Friday 22 March 2024

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवॉर्ड-२०२४ व मिस, मिसेस इंडिया-२०२४ ग्रँड फॅशन शो उत्साहात संपन्न !!

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवॉर्ड-२०२४ व मिस, मिसेस इंडिया-२०२४ ग्रँड फॅशन शो उत्साहात संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिनेअवॉर्ड-२०२४ व मिस, मिसेस इंडिया-२०२४ ग्रँड फॅशन शो उत्साहात संपन्न झाले. शोचे आयोजन पुण्यातील विमान नगर येथील हॉटेल फोर पॉइंट येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, मराठी चित्रपटातील अभिनेते दीपक शिर्के, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट, सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन, सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आदी गोल्डन लोटस अवॉर्ड  तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट गीत लेखन, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट आदी सिल्वर लोटस अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
          यावेळी बॉलीवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व मराठी चित्रपट अभिनेते दीपक शिर्के यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवार्ड ने आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मराठी चित्रपट अभिनेत्री मोनालीसा बागल, अभिनेते प्रसाद शिखरे, अभिनेत्री अश्विनी बागल, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे महेश थोरवे, कार्यक्रमाचे आयोजक डॉ.अविनाश सकुंडे यांचे असुन शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशाल गोरे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यशोधक या मराठी चित्रपटाच्या टीमला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मिस मिसेस इंडिया -२०२४ या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध वयोगटातील  मॉडेल्सनी आपला रॅम्प वॉक सादर केला. या फॅशन शोमध्ये मिस व मिसेस गटातील स्पर्धकांना क्राऊन व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभाताई कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य अर्जुन चव्हाण, गणेश विटकर आणि सचिन मगर यांनी केले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...