**उद्घाटनाच्या दिवशीच ग्रामसेवक निलंबित,,**
मुरबाड , ( श्री.मंगल डोंगरे ) : तालुक्यातील न्हावे या गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरलेले सरपंच जगदिश हिंदुराव, यांचे कारकीर्दीत बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मा.आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. या गावात अगोदरच दोन कार्यालय असताना हे नवीन ग्रामसचिवालय झाले आहे. यामुळे येथूनच ग्रामपंचायतीचा कारभार चालणार आहे. या गावाला प्रशस्त असे ग्राम सचिवालय मिळाल्याने त्या नुतन सचिवालयाचे आमदार किसन कथोरे यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र त्याच दिवशी न्हावे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिपक कासार यांना सीईओ रोहन घुगे यांनी केलेल्या कारवाईत तडकाफडकी निलंबित केल्याने ग्रामपंचायतीच्या कामाचा गौडबंगाल समोर आल्याच्या चर्चैला उधाण आले आहे .
सीईओ श्री.रोहन घुगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांची कार्यपद्धती आणि धमक हि त्यांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत त्यांनी कारवाईचा बडगा उगारला असुन, कामात दिरंगाई, अनियमितता, अफरातफर अशा भोंगळ कारभार करणा-या ग्रामसेवकांच्या छातीत धडकी भरली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एकाच दिवशी मुरबाड तालुक्यातील प-हे व न्हावे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर तात्काळ केलेली निलंबनाची कारवाई हे होय. त्यामुळे तालुक्यातील असे अनेक ग्रामसेवक कारवाईच्या भितीच्या सावटाखाली काम करत असून, सीईओ ची कारवाईची टांगती तलवार कधीही त्यांच्या मानगुटीवर पडुन शकते.अशी आपसात चर्चा सुरु आहे. मात्र ह्या कारवाई झालेल्या ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या कामांना केवळ ग्रामसेवकच जबाबदार आहेत.की गावातील ठेकेदार या अन्य कोणी लोकप्रतिनिधी याबाबत अंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती लवकरच स्पष्ट होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment