Friday 14 December 2018

भिवंडी - चिंबिपाडा येथे होणार गौशाळा

भिवंडी-चिंबीपाडा येथे गौशाळेचे भूमिपूजन

भिवंडी - (प्रतिनिधी)
             प्रत्येक मानवासाठी या भूतलावर घर आहे. प्राण्यांसाठी सुद्धा प्राणी संग्रहालय, घरटे आहेत. खेड्यागावांमध्ये, शेतामध्ये बैल, म्हैस यांच्या साठी गोठे असतात. पण गाईला आपण गोमाता म्हणत असल्याने गाईसाठी गोठ्या बरोबरच आपण गौशाळा बांधत असतो.
          सुसज्ज व सर्व सोयीयुक्त अशी गौशाळा बांधण्यासाठी  भिवंडी तालुक्यातील चिंबिपाडा येथे युवकांनी एकत्र येऊन श्रीराम कृष्णा गौशाला ट्रस्ट ची स्थापना केली. या ट्रस्ट च्या माध्यमातून येथील युवकांनी दोन एकर जागा घेऊन गौशाळा बांधण्याचे ठरविले. त्या जागेचे भूमिपूजन नुकतेच भिवंडी ग्रामीण चे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
         या गोशाळेत सर्व प्रकारच्या गायी आणण्याचा प्रयत्न असेल व ज्या भटक्या गायी असतील त्यांची रीतसर परवानगी घेऊन या गौशाळेत आणण्यात येतील. असे येथील गौशाळेचे संचालक ठाकूर महाराज यांनी सांगितले.
          या जागेमध्ये पाण्यासाठी बोरिंगच्या व्यवस्थेसाठी आमदार मोरे यांचे सहकार्य लाभणार असल्याचे खजिनदार भीमा राठोड यांनी सांगितले.
         भूमीपूजनाच्या कार्यक्रमास आमदार शांताराम मोरे यांच्या सह ठाणे जिल्हा परिषद च्या अध्यक्षा मंजुषा जाधव, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे, समाज कल्याण न्यास चे अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील, जि.प.गट सचिव संदीप पाटील, उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील, चिंबिपाडयाच्या सरपंच नीता जाधव व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
        कार्यक्रमाच्या शेवटी श्रीराम कृष्णा गौशाळेचे अध्यक्ष मनोज वेंडगे यांनी सर्वांचे आभार मानले.

कल्याणमध्ये चंपाषष्ठी उत्सव संपन्न

कल्याणमध्ये चंपाषष्ठी उत्सव जोशात संपन्न

श्री खंडेराय सेवा समितीने केले पालखीचेआयोजन

कल्याण - ( जैनेंन्द्र सैतवाल )
            येथील श्री खंडेराय सेवा समितीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव गुरुवारी शारदा मंदिर हायस्कूल येथे पालखी मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात साजरा केला.
          मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभी मार्तंडभैरव षडरात्रोस्तव सुरू होतो. ज्या प्रमाणे देवीचा नवदिवसाचा नवरात्रोत्सव असतो तसाच श्री मार्तंड भैरवाचा सहा दिवसांचा षडरात्रोत्सव असतो. या उत्सवात अनेक लोक आपल्या घरात घटस्थापना करून सहा दिवस वेगवेगळ्या माळी घालून हा उत्सव साजरा करतात. शेवटच्या दिवशी घट विसर्जन करून ,श्री खंडोबा ची तळी भरून खंडोबाला प्रिय असणाऱ्या भरीत-भाकरीचा, पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून खातात. जे लोक घट स्थापना करीत नाहीत ते तळी आवर्जून भरतात कारण त्या दिवशी खंडोबाने मल्लासुराचा वध करून जेजुरी येथे दोन स्वयंभू लिंगे प्रगट झाली. 
           अनेक उत्सवां पैकी चंपाषष्ठी उत्सव हा गाव-खेड्यात आजही पाळला जातो. परंतु शहरी जीवनात मात्र हा कुळाचार दिवसेंदिवस नाहीसा होत चालला आहे म्हणून आधुनिक शहरी जीवनात नष्ट होत चाललेली तळीची परंपरा व प्रत्येकाला व खास करून युवकांना आपला कुळधर्म, कुळाचार करता यावा म्हणून श्री खंडेराया सेवा समितीने सामुदायिक तळी भंडार हा उपक्रम सुरू केला. असे या समितीचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड व सरचिटणीस अशोक घुगे यांनी सांगितले.
           

Tuesday 11 December 2018

श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा नगरसेवक संजय पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कल्याण - (प्रतिनिधी)
       कल्याण येथे श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स उद्घाटन नगरसेवक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
          गणेश कोते आणि मीनाक्षी जाधव यांच्या श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याआहेत. भाड्याने विविध प्रकारचे फोर व्हिलर्स बसेस, ऑनलाईन ट्रेन आणि विमानाचे तिकीट तसेच हॉटेल बुकिंग आदी सुविधा श्री गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे माजी सैनिक गणेश कोते यांनी सांगितले.
       यावेळी नगरसेवक संजय पाटील यांनी गणेश कोते व मीनाक्षी जाधव यांना नवीन व्यवसाया बद्दल आनंद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर समाजसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हल्ल्याचा मांडा-टिटवाळयात जाहीर निषेध

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याचा मांडा -टिटवाळा शहरातर्फे जाहीर  निषेध.

टिटवाळा - (प्रतिनिधी)
          केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद देशात उमटत आहे.
         रि.पा.इं. चे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर यांच्या नेत्रुत्वाखाली, हल्लेखोर व सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदन कल्याण तालुका पोलीस ठाणे यांना (मांडा टिटवाळा पोलीस स्टेशन) आज देण्यात आले.
           हल्लेखोरावर कठोर कारवाई आणि हल्ल्याच्या सूत्रधारांचा पोलिसांनी लवकर तपास लावावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
         यावेळी सोबत हरीश कांबळे (ठाणे जिल्हा ग्रामिण सचिव ), हांडोरे साहेब (कोकण विभाग उपाध्यक्ष), साईनाथ जाधव (मांडा टिटवाळा शहर उपाध्यक्ष), समिर पाठारे (गायत्रीधाम विभाग उपाध्यक्ष)
आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday 8 December 2018

चोपडा शहरात पो.नि. पाटील यांची बदली केल्याने नागरिकांचे उपोषण

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात पो.नि.किसनराव नजन पाटील यांची बदली केल्यामुळे नागरिकांचे उपोषण

चोपडा वासीयांचा सोमवार/मंगळवारी बंद चा पुकार

                   (जळगाव - प्रतिनिधी)
जळगाव -चोपडा- (८/१२/२०१८)
         येथील पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना दि. ६ डिसेंबर रोजी भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून दुखापत केली होती. परिणामी भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचा बदला म्हणून राज्यातील सत्तेचा उपयोग घेत भाजपने पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली करवून आणली आहे. चोपड्यात राजकारण जिंकले, अधिकारी हरले अशी प्रतिक्रिया उमटत असतांना आज चोपड्यात नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ उपोषण सुरु केले आहे. पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे असे मत नागरिकां कडून बोलले जात आहे. पून्हा चोपडा पो.नि. म्हणून नजन पाटील हेच हवे असी घोषणा देत आहे.
            पोलीस निरीक्षक पाटील यांचा चोपड्यातील दोन वर्षांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला आहे. अवैध धंदे तसेच गुंडगिरी मोडून काढण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले आहे. एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आज चोपडा शहरात नव्हते तर जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली आहे. परंतु राजकारणापुढे सर्वांचीच हार होते तशी पोलीस निरीक्षक पाटील यांच्याबाबतीत देखील घडले आहे. ज्या राजकीय मंडळीवर गुन्हे दाखल आहे अशा लोकां विरुद्ध हदपारीचा प्रस्ताव सुध्दा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी उपोषण केले आहे.
              चोपडा वासीयांचा बंदचा पुकार
                पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने चोपडा येथील नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. पोलिस निरीक्षक पाटील यांची बदली त्वरीत रद्द करावी, या मागणीसाठी चोपड्यातील सर्व पक्षीय कृती समितीचे असंख्य पदाधिकारी, नागरिक आज पोलिस अधिक्षक कार्यालयात आले होते. मात्र पोलिस अधिक्षकांची भेट न झाल्याने त्यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची पदमालय विश्रामगृहावर भेट घेवून संतप्त भावना व्यक्त केल्या.
              आमदार पाटील यांनी भावनांचा आदर करीत लागलीच गृहराजमंत्री केसकर यांच्याशी निदेन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. बदली रद्द करण्याबाबत शिवसेना जिल्ह्यात नजन पाटील यांच्या सोबत आहे.
            चोपडा येथे मात्र सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करीत आमदार पाटील यांना सांगितले, की जर पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली रद्द न झाल्यास दि.१० /१२/२०१८ सोमवार किंवा दि.११/१२/२०१८ मंगळवार रोजी चोपडा शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध करू. काही अनूचीत प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहिल, असा इशारा देण्यात आला आहे.

Monday 3 December 2018

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पोलादपूर - (प्रतिनिधी)
        अबुदाबी (दुबई) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे विनर कप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करीत दैदिप्यमान यश प्राप्त केलेले यशवंत इंग्लिश मिडीम स्कूलचे गुणवंत विद्यार्थी
रुद्र धनंजय शेठ, आर्यन निरंजन मोरे, कौशल नि. देवेे त्यांचा  विघ्नहर्ता ग्रुप वतीने छोटे खानी सत्कार करू त्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी ग्रुपचे अध्यक्ष सिध्देश पवार, अर्थव बुटाला ,अर्चन पाटोळे, अभिषेक जंगम, विक्रांत मोरे, समाधान कुर्डे उपस्थित होते.

विघ्नहर्ता ग्रुप तर्फे आदिवासी वाडीत कपडे वाटप

पोलादपूर आदिवासी वाडीत कपडे वाटप

पोलादपूर - (प्रतिनिधी )
          विघ्नहर्ता ग्रुप पोलादपूर यांच्या वतीने सडवली आदिवासी वाडी येथे कपडे वाटप कार्यक्रम केला त्या वेळी सडवली गावाच्या सरपंच श्रीमती. ताई नतू पवार , माजी उपसरपंच श्री. बापू जाधव, विघ्नहर्ता ग्रुप चे अध्यक्ष सिद्धेश गंगाधर पवार , अथर्व प्र. बुटाला,अर्चन पाटोले, विराज बांदल,शुभम सलागरे,अभिषेक जंगम,प्रथमेश मोहिरे,विक्रांत मोरे,संदीप पांडरकामे,व वाडीतील श्री.रामदास मेस्त्री, अर्जुन पवार , येलू कोल्हे,अक्षय,जानवी,पिंट्या,व इत्यादी लहान मुले व नागरिक उपस्थित होते तसेच काही नागरिकांनी प्रश्न मांडला व विनंती केली कि महिला मंडळासाठी व लहान मुलानं साठी काय तरी द्या तर विघ्नहर्ता ग्रुप चे अथर्व बुटाला यांनी वचन दिल तसेच त्यांच्या सोबत असणारे सर्व ग्रुप चे सदस्यांनी देखील सांघितल कि आम्ही लवकरात लवकर देऊ आणि सर्वांच्या सहकार्य मुळे कार्यक्रम संपन्न झाला.

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !!

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !! पुणे, प्रतिनिधी : भारतीय शालेय खेळ महास...