Sunday 23 May 2021

भिवंडी-काल्हेर रेतीबंदरवर तहसीलदार पाथकाची कारवाई ,सक्शन पंप व लोखंडी बार्ज गॅस कटरने कापून खाडीत बुडवले !

भिवंडी-काल्हेर रेतीबंदरवर तहसीलदार पाथकाची कारवाई ,सक्शन पंप व लोखंडी बार्ज गॅस कटरने कापून खाडीत बुडवले !


भिवंडी,अरुण पाटील :

ठाणे जिल्ह्यात रेती उपसा करण्यास राज्य सरकारने बंदी घातली असताना देखील भिवंडी तालुक्यातील विविध खाडी पात्रातून रेती माफीया कडून दिवस रात्र सक्शन पंप लोखंडी बार्जच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून महसूल रूपाने शासनाचे लाखों रुपयांचे नुकसान व पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना मिळाली असता त्यांनी रेती उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले


तेंव्हा भिवंडी तहसीलदार श्री. अधिक पाटील यांनी आपल्या पथकाच्या मदतीने काल्हेर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रेती बंदर खाडी किनारी छापा टाकून 20 लाख रुपये किमतीचे दोन सक्शन पंप व लोखंडी बार्ज क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून एक बार्ज हा गॅस कटरने कापून खाडी पात्रात बुडविण्यात आले आहेत.तर एक बार्ज व एक सक्शन पंप जप्त करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार श्री. अधिक पाटील यांनी दिली .


भिवंडी तालुक्यातील काल्हेर खाडी ,कशेळी खाडी , वेहले खाडी, पिंपळास खाडी ,कोनगांव खाडी, खारबांव खाडी, अलीमघर खाडी, अंजूर खाडी, या नदी -खाडी पात्रातून दररोज लाखों ब्रास अवैध रेती उपसा करून शासनाचे लाखो रुपयांच्या गौण खनिजांचे नुकसान करून पर्यावरणाचा -हास सुरु आहे. मात्र महसूल खात्याकडून या रोज सुरु असलेल्या या अवैध गौण खनिज वाळू (रेती ) उपस्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या कारवाई नंतर लगेचच 'दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा खाडी पात्रातून वाळू उपस्याला वाळू माफियांनी सुरवात केली' आहे. आता या बाबत महसूल खाते पुढची कारवाई कधी करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी तहसीलदार श्री.अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी सजेतील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे पथक तयार करून महसूल पथकाद्वारे सकाळी काल्हेर रेतीबंदर खाडी पात्रात कारकाई केली. ही कारवाई सुरू असताना लोखंडी बार्ज वर काम करीत असलेले कामगारांनी पाण्यात उड्या घेऊन पलायन केले. या अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीया विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सदर लोखंडी बार्ज कोणाचे आहेत याचा तपास सुरू केला आहे. पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मालोजी शिंदे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...