Monday 31 May 2021

दिलासादायक ! रुग्णसंख्येसोबत मृत्यूचा संख्येत सुध्दा घट !!

दिलासादायक ! रुग्णसंख्येसोबत मृत्यूचा संख्येत सुध्दा घट !! 


मुंबई : महाराष्ट्रात आज ३३,००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८८% एवढे झाले आहे.

आज राज्यात १५,०७७ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज १८४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपासून कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेत लॉकडाऊन शिथिल !

आजपासून कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेत लॉकडाऊन शिथिल !


कल्याण: राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अतर्गंत राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. १ जून ते १५ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यातील लॉकडाऊन एकदम न उठवता टप्प्या टप्प्याने उठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यापद्धतीने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जीवनावश्यक आणि इतर दुकानांच्या वेळांसाठी महापालिकेकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

दुकानांच्या वेळांसाठी नवीन नियम :

1) सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2) अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल.

3) दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार.

4) कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल.

5) कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यँत सुरू राहतील.

6) दुपारी 2 नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे 2 नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

7) अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने ( मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.

8) अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार

9) यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील.

क्रीडा संस्थाकडून गोररिब व गरजूंना अन्नधान्य वाटप !!

क्रीडा संस्थाकडून गोररिब व गरजूंना अन्नधान्य वाटप !!


कल्याण :-  येथील शिवशौर्य फाउंडेशन च्या वतीने कौशल्य नगर मोहटा देवी मंदिर उल्हासनगर 3 येथील बुद्ध विहार याच्या आजूबाजूच्या गोरगरिबांना आणि गरजू लोकांना श्री संदीप ओंबासे सचिव -  टायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते लॉकडॉन च्या काळापासून दुसऱ्यांदा अन्यधान्य वाटप रविवार 30/5/2021 रोजी करण्यात आले.
 

या कार्यक्रमासाठी युथ ऑफ टुडेज अमु चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब कल्याण यांचाही सहभाग होता कौशल नगरात शंभर कुटुंबांना हे धान्य एक महिना पुरेल असा  किट वाटण्यात आले ज्यामध्ये तांदूळ, डाळ, तिखट, मीठ, तेल, पीठ याचाच समवेश होता. 


हे कार्य करण्यासाठी जय जाधव, स्वप्निल ओंबासे,  राजेश मानवडे, ग्रंथाली  कराडकर, दीपक बडवणे, कमल सोनवणे, ईश्वर सोनवणे, तेजस माणगावकर, वैभव पवार, उमेश मैत्रे, नरेश बाविस्कर, करण पवार, सागर सुरवाडे, श्वेता देवनळे, प्रणाली गायकवाड, कमलेश अहिरे व सुदर्शन दुधाणे याचे सहकार्य लाभले..

भिवंडीत सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेपाची शिक्षा !

भिवंडीत सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेपाची शिक्षा !


अरुण पाटील, भिवंडी :
          मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना १२ ऑक्टोबर २०१७ रोजी भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवजी नगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर नारपोली पोलिसांनी मोठ्या भावाला आईच्या तक्ररीवरून अटक केली होती. शनिवारी या खुनाच्या गुन्ह्याची अंतिम सुनावणी होऊन जिल्हा प्रधान तथा जिल्हा सत्र वरिष्ठ न्यायधीश एस. आर. जोशी यांनी आरोपी मोठ्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
             सुनील माने (३२) असे शिक्षा ठोठावलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर आकाश माने (१९) असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे.भिवंडी शहरातील देवाजीनगर भागात कौशल्या माने आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना मयत  आकाश (१९) आणि सुनील (३२) अशी दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे लग्न झाले असून दोन नातवंडेही त्यांना आहेत. मृत आकाशला दारूचे व्यसन होते. तो नेहमी मोठा भाऊ सुनील याला शिविगाळ करत होता. तसेच त्याला मारहाणही करायचा. तो काहीही काम करत नव्हता. तसेच चोऱ्या करून नशेबाजी करीत असल्याने घरच्यांनी मृत आकाशला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला होता .
              मात्र तो कधीही व काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा .१२ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या रात्री घरी येऊन मयत आकाश आईकडे दारूसाठी ५०० रुपयांची मागणी केली. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो घरातून बाहेर पडला.रात्री पुन्हा दारूच्या नशेत आकाश घरी आला मात्र, मोठा भाऊ सुनील याने त्याला दारू "न " पिण्याबाबत बजावले असता तेंव्हा त्याने भावाला शिवीगाळ केली. तसेच त्याच्याकडे देखील दोन हजार रुपयांची मागणी करून घरातून बाहेर पडला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा घरी आलेल्या मयत आकाशला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जोरजोरात शिव्या देऊ लागल्याने याच रागातून मोठा भाऊ सुनीलने घरातील लाकडी दांडक्याने आकाशला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. नंतर  आकाशला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
               तेंव्हा या प्रकरणात बाबबत  न्यायालयात १२ साक्षीदारांकडून साक्ष नारपोली पोलीस ठाण्याचे त्यावेळेचे पोलीस उपनिरीक्षक गोराडे  यांनी न्यायालयात वेळो वेळी आरोपी विरोधात पुरावे सादर केले. तर खुनाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा न्यायालयाने १२ साक्षीदारांकडून साक्ष घेतली. तसेच सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी काम पहिले. तर संपूर्ण कार्यवाहीत खटला चालविण्यास एच. सी. गौरवा पचेगावकर यांनी सहकार्य केले.

रायते येथील उल्हास नदीवर तर दहागाव मधील बारवी वर पर्यटकांचा "कु" मेळा, कोरोना गर्दीत बुडून मेला?

रायते येथील उल्हास नदीवर तर दहागाव मधील बारवी वर पर्यटकांचा "कु" मेळा, कोरोना गर्दीत बुडून मेला?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाची शहरापेक्षा ग्रामीण भागातील गंभीर स्थिती पाहून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढील पंधरा दिवसांचा लाॅकडाऊण वाढवला आहे. तसेच कोरोना मुक्त गाव ही संकल्पना राबविण्याचे अवाहन केले आहे. परंतु कल्याण ग्रामीण भागात येणाऱ्या रायते येथील उल्हास नदीत आणि दहागाव आंबेशिव दरम्यान च्या बारवी नदीत काल अक्षरशः कुंभ मेळा भरला होता. त्यामुळे येणारे जाणारे मिश्किल पणे या गर्दीकडे बघून, कोरोना पाण्यात बुडून मेला 'असे म्हणत होते.


कोरोनाच्या संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू केली, शिवाय काही जिल्हात कडक लाॅकडाऊण लागू केला. परिस्थिती पाहून १५ /१५ दिवसांनी यामध्ये वाढ करण्यात आली होती. १जून पासून लाॅकडाऊण उठून निर्बंध शिथिल होईल असे प्रत्येकाला वाटत होते. लाॅकडाऊण चा फायदा असा झाला की कोरोना ची रुग्ण संख्या कमी झाली. तसेच कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढले. परंतु दुसरे असे झाले की कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन आले, त्यातच मुक्यरमायसोसिस पेंशट वाढत आहेत. आणि तिसरी लाट आली तर ती लहान मुलांना घातक ठरू शकते असे तज्ञांनी मत व्यक्त केले होते. मे महिन्यातील कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे शहरी भागातील रुग्ण संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात ती वाढत आहेत अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध तसेच ठेवले आहेत. शिवाय ग्रामीण भागातील कोरोना पेंशट कमी होण्यासाठी काही जिल्हामध्ये कडक लाॅकडाऊण लागू करण्याचा इशारा दिला आहे. हे करित असताना त्यांनी "कोरोना मुक्त" ही संकल्पना राबविण्याचे अवाहन केले आहे. यामागे कोरोना मुक्त गाव, तालुका, जिल्हा आणि अखेर राज्य असा हेतू आहे. असे असताना काल म्हणजे रविवारी कल्याण तालुक्यातील रायते येथील उल्हास नदीच्या पात्रात तसेच दहागाव आणि आंबेशिव दरम्यान असलेल्या बारवी नदी पात्रात पर्यटक, रिकामटेकडे, आणि आवशे गवशे. नवशे यांची अक्षरशः यात्रा भरली होती. अगदी लहान मुलापासून ते तरुण, तरुणी, स्त्री पुरुष, अबालवृध्द, वयोवृद्ध यांचा समावेश होता 
ही दोन्ही ठिकाणे अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने येणारे जाणारे बघत, हसत, फोटो काढत, आणि मिश्किल पणे म्हणत, आता कोरोना गर्दीमुळे पाण्यात बुडून मेलाच म्हणून समजा! 

विशेष म्हणजे इतकी गर्दी असतानाही पोलीस "दादा" कुठेही दिसत नव्हते. 

त्यामुळे लाॅकडाऊण उठला की काय? अस असे कित्येकांना वाटत होते. पण अशीच परिस्थिती राहिली तर मात्र तिसरी लाट यायला वेळ लागणार नाही याचा प्रत्येकांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

Sunday 30 May 2021

राज्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले !

राज्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले !


मुंबई : रविवारी राज्यात १८,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,३१,८१५ झाली आहे. आज २२,५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,७१,८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात रविवारी ४०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. 

लॉकडाऊन कायम ! रुग्णसंख्येत घट झालेल्या जिल्ह्यात निर्बंधांमधून दिलासा !!

लॉकडाऊन कायम ! रुग्णसंख्येत घट झालेल्या जिल्ह्यात निर्बंधांमधून दिलासा !!


मुंबई : राज्यातील कडक निर्बंध 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कमी झालेल्या जिह्यांना मात्र निर्बंधांमधून दिलासा देण्यात आला आहे. तेथील आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. आवश्यक गटात नसलेली दुकाने उघडणे आणि त्यांच्या वेळा याचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोडण्यात आलेला आहे. शनिवार, रविवारी मात्र दुकाने बंद राहणार आहेत. याविषयीची नवी नियमावली सरकारने आज जाहीर केली.

दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक महानगरपालिकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येणार आहे.

रुग्णसंख्या कमी झालेल्या जिह्यांसाठी :

ज्या महानगरपालिका आणि जिह्यांमध्ये कोविड संसर्गाचा दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तसेच तेथील ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तिथे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

मॉल्स, शॉपिंग सेंटर्समधील दुकाने उघडण्यास मनाई.

आवश्यक वस्तूंच्यासोबत आवश्यक वर्गात नसलेल्या वस्तूंचे ऑनलाइन वितरण करता येणार.

दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध.

शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार.

उपस्थिती वाढवण्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक

कृषिविषयक दुकाने कामाच्या दिवसांना दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहू शकणार.

पावसाळा, पेरणीच्या हंगामात त्यांच्या वेळा वाढवण्याचे तसेच शनिवार, रविवार सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्राधिकरणावर.

रुग्णसंख्या वाढलेल्या जिह्यांसाठी :

कोरोना पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त आणि एकूण ऑक्सिजन बेड्सपैकी 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील तर असे जिल्हे आणि पालिका क्षेत्रातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

जिह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करणार. कुणालाही आत-बाहेर जाण्यास मनाई

मृत्यू, वैद्यकीय कारण, आणीबाणी असेल तरच परवानगी

कोविड प्रसंगीची सेवा देणाऱया व्यक्तींना परवानगी

दुकानांना पुरवल्या जाणाऱया वस्तूंची वाहतूक कायम राहणार

दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना वस्तूंची विक्री करण्यास मनाई

नियम मोडणारी दुकाने कोरोना साथ संपेपर्यंत बंद ठेवावी लागणार आणि दुकानदाराला दंडही होणार.

भिवंडीत आगी लागण्याच्या घटना सुरूच पुन्हा मोती कारखान्याला भीषण आग.!

भिवंडीत आगी लागण्याच्या घटना सुरूच पुन्हा 
मोती कारखान्याला भीषण आग.!


अरुण पाटील, भिवंडी :
            भिवंडीत अग्नी तांडवच्या घटना वारंवार घडत आहेत. आता शहरातील नारायण कंपाऊंड येथे असलेल्या एका प्लॉस्टिक मोती कारखान्याला आग लागल्याचे समोर आले आहे. शनिवारी (29 मे) रात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोती कारखाना जाळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे हा मोती कारखाना नागरी वस्तीत दाटीवाटीच्या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरल
     या भीषण आगीत कंपनीतील साठा व मशीन्स जळून खाक झाल्या आहेत. तसेच या मोती कारखान्यात केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थ, प्लॉस्टिक दाना, व  दाण्यापासून तयार करून ठेवलेला माल याचा साठा होता. त्यामुळे आग लागताच काही क्षणातच कारखान्यात आगीने रौद्र रूप धारण केले, त्यात  संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. विशेष म्हणजे मोती कारखान्यात यावेळी कामगारही काम करीत होते. आगीची घटना समजताच सर्व कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढला. त्यामुळे
जीवितहानी कोणालाही दुखापत झालेली नाही.
        आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या  2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 तास अथक प्रयत्न केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु आहे. आगीचे कारण अध्यापही समजू शकले नाही. या आगीत लाखो रुपयांचा मोत्यांचा साठा व मशीन्स जळून खाक झाल्या. या आगीमुळे परिसरातील नागरीवस्तीत धुराचे लोट पसरले होते.
          भिवंडीतील अग्नीतांडव थांबणार कधी?भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये बेकायदेशीर मोती कारखाने आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असे अति धोकादायक केमिकल व साहित्य असलेला साठा केला जातो. या साठ्यांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. 4 वर्षांपूर्वीही याच परिसरातील एका मोती कारखान्याला आग लागली होती. यात २ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने शहरातील मोती कारखाने बंद करण्याचे फर्मान काढून संबंधित कारखाना मालकांना नोटिसी बजावल्या होत्या.
       मात्र पालिकेची ती कारवाई कागदावरच राहिल्याचे दिसून आले. तर 2 वर्षांपूर्वी भिवंडी-ठाणे महामार्गावरील राहनाळ येथे लाकडाच्या वखारीला आग लागली होती. त्यामुळे येथे झोपेत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये दापोडा येथे लागलेल्या आगीत ३ कामगार होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
        भिवंडीतील यंत्रमाग कारखाने व गोदामांना वारंवार आगी लागण्याचे सत्र सुरुच आहे. त्यात आज मोती कारखान्याला लागलेल्या आगीच्या निमित्ताने भिवंडीतील अग्नितांडव थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष?भिवंडीत मोती कारख्यांनासह यंत्रमाग कारखाने, गोदामे, तसेच डाइंग व सायजिंग यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, महापालिका व पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचेही या आगींच्या घटनांकडे पुरता दुर्लक्ष होत आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल निर्माण झाला

Saturday 29 May 2021

भिवंडीत शिवसेनेला मोठं खिंडार; सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा पक्ष व जिप सदस्यत्वाचा राजीनामा.!

भिवंडीत शिवसेनेला मोठं खिंडार; सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा पक्ष व जिप सदस्यत्वाचा राजीनामा.!


अरुण पाटील, भिवंडी :
          भिवंडी तालुक्यात सर्वपरिचीत असलेले सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा ) हे धडाडीचे नेतृत्व, मात्र सुरेश म्हात्रे यांनी यापूर्वीही काही कारणास्तव शिवसेनेला रामराम ठोकला होता. नंतर बाळ्या मामानी पुन्हा सेनेत प्रवेश केला. तेंव्हा पक्षश्रेष्टीनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत  सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना तब्बल दोन वर्षे कोणतीही जबाबदारी " न ". देता त्यांना शिवसैनिक म्हणून वागणूक दिली. सेनेच्या या वागणुकीमुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती.


         त्या कारणाने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. बाळ्या मामा यांनी आपले वैयक्तिक कारण पुढे करत शिवसेना सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे . 
            विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते. तेव्हा पासूनच बाळ्या मामा हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेस सोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरु आहे. त्याचबरोबर आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बाळ्या मामा यांनी हा राजीनामा दिला असल्याचेही बोलले जात आहे. जर तसे झालेच तर येणाऱ्या २०२४ ची लोकसभेची निवडणूक‌‌ नक्कीच चुरशीची होणार आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे खिंडार पडणार असल्याचे मत राजकीय विश्लेषना कडून बोलले जात आहे.

म्हापण ग्रामपंचायततर्फे झाले दुसऱ्यांदा लसीकरण !

म्हापण ग्रामपंचायततर्फे झाले दुसऱ्यांदा लसीकरण !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामधील म्हापण ग्रामपंचायत सरपंच अभय ठाकुर व उपसरपंच अशोक पाटकर तसेच आरोग्यसेवक प्रविण परब, आरोग्य सेविका शलाका वालवलकर यांच्या विशेष परिश्रमातून नुकतेच दुसऱ्यांदा यशस्वी लसीकरण करण्यात आले. यावेळी १०० डोस देण्यात आले. स्थानिक रहिवाश्यांकडून सरपंच अभय ठाकुर व उपसरपंच अशोक पाटकर,आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

Friday 28 May 2021

राज्यातील कोरोनाबाधित होत आहे घट ! पण मृत्यूदर विचार करायला लावणारा !!

राज्यातील कोरोनाबाधित होत आहे घट ! पण मृत्यूदर विचार करायला लावणारा !!


मुंबई : महाराष्ट्रातील संपूर्ण एप्रिल महिना वेगाने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मे महिन्याच्या शेवटाकडे आता ओसरु लागली आहे. नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ३० हजारांच्या खालीच राहत असून ती आता वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे.
राज्यात शुक्रवारी दिवसभरात एकूण २० हजार ७४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० एवढा झाला आहे. पण, सध्या राज्यात त्यातील फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मृतांचा आकडा ५०० च्या खाली उतरला आहे. राज्यात आज दिवसभरात ४२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के एवढा झाला आहे.

भिवंडीत वळ गावात लागलेल्या आगीत एक मजली कौलारू घर जाळून खाक.!

भिवंडीत वळ गावात लागलेल्या आगीत एक मजली कौलारू घर जाळून खाक.!


अरुण पाटील, भिवंडी :
            भिवंडी तालुक्यातील गोडाऊन पट्ट्यात आगीच्या विविध घटना घडत असतानाच वळ ग्रामपंचायत हद्दीतील एका एक मजली कौलारू घरास आग लागून संपुर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले आहे . 
         वळ गावातील श्याम भोईर ,जनार्दन भोईर, निराबाई भोईर व कैलास भोईर या भोईर कुटुंबाचे  सामायिक एक मजली कौलारू घर होते. शुक्रवारी (दिं.28) रोजी  सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वरच्या मजला वर शॉर्ट सर्किट ने अचानक आग लागली, या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारन करून ही आग संपूर्ण घरात पसरली. कैलास भोईर यांच्या दोन मुलांचे नुकताच लग्न झाले असून त्या लग्नात मिळालेले मानपान व आहेराच्या साहित्यसह  ठेवलेले ए.सी. यंत्राने पेट घेतला.त्यात कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन संपूर्ण सिलिंग व कौलारू छत कोसळले.
              आगीची माहिती मीळताच स्थानिकानीं आग विझवाण्याचा प्रयत्न करून नतर नारपोली पोलिसांसह अग्निशामक दलास पाचारण केले. त्यानंतर तब्बल एक तासाने अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी वळ गावचे सरपंच राम भोईर ,पोलीस पाटील गिरीधर पाटील यांसह अनेक ग्रामस्थ युवक यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेची नोंद नारपोली पोलिसांनी घेतली असून घटना स्थळी तलाठी सजा -पूर्णा चे  श्री. सुधाकर कामडी यांनी आगीतील नुकसानीचा पंचनामा केला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील यांची बिनविरोध निवड !

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील यांची बिनविरोध निवड !


अरुण पाटील, भिवंडी :
         ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नियोजन भवन सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, ठाणे अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तथा सभा सचिव अजिंक्य पवार हे उपस्थित होते.
         या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने या पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, ठाणे अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील या अंबरनाथ तालुक्यातील चरगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडुन आल्या आहेत. याप्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

मुंबई - नासिक महामार्गा वरील तळवली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, स्थानिकांचा आरोप.!

मुंबई - नासिक महामार्गा वरील तळवली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, स्थानिकांचा आरोप.!


अरुण पाटील, भिवंडी :
           मुंबई - नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका इथं उड्डाणं पुलाचे आणि दोन भुयारी मार्ग बनवण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रथम या परिसरातील सर्व्हिस रोड बनवण्याचे काम सिगल इंडिया या कंपनीने घेतले आहे. मात्र सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून मुरूम, माती न टाकता फक्त रॅबिट, कचरा आणि दगड टाकण्यात आले असून पाणी मारणे आवश्यक असताना देखील पाणी मारण्यात येत नसल्याने सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांन कडून होत असून भविष्यात सदर  रस्ता ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासने जातीने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांन कडून बोलले जात आहे.
         भिवंडी - कल्याण रोडला जोडणारा तळवली सर्कल महत्वाचा असून या मार्गांवरून नाशिक, कल्याण, खोपोली, पुणे या ठिकानाहून  दररोज हजारो वाहने ये -जा करत असतात. या महामार्गावार सुरु असलेल्या कामाकडे  प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे तळवली नाका येथील सर्व्हिस  रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे जि काम करणाऱ्या सिगल इंडिया कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे..
      मुंबई - नाशिक महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे होण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करणे आवश्यक आहे मात्र तळवली नाका येथील सर्व्हिस रोडच्या कामासाठी चक्क रॅबिट, दगड आणि कचऱ्याची भरणी करण्याचा धक्कादायक प्रकार सिगल इंडिया कंपनी कडून करण्यात येत आहे वास्तविक मुरूम आणि मातीचा भराव करून त्यावर पाणी मारून रोलर फिरवणे गरजेचे असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शासनाची दिशाभूल करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे मात्र महामार्ग प्रशासन या कामा बाबत झोपेचे सोंग घेऊन गप्प बसले आहे..
        तळवली नाका येथील सर्व्हिस रोडचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने महामार्ग प्रशासने संबंधित सिगल इंडिया कंपनीवर कारवाई करणे आवश्यक आहे कारण काही दिवसाने याच ठिकाणी उड्डाणं पूलाचे आणि भुयारी मार्ग बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे  जर सर्व्हिस रोडचेच काम निकृष्ट दर्जाचे होत असताना देखील संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर नियोजित उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग सुद्धा निकृष्ट दर्जाचे बनवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होण्याची समभावना आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने वेळीच सर्व्हिस रोडचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवून सदर बांधकाम करणाऱ्या सिगल इंडिया कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे, या संदर्भात महामार्ग प्रशासनातील टेक्निकल मॅनेजर दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करू असे सांगितले आहे.

आमची लढाई सरकारसोबत, कोणत्याही जातींविरोधात नाही. मराठा आरक्षण व हक्कांबाबत आम्ही कटिबद्ध – शिवसंग्राम जिल्हाप्रमुख अविनाश सावंत

आमची लढाई सरकारसोबत, कोणत्याही जातींविरोधात नाही. मराठा आरक्षण व हक्कांबाबत आम्ही कटिबद्ध – शिवसंग्राम जिल्हाप्रमुख अविनाश सावंत
 
       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : ५ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर रद्द केले आणि भविष्यातील लाखो तरुणांचे भविष्य दोलायमान  झाले. कित्येक तरुण तरुणींचे मानसिक खच्चीकरण झाले बहुसंख्यांक शेतकऱ्यांची मुले असल्यामुळे कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले होते. 
      एमपीएससी तथा विविध स्पर्धा परीक्षा मधून निवड मिळवली परंतु आरक्षण गेल्याने या सरकारने कोणालाही नियुक्ती दिली नाही. शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही. रोजगार नाही, आता तरुणांनी नेमके करायचे काय? हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. आरक्षणासाठीची विद्यमान सरकारची भूमिका, शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी विविध योजना, सवलती या व इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ५ जूनला बीड येथे सर्व समाजबांधव, विविध संघटना, अनेक राजकीय व सामाजिक संघटना यांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाच्या बळावर एक अभूतपूर्व मोर्चा शिवसंग्रामचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार विनायकराव मेटेसाहेब ह्यांच्या अधिपत्याखाली होणार आहे असे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश सावंत ह्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
     नुकतीच ह्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर शिवसंग्राम आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी ह्याची ऑनलाइन मीटिंग होऊन अनेक गोष्टींचा ऊहापोह आणि मोर्चाची रणनीती ठरविण्यात आली. दि.५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘लढा आरक्षणाचा’ ही संकल्पना प्रमाण मानून “मराठा क्रांती संघर्ष मोर्चा” ह्या नावाने हा मोर्चा आयोजित केला असून आमची लढाई ही सरकारसोबत आहे, कोणत्याही जातींच्या विरोधात नाही असे प्राधान्याने स्पष्ट करण्यात आले. आमदार मेटेसाहेब पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या मनात नक्कीच पाप आहे त्यामुळेच  ते मराठा समाजासाठी काहीच निर्णय करायला तयार नाहीत.    
     सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काम ठप्प आहे, अनेक शैक्षणिक सोयीसुविधा मिळत नाहीत या व इतर अनेक महत्वाच्या  बाबींकडे सरकारचे लक्ष वेधावे ह्यासाठीच कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा हजारोंच्या संख्येने पार पडणारच असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखविला.    
जिल्हाध्यक्ष श्री अविनाश सावंत पुढे म्हणाले की, समाजाच्या प्रश्नांवर कोणीही विरोध करू नका, आरक्षण आणि हक्क ही काळाची गरज आहे. गरीब मराठ्यांना आरक्षणाचे संरक्षण देऊन त्यांचे जीवनमान इतर बहुजनांच्या पातळीवर आणण्यासाठी गेली ३५/४० वर्षे समाजाने जबर संघर्ष केला. राजकीय, सामाजिक, रस्त्यावरची, न्यायालयीन इ. सर्व पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेकांनी प्राणार्पण केले पण अजूनही हा समाज केवळ सरकारी अनास्थेपोटी आहे तिथेच आहे. 
      मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ! एकूण ३५% मराठ्यांतील मोजके ५ ते १०% श्रीमंत, बागाईतदार, राजकारणी, सहकार-शिक्षण सम्राट इत्यादी सोडले तर इतर भूमिहीन, अल्पभूधारक, कष्टकरी,शेतमजूर, हमाल, माथाडी, कामगार, रिक्षाचालक, घरेलू काम करणारे, हातावर पोट असणारे आदी समाजातील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी लढायचे आहे.
मराठा क्रांती मोर्चात आम्ही "सामाजिक भान" काय असते हे जगाला दाखवलंय. 
      आत्ता ५ जूनला बीड येथे निघणाऱ्या "मराठा क्रांती संघर्ष मोर्चात" सर्व कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करून परत एक एल्गार  जगाला दिसेल. मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटाइझर इत्यादी आवश्यक त्या साधनांचा वापर करीत हा मोर्चा निघणार आहे. 
     हा मोर्चा मराठ्यांसाठी न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व संघटनांसाठी मुक्त तर आहेच पण इतर समाजासही तो मुक्त आहे.       
     सदर मोर्चास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेटीगाठी चालू असून विविध संघटनांचे प्रमुख, सकल मराठा समाज पदाधिकारी, अनेक क्षेत्रांतील मान्यवर,विविध समविचारी संघटना ह्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनंत देशमुख, कार्याध्यक्ष शंकरराव थोरवे, उपाध्यक्ष आप्पा सत्वे जिल्हा सदस्य रमेश मते, ऋषिकांत पोतदार आणि ईतर पदाधिकारी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत असेही शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत ह्यांनी शेवटी सांगितले. 
 

पंचरत्न मित्र मंडळ चेंबुरतर्फे वाशी गाव चेंबुर येथे अन्नधान्य व मास्क वाटप !

पंचरत्न मित्र मंडळ चेंबुरतर्फे वाशी गाव चेंबुर येथे अन्नधान्य व मास्क वाटप !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
         सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड, खजिनदार सचिन साळुंखे  यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने  मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम, वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातीलशाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे. कोविड-१९ काळातही लाँकडाऊन सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले.आज चेंबुर येथील वाशी गाव, मुंबई-७४ येथे प्रमुख पाहुणे सुहास शेलार (कार्यकारी संचालक आर.सी.एफ), पंचरत्न मित्र मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड, कविता संतोष शिंकतोडे (संचालिका- जि.एस.के महाविद्यालय), तसेच स्नेहा नानिवडेकर, वैभव घरत, हनुमंता चव्हाण (पिंकू),राजेश मेस्री, संदिप पाटील, निलम गावंड, डाँ.विनित गायकवाड यांच्याहस्ते अन्नधान्य व मास्क वाटप करण्यात आले. प्रस्तावना स्नेहा नानिवडेकर यांनी करताना सांगितले की, पंचरत्न मित्र मंडळाने आजवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवश्यकच तेथे मदतीचा हात सातत्याने दिला आहे. देत आहे न यापुढेही देत राहिल. मंडळाचे कार्यकर्ते समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने सतत मदतीचा हात देत असतात. प्रत्येकाने गरजूंना मदत करावी ही मदत करत आसताना जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही. तर प्रमुख पाहुणे आर.सी.एफ कार्यकारी संचालक सुहास शेलार यांनी मंडळ राबवित असलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करा. स्वःता सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा मोलाचा सल्ला यानिमिताने दिला. कोविड-१९ चे सर्व नियमानुसार हा अन्नधान्य व मास्क वाटप कार्यक्रम अंत्यत साधेपणाने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ पदाधिकारी,सदस्य व सभासद,हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.

Thursday 27 May 2021

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर ! पण मृत्यूदर कायम !!

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर ! पण मृत्यूदर कायम !!

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के पार झाले आहे. गुरुवारी २४ तासांत राज्यात २१ हजार २७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९२ हजार २२५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात अजूनही ३ लाख १ हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

परप्रांतीय नागरिकांचे लोंढे राज्यात पुन्हा लागले परतू !!

परप्रांतीय नागरिकांचे लोंढे राज्यात पुन्हा लागले परतू !!


ठाणे : कोरोनाची पहिली लाट ओसरताच गावी गेलेले परप्रांतीय कामानिमित्ताने पुन्हा महाराष्ट्रात (मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, इ.) दिशेने परतू लागले. काही महिने हाताला काम मिळते ना मिळते तोच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊन आपले हाल होतील या भीतीने आधीच परप्रांतीयांनी पुन्हा गावची वाट धरली; परंतु आता कोरोनाची दुसरी लाटही काही प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यामुळे आता परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रात (मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, इ.) दिशेने येऊ लागले आहेत; परंतु कोरोना चाचणीपासून लपण्यासाठी अनेकांनी रेल्वे स्टेशन किंवा इतर ठिकाणांहून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला होता. अशातच मागील काही दिवसांत परप्रांतीय येण्याची संख्या वाढू लागल्याने राज्यात महापालिका व राज्य शासनाकडून स्टेशन परिसरात अँटिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. स्टेशनवर उतरल्या उतरल्या अशा नागरिकांना हेरून त्यांची चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात चाचणी करून घेण्यासाठी काही दिवसांपासून रांगा वाढल्याचे चित्र दिसत आहे.

फक्त ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात २० मे ते २६ मे दरम्यान ठामपाच्या माध्यमातून स्टेशन परिसरात पाच हजार ७३५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ५७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. 

असाच धोका संपूर्ण राज्यात असल्याने व परत महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांनी आधी कोरोना चाचणी करावी, मगच राज्यात प्रवेश करावा, असे आवाहन आता राज्य शासनाकडून केले आहे.

राज्यात लॉकडाऊन कायम; निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा !

राज्यात लॉकडाऊन कायम; निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा !


मुंबई : मुंबईसह राज्याच्या शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक आहे. त्यामुळे सध्या लागू असलेला लॉकडाऊन कायम ठेवून निर्बंध शिथिल करण्याबाबत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना नेमके कोणते निर्बंध शिथिल करायचे याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत येत्या १ जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली.
निर्बंध शिथिल करताना सध्या दुकानांना दिलेल्या वेळेत आणखी वाढ करायची का, अन्य दुकानांना मुभा द्यायची का यावर येत्या दोन-तीन दिवसात बारकाईने अभ्यास होऊन निर्णय होईल, असेही टोपे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतो आहे. एकदम लॉकडाऊन न उठवता तो १ जूननंतर वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने विभागास निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

वाल्मिकी आबेडकर आवास योजना वसाहत कचोरे याला वाली कोण?-

वाल्मिकी आबेडकर आवास योजना वसाहत कचोरे याला वाली कोण?-  


'वेळेवर विकास कामे न केल्यास आमदार खासदार पालकमंत्री हरवले अशी तक्रार पोलीस आयुक्त ठाणे याच्या कडे करण्याची प्रहार पक्षाची  मागणी' - डॉ आदर्श भालेराव


कल्याण:- कल्याण शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत विकास कामे करण्यात येत आहेत मात्र शहराचा भाग विकास कामापासून वंचित राहिल्याचे पाहायला मिळत आहे. वाल्मीकि आंबेडकर आवास योजना वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक कचोरे 45 मधील परिसरात रस्त्याचे वाताहत झाल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या परिसरातून जाताना कसरत करावी लागत आहे. पथदिवे सुद्धा बंद अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहेत त्यामुळे चोरी व महिला छेडछाड सारखे गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यायाबात पोलीस यत्रना निकामी ठरत आहे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे परिसराला वाली कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पालिकेच्या असुविधा मुळे अनेक मुलांना अपघाताचा सामना करून आपला जीव गमवावा लागला. परिसरात रोग राई असल्याने आजारी पडून अनेक नागरिक दगावले असताना देखील पालिका प्रशासन गप्प!

परिसरात पथदिवे व संरक्षण भित नसल्याने मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे.

पालिकेने पुनर्वसन केलेल्या परिसरात संरक्षण भित नसल्याने अनेक भूमाफिया याच्या निर्माण झाला व त्याच्या मुळे परिसरात अनधिकृत बांधकामांचे शुरुवात झाली. पालिकेने पुनर्वसन केलेल्या वसाहत आता झोपडपट्टी च्या नावा ने ओळखले जाते. नक्की मुख्य धोरण हेच आहे का? पालिकेची हजारो घरे पडीत पडले आहेत त्या मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाणात वाढ झाली तरी पालिका प्रशासन मूग गिळून गप्प!

पुनर्वसन च्या नावाखाली खोटे आश्वासन देवून  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने केलेल्या पुनर्वसन कचोरे येथील वाल्मिकी आबेडकर आवास योजना वसाहत परिसरा ला कोणतेही सोय सुविधा न देणारे पालिका अधिकारी कोठे लापता झाले आहेत याचा ही शोध अद्यापही लागत नाही.
दुर्गाडी ते पत्रिपुल रस्ता रुंदीकरण करताना  सदनिका धारकांना मोठ मोठे आश्वासन देवून गेल्या 15 वर्षा पासून नागरिकांची फसवणूक करण्यात आले आहे. 60 एकर च्या परिसरात पुनर्वसन धारकांना अनेक विकास कामाचे आरखडे दाखवून शाळा आरोग्य केंद्र, समाज मंदिर, अंगणवाडी केंद्र, गार्डन चागले रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन, मोठे नाले, कचरा कुंडी, परिसरास सुशोभीकरण साठी चौक व प्रवेशद्वार नागरिकांना संपूर्ण परिसर साठी संरक्षण भित असे अनेक आश्वासन पालिका अधिकारी याच्या कडून पुनर्वसन सदनिका धारकांना देण्यात आले होते. पण आता पर्यत एकही अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनकडे लक्ष दिले नाही. 60 एकर  च्या जागेत  पालिकेने वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, बी एस यु पी योजना वसाहत निर्माण केले आहे त्या सदनिकाधारक यांच्या साठी असलेले आरक्षण जागेत अनेक अनधिकृत झोपड्या ही बांधण्यात आले आहे त्यामुळे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे वाल्मीकि आंबेडकर आवास योजना वसाहतीतील नागरिकांसाठी विकास कामासाठी कोणतीही जागा शिल्लक उरलेली नाही महापालिकेने पुनर्वसन करतेवेळी संरक्षण भिंत निर्माण केली असती आज वाल्मीकि आंबेडकर आवास योजना वसाहतीतील नागरिकांना विकास कामासाठी शिल्लक असलेली जागेचा वापर करता आला असता अनेक वेळा वारंवार तक्रार करूनही अनाधिकृत बांधकामाला महापालिका अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात होते त्यामुळे त्या परिसरात शेकडो अनाधिकृत झोपड्या तयार करण्यास नागरिकांना यश आले आहे. पुनर्वसन झाल्या पासून एकही पालिका अधिकारी यांनी पुनर्वसन झालेल्या परिसराकडे लक्ष दिले नाही. हीच शोकांतिका आहे. खोटे आश्वासन देवून नागरिकांना राहत्या घरातून असुविधा असलेल्या वातावरण आणून सोडणे हे आहे का पालिकेचा विकास?  नक्की कोणत्या नागरिकांना साठी सुख सुविधा निधी खर्च करते गुंतलेल्या प्रशासनाला पुनर्वसन झालेल्या नुकसान पाहण्यासाठी वेळ मिळेल का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

श्रीकृष्ण नगर ते चौधरी वाडी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे नागरिकांना प्रवासी यांना जाण्या-येण्यात समस्या निर्माण होत आहे विकासापासून वंचित असणाऱ्या परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना रस्त्यामधील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे 
2019 मध्ये चौधरी वाडी ते श्रीकृष्ण नगर येते रिलायंस गॅस ची पाइपलाइन च्या कामा मुळे  रस्ता खराब झाल्या आहे. रस्ता. दुरुस्ती साठी रिलायन्स गॅस कंपनी कडून 3.60 लाख रुपये पालिकेत भरणा केली आहे तरी पालिकेने चौधरी वाडी ते श्रीकृष्णनगर पर्यंतचे रस्त्याचे काम करण्यास दुर्लक्ष केले आहे.

अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून देखील पालिका प्रशासन विकास कामासाठी निधी उपलब्ध नाही असे बतावणी करून नागरिकांच्या भावनेशी खेळत आहेत असे प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ अंबादास उर्फ आदर्श भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले

Wednesday 26 May 2021

राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात; बरेच दिवसांनंतर बाधितांचा आकडा जास्त !

राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात; बरेच दिवसांनंतर बाधितांचा आकडा जास्त !


मुंबई: राज्यात 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे. राज्यात एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.76% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे.

रितिका भोसले ठरली सुवर्ण पदकासह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू "ग्रैंड चैंपियन" ची मानकरी !

रितिका भोसले ठरली सुवर्ण पदकासह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू "ग्रैंड चैंपियन" ची मानकरी !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

           ईशान्य मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील रहिवाशी डाँ.सुहास भोसले व शिक्षिका रिता सु.भोसले यांची कन्या रितिका सुहास भोसले हिने कॉमनवेल्थ दिवस निमित्त आयोजित पहिल्या इंडो श्रीलंका वर्चुअल कराटे चैंपियनशीप - २०२१ मध्ये १६ ते १७ वयोगटात काता या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.तसेच या स्पर्धेत भाग घेतलेल्या भारत व श्रीलंका च्या एकूण २१८ खेळाडूंवर मात करीत सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू "ग्रैंड चैंपियन" हा किताब जिंकून डबल यश मिळवले. इंटरनेशनल इंडो र्यू दो फेडरेशन चे कोच फ्राज शेख सर यांच्या मार्गदर्शन खाली रितिकाने हे यश संपादन केले.

कल्याण तालुक्यातील कोलम गावात आदिवासी बांधव व पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप, युवा मंचचा पुढाकार!

कल्याण तालुक्यातील कोलम गावात आदिवासी बांधव व पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप, युवा मंचचा पुढाकार! 


कल्याण, (संजय कांबळे) : जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध  यांच्या बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून सामाजिक महिला कार्यकर्त्या मनिषा जाधव यानी कोलम गावात आदिवासी बांधव व कल्याण तालुक्यातील पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप केले पतीच्या ६ व्या स्मृतिदिननिमित्त जपली सामाजिक  बांधिलकी जपत भरत दळवी युवा विकास मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
 

कल्याण  तालुक्यातील  ग्रामीण भागातील मालशेज- नगर या राष्ट्रीय महामार्गानजीक वसलेल्या कोलम गावात तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधुन गणेश पार्क टिटवाला येथे राहणाऱ्या सामाजिक  महिला कार्यकर्त्या मनीषा जाधव यानी आपले पती दिवंगत प्रताप जाधव यांच्या ६ व्या स्मृतिदिननिमित्त भरत दळवी युवा विकास मंचच्या माध्यमातून येथील आदिवासी बांधव व कल्याण तालुक्यातील पत्रकार यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मदतीचा हात म्हणून  अन्नधान्य कीट वाटप केले.  


कोविड-१९ या आजाराच्या कालावधीत अन्नधान्याचे साहित्य वाटप करून  तथागत बुद्धांचे तत्त्वज्ञानानुसार गोरगरिबांना केलेली मदत ही खऱ्या अर्थाने बुद्धपौर्णिमा साजरी केल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. यावेळी  कोलम गावच्या सरपंच प्रिती राऊत, महिला कार्यकर्त्या लतिका राऊत, गुरुकुल योगा बाग संस्कार संस्थेचे अध्यक्ष रवि शर्मा, श्वेता जाधव, सुमेश जाधव, यश गायकवाड़, कोलम येथील  सामाजिक कार्यकर्ते संतोष राऊत, महिला कार्यकर्त्या सुनंदा राऊत, कल्पना राऊत, अनुसया राऊत, कमलाकर राऊत, जेष्ठ पत्रकार संजय कांबळे, साप्ताहिक ठाणे अरुणोदयचे प्रतिनिधी  एकनाथ सोनावणे, आदी उपस्थित होते, तसेच सदर उपक्रम राबविण्याची संकल्पना व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी युवा मंचचे अध्यक्ष भरत दळवी सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद राऊत, रोहित राऊत, पवन चोरघे, यश राऊत यानी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी हरी ओम किराणा स्टोअर्सचे मालक संतोष राऊत यानी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालून लोक शिक्षण व लोक जागृती करणा-या पत्रकारांच्या पाठिशी भक्कम पणे व संपुर्ण ताकदिसह उभे  राह्याला हवे असे मत अध्यक्ष भरत दळवी यांनी व्यक्त केले. 

Tuesday 25 May 2021

गरजूंना चाईल्ड उन्नती फाउंडेशनचा मदतीचा हात !

गरजूंना चाईल्ड उन्नती फाउंडेशनचा मदतीचा हात !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
   चाईल्ड उन्नती फाऊंडेशन, मुंबई चेअरमन दिलीप धडस यांच्या प्रयत्नातून गरीब गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करून कोरोनाच्या महामारीत झालेलं सामाजिक काम खूप कौतुकास्पद आहे.चाईल्ड उन्नती फाऊंडेशन तर्फे धारावी, मुंबई, तसेच सातारा जिल्ह्यातील काही खेडेगावमध्ये गरजू कुटुंबियांना अन्न धान्य रेशन वाटप करण्यात आले असून कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही या संस्थेने अनेक गरजू कुटूंबियांना मदतीचा हात दिला होता. त्याचबरोबर रुग्णालयातील लहान बालकांवरील शस्त्रक्रिया वेळी सुद्धा त्या गरजूंना आर्थिक मदत करत असतात. ही संस्था सातत्याने लोकांना मदत करत असते.

Monday 24 May 2021

राज्यात रुग्णसंख्येत घट ! परिस्थितीत सुथारणा !! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ % !!!

राज्यात रुग्णसंख्येत घट ! परिस्थितीत सुथारणा !! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ % !!!


मुंबई  : महाराष्ट्रात आज ४२,३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ % एवढे झाले आहे.

आज राज्यात २२,१२२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ३६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३२,७७,२९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,०२,०१९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,२९,३०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,२७,५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात रेडझोन मधील जिल्हे वगळता लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता ! "मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार"

राज्यात रेडझोन मधील जिल्हे वगळता लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता ! "मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार"


मुंबई : करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 31 मे पर्यंत लाॅकडाऊन लागू आहे. मात्र सध्या राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने 1 जूनपासून रेडझोनमधील 14 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत लाॅकडाऊन शिथील होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत हे संकेत दिले आहेत.

तसेच मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

रेड झोनमधील जिल्हे
बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे.

मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे दुखणं पायाला आणि पट्टी डोक्याला ! "आ. नाना पटोले यांची टीका"

मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे दुखणं पायाला आणि पट्टी डोक्याला ! "आ. नाना पटोले यांची टीका"


मुंबई, दि. २४ मे २०२१:
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाबाबतचा चेंडू आता केंद्र सरकारच्या पारड्यात आहे. पण त्यांची एकंदर भूमिका म्हणजे 'दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला' अशी असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केली आहे. 


राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला पटोले व चव्हाण यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, डॉ. संजय लाखे पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. पटोले म्हणाले की, मागील भाजप सरकारने चुकीच्या पद्धतीने कायदा करून मराठा समाजाची दिशाभूल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याच्या एसईबीसी कायदा टिकवण्यासाठी संसदेमध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल. परंतु, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष मराठा समाजात संभ्रम निर्माण करत आहे. हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. ही वस्तुस्थिती मराठा समाजालाही लक्षात आली आहे. मराठा आरक्षण हा राजकीय वाद किंवा मतांच्या राजकारणाचा विषय नाही. या समाजाला न्याय मिळावा, ही आमची भूमिका असून, त्यासाठी आमची लढाई कायम राहील. मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामागे काही राजकीय व्यवस्था आहे. मराठा समाजाला मदत मिळावी, ही भूमिका घेऊन खा. संभाजी राजे महाराष्ट्राचा दौरा करणार असतील तर त्याला विरोध करायचे कारण नाही. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ आदींना जादा निधी देऊन मराठा समाजाच्या सवलती कायम रहाव्यात, अशीच काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी पुढे सांगितले.

*मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, हीच काँग्रेस पक्षाची भूमिकाः अशोक चव्हाण*

काँग्रेस पक्षाचे मराठा आरक्षणाला पूर्ण समर्थन आहे. ते आरक्षण मिळाले पाहिजे, हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्याकरीता जे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न आम्ही करीत असल्याचे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या मागील सरकारने जनतेची दिशाभूल करून अधिकार नसताना घेतलेल्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने  पोलखोल झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या कायद्याची सर्वोच्च न्यायालयाने चिरफाड केली आहे. सध्या राज्य शासन तीन विषयांवर काम करते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रखडलेली नोकरभरती मार्गी लावणे, माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या समितीच्या शिफारसी ३१ मे पर्यंत मिळणार असून, त्यानुसार पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब करणे आणि राज्यांच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची अंमलबजावणी करून त्याचा अधिकाधिक लाभ मिळवून देणे, असेही चव्हाण पुढे म्हणाले.

लग्नाच्या वाढदिवसाला दिलेला एक किलोचा सोन्याचा हार निघाला नकली, भिवंडीतील घटना !

लग्नाच्या वाढदिवसाला दिलेला एक किलोचा सोन्याचा हार निघाला नकली, भिवंडीतील घटना !


भिवंडी : मे महिन्यात अनेक जोडपी लग्न बंधनात अडकत असतात. त्यामुळे मे महिन्यात अनेकांच्या लग्नाचे वाढदिवस देखील साजरे करण्यात येत असतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती पत्नी एकमेकांना भेटवस्तू देखील देत असतात.  मात्र भिवंडीतील कोनगाव येथील एका पतीने लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने आपल्या पत्नीला चक्क एक किलो सोन्याचा हार भेट दिला. या भेटीने पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पत्नीने हा हार भेट देतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला. त्यानंतर व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत नवरा हार भेट देतांना हिंदी चित्रापटाचे  गाणे गातांना देखील दिसत आहे. एन लोकडाऊन काळात नवऱ्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला आपल्या बायकोला एवढा महागडी भेट दिल्याने तालुका, जिल्ह्या बरोबरच राज्यात सर्वत्र या गिफ्टची मोठी चर्चा रंगली होती. 

भिवंडीतील तालुक्यातील कोन गाव येथील रहिवासी बाळा कोळी यांनी आपल्या लग्नाच्यावाढ दिवसानिमित्त आपल्या पत्नीला चक्क एक किलो वजनाचा सोन्याचा हार भेट दिल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोनगाव पोलिसांनी बाळा कोळी यांना पोलीस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला  दिला. त्यावेळी बाळा कोळी यांनी सांगितले की, "हा हार नकली आहे." हार नकली असल्याचे समजताच पोलिसांना देखील आश्चर्य वाटले. 

बाळा कोळी यांनी कल्याणच्या एका ज्वेलर्स मधून 1 किलो ग्रॅम सोन्याचा हार खरेदी करून आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला दिला होता याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या ज्वेलर्स मध्ये जाऊन माहिती घेतली असता ज्वेलर्स मालकाने हा हार नकली असल्याचे सांगितले. तसेच 38 हजार  रुपयांना हा हार खरेदी करण्यात आल्याचे ज्वेलर्स मालकाने सांगितल्यानंतर पोलिसांनाही हा हार नकली असल्या बाबतची खात्री पटली व  हार हा नकली असल्याबाबत ही  निष्पन्न झाले.

दरम्यान अशा प्रकारे सोन्याच्या अलंकारांचा गाजावाजा नागरिकांनी करू नये, अशा प्रकारे सोन्याच्या दागिन्यांची माहिती चोरट्यांना समजली तर त्यामुळे चोरी व दरोड्याच्या घटना घडण्याची शकता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे कोणतीही बाब सोशल मीडियावर टाकून त्याचे प्रदर्शन करू नये असे आवाहन कोनगाव पोलिसांनी केले आहे..

म्हारळ ग्रामपंचायतीची नालेसफाईची कामे अतिंम टप्प्यात, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून करणार उपाययोजना !

म्हारळ ग्रामपंचायतीची नालेसफाईची कामे अतिंम टप्प्यात, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून करणार उपाययोजना !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायती मधील मुख्य नाल्यासह इतर छोट्या मोठ्या अंतर्गत नाल्याची सफाई अतिम टप्प्यात आली असून यावेळी पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन चालू आहे.


कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हणजे १७ सदस्य संख्या असलेल्या आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये पावसाळ्यात म्हारळ सोसायटी, आण्णासाहेब पाटील नगर, शिवानी नगर गोदावरी नगर आदी परिसरात पाणी भरते. ब-याच वेळी नाले तुंबल्याने पाणी जमा होते. त्यातच अनेकांनी नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे केल्याने नाल्याची लांबी रुंदी दिवसेंदिवस कमी झाली आहे. आणि अशात भर म्हणून की काय आता तयार झालेला कल्याण मुरबाड हा २२२ महामार्ग व गावातील मुख्य रस्ता हा सिमेंट काँक्रिटचे असल्याने आणि याची उंची अधिक असल्याने आता सोसायटी, गोदावरी नगर, शिवानी नगर, आण्णासाहेब पाटील नगर आदी भाग अधिक खाली गेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची डोकेदुखी वाढली आहे. म्हणून सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे, उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, सर्व  ग्रामपंचायत सदस्य , कल्याण पंचायत समितीचे सदस्य, झेडपी सदस्य यांच्या सूचनेनुसार गावातील मुख्य नाला सुर्यानगर ते २२२ महामार्ग असा सुमारे १हजार ते १५०० मीटर लांबीच्या नाल्याची साफसफाई प्राधान्याने सुरू केली आहे. पोकळन, जेसीबी, डंपर आणि मनुष्यबळ यांचा वापर करून सुमारे ४/५ टन कचरा दररोज काढून तो डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. याशिवाय प्रत्येक वार्डातील छोटे मोठे अंतर्गत असे हजार ते बाराशे नाल्यांची सफाई देखील सुरू केली आहे. तसेच जिथे शक्य आहे, पाणी भरते तिथे भूमिगत गटार योजना राबविण्याचा विचार ग्रामपंचायत करित असल्याचे सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे यांनी सांगितले. तर जनतेने नाल्यात गाद्या, उश्या, प्लास्टिकच्या पिशव्या, इतर वस्तू टाकू नये असे अवाहन उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांचे नुकसान होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करुया. 
म्हारळ ग्रामपंचायतीची नालेसफाईची कामे अतिंम टप्प्यात, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून करणार उपाययोजना !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायती मधील मुख्य नाल्यासह इतर छोट्या मोठ्या अंतर्गत नाल्याची सफाई अतिम टप्प्यात आली असून यावेळी पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन चालू आहे.


कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हणजे १७ सदस्य संख्या असलेल्या आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये पावसाळ्यात म्हारळ सोसायटी, आण्णासाहेब पाटील नगर, शिवानी नगर गोदावरी नगर आदी परिसरात पाणी भरते. ब-याच वेळी नाले तुंबल्याने पाणी जमा होते. त्यातच अनेकांनी नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे केल्याने नाल्याची लांबी रुंदी दिवसेंदिवस कमी झाली आहे. आणि अशात भर म्हणून की काय आता तयार झालेला कल्याण मुरबाड हा २२२ महामार्ग व गावातील मुख्य रस्ता हा सिमेंट काँक्रिटचे असल्याने आणि याची उंची अधिक असल्याने आता सोसायटी, गोदावरी नगर, शिवानी नगर, आण्णासाहेब पाटील नगर आदी भाग अधिक खाली गेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची डोकेदुखी वाढली आहे. म्हणून सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे, उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, सर्व  ग्रामपंचायत सदस्य , कल्याण पंचायत समितीचे सदस्य, झेडपी सदस्य यांच्या सूचनेनुसार गावातील मुख्य नाला सुर्यानगर ते २२२ महामार्ग असा सुमारे १हजार ते १५०० मीटर लांबीच्या नाल्याची साफसफाई प्राधान्याने सुरू केली आहे. पोकळन, जेसीबी, डंपर आणि मनुष्यबळ यांचा वापर करून सुमारे ४/५ टन कचरा दररोज काढून तो डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. याशिवाय प्रत्येक वार्डातील छोटे मोठे अंतर्गत असे हजार ते बाराशे नाल्यांची सफाई देखील सुरू केली आहे. तसेच जिथे शक्य आहे, पाणी भरते तिथे भूमिगत गटार योजना राबविण्याचा विचार ग्रामपंचायत करित असल्याचे सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे यांनी सांगितले. तर जनतेने नाल्यात गाद्या, उश्या, प्लास्टिकच्या पिशव्या, इतर वस्तू टाकू नये असे अवाहन उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांचे नुकसान होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करुया. 

युवा प्रेरणा प्रतिष्ठाण बनले अनाथांचा आणि निराधारांचा आधार !

युवा प्रेरणा प्रतिष्ठाण बनले अनाथांचा आणि निराधारांचा आधार !


नालासोपारा, (शांत्ताराम गुडेकर) :

       संपूर्ण जगभर गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू महामारी रोगाने थैमान घातलेला आहे. या महामारी च्या काळात अनेक सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन हे विस्कळीत झाले असतानाच युवा प्रेरणा प्रतिष्ठाण अनाथांचा आणि निराधारांचा आधार  बनले आहे. हे प्रतिष्ठाण गेल्या पाच वर्षा पासून नालासोपारा, ठाणे, गोरेगाव, मिरारोड, वाडा व अन्य ठिकाणी आपले अनमोल सहकार्य करत आहे. प्रतिष्ठाणचे (संस्थापक श्री. यश चंद्रशेखर माने ) यांचे कार्य म्हणजे नोकरी करून आलेला सर्व पगार या अनाथांना बहाल करणारे तरुण नेतृव आजवर कोठेच पहालयला मिळत नाही. अशा नेतृत्वाला आणि त्यांच्या विचाराना जोड मिळाली ती म्हणजे त्यांचे २०० शिलेदार अतोनात मेहनत घेऊन आपले शंभर प्रतिषद योगदान देत आहेत. यात सर्व सहकारी असून श्री. ओमकार राणे, सेफ- श्री आकाश रायत, आदित्य खैर, हरीश सिह, अनिकेत हजरा, आणि सर्व तरुण  सहकारी आपले योगदान देत आहेत. 
           या युवा प्रेरणा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून  आजवर असंख्य निराधार व अनाथांना आणि गरजूना सहकार्य मिळत आहे. विशेषतः या प्रतिष्ठाणमध्ये २०० सभासद असून सर्व सभासद तरुण आहेत. आणि विशेषतः शिक्षण घेत असताना हे सर्वात मोठे योगदान आपल्या प्रतिष्ठाणला देत आहेत. रंजल्या गांजल्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून या प्रतिष्ठाणला सुरवात झाली ती म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षा पासून. शाळेतून घरी येता जाता रस्त्यावरील अनाथ व निरक्षर मुले पाहुन त्या मुलांना वह्या व शिक्षण सामुग्री देऊन त्याच ठिकाणी म्हणजेच रस्त्यावरच शिक्षणाचे धडे या प्रतिष्ठाणने द्यायला सुरू केले ते आजवर अबाधित आहे. या सेवे सोबत ज्या व्यक्तींना अन्न मिळत नाही त्या व्यक्तींना स्वतः अन्न शिजवून त्यांच्या पर्यंत ते पोहोचवण्या साठी हे प्रतिष्ठाण कठिबद्द आहे. आज पर्यंत यात कोणताही खंड पडलेला नाही. शिवाय पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आदिवासी  वस्तीतील जनजीवन म्हणजे सर्व सुविधांपासून वंचित असलेले नागरिकांना प्रथम पाण्याचे टँकर व जीवनावश्यक वस्तू या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून  पोहोचवले जात आहे. खास करून तेथील महिला व झोपडपट्टी मधील महीला मासिकपाळी असताना सॅनिटरी पँड च्या ऐवजी कपड्याचा वापर करतात आणि त्या पासून खूप आजार होतात याचे महत्व पटवून दिले व तेथील महिलांना सॅनिटरी पँड वाटप करण्याचे आगळे वेगळे सहकार्य करण्यात आले. विशेषतः या समाजसेवेपलीकडे कोणताही हेतू नसून केवळ समाज सेवा आणि अनाथांची सेवा हाच उद्धेश प्रतिष्ठानने उराशी बाळगला आहे. रस्त्यावरील अनाथ मुले फक्त आकाशात गवसणी घालणारे विमान पाहून समाधान मानत होते. प्रत्यक्ष त्यात बसण्याचे स्वप्न कधीच साकार होणारे नसताना ते स्वप्न सत्यात मात्र युवा प्रेरणा प्रतिष्ठाणने उतरवले आणि नालासोपारा येथे त्या अनात मुलांना चक्क हँलिकॉप्टरने गगनाला गवसणी घातली. त्यामुळे  प्रतिष्ठाण व श्री. यश माने कायमचे हंलिकॉप्टर दादा या नावाने आज नावारूपाला आले आहेत. या प्रतिष्ठाणला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना प्रत्येकजण आपल्या खिशाला कात्री मारून हे अनमोल सगकार्य करत आहे. त्यात आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसताना खऱ्या अर्थाने हे उभे राहिलेले युवा प्रेरणा प्रतिष्ठाण आज शासनाला देखील प्रेरणादायी ठरत आहे. युवा पिडीतील हे सर्व सहकारी आपला वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून अनाथ मुलांना शिक्षण देत आहे. याहून अजून कोणतेही उदाहरण या सहकार्य पलीकडे मिळणे कठीण आहे. रविवार दिनांक २३ मे २०२१ रोजी खास श्री. यश माने यांच्या वाढदिवसा निमित्त नालासोपारा येथे रस्त्यावरील निराधार नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या वेळी बोलताना श्री. यश माने म्हणाले की, माझे व माझ्या युवा प्रेरणा प्रतिष्ठाणचे संपूर्ण जीवन मी ही जनसेवा करत राहणार आहे. आणि खास करून या सेवेसाठी माझ्या सर्व सहकारी वर्गाचे मी आभार मानतो कारण हे निस्वार्थी सहकारी मिळाले नसते तर मी आज ही जनसेवा करू शकलो नसतो त्या मुळे याचे व या सेवेचे संपूर्ण श्रेय माझ्या सहकारी वर्गाला जात आहे अशीच सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू असे आश्वासनही यानिमिताने दिले.

Sunday 23 May 2021

महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्या आटोक्यात !

महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्या आटोक्यात !


मुंबई : आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 26 हजार 672 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात तब्बल 29 हजार 177 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात सध्या 3 लाख 48 हजार 395 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आज राज्यात 594 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.59 टक्के एवढा आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना पाहायला मिळत आहे. असाच आकडा कमी होत राहिल्यास महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 51 लाख 40 हजार 272 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे महाराष्ट्रात हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

मातोश्री ट्रस्टचे विश्वस्त डॉ.मनोज चव्हाण यांच्या तर्फे जैतापूर आरोग्य केंद्रास औषधे व इतर सामग्रीची मदत !

मातोश्री ट्रस्टचे विश्वस्त डॉ.मनोज चव्हाण यांच्या तर्फे जैतापूर आरोग्य केंद्रास औषधे व इतर सामग्रीची मदत !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/समीर खाडिलकर)  : 

         मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांनी करोना रुग्णांवर उपचाराकरीता लागणारी सर्व औषधांचा संच, पी पी इ किट फेस शिल्ड मास्क फेस मास्क व हॅंड सॅनिटायझर असे सर्व साहित्य जैतापूर आरोग्य केंद्रास सुपुर्द केले. डॉ. मनोज चव्हाण हे मातोश्री ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने राज्यातील अनेक कोविड रुग्णालयास लागणाऱ्या गोष्टी औषधे लागतील तसे पुरवठा करत आहेत. जैतापूर आरोग्य केंद्रास औषधे व इतर साहित्यांची गरज आहे हे जैतापूर मधील समाज सेवक तसेच मनसे चे कार्यकर्ते जयेंद्र कोठारकर यांच्या कानावर येताच त्यांनी याची माहिती ताबडतोब ट्रस्टचे रत्नागिरी प्रमुख अरविंद मालाडकर यांच्या करवी डॉ. मनोज चव्हाण यांच्या पर्यंत पोहोचवली व त्यांनीही अधिक विलंब न करता ताबडतोब मदत उपलब्ध करून दिली. वादळग्रस्तांच्या भेटी करिता कोकण दौऱ्यावर असलेले मनसे चे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई व शिरीष सावंत तसेच खेड चे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते हि मदत आरोग्य केंद्रास सुपूर्द करण्यात आली. तसेच पुढील आठवड्यात अजून एक मदत फेरी होइल व अजून जे काही लागेल ते ट्रस्टच्या उपलब्धते नुसार पोहोच करू असे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आश्वस्त केले.
या प्रसंगी डॉ. मनोज चव्हाण यांचे सोबत ट्रस्टचे संदीप परब, सचिन रणदिवे, रत्नागिरी प्रमुख अरविंद मालाडकर बिपिन शिंदे पंकज पंगेरकर अमोल श्रिनाथ श्रीकृष्ण पेडणेकर चिंदरकर अमोल साळुंखे सुनिल साळवी तसेच आरोग्य केंद्राचे डॉक्टर व स्टाफ उपस्थित होता. या मदत कार्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर परांजपे यांचे विशेष सहकार्य लाभले.

भिवंडी-काल्हेर रेतीबंदरवर तहसीलदार पाथकाची कारवाई ,सक्शन पंप व लोखंडी बार्ज गॅस कटरने कापून खाडीत बुडवले !

भिवंडी-काल्हेर रेतीबंदरवर तहसीलदार पाथकाची कारवाई ,सक्शन पंप व लोखंडी बार्ज गॅस कटरने कापून खाडीत बुडवले !


भिवंडी,अरुण पाटील :

ठाणे जिल्ह्यात रेती उपसा करण्यास राज्य सरकारने बंदी घातली असताना देखील भिवंडी तालुक्यातील विविध खाडी पात्रातून रेती माफीया कडून दिवस रात्र सक्शन पंप लोखंडी बार्जच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून महसूल रूपाने शासनाचे लाखों रुपयांचे नुकसान व पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना मिळाली असता त्यांनी रेती उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले


तेंव्हा भिवंडी तहसीलदार श्री. अधिक पाटील यांनी आपल्या पथकाच्या मदतीने काल्हेर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रेती बंदर खाडी किनारी छापा टाकून 20 लाख रुपये किमतीचे दोन सक्शन पंप व लोखंडी बार्ज क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून एक बार्ज हा गॅस कटरने कापून खाडी पात्रात बुडविण्यात आले आहेत.तर एक बार्ज व एक सक्शन पंप जप्त करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार श्री. अधिक पाटील यांनी दिली .


भिवंडी तालुक्यातील काल्हेर खाडी ,कशेळी खाडी , वेहले खाडी, पिंपळास खाडी ,कोनगांव खाडी, खारबांव खाडी, अलीमघर खाडी, अंजूर खाडी, या नदी -खाडी पात्रातून दररोज लाखों ब्रास अवैध रेती उपसा करून शासनाचे लाखो रुपयांच्या गौण खनिजांचे नुकसान करून पर्यावरणाचा -हास सुरु आहे. मात्र महसूल खात्याकडून या रोज सुरु असलेल्या या अवैध गौण खनिज वाळू (रेती ) उपस्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या कारवाई नंतर लगेचच 'दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा खाडी पात्रातून वाळू उपस्याला वाळू माफियांनी सुरवात केली' आहे. आता या बाबत महसूल खाते पुढची कारवाई कधी करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी तहसीलदार श्री.अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी सजेतील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे पथक तयार करून महसूल पथकाद्वारे सकाळी काल्हेर रेतीबंदर खाडी पात्रात कारकाई केली. ही कारवाई सुरू असताना लोखंडी बार्ज वर काम करीत असलेले कामगारांनी पाण्यात उड्या घेऊन पलायन केले. या अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीया विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सदर लोखंडी बार्ज कोणाचे आहेत याचा तपास सुरू केला आहे. पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मालोजी शिंदे करीत आहेत.

मोहिली पावशेपाडा पोहच रस्त्याचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन, अनेक गावांना होणार फायदा!

मोहिली पावशेपाडा पोहच रस्त्याचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन, अनेक गावांना होणार फायदा!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील मोहिली ते पावशेपाडा यांना जोडणाऱ्या पुलाचे काम जवळपास पूर्ण होऊन देखील जागेच्या वादामुळे हा रस्ता गेल्या कित्येक महिन्यापासून रखडला होता. अखेर आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर याच्या कामाला सुरुवात झाली असून या पोहच रस्त्याचे उद्घाटन आज आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाले. यामुळे परिसरातील १०/१५ गावांना शहरी भागात येण्या जाण्यासाठी फायदा होणार आहे.


उलहासनदी मुळे कल्याण तालुक्याचे विभाजन झाले आहे. एका बाजूला मोहना, आंबिवली, टिटवाळा, खडवली उबार्णी, बल्याणी, मांडा अशी मोठी शहरे, यांच्याच बाजूला मोहिली, मानवली, संतेचा पाडा, वासुद्री, फळेगाव, घोटसई,  सांगोडा, कोढेरी, गुरवली, निंबवली, मोस, उशीद, तर नदीच्या दुसर्‍या बाजूला म्हारळ, वरप, कांबा, उल्हासनगर, बिर्लागेट, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर अशी मोठी शहरे व गावे यांना एकमेकांकडे जायचे यायचे असेल तर शहाड उड्डाण पूल, गोवेली किंवा तिकडिल लोकांना या शहरात यायचे असेल तर याच मार्गाने ये जा करावे लागत होते. यामुळे वेळ व पैसा खर्च होत होता.


त्यामुळे मोहना वाशियांनी अंबरनाथ चे आमदार किसन कथोरे यांना मोहिली ते पावशेपाडा असा उल्हास नदीवर पूल बांधून पोहच रस्ता बांधण्याची मागणी केली आहे. त्यावेळी आमदार किसन कथोरे यांनी तात्काळ याला मान्यता देऊन नाबार्ड २३ अंतर्गत सुमारे ५ कोटी रुपये मंजूर केले होते. यांनतर येथे प्रत्यक्ष काम सुरू झाले. ७ गाळयांचा पुल मोहिली बाजूकडून पुर्ण झाला. पण पावशेपाडा बाजूला एका सिंधी व्यापा-याने या विरोधात राष्ट्रपती पर्यंत तक्रार केली होती. त्यामुळे हे काम गेली काही महिने रखडले होते. मागील वर्षी आलेल्या पुरामुळे व काही भुरटय़ा चोरांनी पुलाचे संरक्षक पाईप कापून नेले होते.आमदार किसन कथोरे यांचा मतदारसंघ बदलाला असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. 
परंतु मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी मतदार संघ बदलला तरी पुन्हा या रस्त्यावर लक्ष केंद्रित करून नाबार्ड मधून पुन्हा या रस्त्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर केला. त्याचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या पुलापासून ते कल्याण मुरबाड महामार्गा पर्यंत सुमारे १२०० मीटर लांबीचा रस्ता असून बाजूच्या गटारांची लांबी ३०० मीटर इतकी आहे.

Saturday 22 May 2021

म्हारळ गावातील म्हारळेश्वर विद्यालयाचा सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता !!

म्हारळ गावातील म्हारळेश्वर विद्यालयाचा सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हारळेश्वर विद्यालयाचा सचिव दिलीप हिंदूराव याला याच विद्यालयाच्या एका शिक्षिकेकडून साडेसात लाख रुपयांपैकी पहिलाहफ्ता तीन लाख रुपये 
घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे या भ्रष्टाचारात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह अजून कोण कोण मोठ मोठे मासे गळाला लागणार हे तपासात निष्पन्न होणार आहे. परंतु या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 


कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीत नेहमीच काहीतरी नवीन घडत असते. या गावात सन १९८३ मध्ये म्हारळेश्वर विद्यालय नावाने शाळा सुरू झाली. इयत्ता ५ वी ते १० वी पर्यत येथे शाळा असून ही विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहे. या शाळेमुळे परिसरातील मुलांची शिक्षणाची सोय झाली. खरे. ट्रस्ट च्या माध्यमातून ही शाळा असल्यामुळे येथे सर्व अलबेल आहे. या शाळेचे सर्वेसर्वा दिलीप हिंदूराव हे असून त्यांचा कोचिंग क्लासेस देखील आहेत. हेच या शाळेत शिक्षक असल्याने ही मुले क्लासला घ्यायची त्यामुळे सगळे कसे अलबेल सुरू असताना या विद्यालयात मुरबाड तालुक्यातील शिरोशे या गावातील श्रीमती झापडे (माझी सरपंच) या शाळेत नोकरी लागल्या. कामावर रुजू होताना काही रक्कम दिली. पण मध्यंतरी यांना ब्रेक देण्यात आला. परंतु यांना परत कामावर घेण्याचा प्रस्ताव ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. तसे प्रस्ताव ठाणे येथे पाठविण्यात आले होते. परंतु यासाठी शिक्षणाधिकारी चित्रा भार्गव यांनी विद्यालयाचे ज्याईन सेक्रेटरी दिलीप हिंदूराव यांच्या मार्फत पैशाची मागणी केली होती यानुसार श्रीमती झापडे यांनी या बाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी म्हारळेश्वर विद्यालयाच्या परिसरात सापळा रचला असता हिंदूराव यांनी रंगेहाथ पकडण्यात आले. या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलीप हिंदूराव याला कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून रितसर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात याच विद्यालयाचे एक ट्रस्टीला विचारले असता ते म्हणाले, विनाअनुदान शाळांचे नियम अनेक वेळा बदलत असतात. या शिक्षिका झापडे यांचा प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतु त्यांनी पैशाची मागणी केली होती. व ते सर्व पैसे ज्याईन सेक्रेटरी दिलीप हिंदूराव यांच्या जवळ दे ते मला सोमवारी देतील असे सांगितले होते. व त्यानुसार हे पैसे हिंदूराव यांच्या टेबलवर ठेवले होते. आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असा खुलासा यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. 

या बाबतीत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून याकरिता बराच वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तपरंतु या प्रकरणामुळे शिक्षण विभागाचे कोण कोण या जाळ्यात अडकतात. तसेच इतर कोणी ट्रस्टच्या सदस्याचा समावेश आहे का हे तपासून निष्पन्न होईलच.पण शिक्षणाधिकारी चित्रा भार्गव यांना देखील अटक होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे परंतु या कारवाईमुळे कल्याण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...