Thursday 31 December 2020

पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार : "गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई"

पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार : "गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई"


पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य व दक्षता समिती योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिले निर्देश !

      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.  
      आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते.
    यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकाेरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती  न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य याेजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबराेबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर शासनाच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निर्देश दिले.

Wednesday 30 December 2020

मालती स्मृती ट्रस्ट ठाणे व पाणी पुरवठा अध्यक्ष यांच्या सहकार्यामुळे खोपिवली शाळेला मिळाले ''पाणी'' !

मालती स्मृती ट्रस्ट ठाणे व पाणी पुरवठा अध्यक्ष यांच्या सहकार्यामुळे खोपिवली शाळेला मिळाले ''पाणी'' !


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील खोपिवली हे गाव गेल्या अनेक दशकांपासून पाणी टंचाई ग्रस्त गाव म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळखले जात होते. मात्र बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामीण नळपाणी पुरवठा कमिटीचे अध्यक्ष श्री मंगल डोंगरे यांच्या जिद्दी स्वभावामुळे व प्रयत्नांमुळे अनेक अडचणींवर मात करत अखेर या गावाची पाणी टंचाई दुर करण्यात यश आले. 


आणि गावातील महिला मंडळींची होणारी पायपीट, रात्रभराच्या जागरण, नाईलाजाने विकत पाणी घेऊन भागवावी लागणारी तहान या सर्व गोष्टींवर मात करण्यात श्री मंगल डोंगरे याना यश आले खरे. पण गावातील शाळेला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आणि जि. प. प्राथमिक शाळा गावापासून दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांची खूपच गैरसोय होत होती. हि गैरसोय दूर व्हावी म्हणून नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद कराळे हे सतत धडपडत होते. शालेय विद्यार्थ्यांना पाणी मिळावे म्हणून अर्ज, विनंत्या व मदतीची आर्जव करत होते. मात्र सदरची समस्या सुटावी म्हणून त्यांनी ग्रामीण नळपाणी पुरवठा खोपिवलीचे अध्यक्ष मंगल डोंगरे यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता आपल्या अधिकारा खाली लेखी परवानगी देऊन सदरची समस्या सुटण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. परंतु त्यानंतर ही मुख्य पाईपलाईन पासून शाळेपर्यंत पाणी जाण्यासाठी १५०० मीटर पाईप व पाण्याची साठवण करणारी टाकी अश्या दोन गोष्टींची नितांत गरज होती. अश्यावेळी ठाणे येथील मालती स्मृतीं ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधून सदरची समस्या सोडविण्यासाठी विनंती केली असता ट्रस्टचे संचालक धनंजय गणेश महाजन यांनी तात्काळ  मदतीचा हात पुढे करून १५०० मीटर पाईपलाईन व साठवण टाकी उपलब्ध करून दिंल्याने व या शाळेचे शिक्षक दिपक भोईर सर यांनी पाईप लाईन टाकण्यासाठी गावातील पालकांना बोलावले असता कोणीही पालक आले नाही. असे असताना स्वतः पदरमोड करून 9000/- रुपये खर्च केले. आणि आज जि प प्राथमिक शाळा खोपिवलीची पाण्याची समस्या सुटल्याचे समाधान शाळेचे शिक्षक, विध्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद कराळे यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.  

"काही करण्याची जिद्द ज्यांच्या कडे असते त्यांच्या अवघड समस्याही दूर होतात". त्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे दिसून येत आहे.

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीनशे अठ्याऐंशी अर्ज, कल्याण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी?

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीनशे अठ्याऐंशी अर्ज, कल्याण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या आजच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३८८ अर्ज दाखल झाले असून यामुळे २११ सदस्य पदाकरिता एकूण ७२८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता तालुक्यात ख-या अर्थाने निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.
कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ, गोवेली रेवती, बापसई नवगाव, रायते पिंपळोली, घोटसई म्हारळ वरप कांबा, निंबवली मोस, गुरवली, राया ओझर्ली, जांभूळ वसत आपटी मांजर्ली, म्हसकळ अनखर, मानवली, बेहरे उतणे चिंचवली, खोणी वडवली, वडवली शिरडोण, सांगोडा कोंढेरी, आणि नडगाव दांणबाव अशा २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. एकूणच ७४ प्रभागातील २११ सदस्य पदाकरिता सुमारे ३१ हजार २४७ पुरुष व २७ हजार १३७ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर २०२० ला एकही अर्ज सादर झाला नाही. दुसऱ्या दिवशी १२, तिसऱ्या दिवशी ७२ तर काल २५६ असे तब्बल ३४० उमेदवारी अर्ज भरले होते आज उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी सुमारे ३८८ अर्ज दाखल झाले आहेत, त्यामुळे एकूण उमेदवार ७२८ झाले आहेत. 
त्यामुळे एकूणच तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मातब्बर उमेदवार निवडून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता खरी निवडणूकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण कोणाची जिरवण्यासाठी निवडणूक मैदानात राहतो? कोण खरेदी विक्री व्यवहारात सहभागी होतो तर कोण गाव विकासासाठी निवडणूक लढतो हे कळणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या ४ जानेवारी २०२१ ची वाट पहावी लागणार आहे.

वीर गावचे सुपुत्र महेश दुर्गोळी यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन !

वीर गावचे सुपुत्र महेश दुर्गोळी यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन !

"एक प्रेमळ शिक्षक कर्मचारी,वीर गावचे माजी उपसरपंच ते कुणबी विकास मंडळ,वहाळ विभाग ( ग्रामीण ) सचिव अशी अनेक पद भूषवणारे सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपलं"- दिपक कारकर


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

      चिपळूण तालुक्यातील अंतिम टोकाच्या "वीर" या खेडेगावात जन्मलेले महेश रत्नाकर दुर्गोळी यांची आज प्राणज्योत मावळली.आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा संघर्ष करत उच्च शिक्षण घेऊन अगदी शिक्षक ते सामाजिक कार्यात अग्रनिय असणाऱ्या महेश यांना आज बुधवार दि.३० डिसेंबर २०२० पहाटे ०६:०० वा. सुमारास ह्रदय विकाराचा आलेला झटका आणि त्यांचा घडून आलेला क्षणीच मृत्यू या बातमीने पंचक्रोशी सुन्न झाली आहे.

               डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय (मांडकी -पालवण) येथे सहाय्यक प्राध्यापक महेश दुर्गोळी (वय- ३४) कार्यरत होते. एक अत्यंत हुशार, प्रेमळ स्वाभाविक शिक्षक तितकंच गावचा विकास आणि सामाजिक योगदात सक्रिय असणाऱ्या महेश यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना अगदी वीर-देवपाट गावची ग्रामपंचायत उपसरपंच पदी कार्यभार सांभाळला, कुणबी विकास मंडळ, वहाळ विभाग (ग्रामीण) चे सचिव, वीर ग्रामस्थ मंडळाचे सदस्य अशा अनेक पदावर प्रामाणिकपणे काम करून युवकांच्या ह्रदयात वसलेलं हे व्यक्तिमत्त्व अचानक सोडून गेल्याने समाजाची खूप मोठी हानी झाली आहे.

              पंचक्रोशीतील एक मन मिळावू व्यक्तिमत्त्व, विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करणारे युवकांचे आशास्थान /मार्गदर्शक शिक्षक महेश दुर्गोळी यांच्या आठवणी आज वीर गाव किंवा वहाळ पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या ह्रदयी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.त्यांना कुणबी विकास मंडळ, वहाळ विभाग (ग्रामीण - मुंबई) / वीर ग्रामस्थ मंडळ या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा ! "कोरोना ला प्रतिबंध करण्या साठी कटीबध्द व्हा "

नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुध्दीत साजरे करा !
"कोरोना ला प्रतिबंध करण्या साठी कटीबध्द व्हा "


"नशाबंदी मंडळाच्या वतीने प्राण्यांचा मानवाला व्यसनमुक्तीचा संदेश"

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :

            समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता खूपच भयानक रुप धारण करित असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच आहे. उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न सदृढ व व्यसनमुक्त ठेवून शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नविन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने, उत्साहाने आणि नविन वर्षाचा संकल्प ठेवून करित असतो. परंतु ३१ डिसेंबर यादिवशी अनेक तरुण स्वतःच्या सुंदर आरोग्यमय जिवानाला काळीमा फासतात. इतकेच नव्हे तर वर्षाच्या अखेरचा दिवस व्यसनामुळे अनेकांच्या अनमोल जिवनाचाही अखेरचा ठरतो. क्षण मजा आणि आयुष्य ची दुर्दशा...!

              ३१ डिसेंबर यादिवशी अनेकजण व्यसन करणारे व पहिल्यांदाच व्यसन चाखणारे असतात म्हणुन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य च्या वतीने बुधवार, ३० डिसेंबर २०२० दुपारी ०३.३० वाजता १३८ बेस्ट बस स्टाँप बाहेर, कँपिटल सिनेमा समोर, सिएसएमटी स्टेशन बाहेर, सिएसएमटी, मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नववर्ष धुंदित नव्हे तर शुध्दित साजरे करा असे प्रेमाचे नम्र आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आले. पृथ्वीतालावरील कोणताही प्राणी दारु पित नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजा यांचे सेवन करित नाहीत. र्निबुध्दी असलेले हे प्राणी त्यांच्या आरोग्यास तसेच त्यांच्या जमातीस अपायकारक असलेले व्यसनांच्या सेवनापासुन दुर असतात. परंतु मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात बुध्दिमान असुनही तो र्निबुध्दी असल्यासारखा व्यसनांना जवळ करुन आपले व आपल्या समस्त मानव जातीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. याच मानवावर निसर्गातील प्राण्यांची ही जबाबदारी आहे. कार्यक्रमावेळी बलुन रुपी प्राण्यांनी आम्ही कोणतेही व्यसन करित नाहीत, तुम्ही तर माणसं आहात असा उपस्थितांना संदेश दिला. यावेळी व्यसनमुक्तीची पोस्टर्स प्रदर्शनी, स्टँण्डीज हे जनतेचे लक्ष वेधुन माहिती देत होते. सेल्फी काँर्नर मध्ये उपस्थित तरुणाईने तर सेल्फी काढुन मित्र, मैत्रीणींना पाठविण्यात सहभाग घेतला. 

             २०२१ मध्ये मी व्यसनमुक्त राहीन अशा सह्यांच्या संकल्पाला लोक उस्फुर्त प्रतिसाद देत होते.एकीकडे चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढत असताना मुंबईकरांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राला नशामुक्तीकडे नेण्याचे पाऊल आहे असे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास  यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुंबईकरांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. 

कल्याण डोंबिवलीकरानो सावधान.... 31 च्या पार्श्वभूमीवर पोलीस ईन ऍक्शन !

कल्याण डोंबिवलीकरानो सावधान....
31 च्या पार्श्वभूमीवर पोलीस ईन ऍक्शन !


"थर्टी फस्टसाठी चौकाचौकात नाकाबंदी, 20 गस्ती पथके, ड्रोन, ब्रेथ अँनालायझर सज्ज."

कल्याण, प्रतिनिधी : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनथ पासून बचाव करण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे मात्र तरीही 31 डिसेंम्बर साजरा करण्याचा तळीरामाकडुन प्रयत्न होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसानी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीत पोलिसांची 20 विशेष पथके तसेच 800 पोलिसांचा फौजफाटा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व नाक्यावर नाकाबंदी साठी सज्ज करण्यात आला आहे. 


शहाड नाका, दुर्गाडी, गांधारी, पलावा जंक्शन, बदलापूर नाका आणि टाटा पॉवर या नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. तर तळीरामावर नजर ठेवण्यासाठी ब्रेथ अनालायजर तयार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेथ अनालायजरची स्ट्रीप प्रत्येक वाहनचालकासाठी बदलली जाणार असून नाक्यावर तैनात असणाऱ्या पोलिसांना पीपीई किट दिले जाणार आहेत. याखेरीज गच्चीत आणि निर्जन स्थळी संचारबंदी मोडणाऱ्यावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे कल्याण झोन मध्ये 4 ड्रोन सज्ज असून संध्याकाळ नंतर हे कॅमेरे शहरावर लक्ष ठेवणार असल्याने नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे.

टिळक नगर, डोंबिवली येथील पोलिसांची कारवाई सीसीटीव्हीच्या आधारे सोनसाखळी चोरट्यांना बेड्या अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत !

टिळक नगर, डोंबिवली येथील पोलिसांची कारवाई सीसीटीव्हीच्या आधारे सोनसाखळी चोरट्यांना बेड्या
अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत !


कल्याण, प्रतिनिधी : रस्त्याने जाणाऱ्या एकट्या दुकट्या नागरिकांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. 


डोंबिवली पूर्वेकडील ज्योतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या या चोरट्याकडून आतापर्यत चार गुन्ह्याची उकल करत त्यातील अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशाल वाघ, शंकर उर्फ शंखू जाधव , गजानन उर्फ भोला घाडी  अशी आरोपीची नावे आहेत.
काही दिवसापूर्वी सकाळी 6 वाजता कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या वृद्ध  महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी खेचुन तिला ढकलून दिल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेच्या तपासा दरम्यान टिळकनगर पोलिसांनी ज्योतीनगर झोपडपट्टीतून आरोपीना अटक केली आहे. तपासात या आरोपींनी गुन्ह्याची कबुली देतानाच टिळकनगर हद्दीत आणखी 2 तर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच महात्मा फुले पोलीस हद्दीत प्रत्येकी 1 गुन्हा केल्याची कबुली दिली. 

अशी माहिती विवेक पानसरे (पोलीस उपायुक्त परिमंडळ 3) यांनी दिली.

Tuesday 29 December 2020

श्री. मैनाक घोष (IAS) हे माणगांव तालुक्याचे नवीन तहसीलदार !

श्री. मैनाक घोष (IAS) हे माणगांव तालुक्याचे नवीन तहसीलदार !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या तहसीलदार पदी श्री. मैनाक घोष यांची नियुक्ती झाली असून त्यांनी माणगांव तालुक्याच्या प्रशासकीय कारभाराला दमदार पणे सुरूवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण माणगांव तालुक्यातून त्यांचे स्वागत होत आहे. 
     श्री. मैनाक घोष हे मुळचे कलकत्ता येथील असून ते २०१९ च्या बॅचचे  ( IAS ) अधिकारी आहेत. त्यांनी भारत सरकार आयकर विभागाच्या असिस्टंट कमिशनर पदाची काही काळ जबाबदारी उत्तम पद्धतीने निभावली आहे. माणगांव तालुक्याच्या तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारण्या आधी त्यांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याच्या ( BDO ) बिडीओ तथा गटविकास अधिकारी पदाची जबाबदारी सक्षम पणे पार पाडली आहे. 
     सोमवार दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी त्यांची रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी माणगांव तालुक्याच्या  प्रशासकीय कामकाजाची दमदार व प्रभावी पद्धतीने सुरूवात केली आहे. त्यांच्या प्रभावी कार्यप्रणालीचे संपूर्ण माणगांव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
      श्री. मैनाक घोष ( IAS ) हे तरूण तडफदार प्रशासकीय अधिकारी   माणगांव तालुक्याच्या तहसीलदार पदी रुजू झाल्यानंतर माणगांव तालुक्याच्या सर्व स्तरातून आणि सर्व माध्यमातून त्यांचे जंगी स्वागत आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वाय. एम.प्रोडक्शन प्रस्तुत नाट्यलेखक यशवंत माणके निर्मित मराठी लघुचित्रपट प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन !

वाय. एम.प्रोडक्शन प्रस्तुत नाट्यलेखक यशवंत माणके निर्मित मराठी लघुचित्रपट प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन !


मुंबई : (दिपक कारकर/शांताराम गुडेकर ) - 

           गुहागर तालुक्यातील मु.पो.पेवे ( खरेकोंड ) गावचे भूमिपुत्र यशवंत रामचंद्र माणके होय. नाट्यलेखन, सिनेमा कथा पटकथा, लघुपट (शॉर्टफिल्म ), मालिका लेखन, मालिका अभिनय, नाट्य दिग्दर्शन,नाट्य अभिनय या सगळ्यातून रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या कोकण सुपुत्राने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

     *एक पाऊल रुपेरी पडद्याकडे*

            नाट्यलेखक यशवंत माणके यांनी छोटा पडदा आणि आता रुपेरी पडद्याकडे वाटचाल सुरू केली आहे. रंगभूमीवर तिहेरी भूमिका साकारल्या नंतर फिल्मी दुनिया या क्षेत्राचा अनुभव घेण्याकरिता "बाळू मामाच्या नावानं चांगभलं"/स्वराज्य जननी जिजामाता या मालिका द्वारे एका छोट्याशा भूमिकेने पहिलं पाऊल टाकत त्यांच्या त्या भूमिका अनेकांनाच भावल्या. सोनी मराठी वाहिनीवर पदार्पण करण्याची मला मिळालेली संधी म्हणजे माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारी ठरली असे नाट्यलेखक माणके म्हणाले. मालिका चित्रपटात काम करून माझ्यासाठी सर्वस्व रसिक माय-बापांची सेवा सातत्याने करत राहीन असा माझा ठाम विश्वास आहे. मी नुकतंच माझ्या जन्मभूमीत तीन मराठी लघुचित्रपट निर्मिती केली आहे. मला मालिका आणि चित्रपट करण्याची इच्छा असली तरी रंगभूमी ही माझी पहिली निवड असेल. तिची सेवा मी कायम करत राहीन असे नाट्यलेखक यशवंत माणके यांनी सांगितले.

           नाट्यलेखक यशवंत माणके यांनी नव्यानं स्थापन केलेल्या वाय एम प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित झालेल्या तीन मराठी लघुपट यांचं प्रथमदर्शनी भव्य प्रदर्शन बुधवार दि.३० डिसेंबर २०२० रोजी गुंदवली अंधेरी ( पूर्व ) येथे सायंकाळी ०६ : ०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कोविड - १९ च्या दिवसात शासकीय नियमांचे पालन करून होणार असून या परिवाराला उपकृत करण्यासाठी सर्वांचे प्रेम व उपस्थिती हवी असे आवाहन नाट्यलेखक माणके यांनी केलं आहे.

उमेदवारांचे आॕनलाईन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी ! ** आँफलाईन अर्ज स्विकारण्याचे निवडणूक आयोगाने दिले आदेश ** !

उमेदवारांचे आॕनलाईन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी !                                      ** आँफलाईन अर्ज स्विकारण्याचे निवडणूक आयोगाने दिले आदेश ** !
 
मुरबाड- (मंगल डोंगरे) : राज्यातील चौदा हजार दोनशे ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी ला होणार असून सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबर आहे. परंतु शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी असणारी वेबसाईट जाम झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज भरण्यास सुमारे तीन ते चार लागत आहेत. अशा परिस्थितीत सर्व उमेदवारांचे अर्ज भरले जाणार नाहीत. सध्या आॕनलाईन सेंटर वर उमेदवार राञभर जागत आहेत परंतु सर्व्हर जॕम असल्याने फाॕर्म भरु शकत नाही अशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सुमारे ६0% उमेदवार अजूनही अर्ज भरायचे शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आॕफलाईन अर्ज स्विकारावेत अशी जोरदार मागणी उमेदवारां कडून झाल्या मुळे राज्य निवडणूक आयोगाने त्या मागणीची गंभीर दखल घेवुन आँफ लाईन अर्ज स्विकरण्याचे आदेश देवुन 30/12/2020 पर्यंत सांयकाळी 5.30 वाजे पर्यंत वेळ वाढवून दिली  आहे.

पत्रकार सुरक्षा समितीची मुरबाड तालुका कार्यकारिणी जाहीर !!

पत्रकार सुरक्षा समितीची मुरबाड तालुका कार्यकारिणी जाहीर  !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : आज मुरबाड तालुका पत्रकार सुरक्षा समितीची सर्वसाधारण सभा संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालय मुरबाड येथे  तालुका अध्यक्ष श्री. मंगलजी डोंगरे  यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. यावेळी बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. मंगलजी डोंगरे यांची निवड जिल्हा कार्यालय बदलापूर येथे काही दिवसांपूर्वी जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबर व जिल्हा सरचिटणीस प्रदीपजी रोकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली होते. म्हणून उर्वरीत कार्यकारिणी निवडण्याचा प्रस्ताव मांडला असता  सर्वानुमते तालुका उपाध्यक्ष पदी दै.लोकमतचे पत्रकार प्रकाश जाधव, सरचिटणीस पदी महाराष्ट्र माझा चे संजय ठाकरे, चिटणीस पदी टि.व्ही.9 चे सचिन पोतदार, कार्याध्यक्षपदी-मुरबाड माझाचे "प्रतिनिधी नरेश म्हाडसे", सहाय्यक कार्याध्यक्ष पदी श्रीसाम्राज्य न्युज चे प्रतिनिधी गणेश जाधव, खजिनदार पदी शब्द मशाल चे संपादक सुरेश भालेराव, सहाय्यक खजिनदार पदी मुरबाड अपडेट प्रतिनिधी चेतन पोतदार, प्रसिद्धी प्रमुख पदी-जनशक्तीचे प्रतिनिधी जिवन शिंदे तर सहाय्यक पदी योगेश तेलवणे, तसेच कार्यालय प्रमुख पदी- शंकर आगिवले व सुधाकर शेळके,आणि प्रमुख सल्लागार म्हणून रविंद्र केंबारी, यांच्या निवडी करण्यात आल्या.

कल्याण तालुक्यातील ऐकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तब्बल तीनशेचाळीस उमेदवारी अर्ज, बेहरे ग्रामपंचायतीत सर्वाधिक?

कल्याण तालुक्यातील ऐकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तब्बल तीनशेचाळीस उमेदवारी अर्ज, बेहरे ग्रामपंचायतीत सर्वाधिक?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य पदासाठी तब्बल ३४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आजच्या दत्तजयंतीच्या दिवशीच्या मुहूर्तावर उमेदवारीचा पाऊस पडला. तालुक्यातील सर्वाधिक उमेदवारी अर्ज बेहरे ग्रामपंचायतीमधून दाखल झाल्याने बिनविरोध निवडणुकीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि पहिल्या दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे तालुक्यात सर्व ग्रामपंचायती या बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. यांनतर तिसऱ्या दिवशी ८४ आणि आज म्हणजे दत्त जयंती निमित्त तब्बल ३४० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. तालुक्यात रायते, गोवेली, बेहरे, राया ओझर्ली, घोटसई, मानवली, वरप, कांबा, म्हसकळ, नडगाव दांणबाव, सांगोडा कोंढेरी, वाकळण, शिरडोण, जांभूळ, बापसई, आपटी, गुरवली, खोणी, आणे भिसोळ या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
एकूण ७४ प्रभागासाठी २११सदस्या करिता सुमारे ३१ हजार १४७ पुरुष आणि २७ हजार १३७ महिला मतदार मतदान करणार असून आज २५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी सर्वाधिक उमेदवारी अर्ज बेहरे या १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ४३ उमेदवारी अर्ज  भरले तर सर्वातकमी वडवली शिरडोण या ग्रामपंचायतीच्या मधून दाखल केले ते ५ आहेत. या खालोखाल आणे भिसोळ ६, रायते पिंपळोली १४,खोणी वडवली २५, म्हारळ ३१, गोवेली. रेवती १२, उतणे चिंचवली ११,मानिवली ७,निंबवली मोस १०, गुरवली ११, वरप १७, आपटी मांजर्ली ८, सांगेडा कोंढेरी १५, नवगाव बापसई ११, जांभूळ वसत १२, म्हसकळ अनखर ७, नडगाव दांणबाव २४, राया ओझर्ली ३०, कांबा २६, घोटसई १५ अशी वर्गवारी आहे.
अजून एक दिवस बाकी आहे. म्हणजे ३० डिसेंबर पर्यंत उमेदवार अर्ज भरता येणार आहेत अशीच परिस्थिती राहिली तर ही आकडेवारी ३४० वरून ४०० किंवा ५०० पर्यंत जावू शकते.
परंतु मध्यंतरी कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायती या बिनविरोध करायच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तसे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पण एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग पाहता बिनविरोध ग्रामपंचायती ही कल्पना मागे पडू शकते असे वाटते. याला कोण जबाबदार याचाही विचार व्हायला हवा!

स्वराज्याच्या ऐतिहासिक भूमितील दुर्लक्षित राहिलेल्या शाहिर पोपटराव वाघमारे यांना एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चा आधार!

स्वराज्याच्या ऐतिहासिक भूमितील दुर्लक्षित राहिलेल्या शाहिर पोपटराव वाघमारे यांना एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चा आधार!
कल्याण (संजय कांबळे) : रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १लाख ५ हजारांचे घोडदळ, ३० मातब्बर सरदार, ३६ समशेरबहाद्दर योध्दे, १२ हत्तीची गजसेना अशा सेना सागराचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची जन्मभूमी असलेल्या कराड तालुक्यातील तळबीड या ऐतिहासिक भूमिती जन्म घेऊन गेली ४०/५० वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या शाहिर पोपटराव वाघमारे यांच्या "शब्दरचनेची" दखल कल्याण मुंबई येथील एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेने घेतली असून त्यांची काही मराठी गाणी रेकॉर्डिंग व विडिओ शुट करण्याचा निर्णय घेतला आहे.


मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव मोहिते यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज या दोघांच्या कारकिर्दीमध्ये फार महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रंणागण हेच त्यांचे विश्रांतीस्थान होते. आपल्या तळपत्या तलवारीचे पाणी त्यांनी मुघलांना पाजले होते. छ शिवाजी राजे व छ संभाजी राजे या दोघांनाही त्यांच्या हस्ते राज्याभिषेक झाला. सप्तसागर व सप्तसिंधूच्या पावन जलांनी त्यांनी आपल्या हाताने राज्यांच्या मस्तकावर अभिषेक केला असा असामान्य सेनापती पुन्हा होणे, असा सरसेनापती कराड जवळील वंसत गडाच्या पायथ्याशी तळबीड या गावात जन्माला आले हे स्वराज्याचे भाग्यच म्हणावे लागेल. परंतु काळानुरूप बदल झाला. असला तरी तळबीड चे माझी सरपंच जयतरांव नाना मोहिते यांनी गावाची प्रगती व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे सुशोभीकरण, आकर्षक बागबगीचा तयार करने यासाठी मा विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार्य केले. बारा बलुतेदार येथे गुण्यागोविंदाने राहत असले तरी याच ऐतिहासिक भूमितील मागासवर्गीय समाजात जन्म घेतलेले शाहिर पोपटराव वाघमारे हे मात्र प्रसिद्धी पासून कोसो दुर राहिले पर्यायाने त्यांनी लिहिलेल्या सुमारे १ हजारच्या आसपास देशभक्ती, समाजप्रबोधन, विडंबन, तसेच अभिमानाने धाती, ऊर भरून येणारे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक पोवाडे आज रेकॉर्डिंग अभावी लोकांसमोर आले नाही व पोपटराव पवार यांच्या शब्द रचनेच्या वह्या धुळखात पडल्या आहेत. तर काही वह्यांना वाळवी लागली आहे. 
ही खबर एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील टिम ला लागली. त्यांनी टिम प्रमुख संजय कांबळे यांच्या कानावर घातली. त्यांनी वेळ न दवडता तळबीड या सरसेनापतीच्या गावाला भेट दिली यावेळी त्याच्या समवेत सातारा जिल्हा प्रमुख नामदेवराव बल्लाळ, गीतकार शिवाजी पवार, माजी मुख्याध्यापक एस जे कांबळे, मोहसीन जमादार, रोहित सकटे, सुरेश वाडकर आदी होते. . गावात प्रवेश करताच प्रथम स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन शाहिर पोपटराव वाघमारे यांच्या घरचा रस्ता धरला. 
 साधारण पणे ८०/९० वर्षाचे शरीराने थकलेले परंतु मनाने १७/१८ वर्षे वयाच्या तरुणांना लाजवेल असे शाहिर समोर आले. 'माझ्या प्रिय भारत माते, पंढरीनाथ आलो तूझ्या दारी, तूझ्या दर्शनासाठी झालो वारकरी'! महाराष्ट्राच्या पावित्र्याला कुणाच्या लागू नये नजरा, तयाला मानाचा मुजरा! अशा एक एक गाण्याच्या ओळी शाहिर ऐकवत होते. आणि उपस्थित सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करीत होते.
मग पोपटराव वाघमारे बोलू लागले. जेमतेम ४थी पर्यंत शिक्षण झाले. घरची परिस्थिती बिकट, जगणे मुश्किल झाले असताना काका सुदाम यांनी मुंबई ला आणले. मोलमजुरी करित असतानाच वेस्टन रेल्वेत काम लागले. पण तीन वर्षांत काम गेले. गावी पत्नी, आई वडील, मुले याचे पोट कसे भरायचे हे मोठे कोडे होते. नंतर मुंबईत श्रीराम मिल मध्ये काम मिळाले. बदली कामगार म्हणून, पण तेहि सुटले. त्यामुळे जगणे मुश्किल झाले. आता काय करायचं हे कळेना. आणि अशातच पोपटराव तमाशा कडे वळले. ३०० रुपये पगारावर त्यांनी तमाशात नोकरी पत्करली. तमाशा साम्राज्ञी. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विठाबाई मांग, नारायणगावकर, काळू बाळू, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, अशा नामांकित तमाशामधून काम करताना पोपटराव यांच्यातील शाहिर जागा झाला. १९४१ रोजी जन्मलेले पोपटराव पहिल्यापासूनच तल्लक बुध्दी चे होते. त्यामुळे आपसूकच त्यांची लेखनी शब्दरुपाने कागदावर उमटू लागली. आणि बघता बघता आज त्यांची १हजाराच्या आसपास गाणी लिहून तयार आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील पोवाडे, देशभक्तीपर गीत, महाराष्ट्राचे अभिमानास्पद गाणे, समाजप्रबोधन, विडंबन, विनोदी, भक्ती गिते, असे हजारो गाणे त्यांनी टिमचे प्रमुख संजय कांबळे यांना दाखवली. त्यांनी ताबडतोब आपल्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर खाली शाहिर पोपटराव वाघमारे यांची काही गाणी नामांकित पार्श्वगायिकाकडून गाऊन ती रेकॉर्डिंग व विडिओ शुट करण्याचे अश्वासन दिले. ऐवढेच नव्हे तर टिमच्या सदस्यांनी दुर्लक्षित शाहिर पोपटराव वाघमारे यांच्या घरी जाऊन काही गाण्यांचा करारनामा केला आहे. यावेळी सातारा जिल्हा टिमचे प्रमुख नामदेव बल्लाळ, मोहसीन जमादार, सुरेश वाडकर, रोहित सकटे, आदी उपस्थित होते. त्यामुळे अडचणी च्या काळात एस के फिल्म प्रोडक्शन ने आधार व साथ दिल्याने शाहिर पोपटराव वाघमारे, त्यांचा मुलगा दयानंद वाघमारे यांनी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या चे संजय कांबळे व टिमचे आभार मानले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्य दलाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जन्मभूमीत ऐतिहासिक शाहिर असलेल्या पोपटराव वाघमारे यांची होणारी परवड योग्य नाही. त्यामुळे त्यांचा ऐतिहासिक ठेवा नव्या पिढीला माहित होण्यासाठी तो लोकांसमोर यायला हवा, तसा सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा असे मत व्यक्त केले. 

Monday 28 December 2020

पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन नॉलेजटेस्टचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !

पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन नॉलेजटेस्टचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !


मुंबई,(प्रतिनिधी) : राष्ट्रीय नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांनी आयोजित केलेल्या नॉलेटेस्ट २०२० स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेले कृतिका देवधरे, निकिता चव्हाण,रोशन तेलंग, अंकिता माने, रोशन बंडी, तुषार रणपिसे, भाविका जाधव, सुजय अहिरे, सायली चिले, ओंकार अनारसे, रविना निकम, रिया मोरे, राज पोल, निखिल खिलारी, मानसी मोरे यांचा मायक्रोलिंक कॉम्प्युटर सेंटर येथे सचिव केतन भोज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मायक्रोलिंक कॉम्प्युटरचे सचिन मनवळ सर व पँथर राजाभाऊ गांधले सामजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शरद गांधले उपस्थित होते.

शहापुर मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला १३६ वा स्थापना दिवस !

शहापुर मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला १३६ वा स्थापना दिवस !


शहापुर (एस.एल.गुडेकर) :

     २८ डिसेंम्बर हा राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिवस असून आज शहापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाचा १३६ वा स्थापना दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की देश स्वातंत्र्य करण्यासाठी योगदान देणारा आपला पक्ष असून आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे,जात धर्म यात वाद निर्माण करून सत्ता मिळवणे हे भाजपचे धोरण असून देशाची एकात्मता व अखंडता कायम राहण्यासाठी प्रसंगी बलिदान ही काँग्रेसची परंपरा आहे,काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या अपर्णा खाडे,लक्ष्मण घरत,तालुका उपाध्यक्ष जितू विशे,कृष्णा गोडांबे यांनीही काँग्रेस पक्षाचा इतिहास,काँग्रेस व देशासमोरील आव्हाने याबाबत आपले मनोगत व्यक्त केले,

    याप्रसंगी गजानन बसवंत,आबा देशमुख,विश्वास गोरे,पद्माकर वरकुटे,देवेन्द्र भेरे,संतोष साळवे,माया मगर,अबुल शेख,अबु ताम्हणकर,युवराज जगताप, राजू साबळे,राहुल देसले,रामचंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत यांनी केले.

भांडूप येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील चो-या रोखण्यासाठी वपोनि शिंदे (भांडूप पोलीस ठाणे) यांना विशाल सावंत यांचे निवेदन !

भांडूप येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील चो-या रोखण्यासाठी वपोनि शिंदे (भांडूप पोलीस ठाणे) यांना विशाल सावंत यांचे निवेदन !


"वपोनि श्याम शिंदे यांनी तातडीने केल्या उपाययोजना" 


मुंबई (शांत्ताराम गुडेकर/ दिपक कारकर) :

          भांडुप येथील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरात मध्यरात्रीच्या वेळी चोरी सदृश्य घटना घडल्या आहेत. युवासेनेचे मुंबई समन्वयक विशाल सावंत यांनी या संदर्भात भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.श्याम शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने उपाययोजना केल्या.

बौद्धजन पंचायत समिती मुंबई ब्रिगेड शाखेच्या पथकाचे ब्रिगेड शाखा गट प्रतिनिधी अंकुश सकपाळ यांच्या निवासस्थानी स्वागत !

बौद्धजन पंचायत समिती मुंबई ब्रिगेड शाखेच्या पथकाचे ब्रिगेड शाखा गट प्रतिनिधी अंकुश सकपाळ यांच्या निवासस्थानी स्वागत !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील महाड क्रांतीभूमी येथे मनुस्मृती दहन दिनी अर्थात २५ डिसेंबर २०२० रोजी महाड क्रांतीभूमी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बुद्ध विहाराची पहाणी दौर्यावर असलेल्या बौद्धजन पंचायत समिती मुंबई ब्रिगेड शाखेचे पथक तथा पदाधिकारी यांनी महाड क्रांतीभूमी येथील कार्यक्रमा नंतर परतीच्या प्रवासा दरम्यान सदर पथकाने इंदापूर गौळवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती मुंबई ब्रिगेड शाखेचे गट प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रातील एस आर ए योजनेतील नामवंत विकासक, बौद्ध समाजातील दानशूर व्यक्तीमत्व, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि सांस्कृतिक भवन माणगांव या वास्तूच्या निर्माण कार्यातील प्रमुख खंदे व्यक्तीमत्व, आणि ज्यांच्या कारकिर्दीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि सांस्कृतिक भवन माणगांव च्या वास्तूची उभारणी झाली ते बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगांव चे माजी तालुका अध्यक्ष कालकथीत लहुजी सकपाळ यांचे बंधू अंकुश जी सकपाळ यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी भेट दिली. 
       बौद्धजन पंचायत समिती मुंबई ब्रिगेड शाखेच्या सदर पथकाचे अर्थात उपकार्याध्यक्ष विनोद मोरे, सरचिटणीस लक्ष्मण भगत, चिटणीस प्रकाश कासे, गजानन तांबे, मनोहर जाधव, लवेश तांबे यांचे मुंबई ब्रिगेड शाखेचे गट प्रतिनिधी अंकुश सकपाळ,  खजिनदार संतोष मोरे, शाखा उपाध्यक्ष कृष्णा राव यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले. या नंतर सदर पथक मुंबई कडे रवाना झाले.

Sunday 27 December 2020

सोमवार पासून ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उडणार 'धुरळा'?

सोमवार पासून ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उडणार 'धुरळा'?

कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील एकूण ४६ ग्रामपंचायतीपैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून पहिल्या दिवशी एकही अर्ज सादर झाला नसला असला तरी दुसर्‍या दिवशी १२ उमेदवारांनी अर्ज भरले मात्र सलग तीन दिवस सुटी असल्याने एकाही उमेदवाराला अर्ज भरता आला नाही. परंतु उद्या म्हणजे सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडणार आहे त्यामुळे बिनविरोध निवड अवघड होऊन बसली आहे.
कल्याण तालुक्यातील एकूण ४६ ग्रामपंचायतीपैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये कल्याण ग्रामीण भागातील २१ तर शहरी भागातील ५ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये म्हारळ वरप कांबा रायते, मानवली, घोटसई, म्हसकळ, निंबवली मोस, गुरवली, गोवेली, सांगोडा वासुद्री कोंढेरी, वाकळण, आदीचां समावेश आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र १२ अर्ज सादर झाले यांनतर नाताळ व इतर सुट्ट्या लागल्या. आता सोमवारी उमेदवारी भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.
काही गावांमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल करण्या अगोदरच प्रचाराला सुरुवात केली आहे. तर काही नेते व कार्यकर्ते ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु काही मंडळींच्या आडमुठय़ा धोरणामुळे व घाणेरड्या राजकारणामुळे जो तो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहेत.
माणगांव तालुक्यातील स्केटिंग चॅम्पियन्स सांगली येथे फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्काराने सन्मानित !


    बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत माणगांव तालुक्यातील कुमार श्रेयस गमरे, अार्यन गमरे, आर्यन मोरे, अर्जुन मोहिते, रुद्राक्ष मोरे आणि अर्णव भेकरे या खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल त्यांना सांगली येथे फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरी मुळे त्यांनी माणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांनी रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्याचे आणि त्यांच्या मार्गदर्शक, तथा प्रशिक्षक क्रीडा शिक्षकांचे नाव रोशन करून जिल्ह्यासह तालुक्याची मान गर्वाने उंचावली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
      सदर पुरस्कार वितरणाच्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथील खरे सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी राज्यातील १५ शिक्षक, ७ क्रीडा शिक्षक, ४५ खेळाडू, २ संघटक यांची वर्णी लागली होती. या भव्य दिव्य अशा शानदार पुरस्कार वितरण कार्यक्रमात माननीय उपायुक्त सौ. स्मृती पाटील मॅडम, श्री. ओंकार शुक्ल, नगरसेवक श्री. विनायक सिंहासने यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याचे स्केटिंग चॅम्पियन्स कुमार श्रेयस गमरे, आर्यन गमरे, आर्यन मोरे, अर्जुन मोहिते, रुद्राक्ष मोरे या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. 
     रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत केलेल्या अव्वल कामगिरीमुळे आणि त्यामुळे त्यांना मिळालेल्या फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्कारामुळे रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंवर समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छात्मक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

[रत्नागिरी जिल्हातील धामणसे( चौकेवाडी) चे सुपूत्र मुंबई येथे वास्तव्यास असणारे समाजसेवक/रंगभूमी सेवक सुभाष बांबरकर]

[रत्नागिरी जिल्हातील धामणसे( चौकेवाडी) चे सुपूत्र मुंबई येथे वास्तव्यास असणारे समाजसेवक/रंगभूमी सेवक सुभाष बांबरकर अतिशय दिलदार, निस्वार्थी, कष्टाळू, भितभाषी, मनमिळावू आहेत. सर्वगुणसंपन्न, प्रतिभाशाली गरजवंतांच्या हाकेला घरच्या माणसासारखा धावून जाणारा जनसेवक सुभाष बांबरकर म्हणजे एक आदर्शवत जीवन मानावे लागेल.अशा या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रमाणित प्रयत्न ....]


रंगभूमीचे सेवक - कोकण सुपुत्र सुभाष बांबरकर

        कोकणच्या मातीत जन्मलेली अनेक हिरे-माणके आज आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वाने ठसा उमटविताना दिसतात असच एक एका गरीब कुटुंबात जन्मलेले रत्नागिरी जिल्हयातील धामणसे ( चौकेवाडी ) गावचे भूमिपुत्र सुभाष यशवंत बांबरकर होय.लहानपणापासून समाजसेवा व कोकणातील लोककलेच वेढ असणाऱ्या सुभाष बांबरकर यांचं नाव मुंबई रंगमंचावर शक्ती-तुरा/नमन आयोजक म्हणून लोकप्रिय ठरलं आहे. कोकणातील नमन/भारुड/जाखडी नृत्य या लोककला सादरीकरण करणाऱ्या कोकणातील नमन मंडळे व कलाकार यांना व्यासपीठ देण्याचं मोठं कार्य बांबरकर यांनी केलं आहे. आयोजक बांबरकर यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा, धामणसे गावी तर माध्यमिक शिक्षण धामणसे गावी व पुढील महाविद्यालयीन शिक्षण भाई मयेकर ज्युनियर कॉलेज,मालगुंड येथे केले. त्या काळात शिक्षण हे फार क्वचितच लोक घेत असत मात्र शिक्षणाची आवड असणाऱ्या बांबरकर यांनी आपलं शिक्षण मोठ्या परिश्रमाने व जिद्दीनं पूर्ण केलं.

           मुंबईत आल्यावर आपलं कौटुंबिक जीवन जगताना रंगभूमीचे वेढ त्यांना लागले. अगदी कोकणातील दिग्गज शाहिर मंडळी व नमन मंडळे यांना आपल्या आयोजनात चमकवत अनेक प्रयोग हाऊसफुल्ल केले. कुटुंब जबाबदारी सांभाळत असताना बांबरकर यांनी आपल्या नोकरीची सुरुवात सन - १९९४ साली बायडींग प्रेस नंतर १९९५ ते१९९९  लेदर वर्क तद्नंत १ जानेवारी २००० ते आजही डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीत अँडमिन असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. आमच्या कोकणात असा सर्वांगीण सुंदर, गुणवान, सच्चा माणूस जन्मला आणि अशा माणसा साठी मला काहीतरी लिहिण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. हे माझे भाग्यच... माझ्या  कोकणच्या या कर्मयोग्याला मी इतकेच म्हणू शकेन.... निस्वार्थी रंगभूमी सेवक बांबरकर,

सूर्याचे तेज येऊ द्या,तुमच्या कर्तृत्वात


चंद्राची शितलता,बहरावी स्वभावात 


कस्तुरीचा सुगंध,दरवळावा सहवासात 


मकरंदाचे माधुर्य,असावे मुखात.....


कोकणची लोककला शक्ती-तुरा,नमन या कलेतुन लोकजागृतीसाठी झटणा-या सुभाष बांबरकर यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!


लेखन- दिपक कारकर


संकलन- शांत्ताराम गुडेकर 

कांजूरमार्ग येथे "जनेरीक औषधालय"चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न !

कांजूरमार्ग येथे "जनेरीक औषधालय"चे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न !


"मा.सौ.शर्मिलाताई ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन" 


मुंबई (समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर) :

            मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या आशिर्वादाने कांजूरमार्ग पूर्व येथे जनरिक औषधालय समाजहितासाठी स्वस्त व गुणकारी असे औषधांचे दुकान "जनहित केमिस्ट व मेट्रोपलिस्" चे भव्य उद्घाटन मा. सौ. शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांच्याहस्ते शाँप नं.६,राम रहिम चाळ, नेहरु नगर, कांजूर व्हिलेज रोड, अनिकेत हाँस्पीटलच्या बाजूला, कांजूरमार्ग (पूर्व),मुंबई-४२ येथे राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या जनेरिक औषधालयमुळे जनतेला बँडेड जेनेरिक औषधांवर १०% ते ८०% पर्यंतची बचत होणार असून या संधीचा लाभ रहिवाशांना होणार आहे.तरी रहिवाशांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त- मा.से.ट्रस्टचे मनोज चव्हाण यांनी केले आहे.
पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) च्या दिनदर्शिका- २०२१ चे शानदार प्रकाशन सोहाळा संपन्न !


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :

        महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य , व सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे पंचरत्न मित्र मंडळाचा वार्षिक दिनदर्शिका २०२१ चे उद्घाटन कॅबिनेट मंत्री नवाब मलिक ( कोशल्य विकास' अल्पसंखांक ) यांच्या शुभहस्ते मुंबईत पार पडला.मंडळाचे कार्य तत्पर अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, सहसचिव स्नेहा नानिवडेकर, खजिनदार सचिन साळुंके, वैभव घरत, निलम  गावंड, डॉ.विनित गायकवाड, रहिम शेख, जालिंदर इंगोले, रमाकांत गवळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. आरसीएफ मधील नोकरीधंदा सांभाळून सामाजिक बांधिलकी जपत स्वःखर्चातून गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ सतत झटत आहे. विषेशतः मूक-बधिर, अंध विद्यार्थी, वृद्धाश्रम व अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील निराधारांना सतत १५ वर्षे अन्नधान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आले आहेत. रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. त्यांच्या समाजकार्याची दखल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, श्री अण्णा हजारे, सिंधुताई संकपाळ, इत्यादी मान्यवरांसाहित अनेक दैनिक वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. 

Saturday 26 December 2020

आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याला आलं यश !! **सरळगाव येथे होणार नवीन (लॉ )विधी महाविद्यालय व मुरबाड येथे विज्ञान महाविद्यालय मंजूर**

आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याला आलं यश !!   
 **सरळगाव येथे होणार नवीन (लॉ )विधी महाविद्यालय   व मुरबाड येथे विज्ञान महाविद्यालय मंजूर**

 **तालुक्यात सुरू होणार  पाहिले लॉ कॉलेज, **

मुरबाड (मंगल डोंगरे) :

मुरबाड तालुक्यातील शैक्षणिक विकासाला चालना मिळावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील सरळगाव येथे नवीन विधी (लॉ) महाविद्यालय व मुरबाड येथे नवीन विज्ञान व टेक्नीकल महाविद्यालय मंजूर केले आहे, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या कडे सतत पाठपुरावा केला होता, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

  *तालुक्यात टेक्नीकल व विधी महाविद्यालय नव्हते ही खंत होती त्यानुसार उच्च शिक्षण विभागाचे सचिव ,मुंबई विद्यापीठ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे सततची मागणी केली होती.*

     तालुक्यातील  विशेष करून मुलींना तसेच गरीब घटकांतील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर विधी महाविद्यालय कल्याण तालुक्यातील गोवेली प्रमाणे मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे आता आपण मंजूर करून घेतले आहे. असे नमूद करत आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की मुरबाड येथे ही नवीन विज्ञान महाविद्यालय ची गरज लक्षात घेऊन या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची होणारी धावपळ दूर व्हावी या हेतूने विज्ञान महाविद्यालय मंजूर केले आहे, त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात तालुक्यातील नवीन शैक्षणिक बदल दिसणार आहेत, मुरबाड *तालुक्यातील आम जनतेच्या आशीर्वाद व सततचे सहकार्य* यामुळेच हे शक्य झाले आहे. माझ्या जन्मभूमीतील  विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी ची परवड संपुष्टात यावी यासाठी माझी सतत तळमळ असते,. 

रोटरी क्लब चोपडा तर्फे एसटी बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. !

रोटरी क्लब चोपडा तर्फे एसटी बस चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. !


-१५० बस चालकांनी घेतला लाभ

चोपडा वार्ताहर :-
रोटरी एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे व सतत समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपले सेवाभावी योगदान देत आले आहे, त्यात रोटरी क्लब चोपडा चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असताना कोरोना काळात सुद्धा सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून या शिबिरा अंतर्गत चोपडा बस स्थानकात असलेले सुमारे दीडशे बस चालकांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली, सदर शिबिर हे श्री गणेशा नेत्रालय, पाठक गल्ली, चोपडा येथे नुकतेच पार पडले.
सदर शिबिराचे उद्घाटन चोपड्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्री दीपक ओ. पाटील(साई) यांच्या शुभहस्ते करण्यात आले, सोबत रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. सचिन कोल्हे व संदेश क्षीरसागर उपस्थित होते.
कोरोना काळानंतर एसटी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यात एस टी बस चालकाची भूमिका ही महत्वाची व जबाबदारीची असल्या कारणाने रोटरी क्लब चोपडा ने बस चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे ठरवले असे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी सांगितले.
  सदर शिबिर नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सचिन कोल्हे यांचा मार्गदर्शनात पार पडले, तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले.
"सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास याचे परिणाम शरीरावर होतात. मात्र, याचा मोठा फटका बसतो तो डोळ्यांना. डोळ्यांच्या आतील नेत्र-पटलावर म्हणजे रेटीनावर देखील मधुमेहाचे दुष्परिणाम होऊन पूर्णपणे अंधत्त्व येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वेळीच निदान होऊन त्यावर उपचार होणे गरजेचे असते" असे डॉ.दीपक पाटील यांनी सांगितले व
त्यांनी शिबिराच्या दरम्यान भेट देऊन शिबिराची पाहणी केली.
  शिबिर यशस्वी होण्यासाठी रोटरी चे पंकज बोरोले, प्रवीण मिस्त्री चंद्रशेखर साखरे, प्रफुल्ल गुजराथी, एम डब्ल्यू पाटील, अनिल अग्रवाल व श्री गणेशा नेत्रालयाचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तर रोटरी चे असिस्टंट गव्हर्नर योगेश भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न !


मुंबई, (प्रतिनिधी ) ; आर.आर.पाटील फाऊंडेशन संलग्न समता प्रतिष्ठान व पँथर राजाभाऊ गांधले सामाजिक संस्था, मायक्रोलिंक फाऊंडेशन आयोजित श्री.केतन दत्ताराम भोज (ईशान्य मुंबई जिल्हा सचिव-राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी सेवा मंदिर ब्लड बँक यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर शुक्रवार दि.२५ डिसेंबर रोजी समता बुद्ध विहार, इंदिरा नगर नं.०२ घाटकोपर(प.) मुंबई/४०००८६ याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. 


यावेळी रक्तदात्यांनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदवून स्वइच्छेने रक्तदान केले. तसेच कोरोनाच्या अटीतटीच्या काळात आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून, सामजिक दायित्व प्राणपणाने जपले त्याबद्दल त्यांच्याप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी आर.आर.पाटील फाऊंडेशनच्या वतीने श्री.विशाल गांधले, मा.श्रीमती.नयन ताई पारकर, प्रकाश भेकरे, पत्रकार शंत्ताराम गुडेकर, सुभाष कोकणे या कोरोना योद्धयांचा कोरोना वीर, वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. शिवाय हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समता प्रतिष्ठान व पँथर राजाभाऊ गांधले सामजिक संस्थेचे संस्थापक शरद गांधले, मायक्रोलिंक फाऊंडेशनचे संस्थापक सचिन मनवळ सर तसेच इंदिरा नगर येथील अनेक युवकांनी कठोर परिश्रम घेतले.

Friday 25 December 2020

"नाशिक येथे स्री मुक्ती दिनानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रम संपन्न".!!

"नाशिक येथे स्री मुक्ती दिनानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रम संपन्न".!!


नाशिक (प्रतिनिधी) : अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने समितीचे कार्यालय कान्हेरी वाडी नाशिक या ठिकाणी २५ डिसेंबर स्री मुक्ति दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र कोषाध्यक्ष जसपालसिंग टीकुभाई कोहली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव हे उपस्थित होते.


या कार्यक्रमास समितीच्या वतिने उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा ममताताई पुणेकर, कार्याध्यक्षा वैशालीताई जाधव, शहराध्यक्षा राधाताई क्षीरसागर, मिलिंद जाधव, सुनिताताई वाघ, सुनिताताई भोईर, शितलताई गांगोडे, समिर जगताप, शिल्पाताई झारेकर, यमुनाताई लिंगायत, नितिन खांडवी, मुकेश राठोड, शंकर देशमुख,  ऋषिकेश जंगम आदी. उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पुष्पपुजा करण्यात आली. तसेच स्री मुक्ती दीन व मनुस्मृती दहन या विषयांवर चर्चासत्र घेवुन उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी सालाबादाप्रमाणे ३१ डिसेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता मादक द्रव्य व अंमली पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी व व्यसनमुक्ती शपथ ग्रहण कार्यक्रम म्हाडा काॅलनी, सातपुर लिंकरोड या ठिकाणी  घेण्याचे निश्चित करण्यात आले. तर दि.४ जानेवारी २०२१ रोजी सामाजिक व विविध मागणीकरीता निफाड उपविभागीय महसूल अधीकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा ठराव संमत करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा क्षीरसागर यांनी तर प्रास्ताविक वैशालीताई जाधव यांनी केले व आभार शिल्पाताई झारेकर यांनी मानले. महिला मुक्ती दिनाच्या सदर कार्यक्रमास अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित आणि कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुभेच्छा देवुन त्यांचे आभार व्यक्त केले. शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या नावाने चॅनेल सुरू, शुभेच्छांचा वर्षाव !

एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या नावाने चॅनेल सुरू, शुभेच्छांचा वर्षाव !


कल्याण (संजय कांबळे) : मनोरंजन आणि चित्रपट सृष्टीत पदार्पण करताच अनेकांचा चर्चेचा विषय ठरलेल्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेचे प्रमुख पत्रकार संजय कांबळे यांनी याच नावाने युट्यूब चॅनेल सुरू केले असून या नव्या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. तर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कल्याण तालुक्यात गेली २५/३० वर्षेपासून संजय कांबळे हे पत्रकार म्हणून काम करत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विषयांवर लेखन करुन समाजाप्रति  बांधिलकी जपत नांगरीकांना न्याय मिळवून दिला. दैनिक गावकरी पासून सुरुवात केलेल्या संजय कांबळे यांनी दैनिक सकाळ, लोकमत, पुण्यनगरी, सागर, नवनगर, बातमीदार, तूफान क्रांती, पोलीस टाईम्स आदी मध्ये पत्रकारिता केली. सध्या ते कार्यरत आहेत. परंतु सतत काहीतरी वेगळं करून दाखविण्याची जिद्द असलेल्या संजय कांबळे यांनी कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर कर्जत खोपोली आदी ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी मिळावी यासाठी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेची निर्मिती केली.
ग्रामीण कलाकारांना घेऊन त्यांनी मागिलवर्षी मुरबाड महोत्सव गाजवला. आता टिमला घेऊन विविध प्रकारचे मराठी साॅग नामांकित पार्श्वगायिकाकडून गाऊन ते विडिओ शुंटिग केले आहे. गेली तीन दिवस माळशेज घाट परिसरात शुंटिग पुर्ण झाले असून ते लवकरच विविध टिव्ही चॅनेल वर येणार आहे. परंतू आपले स्वतःचे हक्काचे चॅनेल असावे हा विचार करून पत्रकार संजय कांबळे यांनी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या नावाने युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्याची लिंक https://youtv.bd/EoHhvxamej4 अशी असून सर्वानी तिला सबस्क्रायईब, लाईक आणि शेअर करा असे आवाहन पञकार संजय कांबळे यांनी केले आहे.
तर या उपक्रमाचे अनेकानी कौतुक करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये कल्याण तहसीलदार दीपक आकडे, अलिबाग तहसीलदार किरन सुरवसे, मावळ तहसीलदार सुनील कोळी, पालीचे तहसीलदार दिलीप रायनवार, रायगडचे उपजिल्हाधिकारी अमित सानप, औरंगाबाद चे उपायुक्त नेमाणे साहेब, ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब, पालघरचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, भिवंडी चे डॉ प्रदिप घोरपडे, मुरबाड चे रमेश अवचार, शहापूर चे सुशांत पाटील, कल्याण च्या श्वेता पालवे, या बरोबरच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर बंजरंग रजपूत, प्रदीप अरोटे, सर्व पोलीस अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कल्याण पंचायत समिती चे विस्तार अधिकारी, कर्मचारी व अधिकारी, सोहम फाऊंडेशन, इमेज ग्राफिक, कोकण रहिवासी संघाचे सचिन जाधव, अनेक पत्रकार संघटना, तसेच डोंबिवली चे सुभाष शेठ म्हात्रे, उद्योजक मोहनशेठ, दिलीप शेठ, सतिश शेठ, रतनशेठ पाटील, आदीचां समावेश आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांची जातीच्या दाखल्यासाठी दमछाक !

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांची जातीच्या दाखल्यासाठी दमछाक !


"उपविभागीय कार्यालयाचा निष्काळजीपणा" !

मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी ला होत असून  नाॕमिनेशन (अर्ज) २३ ते ३० डिसेंबर पर्यत अर्ज सादर करावयाचे आहे. परंतु अजूनही अनेक सदस्यांना अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होऊ शकत नसल्याने अनेक उमेदवार निवडणुकी पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


या आवश्यक कागपञांमधे आरक्षीत, ना.मा.प्रवर्ग उमेदवारास जातीचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. हा दाखला उपविभागीय कार्यालय कल्याण येथुन घ्यावा लागतो परंतु गेल्या आठ दिवसांपासून उपविभागीय आधिकारी कार्यालय कल्याण येथुन दाखलेच मिळत नसल्याची तक्रार अनेक उमेदवारांनी केली आहे. सकाळ पासून नागरिक दाखल्यासाठी कार्यालयात बसून राहतात परंतु   उपविभागीय अधिकारी अभिजित भोंडे पाटिल आपल्या कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांचे दाखले वेळेवर मिळत नसल्याचे दिसत आहे. अर्ज भरण्यास मोजकेच दिवस उरले असताना उपविभागीय  अधिकारी उपलब्ध होत नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. दाखले मिळण्यास उशिर होत असल्याने अनेक उमेदवार   उमेवारी पासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तहसिल कार्यालयातून शिफारसी घेणे, जातपडताळणी आॕनलाईन करणे, पून्हा ती कोकण भुवन व ठाणे येथुन तपासून आणने या सर्व प्रकिया पुर्ण करण्यास उमेदवारांची माञ दमछाक होताना दिसत आहे.

** उपविभागीय अधिकारी अभिजित पाटिल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहित **

अनाधिकृत बांधकाम विरोधात कल्याण वनविभागाची धडक कारवाई, कचोरे येथील बांधकामे निष्कासित !

अनाधिकृत बांधकाम विरोधात कल्याण वनविभागाची धडक कारवाई, कचोरे येथील बांधकामे निष्कासित !


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण वनपरिक्षेत्रातील मौजे कचोरे येथील संरक्षित वन सर्व्हे नं ३८ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. कच्च्या झोपडय़ा बांधकाम झाले असल्याचे कल्याण वनविभागाचे लक्षात आल्यानंतर ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहा वनसंरक्षक श्रीमती गिरिजा देसाई ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी या बांधकामावर कारवाई करित ही बांधकामे निष्कासित केली.


कल्याण वनपरिक्षेत्रातील मौजे कचोरे येथे संरक्षित वन सर्व्हे नं ३८ वर मोठ्या प्रमाणात झोपडय़ा व बांधकाम होत असल्याची बाब वनविभागाचे लक्षात आली होती. कल्याण आणि डोंबिवली शहराच्या मध्यभागी कचोरे हे गाव असल्याने येथील जागेला सोन्याचा भाव आला आहे. येथेच वनविभागाचे संरक्षित क्षेत्र आहे. या जागेवर झोपडय़ा व बांधकाम होत असल्याचे. वन विभागाच्या निदर्शनास आले होते त्यामुळे ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहा वनसंरक्षक श्रीमती गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी मच्छिंद्र जाधव, कल्याण वनपाल, रोहित भोई, राजू शिंदे,. वनपाल खडवली रघूनाथ शेलार, रामदास गोरले, दौलत मोरे, दिलीप भोईर, आदीनी ही मोहीम राबविण्यात मदम केली. यावेळी १५० कच्या व पक्के बांधकाम केलेल्या झोपड्या पाडल्या.
सदरील मोहिम ही संयुक्त मोहीम असल्याने कल्याण वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल /वनरक्षक संजय धारवणे,. वनपरिक्षेत्र अधिकारी पडघा एस ऐ आर्डेकर, व स्टाप, भिवंडी, मुरबाड, बदलापूर, ठाणे वनपरिक्षेत्रातील स्टाप राज्य राखीव पोलीस दलाचे श्री मोरे, सहा पोलीस आयुक्त ए एस धुरी, टिळक नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही एस कडलक, सहा पोलीस निरीक्षक मांडगे, पोलीस हवालदार एस पी खाडे, पोलीस शिपाई व इतर अधिकारी व कर्मचारी, कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, रुक्मिणीबीई रुग्णालयातचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी ही मोहीम पार पाडली.

Thursday 24 December 2020

बी एस एन एल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ !

बी एस एन एल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ !


"स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून पश्चाताप करण्याची आली कर्मचाऱ्यावर वेळ"

कल्याण : बीएसएनएल एम्प्लॉईज ज्यु.क्रेडिट सोसायटी कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत असून ११ महिने उलटूनही अद्याप पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
केंद्र सरकारने बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची घोषणा करून 98 हजार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त केले होते. या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याची खात्री देण्यात आली होती परंतु बीएसएनएल एम्प्लॉईज जु. क्रेडिट सोसायटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
रावसाहेब भालेराव यांनी 11 महिन्यांपूर्वी स्वच्छ निवृत्ती स्वीकारली होती. अकरा महिने उलटूनही अनेकदा सोसायटीकडे अर्ज करून सुद्धा रावसाहेब भालेराव या कर्मचार्‍यास हक्काचे पैसे मिळाले नाहीत. रावसाहेब भालेराव हे बीएसएनएल ज्यू. क्रेडिट सोसायटीचे सभासद आहेत. त्यांचे सोसायटीकडे दीड लाख रुपये येणे बाकी आहे. निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी क्रेडिट सोसायटी कडे पैसे मिळण्यासाठी अर्ज दाखल केला अनेक वेळा त्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहार करून पैसे मिळण्याची विनंती केली परंतु त्यांना अद्यापही हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. सोसायटीकडे त्यांनी चौकशी केली असता तुम्ही भालचंद्र झागस यांना कर्जासाठी साक्षीदार आहात त्यांचा मृत्यू झाला असल्याकारणाने तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर क्रेडिट सोसायटी वर प्रशासक नियुक्त झाल्याने तुमचे पैसे मिळण्यास उशीर होत असल्याचे लिपिक मोरे यांनी सांगितले. सोसायटीच्या ठरावानुसार सोसायटी कडून कर्ज घेतलेल्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे कर्जे माफ करण्यात येते. मी साक्षीदार असलेल्या भालचंद्र झागस यांना त्यांचे सर्व पैसे मिळाले असून त्यांना पेंशन सुरू झाली आहे तरीही सोसायटीने माझे पैसे जाणून-बुजून थांबवले आहे असा स्पष्ट आरोप रावसाहेब भालेराव यांनी केला आहे. गेल्या अकरा महिन्यांपासून सोसायटीने पैसे थांबविल्याने भालेराव यांचे मानसिक संतुलन बिघडले असून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे कामही गेले आणि हक्काचे पैसेही मिळाले नाहीत त्यामुळे त्यांचे अतिशय नुकसान झाले असून यास क्रेडिट सोसायटी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत बीएसएनएल एम्प्लॉईज जुनिअर क्रेडिट सोसायटीचे लिपिक मोरे यांना विचारले असता भालेराव यांचे पैसे देण्यात कोणतीही अडचण नाही परंतु क्रेडिट सोसायटीच्या निवडणूका जवळ आलेल्या आहेत सध्याच्या कोरोना काळामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येऊन सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. प्रशासकांनी भालेराव यांचे प्रकरण स्थगित केले असून निवडणुका लवकरच जाहीर होऊन नवीन कार्यकारी मंडळाने सूत्रे हाती घेतल्यानंतर भालेराव यांचे पैसे तात्काळ देण्यात येतील असे लिपिक मोरे यांनी सांगितले.
क्रेडिट सोसायटीच्या सर्व सभासदांनी बहुमताने ठराव मंजूर केलेला असताना नियुक्तीवर आलेले प्रशासक सभासदांचे पैसे कसे काय रोखू शकतात. सोसायटीच्या सभासदांनी केलेला ठराव हा नियमबाह्य पद्धतीने केला होता का ? तसेच चिरीमिरी दिल्यास काम लवकर होते असा खडा सवाल भालेराव यांनी उपस्थित केला आहे. माझ्या हक्काचे पैसे मला न मिळाल्यास माझ्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून स्वेच्छा निवृत्ती घेऊन पश्चाताप होत असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडणाऱ्या सरकारने कर्मचाऱ्यांना पैसे मिळण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे निवडणुकीमुळे कर्मचाऱ्यांचे रखडलेले पैसे देण्याची जबाबदारी सरकारची असून याकडे सरकारने लक्ष घालून कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मा. सभापती दया शेट्टी यांच्या प्रयत्नाने मोहने स्मशानभूमीसाठी 50 लाख रुपये मंजूर !

मा. सभापती दया शेट्टी यांच्या प्रयत्नाने मोहने स्मशानभूमीसाठी 50 लाख रुपये मंजूर !


"सर्व जाती धर्मियांसाठी आधुनिक  सुखसोयीयुक्त स्मशानभूमी साकारणार"

कल्याण, संदिप शेंडगे : माजी सभापती दया शेट्टी यांच्या प्रयत्नाने मोहने येथील सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या स्मशानभूमीसाठी आपल्या नगरसेवक निधीमधून 50 लाख रुपये मंजूर केले आहेत.
सर्व सुखसोयी युक्त आणि आधुनिक तसेच सुसज्ज उद्यान असलेली स्मशानभूमी लवकरच साकारणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून दया शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. सर्व जाती धर्मीयांसाठी खुले असलेल्या स्मशानभूमीसाठी दया शेट्टी यांनी 50 लाख रूपये मंजूर केल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची अतिशय दुरावस्था झाली होती तसेच येण्या-जाण्यासाठीचा रस्ता अतिशय खराब झाला होता रात्रीच्यावेळी पथदिवे बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती येथील स्मशान भूमी वरील पत्रे खराब झाले होते. अनेकदा पालिकेशी पत्रव्यवहार करून सातत्याने स्मशान भूमी दुरुस्तीकरिता पालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला प्रत्यक्ष भेटून तसेच महापालिकेच्या सभेमध्ये प्रश्न मांडून दया शेट्टी यांनी स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची जागा ही एनआरसी कंपनीच्या मालकीची असल्याने स्मशानभूमी सुशोभीकरनात अडथळा येत होता. शिवसेना उपविभागप्रमुख अंकुश जोगदंड आणि दया शेट्टी यांनी एन आर सी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर शेखावत यांची भेट घेऊन स्मशान भूमी दुरुस्तीची विनंती केली. अनेकदा स्मशानभूमीसाठी कंपनीला विनंती केल्यानंतर अंकुश जोगदंड आणि दया शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश येऊन एन आर सी कंपनी प्रशासनाने ना हरकत दाखला देऊन स्मशानभूमीच्या कामांमध्ये मोठे योगदान आहे. कंपनी प्रशासनाने स्मशानभूमी आधुनिकी करण्यासाठी नाहरकत दाखला देऊन स्मशानभूमीच्या सुशोभीकरण आणि आधुनिकीकरणासाठी मोलाचे सहकार्य केले असल्याचे दया शेट्टी यांनी सांगितले. एन आर सी कंपनीची एनओसी मिळाल्याने या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर होऊन महानगरपालिकेने स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये मंजूर केले. पाच वर्षात १५ कोटी रुपयांची आपल्या प्रभागात कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत पेव्हर ब्लॉक बसविणे गटारे नाले तयार करणे सिमेंट रोड तयार करणे पाय वाटा तयार करणे पथदिवे बसविणे तसेच उर्दू शाळेचे नुतनिकीकरण करून या शेट्टी यांनी आपल्या कामाची पोचपावती याअगोदरच दिलेली आहे.
सर्व जाती धर्म यांच्या नागरिकांसाठी या स्मशानभूमीत अग्निदाह अंत्यविधी अंत्यसंस्कार पार पाडले जाणार आहेत. या स्मशानभूमीत जात धर्म पंथ गाववाला परदेशी असा कोणत्याही प्रकारचा भेद केला जात नसल्याने सभापती दया शेट्टी यांचे मोहने परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मोहने स्मशानभूमी येथे परिसरातील सर्वच जाती धर्मियांच्या नागरिकांसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेद करण्यात येणार नसून सर्वांना या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रवेश असणार आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.
*काही निवडक मान्यवरांच्या प्रतिक्रिया*
सभापती दया शेट्टी हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत असून आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते प्रभाग क्षेत्रातील अनेक भागात त्यांनी महत्त्वपूर्ण कामे केली आहे यामध्ये पायवाटा तयार करणे सिमेंट रोड गटारे नालेपेव्हर ब्लॉक बसविणे पथदिवे बसविणे उद्यान सुशोभीकरण करणे उर्दू शाळेचे आधुनिकीकरण करणे अशा अनेक प्रकारचे विकास कामे त्यांनी आपल्या विभागामध्ये केलेली आहेत खऱ्या अर्थाने ते आपल्या कार्याने कार्यसम्राट आहेत. आमदार विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)

मोहने येथील स्मशानभूमीसाठी 50 लाख रुपये इतकी मोठी रक्कम या अगोदर कधीही मंजूर झालेली नाही दया शेट्टी यांनी खूप मेहनत करून स्मशानभूमीसाठी निधी मंजूर केला आहे शेट्टी हे निस्वार्थपणे काम करीत असून त्यांनी आपल्या प्रभागांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत --- सुरेश सोनार विभाग प्रमुख शिवसेना

मोने स्मशानभूमीसाठी सभापती दया शेट्टी यांनी पन्नास लाख रुपये मंजूर केल्यामुळे आता मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना नातेवाइकांची परवड होणार नाही सर्व जाती धर्मियांसाठी या स्मशानभूमीत प्रवेश असल्याने त्यांच्या कामाचे सर्वच जाती धर्मीय लोकांकडून कौतुक होत आहे संजय समिंदर जिल्हाध्यक्ष कल्याण-डोंबिवली भीमशक्ती सामाजिक संघटना

सभापती दया शेट्टी यांनी मोहने परिसरातील नागरिकांसाठी स्मशानभूमीचे महत्त्वपूर्ण काम मंजूर केले असून त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला आहे प्रभात मिश्रा शिवसेना गाळेगाव विभाग 

कोव्हिड च्या काळात  मोहने येथील नागरिकांना भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रा येथे 14 दिवस कारण टाईम करण्यासाठी पाठविले जायचे यामध्ये नातेवाईकांचे खूप हाल होत असे ही अडचण लक्षात घेऊन दया शेट्टी यांनी एनआरसी कंपनीच्या शाळेजवळ कोवाड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता.आपल्या प्रभागांमध्ये तसेच संपूर्ण अ प्रभाग क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा निर्माण केलेल्या दया शेट्टी यांचे हार्दिक अभिनंदन -- किशोर शिंदे युवा कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी

माननीय सभापती दया शेट्टी यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात सलग दोन वेळा प्रभाग क्षेत्राचे सभापती पद भूषविले असून त्यांनी आतापर्यंत आपल्या प्रभागात 15 कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर केला आहे प्रभाग क्षेत्रातील सर्वांच्या पसंतीचे नगरसेवक म्हणून ते परिचित आहेत त्यांनी प्रभागाची प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवा केली असून खऱ्या अर्थाने कार्यसम्राट जर कोणी असेल तर ते दया शेट्टी आहेत  ---
संदीप शेंडगे पत्रकार उपाध्यक्ष बाळकृष्ण जांभेकर पत्रकार संघ कल्याण.
सभापती दया शेट्टी यांनी आपल्या प्रभागांमध्ये तसेच आजूबाजूच्या प्रभागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी अनेक छोटे मोठे काम केले असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षांने त्यांना संधी दिले असून त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. तसेच प्रभाग समितीचे ते दोन वेळा सभापती म्हणून निवडून आले आहेत

कल्याण तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशी बारा उमेदवारी अर्ज दाखल !

कल्याण तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसर्‍या दिवशी बारा उमेदवारी अर्ज दाखल !


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य पदाकरिता जाहीर झालेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी दुसर्‍या दिवशी मात्र तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे बिनविरोध ग्रामपंचायत करण्याच्या प्रयत्नाला सुंरग लागतो की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कल्याण तालुक्यातील ४६ पैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मानिवली, रायते पिंपळोली, घोटसई म्हारळ वरप कांबा पावशेपाडा, गोवेली, निंबवली मोस, गुरवली, उतणे चिंचवली, राया ओझर्ली, म्हसकळ, आपटी मांजर्ली, जांभूळ, नडगाव दांणबाव, खोणी वडवली, सांगोडा कोंढेरी, नागाव, दहिसर, वाकळण आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील कल्याण ग्रामीण भागातील म्हणजे २१ ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अनेक आमदारांनी आप आपल्या मतदारसंघात ग्रामपंचायती बिनविरोध करा व निधी मिळवा अशी आँफर दिली आहे.
कारण निवडणूक म्हटले की वाद विवाद, भांडणे, हाणामारी पोलीस केसेस आल्याच, यामुळे गावातील वातावरण अशांत बनते, हे टाळण्यासाठी बिनविरोध निवड हे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. तसे प्रयत्न सुध्दा सुरु होते. २३डिंसेबर हा उमेदवारी अर्ज सादर करण्याचा पहिला दिवस होता. या दिवशी तालुक्यातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते की काय असे वाटत होते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये म्हारळ १,कांबा १,मानिवली२, म्हसकळ अनखर १,नडगाव दांणबाव १,आणि राया ओझर्ली ६असे १२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे अजून किती उमेदवार अर्ज भरतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच, जस जसे निवडणूक जवळ येईल तस तसे निवडणूकीची रणधुमाळी पहायला मिळेल. पण मतदारांनी मात्र सदसद्विवेकबुद्धीने मतदान करायला हवे!

जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांच्या हस्ते रायगड जिल्हा न्यायालयामध्ये ई-सेवा केंद्र स्थापन !

जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांच्या हस्ते रायगड जिल्हा न्यायालयामध्ये ई-सेवा केंद्र स्थापन !


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड)  सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी दिलेल्या दिनांक २५ एप्रिल २०२०  रोजीच्या मार्गदर्शिकेप्रमाणे संपूर्ण देशात प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर ई-सेवा केंद्र स्थापन करणेबाबत कळविले होते. केंद्रीय प्रकल्प समन्वयक, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील दि. ०९ मे २०२० राेजीच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग येथे मुख्य प्रवेशद्वारावर मंगळवार दिनांक  २२ डिसेंबर २०२० रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा प्र. इंगळे यांच्या हस्ते ई-सेवा केंद्राचे उद्घाटन झाले.
     यावेळी अलिबाग मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी वकिल व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. न्यायालयीन प्रशासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या ऑनलाईन सुविधांमुळे न्यायालयातील प्रकरणाची माहिती घेणे आता पक्षकारांना अधिक सोईचे होणार आहे. ई-सेवा केंद्र न्यायालयीन कामकाजाच्या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. 
     तरी ई-सेवा सुविधांचा पक्षकारांनी व वकीलांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती विभा प्र. इंगळे यांनी केले आहे. या ई-सेवा केंद्रामार्फत खटल्याची स्थिती, सुनावणीची पुढील तारीख आणि इतर तपशीलाविषयी माहिती देणे,सर्टिफाईड कॉपी तसेच इतर अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा, ई-फाईलिंग करण्याकरीता याचिकेची हार्डकॉपी स्कॅन करणे, ई-सिग्नेचर समाविष्ट करणे, त्यांना सीआयएसमध्ये अपलोड करुन फाईलिंग नंबर देण्याची सुविधा, ई-स्टँप पेपर्स ऑनलाईन खरेदी करणे तसेच ई-पेमेंट्स करण्यासाठी सहाय्य करणे, आधारकार्ड आधारित डिजिटल स्वाक्षरी मिळवण्यासाठी अर्ज करण्यास आणि ती मिळविण्यास मदत करणे, ई-कोर्ट (e Courts) मोबाइल अॅप डाउनलोड करण्यासाठी सहाय्य करणे व प्रसिध्दी देणे, तुरूंगातील बंदी आरोपीच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी ई-मुलाखत सुविधा उपलब्ध करणे, न्यायाधीशांच्या रजेबाबत माहिती देणे, प्रत्येक कोर्टाच्या कोर्ट हॉलच्या ठिकाणाविषयी तसेच त्याची वाद सूची आणि प्रकरण/खटला सुनावणीसाठी घेण्यात आला आहे की नाही यासंबंधी माहिती देणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती आणि सर्वोच्च न्यायालय विधी सेवा समिती कडून विनामूल्य कायदेशीर सेवा कशा मिळवायच्या याबद्दल लोकांना मार्गदर्शन करणे, ट्रॅफीक चलन केसेस आभासी न्यायालयात (Virtual Courts) निकाली काढणे, तसेच ट्रॅफिक चलन केसेस व इतर किरकोळ गुन्हयाच्या प्रकरणामध्ये ऑनलाईन तडजोड करण्याची सुविधा, ई-कोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत ज्या डिजिटल सेवा उपलब्ध आहेत त्या सुविधांच्या संदर्भात सर्व शंकांचे निराकरण करणे व सहाय्य करणे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाच्या सुनावणीची व्यवस्था आणि आयोजनाबाबत माहिती देणे, ई-मेल, व्हाट्सएप किंवा इतर कोणत्याही संबधीत माध्यमाद्वारे न्यायालयीन आदेश न्याय निर्णयाची सॉफ्ट कॉपी प्रदान करण्याची सुविधा पक्षकार व वकीलांना मिळणार असल्याची माहिती जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री.अशोक लांगी यांनी दिली आहे.

Wednesday 23 December 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा नाताळ हा साधेपणाने होणार !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा नाताळ हा साधेपणाने होणार !


कल्याण – 2020 या वर्षातील जवळपास सर्वच सण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरा करण्यात आले. आता अवघ्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळ या सणाच्या निमित्तानेही राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे.


मंगळवारी सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आवाहन केले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर व्हर्नन मेमोरियल मेथोडिस्ट चर्च कल्याण येथे ख्रिस्तमास निमित्त तयारी सुरू झाली आहे.
कल्याण पश्चिमेतील व्हर्नन मेमोरियल मेथोडिस्ट चर्च 102 वर्ष जूने आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी 24, 25  31, 1 तारखेला मास होणार. त्यात 50 हून जास्त जणांचा समावेश आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये नसणार. आणि ऑनलाइन या मास मध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच 26 डिसेंबर मुंलांचे ही  कार्यक्रम ऑन लाईन होणार असल्याची माहिती फादर स्वप्नील निर्मल व 
रेव्ह सुलभा अहलेय यांनी यावेळी दिली.

मुलभूत सोईसुविधाची गैरसोय तरीही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी?

मुलभूत सोईसुविधाची गैरसोय तरीही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी?


कल्याण (संजय कांबळे) : गावा गावात ग्रामपंचायतीच्या वतीने पुरविण्यात येणा-या मुलभूत सोईसुविधाची पुरती वानवा असताना पुन्हा एकदा सरपंच, उपसरपंच, सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूकांची तयारी सुरू केली आहे.
माहे एप्रिल डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणा-या आणि नव्याने स्थापित झालेल्या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मानिवली, निंबवली मोस, गुरवली, वडवली शिरडोण, वरप, आपटी मांजर्ली, सांगोडा कोंढेरी, नवगाव बापसई, जांभूळ, मोहिली, म्हसकळ, नडगाव दांणबाव, रायता पिंपळोली, खोणी वडवली, म्हारळ, उतणे चिंचवली, गोवेली रेवती, राया ओझर्ली, कांबा, घोटसई, तर तिकडिल नागांव, दहिसर, वाकळण, आदी ग्रामपंचायती चा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून या गावातील नागरिकांच्या मुलभूत सोईसुविधा पुर्ण झाल्याका याचा विचार व्हायला हवा.
रायते पिंपळोली गावात स्मशानभूमी नाही, म्हारळ वरप येथे कच-याची समस्या बिकट आहे, तर इतर ग्रामपंचायतींमध्ये गटारे, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, पाणी, आदी समस्या आहेत तशाच आहेत. निवडणूका आल्या की मेजवान्या, पार्ट्या, आल्याच, मतदारांना यामध्ये सामिल केले की पुढची ५ वर्षे आर्थिक गणित सोडविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील राहतो. थोड्याश्या अमिशापोटी आपण आपला हक्क, अधिकार विकतो, गहाण ठेवतो याची जाणीव मतदारांना नसल्याने पुन्हा तेच तेच निवडून येतात. या घाणेरड्या राजकारणापायी चांगले, सुक्षिशीत तरुण तरुणी या निवडकापासून लांबच राहतात. यातूनही कोणी निवडणूक रिंगणात उतरलाच तर तो खर्च करु शकत नसल्याने मतदार देखील त्याला मतदान करित नाही. ही सत्यता कोणीही नाकारू शकणार नाही.
कल्याण तालुक्यातील २१ पैकी बहुतेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी शिवसेना भाजपा एकत्र आले आहेत. तर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मुंसडी मारेल असा विश्वास तालुका अध्यक्ष जयराम मेहेर यांनी व्यक्त केला आहे. तर गेली कित्येक वर्षे खुर्चीत बसून गावात स्मशानभूमी सारखी मुलभूत सुविधा निर्माण करु न शकणारे विरोधात आपण निवडणूकीत उतरणार असे रायते येथील सुदाम भोईर यांनी सांगितले. तसेच आपण केलेल्या सामाजिक कामामुळे आपण निवडून ही येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदारांनी जागृत पणे मतदान करुन आपला प्रतिनिधी योग्यच निवडावा ऐवढीच माफक अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा रद्द !!

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा रद्द !!


**कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घेतला निर्णय **

मुरबाड (मंगल डोंगरे) : संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील जनतेला हवीहवीशी वाटणारी व सर्वात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करणारी बाजार पेठ असलेली महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेवर कोरोनाचे सावट कायम असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील यात्रा उत्सव बंद केले असुन म्हसा यात्रा रद्द करण्यात आली आहे.
संसारातील ग्रुह उपयोगी अनेक वस्तु मिळणारी, गुरांच्या खरेदी-विक्री ची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल घडविणारी बाजार पेठ, खेळणी, पाळणी, मिठाई, ब्लँंकेट, घोंगड्या, भांडीकुंडी, संसार उपयोगी वस्तुंचे स्टाँल, आर्केस्ट्रा, तमाशे, जुनी परंपरा असलेली गळ लावणे, तळी फोडण्याचे नवस फेडण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी, अशी अबाल व्रुद्धांना हवीहवीशी वाटणारी आणि शेजारील गोरगरीबांना दहा दिवस रोजगार उपलब्ध करून देणारी म्हसोबाची जत्रा यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. सुमारे दोनशे वर्षाची परंपरा यंदा प्रथमताच खंडीत होत आहे.
कोरोनाचे प्रमाण गेल्या दोन महिण्यांपासुन फार कमी झाले आहे. दिवंसेंदिवस कोरोना रुग्ण कमी कमी होत आहेत. त्यामुळे प्रार्थना स्थळे, देवळे दर्शनासाठी खुली झाली आहेत. मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारने गर्दीच्या ठिकाणच्या यात्रा उत्सवारील बंदी कायम ठेवली आहे. खरेतर म्हसा यात्रे नंतर ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी यात्रा उत्सव सुरु होतात.ज्यामध्ये श्री मंलगगड, तिसाईदेवी, खंडोबा देवस्थान, शिवमंदीर, संगमेश्वर, गोरखगड, खोपिवली, माघी गणेशोत्सव, अशा उत्सवांवर कायम बंदी राहणार असल्यामुळे यात्रा उत्सवा निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल, रोजगार, दळणवळण यातून गोरगरीबांना मिळणा-या रोजगारावर दुष्परिणाम होणार असुन म्हसा यात्रा रद्द झाल्यामुळे ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बाजार पेठ ,उद्योग धंदे, दुकाने जरी भरणार नसतील. तरी देवस्थान समिती व शासनाने किमान दर्शनासाठी आणि नवस फेडणा-यांसाठी मंदिरात प्रवेश द्यावा. अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
{यंदा यात्रा रद्द झाली असुन, देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने पुजा अर्चा विधीवत पणे केली जाईल. देवस्थान विश्वस्त म्हसा}
{शासनाच्या नियमानुसार सर्व ठिकाणच्या यात्रा उत्सवांवर अद्याप बंदी कायम आहे.--तहसीलदार अमोल कदम.}

Tuesday 22 December 2020

वृक्षसंवर्धनाकडे वनविभागाचे दुर्लक्ष !

वृक्षसंवर्धनाकडे वनविभागाचे दुर्लक्ष !


कल्याण (उंबर्लि) :- "झाडे लावा झाडे जगवा" ही संकल्पना फक्त कागदोपत्री राहिली आहे. उंबर्लि गावातील वनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनीवर जवळपास ४०,००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही जमीन कल्याण तालुका आणि अंबरनाथ तालुका वनविभागात येते. ९ डिसेंबर रोजी उंबर्लि टेकडीवर आगलागल्यामुळे जवळपास २००० झाडांचे नुकसान झाले आहे. 


उंबर्लि, सोनारपाडा आणि दावडी ग्रामस्थ गेली २ वर्ष या वृक्षांचे सौंवर्धन आणि संगोपन करत आहेत. येथील ग्रामस्थांची तक्रार आहे की वनविभागाने झाडे लावली खरी पण त्याचे संगोपन करण्याचा त्यांना विसर पडला आहे. या झाडांचे संगोपन आणि सौरक्षण करण्याची जवाबदारी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
श्री. भास्कर पाटील, मुकेश पाटील,विजय पाटील, पांडू पाटील, डॉ. शिरोडकर, डॉ. नंदा यांनी संत सावळाराम वनश्री संस्था यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि संगोपन करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. गेल्या ३ वर्षांपासून श्रमदानातून उंबर्लि टेकडीच्या मध्यावर असणाऱ्या डबकेवजा पाणवठ्यावरून पाणी वाहून हा उपक्रम राबविला आहे. गावातील ग्रामस्थ सकाळी फेरफटका मारण्यासाठी टेकडीवर जातात तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली की पाण्यावाचून ही झाडे लोप पावत चालली आहेत यांच्या संवर्धनासाठी आपण काही करू शकतो का? या परिसराचे आपणही घटक आहोत आपणही पर्यावरणाचा समतोल राखण्यास जवाबदार आहोत या भावनेतून हा उपक्रम गेले 3 वर्ष राबवत आहेत.
या ग्रामस्थांना टेकडीवर पाणवठ्याची काही सुविधा नसल्यामुळे टेकडीवर वन विभागातर्फे पाण्याची काही सोय सुविधा उपलब्ध झाल्यास आम्हाला मदत होईल अशी मागणी आहे.

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" संघटनेची कोकण प्रदेश आढावा बैठक खेळीमेळीत संपन्न !!

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" संघटनेची कोकण प्रदेश आढावा बैठक खेळीमेळीत संपन्न !!


नवी मुंबई - : अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र (राज्य) या सामाजिक  संघटनेची कोकण विभागीय आढावा बैठक समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तर प्रदेश सरचिटणीस मा. महेंद्र तथा अण्णा पंडीत यांचे अध्यक्षतेखाली "पटेल फार्म १२२ टीपीसि औद्योगिक वसाहत पावनेगांव कोपरखैरणे नवी मुंबई" या ठिकाणी  खेळीमेळीत संपन्न झाली. 


या बैठकीत स्वागताध्यक्ष म्हणून कोकण विभागीय अध्यक्ष संतोष चाळके यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प, शाल देवुन स्वागत केले. आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रदेश अध्यक्ष रविंद्र दादा जाधव म्हणाले की अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ही सामाजिक संघटना महाराष्ट्रभर कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमातुन उभी राहीलेली असुन पदाधिकाऱ्यांनी समाजातील शोषित, वंचीत असलेल्या घटकांच्या विकासासाठी नियोजनबद्ध रितीने कृती आराखडा तयार करुन या आराखड्याच्या माध्यमातून गोरगरीबांच्या विकासासाठी काम करावे तसेच गोरगरीब बेरोजगार व आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजातील पिडीत व्यक्तींवर होणा-या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून कायदेशीर व सनदशीर मार्गाने हिमालयासारखे त्यांचे पाठीशी उभे राहुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समीतीचा उपयोग करावा असे प्रतिपादन रविंद्रदादा जाधव यांनी आढावा बैठकीत केले.
या वेळेस महेंद्र तथा अण्णा पंडीत म्हणाले की कार्यकर्त्यांनी समितीच्या उद्देश व धोरणात्मक कार्यक्रमास आत्मसात करुन अन्याय होईल तिथे समितीच्या उद्देशानुसार जात पात वंश व वर्ण न बघता अन्यायग्रस्तांना सहकार्य करावे. कोकण विभागीय अध्यक्ष स्वागताध्यक्ष  संतोष चाळके यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. संपूर्ण कोकण विभागात समितीच्या शाखा खोलुन जानेवारीत *"कोविड योध्दा चा सन्मान व प्रबोधनात्मक मेळावा"*  पनवेलला आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या आढावा बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना समितीचे पदे देवुन जबाबदारी सोपवुन सन्मानित करण्यात आले.
या बैठकीस पनवेल तालुकाध्यक्ष राज भोईर, कोकण विभागीय महीला संघटक मा.ममता झंवर,
नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा.रमेश खिल्लारे, विक्रम फुलोरे, ठाणे जिल्हा संघटक अमित साळवे, कल्याण ता.संघटक सुनिल भोसले, परेश लोंढे, रतन कडु, सुहास सोनवणे, रत्नदीप जोशी, यश झवर, रोशन कडु, आशिष गुप्ता, अंबरनाथ-उल्हासनगर ता.अध्यक्ष दिपक मागाडे आदिंसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीचे सुत्रसंचालन सुनिल भोसले, अमित साळवे यांनी केले तर आभार रमेश खिल्लारे यांनी मानले. स्नेहभोजना नंतर राष्ट्रगीताने आढावा बैठकीचा समारोप करण्यात आला.

अखेर टेक्नोक्राफ्ट कंपनी धानिवलीच्या आडमुठे धोरणाविरोधात **सिटु कामगारांचे आमरण उपोषण सुरु **

अखेर टेक्नोक्राफ्ट कंपनी धानिवलीच्या आडमुठे धोरणाविरोधात **सिटु कामगारांचे आमरण उपोषण सुरु **


**गाव बचाव समितीच्या कराराचाही केला भंग ,स्थानिक कामगार झाले बेरोजगार **


मुरबाड (मंगल डोंगरे) : गेल्या 9 महिण्यां पासुन लाँकडाऊनच्या नावाखाली कामगारांच्या कमजोरीचा गैरफायदा घेत टेक्नोक्राफ्ट पाँवर डिव्हिजन (विज निर्मिती) कंपनी बंद करण्याच्या निमित्ताने सुमारे 60--65 कायम स्वरुपी कामगारांना कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना न देता एकाएकी कामावरुन काढुन टाकल्याची घटना घडली. तसेच गावबचाव समिती सोबत केलेल्या कराराचाही भंग करून धानिवली येथील भुमिपुत्रांना बेरोजगार केल्याच्या निषेधार्थ आज अखेर सिटु संघटनेच्या झेंड्याखाली सर्व कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
                 सिटु संघटनेचे अध्यक्ष डॉ. डि.एल. कराड, यांनी वेळोवेळी या कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापना बरोबर पत्रव्यवहार केले. मोर्चे काढण्यात आले. आंदोलने ही झाली. मुरबाड तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनाही वेळोवेळी पत्रव्यवहार करून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली गेली. मात्र ढिम्म प्रशासन कर्ते व विकलेली कायदेव्यवस्थे पुढे गोरगरीब कामगार भरडले गेले. त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गातील शेवटचे हत्यार काढावे लागले आणि सुरु झाले **आमरण उपोषण **आज असही मरायचे आहे आणि तसेही.
                लाँकडाऊनची संधी साधत कंपनीने कुठलीही पुर्व सुचना न देता तडकाफडकी कंपनी बंद करण्याचा बहाणा करत सर्व कामगारांच्या झालेल्या सर्व्हिसचा हिशोब हाती न देता किंवा चर्चा करता पोष्टाद्वारे घरपोच करत त्या कामगारांना कायद्याचा आधार ही घेवु दिला नाही.
                 जवळपास 15 वर्षापासून टेक्नोक्राफ्ट कंपनीची डेन्यूब हि पहिली शाखा धानिवली येथे सुरू झाली. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने धानिवली गाव बचाव समिती सोबत अनेक अटी शर्ती असलेला एक करार केला.ज्यामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना प्राधान्य देवून 100 % कायम स्वरुपी सेवेत सामावुन घेतले जाईल. कोणाच्या शेतीचे, जनावरांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई केली जाईल. गावातील व्यक्तीस PRO  म्हणून नेमले जाईल. या गावातील कंत्राटी पद्धतीने काम करणा-या तरुणांना सहा महिण्यात कायम सेवेत कंपनीच्या रोलवर घेतले जाईल. नव्याने भरतीची आवश्यकता भासल्यास या.गावातील 50--50 तरुणांना मागणी प्रमाणे सेवेत सामावून घेतले जाईल व कायम करण्यात येतील. तसेच धानिवली गावातील लोकांना मौजे पशेणी येथील हाँस्पिटल मध्ये 50 % सवलतीने वैद्यकीय सेवा आणि मुलांसाठी 50 % सवलती ने पशेणी येथील शाळेत शिक्षण सुविधा पुरविली जाईल. धानिवली पुला पासून गावात जाणारा रस्ता काँक्रीटीकरण व विद्युत रोषणाई करून दिली जाईल. गावातील गणपती मंदिर बांधून, मंदिराकडे जाणारा रस्ता काँंक्रीट केला जाईल.गावासाठी व्यायाम शाळा, समाज मंदिर, बांधून दिले जाईल. विजनिर्मिती कंपनी बांधण्यासाठी गावातील ठेकेदाराला काम दिले जाईल. बिल्डींग मटेरियल याच गावातील सप्लायर्स कडुन घेतले जाईल. अशा प्रकारचा करार कंपनी सुरु होण्यापुर्वी या कंपनीने केला असताना, यातील कुठल्याही बाबीची पुर्तता न करता कंपनीने धानिवली गावाच्या तोंडाला पाने पुसुन त्यांच्या मुलाबाळांना तबकाफडकी कामावरुन काढून टाकल्याच्या निषेधार्थ आज अखेर सिटु संघटनेने दंड थोपटुन आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...