Wednesday 31 January 2024

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांची एम. एस. आर. डिसीच्या मँनेजिंग डायरेक्टरपदी बदली !

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांची एम. एस. आर. डिसीच्या मँनेजिंग डायरेक्टरपदी बदली !

कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात ठाणे जिल्हा परिषदेत आपल्या कार्य कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणारे २०१७ बॅचचे आईएएस अधिकारी मनूज जिंदल यांची एम. एस. आर. डिसीच्या जॉइंट मँनेजिंग डायरेक्टर पदी बदली झाली आहे. एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात ठाणे जिल्हा हा २ नंबरचा मानला जातो, या जिल्ह्याचे शहरी व ग्रामीण असे दोन भाग पडतात, या जिल्ह्यात एक वर्षांपूर्वी मनूज जिंदल यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली, २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी युपीएससी एनडीए परीक्षेत आँल इंडिया मधून १८ व्या रँकने उर्तीण झालेले या अधिकां-यानी पदभार स्विकारताच मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली, शहापूर, मुरबाड, या मागास तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले, कुपोषण, पाणी पुरवठा, घरकुल योजना आदी बाबतीत स्वतः जातीने पाठपुरावा केला.स्वच्छता अभियान, जलजीवन मिशन, मोदी आवास, सर्वे इत्यादी मध्ये ते नेहमी अग्रेसर राहिले, कातकरी वाडी, आदीवासी वस्ती, मध्ये भेटी देऊन अडचणी समजून त्या दूर केल्या, इतकेच नव्हे तर कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी वाडी येथील ३/२ चा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली व अखेरीस मंजुरी मिळाली.

अतिवृष्टी व पुर परिस्थितीत प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना यंत्रणेसह उपस्थित राह्याला सांगून शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचते की नाही यावर लक्ष ठेवले व मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर जबरदस्त वचक व तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला. कोणत्याही शासकीय योजना अथवा अभिमान राबविण्यात ठाणे जिल्हा राज्यात नेहमी अग्रेसर राहिला. यातून त्यांची कार्य तत्परता व कर्तव्यनिष्ठता दिसून आली.

अशा या चांगल्या अधिका-याची अचानक एम. एस‌ आर. डिसीच्या जॉइंट मँनेजिंग डायरेक्टर पदी बदली झाली आहे. त्यांना अजून काही वर्षे कालावधी मिळाला असता तर त्यांनी ठाणे जिल्हा यशाच्या उंच शिखरावर पोहचला असता, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यांच्या बदलीमुळे एका चांगल्या आईएएस अधिकां-याची पोखळी भरून निघेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

*प्रतिक्रिया __

मा‌. श्री. मनूज जिंदल (माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद) -
ही बदली मला अनपेक्षित आहे, पण शासनाच्या मर्जीपुढे काय? त्यांनी मला एम एस आरडिसीचे काम करण्याची संधी दिली आहे.

जिजाऊ संघटनेच्या कल्याण प्रमुख नम्रता ठाकरे यांना एकविरा कला संस्था पनवेल यांच्या कडून "भुमीकन्या, पुरस्कार ! सर्वांकडून अभिनंदन !!

जिजाऊ संघटनेच्या कल्याण प्रमुख नम्रता ठाकरे यांना एकविरा कला संस्था पनवेल यांच्या कडून "भुमीकन्या, पुरस्कार ! सर्वांकडून अभिनंदन !!

कल्याण, (संजय कांबळे) : संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सामाजिक, सांकृतिक, आणि आर्थिक क्षेत्रात भरीव व समाजपयोगी, लोकोपयोगी कामे करणाऱ्या जिजाऊ या सामाजिक संघटनेच्या कल्याण प्रमुख तथा केलणी कोलम येथील रहिवासी असलेल्या सौ. नम्रता ज्ञानेश्वर ठाकरे यांना रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील 'एकविरा कला संस्था तसेच गायक, दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या वतीने "भुमीकन्या २०२४ हा पुरस्कार मिळाला असून यामुळे जिजाऊ संघटनेसह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कल्याण तालुक्यातील केलणी कोलम ग्रामपंचायत हद्दीतील नम्रता ठाकरे या काही वर्षांपासून जिजाऊ या सामाजिक संघटनेत काम करत आहेत. संपूर्ण कल्याण, मुरबाड, शहापूर, आदी तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी यांच्या साठी नम्रता ठाकरे या सतत कार्यरत असतात. त्यांचे प्रश्न, अडचणी, समस्या, सोडवण्यासाठी त्या नेहमी आघाडीवर असतात, संघटनेच्या माध्यमातून मदत, महिला सक्षमीकरण, वृक्षलागवड, विविध शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्या मदत करतात. त्यामुळे त्या सर्व परिचित असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील एकविरा कला संस्था व गायक, दिग्दर्शक तेजेस पाटील यांच्या तर्फे 'भुमीकन्या पुरस्कार २०२४, हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे तेजेस पाटील, वसत शेलवली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मधू राणे आदी मंडळी उपस्थित होते.
तर भुमीकन्या पुरस्कार मिळाल्याबद्ल जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे व इतर पदाधिकारी तसेच जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे आदीनी सौ ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

Tuesday 30 January 2024

कल्याण पश्चिमचे आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर यांच्याकडून 'दिवंगत पत्रकार स्वदेश मालवीय' याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत !!

कल्याण पश्चिमचे आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर यांच्याकडून 'दिवंगत पत्रकार स्वदेश मालवीय' याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत !!

*मोठ्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार*

कल्याण, सचिन बुटाला : कल्याणातील वरिष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही न्युज चॅनेलचे प्रतिनिधी स्वदेश मालवीय यांना ब्रेन हॅमरेज या आजारासाठी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे २७ जानेवारी रोजी निधन झाले आहे. त्यांच्या वर उपचार सुरू असतानाच मा. आमदार विश्वनाथ यांनी तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. पण पत्रकार स्वदेश मालवीय यांचे दुःखद निधन झाले.

आमदार विश्वनाथ भोईर यांनी मालवीय कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच जाहीर केलेली १ लाख रुपयांची आर्थिक मदतही त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द केली. त्यासोबतच स्वदेश मालवीय यांच्या मोठ्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही आपण करणार असल्याचे आमदार भोईर साहेब यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. 

यावेळी स्वदेश मालवीय यांचे इतर कुटुंब सदस्य आणि कल्याणमधील विविध पत्रकार बांधवही उपस्थित होते.

Monday 29 January 2024

कल्याण येथे एस.सी.एच.आय तर्फे ८ ते ११ फेब्रुवारी रोजी प्रॉपर्टी प्रदर्शन !!

कल्याण येथे एस.सी.एच.आय तर्फे ८ ते ११ फेब्रुवारी रोजी प्रॉपर्टी प्रदर्शन !!

कल्याण, सचिन बुटाला : सर्व सामान्य माणसाला आज मुंबईत घर घेणं जवळपास अशक्य झाले आहे. अशावेळी लोकांचा कल कल्याण डोंबिवली शहराकडे वाढला आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वसाधारण लोकांना परवडतील अशी रेरा रजिस्टर घरांचे बांधकाम एस.सी.एच.आयने करण्याचे निश्चित केले असून त्याचे बरोबर मुंबईप्रमाणेच अत्याधुनिक सोयीसुविधा व प्रशस्त घरांची निर्मिती सुध्दा केली आहे. या सर्व प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी दरवर्षी एस.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या तर्फे कल्याणामध्ये प्रॉपर्टी प्रदर्शन भरविते. असे दर्जेदार १३ वे प्रदर्शन ८ ते ११ फेब्रुवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भरत छेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, एक्झीबिशन कमिटी सचिव सुनिल चव्हाण, प्रमुख सल्लागार तथा माजी अध्यक्ष रवि पाटील आदि उपस्थित होते

यावेळी अध्यक्ष छेडा म्हणाले, या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणे, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे.१६ लाखापासून सुरू होणारी आणि १ करोड पर्यंत घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहे. तर माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना परवडतील अशी मनपसंत घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एस.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात ४० हुन अधिक विकासकांचे १५० हुन अधिक प्रोजेक्ट सादर करणार आहेत. दरवर्षी या प्रदर्शनाला २५ हजारहून अधिक नागरीक भेट देतात. यावेळी रवी पाटील यांनी सांगितले वाढत्या लोकसंख्येकरता स्वतंत्र धरणासाठी एस.सी.एच.आयकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक विचार करून होकार दिला आहे. 

या प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आणि पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड व सुप्रसिध्द अभिनेत्री शमिता शेट्टी उपस्थित राहणार आहेत.

१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, OMR च्या जागी मिळणार ऑनलाईन गुणपत्रिका !!

१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, OMR च्या जागी मिळणार ऑनलाईन गुणपत्रिका !!

मुंबई - निलेश कोकमकर

इयत्ता १० वी व इ. १२ वीच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक शिक्षक व शैक्षणिक घटकांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. 

दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. याची दखल घेऊन राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून प्रथमच प्रात्यक्षिकांचे गुण ‘ओएमआर’ गुणपत्रिकांऐवजी ऑनलाईन भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहे, आणि यामुळे बनावट गुणास आळा बसणार आहे. असे मत राज्य शिक्षण मंडळाचे आहे.

राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा १० ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होईल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत. 

प्रात्यक्षिक व तोंडी श्रेणीअंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीत देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा घेतली जाणार आहे. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले, अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी ज्या-त्या कनिष्ठ महाविद्यालय, शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

राज्य मंडळाकडून दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. १२ वीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रवारी, तर दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. कोरोना काळात मोठी सुट्टी मिळाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव अद्यापही कमी असल्याने राज्य मंडळाने यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त दहा मिनिटे वाढवून देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. 

कोल्हापूर बोर्डाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी म्हटलं की, “यावर्षी प्रात्यक्षिक, तोंडी ‘परीक्षेचे गुण ‘ओएमआर’ सीटवर न भरता प्राचार्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना आहेत. 

दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहेत. विज्ञानाचे प्रयोग न घेता अनेक ठिकाणी तुकड्या बंद पडू नयेत, यासाठी दाखले गोळा करून यादीवर विद्यार्थी संख्या दाखविली जाते, अशा तक्रारी आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास राज्य मंडळाकडून महाविद्यालयास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे असे देखील समजते.

अनेक वर्षे अविरतपणे यशस्वी वाटचाल करणाऱ्या नवतरूण मित्र मंडळ मुंबई संस्थेतर्फे कोकणच्या नमनचे आयोजन !!

अनेक वर्षे अविरतपणे यशस्वी वाटचाल करणाऱ्या नवतरूण मित्र मंडळ मुंबई संस्थेतर्फे कोकणच्या नमनचे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /दीपक कारकर) :
                अनेक वर्षे विविध क्षेत्रात अविरतपणे यशस्वी वाटचाल करणाऱ्या नवतरूण मित्र मंडळ मुंबई संस्थेतर्फे कोकणच्या नमनचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे मांडरकरवाडी या वाडीमधील रहिवासी नोकरी, काम-धंदा निमित्ताने मुंबईत स्थानिक होऊन नवतरूण मित्र मंडळ मुंबई या मंडळाची स्थापना केली. अनेक वर्षे कार्यरत असलेले मंडळ या मंडळाने गेल्या वर्षी जय मानोबा मंदिर जिर्णोध्दार निधीसाठी कोकणची लोककला बहूरंगी नमन आयोजित केले होते. मंडळाचे शिलेदार अध्यक्ष-अशोक मांडरकर, सचिव- गणपत निवळेकर, खजिनदार- नारायण मांडरकर‌ आणि सर्व कार्यकारी कमिटी सभासद यांनी कोकणच्या मातीतील कला जपावी म्हणून पुन्हा एकदा श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मावळंगे (मांडरकरवाडी), यांचे बहूरंगी नमन रविवार दि.४ फेब्रुवारी २०२४, रोजी दुपारी ४ वा. मुंबई मधील नाविन्यपूर्ण नाट्यगृह साहित्य संघ मंदिर चर्नी रोड गिरगाव येथे आयोजित केले आहे. गेल्या वर्षी याच रंगमंचावर लोककला जोपासण्याचा प्रयत्न केला. रसिक प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळे विषय हाताळत ह्या संपूर्ण टिमने समाजात आणि रंगमंचावर कलाविष्कारात अस्तित्व जपल. यावर्षी पुन्हा नव्याने २५ हौशी कलाकार घेऊन रंगमंचावर उभे राहणार आहेत. पुरूष पात्र स्त्री पात्राचा साजशृंगार करून गणगौळण आणि कैदी चंदनपूरचा ही  नाट्यकृती सादर करणार आहेत. नाट्यकृती लेखक- संदिप कानसे, दिग्दर्शक -दिनेश गं. मांडरकर यांनी केलं आहे. गीतकार-गोपाळ करंडे, गायक- दिनेश मांडरकर, वेदांत मांडरकर, विनायक मांडरकर. कार्यक्रमाचे सुञधार-किशोर मांडरकर, तुकाराम मांडरकर, मार्गदर्शक -सुरेश मांडरकर, दत्ताराम मांडरकर यांनी केलेले आहे. तरी कोकणातील नमन, शक्ती -तुरा कलाप्रेमी रसिक मायबाप उपस्थित राहून कला जोपासण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.

वसत शेलवली ग्रामपंचायतीच्या वतीने ख-या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा, पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थीचा शैक्षणिक खर्च उचलला, तर शाळेला इंटरनेट सेवेचे पँकेज !

वसत शेलवली ग्रामपंचायतीच्या वतीने ख-या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा, पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थीचा शैक्षणिक खर्च उचलला, तर शाळेला इंटरनेट सेवेचे पँकेज !

कल्याण, (संजय कांबळे) : लोकशाही म्हणजे, लोकांनी लोकासाठी चालवलेली यंत्रणा, असे ढोबळ मानाने म्हटले जाते, याचे तंतोतंत उदाहरण व अंमलबजावणी कल्याण तालुक्यातील वसत शेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच रवी भोईर यांनी केली असून' तान्वेश भोईर,फांऊंडेशन च्या वतीने २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावातील आदिवासी समाजातील गरीब मुलांचे इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण, त्याचा खर्च करण्यात येणार असून इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद शाळेला इंटरनेट पँकेज वर्षभरासाठी पुरविण्यात येणार आहे, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसत शेलवली हे गाव वसले आहे, या गावचे सरपंच रवी भोईर हे सतत वेगळेपण जपण्यासाठी आग्रही असतात, आपली सरपंच पदी निवड होताच, या पदाचे सर्व मानधन गाव व परिसरातील गोरगरीब कुंटूब व मुलांना दिले होते, त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार ही मिळाला आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारले व २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आले. तेव्हा पासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून वसत शेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच रवी भोईर यांनी अतिशय चांगला संकल्प केला. तान्वेष भोईर, फांऊंडेशन च्या वतीने गावातील आदिवासी वस्तीमधील हुशार ५ मुलांचे त्यांचे इयत्ता १ते पदवी (बीए) पर्यंत चे शिक्षण, त्यांचा सर्व खर्च करण्याचा निर्णय घेतला, इतकेच नव्हे तर देशाचे भावी नागरिक घडविणा-या १ ते ७वी जिल्हा परिषद शाळेला वर्षभर इंटरनेट पँकेज देण्यात येणार आहे, प्रत्येक वेळी ६ हजार रुपयेचा रिचार्ज ते करणार आहेत, १०४ विद्यार्थी असलेल्या या शाळेत संतोष मिडगे, मुख्याध्यापक, उमादेवी पाटील, दिप्ती गांगुर्डे हे शिक्षक ज्ञान देण्याचे काम करतात.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास सुरेश भोईर, भाजपा, उपाध्यक्ष, ठाणे ग्रामीण, सरपंच रवी भोईर, उपसरपंच, रुपेश जाधव, सदस्य जयश्री मार्के, उषा हरणे, जिजाबाई भोईर, भास्कर भोईर, विजय गोरे, ग्रामसेविका, पूनम गगे, जेष्ठ नागरिक मनोहर गोरे, हनुमान भोईर, माजी सदस्य लक्ष्मण मुकणे, सोमनाथ जाधव, आदी मंडळी उपस्थित होते, यावेळी सरपंच रवी भोईर यांना विचारले असता ते म्हणाले, आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोकोपयोगी निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. तर अनेकाकडून सरपंच रवी भोईर यांचे अभिनंदन ही केले जाते आहे तसेच असेच अनुकरण इतर सरपंच व सदस्यांनी केले तर ख-या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा होईल अशी प्रतिक्रिया अँड सुनील गायकर यांनी व्यक्त केली..

Sunday 28 January 2024

आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर्स स्पर्धा 2024 !!

आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर्स स्पर्धा 2024 !!

*एकूण ₹1,50,000/- ची रोख बक्षिसे*

कल्याण, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन 'व्यवसायिक श्री संतोष सोपान डावखर व त्यांची टीम' करीत असतात.
 
या वर्षी पुन्हा एकदा विद्यार्थ्यां मधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर्स स्पर्धा येत्या २९ व ३० जानेवारी २०२४ रोजी रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत आयोजित करत आहोत. दर वर्षी अंदाजे २५००० हुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात

सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे. आम्ही शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख, पारितोषिक, विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकूण 'दिड लाख रुपयां'ची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. यात या वर्षी ५० हुन जास्त शाळा सहभागी झाल्या आहेत.

कोकण वासियांची कल्याण स्थानकातून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी !!

कोकण वासियांची कल्याण स्थानकातून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण हे ऐतिहासिक शहरासोबत एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून येथे आजूबाजूच्या बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, आसनगाव, शहापूर, मुरबाड, डोंबिवली व कल्याण येथे मोठ्या प्रमाणावर कोकण वासियांची वस्ती असून यांना आपल्या गावी जायचं झाले तर ठाणे किंवा पनवेल या शिवाय दुसरा पर्याय नाही जो अत्यंत अडचणीचा व त्रासदायक आहे.

कल्याण येथील कोकण वासियांनी या संदर्भात रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि. या संस्थेच्या अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण येथून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या कोकणात जाण्यासाठी सोडाव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. 

रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ०४.०० वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या सह्यांच्या मोहिमेमध्ये कल्याण तसेच आजूबाजूच्या शहरातील नागरिक प्रवाशांनी भरघोस पाठिंबा दिला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा संस्थापक अध्यक्ष बुवा यशवंत सदाशिव परब, अनिल गायकवाड, शंकर पेंडुरकर, राजेंद्र गावडे, प्रवीण टोले, संतोष मोरे ,विजय सुर्वे, सुधिर गोवळकर महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.उमेश भारती, पंकज डोईफोडे, मनोज गोस्वामी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने नियोजन करून  पार पडला अशी माहिती  सुनील उतेकर यांनी दिली होती वेळात वेळ काडून मोहीमेत सामील झालेल्या  सर्वांचे आभार व धन्यवाद मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात "नमन " प्रयोगाचे आयोजन !!

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात "नमन " प्रयोगाचे आयोजन !!

"लोकं काय म्हणतील ?" नाट्यकृती देईल हास्याची मेजवानी व प्रेरणादायी सामाजिक संदेश...
 

मुंबई,  (दिपक कारकर/शांताराम गुडेकर) :
 
            चिपळूण तालुक्यातील अंतीम टोकाच्या कातळसर ग्रामीण भागात वसलेल्या मौजे मुर्तवडे ( कातळवाडी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ) गावातील "नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि. ) मंडळ गेली अनेक वर्षे नमन कलेचं जतन - संवर्धन करत आहे.उपरोक्त मंडळातर्फे खास रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव बुधवार दि.०७ फेब्रुवारी  २०२४ रोजी रात्रौ ठीक ०८.३० वा.मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले पूर्व, मुंबई  येथे ग्रामदैवत आई श्री वाघजाई देवीच्या कृपेने "नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि.) प्रस्तुत/आयोजित, सखाराम लक्ष्मण नेवरेकर निर्मित व अक्षय य.नेवरेकर संकल्पित कोकणची लोककला जपणारे "ग्रामीण - मुंबई रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नमन'' या वर्षातील शुभारंभ प्रयोग सादर करणार आहे. साहित्य संघ गिरगांव येथे १३ जानेवारी २०२४ रोजी हा शो हाऊस फुल्ल झाला होता. यामध्ये दमदार खेळे, श्री गणेश आराधना गण,राधा - कृष्णाची प्रेमलीला - गवळण,सहित नावीन्यपूर्ण नाट्य कलाकृती करण्यासाठी मंडळाचे यशस्वी कलाकार पुन्हा एकदा सज्ज झाले असून "मराठीची अस्मिता जपणारा आणि कोकणची लोककला जोपासणारा एक मराठमोळा कार्यक्रम मृदुंगमणी/ढोलकीपट्टू अक्षय नेवरेकर, संगीतकार मास्टर सुधाकर धा.नेवरेकर,पॅड मास्टर सतीश रा.नेवरेकर, गीतकार मास्टर सुरेंद्र दे.नेवरेकर, दिग्दर्शक महेश नेवरेकर सह अजय कारकर यांच्या साथीने लोकप्रिय गायक/शाहीर रविंद्र भेरे व नवोदित गायिका प्रथमी मोहिते यांची प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या तोंडावर रूळतील अशी सुमधुर गाणी व हास्य मैफिलीत रुतलेली समजातील क्लिष्ट प्रवृत्तीवर भाष्य करणारी प्रबोधनात्मक नाट्यकृती- "लोकं काय म्हणतील....?" रसिक प्रेक्षकांसाठी पाहणे पर्वणीच आहे."नमन" या लोककलेवर प्रेम करणाऱ्या तमाम कोकणवाशीय, मुंबईकर,नाट्यरसिक प्रेक्षकांनी सहकुटुंब,सहपरिवार समवेत उपस्थित राहून हा कार्यक्रम पहावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी संतोष घाणेकर - ९८३३६८९६८२/रमेश कोकमकर -८८५०४२२७९९/रमेश भेकरे - ९५९४३५२८६३/दिपक कारकर- ९९३०५८५१५३ /  पांडुरंग आलिम-  ,७९७७६१२६९५ यांच्याशी संपर्क साधावा.

Saturday 27 January 2024

म्हसा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, यात्रेचे पास, तिकीट, आयकार्ड न देण्याचा ठराव, लोक कलावंत व व्यापाऱ्यांमध्ये समाधान !

म्हसा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, यात्रेचे पास, तिकीट, आयकार्ड न देण्याचा ठराव, लोक कलावंत व व्यापाऱ्यांमध्ये समाधान !

कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध' म्हसा, यात्रेत येणाऱ्या लोकनाट्य व इतर मनोरंजन करणाऱ्या तमाशा व तस्सम प्रकारच्या कार्यक्रमासाठी कोणालाही मोफत पास, तिकीट, अथवा आयकार्ड न देण्याचा ऐतिहासिक निर्णय म्हसा ग्रामपंचायतीने घेतला असून तसा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या या मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे तर "फुकट्या, यात्रेकरुनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील म्हसा ही यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रासह आजुबाजुच्या राज्यातून ही व्यापारी, कलावंत, येते येत असतात, तब्बल १५/२० दिवस चालणाऱ्या या यात्रेत २०लाखांच्या आसपास लोक येतात, घोंगडी, शेतीचे साहित्य, संसार उपयोगी साहित्य, बैलजोडी यासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. याबरोबरच लोकनाट्य तमाशा, मौत का कुवा, अथवा इतर मनोरंजन कार्यक्रम, खेळणी, पाळणे असेही या ठिकाणी येतात. मात्र अनेक लोक' अमुक तमूकचे नाव सांगून मोफत पास घेतात, येवढ्या वरच न थांबता ते अजून आपल्या मित्रमंडळी व नातेवाईक यांनाही पास, तिकीट, आयकार्ड घेऊन जातात. यामुळे या कलाकारांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तसे त्यांनी अनेक वेळी ग्रामपंचायत व प्रशासनाला बोलून दाखवले होते.

मागील काही अनुभव पाहता ४/५ हजार पास, तिकीट, आयकार्ड घेऊन गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे यावर्षी आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत म्हसा यात्रेत कोणालाही पास 'तिकीट, अथवा आयकार्ड द्यायचे नाही असा निर्णय घेण्यात आला, तसा ठराव घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस देण्यात आल्या.

म्हसा ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहके आणि प्रभारी सरपंच दिनेश कुर्ले यांनी ताबडतोब सदस्यांची बैठक बोलावून विषय क्रमांक १८/१ आणि ठराव क्र १८/१ नुसार पास न देण्याचा विषय मांडला याबाबतची सूचना सदस्यां जया प्रविण घागस, लता नंदकुमार ढमणे, माधुरी सारथी गायकर, आणि वाराबाई काळुराम वाघ यांनी मांडली तर याला अनुमोदन विठ्ठल जानू कुर्ले,व रमेश गोविंद कुर्ले यांनी देऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एवढ्यावरच ग्रामपंचायत न थांबता याचे बँनर बनवून ते यात्रेत जागोजागी लावून अंमलबजावणी केली, त्यामुळे व्यापारी, दूकानदार, स्टाँलधारक, खेळणी, पाळणे, लोकनाट्य मंडळी यांनी समाधान व्यक्त केले तसेच ग्रामपंचायतीचे आभार मानले तर यामुळे' फुकट्या, यात्रेकरुचे 'बारा, वाजले, हे सर्व आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, लोकप्रतिनिधी, म्हसा ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच दिनेश कुर्ले व सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने केले असे म्हसा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी टोहके यांनी सांगितले.

कांगोरीगड माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न !!

कांगोरीगड माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         कांगोरीगड माध्यमिक विद्यालय येथे भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहन सोहळा शाळेतील नाईक बबन बाबू मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयात गेली ३७ वर्ष सेवा देणारे तसेच विना अनुदानित तत्त्वावर कमी पगारात बबन मोरे हे काम करत आहे. एप्रिल महिन्यात त्यांचा सेवानिवृत्त सोहळा होणार आहे. त्यानिमित्त यंदा शाळेत ध्वजारोहन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भारतीय सीमा शुल्कचे अधिकारी पांडुरंग दाभेकर, मुख्याध्यापक शिंदे सर , क्रीडा प्रमुख सुरवसे सर, कला शिक्षक एस के सुतार आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून यावेळी वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.

केअरिंग हॅण्ड संस्था द्वारा संचालित, ॲड. रामराव चोगले सेवा कुटीर येथे प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न !!

केअरिंग हॅण्ड संस्था द्वारा संचालित, ॲड. रामराव चोगले सेवा कुटीर येथे प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न !!

मुंबई, (मोहन कदम /शांताराम गुडेकर) :

              दाते दांपत्याच्या सेवाश्रमातून स्थापित,पाली गावातील केअरिंग हॅण्ड संस्था द्वारा संचालित, ऍड.रामराव चोगले सेवा कुटीर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न झाला. विविध महाविद्यालयातील युवक युवती, स्थानिक ग्रामस्थ, एसपीएस ट्रस्ट संचालक श्री.मंगेश रासम यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिजन इंडिया अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जल्लोष व्यक्त करताना संयम बाळगणे वर्तमानाची गरज आहे. तसेच  सर्व युवानी प्रजासत्ताक दिनाच्या शतक महोत्सवासाठी पुढील २५ वर्षे सातत्याने कार्यरत राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन स्वप्नील राणी नंदकुमार यांनी ध्वजारोहण पश्चात व्यक्त केले. विकास जगताप, प्रियांका जगताप, शुभम वंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाकुटिर येथे वास्तव्यास असणाऱ्या बालकांनी या प्रसंगी आपली कला सादर केली. उपस्थित मान्यवर आणि अन्य ग्रामस्थ यांनी त्यांच्या कलेला दाद देत कौतुक केले.

Friday 26 January 2024

मा. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखालील'रोजगार आपल्या दारी' उपक्रम यशस्वी !

मा. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखालील
'रोजगार आपल्या दारी' उपक्रम यशस्वी ! 

*१ हजार १०० जणांना मिळाला हक्काचा रोजगार*

कल्याण, नारायण सुरोशी : हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकरण या तत्त्वानुसार शिवसेना कल्याण शहरच्या पुढाकाराने मा. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार आपल्या दारी या उपक्रमाचे कल्याण पश्चिमेच्या वायले हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.

कल्याण पश्चिम विधानसभा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'रोजगार आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल १ हजार १०० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. यामुळे उपस्थित तरुण तरुणींच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता

सकाळपासूनच या रोजगार मेळाव्याला कल्याण पश्चिम मतदारसंघासह आसपासच्या परिसरातील हजारो तरुण तरुणींनी मोठी गर्दी केली होती. 

या रोजगार मेळाव्यामध्ये खासगी क्षेत्रातील ४५ विविध कंपन्यांसह राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी दोन हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यापैकी पात्र झालेल्या १ हजार १०० च्या आसपास उमेदवारांना यावेळी नियुक्ती पत्रे (ऑफर लेटर) देण्यात आले. यावेळी संबंधित आभार मानले.

या रोजगार मेळाव्याला माझ्यासह उपनेते प्रकाशजी पाटील साहेब, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आमदार शांताराम मोरे, महिला जिल्हा संघटक सौ.छायाताई वाघमारे, शहरप्रमुख रवी पाटील, माजी महापौर सौ.वैजयंतीताई घोलप, महिला शहर संघटक सौ.नेत्राताई उगले, विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, संजय पाटील, मयूर पाटील, उपशहरप्रमुख सुनिल वायले, मोहन उगले, सुनील खारुक, विद्याधर भोईर, नरेंद्र कामात, मा.नगरसेविका सौ.शालिनीताई वायले, मा. नगरसेवक जयवंत भोईर, गणेश जाधव, श्रेयस समेळ, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मेरा देश मेरा गुरुर” देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम संपन्न !!

“मेरा देश मेरा गुरुर” देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम संपन्न !!
 
रायगड, प्रतिनिधी : रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मेरा देश मेरा गुरुर हा देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.

मेघा चित्रमंदिर येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस  अधीक्षक सोमनाथ घार्गे,उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजीत बडे यांसह विविध अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यांग व विशेष कलाकरांनी सादर केलेले कार्यक्रम कौतुकास्पद आहे. निसर्गाने या व्यक्तींना विशेष देणगी दिलेली असते त्याचा प्रचिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. अतिशय दिमाखदार व आकर्षक तसेच प्रभावी नृत्य व गीत सादर करणाऱ्यां सर्व कलाकारांचे मंत्री कु.आदिती तटकरे यांनी कौतुक करुन त्यांना शुभेच्दा दिल्या तसेच सन्मानही केला.

गीता पडुवाल आणि टीम ने उत्कृष्ट संस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.

भिवंडीत ७ लाखांच्या बनावट "जिरं"सह दोघांना अटक !!

भिवंडीत ७ लाखांच्या  बनावट "जिरं"सह दोघांना अटक !!

भिवंडी, दिं,२६, अरुण पाटील (कोपर) :
           भिवंडीत ७ लाखांचे बनावट "जिरं" विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून या प्रकरणी दोन जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
           भिवंडीमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून या प्रकरणी दोन जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शादाब इस्लाम खान (वय ३३ वर्ष, रा.नवली फाटा पालघर) व चेतन रमेशभाई गांधी (वय ३४ वर्ष रा.कांदिवली पश्चिम) असे बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
          भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९० फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जीरा आढळला. पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या ८० गोन्यांमधील ७ लाख १९ हजार ७०० रुपये किंमती मधून सुमारे साडेतीन टन बनावट जिरे माल व ४ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सुमारे  ११ लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे.
             वाशी ,नवी मुंबई एपीएमसी मार्केट, भिवंडी, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल, धाब्यांवर हे जिरे विक्रीसाठी पाठवण्यात येत होते. धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्‍याचा सर्रास वापर केला जात असल्याचं देखील समोर आलं होतं. शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील बंद केले असून आरोपींना न्यायालयात हजर केले. या आरोपींना २७  जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

चाळीस वर्षे एकनिष्ठ, पक्षनिष्ठ राहिलेल्या गुरवली गावच्या जयराम मेहेर यांची मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती, अभिनंदनाचा वर्षाव !

चाळीस वर्षे एकनिष्ठ, पक्षनिष्ठ राहिलेल्या गुरवली गावच्या जयराम मेहेर यांची मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती, अभिनंदनाचा वर्षाव !

कल्याण, (संजय कांबळे) : सध्या राजकारणाचा चिखल झालेला असताना या चिखलात अनेक जण 'बेडूक, उड्या मारत आहेत अशाही परिस्थितीत गेली, ४० वर्षाहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर अढळ विश्वास ठेवून काम करणारे पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते, ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माझी सदस्य आणि गुरवली ग्रामपंचायतीचे अनेक वेळा सरपंच पद भूषविलेले जयराम पांडुरंग मेहेर यांची मुरबाड विधानसभेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे पक्षातील पदाधिकाऱ्यांसह इतरांनी देखील अभिनंदन केले आहे.

कल्याण तालुक्यातील आणि टिटवाळा शहरानजीक काळु नदीच्या काठावर वसलेल्या गुरवली गावचे जयराम पांडुरंग मेहेर हे १९७२ पासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत आहेत, नवीन व स्वतः ला पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांनी स्वतः चे सरपंच पद 'जोशी, नामक इतर सदस्यांला दिले व ते उपसरपंच झाले, यानंतर मात्र २००५ पर्यत ते २ वेळा सरपंच झाले,
ख-या अर्थाने मुरबाड चे कार्यसम्राट आमदार गोटिराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव असलेले मेहेर हे २००२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सदस्य झाले, या संधीचा फायदा उचलत निंबवली, वासुर्दी, गुरवली, राया, सांगोडा, नांदप, खडवली, घोटसई, आदी गावामध्ये शाळा इमारती तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी बांधल्या, याशिवाय घोटसई, गुरवली, मानिवली, भोंगाळपाडा, गुरवली इत्यादी गावातील अंतर्गत रस्ते बनवून घेतले. सन १९८४ पासून ते आतापर्यंत जयराम मेहेर हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले, या काळात अजित पवारासह अनेक आमदार, पदाधिकारी शरद पवार यांना सोडून गेले, वैयक्तिक स्वार्थ, इडी, इनकम टँक्स, सीबीआय आदी यंत्रणांना घाबरून शिवसेनेसह सर्वच पक्षातील आमदार, खासदार यांनी, अपक्षासह इकडून तिकडे बेडूक उड्या मारल्या व भविष्यात मारतील, मात्र याला स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते बळी पडले नाहीत, लोकप्रतिनिधी इकडून तिकडे गेले असलेतरी सर्व सामान्य जनता, मतदार हा शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या मागे आहेत, तसे ते बोलूनही दाखवतात, याचाच प्रत्यय ४० वर्षाहून अधिक काळ एकनिष्ठ पक्षनिष्ठ राहिलेल्या जयराम मेहेर यांची मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे

शांत, संयमी, मितभाषी, जनमानसात चांगली प्रतिमा असलेले, जेष्ठ, तसेच अभ्यासू, तळागाळातील लोकाबरोबर काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले जयराम मेहेर यांच्या निवडीने त्यांच्या एकनिष्ठतेचा पक्षाने सन्मान केला आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, काशिनाथ पाटील, प्रदेश उपाध्यक्ष श्री पवार, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष वंडारशेठ पाटील, पालघर ठाणे प्रभारी विद्याताई वेंखडे, शहापूर चे मनोज विशे, मुरबाड चे दिपक वाकचौरे, अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सोमनाथ मिरकुटे, उबाठा चे विश्वनाथ जाधव, अल्पेश भोईर, संजय मोरे,संतोष शेलार, ज्ञानेश्वर पाटील, विनायक काळण, संतोष कुशविले,संतोष कोर, यांच्या सह पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, सचिन बुटाला, आदी नी मेहेर यांचे अभिनंदन केले आहे.

समेळगावातुन महिलांनी हजारो मराठा बांधवांसाठी पाठवली शिदोरी....

समेळगावातुन महिलांनी हजारो मराठा बांधवांसाठी पाठवली शिदोरी....

*समेळगावातील महिलांनी एकत्र येत जपली सामाजिक बांधिलकी.* 

नालासोपारा, प्रतिनिधी : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लाखो बांधवासोबत मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी पायी चालत निघाले आहेत. त्यांच्या या कार्यास सहभागी होण्यासाठी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी समेळगावातील महिलांना आव्हाहन केले होते.

समेळगावातील सर्व जाती धर्मातील महिला एकत्र येत मराठा आरक्षणासाठी पायी येत असलेल्या बांधवांसाठी १ हजार चपाती व 5 किलो चटणी, बिस्कीट पुडे, बिस्लरी, फरसाण, व इतर पदार्थ मुंबई येथे पाठवले आहे.

समाजासाठी सगळे मतभेद विसरुन समेळगावातील महिला एकत्र येत आपापल्या घरातुन लागणारे साहित्य जमा केले आहे. महिलांचा एकोपा व एकी हेच बळ हे यातुन दिसुन आले आहे. शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून महिलांना एकत्र आणण्याचे काम केले आहे.

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता शिक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भावना रूचिता नाईक यांनी व्यक्त केली. यावेळी सविता चव्हाण, आशा सातपुते, इंदू गुप्ता, मौसमी कुन्नत, प्रिति माने, सुषमा काकडे, शालिनी सनंसे, काव्य खामकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

आपल्या दैनंदिन अंदाजपत्रकात अध्यात्मिकता आहे का?- संत राजिन्दर सिंह जी महाराज


आपल्या दैनंदिन अंदाजपत्रकात अध्यात्मिकता आहे का?
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज


जगभरातील लोक आपले लक्ष अर्थव्यवस्थेवर केंद्रित करतात आणि आपलं उत्पन्न आणि आवश्यक खर्चासाठी शेवटी जमाखर्च बनवितात. या शिवाय एक वेगळे अंदाजपत्रक आहे त्यावर आपण विचार करू शकतो. आपल्याला पाहिले पाहिजे की या भौतिक संसारात आपण काय जमा करत आहोत? या संसारात आपल्याला जगण्यासाठी श्वासाची निश्चित संख्या दिली आहे. आपण लक्षपूर्वक पाहिले पाहिजे की श्वासाच्या पुंजीचा आपण कसा उपयोग करत आहोत? अथवा प्रभूने दिलेल्या या दिव्य-दाना चे अंदाजपत्रक कसे बनवित आहोत? ही स्वतःलाच विश्लेषण करण्याची चांगली संधी आहे, की आपण या श्वासाचा या पेक्षा चांगला उपयोग करू शकतो का? आपण आपल्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकून पाहिले तर आपण आपला वेळ विनाकारण आणि व्यर्थ खर्च करत आहे का? किंवा आपण याला कोणत्या ध्येयासाठी खर्च करत आहोत? 

आपल्याजवळ दिवसाचे चोवीस तास आहेत. आपली काही श्वासाची पुंजी जीवनाच्या गरजा जसे अन्न,  वस्त्र आणि निवारासाठी खर्च होते. काही श्वास शरीराच्या काही नेहमीच्या परीश्रमामध्ये  खर्च करतो. आपल्याला आपला वेळ शरीराची काळजी जसे जेवण, स्नान,  तयारी करणे,  झोपणे आणि शारीरिक श्रमामध्ये सुद्धा खर्च करावा लागतो. आपल्याला नेहमीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे कमवायला वेळ द्यावा लागतो. 

आपल्याला नोकरीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आपण शाळेत अथवा कॉलेजमध्ये जावे लागते. आपल्याला आपल्या परिवाराची काळजी घेण्याची आवश्यकता असते. आपण समाजासाठी काही योगदान देऊ इच्छितो आहे अथवा दुसऱ्यांना साहाय्य करू इच्छितो तेव्हा या सर्व कार्यासाठी आपला पुष्कळसा वेळ खर्च होतो. या शिवाय आपल्या जवळ जो वेळ शिल्लक राहतो, तो आपण आपल्या इच्छेनुसार खर्च करू शकतो. आता आपल्याला हे पाहावे लागेल की या शिल्लक राहिलेल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी आपण कशा प्रकारे अंदाजपत्रक करू शकतो? 

संत-महापुरुषांच्या शिकवणुकींनुसार अध्यात्मिक मार्ग अनुसरण करणारे लोक याच जीवन काळात आत्मज्ञान आणि परमात्मा प्राप्तीचे ध्येय निश्चित करतात. संत-महापुरुष आपल्याला शिकवितात की या जीवनानंतर काय होईल? हे जाणण्यासाठी आपल्याला मृत्यूची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. आपण याच जीवनांत जिवंतपणी मरणाची कला शिकून आपल्या अंतरी अध्यात्मिक मंडळ पाहू शकतो. आपण ध्यान-अभ्यासा द्वारे शांत अवस्थेमध्ये बसून आपल्या अंतरी अध्यात्मिक धन-दौलत प्राप्त करू शकतो. यासाठी आपल्याला दररोज ध्यान-अभ्यासासाठी वेळ काढणे आवश्यक आहे.  आपण यासाठी पुरेसा वेळेचा संकल्प केला आहे का?

आत्म्याची काळजी :-

ध्यान-अभ्यासासाठी दररोज अभ्यासाची आवश्यकता आहे, ज्यामुळे आपण आपल्या अंतरी प्रभूच्या दिव्य-ज्योति आणि श्रुतिशी जोडले जाऊ शकतो आणि यापेक्षा पुढच्या मंडळात सुद्धा जाऊ शकतो. अंतरी ध्यान टिकविण्यासाठी नित्य सराव केल्याने आपण यात निपुणता प्राप्त करू शकतो. जसे जीवनात बाकी कार्यात सुद्धा यश मिळवण्यासाठी आपणास सरावाची आवश्यकता असते. ठीक अशाप्रकारे आध्यात्मिक जमाखर्च योजना बनविण्यासाठी किंवा परमात्मा-प्राप्तीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, आपल्याला ध्यान-अभ्यासासाठी दररोज काही वेळ देणे आवश्यक आहे. ज्या प्रकारे आपण बाहेरच्या जगात आर्थिक जमा खर्च बनवितो, त्याचप्रमाणे आपण आपल्या रोजच्या जीवनात ध्यान-अभ्यासाला समाविष्ट करून आध्यात्मिक जमाखर्च बनविला पाहिजे, कारण आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेण्याची आपली जबाबदारी पारपाडतांना आपण आपल्या आत्म्याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.

यासाठी आपण आपल्या वेळाचे विश्लेषण करावे ज्यासाठी आपण एक यादी बनू शकतो,  की आपण आपल्या जीवनात आवश्यक कामधंद्यासाठी किती वेळ खर्च करणार आणि किती वेळ आपण आध्यात्मिकतेसाठी देणार आहोत?  बरेसे लोक आपल्या कामाच्या यादीमध्ये दुनियाच्या कार्याला प्रथम स्थान देतात आणि ध्यान-अभ्यासाला शेवटचे स्थान देतात. चला तर! आपण सर्वात प्रथम ध्यान-अभ्यासासाठी आपला वेळ सुनिश्चित करूया, परत अन्य सर्व जबाबदाऱ्याना पूर्ण करण्यासाठी वेळ निर्धारित करू या. 

तेव्हाच  आपण पूर्ण रूपाने सांगू शकतो की ध्यान-अभ्यास आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण भाग आहे.  काही लोक दिवसाची सुरुवात सकाळी ध्यान-अभ्यासासाठी देतात कारण दिवसाच्या बहुतेक वेळ त्यांना आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात खर्च होतो. जसे की रात्री थकल्या  कारणामुळे ध्यान-अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही. यासाठी हेच खर आहे की आपण आपल्याला दिवसाची सुरवात ध्यान-अभ्यासाला प्राथमिकता देऊन करावी आणि आणि ध्यान अभ्यासाला दिवसाच्या शेवटला करण्यासाठी सोडू नये.
जर आपण ध्यान-अभ्यासाला आपल्या जीवनात एक महत्त्वपूर्ण भाग बनविला तर ही आपली चांगली सवय होईल, तेव्हा आपण आपल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करू शकू. ज्यामुळे, आपण आध्यात्मिकतेचा फायदा घेऊ, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पैलूंची शारीरिक, मानसिक व सामाजिक समृद्धी होईल.

ग्रामपंचायत भूरीटेक येथे सरपंच चषक एकनाथ दरोडा यांच्या हस्ते उद्घघाटन !!

ग्रामपंचायत भूरीटेक येथे सरपंच चषक एकनाथ दरोडा यांच्या हस्ते उद्घघाटन !!

जव्हार-जितेंद्र मोरघा

भूरी टेक ग्रामपंचायत सरपंच चषक 2024 चे उद्घघाटन आज बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की, क्रिकेट स्पर्धा आयोजित करून सरपंच लामठे यांनी तरुणांना एक करून एकीची भावना जोपासली आहे त्याच बरोबर तरुणांनी क्रिकेट खेळाबरोबर कामधंदा पण केला पाहिजे. घराच्या कुटुंबांना मदत केली पाहिजे, भुरीटेक वाशियांच्या प्रत्येक सुखदुःखात मदत करेल व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही या वेळी दिली व सरपंच चषक साठी शुभेच्छा ही दिल्या.यावेळी भुरीटेक सरपंच चषक मधे 15 संघ सहभागी झाले असून हे सामने चार दिवस चालणार आहेत. यावेळी भुरि टेक ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच आत्माराम लामठे साहेब, उपसरपंच धोंगडे साहेब, माजी सरपंच संजय भला, राजेश वातास, नामदेव गवारी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी, रवी सुतक,श्याम लामठे, भास्कर शेवाळे व भुरीटेक येथील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य व क्रिकेट रशिक उपस्थित होते.

रामनगर येथे कल्पेश राऊत यांच्यामार्फत सास्कृतिक व कला महोत्सोवाचे आयोजन !!

रामनगर येथे कल्पेश राऊत यांच्यामार्फत सास्कृतिक व कला महोत्सोवाचे आयोजन !!

जव्हार-जितेंद्र मोरघा

ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्यामार्फत आयोजित सांस्कृतीक कला महोत्सव रामनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी गाव स्वच्छ्ता व 200 झाडूंचे वाटप करण्यात आले असून दुपारी हळदी कुंकू सोहळा आयोजित केला व दुपार नंतर महीलांचे खेळ व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राम पंचायत कासटवाडी मध्ये बघायला गेले तर एका बाजूने विकास कामांचा झपाटा चालू केला असला तरी गावा गावात खेळी मेळीचे वातावरान निर्माण व्हावे गावात सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम व्हावे विद्यार्थांना चागल्या प्रकारे मार्गदर्शन मिळून त्यांना त्यांचा निर्णयक्षमता, सहानुभूती, शिस्त, आणि सहकार्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने असे कार्यक्रम राबविले जातात या प्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुका प्रमुख  विनायक राऊत, माजी  सभापती जिल्हा परिषद पालघर गुलाब विनायक राऊत, कासटवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत, ग्राम.सदस्य कल्याणी कल्पेश राऊत त्रिंबक रावते, नितीन चौधरी, नितीन टोकरे, शंकर इल्हात, व कार्यक्रम कार्यकारणी प्रमोद शेंडे, मनोज भोये, विशाल शेंडे, दीपक काकरा, गोविंद माढा, राजेश खोटरा, व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती धर्मा चौधरी, रघू खोटरा, कूवरा सर, प्रमोद खोटरा, भाऊ नडगे, संतोष मोकाशी, किरण जांजर व ग्रामस्थ उपस्थित होते.

वरळी गावची ग्रामदेवता श्री गोल्फादेवी मातेच्या यात्रेचे अवचित साधून वरळी कोळीवाड्यातील नागरिकांसाठी मोफत वाहन सेवा !!

वरळी गावची ग्रामदेवता श्री गोल्फादेवी मातेच्या यात्रेचे अवचित साधून वरळी कोळीवाड्यातील नागरिकांसाठी मोफत वाहन सेवा !!

*मान. श्री.दीपक केसरकर- पालकमंत्री  मुंबई शहर, श्री.किरण पावसकर -शिवसेना  उपनेते, सचिव व प्रवक्ते, मान. नामदार श्री.मिलिंद देवरा- माजी खासदार, मान श्री.दत्ता नरवरकर - माजी नगरसेवक, विधानसभा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती*

मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :
             वरळी गावची ग्रामदेवता श्री गोल्फादेवी मातेच्या यात्रेचे अवचित साधून मान. श्री.दीपक केसरकर- पालकमंत्री  मुंबई शहर, शालेय शिक्षण तथा  मराठी भाषा मंत्री, त्याचबरोबर मान. नामदार श्री.किरण पावसकर -शिवसेना  उपनेते, सचिव व प्रवक्ते, मान. नामदार श्री.मिलिंद देवरा- माजी खासदार, मान श्री.दत्ता नरवरकर - माजी नगरसेवक, विधानसभा प्रमुख यांच्या उपस्थितीत वरळी कोळीवाड्यातील नागरिकांसाठी मोफत वाहन सेवा, दोन्ही संस्थेच्या मच्छीमारांचे मासे बाजारात नेण्यासाठी वाहन सेवा चालू केली. 

              तसेच ग्राम देवता श्री गोल्फा देवी मातेचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे वरळी कोळीवाड्यातील तारांकित प्रश्न पूर्ण करण्याचे आश्वासित केले. वरळी कोळीवाड्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली त्याबद्दल वरळी कोळीवाड्यातील लोकांनी आभार व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...