Saturday 29 October 2022

संभाव्य जीवीतहानी रोखण्यासाठी आदिवासी तरुणांने विद्यूत मंडळाला लावला "बांबू" आमदार 'खोके घेऊन ओके, शेतकऱ्यांचे काय? बळीराजाचा संताप !

संभाव्य जीवीतहानी रोखण्यासाठी आदिवासी तरुणांने विद्यूत मंडळाला लावला "बांबू" आमदार 'खोके घेऊन ओके, शेतकऱ्यांचे काय? बळीराजाचा संताप !


कल्याण, (संजय कांबळे) : नैसर्गिक आपत्ती, त्यात परतीच्या पावसाचा झटका, तर काही ठिकाणी सरकारी बाबूच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या व त्यांच्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे, असे होऊनही लक्ष न देणा-या शासनाच्या 'इज्जतीची' बेअब्रू कल्याण तालुक्यातील उशीद गावाजवळील एका आदिवासी तरुणांने कृतीतून केली, तर आम्ही निवडून दिलेले आमदार, खासदार 'खोके घेऊन ओके, झाले' पण आमचे काय? असा संतप्त सवाल उशीद येथील शेतकरी अनंता परशुराम भागरे यांनी उपस्थित केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, कल्याण तालुक्यातील उशीद गावातील शेतकरी परशुराम भागरे या शेतकऱ्यांच्या दुभत्या म्हशीला विद्यूत मंडळाच्या तुटलेल्या वायरचा शाँक लागल्याने मृत्यू झाला होता, या घटनेला आज ३ वर्षे होत आली. केवळ, आश्वासन, पंचनामा, यातच ही वर्षे गेलीत.


उशीद गावाजवळील हल ते टोपलीपाडा या आदिवासी वाडी दरम्यान ६ खांब आहेत, यामध्ये तीन सिंमेट व तीन लोंखडी आहेत, यावरून गेलेल्या वायर लोंबकळत आहेत, या सहा खांबापैकी २ पडायला आलेले आहेत. यामुळे संभाव्य अपघात होऊन जीवावर बेतू शकते, म्हणून येथील अंनता परशुराम भागरे यांनी हे खांब बदलावे, वायर बदलावी अशा वारंवार तक्रार विद्यूत मंडळाकडे केली आहे. परंतु निर्ढावलेल्या अधिकां-यानी याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले होते. आजही येथील वाड्या वस्त्या अनेक सोईसुविधा पासून कोसो दूर आहेत.


त्यामुळे उशीद गावापासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर असलेल्या टोपलीपाडा वाडीतील विनोद जाधव या आदिवासी तरुणांने चक्क सागाच्या लाकडाचा 'टेकू, या लोंबकळत असलेल्या वायरला दिला आहे, त्यावर दोन काड्या बांधून त्याला लाईटच्या खांबाप्रमाणे उभा केला आहे. चालू लाईनला असे करणे धोकादायक असताना, त्यांने जीव धोक्यात घालून ही कृती करून शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.


दुसरीकडे पुर, नैसर्गिक आपत्ती, परतीच्या पावसाचा तडाखा, कुजलेले पीक, विजेचा शाँक लागून कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, आणि भिंवडी तालुक्यातील शेतकऱ्यांची दगावलेली जनावरे, त्यांना अद्यापही न मिळालेली नुकसान भरपाई, यामुळे शासनाच्या विरोधात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.


निवडणुकीत पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य, आमदार, खासदार दारोदारी मतांचा'जोगवा, मागत फिरतात, लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, जनमताचा अनादर करून, ५० खोके घेऊन एकदम ओके होतात, मात्र, शेतकऱ्यांचे काय?जगाच्या पोशिंदा त्याचे काय? बळीराजाला वाली कोण? असा संतापजनक सवाल कल्याण तालुक्यातील अनंता भागरे या शेतकऱ्यांने उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...