Monday 31 January 2022

ज्ञानदीप सेवा मंडळ,खोडदे ( मोहितेवाडी ) तर्फे क्रिकेट स्पर्धेतून जोपासली बांधिलकी !!

ज्ञानदीप सेवा मंडळ,खोडदे ( मोहितेवाडी ) तर्फे क्रिकेट स्पर्धेतून जोपासली बांधिलकी !!


मुंबई - ( दिपक कारकर ) :

गुहागर तालुक्यातील खोडदे ( मोहितेवाडी ) गावचं गेली अनेक वर्षे कला/ क्रिडा/सामाजिक/शैक्षणिक/सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे "ज्ञानदीप सेवा मंडळ" उपरोक्त मंडळातर्फे नुकत्याच खोडदे मोहितेवाडी अंतर्गत एकदिवसीय भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा,रविवार दि.३० जानेवारी २०२२ रोजी, खदानी मैदान, नालासोपारा ( पूर्व ) येथे पार पडल्या. वाडीतील युवकांना एकत्रित करून, एकोप्याने खेळून अतिशय स्तुत्य आयोजन करत, वाडीतील तरुणांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत वाडीतील आठ संघमालक व त्यांच्या आठ टीम एकत्रितपणे खेळून स्पर्धेला वेगळेपण दिले. यामध्ये स्टार ईलेव्हन ( संघमालक - सुनिल धनावडे ), श्रीजा ईलेव्हन ( संघमालक - कृष्णा मोहिते ), स्वराज ईलेव्हन ( संघमालक - शंकर धनावडे ) राकेश ईलेव्हन ( संघमालक -अनिल मोहिते ), संदीप ईलेव्हन ( संघमालक - गणपत पाडावे ), सुपर स्टार ईलेव्हन ( संघमालक - सचिन मोहिते ), किंग्ज फायटर ईलेव्हन ( संघमालक - यशवंत मोहिते ), साई ईलेव्हन ( संघमालक - वसंत पाडावे ) याप्रमाणे आठ टीमचे आठ संघमालक व त्यांचे संघ स्पर्धेत सहभागी होते. या दमदार स्पर्धेच्या नियोजनात अंतिम विजेता संघ - सुपर स्टार ईलेव्हन, उपविजेता संघ - श्रीशा ईलेव्हन,तर उत्कृष्ट फलंदाज-सुर्या मोहिते, उत्कृष्ट गोलंदाज-सुशांत धनावडे, मालिकावीर-राकेश मोहिते ठरले. स्पर्धेतील सर्व चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला गावचे सरपंच प्रदिप मोहिते, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मोहिते व मंडळाची कार्यकारिणी-अरुण मोहिते, उमेश धनावडे, दिपक अवेरे, चंद्रकांत मोहिते, कृष्णा तांबे, संजय मोहिते, गणपत मोहिते, नितीन मोहिते, महेश मोहिते, उदय मोहिते, वैभव तांबे, राजेश मोहिते, रामदास मोहिते, श्रीकांत कावणकर, विलास मोहिते, आदित्य मोहिते, चौधरी साहेब आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

कल्याण बस आगारातील एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून राशन किटचे वाटप !! "कल्याण बस आगारातील १३० कर्मचाऱ्यांना जिजाऊ संस्थेचा एक हात मदतीचा"

कल्याण बस आगारातील एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून राशन किटचे वाटप !!

"कल्याण बस आगारातील १३० कर्मचाऱ्यांना जिजाऊ संस्थेचा एक हात मदतीचा"


कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण बस आगारातील एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून राशन कीटचे सोमवारी वाटप करण्यात आले. 


राज्यातील एसटी महामंडळाचे ९५ हजार कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून संपावर आहेत. एस. टी. महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणी करिता राज्यातील सर्वच आगारातील कर्मचारी आंदोलन करीत आहेत. 


राज्य सरकार तसेच राज्य परिवहन मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. संपावर सरकारकडून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्याने कामगारांचा प्रश्न अखेर न्यायालयात प्रलंबित आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना सरकार बेकायदेशीरपणे नोटिसा काढून कामगारांवर निलंबनाची कारवाई करीत आहे अनेक कामगारांवर निलंबनाची सरकारने कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यापासून कामगारांना मासिक वेतन मिळाले नाही कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून ८० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी उपासमारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. 


कामगारांची व्यथा समजून कामगारांना एक मदतीचा हात मिळावा म्हणून जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भाऊ सांबरे यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांना महिनाभर पुरेल इतके किराणा सामान वाटप  करण्याचा निर्णय घेतला आहे याचाच भाग म्हणून ठाणे पालघर भिवंडी येथील संपकरी कर्मचाऱ्यांना रेशन किटचे वाटप केले असून सोमवारी कल्याण बस आगारातील १३० कर्मचाऱ्यांना जिजाऊ सामाजिक संस्थेचे जिल्हा प्रमुख अजित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन किटचे वाटप करण्यात आले. 


यावेळी डीजे ग्रुप कल्याण शहर प्रमुख रोहित जाधव मनसे माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे, समाज सेवक आकाश सावंत समाज सेवक फिरोज शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील रोकडे आर्किटेक्ट गणेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. 


उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित करताना जिल्हाप्रमुख अजित जाधव म्हणाले की जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भाऊ सांबरे यांच्या मातोश्री भावना देवी सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील बस आगारातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून संस्थेकडून *एक हात मदतीचा एक हात जिजाऊचा* यानुसार आत्तापर्यंत *२५००* कर्मचाऱ्यांना रेशन किटचे वाटप करण्यात आले आहे. निलेश सांबरे यांचे वडील एसटी कर्मचारी होते एसटी कामगारांच्या काय समस्या असतात या निलेश भाऊ सांबरे यांनी जवळून पाहिल्या आहेत. तुटपुंज्या पगारावर काटकसर करून कुटुंब चालवावे लागते हे निलेश सांबरे यांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना सुरुवातीलाच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने पाठिंबा दिला असून संपकरी कर्मचार्‍यांच्या बाजूने संस्था कायम खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख अजित जाधव यांनी सांगितले. 

उपस्थित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी जिजाऊ सामाजिक संस्थेने केलेल्या मदतीने आम्ही भारावून गेलो असून संस्था आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भाऊ सांबरे यांनी आमच्या घरातील विझलेली चूल सुरू करून दिली आहे असे मत येथील एसटी कर्मचार्‍याने भावुक होऊन व्यक्त केले त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी जिजाऊ सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी जिजाऊ सामाजिक संस्थेचे कल्याण तालुकाप्रमुख आरती पाटील संदीप शेंडगे कुशल मोरे रिजवान सय्यद साहिल मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; मात्र भिवंडी खाडी किनारी आजही हात भट्या सुरु !!

ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; मात्र भिवंडी खाडी किनारी आजही हात भट्या सुरु !!


भिवंडी, दिं,31, अरुण पाटील (कोपर) :
            राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे शाखेमार्फत गेल्या 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम आखण्यात आली होती. विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री, वाहतूक यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसत्र आयोजित करण्यात आलं होतं. मात्र भिवंडी तालुक्यातील खाडी किनारी व कांदळवनात आजही हात भट्या सुरु असून त्यांच्यावर कारवाई करणे अगदी जिकरीचे असल्या कारणाने त्याचा फायदा हे हात भट्टी व्यावसायिक घेत आहेत. मात्र तरीही अशा परिस्थितीत देखील ठाणे राज्य उत्पादन शुल्क  विभाग कारवाई करत असतात. काही दिवसापूर्वी भिवंडी तालुक्यातील अंजूर -अलीमघर खाडी किनारी या पथकाने होडीतून चिखलात जाऊन हात भट्या उध्वस्त केल्याने हात भट्टी व्यवसाईकांचे धाबे चांगलेच दानाणले होते.
          या धाडसत्राच्या दरम्यान साधारणपणे 103 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 60 गुन्हे वारस आणि 43 गुन्हे बेवारस अशा स्वरुपातील आहेत. याप्रकरणी 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 5 वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. 50 लाख 22 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारू विक्री आणि त्याची वाहतूक होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नाकाबंदी केली जातेय. वाहनांची तपासणी यासह रात्रीची गस्तही घातली जात आहे.

केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान देणारा निर्णय -- अण्णा हजारे.

केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान देणारा निर्णय -- अण्णा हजारे.


भिवंडी,दिं,31,अरुण पाटील (कोपर) :
               महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाइन विक्रीला परवानगी दिली आहे. यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आता ज्येष्ट समाजसेवक अण्णा हजारेंनी देखील यावर भाष्य केले आहे. ते या निर्णयावरुन राज्य सरकारवर संतापले असल्याचे दिसतेय. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान देणारा निर्णय असल्याचे देखील अण्णा म्हणाले आहेत.
             अण्णा हजारे यांनी याविषयी एक पत्रक जारी केले आहे. ते म्हणाले आहेत की, 'वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमीभाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाइनची खुली विक्री करून एक वर्षात एक हजार कोटी लिटर वाइन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?' असा संतप्त सवाल अण्णा हजारेंनी केला आहे.
            '20 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले. यातून अडीच लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटींवरून 250 कोटींवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो' असा टोला देखील त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
             सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करत आहे. सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे.' असे मत अण्णा हजारेंनी व्यक्त केले आहे.

एस.एस.स्मृती चषकाचे आयोजन !

एस.एस.स्मृती चषकाचे आयोजन ! 


मुंबई - ( दिपक कारकर ) :

गुहागर तालुक्यातील कोतळूक ( पिंपळवाडी ) गावचं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे "एस.एस.स्मृती विकास मंडळ" उपरोक्त मंडळातर्फे मुंबई पातळीवर गुहागर ता. क्रिकेट मर्यादित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन अर्थातच "एस.एस.स्मृती चषक- २०२२", रविवार दि. ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी नायगाव मधील पाणजू मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत आकर्षक पारितोषिके असून संघांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी संजय आगीवले - ९५६१४७३९६१ यांच्याशी संपर्क साधून आपली सहभाग नोंदनी करावी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून क्रिडाप्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र स.भुवड यांचा आदर्श क्रिकेट संघतर्फे जाहीर सन्मान !!

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र स.भुवड यांचा आदर्श क्रिकेट संघतर्फे जाहीर सन्मान !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आयोजित क्रिकेट संघ ता.दापोली जिल्हा, रत्नागिरी आयोजित किंग मैदान उसघर आगासन दिवा आयोजित सामने मंडळाच्यावतीने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख- राजेंद्र स.भुवड यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. यावेळी आदर्श क्रिकेट संघ करंजाळी आयोजित क्रिकेट संघ ता. दापोली जिल्हा, रत्नागिरीचे पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेट संघ उपस्थित होते.

गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न !!

गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न !!


मुंबई, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :
           गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या माध्यमातून प्रतीवर्षा प्रमाणे कोविडच्या शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पूजा महोत्सव साजरा करण्यात आला. पूजा महोत्सवचे हे २२ वे वर्ष होते. यावेळी भव्य महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार महोत्सव साजरा करत असताना चित्रकला स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, त्याचबरोबर विविध रेकॉर्ड डान्स व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमाला रहिवाशी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोसायटीचे पदाधिकारी, उत्सव समितीचे कार्यकर्ते, महिला मंडळ व मुला- मुलीने यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, सदस्य व सभासद आणि रहिवाशी आणि हितचिंतक यांनी महत्वाचे सहकार्य केले याबद्दल सर्वाचे आभार मानले. या कार्यक्रमला अनेक मान्यवर यांनी भेट दिली. शेवटी आभार प्रदर्शनाने पूजा महोत्सवची सांगता करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न !!

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न !!


 मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          माहिती अधिकार, पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेनेचा वर्धापन दिन नुकताच विविध समाज उपयोगी कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाची आखणी करून करोनाचे सर्व नियम पाळून पुण्यामधील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. 


स्वारगेट येथे देशभक्त केशवराव जेधे चौकात संघटनेच्या नामफलकाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डेक्कन याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे विश्रांतवाडी शाखेच्या नामफलकाचे अनावरण विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर करण्यात आले. खराडी येथेदेखील संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कैलास दादा पठारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच खराडी येथील "संतुलन" अनाथाश्रमात लहान मुलांना खाऊ वाटप भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. 


कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी संघटनेचे संस्थापक/ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश धनंजय सकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कैलासदादा पठारे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा जयश्रीमाई सावर्डेकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. अफसरभाई चाँद कुरेशी, महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉक्टर श्रुतिकाताई कडू, राष्ट्रीय अध्यक्ष युवक आघाडी प्रवीण राठोड महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी संतोष माने, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल जाधव, महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरीसंदीप पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष संग्राम भाऊ तळेकर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शशांक शिरोडे, जिल्हा उपाध्यक्ष कांता भाऊ राठोड, आंतरराष्ट्रीय समन्वयक संकेत बाळासाहेब जगताप, ब्लू क्रॉस मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष विशालभाऊ शेडोळकर, स्वारगेट शाखेचे मिलिंद सुतार, अमित चौधरी, गणेश पवार, अतिश झुरंगे, श्रीकांत कर्णवर, विश्रांतवाडी शाखेचे राहुल जाधव, आकाश लोंढे, प्रदीप कांबळे, सुमित मोरे, खराडी शाखेचे स्वप्निल जगताप, गणेश मसलेकर, व्ही बी डावरे, राहुल पठारे, आकाश पठारे, ऋत्विक दरेकर, सुभाष अडागळे, दत्ता सुकळे, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड विभागाच्या सौ. अमृता जाधव, सौ. अनिता शिंदे, तानाजी संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते .

Sunday 30 January 2022

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह गंभीर गैरवर्तन : सर्वोच्च न्यायालय.

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह गंभीर गैरवर्तन : सर्वोच्च न्यायालय.


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) : दारू पिऊन वाहन चालविण्याची परवानगी कोणालाही नाही. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आणि इतरांच्या जीवाशी खेळणे हे अत्यंत गंभीर गैरवर्तन आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. 

ब्रिजेश चंद्र द्विवेदी हे फतेहपूर येथे प्रोव्हिन्शिअल आर्म्ड कॉन्स्टब्लरीमध्ये (पीएसी) चालक होते. दि. २ फेब्रुवारी २००० रोजी ते कुंभमेळ्यासाठी फतेहपूरहून अलाहाबादला पीएसी जवानांना घेऊन जाणारा लष्करी ट्रक चालवत होते. त्या वेळी त्यांनी मागच्या बाजूने एका जीपला धडक दिली. वैद्यकीय तपासणीत त्यांनी दारूचे सेवन केले होते व दारुच्या प्रभावाखाली असल्याचे आढळले. त्यांची विभागीय चौकशी करण्यात येऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. 

या बडतर्फीला उच्च न्यायालयात ब्रिजेश चंद्र द्विवेदी यांनी आव्हान दिले. तेव्हा असा युक्तिवाद केला की, बडतर्फीची शिक्षा गुन्ह्यापेक्षा खूप जास्त आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. दरम्यान, ब्रिजेश चंद्र यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोठे नुकसान झाले नसून, हा किरकोळ अपघात होता म्हणून थोडी उदारता दाखवावी. बडतर्फीच्या आदेशाचे सक्तीच्या निवृत्तीमध्ये रूपांतर व्हावे, अशी प्रार्थना ब्रिजेश चंद्र यांच्यातर्फे करण्यात आली. 

सर्वोच्च न्यायालयाने दारू पिऊन ट्रक चालवला हे सिद्ध झाले आहे. दारूच्या नशेत पीएसी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा ट्रक चालविणे हे अतिशय गंभीर गैरवर्तन आहे. अशी अनुशासनहिनता खपवून घेतली जाऊ शकत नाही आणि तीही शिस्तबद्ध लष्करात, असे मत नोंदवले. 

केवळ मोठे नुकसान झाले नसल्यामुळे आणि तो किरकोळ अपघात होता हे कारण असू शकत नाही. जीवघेणा अपघात झाला नाही हे नशीब. ट्रकमधून प्रवास करणाऱ्या पीएसी कर्मचाऱ्यांचा जीव ड्रायव्हरच्या हाती होता. त्याने त्यांच्या जीवाशी खेळ केला असे म्हणता येईल, असे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

Saturday 29 January 2022

गणेश हिरवे यांना केतन भोज युवा मंचतर्फे "कोरोना योद्धा पुरस्कार -२०२१" ने सन्मानित !!

गणेश हिरवे यांना केतन भोज युवा मंचतर्फे "कोरोना योद्धा पुरस्कार -२०२१" ने सन्मानित !!


मुंबई, (उत्कर्ष गुडेकर/ सौ. मनस्वी मनवे) : कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. जोगेश्वरी पूर्व  येथील सामाजिक कार्यकर्ता आदर्श शिक्षक गणेश हिरवे हेही याला अपवाद नाहीत. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. स्वतःच्या वाढदिवसाच्यानिमित्त (दि.२७ जाने.) ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना  व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ वृत्तपत्रलेखक, अनेकदा रक्तदानासारखे पवित्र कार्य साकारणारे जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री गणेश हिरवे यांना सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, पर्यावरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या केतन भोज युवा मंचतर्फे "कोरोना योद्धा पुरस्कार -२०२१" ने नुकतेच अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समितीचे मुंबई जिल्हा सचिव, माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना मुंबई प्रसिद्धी प्रमुख, मा. विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन शांताराम गुडेकर (वृत्त पत्रलेखक /पत्रकार ) यांच्या हस्ते केतन भोज युवा मंच यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. हिरवे सरांचे इतक्या वर्षांतील कार्य हे हेवा वाटण्याजोगेच आहे. गरीब लोकांसाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठी सातत्याने ते धडपडत असतात. इतरांसाठी काहीतरी करायची त्यांची वृत्ती अनेकांना प्रेरणादायी ठरली आहे. शिक्षकी पेशा आणि कौटुंबिक जीवन सांभाळून सतत काही ना काही सामाजिक उपक्रम राबवण्याची त्यांची धडपड गेली कित्येक वर्षे अविरतपणे कशी सुरू आहे व इतकी इच्छाशक्ती त्यांच्यात कशी जागृत होते हा मला नेहमीच पडणारा प्रश्न. कारण आज नोकरी - प्रपंच सांभाळून सामाजिक जीवनात सक्रिय राहणे म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही. तरी सुद्धा हिरवे सर सतत वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत आहेत. यातुनच त्यांच्या सामाजिक भावनेने झपाटलेल्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते. हिरवे सरांसारखी आसामी समाजात अपवादानेच आढळते व अनेकांना आदर्शवत ठरते. 

मूर्ती छोटी पण कार्य आणि मेहनत महान सरांना सुरवातीपासूनच ग्रुपमधे राहून कार्य करायला आवडते. अगदी रस्त्यावरच्या माणसांपासून, खेडेगावातील लोकांपर्यंत जरूरी वस्तू पोहोचवणारा समाजसेवक. वृत्तपत्रातून आपले परखड विचार मांडणारा वृतपत्रलेखक. संसाराची सुरळीत गाडी चालवणारा पती आणि मुलांना योग्य मार्गदर्शन करणारे वडील. रक्तदान  करणारे रक्तदाता. लोकांना वाचनाची गोडी लावणारे  पुस्तके उपलब्ध करून देणारे.. शाळेतील मुलांना चांगली मूल्य देणारे आणि अनेकांना सामाजिक कार्याची आवड निर्माण करणारे.. अशा विविध पैलूने संपन्न असलेले सन्मा. गणेश हिरवे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांकडून अभिनंदनसह उदंड आयुष्य लाभो आणि असेच चांगले कार्य होत राहो अशा शुभेच्छा सदिच्छा देण्यात आल्या आहेत.

क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह आहेत -- अनिल देशमुख

क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह आहेत -- अनिल देशमुख


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) : विशेष पीएमएलए न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली असली तरी देशमुख यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा पैसे वसूल करताना ही रक्कम ‘नंबर १’ साठी करत असल्याचे काही लोकांना सांगितले. तर त्याने नंबर १ हा मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासाठी वापरायचा, हे चांदीवाल आयोगासमोर स्पष्ट झाल्यामुळे क्रमांक -१ हा मी नसून परमबीर सिंह असल्याचे देशमुख यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. 

अनिल देशमुख पदाचा गैरवापर करून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटी रुपये वसूलचे आदेश सचिन वाझे व अन्य काही पोलिसांना दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. सुरुवातीला त्यास वाझेनेही दुजोरा दिला. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील आयोगापुढे सचिन वाझेने ‘यू-टर्न’ घेतले. आपण देशमुखांच्या वतीने पैसे वसूल केले नाही, असे वाझेने साक्षीत म्हटले आहे. असे देशमुख यांनी ॲड. अनिकेत निकम यांच्याद्वारे दाखल जामीन अर्जात म्हटले. 

ज्याच्या जबाबाचा आधार घेत ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला, त्या वाझेने साक्ष फिरविली आहे. त्याने (वाझे) आयोगाला सांगितले की, तो मला भेटला नाही आणि वसूल केलेले पैसे त्याने मला कधीच दिले नाही. ईडीने वाझेच्या चुकीच्या जबाबावर आधारित माझ्यावर गुन्हा नोंदविला. संशयास्पद भूतकाळ असलेल्या सचिन वाझे या  कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवर पैसे वसूल केल्याचा आरोप करणे हे कितपत योग्य आहे असे देशमुख यांनी अर्जात म्हटले आहे. 

राज्यात २.२५ लाख पोलीस कर्मचारी आहेत. राज्यभरात १०,००० सहायक पोलीस निरीक्षक आहेत. अशा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत थेट प्रवेश मिळाला, असे मानणेही चुकीचे आहे, असा दावा देशमुख यांनी अर्जात केला.

खासदार राहुल गांधींवरील मानहानी प्रकरणाची सुनावणी भिवंडी जलदगती न्यायालयात होणार !!

खासदार राहुल गांधींवरील मानहानी प्रकरणाची सुनावणी भिवंडी जलदगती न्यायालयात होणार !!

        (भिवंडी / सोनाळे ग्राउंडवर भाषण करताना)

भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) : भिवंडी येथील सोनाळे गावात राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत बोलताना, महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याविरोधात, संघाचे भिवंडी तालुका कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडीच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार नोंदवून राहुल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. गेल्या 7 वर्षापासून सुरु असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी आता भिवंडी जलदगती न्यायालयात होणार आहे. त्यामुळे लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे. 

खासदार राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत  वक्तव्य केले होते की, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होऊन प्रलंबित दाव्याची भिवंडी जलदगती न्यायालयातच 5 फ्रेब्रुवारीपासून दरोरोज सुनावणी  केली जाणार असल्याचे आदेश भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश जे. व्ही पालीवाल यांनी दिले आहे. यामुळे गेल्या 7 वर्षापासून सुरु असलेल्या मानहानी दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भिवंडी न्यायालयात सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या एका दाव्याचा हवाला देत, निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संबंधित खटले जलद गतीने चालवायचे आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर आधारित राहुल गांधींवरील दावाही त्याच श्रेणीत येत असल्याने हा दावा वर्गीकृत केल्याचे नमूद केले. त्यामुळे हा दावा प्राधान्याने आणि जलदगतीने चालवावा आणि दैनंदिन सुनावणी व्हावी, अशी इच्छा होती. यावर न्यायधीशांनी दोन्ही वकिलांची तयारी विचारली असता तक्रारदारातर्फे ॲड. प्रबोध जयवंत तर राहुल गांधींचे वकील ॲड. नारायण अय्यर, यांनी फास्ट ट्रॅकिंग आणि दैनंदिन सुनावणीसाठी तयारी दाखवली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात दावा दाखल केला होता. कुंटे यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी आरएसएसच्या संदर्भात केलेले भाषण प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह होते. तर राहुल गांधी यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार आहे. 2017 पासून हा दावा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात जात आहेत. मात्र जलदगती न्यायालयात सुनावणी होईल, असे ते म्हणाले. 

भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या 2014 साली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेविरोधात राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयात करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्रा सोबत भाषणातील उतारा दाखल केला होता. 

सदर उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा, असा अर्ज याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता. परंतू मागील 12 जून 2018 रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायलप्रमाणे चालविण्याची मागणी केली होती. तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायलप्रमाणे चालविणयास न्यायालयाने मान्यता दिली होती.

अनिल देशमुख बदल्यांसाठी अधिकाऱ्यांच्या अनधिकृत याद्या पाठवायचे-- सीताराम कुंटे.

अनिल देशमुख बदल्यांसाठी अधिकाऱ्यांच्या  अनधिकृत याद्या पाठवायचे-- सीताराम कुंटे.


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) : महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून कुंटे यांची चौकशी केली होती. त्या वेळी त्यांनी जवाबात धक्कादायक माहिती देत देशमुख हे बदल्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनधिकृत याद्या स्वीय सचिव संजीव पालांडेकडे सोपवायचे मी त्यांच्या आधीन राहून काम करत असल्याने यादी नाकारु शकत नव्हतो अशी धक्कादायक माहिती ईडीला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

मुंबई पोलिसांच्या नियुक्त्या बदल्या या संदर्भातल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्तवसुली संचालनालय ईडीने माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सात डिसेंबर रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठविले होते. कुंटे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मंत्री असताना गृह विभागाचे मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. त्यामुळे पोलीस बदल्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली होती. 

त्या वेळी त्यांनी जवाबात धक्कादायक माहिती देत देशमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या याद्या स्वीय सचिव संजीव पालांडेकडे सोपवायचे मी त्यांच्या आधीन काम करत असल्याने यादी नाकारु शकत नव्हतो अशी धक्कादायक माहिती ईडीला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भातील याद्या जरी देण्यात आली असली तरी मात्र या याद्याला अंतिम स्वरूप देण्याचा अधिकार हा गृह विभागाचे सचिव यांना असतो विभागाकडून येणारे याद्या नियमानुसार आहे की नाही हे तपासल्यानंतर त्यानुसार बदल्या करण्याकरिता आदेश गृह विभाग काढत असतो. 

मात्र जर गृहमंत्र्यांनी दिलेली याद्या असल्यामुळे जर गृहसचिव यावर आपला निर्णय देत असेल तर ते आपल्या कर्तव्य मध्ये कुठे ना कुठे कमी पडले आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे गृहसचिव देखील त्यामध्ये तेवढेच दोषी असू शकतात अशी प्रतिक्रिया माजी निवृत्त पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी दिली आहे. 

अनिल देशमुख प्रकरणात ईडीने 7 हजाराच्या पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रा मध्ये ईडीने अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख तसेच पत्नी आरती देशमुख यांचा भाऊ याला देखील यामध्ये सह आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. तसेच अनिल देशमुख यांना या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून ईडीने आरोपपत्रात दाखवले आहे. 

परमबीरसिंग यांनी देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपानंतर गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण बाहेर आहे. शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा धक्कादायक अहवाल दिला होता. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आणि त्यांच्या पोस्टींगसाठी मध्यस्थांमार्फत लाचेचा मुद्दा समोर आला. 

त्यामुळे राज्यभर वादळ उठलं. ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या दोन खासगी सचिवांनाही अटक केली आहे. सीबीआयकडूनही खंडणी प्रकरणाचा तपास केला जात आहे. फोन टॅपिंग प्रकरणात कुंटे यांनी राज्य सरकारला अहवालही सादर केला आहे. यामध्ये त्यांनी शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित काळात कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांचे ज्वेलर्स असोसिएशन बैठकीत सी.सी. टी.व्ही. बसविण्याचे आवाहन !! "अध्यक्ष प्रकाश जे. शंकलेशा यांचे सहकार्याचे आश्वासन"

कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांचे ज्वेलर्स असोसिएशन बैठकीत सी.सी. टी.व्ही. बसविण्याचे आवाहन !! "अध्यक्ष प्रकाश जे. शंकलेशा यांचे सहकार्याचे आश्वासन"


कल्याण, हेमंत रोकडे : कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वतेतील ज्वेलर्स असोसिएशन बैठक करण्यात् आली. या बैठकीत आस्थापनामध्ये सी.सी. टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात यावे. “१ कॅमेरा समाजासाठी, देशासाठी" समर्पित करावा असे  सांगण्यात आले. जेणे करून वाढत्या गुन्हेगारी वर आळा घालता येईल आणि लवकरचं आरोपीला पकडण्यास मदत होईल. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी  कल्याण पूर्वेतील ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष प्रकाश जे शंकलेशा यांच्या अध्यक्षतेखाली ज्वेलर्स दुकानादरची बेठक घेऊन त्यांना निवेदन पत्र देऊन सामाजिक उपक्रम म्हूणन सी.सी. टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात यावे. असे आवाहन केले गेले. या उपक्रमला कल्याण पूर्वतील व्यापारी ,दुकानदार आणि ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष प्रकाश जे शंकलेशा यांनी सांगितलं की आम्ही सर्व दुकानाच्या बाहेर सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसू असे सांगण्यात आले.

महात्मा फुले पोलीसांनी २ अवैध अग्निशस्त्रे कब्जात बाळगणाऱ्या आरोपीला केली अटक !!

महात्मा फुले पोलीसांनी २ अवैध अग्निशस्त्रे कब्जात बाळगणाऱ्या आरोपीला केली अटक !!


कल्याण, हेमंत रोकडे : पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने ठाणे ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महत्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे हद्दीत ऑल आऊट ऑपरेशनसाठी अधिकारी अंमलदार नेमुन त्यांना प्रभावी व परिणामकारक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.


त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि दिपक सरोदे व डी. बी. स्टाफ हे हद्दीत गस्त करीत असतांना सपोनि दिपक सरोदे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, "अनंता रिजेन्सी समोर, भवानी मॅरेज हॉलचे बाजुस, काळा तलाव, कल्याण (प) येथे एक इसम पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेला आहे व त्याचे कब्जात अग्निशस्त्रे आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि दिपक सरोदे यांनी सदरची माहीती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना कळविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाने यांनी सदर कारवाईसाठी पोलीस अधिकारी व् अंमलदार यांची २ पथके तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन रवाना करुन सदरची माहीती तात्काळ वरिष्ठांना कळविली.


दिनांक २९/०१/२०२२ रोजी २१.०० वा. चे सुमारास पोलीस पथक हे बातमीतील नमुद ठिकाणी पोहचले असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनाचा एक इसम युनिकॉर्न मोटार सायकलसह भवानी मॅरेज हॉलचे बाजुस संशयास्पद स्थितीत उभा असलेला दिसुन आला. त्याला पळण्याची कोणतीही संधी न देता पोलीस पथकाने ताब्यात घेवुन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचलेला १ गावठी कट्टा तसेच १ देशी १ बनावटीचे पिस्टल, तसेच त्याचे पॅन्टीचे खिशात कट्ट्याचे ३ जिवंत काडतुसे, आणि देशी पिस्टलचे ३ जिवंत काडतुसे असे एकुण ६ काडतुसे मिळून आले आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमाला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश नितुचंद राजवंशी वय २६ वर्षे, रा. माथाडी बिल्डींग, घनसोली, नवी मुंबई, मुळ राहणार जि. गुडगांव, हरीयाणा राज्य असल्याचे सांगितले आहे. सदर इसमाचे कब्जात मिळुन अग्निशस्त्रे, काडतुसे, रोख रक्कम, मोटार सायकल हे जप्त् करुन्  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दिनांक ३१/१/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. तपासामध्ये सदर आरोपीने त्याचेकडील अग्निशस्त्रामधुन हवेत फायर केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भा. ह. का. कलम २७ अशी कलमवाढ करण्यात आली आहे. सदर आरोपीचा पुर्वेतिहास पाहता त्याचे विरोधात मानपाडा  गुन्हा दाखल असुन त्यामध्ये त्याला अटक झालेली आहे. त्याच प्रमाणे त्याचे मुळ गावाकडे व इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि  सागर चव्हाण तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ४, उल्हासनगर प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, जे. डी. मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग  उमेश माने-पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक 
अशोक होनमाने, पोनि. (गुन्हे) प्रदिप पाटील, सपोनि दिपक सरोदे, सपोनि ढोले, पोउनि जगताप,  व्ही. आर. भालेराव, भालेराव, एस. एम. भालेराव, भालेराव, जाधव, मधाळे, ठिकेकर, मोरे, भोईर यांनी केली आहे.

ठाणे- भिवंडी -नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा !!

ठाणे- भिवंडी -नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा !!


भिवंडी, दिं,29, अरुण पाटील (कोपर) :
          भिवंडी -नाशिक -ठाणे (घोडबंदर) ते नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.शनिवार -रविवार सुट्टी असल्याने या मार्गांवरून नासिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा गेल्या तीन तासांपासून वाहतूक कोंडीत खोळंबा झाला आहे. प्रवाशांना गाडीत बसून रहावे लागल्याने त्यांचा संतापाचा पारा चढला आहे.
            तसेच भिवंडी-नाशिक महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावरुण अंजूर -फाटा (भिवंडी) दिशेला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने येथील स्थानिकांना दिखील याचा मोठा फटका बसला आहे. अंजूर फाटा -कशेळी गावा दरम्यान मेट्रो रेल्वेचे काम सुरु असल्याने ठीक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरल्याने या ठिकाणी धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. मात्र या मार्गावरील माणकोली - अंजूर फाटा व अंजूर फाटा -कशेळी या दरम्यान तैनात वाहतूक पोलीस हे वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा वाहन चालकांकडून पैसे वसुली कारण्याकडे जास्त लक्ष देत असल्याने त्याचा फटका वाहतूक कोंडीवर देखील होत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत. 
           आज सकाळ पासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.

मोठ्या परताव्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची २२ कोटींची फसवणूक, तब्बल दहा हजार गुंतवणूकदारांना गंडा !!

मोठ्या परताव्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची २२ कोटींची फसवणूक, तब्बल दहा हजार गुंतवणूकदारांना गंडा !!


भिवंडी, दिं,29, अरुण पाटील (कोपर) : मोठया परताव्याच्या अमिषाने ठाणे, कल्याण तसेच मुंबईतील गुंतवणूकदारांची २२ ते २३ कोटींची फसवणूक करणाऱ्या आदित्य रेडीज या सूत्रधार संचालकाला अटक करण्यात आली. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. त्याला ३१ जानेवारीर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.
             कल्याणच्या खडकपाडा येथील रहिवाशी रेखा झोपे (५७) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विष्णूनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलमानुसार ३० नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात अरुण गांधी (७५) या पहिल्या आरोपीला एक महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती.
             यातील मुख्य आरोपी आदित्य रेडीज तसेच त्याचे वडील हेमंत आणि आई मानसी हे हा गुन्हा दाखल झाल्यापासून भूमीगत झाले होते. ते बदलापूर परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर शेख यांच्या पथकाने २४ जानेवारी २०२२ रोजी बदलापूर भागात सापळा रचून आदित्य याला अटक केली.
             यापूर्वी अटक केलेला अरुण गांधी आणि आदित्य यांनी आपसात संगनमत करून संपर्क अॅग्रो मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड (आधीचे नाव कालीकाई अॅग्रो मल्टी स्टेट सोसायटी) कंपनी सुरू करून तक्रारदार तसेच इतरांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठेवीपोटी मोठया प्रमाणात रक्कम स्वीकारली. त्यांना कोणतीही रक्कम परत न करता, त्या रक्कमेचा अपहार करून सुरुवातीला ३५ लाख ३८ हजार ३५० रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आहे. मात्र, यात सुमारे दहा हजार गुंतवणूकदारांची २२ ते २३ कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली

म्हसळा तालुक्यातील कु. अर्चना येलवे हिने सादर केलेल्या काव्याचा सन्मान !

म्हसळा तालुक्यातील कु. अर्चना येलवे हिने सादर केलेल्या काव्याचा सन्मान !


कोकण - ( दिपक कारकर ) :

म्हसळा तालुक्यातील व्हिजन एज्युकेशन फाउंडेशन व तहसील कार्यालय म्हसळा तर्फे भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात उत्तम काव्य सादर करणाऱ्या अर्चना येलवे हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.म्हसळा तालुक्यातील करंबे ताम्हाणे गावची अर्चना डोंगराळ विभागातून रोज पायी प्रवास करून तालुक्यात शिक्षण घेताना गतवर्षी म्हसळा तालुक्यातून बी.ए.उत्तीर्ण होताना तालुक्यातून प्रथम आली होती. शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी कलेक्टर होण्याचं स्वप्नं मनी बाळगणाऱ्या अर्चनाने आता पासूनच अभ्यासाची पूर्वतयारी सुरू केली आहे. तिच्या या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी गावचे ग्रामस्थ/ पालक व प्राचार्य वर्ग देखील तिला प्रोत्साहित करत आहेत. प्रत्येक उपक्रमात सक्रिय राहून यश मिळणाऱ्या अर्चनाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

बालाजी रुग्णालयात जेष्ठ पत्रकारांनी "डोळे" तपासून मोफत उपचाराचा लाभ घेतला !!

बालाजी रुग्णालयात जेष्ठ पत्रकारांनी "डोळे" तपासून मोफत उपचाराचा लाभ घेतला !!


कल्याण, हेमंत रोकडे : भारतीय पत्रकार महासभा " पत्रकार संघटनेच्या अंतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून जेष्ठ पत्रकारांना डोळे तपासणीसाठी "मोफत कुपन" वितरण करण्यात आले होते. ञत्याच पार्श्वभूमीवर २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान कल्याण येथील बालाजी रुग्णालयात ७ पत्रकारांनी डॉ. ब्राम्ही पांडे यांच्या सहकार्याने आपल्या डोळ्यांची संगणकाद्वारे तपासणी करून, मोफत उपचाराचा लाभ घेतला. 


भारतीय पत्रकार महासभा" राष्ट्रीय अध्यक्ष हसनैन जाफरी, राष्ट्रीय सचिव -कपिल धाकड यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुभाष पटनाईक यांच्या मार्गदर्शनातून आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनी जेष्ठ पत्रकारांना डोळे तपासणीसाठी " मोफत कुपन वितरण" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण येथील नरसिंह खानोलकर पत्रकार कक्षात सर्वच पत्रकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला होता. 


कल्याण, डोंबिवली, उल्हानगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या शहरातील जेष्ठ पत्रकारांनी कल्याण पश्चिम, मुरबाड रोड, येथील खाजगी बालाजी डोळ्यांचे प्रसिद्ध रुग्णालयात २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता  प्रत्यक्ष हजर राहून, डॉ. ब्राम्ही पांडे यांच्या सहकार्याने जेष्ठ पत्रकार दीपक ठाकूर, बाळकृष्ण मोरे, इब्राहिम इनामदार, अब्दुल शेख, शिवाजी भगत, रज्जाक तांबोळी, यांनी कॉम्प्युटर मशिनद्वारे मोफत डोळे तपासणी करून मोफत उपचार करून घेतले.

Friday 28 January 2022

शिवसेना शाखाप्रमुख सुनील पाटील, सचिन म्हात्रे यांच्यातर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन !!

शिवसेना शाखाप्रमुख सुनील पाटील, सचिन म्हात्रे यांच्यातर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन !!


मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :

               बोरिवली  शिवसेना शाखा क्र.१७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील आणि शिवसेना शाखा १५ चे शाखाप्रमुख सचिन म्हात्रे याच्यातर्फे हिंदुरुदयसम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती व भगवा सप्ताह अंतर्गत रविवार दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते २-३० या वेळेत समर्थ कुटीर (आलम मंदिर ), गावदेवी मैदान जवळ, शिंपोली गांव, बोरिवली पश्चिम येथे कोरोनाचे संकट अजून संपलेले नसल्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीरचे (शिवसेना शाखा १५ व १७ संलग्न) आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात शरीराची तपासणी करण्याबरोबरच मधुमेह मध्ये पायांची काळजी कशी घ्यायची, शरीराची चरबी मोजणे, रक्तातील साखर तपासणे, हृदयाच्या कार्याची स्थिती, हाडांची खनिज घनता चाचणी, डोळ्यांची तपासणी चा समावेश आहे. उपरोक्त तपासण्या करण्यासाठी धनश्री हॉस्पिटल, बोरोबर पश्चिमचे चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ, हाडांचे डॉक्टर उपस्थित रहाणार आहेत.तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी शिवसेना शाखा क्र. १७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील आणि शिवसेना शाखा क्र. १५ चे शाखाप्रमुख सचिन म्हात्रे यांच्याशी शाखेत संपर्क करावा असे आवाहन शिवसेना शाखा १५ आणि  १७ च्या पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल !! 


कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ अधिकाऱ्यांवर कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल.

पोलिसांनी फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (420, 418, 415, 467, 448, 120 बी, 34, 9, 13 कलमांतर्गत) गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे. या प्रकरणी गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन, गोविंद बोडके या पाच तत्कालीन केडीएमसी आयुक्तांसह, केडीएमसी अधिकारी, संबंधित विकासक, आर्किटेक्ट अशा 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी इमारत पुनर्वसन प्रकरणी केडीएमसी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन करत मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली असल्याचा आरोप तत्कालीन नगरसेवक अरुण गिध यांनी केला आहे. याबाबत गिध यांनी केडीएमसीसह पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र काहीच कारवाई न झाल्याने अखेर गिध यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

महापालिकेच्या विविध प्रभागात निष्कासनाची धडक कारवाई !

महापालिकेच्या विविध प्रभागात निष्कासनाची धडक कारवाई !


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार  आणि विभागीय उपआयुक्त  अर्चना दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली  अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी कल्याण पश्चिम, शहाड येथील बालाजी लॉज या इमारतीसमोर  दुकानदारांनी  मोकळया जागेमध्ये (मार्जिन स्पेस) केलेले बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई अनधिकृत बांधकाम  नियंत्रण विभागाचे  कर्मचारी  व एक जेसीबीच्या  सहाय्याने  केली.


जे प्रभागातही  विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व, आनंदवाडी, कोळसेवाडी येथे चाळीतील चालू असलेल्या 2 रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.  तसेच अनिल पावशे, फुलपती फ्लॉवर मिल, रामजी यादव यांचे शेडवर कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे सुहास ढेकळे, कामत स्टोर्स यांचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कसित करण्याची कारवाई अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी व हातोडयाच्या मदतीने करण्यात आली.

त्याचप्रमाणे 9/आय प्रभागातही विभागीय उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आय प्रभागाचे  सहा. आयुक्त संजय साबळे यांनी आडीवली -ढोकळी  येथील बांधकाम धारक किरण पाटील यांचे आ.सी.सी. इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची  धडक कारवाई आज सुरु केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम  नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस  कर्मचारी, मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी  यांच्या मदतीने व 1 पोकलेनच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचं नाव गोंडसपणे पुढे करत वाईन कंपनीच्या उद्योजकासोबत मोठे अर्थकारण-- देवेंद्र फडणवीस "चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे"

शेतकऱ्यांचं नाव गोंडसपणे पुढे करत वाईन कंपनीच्या उद्योजकासोबत मोठे अर्थकारण-- देवेंद्र फडणवीस  

"चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे"


भिवंडी, दिं,28, अरुण पाटील (कोपर) :
             वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. या निर्णयाला विरोध करत भाजपने सरकारवर जोरदार प्रहार केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 
              शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर, संजय राऊत यांनीही मलिकांची री ओढली. देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका करताना, आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवू देणार नाही, असे म्हटलंय. तसेच, काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 
               काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय घेतलेला नाही. काही लोकांनी नव्याने दारुच्या कंपन्या आणि एजन्स्या घेतल्या आहेत. या लोकांच्या भल्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकं कोणाची बैठक झाली, ती कुठे नेमकी झाली. ती बैठक विदेशात झाली का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. म्हणून हा साधा घेतलेला निर्णय नसून यामागे मोठं अर्थकारण आहे, हा अर्थपूर्ण निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचं जे स्वप्न सरकारचं दिसतंय त्याचा आम्ही निषेध करतो,'' असेही फडणवीस त्यांनी म्हटले आहे.
            तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिलं नाही. शेतकऱ्याला चार पैसे मिळणार असतील तर केंद्रानेही असे धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्याचं आर्थिक गणित समजून घ्यावं, असेही राऊत यांनी म्हटले. 
              राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणाऱ्या भाजपाचाही नवाब मलिक यांनी यावेळी समाचार घेतला. "गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत", असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

सह्याद्री कुणबी संघ,पुणे शहर ( रजि.) संस्थेचा १४ वा वर्धापनदिन व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम संपन्न !!

सह्याद्री कुणबी संघ,पुणे शहर ( रजि.) संस्थेचा १४ वा वर्धापनदिन व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम संपन्न !!


मुंबई, ( दिपक कारकर ) :

पुण्यातील विविध पुरस्काराने सन्मानित व प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याने प्रसिद्ध असणाऱ्या सह्याद्री कुणबी संघाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा व महिला आघाडी पुणे शहराचा हळदी- कुंकू तसेच तिळगुळ समारंभ कार्यक्रम कोव्हिड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय नियमांचे पालन करून नुकताच पार पडला. कार्यक्रमाला सह्याद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत संपर्कप्रमुख शंकरदादा घडशी, उपाध्यक्ष प्रविण भोज, महाराष्ट्र प्रांत सरचिटणीस अजित शिगवण, विठ्ठल नाईक, सतीश डाकवे, पुणे शहर अध्यक्ष दिपक फणसळकर, महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा वैष्णवी भोज, सरचिटणीस प्रज्ञा घडशी तसेच इतर पदाधिकारी-विभाग अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राज भागणे यांनी केले.या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

कॉलेज कुमार विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या इसमास अटक !! - डोंबिवली मानपाडा पोलिसांनी तिघांना केले अटक

कॉलेज कुमार विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या इसमास अटक !!
- डोंबिवली मानपाडा पोलिसांनी तिघांना केले अटक 


डोंबिवली, हेमंत रोकडे : धुळ्यातील आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून तो पुरवणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या टोळीचा डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीमधील डोंबिवली येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर या आरोपी कडून ३ लाख १० हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा इसम कॉलेज मधील विद्यार्थ्यांना व ऑटो रिक्षावाला ना  गांजा पुरवत होता. 


या प्रकरणातील राम नगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर, शिरपूर येथे राहणारा रेहमल पावरा, संदीप पावरा , यांना अटक केली असून यातील दिनेश शिवाजी पावरा हा मुख्य आरोपी फरार आहे.  


अशा पद्धतीने कोणी गांजा विक्री करताना किंवा गांजा पिताना आढळून आले तर त्वरित ९८२३२२४५८४ किंवा ९९२२९९८६९८ या क्रमांकाला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी केले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे,  पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उलगडला असून अधिक तपास ते करत आहेत.

Thursday 27 January 2022

आता महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाइन, मंत्रिमंडळाची मंजुरी; भाजप म्हणे- हे सरकार बेवड्यांना समर्पित !!

आता महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाइन, मंत्रिमंडळाची मंजुरी; भाजप म्हणे- हे सरकार बेवड्यांना समर्पित !!


भिवंडी, दिं, 28, अरुण पाटील (कोपर) :
            राज्यातील सुपर मार्केटस आणि किराणा दुकानांमध्ये वाइन मिळण्याचा मार्ग मोकळा  झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक दुकानांमध्ये वाइन विक्री करता येऊ शकणार आहे. राज्य सरकारने वाईन विकण्याची परवानगी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
                 महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्री केली जाणार आहे. पण त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठे असले पाहिजे ही अट घालण्यात आली आहे. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करता येणार आहे, असे सरकारने अध्यादेशात म्हटले आहे .
           या प्रस्तावाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पीत आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
              तर महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनी जेष्ठ पत्रकारांना डोळे तपासणीसाठी "मोफत कुपन" वितरण सोहळा संपन्न...

प्रजासत्ताक दिनी जेष्ठ पत्रकारांना डोळे तपासणीसाठी "मोफत कुपन" वितरण सोहळा संपन्न...


कल्याण, बातमीदार : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून, जेष्ठ पत्रकारांना डोळे तपासणीसाठी "मोफत कुपन" वितरण करण्यात आले.


"भारतीय पत्रकार महासभा" राष्ट्रीय अध्यक्ष हसनैन जाफरी, राष्ट्रीय सचिव -कपिल धाकड यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुभाष पटनाईक यांच्या मार्गदर्शनातून आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले होते. कल्याण येथील नरसिंह खानोलकर पत्रकार कक्षात सर्वच पत्रकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला.


"भारतीय पत्रकार महासभा" महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सुभाष पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली कल्याण, डोंबिवली, उल्हानगर या शहरात प्रजासत्ताक दिनी "भारतीय पत्रकार महासभा" चे हार्दिक शुभेच्छा चे बॅनर लावण्यात आले. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून, कल्याण पश्चिम, मुरबाड रोड, येथील खाजगी बालाजी रुग्णालय कान, नाक, घसा आणि डोळ्यांचे प्रसिद्ध रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे डॉ. ब्राम्ही पांडे यांच्या सहकार्याने २८ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळात जेष्ठ पत्रकारांचे कॉम्प्युटर मशिनद्वारे मोफत डोळे तपासले जाणार आहेत.


कल्याण-डोंबिवली महानगर पालिका कक्षात दुपारी चार वाजता स्थानिक जेष्ठ पत्रकार दीपक ठाकूर, इब्राहिम इनामदार, रज्जाक तांबोळी, बाळकृष्ण मोरे, अशोक वर्मा यांना डोळे तपासणीचे मोफत कुपन देण्यात आले.


भापम. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष पटनाईक, जिल्हा उपाध्यक्ष नारायण सुरोशी, दैनिक नवभारत चे जेष्ठ पत्रकार अशोक वर्मा, जेष्ठ पत्रकार -बाळकृष्ण मोरे यांच्या हस्ते मोफत डोळे तपासणीचे कुपन देण्यात आले. या प्रसंगी "भारतीय पत्रकार महासभा" चे पदाधिकारी संजय गायकवाड, जितेंद्र कानाडे, प्रवेश सिंग, सुरेश शेट्टी, इस्माईल शेख, पत्रकार आवर्जून उपस्थित राहिले होते.

प्रजासत्ताक दिनाचे आवचित्य साधत रहीवाशी संघटनेने दिला गरजूंना मदतीचा हात !!

प्रजासत्ताक दिनाचे आवचित्य साधत रहीवाशी संघटनेने दिला गरजूंना मदतीचा हात !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : मुंबईच्या हिरानंदानी गार्डन्स संकुलातील टीवोली या रहीवाशी संघटनेने बदलापुरातील प्रगती अंध विद्यालय आणि फेथ ओर्फनेज या अपंग आणि गतिमंद मुलांच्या संस्थेला व्यवसाईक सामाजिक जबाबदारीच्या (CSR) माध्यमातून विध्यार्थ्यांच्या गरजा लक्ष्यात ठेवून मदत केली आहे, आवचित्य होतं प्रजासत्ताक दिनाचे.


दोन वर्षा पूर्वी टीवोली सोसायटीने या संस्थांना पवार जनरेटर, वाटर प्युरीफाय, सोलर वाटर हिटीर, वाशिंग मशीन आणि बोरवेल अशी मदत केली होती आणि या संस्थांना दत्तक देखील घेतलं होतं, मात्र कोविडच्या वैश्विक महामारी मुळे दोन वर्ष कुठलेच कार्यक्रम घेतले गेले न्हवते. 


या वर्षी सोसायटीने आणि त्यांच्या समिती सदस्यांनी पुन्हा या संस्थांना मदतीचे आव्हान त्याचं रहिवाशांना केली होती, आणि त्याला प्रतिसाद देत रहिवाशांनी या संस्थांना त्यांच्या इमारती दुरुस्तीचे काम, 3 के वी चे  सौर ऊर्जा पुरवठा यंत्र आणि लहान मुलांसाठी बंक बेड या सुविधा दिल्या आहेत. 


प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ही मदत देण्यात आली आहे, सोसायटी प्रनागणात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रगती अंध विध्यालायाचे संस्थापक लौकिक मांजरेकर आणि फेथ ओर्फनेजच्या अबीब मेथीव यांनी टीवोली सोसायटी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मुलांच्या शिक्षण आणि आरोग्य साठी लागेल ती मदत टीवोली सोसायटी यापुढे ही कायम करत राहील असे सोसायटीचे डॉ. राकेश बक्षी यांनी म्हटलं आहे. 
२०० फुट उंच हवेत तरंगता राष्ट्रध्वजाचा फुगा हा आकार्षानाचा केंद्र बिंदू ठरला.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...