Monday 31 October 2022

राष्ट्रीय एकतेसाठी रन फॉर युनिटी दौडचे आयोजन महापौरांसह नागरिकांची एकता रॅलीत दौड !

राष्ट्रीय एकतेसाठी रन फॉर युनिटी दौडचे आयोजन 
महापौरांसह नागरिकांची एकता रॅलीत दौड !


जळगाव, अखलाख देशमुख, दि ३१ : भारतरत्न तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. ३१ आक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रीय एकतेसाठी रन फॉर युनिटी दौडचे आयोजन करण्यात आले. जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन, पोलीस अधीक्षक एस.राजकुमार, आयुक्त सौ. विद्या गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांचेसह मान्यवरांनी दौड मध्ये सहभाग घेतला.
क्रीडा व युवक सेना संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे सुरुवातीला महापौर सौ. महाजन यांनी लोहपुरुष वल्लभभाई पटेल तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी लोहपुरुष व दिवंगत प्रधानमंत्रीना अभिवादन करून सर्व उपस्थितांना एकतेची शपथ देऊन हिरवी झेंडी दाखवली व रॅलीला सुरवात झाली. या रॅलीत तरुण, तरुणी, सामाजिक राजकीय व्यक्ती, तसेच शासकीय कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौड रॅली शहरातील विविध मार्गावरून जात असताना शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. सरदार पटेल यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीची जनतेला माहिती व्हावी तसेच समाजात एकता कायम राहावी, हा दौडचा उद्देश होता.

ईडी सरकारने शेतकऱ्याला सुद्धा लुटायचं सोडलं नाही, नुकसान पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात ४०० रुपये !

ईडी सरकारने शेतकऱ्याला सुद्धा लुटायचं सोडलं नाही, नुकसान पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात ४०० रुपये !


अहमदनगर, अखलाख देशमुख, दि ३१ : राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीत बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर येण्यासाठी उशीरा का होईना राज्य सरकारला शहाणपण सुचले आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वस्त केले. मात्र या नुकसान भरपाईत शेतकऱ्यालाच लुटण्याचे काम होत आहे. ही घटना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात आढळून आली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी बेधुंदपणे शेतकऱ्यांकडून पाहणीसाठी पैसे मागत आहेत. त्यांना कोणाचा वरदहस्त आहे ज्यातून उघडउघड लुटमार करण्याची हिंमत अधिकाऱ्यांना झाली आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा. अन्यथा आपलं सरकार हे बळीराजाच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे यावर निश्चितपणाने शिक्कामोर्तब होईल.

५० खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, ५० कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी: आम आदमी पार्टी !

५० खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, ५० कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी: आम आदमी पार्टी !


पुणे, अखलाख देशमुख, दि ३१ : आज बीजेपी आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या सरकारचे समर्थक आमदार बच्चू कडू व रवी राणे अशी चर्चा झाल्याचे समजते. हे सर्व सत्ताधारी बाकांवरील आमदार आहेत. दोघांमधील वाद चव्हाट्यावर येण्यास कारण ठरलंय गुवाहाटी आणि खोके. रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडूंनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर सुरूवातीला बच्चू कडूंनी मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) यांनाही यात भूमिका मांडण्याचं आवाहन केलं होतं.

खरे तर हा प्रश्न जनतेच्या पैशाचा आणि मतदारांच्या अपेक्षांभंगाचा आहे. हे सर्व फुटीर आमदार कोणत्या आमिषाला बळी पडले आहेत असा जनतेच्या मनात प्रश्न आहे. केला गेलेला आरोप हा तब्बल पन्नास कोटींचा आहे आणि शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांची संख्या पाहता ही रक्कम प्रचंड मोठी होते. हा गंभीर आरोप फक्त च्या दोघांमध्ये मिटवण्याचा नसून याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. *या आरोपाची चौकशी ईडी- सीबीआय मार्फत करायला हवी अशी मागणी आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे*.

एकता दौड (UNITY RUN) व फीट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमास उत्फुर्त प्रतिसाद !

एकता दौड (UNITY RUN) व फीट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमास उत्फुर्त प्रतिसाद !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३१ : सरदार वल्लभभाई पटेल याचा जन्मदिन दि. 31 ऑक्टोंबर हा "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून "राष्ट्रीय एकता दौड" (UNITY RUN) व फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, औरंगाबाद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7.00 वाजता मानवी साखळी तयार करून एकता दौड (UNITY RUN) व आजादी का अमृत महोत्सव फीट इंडिया फ्रीडम रन (3.00 कि.मि.) करणेकरीता विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आले. 

या प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल याच्या प्रतिमेस प्रमुख पाहूणे मा. डॉ. भागवत कराड,केंद्रीय अर्थ राज्य मंत्री,भारत सरकार, नवी दिल्ली व मा. जिल्हाधिकारी, औरंगाबाद आस्तिककुमार पांडेय, भाप्रसे, यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून " एकता दौड" (UNITY RUN) व फिट इंडिया फ्रिडम रनची सुरूवात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. 

सदर कार्यक्रमांचे प्रास्ताविक मा. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी केले. मा. डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री,भारत सरकार, नवी दिल्ली व जिल्हाधिकारी औरंगाबाद आस्तिककुमार पांडेय, भाप्रसे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी एकता व समानतेने राहण्याकरीता उपस्थितांनी "राष्ट्रीय एकता" ची शपथ मा. ना. श्री. भागवत कराड यांनी दिली. सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे याकरीता किमान अर्धा तास तरी नियमित चालणे किंवा धावणे हा उद्येश समोर ठेवून फिट इंडिया फ्रिडम रन च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

रायते विद्यालयातील समुपदेशक कल्पेश शिंदे हे महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

रायते विद्यालयातील समुपदेशक कल्पेश शिंदे हे महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित !


कल्याण, (संजय कांबळे) :

पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी संचालित रायते विभाग हायस्कूल रायते ता कल्याण या विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक आणि वाडा तालुक्यातील बिलघर गावचे सुपुत्र  कल्पेश मनोहर शिंदे यांना  नुकताच महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय सैनिक फेडरेशन चे अध्यक्ष तथा माझी खासदार ब्रिगेडियर सुधीर सांवत यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. यावेळी माझी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खा, धैर्यशील माने अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषण राजे, आदी मान्यवर उपस्थित होते.


कल्पेश शिंदे हे रायते विभाग हायस्कूल रायते येथे शिक्षक म्हणून तसेच समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने कल्पेश शिंदे यांची निवड करण्यात आली.जयसिंगपूर /कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मान पत्र,स्मृतिचिन्ह, देऊन गौरविण्यात आले.


हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य सी एस पाटील सर , सौ माळी मॅडम ,सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी ,रायते व बीळघर पंचक्रोशितील तमाम पालकांकडून सरांवर अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस तर्फे राष्ट्रमाता इंदिरा गांधी पुण्यतिथी व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी !

औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस तर्फे राष्ट्रमाता इंदिरा गांधी पुण्यतिथी व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी !


औरंगाबाद दि ३१ : राष्ट्रमाता स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संजयनगर मुकुंदवाडी येथील इंदिरा गांधी यांचा पुतळ्याला औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ (लीडर) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच काँग्रेस नेते लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहागंज मधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले, आणि तसेच पक्ष कार्यालय गांधी भवन येथे राष्ट्रमाता इंदिरा जी गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांचा अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसूफ (लीडर) जगन्नाथ काळे, मदन काका सातपुते, भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोंगरे, इकबालसिंग गिल,सागर नागरे, निलेश आंबेवाडीकर, बाळु गूजर, अशोक डोळस, अनिल माळोदे लियाकत पठाण
रवि लोखंडे, कैसर बाबा, रईस शेख,प्रकाश वाघमारे, अलंकृत येवतेकर, शुभम बनकर, चक्रधर मगरे, श्रीकृष्ण काकडे, सुभाष शुक्ला, मुद्दसर अन्सारी, सलीम खान, सय्यद फौजुदिन विनायक सरोदे, आकाश रगडे, सुनील वाहुल उमाकांत खोतकर, योगेश थोरात, विजय कांबळे,हेमा पाटील, उज्वला दत, सुहासिनी घोरपडे, रेखा राउत, दिपाली मिसाळ, रेखा राउत, शशिकला मगरे, माधवी चांद्रकी, मीनाक्षी देशपांडे, अनिता भंडारी, रूबिना शेख, स्वाती सरोदे, अरुणा लांडगे, स्वाती बासू, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

जंगलांचा विनाश करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा पराभव - आरती कुलकर्णी

जंगलांचा विनाश करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा पराभव

- आरती कुलकर्णी


ॲमेझॉनच्या सदाहरित जंगलांसाठी कर्दनकाळ ठरलेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांचा अखेर पराभव झाला. ब्राझीलमधली ही निवडणूक ॲमेझाॅनच्या जंगलांचं भवितव्य ठरवणारी आहे, असं बोललं जात होतंच. आता बोल्सोनारो यांचा पराभव झाल्यामुळे ब्राझीलमधली ॲमेझाॅनची जंगलं मोकळा श्वास घेऊ शकतील, अशी थेट मतं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत. आता नव्याने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले लुला डा सिल्वा यांनी ब्राझीलच्या जंगलांची हानी भरून काढण्याचं आश्वासन दिलं आहे. 

ॲमेझाॅनची सदाहरित जंगलं आणि वर्षावनं ही जगाची फुफ्फुसं मानली जातात. पण गेल्या २० वर्षांत इथली जंगली झपाट्याने नाहिशी झाली. बोल्सोनारो राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर पहिल्या तीनच वर्षातली आकडेवारी पाहिली तर आपल्या हे लक्षात येईल. 1 आँगस्ट 2019 ते 31 जुलै 2021 या काळात म्हणजे बोल्सोनारो यांच्या कारकिर्दीत 34 हजार चौ. कि.मी. जंगलाचा विनाश झाला, असं आकडेवारी सांगते. या नष्ट झालेल्या जंगलांचं क्षेत्र बेल्जियम या देशापेक्षाही जास्त आहे.  

याआधी ब्राझीलची ओळख ही जंगलांचं संवर्धन करणारा देश अशी होती. गेल्या दोन दशकांचा इतिहास पाहिला तर ब्राझीलमध्ये भूमिपुत्रांचा त्यांच्या जमिनींवरचा हक्क अबाधित होता, बेसुमार लाकूडतोडीला पायबंद घालण्यात आला होता. जंगलांच्या संवर्धनाची धोरणं आखली जात होती. पण बोल्सोनारो यांनी या सगळ्यालाच मूठमाती दिली.  

इथली जंगलं विकासाच्या नावाखाली कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आली. ही सदाहरित जंगलं वणव्यांच्या आगीत भस्मसात झाली. भांडवलदार आणि कंत्राटदारांना हाताशी धरून जंगलं जाळण्याचं षड्यंत्र रचण्यात आलं. अनिर्बंध लाकडूतोड करण्यात आली. बेसुमार खाणकाम सुरू झालं. जंगलं तोडून तेच क्षेत्र कोणत्याही नियोजनांशिवाय शेती आणि पशुपालनासाठी खुलं करण्यात आलं.  
ब्राझीलच्या या विनाशकारी धोरणांविरुद्ध जागतिक स्तरावरच असंतोष होता पण बोल्सोनारो यांना त्याची पर्वा नव्हती. ब्राझीलमधल्या पर्यावरणवादी चळवळी चिरडून टाकण्याचा त्यांनी चंगच बांधला होता.  
त्यांच्या या धोरणांमुळे आपण ॲमेझाॅनचं 17 टक्के वर्षावन गमावून बसलो आहोत, असं 2021 चा एक अहवाल सांगतो. तेव्हाच हा विनाश 20 ते 25 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज पर्यावरणवादी तज्ज्ञांनी बोलून दाखवला होता. 
राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणांमुळे एका देशाच्या आणि पर्यायाने जगाच्याच पर्यावरणाचा कसा विनाश होऊ शकतो याचं ब्राझील हे एक भयंकर उदाहरण आहे. आता नव्याने निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षांनी जंगलांचा विनाश करणाऱ्या धोरणांचं उच्चाटन करून या जंगलांचं संरक्षण करण्याचा निर्धार केला आहे. 

लुला डा सिल्वा हे डाव्या विचारसरणीचे राजकीय नेते मानले जातात. ब्राझीलमधल्या सध्याच्या राजकीय वातावरणात लूला हेच Greenest candidate आहेत, असं म्हटलं जात होतं. अशा पर्यावरणाला महत्त्व देणाऱ्या राजकीय नेत्याचा विजय झाल्यामुळे इथल्याच नव्हे तर जगभरातल्या पर्यावरणप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत.  

ॲमेझाॅनच्या जंगलाची आणि या जंगलांवर अवलंबून असलेल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे, असं वक्तव्य लूला यांनी केलं होतं. याआधी 2003 मध्ये जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा ब्राझीलमधली जंगलं नष्ट होण्याचं प्रमाण टोकाला गेलं होतं. पण त्यांनी जंगलं राखण्यासाठी बऱ्याच सुधारणा केल्या हे ते पुन्हापुन्हा सांगतात. यामुळेच त्यांच्याकडून पर्यावरणवाद्यांना मोठ्या आशा आहेत. 

लूला जर त्यांनी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे वागले तर ॲमेझाॅनच्या जंगलांमध्ये पुन्हा एकदा आशेचे किरण डोकावू लागतील... असं आत्ताच्या क्षणाला तरी वाटतं आहे.

नमन व जाखडी लोककलेचं एकत्रित धुमशान "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजन !

नमन व जाखडी लोककलेचं एकत्रित धुमशान "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजन !


*ठाणे: उदय दणदणे*

मुंबईतील दामोदर नाट्यगृह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी - राजन तिरवडेकर, जयवंत सातोसकर, अशोक साळुंखे, दिलिप बंडागळे, महेश शिरवडकर, कमलाकर पाटकर, उत्तम ढोलम, विजय पडये, भारती एस्. संकल्पित व दामोदर नाट्यगृह चतुर्थश्रेणी कर्मचारी आयोजित शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दामोदर नाट्यगृह परळ, मुबंई येथे रात्रौ ०८.३० वा. समर्थ कृपा प्रोडक्शन रत्नागिरी प्रस्तुत. *"कोकणचा साज संगमेश्वरी बाज"* या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संगमेश्वरी शैलीत खास चमचमीत- चटकदार , चुटके,गाणी, त्याचबरोबर कोकणातील नमन,जाखडी,लोककलांचे खास संगमेश्वरी बोलीत विनोदी शैलीत एकत्रित असं धुमशान सादरीकरण होणार आहे. 

दामोदर नाट्यगृह हे मुबंईतील एक सुप्रसिद्ध नाट्यगृह असून सदर नाट्यगृहात- नाटक ,लावणी, व कोकणातील लोकप्रिय नमन, जाखडी, दशावतार, भारुड, या लोककला सर्वाधिक सादरीकरण होत असतात, त्याचबरोबर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने होत असतात.

रंगमंचावर होणारे कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी हॉल मॅनेजमेंट बरोबरच कर्मचाऱ्यांचाही फार मोठा सहभाग असतो.

नाट्यगृहात कार्यरत असणारे डोअरकिपर यांना मानधन हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमानुसार मिळत असते. कधी कधी व्यावसायिक नाटक व इतर कार्यक्रम काही तांत्रिक कारणांमुळे अचानक रद्द केले जातात. अशावेळी सदर कर्मचाऱ्यांना मानधन मिळत नाही प्रसंगी कर्मचारी आर्थिक संकटात येतात. या विवंचनेतुन कर्मचाऱ्यांना थोडासा का होईना ! दिलासा मिळावा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दामोदर नाट्यगृह व्यवस्थापक, सोशल सर्व्हिस लीग, सहकारी मनोरंजन मंडळ व दामोदर हॉल मॅनेजर -सुभाष माळोदे, सुंदर परब, वैभव तांबे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी कलाक्षेत्रातील सर्व आयोजक, निर्माते, लेखक दिग्दर्शक,कलाकार, रसिक प्रेक्षकांनी सदर उपक्रमास बहुमूल्य योगदान देऊन व आयोजित केलेल्या मनोरंजन कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहून सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी. भारती एस,- ९०२९८६७९६७ / ९४०४८६७९६७ राजन तिरवडेकर- ८१०८९९८९६८ अशोक साळुंखे- ८७६७३७४६०१ यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन दामोदर नाट्यगृह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करत महापौर सह नागरिकांची एकतेसाठी मोटार सायकल रॅली !

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करत
महापौर सह नागरिकांची एकतेसाठी मोटार सायकल रॅली !


जळगाव, अखलाख देशमुख, दि ३१ : राष्ट्रीय एकता दिवस तथा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी शहरातील काव्यरत्नावली चौक येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या प्रतिमेला प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरात मोटारसायकल रॅली ला सुरुवात झाली. लोहपुरुष यांच्या प्रति श्रद्धाभाव यात दिसला. भोरगाव लेवा पाटीदार पंचायत पाडळसे जळगाव विभाग, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्दिशीय संस्था, अखिल भारतीय लेवा विकास महासंघ जळगाव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महापौर सौ. महाजन यांच्या सह शहरातील लेवा पाटीदार समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कर्मचारी, शेतकरी तसेच सर्व समाजातील बंधू भगिनीनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देत एकतेचा संदेश दिला. सदर मोटारसायकल रॅली काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेडियम, शिवाजी पुतळा, मनपा इमारत, चित्रा चौक, पुष्पा बेंडाळे चौक, पांडे चौक, बीएसएनएल कार्यालय मार्गे लेवा भवन येथे रॅलीची सांगता झाली. लोहपुरुष सरदार पटेल यांना मान्यवरांनी अभिवादन केले.स्वातंत्र्य लढ्यात सरदार पटेल यांचे योगदान याबद्दल मान्यवरांनी मनोगतात इतिहासाला उजाळा दिला. या कार्यक्रमात महापौर सौ. जयश्री महाजन, जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश दामू भोळे उर्फ राजुमामा, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डाँ. श्री. उल्हास पाटील, डाँ सौ. केतकी पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेनेचे जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्रीय ऐकता , बंधुभाव हा संदेश ही यातून दिला गेला.

Sunday 30 October 2022

वंचितचे महेंद्र अहिरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून उल्हासनगरात महाआरोग्य शिबीर संपन्न !

वंचितचे महेंद्र अहिरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून उल्हासनगरात महाआरोग्य शिबीर संपन्न !


उल्हासनगर, (अशोक शिरसाट ) : उल्हासनगर - ४ येथे वंचित बहुजन आघाडीचे विभागप्रमुख, 'भावी नगरसेवक महेंद्र अहिरे', यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तसेच या शिबीरात मोफत शुगर ब्लड प्रेशर असे विविध चाचण्याचा लाभ नागरिकांनी घेतला असून डोळे तपासणी या शिबीराचे उद्घाटन वंचितचे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांच्या हस्ते झाले तसेच जेष्ठ नागरिक यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले होते तसेच महाआरोग्य व महारोजगार मेळावा आणि मोफत चष्मा वाटप असे विविध शिबीराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला असून या शिबीरा प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रा. सुरेश सोनवणे, वार्ड अध्यक्ष दिपक आढाव, यांच्यासह तरुण युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

🟦 मुंबईकरांचं पाणीही महागलं, पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांनी वाढ; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी !

🟦 मुंबईकरांचं पाणीही महागलं, पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांनी वाढ ; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी !


मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच मुंबई महापालिका प्रशासनाने आता पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या उद्यापासून (1 नोव्हेंबर) अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यानुसार आता मुंबईकरांच्या 'पाणीपट्टीत 7.12 टक्क्यां'नी वाढ होणार आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, भाज्या महाग होत असतानाच मुंबईकरांच्या या महागाईच्या यादीत महापालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची भर पडली आहे. कोरोना कालावधीत मुंबई महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला होता. हा रिता झालेला खजिना भरुन काढण्यासाठी मुंबई महापालिकेने करवाढीचा मार्ग स्वीकारला आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने 2012 मध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली होती. त्या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जात आहे. यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

2022-23 साठी पाणीपट्टीत तब्बल 7.12 टक्के वाढ केली असून 16 जून 2022 पासून ही दरवाढ लागू होणार आहे. घरगुतीसह व्यवसायिकांकडून ही दरवाढ नोव्हेंबर महिन्यापासून वसूल केली जाणार आहे. या पाणीपट्टी वसुलीतून मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाला 2022-23 मध्ये 91.46 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

*पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षभरात बीएमसीकडून कोट्यवधींचा खर्च....

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्यासाठी मुंबई महापालिकेला वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारली जाते. 2020 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे पाणीपट्टीमध्ये वाढ केलेली नव्हती. मात्र मागील वर्षी 2021 मध्ये पाणीपट्टीत 5.29 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

*अशी होणार पाणीपट्टीत वाढ -*

नव्या पाणीपट्टी वाढीनुसार प्रति एक हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी 4.93 रुपयांवरुन 5.28 रुपये होणार आहे.

इमारतींची पाणीपट्टी 5.94 रुपयांवरुन 6.36 रुपये होणार आहे.

नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी 23.77 रुपयांवरुन 25.26 रुपये होणार आहे.

व्यवसायिक विभागात 44.58 रुपयांवरुन 47.65 रुपये होणार आहे.

उद्योग कारखान्यांसाठी 59.42 रुपयांवरुन 63.65 रुपये आणि रेसकोर्स आणि फाईव्ह स्टार हॉटेलसाठी 89.14 रुपयांवरुन 95.49 रुपये इतकी पाणीपट्टी वाढणार आहे.

दरम्यान, मलनिस्सारण प्रति एक हजार लिटरसाठी 4.76 रुपये आकारण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थकारणावर चीनचा दबदबा : 'प्रा. अलका आचार्य'

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थकारणावर चीनचा दबदबा : 'प्रा. अलका आचार्य'


मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : क्षेत्रीय एकात्मिकता, राष्ट्रशक्तींचे बळकटीकरण, जागतिक अर्थव्यवस्थेत भक्कम सहभाग, देश-विदेशातील विविध संस्था तसेच संघटनांना अधिकांश मदत करण्याची नीती, जगभरात गुंतवणूक यातूनच चीनच्या जागतिक नीतीची चालना आणि परिणामकता दिसून येते, आपल्या बलस्थानातून त्यांनी जागतिक स्तरावर स्थान भक्कम केले आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार व अर्थकारणावर दबदबा निर्माण केला आहे, असे विश्लेषण `चीनची जागतिक नीती – चालना आणि परिणामकता’ या विषयावर चायनीज स्टडीज इन्स्टिट्यूटच्या माजी संचालिका तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या माजी सदस्या प्रा. अलका आचार्य यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वरळी येथील नेहरू केंद्रात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.

आपल्या विषयाचे सखोल विवेचन करताना त्यांनी अनेक मुद्यांचा उहापोह केला. सर्वाधिक औद्योगिकरण, जागतिक पातळीवर परिणाम करु शकेल, अशी प्रभावशाली अर्थव्यवस्था आणि व्यापारीकरण, विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये अग्रणी, जागतिक दर्जाची विद्यापीठे, विज्ञान आणि तंत्रज्ञानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अव्वल संशोधन, सर्वाधिक पेटंटधारक राष्ट्र, उर्जेचा विपुल प्रमाणात नियोजनबद्ध वापर, परकीय गुंतवणूकधारांना सदैव आकर्षक करणारी व्यवस्था, सैन्यदलाचे आधुनिकीकरण ही चीनची बलस्थाने आहेत. त्याच्या आधारे त्यांनी जागतिक स्तरावर आपले स्थान भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. `चायनास बेल्ट अँड रोड इनिशिएव्हिट’ या कार्यक्रमांतर्गत चीनने आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच अर्थकारणावर दबदबा निर्माण केला आहे. अमेरिकेबरोबर तुल्यबळ राहण्याचा प्रयत्न सैन्याच्या आधुनिकीकरणातून केला आहे. तिबेट, तैवान आणि दक्षिण चीनलगतच्या भागांचे सार्वभौमत्व निर्माण केले आहे. या मुद्यांनाही त्यांनी स्पष्ट केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे यशवंतराव चव्हाण सामाजिक विज्ञान संशोधन केंद्र मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदवीसाठी आता मान्यताप्राप्त आहे. सामाजिक कार्य तसेच सार्वजनिक धोरण संशोधन यासाठी ते महत्वाचे असून त्यानुसार विकसित करण्यात येणार आहे. या केंद्राची औपचारिक घोषणा करण्यासाठी तसेच प्रमुख कार्यक्रमांपैकी एक म्हणून परराष्ट्र धोरणावर मुंबईचा दृष्टीकोन विकसित करण्यासाठी संशोधन केंद्राने परराष्ट्र धोरणावर मुंबई संवाद ही एक वर्षभर चालणारी सार्वजनिक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यापुढील काळात केंद्राच्या माध्यमातून अशा स्वरुपाचे उपक्रम होणार असून त्यातून विविध विषयांवर वैचारिक मंथन होईल. पंडित नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या सकंल्पनेतील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ते महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रोत्यांच्या प्रश्नांना प्रा. अलका आचार्य यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

कल्याणचा भूमिपुत्र कु. सिध्देश रवी ताजने याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले अभिनंदन !

कल्याणचा भूमिपुत्र कु. सिध्देश रवी ताजने याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले अभिनंदन !


कल्याण, बातमीदार : ऐतिहासिक कल्याण शहरातील तरुणांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रिडा क्षेत्रात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन आपल्या कल्याणचे नाव महाराष्ट्रात मोठे होईल या अनुषंगाने आपले कल्याणचे "कार्यसम्राट आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब" नेहमीच प्रयत्नशील असतात.

नुकतेच पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय 'पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टिंग' स्पर्धेमध्ये ५९ किलो वजनी गटात बेतुरकर पाडा, कल्याण येथील भूमिपुत्र 'कु. सिद्धेश रवि ताजने' यांनी राज्यातून *प्रथम क्रमांक* पटकावित सुवर्णपदक प्राप्त केले तसेच त्याचे अखिल भारतीय पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आमदार साहेबांनी कु. सिद्धेश याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भारत जोडो यात्रेसाठी औरंगाबाद मधे वातावरण निर्मिती करा - नाना पटोले

भारत जोडो यात्रेसाठी औरंगाबाद मधे वातावरण निर्मिती करा - नाना पटोले 


मुंबई, अखलाख देशमुख, दि ३० : भारत जोडो यात्रा संदर्भात पक्ष कार्यालय दादर टिळक भवण मुंबई येथे आज महत्वाची बैठक पार पडली या मध्य सविस्तर चर्चा झाली व भारत जोडो यात्रा संदर्भातील औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची पास यादी मा. आ. नाना भाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, यांना औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष शेख युसूफ लिडर यानी पास ची यादि सादर केली, मा. आ नाना भाऊ पटोले यांनी भारत जोडो यात्रा औरंगाबाद शहरात वातावरण निर्मिती करून कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले या वेळी सोबत डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसार बाबा, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जी.एम.पटेल बायो एग्रोचे टाकळी (रा.रा.) येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन !

जी.एम.पटेल बायो एग्रोचे टाकळी (रा.रा.) येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : खुलताबाद तालुक्यातील टाकळी ( रा.रा.) येथील जी. एम. पटेल बायो अँग्रो प्रा. ली.च्या 80 टीसीडी क्षमतेचे गूळ प्रकल्प व पहिल्या गाळपाचा शुभारंभ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत नव्याने सुरू झालेल्या गूळ प्रकल्पाच्या मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, जि.प.माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, एल.जि. गायकवाड, जगन्नाथ खोसरे, जिल्हा बँकेचे संचालक जावेद पटेल, किरण पा. डोणगावकर, सतीश ताठे, शेख पाशु चचा, जी. एम.पटेल बायो ऍग्रोचे असद पटेल, ऍड. इशतीयाक पटेल,जुल्फेखार पटेल, अखलाख पटेल,मझर पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्षपदी नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपूत !

बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्षपदी नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपूत !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : गंगापूर शहराच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मणसिंग राजपूत हे कार्यरत होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण सिंग राजपूत हे कोणत्या शिवसेनेचे हा संभ्रम शिवसैनिकासह नागरिकांमध्ये होता, आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, जिल्हा प्रमुख रमेश पवार, जिल्हा परिषद माजी सभापती विलासबापु भुमरे, तालुका प्रमुख दिलीप पा निर्फळ, माजी सभापती अरुण रोडगे, माजी सभापती दिलीपसिंग राजपूत, कन्नड तालुका प्रमुख केतन काजे यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मण सिंग राजपूत यांनी अधिकृत प्रवेश करून संभ्रम दूर केला
त्यांच्यासोबत उपसभापती ताराचंद पवार, भीमसिंह दादा राजपूत, जुने शिवसेनिक बाळासाहेब पवार, बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला, या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते.

धन्यवाद मोदी जी अभियान देशवासीयांनी आपला सहभाग नोंदवावा - अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज़ देशमुख

धन्यवाद मोदी जी अभियान देशवासीयांनी आपला सहभाग नोंदवावा - अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज़ देशमुख 


सांगली, अखलाख देशमुख, दि ३० : ज्यांनी देशावर सत्तर वर्षे राज्य केले, पण सर्वसामान्य देशवासी अडचणींत असताना पाठ फिरवली पण देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या उदार भुमिकेमुळे कोरोना काळात सर्वसामान्यांच्या चुली पेटल्या. तब्बल १६८ योजनांच्या माध्यमातून मोदींनी सर्वसामान्यांना अन्नधान्य, मुद्रा कर्ज, शिष्यवृत्ती, उज्वला ॻॅसपासुन विविध प्रकारच्या योजना देशभरात पोचवल्या यासाठीच धन्यवाद मोदीजी अभियान राबविण्यात येत आहे देशवासीयांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी सांगलीत बोलताना केले.
धन्यवाद मोदीजी अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या सांगली शहर व ग्रामीण कार्यकारणी बैठक आज सांगली येथे पार पडली या बैठकीत अध्यक्षस्थानी एजाज देशमुख भाजपा प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र राज्य हे होते.या बैठकीत बोलताना एजाज देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील लाभार्थी यांच्या कडुन १०,०००/- आभार पत्रे पंतप्रधान मोदींना जातील अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार साहेब, अल्पसंख्यांक मोर्चाच्या संघटन प्रदेश सरचिटणीस अतीक खान, प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश तात्या बिरजे, सरचिटणीस मिलिंद कोरे, प्रदेश चिटणीस अशरफ वांकर, शहर जिल्हा अध्यक्ष शहानवाज सौदागर, ग्रामीण अध्यक्ष आजम मकानदार, प्रदेश चिटणीस असिफ पटेल, कोल्हापूर जिल्हा अद्यक्ष आजम जमादार, जेष्ठ नेते श्रीकांत तात्या, अविनाश मोहिते, महिला मोर्चा उपाध्यक्ष माधुरी वसगडेकर, प्रीती मोरे, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्षा संगीता जाधव, भटके विमुक्त जिल्हा उपाध्यक्ष ललिताताई मासाळ, कुपवाड मंडल जिल्हा उपाध्यक्ष, स्वप्नाली भट, कनीजा शेख, लक्ष्मी हिप्पलकर, उपाध्यक्ष साजीदअली पठाण, लियाकत शेख, रियाज वंटमुरे, सरचिटणीस कय्युम शेख, गौस पठाण, समीर मोमीन, असगर शरीकमसलत, शिवरुद्र कुंभार, फिरोज मुलांनी, हबीब शेख, असलम कलावंत, संजय कोटकर, के के काजी, आदिनाथ शेडबाळे, राजू शेख, मिरज तालुकाध्यक्ष हमीद सुतार, वाळवा तालुका अध्यक्ष आसिफ शेख, आटपाडी तालुका अध्यक्ष मुनीर पठाण, पलूस तालुका अध्यक्ष सद्दाम अत्तार, जत तालुका अध्यक्ष, रईस पिरजादे, ओंकार पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खासदार चषकचे उदघाटन !

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खासदार चषकचे उदघाटन !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : खा. इम्तियाज जलील संचलित दुआ फॉन्डेशनच्या वतीने आमखास मैदान येथे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले, अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थिंताना मार्गदर्शन केले. तसेच नाणेफेक करुन क्रिकेट स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

यावेळी खा. इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस महासंचालक निसार तांबोळी, रेल्वे महामार्गाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, एल.जि. गायकवाड, भारत राजपूत, सतीश ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

२५ पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो लावणाऱ्या अज्ञात इसमाचे भास्कर जाधवांकडून कौतुक !

२५ पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो लावणाऱ्या अज्ञात इसमाचे भास्कर जाधवांकडून कौतुक !


भिवंडी, दिं, ३१, अरुण पाटील (कोपर) :
         आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावावा, अशी मागणी केली. यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा या बाबत विविध विधाने केली जात आहेत.
         चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? याबाबत विविध राजकीय नेत्यांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली. यामध्ये काहींनी देवदेवतांची नावं सूचवली तर काहींनी विद्यमान राजकीय नेत्यांचीही नावे सूचवली. संबंधित महापुरुषांमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अशा विविध नेत्यांचा समावेश आहे .
          त्यातच आता सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीने २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो संपादित केला असून ‘हे नाणं फायनल करा’ अशी मागणीही त्याने केली आहे .
          या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित अज्ञात तरुणा विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आहे. या प्रकारानंतर शिवसेना नेते भास्कर जाधवांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी संबंधित फोटो संपादित (एडिट) करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचं कौतुक केलं आहे. ज्याला कुणाला ही कल्पना सुचली आहे त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिली आहे.
           नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावल्याबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “नोटांवर विविध नेत्यांचे फोटो असावेत, ही चर्चा मी ऐकली आहे. ज्याला कुणाला ही कल्पना सुचली आहे त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे, एवढंच मी याबद्दल बोलेल” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा 'दणका, विद्यूत मंडळाच्या वरीष्ठ आधिकां-याकडून दखल, खांब बदलण्याचे काम सुरू !

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा 'दणका, विद्यूत मंडळाच्या वरीष्ठ आधिकां-याकडून दखल, खांब बदलण्याचे काम सुरू !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांनी दैनिक सागर, दैनिक, महाभारत, आपले महानगर, महानगरी टाईम्स, माझा बातमीदार, ऐबी जनमत न्यूज,आदी विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडिया मधून'संभाव्य जीवीतहानी टाळण्यासाठी आदिवासी तरुणांचा विद्यूत मंडळाला बांबू, आमदार खोके घेऊन ओके, शेतकऱ्यांचे काय? बळीराजाचा सवाल ! अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होतात, विद्यूम मंडळ खडबडून जागे झाले, ऐवढेच नव्हे तर रविवारी सुट्टी असताना ही हे कर्मचारी, अधिकारी जागेवर जाऊन, सत्य परिस्थिती लक्षात घेऊन वाकलेले लाईटचे खांब बदलण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहापूर रस्त्यावर वसलेल्या उशीद गावापासून ५००/७०० मीटर अंतरावर असलेल्या हाल टोपलेपाडा येथे काही वर्षांपूर्वी परशुराम भागरे या शेतकऱ्यांच्या दुभत्या म्हशीचा शाँक लागुन मृत्यू झाला होता. या परिसरातील ६ लाईटच्या खांबापैकी २ खांब पुर्णपणे वाकलेले/ झुकलेले आहेत, यांच्या तारा जमिनीबरोबर लोंबकळत आहेत, हे धोकादायक असल्याने येथील अनंता भागरे, विनोद जाधव आदींनी विद्यूत कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेरीस तालुक्यातील संवेदनशील पत्रकार संजय कांबळे यांनी वरील मथळ्याखाली फोटोसहित विविध दैनिकातून बातमी प्रसिद्ध करताच विद्यूत मंडळ खडबडून जागे झाले.

                           (काम सुरू असताना)
खडवली, टिटवाळा आणि गुरवली विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आज रविवारी सुट्टी असताना सकाळीच उशीद हल गावाजवळील टोपलेपाडा येथील संबंधित वाकलेल्या खांबांची स्थळ पहाणी करून ताबडतोब पोल बदलण्याचे काम सुरू केले. 

                                (काम पुर्ण झाले)
शिवाय परशुराम भागरे यांच्या मृत म्हशींचे नुकसानभरपाई चे काम नक्की कुठे अडले आहे, याची स्वतः चौकशी करण्याचे आश्वासन दिले.


दरम्यान खडवली, गुरवली, टिटवाळा या सेक्शन अंतर्गत ५५० ट्रान्सफार्मर आहेत, खडवली शाखेतंर्गत १८ जणांविरोधात १४ लाख ३७ हजार रुपयांची वीज चोरी प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ४०६ जणांविरोधात कारवाई करून १ कोटी ९४ लक्ष रुपयांची वीज चोरी उघड केली आहे. खडवली शाखेतर्फे आतापर्यंत ६६ लाखाच्या वीजचोरी प्रकरणी १३१ जणावर, टिटवाळा शाखातंर्गत ९८ लाखाची वीजचोरी, मांडा शाखेतर्फे ३० लाख वीजचोरी प्रकरणी ६० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर वीजबिल भरून सहकार्य करावे तसेच अधिकृत कर्मचाऱ्यांशिवाय लाईटचे काम करु नये, ते बेकायदेशीर व जीवावर बेतणारे ठरु शकते, असे विद्यूत मंडळाच्या वरीष्ठ अधिकां-यांनी सांगितले. तर पत्रकार संजय कांबळे यांच्या वस्तूनिष्ठ बातमीची दखल घेऊन तात्काळ धोकादायक खांब बदलण्याचे काम सुरू केल्याबद्दल विद्यूत मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार कांबळे यांचे अनंता भागरे या शेतकऱ्यांकडून व ग्रामस्थांनकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Saturday 29 October 2022

रांगोळी स्पर्धेत श्रद्धा संकल्पच्या रांगोळीस द्वितीय क्रमांक !

रांगोळी स्पर्धेत श्रद्धा संकल्पच्या रांगोळीस द्वितीय क्रमांक !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
          गोरेगाव पूर्व येथील, संकल्प सोसायटीतील श्रद्धा संकल्प इमारतीमधील महिलांनी भव्य रांगोळी काढून दीपोत्सव  दीपोत्सव -२०२२ साजरा केला केला. संकल्प फेडरेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत श्रद्धा संकल्पच्या रांगोळीस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. रांगोळी व रांगोळी काढणाऱ्या महिलाचे गोरेगाव परिसरात फारच कौतुक होत आहे.

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार !

सुरजकुंड येथील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची माहिती


सुरजकुंड, हरयाणा, दि. 28 ऑक्टोबर
सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या बैठकीला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर या बैठकीत मंथन करण्यात आले. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खाजगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलिस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलिकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणार्‍या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच त्यादृष्टीने सज्जता असेल.

ही बैठक आयोजित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही गुन्हा किंवा कायदा-सुव्यवस्था हा प्रश्न केवळ कोणत्याही एका राज्याचा प्रश्न नसतो, तर अनेक राज्यांना एकाचवेळी त्याचा सामना करावा लागतो. या बैठकीच्या माध्यमांतून केंद्र आणि राज्यात समन्वयाची उत्तम व्यवस्था तयार करण्यात आली, याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो.

सीसीटीएनएसमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गतीने कार्यवाही पूर्ण केली. अ‍ॅम्बीसच्या माध्यमांतून सुद्धा मोठी प्रगती राज्य सरकार करते आहे. सुमारे 6 लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रीक तयार करण्यात आले आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे नाव बदलून अन्य राज्यांत पुन्हा गुन्हे करतात, अशांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्याला सायबर पोलिसांशी जोडल्यामुळे गुन्ह्यांचा तपास वेगाने होणार आहे. चालान प्रणाली आणि एकच ऑनलाईन कोर्ट यामुळे मनुष्यबळाची सुद्धा बचत होते आहे. ऑनलाईन ट्रेनिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाला गती मिळते आहे. राज्यात 20 हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईला गती देण्यात आली असून, यात केंद्र सरकारची मोठी मदत मिळत आहे. शहरी नक्षलवादाचा धोका मोठा आहे. त्याविरोधात कठोर पाऊले उचलली जात आहेत. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांतून अपराध सिद्धीचा दर वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. सागरी सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली.

सुनेला घरकाम करायला लावणे म्हणजे क्रूरता नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण !

सुनेला घरकाम करायला लावणे म्हणजे क्रूरता नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण !


भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
          विवाहित महिलेला घरातील कामं करण्यास सांगणे ही क्रुरता नाही तसंच, घरातील सुनेने केलेल्या कामाची तुलना मोलकरणीच्या कामाशी होऊ शकत नाही, असं महत्त्वाते निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे.
          महिलेने २१ ऑक्टोबर रोजी पती व सासू- सासऱ्यांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. महिलेने तक्रारीत म्हटलं होती की, लग्नानंतर एक महिना तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळीने तिला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर तिच्यासोबत मोलकरणीसारखा व्यवहार करु लागले. दरम्यान महिलेचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
           महिलेने असाही दावा केला आहे की, पती आणि सासू-सासऱ्यांनी लग्नानंतर चारचाकी कार घेण्यासाठी चार लाख रुपये माहेरुन घेऊन यावे यासाठी मागणी केली होती. तसंच, त्यासाठी माझा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आला, अशी तक्रारही तिनं केली होती.
            न्यायालयाने या महिलेचा अर्ज फेटाळताना म्हटलं आहे की, जर एखाद्या महिलेला घरातील किंवा कुटुंबातील घरकाम करायला सांगितले जात असेल तर तिच्याकडून मोलकरणीसारखे काम करुन घेतले जात आहे, असा त्याचा अर्थ होत नाहीय. तसंच, त्याला क्रुरताही म्हणता येणार नाही.
             जर का कोणत्याही स्त्रीला घरातील काम करायचे नसेल किंवा तशी इच्छा नसेल तर त्या महिलेने लग्नापूर्वी तसे सांगावे जेणेकरुन मुलाला लग्नापूर्वीच पूर्नविचार करणे सोपे जाईल. लग्नानंतर जर अशी समस्या निर्माण झाली तर त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे, असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
            न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने २१ ऑक्टोबर रोजी महिलेचा पती आणि सासू सासऱ्यांविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महिलेने केवळ तिचा छळ झाल्याचे सांगितले होते. मात्र तिच्या तक्रारीत कोणत्याही कृत्याची माहिती नमूद केली नव्हती.
             भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८/अ मध्ये केवळ मानसिक आणि शारीरिक अपमानास्पद शब्दांचा वापर पुरेसा नाही तोपर्यंत अशा कृतींचे वर्णन त्यामध्ये केले जात नाही, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

अंगणवाडीच्या बालकांची खाऊ शिजवण्याची बिले अदा करा - *काम्रेड अमृत महाजन*

अंगणवाडीच्या बालकांची खाऊ शिजवण्याची बिले अदा करा - *काम्रेड अमृत महाजन*


चोपडा, बातमीदार.. महाराष्ट्र राज्य भर गेल्या मे २२ महिन्यापासून अंगणवाड्या उघडल्यानंतर त्या बालकांच्या हजेरीने गजबजू लागल्या आहेत. त्या अंगणवाडीतील मुलांना स्थानिक बचत गटांमार्फत वा बचत गट मिळाला नाही तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विनंती करून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रशासन अंगणवाडीतील बालकांना खाऊ पूरवत आहे. रोज किमान २० ते १०० लाभार्थी यांना ताजा शिजवलेला खाऊ पुरवला जातो, अशा तऱ्हेने राज्यात लाखभर अंगणवाडी मध्ये बचत गटांमार्फत वा अंगणवाडी कर्मचारी मार्फत वाटला जातो. त्यांची बिले सरकारने पाच महिन्यापासून दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांना व्याजाचे पैसे काढून उधार उसनवारीने जास्तीचे जास्तीचे पैसे मोजून खाऊ वाटप करावा लागतो. हा खाऊ योग्य मापात दिला नाही तर बचत गटांना जबाब विचारला जातो. परंतु गेल्या पाच महिन्यापासून खाऊ शिजवण्याची बिल मिळालेली नसल्यामुळे खाऊ पुरवणारे गट व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आदिवासी भागात तर लाभार्थी संख्या खूपच मोठी असते त्याचे आर्थिक हाल व शोषणाला पारावारच राहिला नाही संबंधित कार्यालयांना समस्या मांडावी तर ते थातुर मातुर उत्तरे देऊन वेळ निभावून नेतात. त्यांची जळगाव जिल्हा परिषदेमध्ये वा महाराष्ट्र शासनाकडे दाद पुकार घेतली जात नाही. एकदा घेतलेला ठेका रद्द करता येत नाही म्हणून बचत गटांतर्फे शिजवला जाणारा खाऊचे बिल महाराष्ट्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने त्वरित अदा करावीत. अशी मागणी जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे नेते कॉम्रेड अमृत महाजन, जिजाबाई राणे, लक्ष्मीबाई नाकाडे, यमुना बाई धनगर, सुमनबाई पाटील, सारुबाई कोळी, ठगु बाई भोई, मंगला सुशीलाबाई पाटील, मंगला कुमावत, देवकाबाई धनगर, मालू बाई धनगर, रंजना धनगर, लताबाई धनगर, सुशीला बाविस्कर, प्रतिभा डोळे  वैशाली महाजन, सुनंदा बाई चौधरी, शोभाबाई कोळी,  जनाबाई पाटील, बचत गट संघटना पदाधिकारी यांनी केली आहे.

संभाव्य जीवीतहानी रोखण्यासाठी आदिवासी तरुणांने विद्यूत मंडळाला लावला "बांबू" आमदार 'खोके घेऊन ओके, शेतकऱ्यांचे काय? बळीराजाचा संताप !

संभाव्य जीवीतहानी रोखण्यासाठी आदिवासी तरुणांने विद्यूत मंडळाला लावला "बांबू" आमदार 'खोके घेऊन ओके, शेतकऱ्यांचे काय? बळीराजाचा संताप !


कल्याण, (संजय कांबळे) : नैसर्गिक आपत्ती, त्यात परतीच्या पावसाचा झटका, तर काही ठिकाणी सरकारी बाबूच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या व त्यांच्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे, असे होऊनही लक्ष न देणा-या शासनाच्या 'इज्जतीची' बेअब्रू कल्याण तालुक्यातील उशीद गावाजवळील एका आदिवासी तरुणांने कृतीतून केली, तर आम्ही निवडून दिलेले आमदार, खासदार 'खोके घेऊन ओके, झाले' पण आमचे काय? असा संतप्त सवाल उशीद येथील शेतकरी अनंता परशुराम भागरे यांनी उपस्थित केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, कल्याण तालुक्यातील उशीद गावातील शेतकरी परशुराम भागरे या शेतकऱ्यांच्या दुभत्या म्हशीला विद्यूत मंडळाच्या तुटलेल्या वायरचा शाँक लागल्याने मृत्यू झाला होता, या घटनेला आज ३ वर्षे होत आली. केवळ, आश्वासन, पंचनामा, यातच ही वर्षे गेलीत.


उशीद गावाजवळील हल ते टोपलीपाडा या आदिवासी वाडी दरम्यान ६ खांब आहेत, यामध्ये तीन सिंमेट व तीन लोंखडी आहेत, यावरून गेलेल्या वायर लोंबकळत आहेत, या सहा खांबापैकी २ पडायला आलेले आहेत. यामुळे संभाव्य अपघात होऊन जीवावर बेतू शकते, म्हणून येथील अंनता परशुराम भागरे यांनी हे खांब बदलावे, वायर बदलावी अशा वारंवार तक्रार विद्यूत मंडळाकडे केली आहे. परंतु निर्ढावलेल्या अधिकां-यानी याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले होते. आजही येथील वाड्या वस्त्या अनेक सोईसुविधा पासून कोसो दूर आहेत.


त्यामुळे उशीद गावापासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर असलेल्या टोपलीपाडा वाडीतील विनोद जाधव या आदिवासी तरुणांने चक्क सागाच्या लाकडाचा 'टेकू, या लोंबकळत असलेल्या वायरला दिला आहे, त्यावर दोन काड्या बांधून त्याला लाईटच्या खांबाप्रमाणे उभा केला आहे. चालू लाईनला असे करणे धोकादायक असताना, त्यांने जीव धोक्यात घालून ही कृती करून शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.


दुसरीकडे पुर, नैसर्गिक आपत्ती, परतीच्या पावसाचा तडाखा, कुजलेले पीक, विजेचा शाँक लागून कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, आणि भिंवडी तालुक्यातील शेतकऱ्यांची दगावलेली जनावरे, त्यांना अद्यापही न मिळालेली नुकसान भरपाई, यामुळे शासनाच्या विरोधात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.


निवडणुकीत पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य, आमदार, खासदार दारोदारी मतांचा'जोगवा, मागत फिरतात, लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, जनमताचा अनादर करून, ५० खोके घेऊन एकदम ओके होतात, मात्र, शेतकऱ्यांचे काय?जगाच्या पोशिंदा त्याचे काय? बळीराजाला वाली कोण? असा संतापजनक सवाल कल्याण तालुक्यातील अनंता भागरे या शेतकऱ्यांने उपस्थित केला आहे.

राजभवन येथे आयोजित काव्य संमेलन व स्मृती सोहळा संपन्न !

राजभवन येथे आयोजित काव्य संमेलन व स्मृती सोहळा संपन्न !


मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : महावीर प्रसाद द्विवेदी यांचे हिंदी साहित्य विश्वात मोठे नाव आहे. ज्याप्रमाणे संत तुलसीदास मीराबाई संत ज्ञानेश्वर तुकाराम गुरुनानक यांना विसरता येणे शक्य नाही त्याचप्रमाणे हिंदी भाषेला प्रचलित रूप देणाऱ्या महावीर प्रसाद द्विवेदी व हजारी प्रसाद द्विवेदी यांना विसरता येत नाही. महावीर प्रसाद द्विवेदी यांचे जन्मगाव असलेल्या रायबरेली जिल्ह्यातील दौलतपूर या गावचा साहित्यिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा या दृष्टीने आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेकडे पत्रव्यवहार करू तसेच पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे दिले.  

राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ राम मनोहर त्रिपाठी सेवा समिती व श्रीमती दुर्गादेवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर प्रसाद द्विवेदी स्मृती संरक्षण अभियान रजत जयंती सन्मान व मराठी - हिंदी कवी संमेलनाचे गुरुवारी राजभवन येथे आयोजन करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते.  

प्रसिद्ध साहित्यिक व माजी मंत्री डॉ राम मनोहर त्रिपाठी मुंबई महानगरीत आले व  महाराष्ट्राशी समरस झाले. डॉ राम मनोहर त्रिपाठी यांनी साहित्य समाजकारण व राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला माजी मंत्री कृपाशंकर सिंह माजी आमदार राज के पुरोहित  गीतकार मनोज मुंतशीर अनूप जलोटा डॉ मंजू पांडे अनुराग त्रिपाठी राजीव नौटियाल समाजसेवक प्रशांत शर्मा अनिल गलगली सुबोध शर्मा ब्रिजमोहन पांडे डॉ प्रदीप व्यास दीपक पांडे हरबंस सिंह अमरजीत मिश्रा शचिंद्र त्रिपाठी हेमराज शाह आर यू सिंह जितेंद्र दीक्षित बी आर भट्टड़ डॉ राजेंद्र सिंह सुमिता सुमन सिंह हरीश सणस पूनम त्रिपाठी डॉ व्यंकटेश जोशी डॉ दीपनारायण शुक्ला अशोक त्रिवेदी अजय शुक्ला यांसह साहित्यिक पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.  

राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ राम मनोहर त्रिपाठी यांच्या रचना संगीतबद्ध केल्याबद्दल भजन सम्राट अनुप जलोटा तसेच आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी स्मृति संरक्षण अभियान संस्थेचे निमन्त्रक गौरव अवस्थी यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी झालेल्या काव्य संमेलनात रामदास फुटाणे डॉ सुनील जोगी योगेंद्र शर्मा राजीव राज व ज्योती त्रिपाठी यांनी काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले.

Friday 28 October 2022

संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार त्याच्या पाठिशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होणारे काम राज्य सरकारने करावे - विरोधी पक्षनेते अजितदादा पवार

संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार त्याच्या पाठिशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होणारे काम राज्य सरकारने करावे - विरोधी पक्षनेते अजितदादा पवार 


पुणे, अखलाख देशमुख, दि २८ : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत आज विरोधी पक्षनेते अजितदादांनी प्रकाश टाकून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. यावेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार त्याच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होईल असे काम राज्य सराकारने करावे अशी आग्रही मागणी अजितदादांनी शिंदे- फडणवीस सरकारकडे केली. आज पुणे शहर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा माध्यमांसमोर मांडला. 

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यावर बोलताना अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या एका पत्राचा उताराच वाचून दाखवला. हे पत्र वाचून झाल्यावर विरोधी पक्षनेते म्हणाले की, या पत्रातील उद्धव ठाकरे यांचे नाव बाजूला करून त्याठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे नाव टाकावे लागेल, असा चिमटा त्यांनी काढला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केलेले आवाहन आज जशास तसे लागू होते. आज देवेंद्र फडणवीस स्वत: अर्थमंत्री, नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मिळून चांगले सरकार चालवत आहेत असा त्यांचा ग्रह आहे. त्यामुळे आता त्यांनी लोकांना मदत करून संकटातून बाहेर काढावे, अशी आग्रही मागणी अजितदादांनी केली.

सर्व विभागांनी समन्वयातून जिल्ह्याचा सर्वागीण विकास साधावा - पालक सचिव हर्षदीप कांबळे

सर्व विभागांनी समन्वयातून जिल्ह्याचा सर्वागीण विकास साधावा - पालक सचिव हर्षदीप कांबळे


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. २८ : जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समनव्य ठेवण्याचे निर्देश देत उद्योग विभागाचे प्रधान जिल्हा वार्षिक योजनेचा निधी सचिव विकास कामांवर खर्च करण्याचे निर्देश उद्योग विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव हर्षदीप कांबळे यांनी दिले. 
जिल्हा वार्षिक सर्वसाधरण योजनेच्या आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सहायक जिल्हाधिकारी श्री.जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी शितल महाले तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून उपलब्ध झालेला निधी वेळेत खर्च करून विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी दिल्या. 

औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिक विकासाचे विविध प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. ऑरिक सिटीमध्ये मोठे उद्योग येत असून गुंतवणूकीत वाढ होत आहे. कृषी आधरित प्रक्रिया उद्योग, महिलांना रोजगार, इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उद्योगात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नाविन्यूपर्ण उपक्रमाची आखणी करावी असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महत्वकांक्षी योजना व उपक्रमांची माहिती पालक सचिव यांना दिली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान, स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, त्याचप्रमाणे उद्योग, कृषी सहकार आदि विभागाच्या प्रलंबित कामाचा आढावा घेतला.

धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वैशाली साळवे यांची बिनविरोध निवड !

धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वैशाली साळवे यांची बिनविरोध निवड !


जव्हार (मोखाडा), जितेंद्र मोरघा :

तालुक्यातील धामणशेत कोशिमशेत गृप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी वैशाली साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सरपंच पदी सुरेश धिंडे या अगोदरच जनतेतून निवडून आले आहेत.

यावेळी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने वैशाली साळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला व सर्व बहुमताने वैशाली साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच सरपंच व सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पुरस्कृत जय आदिवासी क्रांती पॅनेलने तालुका प्रमुख अमोल पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम विलास गिरधले यांच्या मार्गदर्शनाखाली दणदणीत विजय मिळवून सरपंचपदी सुरेश धिंडे व आठ सदस्य निवडून आणुन शिवसेनेचा भगवा फडकवला आहे, यावेळी निवडणूक अधिकारी जोपले यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली तसेच ग्रामसेवक मंगेश पाटील पंचायत समिती सदस्य युवराज गिरधले योगेश धिंडे रवी जोघारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांशी बैठक संपन्न, सकारात्मक विचार !

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांशी बैठक संपन्न, सकारात्मक विचार !


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कल्याण तालुक्याच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्याशी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन श्री भवारी यांनी दिले.


कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत मध्ये सुमारे १९८ कर्मचारी आहेत, घरपट्टी, पाणीपट्टी, साफसफाई यासह विविध कामामध्ये यांचा सहभाग महत्त्वाचा असतो, विविध शासकीय योजना राबविण्यात ग्रामसेवकांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत असतात. जन आरोग्य, आयुष्यमान भारत नोदणी मध्ये यांचे मोलाचे योगदान आहे, असे असलेतरी एक दोन कामचुकार व गुंडप्रवृतीच्या कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण संघटनेची बदनामी झाली होती, याचा अनुभव पंचायत समितीच्या वरीष्ठ अधिका-यांना देखील आला होता. हे कटू सत्य असले तरी कर्मचाऱ्यांचे योगदान नजरेआड करता येणार नाही.


त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष सुरेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना देण्यात आले. यामध्ये शासनाकडून किमान वेतन ५०, ७५' व १०० टक्के अदा करण्यात येत असले तरी उर्वरित किमान वेतन हिस्सा व राहणीमान अनेक ग्रामपंचायतीकडून दिला जात नाही, सेवा पुस्तके अद्ययावत करून मिळावे, नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेली १४ गावे व ५ ग्रामपंचायत मधील सुमारे ४३ कर्मचाऱ्यांना दाखला द्यावा, १० टक्के नस्ती सन २०२१/२२ नुसार घेण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश असून बीडिओ यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले शिवाय कर्मचाऱ्यांकडून वसूली कामात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यास गटविकास अधिकारी अशोक भवारी हे विसरले नाहीत.

एकूणच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आजची बैठक अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, यावेळी ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक जगदीश मडके उपस्थित होते. तसेच विविध ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकता दौड मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे - उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे

एकता दौड मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे - उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दिनांक २८ : ‘फीट इंडिया’ अंतर्गत राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन विभागीय क्रीडा संकूल ते गजानन महाराज मंदीर या दरम्यान दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये नागरिक, क्रीडा प्रेमी, हेल्थ क्लब आणि सामाजिक संस्थेने सहभाग घ्यावा असे अवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी बैठकीत केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक दयानंद कांबळे, महिला बाल कल्याण कार्यालयाचे श्री. डोंगरे यांच्यासह शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त 31 ऑक्टोशबर हा दिवस देशभर एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वधर्म समभावाची भावना वृद्धीगत होण्यासाठी एकता दौडचे आयोजन जिल्ह्यात केले असून यामध्ये विविध क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी, सदस्य, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच विविध स्वंयसेवी संस्था सहभाग नोंदवणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी घुगे यांनी दिली.

मायभुमी फाउंडेशनच्या माध्यमातून जे. जे. हॉस्पिटल येथे फळ वाटप !

मायभुमी फाउंडेशनच्या माध्यमातून जे. जे. हॉस्पिटल येथे फळ वाटप !


मुंबई, (दीपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :

            एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी साजरी करत असताना ज्याना आपली दिवाळी रुग्णालयात उपचार घेत असताना काढावी लागत होती. अशा रुग्णांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी त्यांच्या मदतीला धावून आले ते म्हणजे मायभुमी फाउंडेशन. यांच्या माध्यमातून विविध रुग्णांना कायमस्वरूपी मदत होत असते. 


रुग्णांना मायभुमि फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबई जे जे रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. श्री. चेतन मलेकर, श्री.प्रमोद पीयूष (जळगाव), श्री. पीयूष कुले, श्री.विश्वनाथ टक्के, श्री. महेंद्र बोर्ले, श्री.प्रभाकर टक्के, श्री. सुहास काप, श्री. महेंद्र जोंधळे, श्री.जितू कानसारे, मायभुमी फाउंडेशनचे संस्थापक श्री.अनंतजी काप, श्री.रवींद्र पेंढारी व श्री. देवेंद्र गोठल यांच्याकडून याकमी योगदान लाभले. 


त्या बद्दल  या सर्वांचे फॉउंडेशनतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. मायभुमी फाउंडेशनतर्फे  राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी या फॉउंडेशनच्या पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांना यनिमित्ताने अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

Thursday 27 October 2022

चंदनसार, भाताने, पारोळ येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स, डॉक्टर, आशा वर्कर यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून कृतज्ञेची भाऊबीज भेट....

चंदनसार, भाताने, पारोळ येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स, डॉक्टर, आशा वर्कर यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून कृतज्ञेची भाऊबीज भेट....


वसई, प्रतिनिधी : मागील दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था समर्थपणे सांभाळणाऱ्या वसई विरार तालुक्यातील आशाताई, परिचारिका डॉक्टर भगिनींसाठी आजची भाऊबीज आनंदाची ठरली. 


जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून यासर्व भगिनींना पैठणी व चांदीची भेट वस्तु देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचे महाभयंकर संकट पसरल तेव्हापासून आजपर्यंत आपल्या कुटूंबाची काळजी न करता कोरोनाच्या संकटाचा सामना करत लढत राहिल्या त्या आपल्या आशाताई परिचारिका, डॉक्टर भगिनींचे 2020 2021 वर्षाप्रमाणे यावर्षीही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने त्यांचा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पैठणी भेटीच्या रूपाने जिजाऊची कृतज्ञेची भाऊबीज भगिनींपर्यंत पोहचवत साजरी केली.

आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत त्या समाजाचे काहितरी देणेकरी लागतो सर्व समाजाचे आपल्यावर अनेक ऋण असतात हे ऋण फेडण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणुन स्वखर्चातुन समाजाची सेवा करण्याचे ध्येय निलेश सांबरे यांचे असुन आरोग्य, शिक्षण, कला - क्रिडा महिला सक्षमीकरण, शेती व आदी सामाजिक क्षेत्रात जिजाऊ संस्था अग्रक्रमाने उपक्रम राबवत असुन समाजाचा विकास करणे हेच एकमेव ध्येय असुन मानवतेच्या कल्याणासाठी जिजाऊ संस्था कार्य करत असुन आपल कर्तव्य पार पाडत आहे.
पैठणीची आपुलकीची भेट स्विकारताना आपल्या भगिनींच्या चेहर्‍यावर फुलणारा आनंद सर्वांचाच हुरूप वाढवतो. 

आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाची आरोग्य सेवा करणारया आशाताई, परिचारिका, डॉक्टर, भगिनींना स्नेहाची जिजाऊ पैठणी भेट देण्यासाठी जिजाऊ संस्थेचा तालुका प्रमुख हर्षालीताई खानविलकर तसेच स्थानिक पक्षाचे समाजसेवक व जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक उमेश घरत, अमित नाईक, उन्मिका पाटील, योगिता घरत, असिफ शेख उपस्थित होते.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...