Friday, 28 January 2022

कॉलेज कुमार विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या इसमास अटक !! - डोंबिवली मानपाडा पोलिसांनी तिघांना केले अटक

कॉलेज कुमार विद्यार्थ्यांना गांजा पुरवणाऱ्या इसमास अटक !!
- डोंबिवली मानपाडा पोलिसांनी तिघांना केले अटक 


डोंबिवली, हेमंत रोकडे : धुळ्यातील आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून तो पुरवणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या टोळीचा डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीमधील डोंबिवली येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर या आरोपी कडून ३ लाख १० हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा इसम कॉलेज मधील विद्यार्थ्यांना व ऑटो रिक्षावाला ना  गांजा पुरवत होता. 


या प्रकरणातील राम नगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर, शिरपूर येथे राहणारा रेहमल पावरा, संदीप पावरा , यांना अटक केली असून यातील दिनेश शिवाजी पावरा हा मुख्य आरोपी फरार आहे.  


अशा पद्धतीने कोणी गांजा विक्री करताना किंवा गांजा पिताना आढळून आले तर त्वरित ९८२३२२४५८४ किंवा ९९२२९९८६९८ या क्रमांकाला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी केले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे,  पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उलगडला असून अधिक तपास ते करत आहेत.

No comments:

Post a Comment

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न !

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न ! विरार, पंकज चव्हाण : विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत...