Monday 29 October 2018

जव्हार येथे शिवसेनेने राष्ट्रवादीचा, घड्याळे जाळून केला निषेध

शिवशेना कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीचा घड्याळे जाळुन केला निषेध

दैनिक सामनाचा पेपर जाळणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेद करण्यात आला.

जव्हार - ( प्रतिनिधी - जितेंद्र मोरघा)
           जव्हार तालुक्यात शिवशेना कार्यकर्त्यांनी एकत्र  येवुन गांधी चौकात  बंद पडलेली घड्याळे जाळुन राष्ट्रवादीचा जाहीर निषेध केला.  आणि पोलिस स्टेशनला निवेदन दिले. शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देवुन परिसर दणाणून सोडला.                  यावेळी उप जिल्हा प्रमुख प्रफुल पवार, शिवसेना तालूका प्रमुख श्रावण खरपडे, अर्बन बँकेचे चेअरमेन चिञांगण घोलप, शिवशेना शहर प्रमुख परेश पटेल, नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, हितेंद्र चोथे, चंबळे मॅडम, तसेच महीला आघाडीच्या कार्यकर्त्या व असंख्ख शिवशैनिक उपस्थित होते.

Sunday 28 October 2018

टिटवाळा येथे आज नवीन मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती शिबीर

टिटवाळा येथे नवीन मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती शिबीर

भारतीय जनता पार्टी व राज्य निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल )
            संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत भारतीय जनता पार्टी व राज्य निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने, आज २८ ऑक्टोबर २०१८ रविवार रोजी मांडा- टिटवाळा येथे नवीन मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
           मांडा-टिटवाळा परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येत अाहे कि,भारतीय जनता पक्ष अाणि राज्य निवडणुक अायोग यांच्या संयुक्त विद्यमाने १३८,कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामधील मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी एकदिवसीय मतदान नोंदणी शिबिराचे अायोजन करण्यात अाले अाहे.
           नविन मतदार नोंदणी, दुरुस्ती तथा अापली नावे जर इतर ठिकाणावरुन या ठिकाणी घ्यावयाची असतील अशी सर्व नोंदणी केली जाणार अाहे.
याप्रसंगी राज्य निवडणुक अायोगाचे अधिकारी व त्यांची टीम उपस्थित अाहे. अापल्याला कुठेही धावपळ करण्याची गरज भासणार नाही. तसेच अापल्या कागदपत्राची तपासणी करुन अापले नांव नोंदविण्याची प्रक्रिया तात्काळ होणार अाहे. तसेच नागरिकांच्या सोईसाठी अाॅनलाईन नोंदणीची सुध्दा व्यवस्था करण्यात अाली अाहे.
        तरी नवीन मतदार नोंदणी करावी अाणि या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक, कंडोमनपाच्या उपमहापौर सौ. उपेक्षाताई शक्तिवान भोईर यांनी केले आहे.
        अावश्यक कागदपत्रे -
        रहिवासी:— लाईट/टेलीफोन बील, बँक पासबुक, टॅक्स पावती, अाधार कार्ड किंवा पासपोर्ट (यापैकी कोणतेही एक-झेराॅक्स प्रत)
        वयाचा पुरावा:— पॅन कार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी कोणतेही एक-झेराॅक्स प्रत),
२फोटो(पासपोर्ट साईज).
       हे शिबीर आज रविवार दि.२८/१०/२०१८,
स.९ ते सायं.५ वा.पर्यंत ,तळ मजला, ममता १३५१ ,ममता बुक डेपो समोर, विद्या मंदिर शाळेच्या बाजुला, माताजी मंदिर रोड, मांडा-टिटवाळा(पु.) येथे आहे.  
  
          

Sunday 14 October 2018

उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या, प्रभाग ९ मध्ये पसरला प्रकाशाचा विकास

उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रभाग ९ मध्ये पसरला प्रकाशाचा विकास

पाच सोसायट्यांच्या मार्गावर बसविले पथदिवे

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
               कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपमहापौर उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरातील प्रभाग क्र.९ येथे अमृत सिद्धी सोसायटी, सुमुख सोसायटी, एकदंत सोसायटी, राहील अपार्टमेंट, सिद्धी विनायक टॉवर या सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले. त्या कामाचा लोकार्पण सोहळा हा उपमहापौर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
              टिटवाळा रेल्वे स्टेशन जवळील या उपरोक्त सोसायट्यांच्या रस्त्यांवर पथदिवे नव्हते. रात्री-अपरात्री या रस्त्याने येथील रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत होता. त्याची तक्रार रहिवाशांनी व महिलांनी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कडे केली होती. त्याबाबत उपमहापौरांनी विशेष लक्ष देऊन येथे १७ पथदिव्यांची व्यवस्था केली. त्याबरोबरच रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ताही बनविला. त्यांच्या प्रयत्नाने पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा येथे संपन्न झाला.
           सध्या कंडोमनपाची आर्थिक स्थिती हलाकीची असल्यामुळे आम्हा सर्व नगरसेवकांना आप-आपल्या प्रभागातील विकास कामे करण्यात अडथळा व विलंब होतो, तरी सुद्धा मी सतत प्रयत्न व पाठपुरावा करीत राहिल्याने माझ्या प्रभागात पथदिवे व रस्त्याच्या डांबरीकरणाचे विकास काम केले, असे उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी या प्रसंगी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले.
              या प्रसंगी मोहने-टिटवाळा मंडळ सरचिटणीस शक्तिवान भोईर, वसंत केणे सर, सुरेश खांबोरकर ,विवेक पुराणिक सर ,जहांगीरदार काका, अमोल केदार, स्वप्ना दीक्षित, यामिनी चव्हाण, यशोदा पाटील,  अमृत सिद्धी सोसायटीतील सर्व पदाधिकारी व रहिवाशी येथे उपस्थित होते.

             
             

Saturday 13 October 2018

दीपेश सतीश तिवारी ठाणे जिल्हा काँग्रेस चे नवनियुक्त सचिव


टिटवाळयाचे दीपेश सतीश तिवारी यांची ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल )
             राज्यात सर्वच पक्षांमध्ये पदाधिकारी, कार्यकारिणी बदल करण्याचे पडघम वाजू लागले आहेत. नवीन चेहरे, तरुण-तरुणी यांनाही पदाधिकारी म्हणून नवीन कार्यकारिणीत संधी देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीने नवीन युवा-तरुण चेहऱ्याला पदाधिकारी म्हणून संधी दिली आहे.
              टिटवाळयाचे युवा-तरुण-कार्यक्षम असे उमदे व्यक्तिमत्त्व असलेले दीपेश सतीश तिवारी यांची ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाने व ठाणे जिल्हा प्रभारी सुभाष कानडे यांच्या सुचनेने, माजी खासदार सुरेश टावरे यांनी दीपेश तिवारी यांची नियुक्ति केली.
              दीपेश तिवारी हे टिटवाळा येथील के एन टी पब्लिक स्कूल चे ट्रस्टी आहेत., ग्रेटर व्हॅली इंटरनेशनल स्कूल चे प्रबंधक व केंट किड्स प्री स्कूल चे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्याने दांडगा जनसंपर्क, संघटन व नम्र स्वभाव हे गुण हेरून वरीष्टांनी त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली.
       उमदे युवा व्यक्तिमत्व असल्याने जिल्ह्यातील भरपूर तरुण-युवा वर्ग सोबत घेऊन राजीव गांधी यांचे हात बळकट करेल असे यावेळी दीपेश तिवारी यांनी सांगितले.
          या प्रसंगी ग्रेटर व्हॅली स्कूल चे ट्रस्टी एडव्होकेट ऋषभ रमेश तिवारी, के एन टी स्कूल चे ट्रस्ट उपाध्यक्ष आदर्श उपाध्याय उपस्थित होते. टिटवाळयात सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मोरेश्वर-आण्णा तरे यांच्या प्रयत्ननांना यश

मोरेश्वर-आण्णा तरे यांच्या पाठपुराव्याला यश

टिटवाळयात पाणी टंचाई होऊ नये यासाठी केली उपाययोजना

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
              टिटवाळा- मांडा शहराची जनसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव-नवीन रहिवाशी सोसायट्या, मोठ-मोठी बारा ते चौदा मजले असलेल्या दहा बारा इमारतींचे कॉम्प्लेक्स येथे तयार होत आहेत. एक कॉम्प्लेक्स म्हणजे जणू काही चारशे-पाचशे रहिवाशांचं एक छोटंसं गाव तयार होतं असं म्हणता येईल. त्यासाठी पाणी, वीज या रोजच्या मूलभूत गरजांची खूप आवश्यकता असते. त्यातल्या त्यात पाणी, हे प्रत्येकाचे जीवन आहे. पाणी नसले तर बहुतेक कामे अडतात.
          पाणी पुरवठा हा, येणाऱ्या दिवसात वेळेवर व मुबलक प्रमाणात व्हावा यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव मोरेश्वर-अण्णा तरे यांनी " पाणी अडवा - पाणी साठवा " ही मोहीम सुरू करून काळू नदीवरील पाणी साठा कमी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी कंडोमनपा पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजु फाटक यांच्याशी संपर्क साधून, 'पाणी अडवा-पाणी साठवा' या बाबत सतत पाठपुरावा करून, पाणी साठविण्यासाठी काळू नदीच्या धरणावर लोखंडी दरवाजे लावून पाणी अडविण्यासाठी आतापांसुनच सुरुवात केली.
            या वेळी पावसाळ्यात परतीचा पाऊस न आल्याने काळू नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. नदीचे पाणी वाहून जात असल्याने पाण्याची पातळी कमी-,कमी होत आहे ते लक्षात आल्यावर जागृततेने, विलंब न लावता लगेच अधिकाऱ्यांशी अण्णा तरे यांनी संपर्क साधला. येथील संपूर्ण माहिती देऊन येणाऱ्या पाणी टंचाईला टिटवाळा-मांडा येथील नागरिकांना सामोरे जावे लागले असते, तसे होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनीही आण्णा तरे यांच्या निवेदनाची दखल घेत, काळू नदीवरील धरणावर लोखंडी दरवाजे बसवून पाणी अडविले.
            या काळू नदीच्या धरणा जवळच कंडोमनपाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. यातून टिटवाळा-मांडा शहराला पाणी पूरवठा होतो. परंतु काळू नदी ज्या गावांजवळून वाहत येते, तेथील नागरिकही या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी, प्राण्यांसाठी करीत असतात. मढ, उशीद, फळेगाव, रुंदा, गुरवली येथील नागरिकांना देखील काळू नदीचे पाणी अडविल्यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा धोका निर्माण होऊ शकत नाही.
            मोरेश्वर-अण्णा तरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत असतांना ते टिटवाळा गाव कमिटीचे ही अध्यक्ष आहेत. गाव कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ' पाणी अडवा-पाणी साठवा ' या मोहिमे अंतर्गत आपल्या तत्पर कार्याचा ठसा कायम ठेवला आहे. या मोहिमे साठी नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Wednesday 10 October 2018

भुसावळ येथे श्री इंद्रध्वज महामंडळ विधान महोत्सवास प्रारंभ

भुसावळ येथे दिगंबर जैन समाजातर्फे श्री १००८ इंद्रध्वज महामंडळ विधान, लघु पंचाकल्याणक, गजरथ महोत्सवास सुरुवात

भुसावळ - (जैनेंन्द्र सैतवाल)
              दि. १० ऑक्टोबर २०१८ पासून भुसावळ येथील संतोषी माता हॉल मध्ये श्री २००८ इंद्रध्वज महामंडळ विधान महोत्सवास प्रारंभ झाला आहे. हा महोत्सव दि. २०/१०/१८ पर्यंत आहे. हा सोहळा प.पू. वात्सल्य रत्नाकर मुनींश्री १०८ स्वात्मनंदीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व सानिध्यात संपन्न होत आहे.
             या मोहत्सवा विषयी सविस्तर व रोज चे अपडेट साठी बघा फक्त " बातमीदार माझा " ब्लॉग.

Monday 8 October 2018

टिटवाळयातील पालकांसाठी धक्कादायक बातमी

टिटवाळा येथील के एन टी शाळेने दिली, विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसण्याची शिक्षा

सर्व पालकांसाठी धक्कादायक प्रकार

टिटवाळा (जैनेद्र सैतवाल )
             टिटवाळा शहर हे श्रीक्षेत्र म्हणून महागणपती सिद्धिविनायक गणपती साठी प्रसिद्ध आहे, तसेच ते येथील नागरी संख्या वाढत असल्याने येथे नवं-नवीन शाळां साठी ही प्रसिद्ध होत चालले आहे. टिटवाळयात इंग्लिश मिडीयम, सी बी एस सी बोर्ड, व खाजगी शाळा वाढत आहे. त्यातीलच गणेश मंदिरा जवळील के एन टी पब्लिक स्कूल ही एक शाळा टिटवाळयात प्रसिद्ध आहे. ही शाळा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे शहरातील भरपूर मुले शिकतात.
             आज, के एन टी पब्लिक स्कूल या शाळेत सर्व पालकांना अचंबित करणारा एक धक्कादायक प्रकार येथे घडला. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याना शाळेतील वर्गाबाहेर काढून मुख्याध्यापकांच्या ऑफिस बाहेरील व्हरांड्यात पाच मुलांना बाकावर बसविण्यात आले. जवळपास दीड ते दोन तास या विद्यार्थ्यांना बाहेर बसून राहण्याची शिक्षा दिली. हे जेव्हा पालकांना समजले तेव्हा पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव मोरेश्वर (आण्णा) तरे यांना या विषयीची तक्रार केली. या तक्रारीची लगेच आण्णा तरे यांनी दखल घेत कार्यकर्ते, पालक व पत्रकार यांना सोबत घेऊन के एन टी शाळेत, संस्थेच्या संस्था चालकांची भेट घेतली. व उपरोक्त प्रकाराबाबत जाब विचारला. यावर संस्थाचालक सतीश तिवारी यांनी सांगितले की, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे सहा ते आठ महिन्यांची फी बाकी आहे. म्हणून त्यांना समज देण्यासाठी हे पाऊल उचलले. पण आणा तरे यांनी त्यांचे बोलणे खोडून काढत म्हणाले की, असे कोठे नियम आहेत की पालकांनी फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवावे? पालकांकडे जर फी बाकी आहे तर ती फी या शिक्षेच्या मार्गाने न घेता पालकांना समजावून सांगून घ्या. त्यावर संस्था चालकांनी विद्यार्थ्यांना वर्गा बाहेर बसवून जी शिक्षा दिली त्याबद्दल माफी मागितली.
           संस्थाचालक सतीश तिवारी यांचे म्हणणे आहे की, बऱ्याच पालकांकडे शाळेची फी बाकी आहे, सहा ते आठ महिन्यांपासून ते पालक फी भरत नाही. वेळो वेळी त्यांना पत्र व फोन करून सूचित केले होते. तरीही फी भरत नाहीत म्हणून आम्ही विद्यार्थ्याना वर्गा बाहेर बसविले. वर्गाबाहेर बसविणे हे चुकीचे असून त्याबद्दल मी माफीही मागतो. पण पालकांनी फी वेळेवर नाही भरली तर शाळेचा खर्च कसा करता येईल? तरी या पुढे सर्व पालकांनी वेळेवर फी भरावी असे ते या वेळी म्हणाले.
            संस्थाचालक सतीश तिवारी यांनी मुलांना शिक्षा दिल्याबद्दल माफी मागितल्या चे सांगून या पुढे फी साठी असा प्रकार केला जाणार नाही अशी ग्वाही मोरेश्वर-आण्णा तरे व उपस्थित कार्यकर्ते, पालक व पत्रकारांना दिली. यावेळी आण्णा तरे यांनी संस्था चालक व पालकांना समजावून हे प्रकरण मिटविले. की यापुढे असे विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होणार नाहीत.
            याप्रसंगी मोरेश्वर-आण्णा तरे यांच्या सोबत समीर भालके, मोहन तरे, संतोष कराळे, किरण रोठे, विष्णू वाघे, अशोक चौरे, कैलास एगडे, पत्रकार मित्र व पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते.
           

Sunday 7 October 2018

नगरसेवक संतोष तरे यांनी निधीचा केला पुरेपूर उपयोग

टिटवाळयात नगरसेवक निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ

नगरसेवक संतोष तरे यांनी निधीचा केला पुरेपूर उपयोग

टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
              कल्याण-डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्र. १० चे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगरसेवक संतोष काशिनाथ तरे यांनी नगरसेवक निधीतून वाघमारे आळी येथे पेव्हर ब्लॉक बसवून रस्ता तयार  शुभारंभ आज येथे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. विशेष म्हणजे शुभारंभा नंतर लगेच पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
                टिटवाळयातील अंतर्गत रस्ते बनविण्याची सुरुवात नारायण नगर येथून करण्यात आली. येथील रस्त्याचे डाम्बरी करण्याचे काम सुरू झाले आहे.  नंतर बालाजी नगर चाळीतील अंतर्गत रस्त्यांना लेकर टाइल्स बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना आता नगरसेवक संतोष तरे यांच्या १० लाख रुपये नगरसेवक निधीतून, वाघमारे आळी येथे शुभारंभ दिवशीच ६० ब्रास, लाल व पिवळ्या रंगाचे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या काम सुरू झाले आहे. त्याच बरोबर बंदिस्त गटार करण्याच्याही कामास सुरुवात झाली आहे.
              वाघमारे आळी येथील अंतर्गत रस्ता खूपच खराब झाल्याने व गटाराचे घाण पाणी सर्वत्र पसरत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी नगरसेवक संतोष तरे यांच्या कडे केली होती, या मुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत होते. ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नगरसेवक निधी मंजूर करून घेतला.
             कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत, आर्थिक व्यवस्थेची मंदी असल्यामुळे विकास कामांसाठी नगरसेवक निधीची टंचाई भासत असल्याने, नगरसेवकांना विकास कामासाठी दिरंगाई होत आहे. असे नगरसेवक संतोष तरे यांनी या प्रसंगी सांगितले.
              राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण-डोंबिवली जिल्हा सचिव मोरेश्वर (आण्णा) तरे, नगरसेवक संतोष (आप्पा) तरे, दिलीप सोनवणे सर, कचरू वाघमारे, महेंद्र हाडवले, निलेश डोंगरे, मुस्तफा सय्यद, साईनाथ तरे, विजय वाघमारे, सागर वाकळे सर, पंकज महाडिक, कमलाकर गायकर ,संतोष वाघमारे, पप्पू वाघमारे अनिल भालेराव, अशोक डोंगरे, चंद्रकांत थोरात, चिंदू कचरे, आकाश गुंजाळ, सचिन घोडेस्वार, भालचंद्र वाघमारे, अरुण वाघमारे, आनंद वाघमारे, विठ्ठल वाघमारे, बाळ भगत, प्रसाद दलाल, भरत बेडसे, वैभव रोठे, राजेश एगडे, अमित तरे, तसेच सौ. सुनंदा भांगरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 6 October 2018

महात्मा गांधी जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबीर

जेष्ठ नागरिक संघ पोलादपूर यांचे वतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पोलादपूर - (प्रतिनिधी)
               जेष्ठ नागरिक संघ पोलादपूर आणि अनुगामी लोकराज्य अभियान,अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ ऑक्टोबर २०१८ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने, पोलादपूर येथील जेष्ठ नागरिक सभागृह येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
                जेष्ठ नागरिक, तरुण तसेच लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. १०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन त्यांना अल्पदरात चष्मे देण्यात आले.
                जेष्ठ नागरिक संघ पोलादपूरच्या अध्यक्षा सौ. कांचन बुटाला, प्रभाकर पालकर अनुलोम, महेश मोटे, सुनील शिंदे, कल्पेश मेटापले, अथर्व बुटाला, यश ऑप्टिशियन व जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य यांनी परिश्रम घेऊन हे शिबीर यशस्वी केले.
            

मुरबाड शहरातील धक्का दायक घटना

मुरबाड शहरातील धक्का दायक घटना

शहरातील सौ. निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालयात दुसरीच्या विद्यार्थ्यास अमानुष मारहाण

मुरबाड - (मंगल डोंगरे)
            मुरबाड शहरातील सौ.निर्मला बळीराम तोंडलीकर विद्यालयात इ.२ रीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यास  जबर मारहाण करून शौचालयात डांबून ठेवण्यात आले.
          सदर विद्यार्थ्याचे नाव सार्थक उमेश हुमणे असे आहे. शिक्षिका सौ.सुचिता रविंद्र पाटील यांनी त्यास गृहपाठ केला नाही म्हणून जबर मारहाण करून शौचालयात डांबून ठेवले.
            एक तासानंतर मित्रांनी त्याची  शौचालयातून सुटका केली. सदर प्रकाराबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी ही आमची जबाबदारी नाही असे सांगितले.
          त्यामुळे सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांनी कलम ३२३ अंतर्गत सदर शिक्षिका सौ.सुचिता रविंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भात पिके करपल्याने शेतकरी हवालदिल

मुरबाड तालुक्यात उभी भात पिके करपल्याने शेतकरी हवालदिल

★तात्काळ पंचनामे करून भरपाईची मागणी ★

मुरबाड - मंगल  डोंगरे
           मुरबाड तालुक्यात उभी भातपिके पुर्णता करपल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन सदर पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शेतकरी संतोष भांगरथ याने केली आहे.
             मुरबाड हा तालुका एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. मात्र हे कोठार सांभाळणाऱ्या बळिराजावर आस्मानी संकट कोसळल्याने तो पुरता हैराण झाला आहे. कधी महापुर तर कधी लपंडाव खेळणा-या पावसाने दडी मारल्याने या शेतक-याची बारा महिने अहोरात्र राबराब राबुन केलेली मेहनत फुकट जाते. अन् मग अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असुन गौरी-गणपती सणांपासुन पावसाने दडी मारल्याने हाता तोंडांशी आलेली भात पिके उभी करपुन गेली आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतक-याला न्याय मिळावा म्हणून शासनाकडून तात्काळ पचंनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी संपुर्ण तालुक्यातील शेतकरी वर्गाकडुन होत असल्याचे शेतकरी संतोष भांगरथ यांनी सांगितले.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...