Sunday 31 March 2024

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे बाळासाहेब भवन येथे महत्वपूर्ण सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे बाळासाहेब भवन येथे महत्वपूर्ण सभा संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :

     लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, प्रवक्ता, मा.आमदार श्री. किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक रविवारी (दि.३१) बाळासाहेब भवन येथे पार पडली.

      एप्रिल महिन्यात येणारे उत्सव सण ,जयंती म्हणजेच गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, हनुमान जयंती तसेच एक मे रोजी होणारा कामगार दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात साजरा करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्ष सुमंत तारीख श्रेयस पाडावे दिलीप नाईक, गणेश शेट्टी छत्रपती पुरस्कार विजेते, मा.नगरसेवक मंगेश सातमकर तसेच सर्व चिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे मुख्य नेते आणि मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात लोकसभेच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे पुणे राजाराम पाटील वृध्दाश्रमास मदतीचा हात !!

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे पुणे राजाराम पाटील वृध्दाश्रमास मदतीचा हात !!

मुंबई (शांताराम गुडेकर )

     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा गोर गरीबांचा कर्तव्यांचा केंद्रबिंदु असलेल्या संस्थेद्वारे गुढीपाडवा हिंदू नवीन वर्ष व प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्र वृध्दाश्रम पांगरीमाथा बल्लाळवाडी ता.जुन्नर, जि.पुणे येथे वृध्दाश्रम भेट देऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या साधनांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाला प्रमुख पाहुणे रवींद्र डोके (सरपंच), वसंत डोके (नशा मुक्ती अध्यक्ष),धनंजय हांडे,शंकर शिंगोटे, सत्यवान डोके, सुभाष खोडदे (समाजसेवा) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.याप्रसंगी सदर वृध्दाश्रमाचे  विवेक तांबोळी (अध्यक्ष), राजेंद्र पांडे (संचालक), सौ.मनीषा खिल्लारे मॅडम, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत वि.खोपकर, संदीप चादीवडे (सचिव), दौलत बेल्हेकर (संचालक), वसंत घडशी कार्यालय प्रमुख, वैभव डोके, अशोक चौगुले, राजेंद्र पेडणेकर, कु.विनय चौधरी, कु.विवेक भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच मंगेशशेठ बनकरी यांचे भाचे झाले डॉक्टर ! विविध मान्यवरांनी केले अभिनंदन !!

कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच मंगेशशेठ बनकरी यांचे भाचे झाले डॉक्टर ! विविध मान्यवरांनी केले अभिनंदन !!

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच मंगेश शेठ बनकरी यांचे भाचे कु राहुल रमेश विशे हे शरदचंद्र पवार होमिओपॅथी मेडिकल काँलेज आणि हाँस्पिटल श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या काँलेज मधून बी एच एम एस पदवी प्राप्त करून डाँक्टर बनले असून त्यांचे परिसरातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून कांबा ग्रामपंचायत ओळखली जाते, या ग्रामपंचायतीचे माझी सरपंच मंगेश बनकरी हे परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व असून त्यांचे घराणेही नावाजलेले आहे, ते कित्येक वर्षे कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच होते, त्यांचे भाचे राहुल रमेश विशे हे देखील हुशार व महत्त्वकांक्षी असल्याने त्यांनी डाँक्टर व्हावे अशी मंगेश बनकरी यांच्या सह इतरांची अपेक्षा होती.

त्यानुसार राहुल याने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शरदचंद्र पवार होमिओपॅथी मेडिकल काँलेज व हाँस्पिटल येथे प्रवेश मिळवून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि मांमाच्या घराण्याची प्रतिष्ठा याचा विचार करून जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालून अखेरीस यश मिळविले, या काँलेज मध्ये बी एच एम एस ही पदवी प्राप्त केली. 

त्यांच्या या यशामुळे कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच मंगेश बनकरी, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, आ कुमार आयलानी, जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोंडविदे, कांबा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच छायाताई बनकरी, सर्व सदस्य, राहुलचे आईवडील, तसेच उद्योजक मोहनशेठ, अनिलशेठ, राकेशशेठ, प्रसाद शेठ, बाकाशेठ पावशे, छगनशेठ बनकरी, देवराम शिरोसे, भगवान शिरोसे, राजेश वाळिंबे, पत्रकार संजय कांबळे, यांच्या सह सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Saturday 30 March 2024

कल्याण तहसील कार्यालयाची दुरुस्ती, मात्र पाणपोई, शौचालय सह इतर गैरसोयींचे काय ?

कल्याण तहसील कार्यालयाची दुरुस्ती, मात्र पाणपोई, शौचालय सह इतर गैरसोयींचे काय ?

कल्याण, (संजय कांबळे) : शासनाला लाखो, करोडोंचा महसूल मिळवून देणाऱ्या कल्याण तहसील कार्यालयाच्या दुरुस्ती काम अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. मात्र कार्यालयातील कर्मचारी तसेच तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या पाणपोई, शौचालय, मुतारी, आदी गैरसोयीचे काय? शिवाय या कार्यालयाच्या पाठिमागे असलेल्या इतर शासकीय खोल्यांच्या डागडुजी चे भिजत घोंगडे कधी गंगेत न्हाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कल्याण न्यायालयाच्या समोर तहसील कार्यालय आहे, अगदी ब्रिटीश कालीन हे कार्यालय असल्याने याचे बांधकाम सुस्थितीत आहे, कल्याण रेल्वे स्टेशन व बस स्थानक जवळ असल्याने संपूर्ण तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील लोक देखील त्यांच्या विविध कामासाठी या कार्यालयात येत असतात, सध्या या कार्यालयात पुरवठा विभाग, निवासी नायब, तहसीलदार, तहसीलदार, अभिलेख कक्ष, संजय गांधी विभाग, आवक जावक खिडकी, तलाठी कार्यालय, सेतू, मंडळ अधिकारी कार्यालय, आदी विविध कार्यालये आहेत, बाजूला जुनी महात्मा फुले पोलीस चौकी, आरोपीची कस्टडी, तर मागे सर्वे, नागरी संरक्षण विभाग, गोपनीय विभाग, बिनशेती कार्यालय ही कार्यालये आहेत.

कल्याण शहराचे झपाटय़ाने नागरीकरण झाल्याने इतर शासकीय कार्यालयाप्रमाणे याही कार्यालयाला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे, कल्याण तहसील कार्यालयाबाहेर गाड्या, स्टँम वेंडर, व इतरांनी अशी जागा व्यापली आहे की, या कार्यालयात येण्यासाठी पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी जसे शेताच्या बांधाचा वापर केला जातो, तसी परिस्थिती येथे दिसून येत आहे. येथील अंतर्गत सोईसुविधा ची तर पुरती बोंबाबोंब दिसून येत आहे, शौचालय, मुतारी, पाणपोई, केव्हाच कोरडी पडलेली आहे, तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात ही पाणपोई सुरू करण्यात आली होती. मात्र आज तिची अवस्था एकाद्या 'थडग्या, प्रमाणे झाली आहे. आपल्या विविध कामासाठी येणाऱ्या सर्वच वयोगटातील लोकांची खूप गैरसोय होत आहे, त्यातल्या त्यात महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.

कल्याण शहर परिसरात 'डझनभर, लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी नेमका कोणाचा ? कोणता ? विकास केला, त्यांनी या न केलेल्या विकासाची 'गँरटी, कोण देणार? कोण घेणार?याबाबत कोणी काही बोलायला तयार नाहीत, पावसाळ्यात तर या कार्यालयात  जागोजागी 'ठिबक सिंचन, दिसून येते तर, परिसराला गटाराचे स्वरूप प्राप्त होते, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी दिसून येते. साधारणपणे अडीच ते तीन गुंठे परिसर असलेले हे ठिकाण एखाद्या कोंबड्यांच्या 'खुराड्या, प्रमाणे दिसत आहे, अशात मोर्चा आला तर मग विचारता सोय नाही !

दरम्यान गेल्या कित्येक वर्षांच्या मागणीनंतर कल्याण च्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कार्यालयाच्या डागडुजी चे काम हाती घेतले आहे. प्रथम या कार्यालयाच्या छताचे काम सुरू झाले आहे, छतावर कौलारू पत्रे बसविले जात आहेत, कल्याण मंडळ अधिकारी यांच्या ही कार्यालयावर असे पत्रे बसविले आहेत. हळूहळू संजय गांधी विभाग, बिगरशेती कार्यालय, व शेती कार्यालय असे विभागाचे काम हाती घेतले आहे. तर उन्हाळा असल्याने पाणपोई व शौचालय याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या डागडुजी साठी सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असून पुढे पुढे इतर सोईसुविधाना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या कार्यालयाच्या मागे असलेल्या इतर शासकीय कार्यालयाचे काम कधी होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. भविष्यात तरी या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सोईसुविधा मिळतील अशा अपेक्षा व्यक्त करुया !!

Thursday 28 March 2024

!! प्रभो शिवराया !! - प्रासंगिक कविता (संतोष गावडे / पत्रकार - वृत्तपत्र लेखक)

प्रासंगिक कविता
---------------------

!! प्रभो शिवराया !!

झुकेल मस्तक सदैव अमुचे महाराज तुमच्या चरणी
ते सुर्य चंद्र अन् तारे जोवर दिसतील आम्हा गगनी !!

अथांग सागर विशाल धरणी असेल सारी सृष्टी
तोवर राजे राहील जगती अगाध तुमची कीर्ती !!

तुम्हांमुळे हो जन्म आमुचा धर्म राहिला तुम्हांमुळे
उंच नभातून आजही डोले ध्वज भगवा तो तुम्हामुळे !!

तुळस अंगणी रोजच गाई तव शौर्याची गाथा
कळस मंदिरी बोले अविरत केवळ तुमच्या बाता !!

विश्वेश्वर तो काशीचा अन् आमुचा पंढरीराया
तुम्हांमुळे  हो इथे नांदली तुळजापूरची माया !!  

अठरापगड त्या जातींमधूनी जडजवाहीर हिरे वेचिले 
जात पंथ ना कधी पाहीले अविरत चिंतन धर्माचे !!

पेंद्या सुदामा श्रीरंगासी  तसे तुम्हा मावळे
तळहातावर प्राण घेऊनी रामराज्य निर्मिले !!

कठीण काळा काळ पाहिला कित्येक क्रूर मारिले
श्रीरामासम दैत्य छाटीले जे धर्मावर कोपले !!


हजार नाही लाखही नाही अगणित तुम्हा मुजरे
या हो परतून पुन्हा एकदा हे राष्ट्र तुम्हा गर्जे 

- संतोष गावडे
पत्रकार /वृतपत्रलेखक 
अंधेरी (पूर्व )

Wednesday 27 March 2024

वंचित आघाडिचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या ''एकला चलो रे, च्या भूमिकेमुळे आंबेडकर समाजामध्ये कमालीची नाराजी ?

वंचित आघाडिचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या ''एकला चलो रे, च्या भूमिकेमुळे आंबेडकर समाजामध्ये कमालीची नाराजी ?

कल्याण, (संजय कांबळे) : वंचित बहुजन आघाडिचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी अगदी शेवटच्या क्षणी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीशी फारकत घेऊन 'एकला चलो रे, ची भूमिका घेत काही उमेदवारी देखील जाहीर केली, मात्र हा निर्णय समाजाला अजिबात रुचलेला नसून या वेगळ्या भूमिकेचा कळत नकळत भाजपालाच फायदा होणार असल्याची भावना आंबेडकरी जनतेमध्ये पसरली आहे, त्यामुळे आपल्या नेत्यांनी निर्णय बदलावा अशीच इच्छा अनेकांनी बोलून दाखविली तर या हट्टी विचारधारेमुळे बहुजनांची मते वंचित पासून दूर जाऊ शकतात अशी शक्यता जानकारांनी व्यक्त केली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या वंचित बहुजन आघाडीने तब्बल २४ लाखाच्या वर मतदान घेतले, हे प्रमाण होते ४.६ टक्के, त्यामुळे वंचितचे एकही उमेदवार निवडून आले नसले तरी याचा जबर फटका काँग्रेस व इतर पक्षाला बसला, मात्र याचा फायदा भाजपाला झाला, भाजपा हा जातीयवादी पक्ष म्हणून आंबेडकर समाजाने कधीही या पक्षाला मतदान केले नाही व करणार नाही, हे ओळखून आता २०२४ चा लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे इतके वंचितला महत्त्व प्राप्त झाले, याचा परिणाम म्हणून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचित आघाडीशी युती केली, यामुळे भिमशक्ती व शिवशक्ती एकत्र येणार असल्याने बहुजन समाजामध्ये कमालीचा उत्साह वाढला, वंचित चे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभाना लाखोंची उपस्थिती होऊ लागली, भाजपा हा भारतीय संविधान बदलू पाहतो आहे, याला गाढून टाका असे अवाहन आंबेडकर यांनी केले, या सर्वांचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीने आंबेडकर यांना आघाडीत घेतले, त्यामुळे आपला नेता सेत्तेत येणार, बहुजनांचा आवाज लोकसभेत घुमणार अशी आशा समाजाला वाटू लागली, यामुळे गावागावात वंचित चे कार्यकर्ते कामाला लागले, आत्तापर्यंतची रस्त्यावरील लढाई आपले नेते आता संसदेत लढणार अशी प्रतिमा तयार होत असतानाच काही जागावरुन आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत 'एकला चलो रे' चा निर्णय घेतला, आणि समाजाला धक्काच बसला,
कारण आपण कितीही ताकद लावली तरी आपली कुवत काय आहे? हे तळागाळातील कार्यकर्ता जाणून आहे, आजही समाजावर अनंत अत्याचार होत आहेत, तरुणांचा खून होत आहे, बलात्कार, विनयभंग, हे नित्याचेच झाले आहे, अश्या वेळी आपण सत्तेत सहभागी असणे किती आवश्यक आहे हे सर्वांना माहिती आहे, मात्र येथे वेगळेच चित्र दिसत आहे,
अगोदरच वंचित ही भाजपाची ''बी, टिम आहे असे आरोप होत आहेत, अश्या वेळी अँड आंबेडकर यांचा हा निर्णय संशय निर्माण करणारा वाटतो, त्यामुळे समाजामध्ये कमालीचा असंतोष व नाराजी पसरली आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलणाऱ्या 'मोदींना, हरविणे हे एकच लक्ष्य असताना अमुक इतक्या जागाचा हट्टाहास कशासाठी? असा प्रश्न बहुजनांना पडला आहे, या बाबतीत कल्याण तालुक्यातील संजय भालेराव यांनी नेते अँड प्रकाश आंबेडकर यांना २ पत्रे पाठविली आहेत, शिवाय अजून खुले पत्र ते लिहून समाजाची मागणी ते त्यांच्या पर्यत पोहचविणार आहेत, अशीच भावना संपूर्ण समाजाची आहे.

बाळासाहेब आंबेडकर हे संपुर्ण देशातील एक स्वाभिमानी नेते आहेत हे कुणीच नाकारू शकत नाही आघाडीत सहभागी झाल्याने महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडवून देईल अशी मोठी अपेक्षा समाज धरून होता अनेक वेळा बाळासाहेब आणि आघाडीचे नेते यांच्या  भेटी आणि चर्चा घडवून येत होत्या त्यामुळे यावेळेस एक वेगळे चित्र घडू शकते याची  समाज चातकासारखी वाट पाहत होता.अशा वेळी आपण समाजाला धक्का दिला,

यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे आपण आठ उमेदवार  ठरवले आहेत, बाकी इतर ठिकाणी समाजाने कुणाला मतदान करावे?

२०१९ ला भिवंडी लोकसभा अरुण सावंत हे लढले तेव्हा त्यांना ४३ हजार पर्यंत मतदान झाले हे मतदान फक्त नि फक्त आंबेडकरी समाजातील होते आता ते आपल्या बदललेल्या भूमिकेमुळे वंचित ला मिळेल का? असे असते अनेक प्रश्न समाजातील लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे जातीयवादी पक्षाला रोखायचे असेल तर अँड. आंबेडकर यांनी आपला 'एकला चलो रे, चा निर्णय मागे घ्यावा व यावेळी समाजाचे ऐकावे अशीच इच्छा सर्वांची आहे.

समाजसेवक कृष्णा कदम यांचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव !!

समाजसेवक कृष्णा कदम यांचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै. हभप विठोबाआण्णा मालुसरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदाचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती पुरस्कार वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा मारुती कदम याना देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुभाष जाधव, महेश मालुसरे, निलेश कोलसकर, गोविंद चोरगे आदि विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या पुरस्काराने गौरविण्यात  आल्याचे मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
               वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य सुरू असून मुंबई गोवा महामार्गावर जोवर सुसज्ज रुग्णालय बनत नाही तोवर या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी मुंबईत विविध रुग्णालयात मदतीचे कार्य सुरू राहणार असल्याचे त्यांनी कक्ष स्थापनेपूर्वीच जाहीर केले होते. गेली तीन वर्षं सातत्याने कदम यांनी त्यांच्या विविध टीमसह मदत मिळवून दिली आहे. दिव्याग व्यक्तींना व्हीलचेअर तसेच ६० पेक्षा अधिक महिला व पुरुषांचे मोतीबिंदू चे उपचार मोफत केले आहे.त्यांच्या या कामगिरी बाबत रायगड, मुंबईतून विविध संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले  आहे.

Tuesday 26 March 2024

कल्याण (अंबिवली) मुरबाड नवीन रेल्वे लाईन विरोधात शेतकऱ्यांचे आत्मदहन अंदोलन ?

कल्याण (अंबिवली) मुरबाड नवीन रेल्वे लाईन विरोधात शेतकऱ्यांचे आत्मदहन अंदोलन ?

कल्याण, (संजय कांबळे) : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा शिमगा आणि राजकीय उमेदवारांची धुळवड सुरू असताना कल्याण तालुक्यातील मानिवली गावाच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या कल्याण (अंबिवली) मुरबाड या नवीन रेल्वे लाईन विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आपणापुढे सामुहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सुनील गायकर या शेतकऱ्यांनी सांगितले आहे, तसे निवेदन रेल्वेच्या उप मुख्य अभियंता निर्माण कार्यालय, नवी मुंबई यांना दिले आहे.

मागील आठवड्यात कल्याण (अंबिवली) मुरबाड या २८ किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वे लाईन साठी ज्वांईट सर्वे मानिवली येथे सुरू असताना तो गावातील शेतकऱ्यांनी बंद पाडला होता, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रेल्वे साठी सर्व्हे नंबर ११२ व इतर मिळकती मधील एकूण १९७० गुंठे बाधित होणार आहे. याशिवाय २५०० शे फळझाडे व २ हजार जंगली झाडे तुटली जाणार आहेत. यावर पर्याय म्हणून सरकारी गायरान सर्वे नंबर १०२ मध्ये ३३ हेक्टर ६३ गुंठे इतकी उपलब्ध आहे, शिवाय ही जमीन उंचावर असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. मात्र असे असताना आम्हा शेतकऱ्यांच्याच नशिबी, मुळावर हा प्रकल्प का? असा प्रश्न उपस्थित करून यामुळे आमची राहती घरे, बागायती उपजाऊ जमीन, झाडे, ही यामध्ये बाधित झाल्यानेआमच्या वर स्थलांतर व्हावे लागणार आहे. ते आम्हांला मान्य नाही असे बोलून सरकारी जागेतून ही नवीन रेल्वे गेल्यास आमची हरकत असणार नाही पण आमच्या जमीनीतून लाईन नेण्यास आमचा तीव्र विरोध व हरकत असल्याचे सांगून आमचा राजकर्त्यावर विश्वास नाही पण भारतीय राज्यघटनेवर व न्यायव्यवस्थेवर पुर्ण भरवसा व विश्वास असून भारतीय संविधान परिछेद २१ नुसार समान न्याय मिळविण्याचा पुर्ण अधिकारी आहे, तो न्याय न मिळाल्यास आम्हाला सामुहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रंसगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा श्री गायकर यांनी दिला आहे. 

तसे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी, उप मुख्य अभियंता, निर्माण कार्यालय जुईनगर, नवी मुंबई, तसेच कल्याण तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर  सुनील दत्ता गायकर, चंद्रकांत गायकर, सुनील दगडू गायकर, व्दारकानाथ धर्मा गायकर, रमेश केणे, भालचंद्र गायकर, विलास गायकर, सुनील आत्माराम केणे, संतोष वारघडे, गजानन काळण आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, दरम्यान सध्या देशात लोकसभ निवडणुकीचा शिमगा सुरू झाला आहे, उमेदवार आणि राजकीय पक्षांनी धुळवड चालू केली आहे. आम्ही ५ वर्षे कसे चांगले काम केले, विरोधक खोटे आरोप करताहेत, पंतप्रधान गँरटी देताहेत, मात्र सध्य परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला कोणी ही वाली उरलेला नाही, शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळत नाही, वयाचे कारण पुढे करून लहान मुलांना वैद्यकीय उपचार नाकारले जात आहेत, कष्टकरी, शेतमजूराला घरपट्टी साठी हेलपाटे मारावे लागत आहेत, विविध प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उध्दवस्त होत आहे, या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले असता इकडून तिकडे पाठवले जात आहे. असे असेल तर शासन आपल्या दारी येवून नक्की काय करते ? असा सवाल आत्माराम केणे यांनी विचारला आहे. तर रेल्वे प्रकल्पाच्या विरोधामागील कारण कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी जाणून घेत शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले, तथापि याबाबत शेतकरी सुनील गायकर यांना विचारले असता, ते म्हणाले आमच्या विरोधाचा विचार न केल्यास, गावा गावात जाऊन बाधित शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून हे अंदोलन अधिक प्रखर व तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Sunday 24 March 2024

मोखाडा तालुक्यात खोडाळा येथे बहुजन विकास आघाडीचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन !!

मोखाडा तालुक्यात खोडाळा येथे बहुजन विकास आघाडीचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्धघाटन !!

जव्हार, जितेद्र मोरघा -

मोखाडा तालुक्यात खोडाळा येथे बहुजन विकास आघाडीचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन माजी खासदार बळीराम जाधव व ज्येष्ठ नेते विल्सन फर्गोस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी खासदार बळीराम जाधव यांनी बोलताना सांगितले की, हे कार्यालय लोकसभा निवडणुकीसाठीच चालू केले नाही तर हे कार्यालय 12 ही महिने जन सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी चालू केले आहे. या ठिकाणी काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे कामाचे समाधान होईल तो पर्यंत पाठपुरावा केला जाईल. या कार्यालयात कोणत्याही जातीचा धर्माचा ,पक्षाचा व्यक्ती आला तरी काम केले जाईल असे सांगितले यावेळी त्यांनी 2009 ते 2014 काळात या भागात केलेल्या कामाला उजाळा दिला व तुम्ही कोणतेही काम असो मला थेट न घाबरता संपर्क करा असे सांगितले. यावेळी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विल्सन फर्गोस, जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, मोखाडा तालुका उप अध्यक्ष रमेश बोटे, सायदे गण प्रमुख अंकुश बोटे, खोडाला गण अध्यक्ष जनार्दन पाटील, गोमघर ग्रामपंचायत सदस्य नरेश पाडेकर, दिनकर ठोंबरे, चंदर बोटे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य संतोष भला, विजय वारा, योगेश पुराणे व खोडाला गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण ते खान्देश विदर्भ मध्य रेल्वेकडून (Periodicity) प्रायोगिक तत्त्वावर कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणारी गाडी क्र ०११३९/०११४० नागपुर मडगाव प्रतिक्षा बी विकली एक्स्प्रेसला ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ !!

कोकण ते खान्देश विदर्भ मध्य रेल्वेकडून (Periodicity) प्रायोगिक तत्त्वावर कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणारी गाडी क्र ०११३९/०११४० नागपुर मडगाव प्रतिक्षा बी विकली एक्स्प्रेसला ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ !!

 नागपूर, प्रतिनिधी : नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला नॉन मान्सून ३ मार्च २०२४ ते ९ जुन २०२४ व मान्सून १० जुन२०२४ ते ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे खान्देश, विदर्भ ते कोकण चालणारी ३० जुन २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे
            खान्देश, विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता ३० जुन २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे 
             सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं येथून दर बुधवार,शनिवारी दु.०३.०६ वाजता सुटून गुरुवार,रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४६ वाजता पोहोचेल.
             मडगाव गोवा ते नागपुर जं दरम्यान धावताना हि गाडी ०११४० गुरुवार,रविवारी मडगाव गोवा येथून रा.०८.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३१ वाजता नागपुर जं येथे पोहोचेल 
             नागपुर जं. ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं,पुलगाव,धामणगाव,बडनेरा जं,अकोला जं, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे या तीन महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजुच्या मिळुन ५४ फेऱ्या होणार आहेत या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण __


ॲपवर भारतीय रेल्वेच्या आरक्षण २४ मार्च२०२४ पासून आरक्षण खिडकीवर सुरु करण्यात आले आहे
             नागपुर जं मडगाव नागपुर जं प्रतिक्षा सुपरफास्ट बि-विकली एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती शेगांव सल्लागार व सदस्य ॲड.श्री.पुरुषोत्तम डांगरा संजय त्रिवेदी ,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख सौ.माधुरी शर्मा,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले, राष्ट्रीय संघटनमंत्री-देवगड संपर्कप्रमुख ओमकार उमाजी माळगांवकर, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, प्रवासी सुधीर राठोड, अनिल राठोड, दिपक सोनवणे, विदर्भ-खान्देश कृषी विद्यापीठ-मेडिकल कॉलेजातील विद्यार्थी- विद्यार्थीनी वर्गाकडून करण्यात आले आहे.

Saturday 23 March 2024

शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे यांचे विचार कार्य कामगार वर्गाने अभ्यासावे !!

शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे यांचे विचार  कार्य    कामगार वर्गाने अभ्यासावे !! 

** शेतमजूर युनियन चे आवाहन

चोपडा, प्रतिनिधी... शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकचे स्वप्न पाहिले होते स्वातंत्र्यानंतर त्यानुसार संविधान तयार झाले पण गेल्या दहा वर्षापासून संविधानाने मंजूर केलेले शेतमजूर दुर्बल घटकांसाठी असलेले हक्क नाकारले जात असून रोजगार हमी योजना व आरोग्य अधिकार शिक्षणाच्या अधिकार  खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाचे संकुचित केले जात आहे. जीएसटी कर मध्ये देशातील 90% जनता भरडली जात असून श्रीमंत लोकांवर कमी टॅक्स लावले जात आहेत. त्यांना करमाफी कर्ज माफी केली जात आहे तसेच इलेक्शन  बाँड काढून देशाच्या तथाकथित विकास योजना सत्ताधारी  यांना इलेक्शन बाँड द्वारे निधी  देणाऱ्या कंपन्यांकडे सुपूर्द केल्या जात आहेत. म्हणजेच कंपनी राज पुन्हा सुरू होत आहे अशा तऱ्हेने जनतेचे प्रजासत्ताक ऐवजी मूठभरांचे सत्ता प्रस्थापित केली जात आहे अशावेळी शहीद भगतसिंग यांचे हिंदुस्तान सोसायटी रिपब्लिक व संविधान कर्त्यांनी पाहिलेले स्वप्न पाहत आहे म्हणून शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा अभ्यास करण्याची गरज आहे विशेषत: कामगार वर्गाने त्याचा अभ्यास करावा असे आवाहन चोपडा येथे शेतमजुरांच्या हक्कांविषयी चालवलेल्या लालबावटा शेतमजूर युनियनच्या मोहिमेच्या समारोप करताना झालेल्या सभेत अध्यक्ष कॉ  सुरेश शिरसाठ व शेतमजूर नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी केले.

याबाबत सविस्तर असे की. अखिल भारतीय खेत मजूर युनियनने 1 मार्च ते 23 मार्च या कालावधीत शेतमजुरांच्या प्रश्नांच्यावर देशव्यापी मोहीम आयोजित केली होती त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही चोपडा अमळनेर जळगाव येथे तालुकास्तरावर शेतमजुरांच्या प्रश्नावर आंदोलने करण्यात आले व 23 मार्च 2024 रोजी शहीद भगतसिंग स्मुर्ती चोपडा येथे समारोपाची सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक काँ सुरेश मगन शिरसाट हे होते त्यावेळी शहीद भगतसिंग सुखदेव  ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री रमेश दिगंबर पाटील यांनी केले या मेळाव्याला  शेतमजुर युनियनचे  कार्यकर्ते सर्वश्री संतोष कुंभार, गुलाब शहा फकीर, अंबालाल राजपूत, सुशीला मराठे, राधाबाई पाटील, कैलास भिल्ल, रमेश साळुंखे, युवराज साळुंखे, जमुनाबाई मराठे, प्रकाश रल आदी वराड, भोकर, रुखनखेडे, गोरगावले, खरद, चोपडा शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

परवानाधारकांना आचारसंहितेत शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध- जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचे आदेश

परवानाधारकांना आचारसंहितेत शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध
-  जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचे आदेश

नागपूर, प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता कालावधीत नागपूर जिल्हा व ग्रामीण भागातील शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निर्गमित केले. दिनांक 6 जून 2024 पर्यंत हे प्रतिबंध लागू राहतील. याचबरोबर शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 21 मधील तरतूदीनुसार शस्त्र परवान्यावर नोंदविलेले शस्त्रे जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहे. हा मनाई आदेश जो समाज दीर्घकालिन स्थायी कायदा, रुढी व परीपात यानुसार शस्त्रास्त्र बाळगण्यास हक्कदार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. तथापि अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीची शस्त्रास्त्र अडकावून ठेवण्यास जिल्हा प्रशासनास कोणताही प्रतिबंध असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  

सदर आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी-कर्मचारी, बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. या व्यक्तींकडून त्यांच्याकडील शस्त्राच्या, हत्याराचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाच्या अधिकाऱ्यांवर राहील.   

‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश !!

‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश !!

पुणे, प्रतिनिधी : बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ जानेवारी २०२४ रोजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील ५ वर्षांसाठी ही बंदी असणार आहे. याविषयी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच कार्यवाहीबाबत शपथपत्रे दाखल करून ती राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Friday 22 March 2024

निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !!

निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी  अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !!

** जिल्ह्यात 3 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

रायगड, प्रतिनिधी- निवडणूक विषयक सर्व प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रायगड जिल्ह्यात वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज अखेर पर्यंत जिल्ह्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

निवडणूक प्रक्रिया हे सांघिक काम आहे. निवडणूक कामात समन्वय महत्त्वाचा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे.

या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधीं समोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे. आदींबाबत तसेच मॉक पोल प्रकीयेच्या सुरुवातीपासून ते प्रकिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली.आज अखेर पर्यंत अंदाजे तीन हजार विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची 24 प्रशिक्षणे घेण्यात आली आहेत.बाकी यंत्रणाची प्रशिक्षण प्रक्रिया सुरु आहे. 

 या प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी ज्योत्सना पडियार हे काम पहात आहेत. उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, अजित नैराळे, राहुल मुंडके, मुकेश चव्हाण, जनार्दन कासार, तहसीलदार विकास गारुडकर, महेश शितोळे, स्वाती पाटील, चंद्रसेन पवार, जिल्हा परिषद लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा सूचना अधिकारी निलेश लांडगे यांनी या सर्व अधिकारी कर्मचारी यांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले आहे. 

निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांना या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी फायदा होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी व्यक्त केला.

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय - मुख्य निवडणूक आयुक्त

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय - मुख्य निवडणूक आयुक्त 

मुंबई, प्रतिनिधी - ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशासाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त यांनी दिली.

काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुध्दलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफीसने फोटोसह दिलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्राईव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, केंद्र/ राज्य सरकार/पीएसयू/ पब्लिक लिमिटेक कं.कर्मचाऱ्यांने दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/ आमदार/ एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे. 

यापैकी एक मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी, मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करुन घेण्यास प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या  कलम 20 ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार  त्यांच्या भारतीय पासपोर्ट मधील तपशीलांच्या आधारे ओळखले जातील. 

पोस्को कंपनीत जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल मुनगीकर यांचे पर्यावरण आणि जैवविविधता विषयावर मार्गदर्शन !!

पोस्को कंपनीत जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल मुनगीकर यांचे पर्यावरण आणि जैवविविधता विषयावर मार्गदर्शन !!

       बोरघर /माणगाव ( विश्वास गायकवाड ) : पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी सीएसआर फंड सामाजिक विनियोग या अनुषंगाने माणगाव पत्रकारां समवेत त्रैमासिक चर्चा सत्र तथा परिसंवाद शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी च्या कॉन्फरन्स हॉल तथा परिसंवाद कक्षात संपन्न झाला. सदर परिसंवाद कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून जागतिक जल दिनाचे औचित्य साधून डॉ राहुल रमेश मुनगीकर ( पर्यावरण आणि जैवविविधता या विषयाचे गाढे अभासक आणि संशोधक ) यांचे पर्यावरण, जैवविविधता, पर्यावरण प्रदूषण, जलप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, जंगल तोड आणि मानव निर्मित वणवे आणि पर्यावरणाची हानी इत्यादी महत्वपूर्ण गंभीर विषयांवर मौलिक मार्गदर्शन आयोजित केले होते. 
       सदर चर्चा सत्र परिसंवाद कार्यक्रमात सर्व प्रथम पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी व्यवस्थापकीय मंडळाकडून विषेशतः मा. पाटील सर, मा. पुरंदरे सर आणि मा. महेंद्र थिटे सर यांनी पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी च्या माध्यमातून सीएसआर फंडाचा कंपनी व्यवस्थापनाने सामाजिक उत्तरदायित्त्व या उदात्त भावनेतून शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका या मुलभूत बाबींवर सामाजिक उत्थानासाठी केलेल्या आर्थिक विनियोगाची माहिती पत्रकारांना दिली. 
      या नंतर पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी व्यवस्थापनाने पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलेले पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर संशोधनात्मक पीएच डी करणारे संशोधक माननीय डॉ. राहुल रमेश मुनगीकर यांनी उपरोक्त विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर पर्यावरणाचे रक्षण व जैवविविधता संवर्धन आणि आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य या संदर्भात जाणीव जागृती केली. 
    या नंतर जागतिक जल दिन या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन जागतिक जल दिना निमित्ताने माणगाव पत्रकारांनी डॉ राहुल रमेश मुनगीकर यांची बाईट तथा मुलाखत घेतली. या बाईट मुलाखती मध्ये पत्रकारांनी डॉ मुनगीकर यांना जागतिक जल दिन आणि जल प्रदूषण, मानवी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक चा बेसुमार वापर मानवी जीवनाला, पर्यावरणाला, जल प्रदूषणाला हानीकारक तसेच मानवनिर्मित वणवे, ग्लोबल वॉर्मिंग तथा जागतिक तापमानवाढ, बेसुमार वृक्ष तोड, सांस्कृतिक होळी उत्सव आणि वृक्ष तोड, अवर्षण, प्रवर्षण, पूर स्थिती आणि दुष्काळ या बाबत चर्चात्मक परिसंवाद साधला.

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवॉर्ड-२०२४ व मिस, मिसेस इंडिया-२०२४ ग्रँड फॅशन शो उत्साहात संपन्न !!

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवॉर्ड-२०२४ व मिस, मिसेस इंडिया-२०२४ ग्रँड फॅशन शो उत्साहात संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवॉर्ड-२०२४ व मिस, मिसेस इंडिया-२०२४ ग्रँड फॅशन शो उत्साहात संपन्न झाले. शोचे आयोजन पुण्यातील विमान नगर येथील हॉटेल फोर पॉइंट येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, मराठी चित्रपटातील अभिनेते दीपक शिर्के, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट, सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन, सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आदी गोल्डन लोटस अवॉर्ड  तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट गीत लेखन, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट आदी सिल्वर लोटस अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
          यावेळी बॉलीवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व मराठी चित्रपट अभिनेते दीपक शिर्के यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवार्ड ने आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मराठी चित्रपट अभिनेत्री मोनालीसा बागल, अभिनेते प्रसाद शिखरे, अभिनेत्री अश्विनी बागल, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे महेश थोरवे, कार्यक्रमाचे आयोजक डॉ.अविनाश सकुंडे यांचे असुन शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशाल गोरे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यशोधक या मराठी चित्रपटाच्या टीमला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मिस मिसेस इंडिया -२०२४ या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध वयोगटातील  मॉडेल्सनी आपला रॅम्प वॉक सादर केला. या फॅशन शोमध्ये मिस व मिसेस गटातील स्पर्धकांना क्राऊन व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभाताई कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य अर्जुन चव्हाण, गणेश विटकर आणि सचिन मगर यांनी केले.

जन्मशताब्दी वर्षी वै.ह.भ.प विठोबा आण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराचे वितरण !!

जन्मशताब्दी वर्षी वै.ह.भ.प विठोबा आण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराचे वितरण !!

***** पाच निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार गौरव

मुंबई, (शांताराम गुडेकर) -

          स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै.ह.भ.प विठोबा आण्णा सुभनराव मालुसरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवार दि.२६ मार्च २०२४ रोजी पोलादपूर तालुका साखर खडकवाडी येथे वसा समजासेवेचा सन्मान कर्तृत्वाचा या आधारे समाजात कार्यरत असणाऱ्या मुंबईसह तालुक्यातील पाच निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
           महाराष्ट्रातील वारकरी परंपरा तसेच कीर्तन, प्रवचनाचा वारसा पुढे अखंड चालू रहावा आणि समाजाला प्रबोधन व्हावे यासाठी वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवरील कीर्तन सोहळ्यात हजेरी लावून कार्यक्रमाना उत्तेजीत केले होते. जन्मशताब्दी ची सुरुवात करताना तालुक्यातील गायनाचार्य, मृदुंगाचार्य यांच्या उपस्थितीत भव्य सुस्वर भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून मुंबई आणि तालुक्यातील सामाजिक कार्य कारणाऱ्या  पाच निवडक कार्यकर्त्याचा पुरस्कार प्रदान करून होणार आहे. कृष्णा कदम ( के के ) - ओंबली, सुभाष जाधव - खडकवाडी , गोविंद चोरगे- साखर, महेश मालुसरे - मुळशी पुणे, निलेश कोळ सकर- देवळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने सांगितले आहे.

Thursday 21 March 2024

कोचरी प्रिमीयम लीग KPL २०२४ चे आयोजन !!

कोचरी प्रिमीयम लीग KPL २०२४ चे आयोजन !!


लांजा, (केतन भोज)‌ : तालुक्यातील मु.पो. कोचरी (मठाचा माल सुतारवाडी), ता.लांजा, जि. रत्नागिरी या ठिकाणी रविवार दि.२४ व सोमवार दि २५ मार्च रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कोचरी  प्रिमीयर लीग KPL २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५,०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक व द्वितीय पारितोषिक १०,००० रोख रक्कम व आकर्षक चषक असे ठेवण्यात आले आहे, तसेच या स्पर्धेसाठी गावातील व गावाबाहेरील अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली आहे. 

तरी या स्पर्धेसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून स्पर्धेतील खेळाडूंचे मनोबल उंचवावे असे आवाहन कोचरी प्रिमीयर लीग चे मुंबई कमिटी : अध्यक्ष-दत्ताराम बेंद्रे, उपाध्यक्ष- कल्पेश पवार, सचिव- पंकज खांडेकर, उपसचिव- प्रदिप गुरव, सहसचिव- रुपेश बने, खजिनदार- सुधिर कांबळे, उपखजिनदार- राजेंद्र डाफळे, ग्रामिण कमिटी : अध्यक्ष- सुरज बने, उपाध्यक्ष- संजय बेंद्रे, सचिव- मयुर कांबळे, उपसचिव-विरेश बने, खजिनदार- भरत गुरव, उपखजिनदार- राज कांबळे, प्रमुख सल्लागार मुंबई : राजाराम (काका) फापे, मच्छिंद्र कांबळे, सतिश पालेकर, प्रमुख सल्लागार ग्रामिण-संदेश कांबळे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा !!

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा !!

पुणे, प्रतिनिधी : कारागृहातील बंद्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी  उपलब्ध व्हावीत यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई-लायब्ररीची सुविधा सुरु करण्यात आली असून या लायब्ररीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, आर. ई गायकवाड, एम. एच. जगताप, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंदा कांदे आदी उपस्थित होते. 

कारागृहातील बंद्यांसाठी 'ई-लायब्ररी' हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या ई-लायब्ररीमध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात संगणकावर बंद्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली असून या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे कारागृहाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यासाठी अखंड बेमुदत उपोषण !!

मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यासाठी अखंड बेमुदत उपोषण !!

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे तसेच त्यांचे सहकारी दुय्यम निबंधक प्रविण चौधरी व अन्य दोन यांच्या वर कार्यालयातील एका महिलेने जातीवाचक बोलणे, अश्लील शब्द वापरणे व सुट्टीच्या दिवशी जाणूनबुजून कामावर बोलविणे तसेच शरीरसुखाची मागणी करणे असे आरोप केले. 

सदर प्रकरणात उपनगर पोलिस स्टेशन, नाशिक येथे अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ प्रमाणे ३(I), (r), (s), (w), (i), (ii), तसेच भा.दं.वि १८६० प्रमाणे ३५४, ३५४- अ, ३५४- ड, ५०४, ५०६, ३४ विनयभंग व ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे यांनी अनेक गैरव्यवहार केले असून त्या महिलेवर झालेल्या अन्याय सहन केला जाणार नाही असे बहुजन विकास परिषद, महाराष्ट्र यांचे कार्याध्यक्ष सुर्यकांत चिंतामण भालेराव यांनी सांगितले, तसेच कैलास दबंगे यांची SIT चौकशी करावी व त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी बेमुदत अखंड साखळी उपोषण २० मार्च २०२४ सुरू केले आहे.

सदर उपोषण काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा उपोषणकर्ते यांच्या जिवितास धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी १) मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दबंगे, २) दुय्यम निबंधक प्रविण चौधरी, ३) देविदास कोल्हे (एस. टू. कंपनीचा इंजिनिअर), ४) सागर बच्छाव (दुय्यम निबंधक), ५) अजय पवार (सिन्नर दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी), ६) सौ. स्वाती कैलास दबंगे (कैलास दबंगे यांच्या पत्नी) हे जबाबदार रहातील, अशा अर्ज त्यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना केला आहे.

Wednesday 20 March 2024

शेतमजुर बचाव देश बचाव मोहिम..‌तीन तालुक्यातील धरणे आंदोलने..यशस्वी..

शेतमजुर बचाव देश बचाव मोहिम..‌तीन तालुक्यातील धरणे आंदोलने..यशस्वी..

जळगाव, प्रतिनिधी .. गेल्या दहा वर्षापासून शेतमजूर कष्टकरी असंघटित कामगार, जंगल गायरान धारक, बेघर यांच्या प्रश्नाकडे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे संपूर्ण दुर्लक्ष असून फक्त धनदांडगे उद्योगपती यांच्यासाठी सरकार काम करीत आहे म्हणून  मजुरांच्या विविध मुद्द्यांना घेऊन शेतमजूर बचाव देश बचाव मोहीम महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन  व भारतीय खेत मजदूर युनियन ने दिलेल्या आदेशानुसार  मार्च ते 23 मार्च 2024 काळात देशव्यापी  मोहीम व शेतमजूर यांच्या प्रश्नांचा पाठपुराव्यासाठी देशभर आंदोलने करण्याची सुरुवात केली आहे.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही 18 ते 20 मार्च 2024 काळात चोपडा, अमळनेर व जळगाव या तीन तालुक्यात या मोहिमेअंतर्गत त्या त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयांवर धरणे व निवेदन देणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोपडा, अमळनेर, जळगाव येथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करून आपले कार्यक्रम करा अशी संमती दिली, त्यानुसार 18 मार्च रोजी चोपडा येथे तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर युनियन तर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना 9 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्या मागण्यात म्हटले आहे की श्रावणबाळ आदी योजनात कमाल वयाची मर्यादा 60 वर्षे असावी तसेच खोट्या व  तकलादू कारणे दाखवून लाभार्थी वयोवृद्ध दिव्यांग यांना लाभ नाकारण्यात येऊ नये  वयासाठी मेडिकल सर्टिफिकेट गृहीत धरावे जंगल गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करावी. सर्वांना आरोग्य हक्क म्हणून सरकारी दवाखाने यात औषधी साधने व तज्ञ मेडिकल अधिकारी यांचा समावेश व्हावा शिक्षण क्षेत्रातील विषमता दूर करण्यासाठी शाळा अंगणवाडी डिजिटल करावी. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जे लोक सुटून गेले  त्यांची फेर चौकशी व्हावी त्यांच्या समावेश व्हावा आदि मागण्यांचे निवेदन  आयटक संपर्क कार्यालयात मीटिंग घेण्यात येऊन तयार करण्यात आले. 

*** त्यावेळी लालबावटा शेतमजूर युनियनचे संस्थापक नेते दिवंगत कॉम्रेड स ना भालेराव यांच्या पंचविसाव्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला काँ. वासुदेव कोळी यांनी माल्यार्पण केले तसेच धुळे जिल्ह्याचे शेतमजुर नेते एडवोकेट का मदन परदेशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर चोपडा तहसीलदार कार्यालयावर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शेतमजूर नेते कॉम्रेड अमृत महाजन शेतमजूर युनियन चे जिल्हा सचिव कॉम्रेड वासुदेव कोळी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केले त्यावेळी चोपडा तहसीलदार यांना भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर केले त्यात सर्वश्री कॉम्रेड इरफान मणियार, जिजाबाई राणे, शशिकला निंबाळकर, शोभाबाई देशमुख, सुरेश भिल्ल, भगवान भिल्ल, सिंधुबाई भिल, गणेश महाजन, चंद्रकला माळी, संतोष कुंभार, सखुबाई पारधी, दुर्योधन भिल्ल, खैरूनिसा शेख, उषाबाई वाघ आदींनी निवेदन सादर केले. अमळनेर येथे शेतमजुर कार्यकर्त्यांनी जमून दुपारी साडेबारा वाजता बैठक लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, तालुका सचिव वाल्मीक मैराळे व शेतमजूर युनियनचे तालुका अध्यक्ष सरफराज शहा यांच्या मार्गदर्शनात शेतमजुरांच्या प्रश्नांवर चर्चा झाली एक निवेदन तयार करण्यात आले. 123 नंबर फ्लॅट मधील रहिवासी व व्यावसायिक प्रयोजनार्थ गेल्या पन्नास वर्षापासून जे लोक राहत आहेत त्यांच्या नावे राहत असलेली जागा करा तसेच कलाली येथील जंगल गायरान जमिनीवरील शेती नावे करा व मोहिमेअंतर्गत शेतमजुरी यांचे नमूद केलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन तहसीलदार श्री सुराणा यांना सादर करण्यात आले त्यावेळी सर्वश्री कॉमेडी मन्सूर शहा नारायण मैराळे भावना पांचाळ, रंजना पांचाळ, सिताराम वडार, उषाबाई पवार, श्री हरिश पवार ,जायदाबी शहा आदि पदाधिकारी यांचा सहभाग होता. जळगाव येथेही लालबावटा ऑफिस मध्ये आज रोजी कॉम्रेड भास्कर सपकाळे यांच्या पुढाकारात एक वाजता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी शेतमजुरांमधील बचत गटांच्या महिला प्रतिनिधी ही उपस्थित होत्या भोकर व पाथरी येथील जंगल, गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांची नावे शेती करा शेतमजुरांच्या बचत गटांना अंगणवाडीच्या खाऊ शिजवण्याचे कंत्राट पूर्ववत मिळावी. गेल्या दोन वर्षांपूर्वीची बचत गटांची तीन महिन्याची थकीत बिल अदा करा आधी मागण्या व मोहिमेअंतर्गत नमूद सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन तहसीलदार श्री पाटील यांना देण्यात आले त्यावेळी सर्व कॉम्रेड बळीराम, धीवर अलका, कोठावदे, गोकुळ कोळी, विजय बाविस्कर, कैलास भिल, शोभा मोठे देवकाबाई शर्मा बेबी कुंभार गुड्डी शेख ,वंदना पाटील मंगल धनगर, वसंत पाटील, सुकलाल मिल, रिजवाना पिंजारी, प्रतिभा पाटील, तसलीम शेख, पंढरी साळुंखे, भास्कर पाटील, भरत बाविस्कर, राजाराम कोळी, लोटन.पाटील, साधना कोळी आदि 50 कार्यकर्ते आले होते या तीनही आंदोलनांना भारतीय "खेत मजूर युनियनचे माजी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस अमृत महाजन" यांनी मार्गदर्शन केले .त्यांच्या मार्गदर्शनात मोठे आहे की, गेल्या दहा वर्षात शेतमजुरांच्या आर्थिक सामाजिक धार्मिक जीवनात मोदी सरकारने फार मोठ्या प्रमाणात जवळजवळ केलेली असून त्यांच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाही उलट त्यांच्या हक्क नाकारत आहेत म्हणून शेतमजुरांनी संघटित व्हावे व आगामी 2024 काढा लोकसभा निवडणुकीत भाजप आरएसएस मोदी सरकार हटवावे असे आवाहन केले...

येत्या 23 मार्च रोजी शहीद  भगतसिंग स्मृतिदिनानिमित्ताने मीटिंग घेण्यात येणार असून या मोहिमेचे जागरण सुरूच राहणार आहे. 

कॉम्रेड अमृत महाजन जळगाव,
+91 98605 20560

पत्रकार भिमराव धुळप यांची एस.ई.ओ पदी नियुक्ती !!

पत्रकार भिमराव धुळप यांची एस.ई.ओ पदी नियुक्ती !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         धारावीतील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले व धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक श्री.भिमराव बालकाबाई हिंदुराव धुळप यांची महाराष्ट्र शासनाच्या मुंबई शहर विभागासाठी विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
          भिमराव धुळप हे फक्त पत्रकारिता न करता सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य, आदी क्षेत्रात  उल्लेखनीय असे कार्य करत आहेत.अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आदिवासी पाडा येथील गरजूंना मदत, ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय  सहाय्यता निधी मिळवून देणे, त्यांना रुग्णालय उपलब्ध करणे (आरोग्यदूत म्हणून काम), दिव्यांगांना मदत असे कार्य चालूच आहे,या गोष्टीची दखल घेऊन राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे. आतापर्यंत त्यांना २० पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ७५० हुन अधिक रुग्णांना मदत केली आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने खा. राहुल शेवाळे यांनी शिफारस करून पालकमंत्री दीपक केससकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांना दिले व श्री. भिमराव बालकाबाई हिंदुराव धुळप यांची एस. ई. ओ पदी नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रविण सपकाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्याध्यक्ष पदी निवड !!

प्रविण सपकाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्याध्यक्ष पदी निवड !!

मुंबई, प्रतिनिधी -  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी जळगाव येथील प्रविण सपकाळे यांची निवड झाली आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी संघटनेचे राज्य महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे व राज्यभरातील विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पत्रकार संघाचे उपक्रमशील पदाधिकारी असलेले उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले प्रवीण सपकाळे यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. श्री. सपकाळे यांना सर्व राज्य कार्यकारीणीच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.

दादा महाराज मोरे माऊलीचां संत ज्ञानेश्वरांची मूर्ती भेट देत सत्कार !

दादा महाराज मोरे माऊलीचां संत ज्ञानेश्वरांची मूर्ती भेट देत सत्कार !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांना आज दि.२० मार्च २०२४ रोजी मुंबई येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांची सुबक मूर्ती भेट देऊन वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा मारुती कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत ज्ञानोबा बांदल उपस्थित होते. दादा महाराज मोरे माऊली गेली अनेक वर्ष आपल्या अमोघ वाणीतून कीर्तनातून समाज प्रबोधन करत आहेत. मुंबईसह, बडोदा, रायगड येथे त्यांचा अनुयायी वर्ग मोठ्या संख्येने आहे. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमचे त्यांनी कौतुक केले आहे. रायगड मध्ये प्राथमिक उपचारासाठी रुग्णालय बांधले जावे ही चांगली बाब असल्याचे देखील सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमशी चर्चा करताना केले. यावेळी आज मदत कक्षाच्या टीमने दादा महाराज मोरे माऊलीची भेट घेत त्यांना संत ज्ञानेश्वर माऊलीची सुंदर अशी मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार केला असल्याचे वैद्यकिय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

Tuesday 19 March 2024

पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते पाशा पटेल !!

पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते पाशा पटेल !!

मुंबई, जितेंद्र मोरघा : शेतकरी नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे,  मुंबईसह राज्यात वाढत्या वायुप्रदुषणामुळे अनेक आराेग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत आणखी अभ्यास करण्यासाठी राज्याच्या आराेग्य विभागाकडून ‘टास्क फाेर्स’ ची स्थापना करण्यात आली.
हा टास्क फोर्स पृथ्वी आणि महाराष्ट्र राज्याला प्रभावित करणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी समर्पित आहे.

महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांची या समितीच्या सह-अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच राज्य सरकारच्या विविध संबंधित विभागांचे सचिव टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.

** खरा आनंद __ संत राजिंदर सिंह महाराज''''

** खरा आनंद __ संत राजिंदर सिंह महाराज'''' 

सृष्टीच्या सुरुवातीपासूनच मानवाचा हा प्रयत्न आहे की, त्याने आपल्या जीवनात आनंदाने जगावे म्हणून तो अशीच कृती करण्याचा प्रयत्न करतो कि, ज्यामुळे त्याला असे वाटते कि त्याला आनंद मिळेल.

आपल्या पैकी बरेचसे लोक असा विचार करतात की, जेव्हा आपले शरीर सुदृढ असेल, आपल्याजवळ भरपूर पैसा असेल, आपले नातेसंबंध चांगले असतील, एक मोठे घर असेल आणि एक यशस्वी कारकीर्द असेल, तेव्हा आपल्याला खुशी प्राप्त होईल. याकरिता त्याचा असा प्रयत्न असतो की, संसारात काही तरी व्हावे, आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहावे, आपण नावलौकिक कमवावा, धन-दौलत कमवावी, आपले कुटुंबीय व नातेसंबंध चांगल्या प्रकारे निभवावे, या सर्व भौतिक सुखांना प्राप्त करण्यात आपला अमूल्य वेळ या कार्यात खर्च करतो.

आपल्यापैकी बरेचसे लोक स्वतःला शरीर आणि मन समजतात. आपण आपला सर्व वेळ शारीरिक गरजा उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा यांच्या पूर्ती करिता आणि त्याला आराम देण्याकरिता विविध प्रकारच्या खुशी इत्यादींमध्ये व्यतीत करतो. याच बरोबर आपण आपल्या बौद्धिक विकासाकरिता आपला बराचसा वेळ एक चांगलं शिक्षण प्राप्त करण्यात घालवितो. ज्याद्वारे, आपण एक सोनेरी उज्वल भविष्य बनवून या जगात नावलौकिक आणि धन-दौलत कमवू शकू.

आपण जर लक्षपूर्वक पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की, या जगात शारीरिक, मानसिक, बौद्धिक खुशी प्राप्त करीत असताना, आपल्याला अशी भीती वाटत असते की आपण ही यांच्यातच कायमचे गुरफटून जाऊ. यांच्यातले कोणतेही सुख कायमस्वरूपी नाही कारण की या जगातील प्रत्येक वस्तू नाशवान आहे. अशा परिस्थितीत आपण असा विचार करतो की, असे कोणते सुख आहे कि जे सदैव आपल्या बरोबरच राहील. तेव्हा आपले लक्ष आपल्या धर्मग्रंथांकडे व त्यांच्या शिकवणुकीकडे जाते.

महापुरुष आपल्याला समजावितात की आपणास खरे सुख प्राप्त करायचे असेल तर, ते बाह्य जगात नसून ते आपल्या अंतरीच आहे. त्याकरिता आपल्याला आपले लक्ष बाह्य दुनियेच्या आकर्षणा पासून हटवून आपल्या आत्म्याकडे लावलं पाहिजे. आपल्याला हे शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी कोणत्या एखाद्या पूर्ण महापुरुषाच्या चरणकमली जावे लागेल आणि त्यांच्या कडून ध्यान-अभ्यासाची विधि शिकून त्याला आपल्या जीवनाचा भाग बनविता यावा.

जसजसे ध्यान-अभ्यासाला आपण नियमितपणे वेळ देऊ लागतो, आपण आपल्या अंतरी प्रभूच्या ज्योती आणि श्रुतीशी जोडले जाऊन, खरी खुशी अनुभवू शकतो, ज्यामुळे आपला या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला जातो.
ध्यान-अभ्यासाद्वारे आपण प्रभुशी एकरूप होऊ शकतो आणि सदैव टिकणारी खुशी प्राप्त करतो. ध्यान-अभ्यासाची ही विधि प्रत्येक माणूस करू शकतो. भले तो लहान बालक असो वा वृद्ध. बालवयापासूनच ध्यान एकाग्र करण्यास शिकले पाहिजे, ज्यामुळे ही एक चांगली सवय जडेल.

जे लोक ध्यान एकाग्र करण्यास शिकतात, ते आपलं लक्ष संसारिक चिंतेतून हटवून अंतरी असलेल्या आनंदाशी जोडण्यास शिकतात आणि आपल्या अंतःकरणात कायम राहणाऱ्या आनंदाचे अनुभव करतात.

आपण दैनंदिन जीवनाच्या जबाबदाऱ्या निभवत असतानासुद्धा ती खुशी आपल्या बरोबरच असते. जेव्हा आपण कामावर जातो, भले आपण वर्दळी मध्ये गाडी चालविताना अथवा बाजारहाट करताना, मुलांचे संगोपन करताना, दिवस-रात्र, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी ही खुशी आपल्याबरोबर असते. ध्यान-अभ्यास करण्याचा मोठा फायदा असा की जेव्हा आपल्या अंतरी प्रभूच्या दिव्य ज्योती आणि श्रुतीशी आपण जोडले जातो तेव्हा आपल्याला हा अनुभव होतो की प्रभूची शक्ती केवळ मनुष्यप्राण्यातच नव्हे तर सृष्टीतील सर्व जीव-जंतूंच्या आणि झाडा-झुडपात इत्यादींना सुद्धा जीवन देत असते.  तेव्हा आपल्या अंतरी सर्वांच्या प्रती प्रेम, अहिंसा आणि करुणेचा भाव उत्पन्न होतो. आपली इच्छा असते की त्यांचे ही जीवन खुशीने भरलेले राहो.

चला तर, आज विश्वभरात खुशीचा दिवस (International Day of Happiness) साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी आपण ध्यान-अभ्यासा करिता वेळ काढून आपल्या अंतरी असलेल्या शाश्वत खुशीचा अनूभव करूया आणि या विश्वात त्याचा प्रसार करूया.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...