Saturday 30 September 2023

जेष्ठांचे रक्षण काळाची गरज__

जेष्ठांचे रक्षण काळाची गरज
--------------------------------------

                   जुनं ते सोनं ! एक काळ असा होता की, मोठ्यांना मान-सन्मान मिळत होता. भारत तर यामध्ये अग्रेसर होता. त्यावेळी सद् विचार जगभरच होता. भारत तर याची जन्मभूमी. येथे नुसता विचार नाही चोख आचारसुध्दा. वस्तू असो या व्यक्ती, सर्व जुनं ते सोनं मानुन त्याची जपणुक-राखण, पालणपोषण करण्याची आपली परंपरा. पण आज काय पहायला मिळते ? १० कोटी ३० लाख वृध्दांपैकी जवळपास प्रत्येक दुसऱ्या वृध्दांची स्थिती केविलवाणी आहे. १० पैकी ७ वृध्दांना कौटुंबिक छळ सहन करावा लागतो. शहरांमध्ये ६०% सुना तर ५०% मुलंच वृध्दांना वाईट वागवतात. वेळप्रसंगी घराबाहेरही काढतात. फारच वृध्दांची आर्थिक स्थिती चांगली आहे. ते वृध्दाश्रमाचा आसरा घेतात.  ७०% वृध्दांना खासगी नोकरीमुळे पेन्शन नाही. त्यांची अवस्था भयानक आहे. ८०-८५ वर्षांचे वृध्द शहरात आजही काही ना काही काम करुनच आपले पोट भरताना दिसतात.
                   सध्या युज अँड थ्रो ! असेच वातावरण आहे. मग ते खेळणे असो या  जिवंत  मायबाप. उपयोग किंवा  वापर  संपताच वा-यावर टाकणे हीच आजची स्थिती आहे. पण ही स्थिती समाजाला घातक ठरणारी आहे हे नाकारण्यासारखे नाही. पूँजीवादाच्या या अनीतीचा भीषण प्रसार या आपल्या देशात झपाट्याने होताना दिसत आहे. आई-वडिल, आजी-आजोबा असे अनुभवाचे भांडार अक्षरशः टाकाऊ भंगार मानले जात आहे. याला जबाबदार कोण? घरात स्थान नाही समाजात मान नाही. सरकारलाही जाण नाही. अशीच अवस्था आज असंख्य जेष्ठ नागरिकांची पहावयास मिळते.
                   जेष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्राची संपत्ती असे म्हटलं जाते. लोकशाही राष्ट्रांच्या संविधनात अशीच मते व्यक्त केलेली आहेत. पण प्रत्यक्षात काय? या मतानुसार प्रत्यक्षात काय घडले नाही. घडण्याची शक्यता ही नाहीच असेच म्हणावं लागेल. वडिलधारी माणसं ही समाजाची मार्गदर्शक, आधार मानल्या जाणाऱ्या या भारत देशात तर परिस्थिती  दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत आहे. वडिलधारी माणसांसाठी आता जागा अपुरी पडायला लागली आहे. म्हणूनच वडिलधारी माणसांना घराबाहेर काढले जात आहे. जेष्ठ नागरिकांची ही अवस्था  होत असल्यामुळे सरकारने नविन कायदा करुन जेष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. पण त्या कायद्याचे पालन होते का याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारच्या या कायद्याने वृध्दांची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा ठेवायला आता हरकत नाही. पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारा राम, आई-वडिलांना कावडित घालून तिर्थयात्रा घडवणारा श्रावणबाळ, मायबापाची सेवा करणारा पुंडलीक हे येथील आदर्श आहेत. मात्र सध्या संपत्तीच्या वादात आई-वडिलांची हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. बायकोचे बैल झालेले पुरुष जन्मदात्यांना विसरुन बायको सांगेल तसे वागवतात. बायको, मुलांच्या व स्वतःच्या वेगवेगळ्या चप्पल, बुटं ठेवायला घरात सुंदर कपाट ठेवणा-या या या बायकोच्या बैलांना ज्यांनी हे जग दाखवले, स्वतः  उपाशी राहून लहानाचे मोठे केले त्या जन्मदात्यांना त्याच्याच घरात त्यांनाच जागा न ठेवणा-या या मुलांना काय म्हणावे. काही मुलं आजही आई-वडिलांची, आजी-आजोबा यांची सेवा करणारी आहेत. पण अशांची संख्या अत्यंत कमीच आहे. जास्त संख्या ती भांडवलशाही  व चंगळवादाने बिघडलेल्यांचीच पहावयास मिळते.
                   अपत्यांकडून होणारी उपेक्षा ही बहुसंख्य वृध्द मातापित्यांच्या काळजाला व्यथित करणारी वेदनाच. रात्र -रात्र जागून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या व पदरमोड करुन लाड पुरवलेल्या मुलांकडूनच उपेक्षा होणे दुर्दैवीच म्हणावे लागेल. झोपडपट्टीपासून बंगल्यापर्यंत, अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत समाजाच्या प्रत्येक थरात मला जन्म दिलात, मोठे केलेत ते काय उपकार केलेत का? तुमचे कर्तव्य तुम्ही केलेत आसे बोलणारे वृध्दांच्या अंगावर वसकन खेकसणारे नराधम या समाजात कमी नाहीत. माता-पिता यांना कर्तव्य सांगणारे हे नराधम स्वतःचे कर्तव्य मात्र विसरून जातात याला काय म्हणायचे. वृध्द आई-बाबा यांची काळजी घेणे, त्यांचे रक्षण करणे हे अपत्यांचे मानवी, सामाजिक, नैतिक कर्तव्य पण ते आज आचरणात येताना फार कमी प्रमाणात  दिसते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल असे आमचे प्रमाणिक मत आहे.
                   पांढरपेशा कृतघ्नांची रित जरा वेगळी बघायला मिळते. बाजारी पध्दतीचा ते वापर करतात. आई-वडिलांशी बोलणी करुन कोठेतरी लांब जागा घेऊन देतात किंवा वृध्दाश्रमाचा मार्ग दाखवतात. ४-५ महिन्यांनी एकदा कधीतरी औपचारिक भेट देतात. ती सुध्दा बायकोपासून वेळ मिळाला तरच आठवड्याच्या रजेच्या दिवशी बायको, मुलांना  पिकनिकला जाणाऱ्या मुलांना जन्मदात्यांचे दर्शन घ्यायची इच्छा होत नाही.पण ज्या वृध्दांना मुलांच्या, नातवंडे यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य  लाभते ते स्वतःला खरंच भाग्यवान समजत असतील यात शंकाच नाही. काहीजण वृध्दांना थारा देतात पण घरची, मुलांची सर्व कामे करावी लागतील अशी ताकीदच देऊन पण हे योग्य नाही. मग पर्याय म्हणून एकांकीपणाला कंटाळून वृध्द जीव देतात. तर अनेकांच्या एकटेपणाचा फायदा घेत हत्या होतात. हे सर्व थांबवण्यासाठी तरुणांनी, समाजाने, सरकारने, प्रसिद्धीमाध्यमे, पत्रकार, वृत्तपत्रलेखक, विविध संस्था, एन.जी.ओ. यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मुलांना योग्य सल्ला देऊन जेष्ठ नागरिकांचा स्विकारण्यास भाग पाडावे. वृध्दांचा आदर करण्याची शिकवण द्यावी तरच वृध्दांची दुर्दशा थांबेल. अन्यथा आपल्यावरही हीच वेळ येणार हे विसरुन चालणार नाही.
                एकंदरीत पुरेशी सामाजिक सुरक्षा नाही. आर्थिक सुरक्षा नाही. त्यामुळेच भारतातील बहूतेक वृध्द मिळालेल्या आस-याला अगतिकपणे चिकटून पण जीव मुठीत धरुन कसंबसं जगत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे वृध्दांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वृध्दांचा संभाळ कसा होणार हा आता यक्ष प्रश्न बनला आहे. तुम्ही आपल्या आई-वडिलांची, आजी-आजोबा यांची काळजी घ्या. नाहीतर तुमचे अनुकरण करुन तुमच्या मुलांकडूनही तुमची उपेक्षा होईल हे सत्य विसरु नका. शेवटी जेष्ठ नागरिक दिनानिमित जेष्ठ नागरिकांना शुभेच्छा !

शांताराम गुडेकर
पत्रकार /वृत्तपत्रलेखक 
पार्क साईट विक्रोळी (प.)
मुंबई -४०० ०७९
भ्रमणध्वनी -९८२०७९३७५९

जीवनात शांति कशी प्राप्त करावी - संत राजिन्दर सिंह जी महाराज

जीवनात शांति कशी प्राप्त करावी
- संत राजिन्दर सिंह जी महाराज

      आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जन्मदिवशी संपूर्ण विश्वभरात "अहिंसा दिवस" साजरा केला जात आहे. आपण सगळे जाणतो कि गांधीजींनी अहिंसेद्वारे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते नेहमी म्हणत असत, जर आपणास आपल्या जीवनात शांति असावी असे वाटत असेल तर, आपणास त्याकरिता अहिंसेला मन, वचन आणि कृतीद्वारे आपल्या जीवनात उतरविले पाहिजे. तेव्हाच आपल्या जीवनातच नव्हे तर पूर्ण विश्वात शांति स्थापनेचे स्वप्न साकार करू शकू.

       आता प्रश्न असा निर्माण होतो की आपण आपल्या जीवनात किंवा विश्वभरात शांति स्थापने करता काय करतो? या विषयी माझे एक स्पष्ट मत आहे की, आपल्याला आश्चर्य वाटेल की या विषयाला आपण आतापर्यंत दुर्लक्षित कसे केले? विश्वात शांति स्थापनेसाठी सर्वांत प्रथम पाया आपण स्वतःच आहोत.

       जर आपण ध्यान अभ्यासाद्वारे आंतरिक शांति प्राप्त केली तर आपल्याला आत्मिक प्रसन्नता अनुभवायला मिळेल. त्या आत्मिक शांति आणि आनंदाला प्राप्त केल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपला परिवार आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना शांत करण्यात सहाय्यभूत ठरू. त्यानंतर ही शांतिची व्याप्ती हळूहळू समाज आणि राष्ट्र यांच्यातून विश्वभरात प्रसारित होईल. या प्रकारे आपण एक-एक करुन ही साखळी जोडून विश्वात शांति ची स्थापना करू शकू.

     मनो-वैज्ञानिकांच्या मते समजाविले जाते की, कोणत्याही माणसाला दुसऱ्या कोणी माणसाने शिकवावं की त्याच्या करिता योग्य काय आहे? हे सांगितलेलं आवडत नाही. जर कोणी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती त्याचा विरोध करते. इतरांना हे सांगणं पुरेसं नाही की त्यांनी शांतिने जगावे. जर आपण इच्छित असू, आपल्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर व्हावा, तर आपल्याला ते आपल्या जीवनात प्रथम उतरविले पाहिजे. जर आपण ध्यान-अभ्यासाद्वारे आपल्या अंतरी शांति प्राप्त केली तर यामुळे आपले जीवन बदलून जाईल. आपण नेहमी शांत आणि प्रसन्न चित्त राहू, यामुळे इतर व्यक्ती सुद्धा जिज्ञासेने हे जाणण्याचा प्रयत्न करतील या खुशी चे रहस्य काय आहे? याच बरोबर हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतील की ही खुशी आणि शांति आपण कशाप्रकारे प्राप्त केली.

     चला तर, आपण सुद्धा ध्यानाभ्यासाद्वारे आपल्या अंतरी शांतिचा दीपक प्रज्वलित करूया. ज्याचा प्रकाश इतरांना सुद्धा प्रकाशित करेल, जेणेकरून त्यांचे जीवन सुद्धा शांति आणि प्रकाशाने ओतप्रोत होईल, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने "अहिंसा दिवस" साजरा करू शकू.

    विश्वविख्यात परम पूजनीय संत राजिंदर सिंह जी महाराज यांचे देवळाली,जिल्हा नाशिक येथे दिनांक 12 व 13 ऑक्टोबर 2023 रोजी शुभ आगमन होत आहे. त्यानिमित्त दर्शन, सत्संग आणि नामदान कार्यक्रम कॅन्टोन्मेंट ग्राउंड,आनंद रोड, देवळाली येथे आयोजित केला आहे.

श्री शिवाजी मंदिर, दादर येथे "माझं अस्तित्व" या नाट्य प्रयोगाचे आयोजन !!

श्री शिवाजी मंदिर, दादर येथे "माझं अस्तित्व" या नाट्य प्रयोगाचे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /सौ.मनस्वी मनवे) :
             नाटकाचे लेखक व दिग्दर्शक श्री. शैलेश भागोजी निवाते यांचे एक वेगळे व उत्तम नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचावे यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक स्वतः श्री.शैलेश निवाते यांनी केलं आहे.आपल्या स्वप्नांना पालवी फुटावी या भावनेतून "जीवनशैली" यांनी निर्मिती केलेल्या "माझं अस्तित्व" या प्रायोगिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम) येथे, रविवार, दिनांक - ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी - १० : ०० वाजता सादर होणार आहे.
            नाटक या शब्दाची व्याख्या करणे कठीण आहे.पण नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांचा द्वाराव्यक्त होणारा संघर्षमय हा नाटकाचा घडणारा घटक माणसाच्या किंवा कलाकाराच्या अंतर्बाह्य क्रिया - प्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा कलाकार होय.माणसाची अद्भुत, हिंसाचार व अतूट मैत्रीच्या ऋणानुबंधातून हरवलेल्या मित्राची कहाणी व माणसाची माणुसकी जपणारी कौटुंबिक जिव्हाळ्याचे, हृदयस्पर्शी दोन अंकी नाट्य कलाकृती नाट्य प्रेमींच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत. लाचारीने एका व्यक्तीवर झालेल्या अन्यायाला जाब विचारून त्याच्यावर केलेला पाठपुरावा आणि न्याय मिळवून देणारी माणसं आज ही या जगात आपल्या सोबत आहेत, अशाच सर्वसामान्य जनतेला विचार करण्यासाठी हे नाटक प्रवृत्त करणारं आहे. तर मंडळी हे नाटक पहायला कोणी विसरू नका आपल्या जवळच्या नाट्यगृहात, लवकरच आपलं आसन बुक करुन, आपण सारे बहुसंख्येने उपस्थित राहून या नाटकाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजक यांनी केले असून अधिक माहितीसाठी आणि तिकीटासाठी  शैलेश निवाते- ९७५७३४४१०७ यांच्याशी संपर्क साधवा.

गोवेली ग्रामीण रुग्णालयात आयुष्यान मेळाव्यात हजारो रुग्णांनी घेतला लाभ, जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले कौतुक !

गोवेली ग्रामीण रुग्णालयात आयुष्यान मेळाव्यात हजारो रुग्णांनी घेतला लाभ, जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले कौतुक !

कल्याण, (संजय कांबळे) : गोवेली ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा व शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने आज आयुष्यमान मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तालुक्यातील सुमारे  १० हजार ४७४ रुग्णांनी विविध प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती लाभून ही अंत्यत निटनिटके नियोजन  केल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ माधवी पंदारे व त्यांचे वैद्यकीय अधिकारी,सिस्टर व कर्मचारी यांचे कौतुक केले.

आज ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता, ठाणे, कळवा, उल्हासनगर, कल्याण आदी शहरातून विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यामुध्ये बालरोगतज्ज्ञ, अस्थीव्यंगतज्ञ,त्वचा विकार तज्ञ,मनोविकार तज्ञ, कान, नाक घसा तज्ञ,नेत्रशल्य चिकित्सक, दंतशल्य चिकित्सक, सर्जन असे १० वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याचा लाभ घेतला. रुग्णांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.साधारण पणे साडेदहा हजार रुग्णांनी विविध आजाराचे तज्ञांचे मार्फत तपासणी करून घेतली. यामध्ये आरबीएसके ६३४४, सीऐएमपी ३९६७, आयुष्य विभाग ३३७, ईसीजी १५०, त्वचा १७७, डोळ्यांचे विकार १०२, टिबी, एक्स रे १०५ इत्यादी चा समावेश आहे.

या मेळाव्याला जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविंदे, गोवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा दिपक जाधव, काशीनाथ चोरगे, जिजाऊ संस्थेच्या नम्रता ठाकरे,आदी मान्यवर उपस्थित होते तर दुपारच्या सत्रात ठाणे सिव्हिल हाँस्पिटलचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी मेळाव्यास भेट दिली. सर्व वैद्यकीय अधिकारी व ते पुरवित असलेल्या सेवाची माहिती घेतली आणि येणाऱ्या रुग्णासाठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ माधवी, डॉ, सोनाली, डॉ समरीन, डॉ, काकडे, डॉ मृणाल, नेमा कुलाबकर, कोमल गोगाकर, भावना सैंदाणे, प्रगती असवले, सिध्देश परब, त्यांचे सहकारी डॉक्टर, कार्यालय सहा, अधीक्षक सुनील  डोंगरे,  गोर्वधन राठोड, उध्दव वडजे, सुरक्षारक्षक सुधाकर घोंडविंदे, ठाकरे, हर्षदा कापूसकर आणि सहकारी यांनी योगदान दिले तर या मेळाव्याला मोलाचे सहकार्य कल्याण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ,दहागाव व खडवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा वर्कर, आदींनी केले. एकूणच सर्वाच्या सहकार्याने आजचा मेळावा यशस्वी झाला. यावेळी योगासनेची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली तसेच अवयवदान व तंबाखू मुक्ती ची शपथ घेण्यात आली. व सोहळा संपन्न झाला.

Friday 29 September 2023

युवा उद्योजक धिरज सांबरे यांनी जिजाऊ संस्थेचा वारसा जपत गरीब विद्यार्थ्याला केली तब्बल १७ लाखांची मदत !!

युवा उद्योजक धिरज सांबरे यांनी जिजाऊ संस्थेचा वारसा जपत गरीब विद्यार्थ्याला केली तब्बल १७ लाखांची मदत !!

ठाणे, प्रतिनिधी : शिक्षण घेत असताना आपल्या भविष्याच्या वाटा ठरवताना डॉक्टर , इंजिनियर होण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात मात्र परिस्थिती अभावी अनेकांची स्वप्ने ही अधुरीच राहतात आणि मग त्यांना पर्यायी मार्ग स्वीकारावे लागतात. MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या विशाल पाटील ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही अगदी हेच घडणार होते. मात्र त्याच्या परिस्थितीबद्द्ल उद्योजक धिरज सांबरे यांना कळाल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्याला तब्बल १७ लाखांची मदत केली आहे . त्यामुळे वाडा तालुक्यासह  संपुर्ण जिल्ह्यात या अनोख्या सामाजिक बांधिकीबद्द्ल धिरज सांबरे तसेच जिजाऊ संस्थेचे कौतुक केले जात आहे.

तळागाळांतील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले हात आहेत. तर पैशांअभावी शिक्षण अडणा-या अनेकांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातुन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आर्थिक मदतही केली आहे. 

आई वडील नसलेला कोल्हापुरचा गरीब कुटुंबातला स्वप्नील माने या विद्यार्थ्यालाही आर्थिक मदत करत त्याचा IPS पर्यंतचा प्रवासात जिजाऊ संस्थेने मोलोचे सहकार्य केले होते. तर मोखाडा तालुक्यातील परिस्थीती अभावी शिक्षण अर्धवट सोडणा-या मोहिनी भारमल हिच्या संपुर्ण कुटुंबाची जबादारी जिजाऊ संस्थेनेले घेउन तिच्या पंखाना बळ दिले आणि अग्निश्मम दलात निवड झाली. अश्या एक ना अनेक युवक युवतींच्या भविष्यातले स्वप्न पुर्ण करण्यासाठी जिजाऊ संस्था आणि निलेश सांबरे ही खंबीरपणे पाठिशी उभे राहिले आहेत. हाच वारसा पुढे चालवत "निलेश सांबरे यांचे चिरंजीव धिरज सांबरे" यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या पालघरच्या वाडा तालुक्यातील विशाल संतोष पाटील याला आर्थिक साह्य करत त्याच्या पुढील सर्वच शिक्षणाची जबादारी घेतली आहे.

वाडा तालुक्यतील एका सामन्य शेतकरी कुटुंबातील विशाल पाटील याने क्लासची फी भरण्यासाठी फी नसल्याने घरीच अभ्यास करत मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने NEET मध्ये 470 गुण मिळवून वाडा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला, परंतु वडील एक सामान्य शेतकरी असल्याने पुढे जाऊन विशालला  वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी लागणारी मोठी रक्कम भरता येणं आवाक्याबाहेरचे होते, पण जशी ही बातमी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे सुपुत्र व प्रसिध्द उद्योजक धिरज सांबरे यांना समजली तेव्हा कसलाही विचार न करता विशालला संपूर्ण प्रथम वर्ष MBBS ची फी 17 लाख 12 हजार रुपये भरून ऍडमिशन घेऊन दिले आहे. तर यापुढेही त्याचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत त्याची संपुर्ण जबादारी ही उद्योजक धिरज सांबरे यांनी घेतली आहे .

आजच्या एकमेकांच्या ताटातले ओरबाडुन खाण्याच्या युगात  एवढी मोठी रक्कम दुसऱ्याच्या शिक्षणासाठी देणं ही केवळ स्वप्नवतच गोष्ट आहे . मात्र आज निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यामातुन जपलेली समाजिक बांधिलकीची ही बिजं इतरांच्यातही अंकुरत आहेत त्याचे हे उदाहरण आहे .  विशाल चे MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार असुन याबद्दल विशालच्या कुटुंबात आणि नाणे गावातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोषित  आनंदाचे वातावरण आहे. जिजाऊच्या या कार्याचे सर्वत्रच कौतुक होत आहे .

कोकणातील श्रीक्षेत्र श्री मार्लेश्वर एक जागृत देवस्थान !!

कोकणातील श्रीक्षेत्र श्री मार्लेश्वर एक जागृत देवस्थान !!

                   महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचं श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा अविष्कारच! त्यातच मार्लेश्वर म्हणजे नागमोडी पर्वतरांगा जणू निसर्ग सागरावर उमटणा-या सोनेरी लाटाच ! या निर्जन, निरव शांतता असलेल्या अरण्यात अध्यात्मिक उपासकांसाठी अभंग शांतता भरून राहिली आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योग साधकास अध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे. अशा या देवस्थानला भेट देण्यासाठी आम्ही गणेशोत्सव काळात सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वरला जायचे नक्की केले. मी व पत्नी सौ. संजीवनी शांताराम गुडेकर, मुलगी सौ. निशा सूरज घोडेस्वार, मुलगा उत्कर्ष शां. गुडेकर, नातू कु. सिद्धांत सु. घोडेस्वार, साडू श्री. संतोष भिवा रेवाळे, मेव्हणी सौ. स्नेहा संतोष रेवाळे आणि त्यांचा मुलगा संकेत रेवाळे, मुलगी सायली रेवाळे, भाचा मंगेश वामन रेवाळे आणि त्याची पत्नी सौ. माऊली मंगेश रेवाळे, मुलगी कु. रुद्रा रेवाळे, पुतण्या दिलीप  गुडेकर आणि त्याची पत्नी सौ. दिशा दिलीप गुडेकर तसेच कु. रुई भोज आणि अमित मिश्रा या सर्व सदस्यांनी दर्शनसाठी जायचं ठरवले. आंगवली रेवाळे वाडी येथील रहिवाशी सूर्यकांत गंगाराम रेवाळे यांच्या गाडीने आम्ही निघालो. (आमचे स्वःताचे वाहन नसल्याने) व गणेशोत्सव सुरु असल्याने वाहन मिळते की नाही असा प्रश्न असताना वाहन उपलब्ध झाल्याचा आनंद होता. कारण गणेशोत्सव कारणाने एस.टी ही भरगच्च भरुन येणार हे खात्रीदायक होते. त्यामुळे आम्ही हा पर्याय निवडला होता.

            रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे १५ कि. मी.आणि आंगवली या गावापासून ११ कि. मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं हे पवित्र आणि जागृत  देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. नैसर्गिक दृष्टय़ा अतिशय विलोभनिय असणा-या या ठिकाणी माणूस अक्षरश: हरवून जातो. भोवतालच्या रमणीय परिसराचा व हिरव्यागार वनश्रीचा आस्वाद घेण्यात दंग होतो. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे कुंजन प्रसन्नतेला वरदान आहे. पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वरला भेट देण्याची मजा आणखीनच वेगळी असते हे तेथे पोहचल्यावर समजते.

          श्री क्षेत्र मार्लेश्वर बसस्थानकापासून पुढे अरुंद नागमोडी सिमेंटच्या पाय-यांची पक्की पायवाट आहे. घनदाट जंगल, खाली खोल दरी, माथ्यावर सह्याद्रीची शिखरं पाहत असताना अनोख्या विश्वात कधी पोहचतो, याचे भानच राहिले  नाही. देवळाचा साडेतीन फुटी दरवाजा व गाभारा गुहास्वरूपाचा असून तो सुरक्षित आहे.एकावेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते. गाभा-यात मात्र २५ माणसं उभी राहू शकतात. ही गुहा पांडवकालीन असल्याचे जनमत आहे. गाभा-यात शंकराची स्वयंभू पिंड आहे. सोबत पाण्याचे कुंड असून खोळवर गेलेली विवरं आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे साप व नाग मुक्तपणे संचार करताना दिसतात. मात्र ते कोणालाही इजा करत नाहीत. वाटेत वानरांची खोडकर वानरसेना हसत खिदळत मन रिझवतात.या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक सांस्था, पत्रकार, स्वयंसेवक श्री क्षेत्र मार्लेश्वर ट्रस्ट, मारळ ग्रामपंचायत व अन्य समिती पदाधिकारी, सदस्य, पोलिस यंत्रणा प्रयत्न करत असतात. येणा-या-जाणा-या भाविकांना त्रास होऊ नये,म्हणून दक्षता घेतली जाते. शिवाय स्वच्छता राखण्याचे कामही चोख बजावले जाते.अनेक सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे कार्यकर्ता झटत असल्याचे दिसले. 

           मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी याठिकाणी र्वषभर रिघ असते.शालेय सहली याचठिकाणी मोठय़ा प्रमाणात येत असतात. दर महिन्याच्या सोमवार व शनिवार तसंच सुट्टीच्या दिवशी व श्रावण महिन्यात, महाशिवरात्री, दत्तजयंती या दिवशी तर भाविकांचा महासागर लोटतो असे तेथील पुजारी ल अन्य समिती पदाधिकारीवर्ग ने सांगितले.जानेवारी महिन्यात तर येथे खूपच गर्दी असते. कोकणवासीय चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरचा जत्रौत्सव असतो. १३ ते १८ जानेवारी दरम्यान होणा-या या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात. पूर्वी मारळ, आंगवली या गावांना फारसं कोणी ओळखत नव्हतं. परंतु आज मारळ-आंगवली म्हणजे मार्लेश्वर व मार्लेश्वर म्हणजे आंगवली-मारळ होय.या यात्रेसाठी भाविक पायी, सायकल व इतर खाजगी वाहने, एस.टी. बसेसने येत असतात. मुंबई येथून अनेक भाविक ग्रुपने बस करून यात्रेसाठी जातात. परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल, ठाणे, बोरिवली याठिकाणाहून तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, साखरपा, देवरूख, संगमेश्वर, सावंतवाडी याठिकाणाहून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे एस.टी.ची सोय केलेली असते. सारा परिसर ‘हर हर महादेवऽऽऽ..’, ‘हर हर मार्लेश्वरऽऽऽ..’  या जयघोषाने दुमदुमत असतो. आंगवली गावांमध्ये असणारे माल्रेश्वर देवालय (मठ) व मारळचे श्री क्षेत्र माल्रेश्वर देवस्थानचे पावित्र्य जपणे प्रत्येकाच्या हाती असते. कारण ही दोन्ही मंदिरे वैशिष्टय़पूर्ण आहेत. याठिकाणी येणारे भाविक मद्यपान करून येऊ शकत नाहीत. शिवाय मांसाहार केलेलाही चालत नाही. महिलांनी आपल्या अडचणीत याठिकाणी येऊ नये असा संकेत आहे. ज्यांनी या बाबींचा विचार केला नाही, त्या-त्या वेळी नैसíगक आपत्ती वा अपघात झाले असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते.येथील धारेश्वर धबधब्याखाली प्रत्येक भाविक (पुरुष-महिला, युवकवर्ग) एकत्रितपणे स्नान करून शुचिर्भुत होऊनच माल्रेश्वरचे दर्शन घेतात असे अनेकांनी सांगितले. मात्र आम्हाला धबधब्याखाली पावसामुळे जाता आले नाही.नव्हे समितीने धबधबा कडे जाणारा रस्त्याच बंद केलेला होता. तरीही पाठी धबधबा कसा येईल हे बघत आम्ही व मुले फोटो, सेल्फी घेण्यात मग्न होती. वर्षासहलीसाठीही येथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. वाचक हो ! आपणही एक वेळ येथील जत्रौत्सवाचा किंवा मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचा अनुभव घ्यावा. येथील निसर्ग सौंदर्य, धारेश्वर धबधबा आपणास येथे पुन्हा पुन्हा येण्यास उद्युक्त करते. कारण हे मार्लेश्वर  देवालय (मठ) व श्री क्षेत्र माल्रेश्वर तीर्थस्थान ग्रामदैवत तितक्याच निसर्गरम्य गावात वासलेले असून मनाला ओढ लावणारे, स्मृतिचिरंतन करणारे, गतकाळाला उजाळा देणारे नव्हे तर पुन्हा-पुन्हा पाहातच राहावे असेच आहे.आम्ही तर दर्शन घेतले.आनंद लुटला. एकवेळ आपणही  श्री क्षेत्र मार्लेश्वरला अवश्य भेट देऊन आनंद लुटावा.
‘हर हर महादेवऽऽऽ..!!’ ‘
हर हर मार्लेश्वरऽऽऽ..!!’

शांत्ताराम गुडेकर
दै. अग्रलेख
मुंबई /कोकण विभागीय संपादक 
मोबाईल -9820793759

नाका तेथे शाखा या मनसेच्या घोषवाक्य अंतर्गत जनसंपर्क कार्यालय उदघाटन !!

नाका तेथे शाखा या मनसेच्या घोषवाक्य अंतर्गत जनसंपर्क कार्यालय उदघाटन !!

 *_मा. श्री. राजसाहेब ठाकरे_* यांचे हाथ बळकट करण्यासाठी____

लोणावळा, प्रतिनिधी : मा. श्री. संदीप लक्ष्मण पोटफोडे* यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बावला सेनेटोरीयम, ८१६/अ, मुंबई पुणे रोड, महाराजा इन हॉटेल समोर, लोणावळा, ता. मावळ, जि.पुणे येथील जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा दि. २७/०९/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता त्यांच्या मातोश्रींच्या हस्ते रिबीन कापून संपन्न झाला. 

यावेळी सुरेश जाधव, संतोष खराडे, रुपेश नांदवटे, गणेश आहेर, मंगेश फाटक, नरेश आहेर, संग्राम भानुसघरे, राजू भाणुसघरे, निखिल भोसले, दिनेश कालेकर, अंकुश कचरे, आकाश ढाकोळ, अर्जुन ओव्हाळ, अनिल राजीवडे, सुमित अमले, सुरेश आंबेकर, ऋषिकेश कुटे, सिराज खान, मेहराज खान, जयराम पाळेकर, सूरज देवकर, सुनील जनीरे, वैशाली पोटफोडे व असंख्य कार्यकर्ते, मित्र परिवार उपस्थीत होते. 

तालुका अध्यक्ष रुपेशभाऊ म्हाळस्कर, पत्रकार विशालजी विकारी यांनी सदिच्छा भेट देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना संदीप पोटफोडे म्हणालेत मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी व प्रत्येक नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी सदैव काम करणार असून नागरीकांच्या हिताच्या अनेक योजना, कार्यक्रम राबविले जाणार आहेत. उद्या शनिवार दि. ३०/०९/२०२३ रोजी कार्यालयात आधार कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण त्याचा लाभ घ्यावा.

कल्याण तालुक्यातील सेहचाळीस ग्रामपंचायत मधील त्रेऐंशी महसुली गावात एक आँक्टोंबर रोजी होणार श्रमदानातून स्वच्छता !

कल्याण तालुक्यातील सेहचाळीस ग्रामपंचायत मधील त्रेऐंशी महसुली गावात एक आँक्टोंबर रोजी होणार श्रमदानातून स्वच्छता !

कल्याण, (संजय कांबळे) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयती दिनाच्या निमित्ताने कल्याण पंचायत समितीच्या ४६ ग्रामपंचायती व या अंतर्गत येणाऱ्या ८३ महसुली गावातून लोकसहभागातून श्रमदान आणि स्वच्छता करण्यात येणार आहे. याबाबत चे मार्गदर्शन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कर्मचारी यांना  नुकतेच कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयती दिनी देशभर महाश्रमदान स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत व या अंतर्गत ८३ महसुली गावात स्वच्छता हि सेवा अभियानांतर्गत लोकसहभागातून श्रमदान व यातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, सकाळी १० ते ११ या वेळेत, शालेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिपाई, तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतचे मार्गदर्शन व सूचना कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात कर्मचाऱ्यांना दिल्या तसेच हे महाश्रमदान अभिमान यशस्वी करण्याचे अवाहन केले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चिराग आनंद यांनी घेतले मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन !!

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चिराग आनंद यांनी घेतले मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन !!


मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर अनेक नेतेमंडळी, कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित, मराठी तसेच बॉलिवूड सिने मंडळी आणि अनेक दिग्गज लोक दर्शनासाठी पोहोचले होते.

कल्याण येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य विस्तारक चिराग आनंद यांनी सुध्दा मा. मुख्यमंत्री यांच्या घरी जाऊन दर्शन घेतले, चिराग आनंद हे कल्याण पश्चिम येथील रहिवासी असून त्यांचे सामाजिक व वैद्यकिय क्षेत्रात मोठे योगदान आहे. 

चिराग आनंद यांनी दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की महाराष्ट्रराचे लाडके मा. मुख्यमंत्री व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब स्वतः सगळ्यांना भेटून विचारपूस करत होते, सामान्यांची जाणीव असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत.

Thursday 28 September 2023

शासनाला गोरगरिबांचे कर्ज माफ करावेच लागणार - एस.एम फाउंडेशनच्या डॉ. माकणीकर यांचा मनोदय !!

शासनाला गोरगरिबांचे कर्ज माफ करावेच लागणार - एस.एम फाउंडेशनच्या डॉ. माकणीकर यांचा मनोदय !!

मुंबई, दि (प्रतिनिधी) : कर्जापोटी राज्यातील बहुतांश लोक कर्जबाजारी झाले असून आत्महत्तेचा मार्ग अवलंबवतात या आत्महत्या थांबवायच्या असतील, राज्यातील मानुस जगवायचा असेल तर शासनाला सरसकट कर्ज माफी करावी लागेल असा मनोदय *एस.एम फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. राजन माकणीकर* यांनी व्यक्त केला.

कर्जबाजारी पणा मुळे राज्यातील बहुतांश संसार मोडकळीस आलेत तर असंख्य संसार संपले आहेत. अश्या अवस्थेत सरकार नको ते उपक्रम राबवत आहे. नको त्या उत्सवाला आर्थिक खतपाणी घालण्या पेक्षा बळीराज्यासह सरसकट महाराष्ट्र राज्य कर्जमुक्त करावं. शासनावर दबाव गट निर्माण करूण महाराष्ट्र कर्जमुक्त अभियान राबवत असून बहुसंख्येने अभियानात सामील व्हावे असे संस्थेच्या सचिव कुमारी संध्याताई शेळके यांनी सांगितले.

कर्ज मिळवल्या नंतर कुणाला परतावा करण्यास विलंब होत असेल. किंवा हप्ते थकले असतील तर कर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र बँका कर्ज वसुली साठी कर्जदाराचा मानसिक छळ करतात हें आर बी आय च्या मार्गदर्शक नियमावलीच्या विरोधात आहे. खाजगी स्वरूपात नेमलेले वसुली कंपन्याचे प्रतिनिधी गैरवर्तन करतात. यावेळी तात्काल संबंधित बँक व्यवस्थापक व RBI ला लिखित स्वरूपात तक्रार करावी किंवा संस्थेच्या प्रतिनिधीला कळविण्यात यावे असेही कु. संध्याताई शेळके यांनी आवाहन केले आहे.

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त निमगाव (म.) येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त निमगाव (म.) येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

सोलापूर, विकास जगताप (दैनिक बातमीदार) :

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त निमगाव मगर येथे माळशिरस तालुक्यातील थोर समाजसेवक राहुल दादा बोडरे, आनंद बोडरे, व निमगाव मगर क्रिकेट क्लब यांचेकडून संयुक्त पने भव्य अश्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले.

माळशिरस तालुक्यातील इतिहास बघता फक्त राजकीय लोकांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचा उद्देश समोर ठेऊन आजपर्यंत अनेक कार्यक्रम माळशिरस तालुक्यात घेतले पण आयोजक राहुल दादा बोडरे यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता सर्व धर्मतील युवकांना एकत्रीकरण करून खेळाच्या माध्यमातून सामाजिक खेळाच्या उपक्रमातुन एक एकात्मितेचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे, या उपक्रमात माळशिरस तालुक्यातील अनेक सर्व धर्मीय समाज बांधव उपस्थित होते,

या स्पर्धेच्या युगात दहिगाव हा संघ विजेता ठरला,  व या स्पर्धेत कलटन हा  संघ उपविजेता ठरला, या उपक्रमाला स्यानिक जनताकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला,

सदर क्रीडा स्पर्धा ही श्री.राहुल दादा बोडरे, आनंद बोडरे निमगाव मगर क्रिकेट क्लब यांचे माध्यमातून सदर क्रिकेटचे आयोजन करण्यात आले.

गोवेली ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच दहा वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार, कल्याण तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य पर्वणी !

गोवेली ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच दहा वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार, कल्याण तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य पर्वणी !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागासह परिसरातील लोकांसाठी वरदान ठरलेल्या गोवेली ग्रामीण रुग्णालयात विविध आजाराचे सुमारे १० तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून कल्याणच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांसाठी ही आरोग्य पर्वणी ठरणार असून याचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ माधवी पंदारे मँडम यांनी केले आहे.

केंद्र शासनामार्फत आयुष्यान भव कार्यक्रमाचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरुन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालू राहणार आहे. या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयात व उपजिल्हा व शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने आयुष्यमान मेळावा ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे आयोजित केला आहे.

याकरिता बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अस्थिभंग चिकित्सक, दंतशल्य चिकित्सक, त्वचा रोग तज्ञ, मनोविकार तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक आणि सर्जन असे १० विविध आजाराचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोतीबिंदू, उच्च रक्तदाब, मधुमेह, तपासणी व मार्गदर्शन तसेच तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, आदी ची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. याशिवाय कुपोषित बालके, गरोदर माता, स्तनदा माता व इतर स्त्रियांची तपासणी केली जाणार आहे. तसेच आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथीकच्या रुग्णांना तपासणी करून उपचारात्मक निदान केले जाणार आहे. यावेळी योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिके केली जातील, शिवाय सर्जन व्दारे तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. एवढे विविध आजाराचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी पहिल्यांदाच ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ माधवी पंदारे मँडम यांनी केले आहे.

दरम्यान कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण परिसरासाठी वरदान ठरत आहे. या रुग्णालयात मागील १ वर्षात बाह्यरुग्ण सुमारे ३१ हजार ५६५ तर आंतर रुग्ण १ हजार ७४६ इतके उपचारार्थ आले होते. ३२५ लहान मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असून ८२ प्रसुती, २ हजार ९९५ श्वान दंश, १९७ विंचू, १०८ सर्पदंशचे रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय २ हजार ८४३ मलेरिया, ९७ डेंग्यू, ५७० टायफाँइड रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. तसेच सुसज्ज प्रयोगशाळेच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ६३५ चाचण्या घेण्यात आल्या.

पुरुष, स्त्री आंतररुग्ण कक्ष, एक्सरे, इसीजी अशा विविध आरोग्य सोईसुविधा या रुग्णालयात मोफत उपलब्ध असल्याने गोरगरीब रूग्णांना मे रुग्णालय मोठा आधार वाटत आहे.अशा या रुग्णालयात ३० सप्टेंबर रोजी आयुष्यामान मेळावा आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असून याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार सुध्दा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकिय अधीक्षक डॉ माधवी पंदारे यांनी केले आहे.

Tuesday 26 September 2023

निवोशी नानेवाडी ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी !!

निवोशी नानेवाडी ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी !!

[ गुहागर/निवोशी : उदय दणदणे ]

गुहागर तालुक्यातील निवोशी नानेवाडी ग्रामस्थांनी सामाजिक बांधीलकी जोपासत बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ०८.वा. श्री गणेश कृपा समाज मंदिर (नानेवाडी) निवोशी येथे गावच्या भूमिपुत्रांसाठी ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन करत आपल्या कार्यकर्तृत्ववाने निवोशी गावचं बहुमान उंचावणारे तसेच विविध संस्थावर कार्यरत असणारे नुकतंच "अखिल भारतीय मानव विकास परिषद" व "आदर्श मुंबई महाराष्ट्र न्यूज 18" च्या वतीने आदर्श पत्रकार म्हणून "आदर्श भारतीय राजदूत अवॉर्ड" (इंडियन ॲम्बेसेडर) राज्यस्तरीय पुरस्कार-२०२३ प्राप्त केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार उदय दणदणे यांचा विशेष अभिनंदनपर सत्कार करण्यात आला तर गेली अनेक वर्ष ग्रामपंचायत स्तरावर विविध समितीवर तसेच सदस्य पदी कार्यरत असणारे व नुकतीच पालशेत- निवोशी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी विराजमान झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुन अवेरे यांचे विशेष अभिनंदनपर सत्कार करण्यात आला व ह्या दोन्ही भूमिपुत्रांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रोत्साहित करण्यात आले. निवोशी गावचे जेष्ठ समाजसेवक गणपत अवेरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नारायण मांडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऋणानुबंध सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सत्कार समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना गावकुशीत हा ऋणानुबंध सत्काराचा पहिला बहुमान नानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने होत असल्याचे आनंद व ऋण व्यक्त करत पत्रकार उदय दणदणे यांनी प्रथम समस्त नानेवाडीचे आभार मानले, तर गावातील जेष्ठ मंडळींचा आदर्श घेत निवोशी गाव विकासासाठी तरुणांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. 

त्याचबरोबर तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर दणदणेवाडी पासून नानेवाडी पर्यंत भेलेवाडी, गणेशवाडी, कातळवाडी तील ग्रामस्थांनी माझा आदरतीर्थ सन्मान केल्याबद्दल अर्जुन अवेरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवोशी गावचे सक्रिय कार्यकर्ते विजय अवेरे यांनी केले. तर संदेश अवेरे व किरण अवेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला सुरेश होरंबे, विजय अवेरे, यशवंत वनगे, अर्जुन धावडे, शांताराम मांडवकर, चंद्रकांत अवेरे, रमेश दणदणे, गणेश दणदणे, अनिल दणदणे तसेच नानेवाडीतील समस्त महिला वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंगवली परिसरातील घरगुती गणपतींचे भक्तीभावाने विसर्जन !

आंगवली परिसरातील घरगुती गणपतींचे भक्तीभावाने विसर्जन !

आंगवली, (शांत्ताराम गुडेकर) :

      गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध अश्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो. आंगवली (रेवाळे वाडी) येथील पाच दिवसांच्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यांत घरगुती लहानमोठ्या गणेश मूर्तींचा समावेश होता.रेवाळे, धनावडे, गुडेकर, आग्रे, चव्हाण, जाधव कुटूंबातील गणपती यामध्ये समाविष्ट होते.

        आता वर्षभरानंतरच गणेशोत्सवाचा जल्लोष अनुभवता येणार असल्याने हा देखणा नजारा डोळ्यात सामावून घेण्यासाठी गणपती विसर्जन ठिकाणी आणि अशा सर्वच प्रमुख गणपती विसर्जन ठिकाणी महिला -पुरुष, युवक -युवती, लहान मुले आणि अबालवृद्धांची गर्दी उसळली होती.

पत्रकारांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्रकारांतर्फे निषेध !

पत्रकारांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्रकारांतर्फे निषेध ! 

कल्याण (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना २०२४ पर्यत भाजपच्या विरोधात बातम्या येवू देऊ नका, यासाठी पत्रकारांना चहा पाजा, प्रसंगी धाब्यावर बसवून  समजावून सांगा, अशा शब्दात सल्ला दिला अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, यामध्ये पत्रकारांचा अपमान झाला असून यांचा निषेध करण्यासाठी आज कल्याण तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदार कल्याण मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले आहे व समस्त पत्रकारांची श्री बावनकुळे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे, 
याप्रसंगी पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, सचिन बुटाला, कुणाल म्हात्रे आदी पत्रकार उपस्थित होते.

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, निकोप लोकशाही साठी जो चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान दिला आहे, तो महत्त्वाचा आहे, त्यांचे स्वातंत्र्य व निर्भीडता महत्त्वाची आहे, असे असताना सध्या देशात, राज्यात पत्रकारांवर हल्ले वाढत आहेत, चँनेल वर बंदी घातली जात आहे, अशीच परिस्थिती राहिली तर देश हुकूमशाही कडे जायला वेळ लागणार नाही, नुकतेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये भाजपला २०२४ मध्ये सत्तेत यायचे असेल तर पक्षाच्या विरोधात एकही बातमी येवू देऊ नका, यासाठी पत्रकारांना शोधून त्यांना चहा प्यायला न्या, प्रसंगी धाब्यावर घेऊन जा, असा सल्ला दिला आहे, यामुळे निपक्ष, निर्भयपणे पत्रकारिता करताणा-या समस्त पत्रकारांचा हा अपमान आहे, म्हणजे पत्रकार चिरीमिरी देऊन त्यांना मँनेज करा असा सरळ अर्थ निघतो, व हे निषेधार्थ आहे. म्हणून कल्याण तालुक्यातील पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, सचिन बुटाला, कुणाल म्हात्रे, अभिजित देशमुख आदी पत्रकारांनी एकत्र येऊन 'राज्यपाल' महाराष्ट्र राज्य, यांना कल्याण तहसीलदार मार्फत निवेदन दिले, यामध्ये प्रदेश अध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करुन त्यांनी पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार श्रीमती कौशल्य राणे पाटील यांनी आपल्या भावना शासनापर्यत पोहचवतो असे सांगितले.

Monday 25 September 2023

बावनकुळेंच्या विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल "पत्रकारांना चहा पाजा ; ढाब्यावर न्या" !!

बावनकुळेंच्या विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल "पत्रकारांना चहा पाजा ; ढाब्यावर न्या" !!

*विरोधकांनी उठवली टीकेची झोड*


मुंबई, प्रतिनिधी : अहमदनगर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब सल्ला दिला. याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, धाब्यावर घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असे विधान केले आहे. बावनकुळे यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

आमदार खरेदीचा दांडगा अनुभव असलेले खोके सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत. भाजपविरोधात बातम्या छापू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजण्याचा सल्ला देणाऱ्या बावनकुळेंना पत्रकार मूर्ख वाटतात का? असे ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले.

तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की… पण जनता 2024 मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.


संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित धायरी येथे रक्तदान शिबिरामध्ये १६१ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान !!

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित धायरी येथे रक्तदान शिबिरामध्ये १६१ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान !!

रक्तदान हि मानवतेची सर्वोच्च सेवा : १६१ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान...

धायरी ब्रांच २४ सप्टेंबर २०२३ :  

            सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच धायरी येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २४ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये १६१ निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, संत निरंकारी रक्तपेढी व ससून रुग्णालय रक्तपेढी पुणे यांनी १६१ युनिट रक्त संकलन केले.
            या शिबिराचे उदघाटन आदरणीय श्री ताराचंद करमचंदानी जी झोनल प्रमुख पुणे झोन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला मा. आमदार भीमराव आण्णा तापकीर तसेच अतुल चाकणकर सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.
            संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७४७३ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,३२,४९७ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
            संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता  यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
            गेल्या १५ दिवसांपासून मिशनचे सेवादार यांनी धायरी परिसरामध्ये नुक्कड नाटिका द्वारे व प्रत्यक्ष भेटून रक्तदानाची जनजागृती करण्यात आली, रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार धायरी ब्रांच प्रमुख श्याम भागवत सेवादल संचालक पांडुरंग दळवी यांनी केले.

शहाड येथील सेंच्युरी रेआँन कंपनीमधील स्फोटाची भयानकता हळूहळू समोर, मन सुन्न करणारे दृश्य ?

शहाड येथील सेंच्युरी रेआँन कंपनीमधील स्फोटाची भयानकता हळूहळू समोर, मन सुन्न करणारे दृश्य ?

कल्याण, (संजय कांबळे) : २३सप्टेंबर सकाळी साडेदहा ते  पावनेअकरा च्या सुमारास  मुरबाड मार्गावर असलेल्या बिर्लागेट शहाड येथील प्रसिद्ध बिर्ला उद्योग समूहाच्या सेंच्युरी रेआँन कंपनीच्या सी एस टू डिपार्टमेंट मध्ये शक्तीशाली स्फोट झाला होता, याची भयानकता हळूहळू समोर येवू लागली असून या दृश्याने मन सुन्न होऊन जाते. यामुळे कामगारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शनिवारी सकाळी सेंच्युरी रेआँन कंपनीत नायट्रोजन टँकरमध्ये भरताना जबरदस्त स्फोट झाला होता, यामध्ये शैलेश यादव व राकेश श्रीवास्तव याचा जागीच मृत्यू झाला होता, तर पवन यादव व अनता डिंगोरे हे गायब होते. तर सागर झाल्टे, पंडित मोरे, प्रकाश निकम, हंसराज सरोज, आणि मोहम्मद अरमान हे जखमी झाले होते. स्फोट इतका भंयकर होता की, शेजारच्या शहाड, तानाजी नगर, बिर्लागेट, धोबीघाट आदी परिसरात जबर  हाजरा बसला होता.त्यामुळे बेपत्ता कामगारांच्या शरीराचे तुकडे उडाले अशी चर्चा दबक्या आवाजात कामगारांमध्ये होती, मात्र कंपनी प्रशासन काही ही माहिती देत नव्हते, परंतु गायब दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या४झाली आहे. तर एका कामगारचा मृतदेह हा तिसऱ्या मजल्यावर उडाल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली. शिवाय पक्षामुळे हे लक्षात आले अशी कुजबुज ही ऐकायला मिळत होती. हा फोटो सोशलमिडियावर व्हायरल झाल्याने मृतदेहाची काय अवस्था झाली आहे हे लक्षात येते. 

कामगारांच्या नातेवाईकांच्या दु:खाला तर पारावार उरला नाही. परंतु काही दिवसापूर्वी या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगारांचे जीव गेले आहेत, त्यामुळे काही प्रमाणात कंपनी व्यवस्थापन वादात अडकले होते, सुमारे ५/६ हजार कामगार असलेल्या या  कंपनीत अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत, कंपनीवर अनेक आरोप करण्यात आले होते.

या स्फोटाची माहिती मिळताच उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांनी कंपनीच्या रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची माहिती घेतली.यानंतर खासदार आले. पाहणी केली, घोषणा केल्या व कार्यकर्ते यांच्या गणेशोत्सवास भेटी दिल्या, त्यामुळे हे राजकारणी नक्की कशासाठी आले होते?, असे कामगारां मधून संताप ऐकायला मिळत होता. दरम्यान कंपनीमध्ये आतापर्यंत अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून त्यांचे काय झाले? 

____याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे*

ऑल जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन के द्वारा मेरठ मे प्रतिभा सम्मान समारोह का आयोजन !!

ऑल जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन के द्वारा मेरठ मे  प्रतिभा सम्मान समारोह का आयोजन !!

डोंबिवली, प्रतिनिधी : जनपद मेरठ मे ऑल जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन के द्वारा मेरठ संस्कृति रिजॉर्ट में रविवार को प्रतिभा सम्मान समारोह का आयोजन किया गया ऑल जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन के तत्वधान में प्रतिभा सम्मान समारोह का आयोजन कर मेधावी छात्र छात्राओं ब मंडल जिला स्तर पर खेलो में अपने विद्यालय का नाम रोशन करने वाले छात्र छात्राओं को प्रशस्ति पत्र ब प्रतीक चिन्ह देकर सम्मानित किया गया.

इस दौरान जनपद के विभिन्न विद्यालयों के सैकड़ों छात्र छात्रा मौजूद रहे, इस कार्य क्रम में मोनाड विश्वविद्यायल पिलखुआ का महत्व पूर्ण योगदान रहा इस अवसर पर क्षेत्र के गणमान्य व्यक्ति मौजूद रहे कार्य क्रम के मुख्य अतिथि आचार्य पंडित रमेश त्रिपाठी गोरखनाथ मंदिर गोरखपुर रहे अध्यक्षता ऑल जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन के प्रदेश महासचिव सतीश पवार ने की इस अवसर पर मोनाड़ यूनिवर्सिटी के उप कुलपति डॉक्टर एन के  सिंह ने छात्र छात्राओं को संबोधित करते हुए कहा की शिक्षा बिना हमारा जीवन अधूरा है हर छात्र छात्राओं को अपने जीवन में लक्ष्य बनाकर मंजिल तक पहुंचने मे शिक्षा का बहुत बड़ा योगदान है संगठन के राष्ट्रीय महासचिव शशांक शर्मा के द्वारा आयोजित किए गए कार्य क्रम की जनपद के लोगो ने जमकर सरहना की इस अवसर पर महात्मा पंडित हजारी लाल विद्यालय की छात्राओं द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किए गए इस दौरान इंटर कॉलेज कल्याणपुर ,इंटर कालेज कैथवाड़ी, इंटर कॉलेज रासना, इंटर कॉलेज, कलजरी, एस डी इंटर कॉलेज सदर, एस डी गर्ल्स कॉलेज सदर, गुरु तेग बहादुर इंटर कॉलेज सदर, डी एन इंटर कॉलेज मेरठ एम पी एस पब्लिक स्कूल गर्ल्स सदर , फैज ए आम इंटर कॉलेज मेरठ के छात्र छात्राये मौजूद रहे.

कार्यक्रम का संचालन प्रवक्ता अतुल त्यागी ने किया, इस दौरान अमित सिंघल ,शिखा चौहान, नम्रता शर्मा, मोनू प्रमुख बड़ौत, प्रशांत शर्मा, वरिष्ठ पत्रकार राजेश गुप्ता लखनऊ, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, मुनेंद्र शर्मा ,नरेश त्यागी एडवोकेट, परमीत सिंह, नितिन सिंघल, भूपेंद्र चौधरी, दीपक कौशिक, सहित सैकड़ों लोग मौजूद रहे.

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने भिवंडी शहरात बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या ३ आरोपींना केली अटक !!

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने भिवंडी शहरात बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या ३ आरोपींना केली अटक !!
भिवंडी, दिं,२४,अरुण पाटील(कोपर)
         महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या ३ आरोपींना अटक केलीय. हे आरोपी बांगलादेशातील नागरिकांना शिधा पत्रिका  (रेशनकार्ड) बनवून देत असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र एटीएसनं भिवंडी शहरातील निजामपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली आहे.
          इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील अधिक तपास निजामपूर  पोलीस करत आहेत. देशातील प्रत्येक राज्यात व शहरात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत असून त्याला आपले स्थानिक दलाल जबाबदार असून हेच त्यांना लागणारी कागदपत्रे काही पैसे घेऊन तयार करून देत असतात ,
           नंतर हेच नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करुन ते सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. अशाच अवैध पद्धतीने राहणाऱ्या लोकांना बनावट शिधापत्रिका बनवून देत असल्याची माहिती एटीएस च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या नंतर महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटने सापळा रचून ३ जणांना ताब्यात घेतले. अटकेत असलेल्यांपैकी नौशाद हा रेशन दुकान चालवतो. तर इतर दोन आरोपी बनावट कागदपत्रे बनवण्याचा धंदा करत होते.
     हे तिघे आरोपी बांगलादेशी नागरिकांना भारतीय कागदपत्रे बनवून देत होते.बनावट शिधा पत्रिका (रेशन कार्ड) बनवण्यासाठी ते ८ हजार घेत असल्याचे समोर आले आहे. आजही भिवंडी शिधावाटप कार्यालयाच्या आवारात बनावट शिधा पत्रिका बनवून देणाऱ्या दलालांची रेलचेल आहे. मात्र तेथील अधिकारी, कर्मचारी त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे शिव आरोग्य सेनाचे मुंबईसह अन्य विभागात पदाधिकारींच्या नियुक्त्या जाहीर !!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे शिव आरोग्य सेनाचे मुंबईसह अन्य विभागात पदाधिकारींच्या नियुक्त्या जाहीर !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नेते, मा.उद्योगमंत्री श्री.सुभाष  देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपनेते श्री.रवींद्र मिर्लेकर उपनेते अणि अंगीकृत संघटना समन्वयक श्री.भाऊ कोरगावकर शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर  ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन दादर येथे महाराष्ट्र राज्यभरातील विविध विभागातील, जिल्हा तसेच संपर्क पदाधिकारी यांच्या पदभार देण्याच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना  शिवसेना नेते श्री.सुभाष देसाई  म्हणाले सन्मा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अरंभलेल्या आरोग्य यज्ञाची व्याप्ती शिव आरोग्य सेनेने महाराष्ट्रातील गरजू रुग्ण तसेच तळागाळाच्या लोकांपर्यंत न्यावी त्यानंतर शिव आरोग्य सेना मुंबई विभाग मुंबई उपाध्यक्ष फार्मसिस्ट श्री.सेलएड्रियन डेव्हिड, घाटकोपर (पश्चिम) विधानसभा सह समन्वयक पदी श्री.जयेश पवार, घाटकोपर (पूर्व) विधानसभा समन्वयक पदी श्री.दिपक गोपाळे, विधानसभा समन्वय सचिव पदी श्री.कैलास गेसावी, मानखुर्द - शिवाजी नगर विधानसभा समन्वयक पदी डॉ. श्री.आनंद बाबर, विधानसभा समन्वय सचिव पदी श्री. रितेश पाचारकर, अंधेरी पश्चिम विधानसभा आरोग्य संघटक पदी श्रीमती स्वाती सुनिल (बबन) तावडे, प्रभाग समन्वय सचिव क्रमांक : १२७ पदी अनिता भागोजी उतेकर, विलास चांदवली विधा. प्रभाग समन्वयक क्र.163 पदी श्री.वसंत भणगे यांची तर ठाणे जिल्हा आरोग्य संघटक पदी श्री.प्रशांत विठ्ठल भुइंबर आणि कोल्हापूर जिल्हा समन्वयक पदी श्री.पुरुषोत्तम माधव हसमणीस व पुणे जिल्हा संपर्क समन्वयक पदी श्री.बाळकृष्ण आशातुकाराम वांजळे, पुणे जिल्हा समन्वयक (जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर,) पदी श्री. सुखदेव ज्ञानू नरळे, पिंपरी चिंचवड शहर समन्वयक पदी श्री. दिलीप ज्ञानदेव सावंत, पिंपरी चिंचवड शहर समन्वय सचिव पदी सौ. मंजुषा दत्तात्रय लोहटे, भोसरी विधा. समन्वयक पदी श्री. बाळासाहेब श्रीमंत वाघ,भोसरी विधा.आरोग्य संघटक पदी श्री.लिंबाजी मधुकर जाधव, भोसरी विधा.समन्वय सहसंघटक पदी श्री.राहुल लक्ष्मण चौधरी, रुपीनगर, तळवडे विभाग भोसरी आरोग्य संघटक पदी श्री.संतोष नारायण वरे, चिंचवड विधा. समन्वयक पदी श्री.अनिल रमेश कोळी, चिंचवड विधा. आरोग्य संघटक पदी श्री.पांडुरंग गंगाधर फाटकर, चिंचवड विधा. आरोग्य सहसंघटक पदी श्री.दीपक शिवाजी पाटील आणि अहमदनगर जिल्हा समन्वयक पदी श्री. महेश गागरे, अहमदनगर दक्षिण जिल्हा समन्वयक पदी इम्तियाज सिकंदर शेख, अहमदनगर तालुका समन्वयक पदी श्री.युनचस टेंगे, अहमदनगर शहर समन्वयक पदी श्री.अर्जुन मुटगुळे, नेवासा तालुका समन्वयक पदी श्री.रामदेव बाबुराव घोडेचोर, शिर्डी लोकसभा समन्वयक अजीज याकूब मोमीन यांची तर चंद्रपूर जिल्हा समन्वयक (राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर विधनसभा) पदी नरसय्या अंकुश मादर आणि सांगली जिल्हा समन्वयक (शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, जत, सांगली शहर) पदी श्री. दिलीप शेखर, सांगली जिल्हा समन्वयक (खानापूर, आटपाडी, मिरज कवठेमहंकाल, तासगाव) पदी श्री.अभिजीत गद्रे, मिरज तालुका समन्वयक पदी श्री. किशोर सासने, शिराळा तालुका समन्वयक पदी श्री.अनिल साठे ,पलूस तालुका समन्वयक पदी श्री. अस्लम नदाप, कडेगाव तालुका समन्वयक पदी श्री. अशोक सूर्यवंशी, जत तालुका समन्वयक पदी श्री. विनम्र गुरव, वाळवा तालुका समन्वयक पदी श्री. पवन मस्के व नाशिक जिल्हा अध्यक्ष  डॉक्टर सेल डॉ. विलास एकनाथ देशमुख (एमबीबीएस) या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन नेमणूका जाहीर करण्यात आल्या त्याप्रसंगी मराठवाडा समन्वयक श्री.राजूभैया जयस्वाल, जालना संपर्क समन्वयक श्री. मकरंद राजहंस, पुणे जिल्हा समन्वयक श्री.रमेश क्षीरसागर, नवी मुंबई विभागीय समन्वयक श्री.प्रवीण वाघराळकर, मा. नगरसेविका सौ. जोत्सना दिघे, मुंबई उपनगर समन्वय सचिव श्री.शिवाजी झोरे, अलिबाग तालुका आरोग्य संघटक श्री. साक्षत म्हात्रे, अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक श्री.महेश केणी, आरोग्य सैनिक श्री.लीतेश केरकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Saturday 23 September 2023

नवी मुंबई पोलीस दलात अफवांचा बाजार !

नवी मुंबई पोलीस दलात अफवांचा बाजार !

          राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेल्या नवी मुंबई पोलीस दलात  सध्या अफवांचा बाजार भरला आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यापासून ते परिमंडळ-१चे उपायुक्तांच्या पर्यंत अफवांचे काहूर माजले आहे. या वावड्याचे जनक खात्यातीलच काही वसुली बहाद्दर असून आपल्या हवे ते 'नॅरेटिव्ह' सेट करण्यासाठीं उलट सुलट बातम्या पसरविल्या जात आहेत. 
आयुक्त भारंबे यांनी साईडला बदली मागितली आहे, ते दिर्घ रजेवर जाणार, 'झोन - वन' चे एक्स्टेनशन निश्चित झाले आहे,ते तेथुन हलणार नाहीत, अशा  पध्दतशीर वावड्या उठविल्या जात आहेत. गेल्या ८,९महिन्यांपासून अवैध धंद्याना बऱ्यापैकी लगाम बसल्याने ज्यांची  दुकाने बंद झाली आहेत.त्यांच्याकडून या कांड्या पिकविल्या जात आहेत.
गेल्या  जानेवारीपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय  हे राज्यात वाईट अर्थाने चर्चिले  जाणारे पोलीस घटकाच्या यादीत अग्रस्थानावर  होते. अवैध धंदे ,बेकायदेशीर कामे आणि हप्ता वसुलीने महानगरात बजबजपुरी माजली होती. मात्र  नेतृत्व बदल झाल्यानंतर खात्यातील स्वच्छता मोहीमेने ‘टॉप गियर’ घेतला .अधिकाऱ्यात फारशी अकार्यक्षमता नसलीतरी त्यांचे मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांना  सुव्यवस्थित व सुरक्षितेतीची हमी देण्यापेक्षा केवळ वसुलीला प्राधान्य दिले जात होते. आपल्याकडे येणारा तक्रारदार, गैरतक्रारदार हे जणू सावज असल्याचा समज अति वरिष्ठ आणि प्रभारी अधिकाऱ्यानी करून घेतलेला होता. त्यांच्याकडून केवळ ‘अर्थ’कारणावर भर दिला जात असल्याने  एखाद्या हक्काच्या कामासाठी पोलीस मुख्यालयात पाऊल ठेवायचे तर खोके आणि पेट्यांची  तयारी करुनच जावे लागत होते. बेबंदशाही आणि अवैध धंद्यायचा सुळसुळाट सुरू झाल्याने अन्यायग्रस्त नागरिकांची  अवस्था  बिकट झालेली होती. त्यामुळे त्यांच्यातून कोणत्याही क्षणी  मोठा उद्रेक  होईल, अशी परिस्थिती निमार्ण झाली असताना डिसेंबरच्या मध्यावर मिलिंद भारंबे यांची आयुक्तपदावर  नियुक्ती  झाली. त्यांनी चार्ज  घेतलेल्या दिवसापासून आयुक्तालयातील कामाच्या  पद्धतीमध्ये  बदल दिसून येवू  लागला. शहरात अनाधिकृत ,खात्याला कलंक लावणारे काम व बेशिस्त खपवून घेतली जाणार नसल्याचा  सज्जड दम भारंबे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना पहिल्याच बैठकीत भरला होता.त्यामुळे  मध्यरात्री साडेतीन,४ वाजेपर्यत राजरोसपणे सुरु असणारे बीयर बार, परमिटरुमवाल्यांना वेळेचे निर्बंध लक्षात येवू लागले. पोलीस ठाण्यात  तक्रार देण्यासाठी येणाऱ्या अभ्यगंताना  त्यांच्या  आथिर्क सुबलतेवरून  नव्हे तर गुन्ह्याच्या   गांभिर्यांवरुन महत्व देण्यात येवू लागले.कोणतेही काम नियमात व वेळेच्या बंधनात  पूर्ण करण्याच्या  सूचना असल्याने  प्रलंबित तपास कामे व प्रकरणाच्या फाईली वेळेत पुढे सरकू लागल्या. नऊ प्रभारी अधिकाऱ्यांसह २४ पोलीस निरीक्षकांच्या  आयुक्तालयातर्गंत तडकाफडकी बदल्या केल्या.
गेल्या ९ महिन्यात आयुक्तालयातील बेकायदेशीर धंदे, नियमबाह्य बार, परमिटरुमला बऱ्यापैकी लगाम बसलेली आहे. तरीही 'गांधी'बाबाचा मोह कोणालाही सहजासहजी आवरता येत नाही. त्यामुळे  दोन नंबरवाल्यांनी आयुक्त वगळता अन्य  अधिकाऱ्यांवर  त्याची 'कृपा' कायम ठेवली असल्याने  अवैध धंदे काही प्रमाणात कायम आहेत. त्यांना ते पूर्वीप्रमाणे जोमाने सुरू करावयाचे असल्याने त्यामध्ये मुख्य अडसर असलेल्या भारंबे यांच्याबद्दलच उलटसुलट वावड्या उठविल्या जात आहेत. कौटुंबिक कारणास्तव आयुक्तांनी बदलीसाठी अर्ज केला आहे गणेशोत्सव नंतर ते दीर्घ रजेच्या सुट्टीवर जाणार आहेत त्यांचा पदभार  'एसीबी'तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपविला जाईल, त्यानंतर सर्व व्यवहार पुर्वीप्रमाणेच  सुरू होईल, अशा  अनेक अफवांचे पेव फुटले आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या 'मपोसे' उपायुक्त,अप्पर अधीक्षक दर्जाच्या  अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झोन -१च्या उपायुक्ताचा समावेश नाही.  ठाण्यातील राज्यकर्ते 'पिता-पुत्रां' वरदहस्त असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार आहे ,अशी चर्चा आहे चालवली जात आहे जेणेकरून त्यांच्या हद्दीत होत असलेले  वसुलीचे 'रेट कार्ड' वाढविले जाईल. वास्तविक आयुक्त भारंबे हे अत्यंत कर्तव्यदक्ष असल्याने ते आपल्यावर सोपविलेली जबाबदारी मोठ्या विश्वासाने  योग्य पद्धतीने पार पाडतात. त्यामुळे सद्या त्रिशंकू सरकार , सेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सूरू असलेल्या सुनावणीमुळे काहीशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना ते नवी मुंबईतील  कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाहीत, तसेच या परिस्थितीत  त्यांना बदलण्याचा धोका  गृहखात्याचा कारभार सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत घेणार नाहीत . त्याचबरोबर "ठाणेकरां'चा कितीही दबाव असलातरी या आधिकाऱ्याना मुदतवाढ दिली जाणार नाही, असे गृह विभागातील  अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पट करण्यात आले.
------------------------
      आयुक्तांच्या गैरहजेरीत त्यांच्या नावे मोठी वसुली

 पोलीस आयुक्त मिलिंद भारबे हे  हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेले होते. तेंव्हा साहेबांकडून नवी मुंबईत ऑनलाईन  लॉटरी सुरू करून देतो ,असे आश्वासन देऊन एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने  एक कोटी घेतले,मात्र अद्यापही त्यासाठी हिरवा कंदील न मिळाल्याने दिलेली रक्कम परत घेण्यासाठी संबंधित व्यक्ती अधिकाऱ्याच्या कार्यालयात येरझाऱ्या घालत  आसताना  त्याला टाळले जात आहे  आयुक्तांनी याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी ,अशी मागणी होत आहे. 
-जमीर काझी ,
बेलापूर, नवी मुंबई,  
दि.२२ सप्टेंबर २०२३

शहाड येथील सेंच्युरी रेआँन कंपनीमध्ये स्फोट दोन कामगारांचा मृत्यू तर पाचच्यावर जखमी, परिसरात हादरा !!

शहाड येथील सेंच्युरी रेआँन कंपनीमध्ये स्फोट दोन कामगारांचा मृत्यू तर पाचच्यावर जखमी, परिसरात हादरा !!
 
कल्याण, (संजय कांबळे) : आज सकाळी कल्याण मुरबाड मार्गावर असलेल्या बिर्लागेट शहाड येथील प्रसिद्ध बिर्ला उद्योग समूहाच्या सेंच्युरी रेआँन कंपनीच्या सी एस टू डिपार्टमेंट मध्ये शक्तीशाली स्फोट झाला,या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झाले  झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे, हा स्फोट इतका जबरदस्त होता की परिसरात मोठा हादरा बसला, त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, 

कल्याण मुरबाड महामार्गावर बिर्लागेट शहाड येथे प्रसिद्ध बिर्ला उद्योग समूहाने सेंच्युरी रेआँन कंपनी सुरू केली आहे,गेल्या कित्येक वर्षांपासून ही  ही कंपनी व्यवस्थित सुरू आहे, परंतु काही दिवसापूर्वी या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगारांचे जीव गेले आहेत, त्यामुळे काही प्रमाणात कंपनी व्यवस्थापन वादात अडकले होते, सुमारे ५/६ हजार कामगार असलेल्या या  कंपनीत अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत, कंपनीवर अनेक आरोप करण्यात आले होते.

आज सर्वत्र गौरी गणपती विसर्जनाची तयारी सुरू असतानाच सकाळी अकराच्या सुमारास कंपनीच्या सी एस टू डिपार्टमेंट  नायट्रोजन चे सिफ्टिं सुरू असताना शक्तीशाली स्फोट झाला, हा इतका भयंकर होता की, याचा हादरा बिर्लागेट, तानाजी नगर, धोबीघाट, म्हारळ, शहाड या परिसरात बसला, यामध्ये २ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ५ च्या वर कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे, कंपनी गेट जवळील रिक्षा व इतर वाहने हटवण्यात आली आहेत व परिसर मोकळा करण्यात आला आहे या स्फोटाची माहिती मिळताच उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांनी कंपनीच्या रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची माहिती घेतली. दरम्यान कंपनीमध्ये आतापर्यंत अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून व्यवस्थापनावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. सदरचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कंपनी कडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कंपनी व्यवस्थापनकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने सविस्तर माहिती कळू शकली नाही. याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

सेंच्युरी रेआँन कंपनीच्या सीएसटू डिपार्टमेंट मध्ये स्फोट, परिसर हादरला, अनेक कामगार जखमी झाल्याची भिती !

सेंच्युरी रेआँन कंपनीच्या सीएसटू डिपार्टमेंट मध्ये स्फोट, परिसर हादरला, अनेक कामगार जखमी झाल्याची भिती ! 

*टॅंकरमध्ये केमिकल भरतांना स्फोट पाच कामगाराचा मृत्यू सात जखमी, मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती*

कल्याण, (संजय कांबळे) ::आज सकाळी कल्याण मुरबाड मार्गावर असलेल्या बिर्लागेट येथील प्रसिद्ध बिर्ला उद्योग समूहाच्या सेंच्युरी रेआँन कंपनीच्या सी एस टू डिपार्टमेंट मध्ये शक्तीशाली स्फोट झाला, या स्फोटात अनेक कामगार जखमी झाले असून काही मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे, हा स्फोट इतका जबरदस्त होता की परिसरात मोठा हादरा बसला, एवढी भीषणता होती त्या स्फोटात की काही कामगारांच्या शरीराचे तूकडे इकडे तिकडे उडाले होते त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण मुरबाड महामार्गावर बिर्लागेट शहाड येथे प्रसिद्ध बिर्ला उद्योग समूहाने सेंच्युरी रेआँन कंपनी सुरू केली आहे,गेल्या कित्येक वर्षांपासून ही  ही कंपनी व्यवस्थित सुरू आहे, परंतु काही दिवसापूर्वी या कंपनीत मोठ्या प्रमाणावर कामगारांचे जीव गेले आहेत, त्यामुळे काही प्रमाणात कंपनी व्यवस्थापन वादात अडकले होते, सुमारे ५/६ हजार कामगार असलेल्या या  कंपनीत अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत, कंपनीवर अनेक आरोप करण्यात आले होते.

आज सर्वत्र गौरी गणपती विसर्जनाची तयारी सुरू असतानाच सकाळी अकराच्या सुमारास कंपनीच्या सी एस टू डिपार्टमेंट मध्ये शक्तीशाली स्फोट झाला, हा इतका भयंकर होता की, याचा हादरा बिर्लागेट, तानाजी नगर, धोबीघाट, म्हारळ, शहाड या परिसरात बसला, यामध्ये अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत असून काहीचा मृत्यू झाला असल्याचे समजते, कंपनी गेट जवळील रिक्षा व इतर वाहने हटवण्यात आली आहेत व परिसर मोकळा करण्यात आला आहे, कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने अधिक माहिती कळू शकली नाही.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...