Saturday 31 October 2020

खेड दापोली चे आमदार योगेश कदम यांची गोरेगांवला भेट ! गोरेगांवकरांनी केले स्वागत !!

खेड दापोली चे आमदार योगेश कदम यांची गोरेगांवला भेट ! गोरेगांवकरांनी केले स्वागत !! 


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड - दापोलीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. योगेश कदम यांनी गोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मुख्तार शेट वेलासकर यांच्या निवासस्थानी भेट देवून गोरेगाव विभागातील विकास कामांची माहिती घेतली. या प्रसंगी बोलताना महाविकास आघाडीतून गोरेगाव चा विकास करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या विभागात आजपर्यंत फक्त खासदार सुनील तटकरे साहेबांनी विकास कामे केली आहे अशी मुख्तार शेट यांनी माहिती दिली. यापुढे महविकास आघाडीतून गोरेगावमधील विकासकामे केली जातील असे सांगून कोणत्याही विभागाचे काम सांगितले तरी करून देण्याचे आमदारांनी आश्वासन दिले. तसेच नगरविकास मंत्री अब्दुल सत्तर आज मंडणगड येथे येत असून त्यांच्या खात्याची कामे करून  देता येतील असे सांगितले.
      गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बसी, उपसरपंच विनोद बागडे, माजी उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, सदस्य सलीम राखांगी, ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी पितळे,  मोहिनी गोरेगावकर, इस्वलकर, वर्षा लाड यांनी आमदारांचे स्वागत केले, मुस्लिम समाजाच्या वतीने इम्रान मणियार, करदेकर, शब्बीर बावा  लोखंडे यांनी स्वागत केले. वेलासकर यांच्या कुटुंबाने भेटवस्तु  देवून वैयक्तिक स्वागत केले. 
     गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. मुनावर टोल यांनी माणगाव किंवा महाड येथे पासपोर्ट ऑफिस देण्याची मागणी केली. तसेच आर. टी.ओ. कार्यालय माणगाव येथे देण्याची मागणी केली. या वेळी शिवसेनेचे नेते विजयराज खुळे, विकास गायकवाड, अमजद अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण येथे भाजपा चित्रपट कामगार आघाडी चा नियुक्ती समारंभ संपन्न !

कल्याण येथे भाजपा चित्रपट कामगार आघाडी चा नियुक्ती समारंभ संपन्न !


कल्याण : दिनांक 27/10/2020 रोजी कल्याण येथे भाजपा चित्रपट कामगार आघाडीची कल्याण तालुक़ा आणि शहर कार्यकारणी त्याच बरोबर प्रदेश कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आली. ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा , जळगाव जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि नांदेड़ जिल्हा अध्यक्षांची ही नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला कामगार नेते श्री. संजयजी केनेकर साहेब, भाजपा कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. गणेशजी ताठे साहेब यांचे बहुमुल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा चित्रपट कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विजय जी सरोज, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. सत्यवानजी गावडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. संजय रणदिवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत महाडिक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. ॲड. सुरजकुमारजी (सुर्या) पिल्ले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. राकेशजी ठाकुर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. महादेव साळोखे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पुनमजी घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रज्ञाजी पितळे आदी मान्यवर उपस्थित होते...
मान्यवरांकडून यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मन:पुर्वक अभिनंदन करुन मार्गदर्शन केले आणि पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आयोजन / विषेश सहकार्य / आभार
मा.श्री. रविंद्रजी महाडीक
[भाजपा चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव]
सौ ज्योती सुभाष भोईर [नवनिर्वाचीत महाराष्ट्र चित्रपट कामगार आघाडी प्रदेश सहसचिव ]
सौ निता वात्मिक देसले [नवनिर्वाचीत महाराष्ट्र चित्रपट कामगार आघाडी प्रदेश सहसचिव ]
सौ भारती सचिन बुटाला [नवनिर्वाचीत महाराष्ट्र चित्रपट कामगार आघाडी प्रदेश सहसचिव]
श्री अरूण राजपुत
[ठाणे जिल्हा उपाध्यक्ष]
श्री विनायक गोरे
[भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष]
श्री ज्ञानेश्वर सुभाष काकड [नवनिर्वाचीत कल्याण शहर अध्यक्ष भाजपा चित्रपट कामगार आघाडी]
श्री प्रणव भांबुरे [निवेदक / मराठी कलाकार]

Friday 30 October 2020

इंडियन ऑइल तर्फे देशभरासाठी एकच इंडेन रिफील नोंदणी क्रमांक जारी !

इंडियन ऑइल तर्फे देशभरासाठी एकच इंडेन रिफील नोंदणी क्रमांक जारी !


मुंबई, : सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइल तर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर नोंदणीसाठी एक कॉमन नंबर जारी केला आहे. आता ग्राहक 7718955555 या क्रमांकावर गॅस सिलिंडरची नोंदणी करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24x7 उपलब्ध असेल.

या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर नोंदणी करता येऊ शकेल. ग्राहकांसाठी ही मोठीच सोय झाली असून इंडेन LPG रिफील सिलिंडर नोंदणी करणे आता अधिक सोपे आणि सोयीचे झाले आहे. ग्राहक कोणत्याही राज्यात किंवा टेलिकॉम सर्कलमध्ये असले तरी त्यांचा इंडेन रिफील नोंदणी क्रमांक हा तोच राहणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेली वेग-वेगळ्या टेलिकॉम सर्कलसाठी वेगळ्या इंडेन रिफील नोंदणी क्रमांकाची योजना 31.10.2020 च्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी LPG रिफील नोंदणीसाठी एकच कॉमन क्रमांक 7718955555 हा असेल.

ग्राहक केवळ त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून इंडेन LPG रिफील बुक करू शकतात. LPG रिफील बुक करण्याची सुधारित पद्धती आणि मोबाईल नोंदणी खालील प्रमाणे आहे.

(अ) जर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक इंडेन रेकॉर्डमध्ये आधीच नोंदणी केलेला असेल तर IVRS द्वारा एक 16 अंकी ग्राहक ओळख क्रमांक मिळेल. हा 16 अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इंडेन LPG बिल/ इन्वोइस/ कॅश मेमो / सबस्क्रिप्शन वाऊचरवर नोंदला असेल याची दखल घ्यावी. ग्राहकांनी हे निश्चित केल्यावरच रिफील बुकिंग स्वीकारले जाईल.

(ब) जर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक इंडेन रेकॉर्ड मध्ये नसेल तर त्यांनी त्यांचा 7 आकड्याने सुरु होणारा 16-अंकी ग्राहक ओळख क्रमांक टाकून वन टाईम रजिस्ट्रेशन द्वारे मोबाईल नोंदणी करून घ्यावा. ह्याच्या सोबतच त्याच IVRS कॉलवर त्याचे अधिप्रमाणन करून घ्यावे. हे केल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली जाईल आणि LPG रिफील बुकिंग स्वीकार होईल. हा 16 अंकी ग्राहक ओळख क्रमांक ग्राहकांच्या इंडेन LPG बिल/ इन्वॉइस/ कॅश मेमो / सबस्क्रिप्शन वाऊचर वर नोंदला असेल याची दखल घ्यावी.

इंडेन LPG च्या अधिक माहिती साठी आमच्या https://cx.indianoil.in या संकेत स्थळाला भेट द्या किंवा IndianOil ONE mobile app डाउनलोड करून घ्या, असे आवाहन IndianOil- पश्चिम क्षेत्रच्या सर-व्यवस्थापक (कॉर्पोरेट काम्युनिकेशन्स) अंजली भावे यांनी केले आहे

धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी !

धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी !

नवी दिल्ली : धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पास आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातंर्गत देशभरातील ७३६ धरणांचा समावेश असून महाराष्ट्रातील १६७ धरणे आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेटने धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्प (DRIP), टप्पा II आणि III ला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत देशभरातील 736 धरणांचे पुनर्वसन व सुधारणा केली जाईल. यासाठी जागतिक बँक आणि  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) आर्थिक मदत करणार आहे. यासंदर्भातील विषयाला आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पातील टप्पा 1 व 2 साठी 10,211 कोटी रूपयांचा निधी अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागेल. प्रत्येक टप्पा सहा वर्षांचा असणार आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2031 पर्यंत हा कालावधी राहणार असून या दरम्यान दोन वर्षांची पुनरावृत्ती (ओवरलॅपिंग) चा समावेश आहे. या प्रकल्पासाठी बाहेरून 7.000 कोटी रूपये आणि उरर्वीत 3.211 कोटी रूपये कार्यान्वयित एजेंसी (आईए)कडून वहन केले जातील. केंद्र सरकार ऋण देयता च्या स्वरूपात 1024 कोटी रूपये देईल.

या प्रकल्पातंर्गत निवड झालेल्या धरणांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारणे,  धरणांचा विकास शाश्वत रीतीने करणे. धरणांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र व राज्यामंध्ये संस्थात्मक व्यवस्था मजबुत करणे.  धरणे संबंधित विभागांचे सशक्तीकरण करणे.  धरणांच्या माध्यमांतुन महसुल मिळविता येतो का हे तपासणे यासह प्रकल्प व्यवस्थापण करणे या घटकांचा समावेश राहील

रोटरी क्लब ऑफ चोपडा व अमळनेर आयोजित सेमिनार...

रोटरी क्लब ऑफ चोपडा व अमळनेर आयोजित सेमिनार...


"सकारात्मक जगण्याच्या कलेमुळे जीवन सोपे होते - हर्षल जावळे"

चोपडा प्रतिनिधी. :
 आपली जीवनशैली आपण विचार करतो त्याप्रमाणेच होईल.नकारात्मक किंवा सकारात्मक विचारसरणीचा मानवी जीवनावर व्यापक परिणाम होतो.
 पुणे येथील हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट चे रिजनल डायरेक्टर हर्षल जावळे यांनी चोपडा येथील अमरचंद सभागृह येथे रोटरी क्लब ऑफ चोपडा व सह आयोजक रोटरी क्लब ऑफ अमळनेर यांनी,"पॉझिटीव्ह थिंकिंग टू ब्रिंग चेंज युवर लाईफ" या विषयावर आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये ही माहिती दिली.  ते म्हणाले की अति विचार करण्यामुळे आपले मन नकारात्मक विचारांना जन्म देत आहे.  ज्यामुळे लोकांना खूप व्यस्त वाटते. ज्यामुळे आयुष्यातील साधेपणा आणि सहजता संपत चालली आहे. जर आपण मनाला शांत आणि सकारात्मक ठेवण्याची कला शिकली तर मग आपण व्यस्त असताना सुद्धा सहज जीवन अनुभवू शकतो. ते म्हणाले की आपल्या मनात नकारात्मक विचारांना उत्कर्ष होऊ देऊ नका. यामुळे जीवन सोपे आणि संतुलित होते, तसेच "बुद्धीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यस्त दिनचर्येत सुद्धा दिवसातून ठराविक अंतराने मेंदूला आराम आणि विराम दिला गेला पाहिजे असे केले तर बर्‍याच समस्या आपोआप सुटतील, अशा कल्पनांचा अवलंब केल्याने आपण अधिक हलके होऊ. यामुळे लोकांमधील परस्पर संबंध सुधारतात.मानसिक तणाव मानवी जीवनात नैराश्याला कारणीभूत ठरतो. आपण जितके साधे आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करता तितकेच जीवन सोपे होईल."
 रोटरी क्लब ऑफ चोपडा चे अध्यक्ष नितीन आहिरराव यांनी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत केले, चेतन टाटीया यांनी त्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन सचिव रुपेश पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास रोटरी क्लब अमळनेर चे अध्यक्ष अभिजित भांडारकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना चोपडा रोटरी क्लब चा उपक्रमांचे कौतुक केले व उपक्रमात सहभाग करून घेतल्या बद्दल धन्यवाद दिले, सदर कार्यक्रमास संजीव गुजराथी, प्रफुल गुजराथी, एल. एन.पाटील, एम. डब्लू पाटील, पंकज बोरोले, चंद्रशेखर कोष्टी, डॉ अमोल पाटील, प्रदीप पाटील, अर्पित अग्रवाल, गौरव महाले, रमेश वाघजाळे, भालचंद्र पवार, प्रो.धनराज ढगे, शिरीष पालीवाल, डॉ स्वेता वैद्य, देवांशी बाविस्कर, विनोद वैद्य, सनी कोठारी, शेखर मोरे, दिनेश नाईक, रोटरी क्लब चोपडा व रोटरी क्लब ऑफ अमळनेरचे सदस्य उपस्थित होते.

स्वदेस फाऊंडेशन आणि आय.एल.अँण्ड एफ.एस यांच्या संयुक्त विद्यमाने गवंडी प्रशिक्षण वर्गाचे सीईओ डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न !

स्वदेस फाऊंडेशन आणि आय.एल.अँण्ड एफ.एस यांच्या संयुक्त विद्यमाने गवंडी प्रशिक्षण वर्गाचे सीईओ डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न !
 
         बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : स्वदेस फाऊंडेशन ही संस्था गेल्या २० वर्षापासून जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड या तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, आर्थिक विकास, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प अशा विविध विषयांवर काम करीत आहे.
       याचाच एक भाग म्हणून दि.२८ऑक्टोबर २०२० रोजी कार्ले आदिवासीवाडी येथे गवंडी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये एकूण ४५ दिवसात २० युवकांना गवंडी कामाचे शास्त्रोक्त व तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकास (भारत सरकार) यांचे प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे. 
       या वर्गाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शितल पुंड, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी मैनक घोष, श्रीवर्धन पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.भोगे, कार्यक्रम अधिकारी जयवंत गायकवाड, कार्ले ग्रामंपचातीचे सरपंच, ग्रामसेवक श्री.गोवारी, स्वदेस फाऊंडेशनचे तालुका प्रमुख राहुल कटारीया, तुषार इनामदार, प्रसादराव पाटील, दिपक गिऱ्हे, प्रवीण पवार व आय.एल.अॅण्ड एफ.एसचे नागेश लडगे हे उपस्थित होते.

Thursday 29 October 2020

महात्मा फुले पोलिस स्टेशनची आणखी एक गौरवास्पद कामगिरी !!

महात्मा फुले पोलिस स्टेशनची आणखी एक गौरवास्पद कामगिरी !!


कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची झालेली वाढ हा पोलिसांसाठी एक चिंतेचा विषय झाला होता. अशातच दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी उल्हासनगर येथील संभा रामा धुळे ह्यांचा मोबाईल रेल्वे स्टेशन परिसरातील कल्याण दरबार हॉटेल समोरून पायी जात असताना मागून काळ्या रंगाच्या सुझुकी अॅशेस वरुन आलेल्या दोघांतील मागच्या इसमाने त्यांच्या शर्टाच्या खिशातून  मोबाईल हिसकावून घेत पलायन केले. संभा रामा धुळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चिकाटीने मेहनत करून आरोपी १) अविनाश उर्फ लाला विठ्ठल चिकणे, वय २०, रा. उंबर्डे, कल्याण. २) मुनवर मोहम्मद शेख, वय १७, रा. नवीन गोविंदवाडी, कल्याण. यांना अटक करून ६०,००० रुपये किंमतीची सुझुकी अॅशेस, व २८,००० रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा ८८,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच २४ ऑक्टोबर २०२० रोजी सुध्दा वलीपीर रोड, बैलबजार, कल्याण येथे अरहम खलीद टमणे, रा. बाजारपेठ, कल्याण उभे असताना त्यांच्या खिशातून अॅक्टिव्हा गाडीवरून येऊन खिशातून मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले, त्याचा सुध्दा तपास चिकाटी व हुशारीने करून निखिल मंगल ठाकरे, वय २१, रा. सोनाळे, ता. भिवंडी यास अटक करून ९८,००० रुपयांचे ७ मोबाईल व ४५,००० रुपयाची अॅक्टिव्हा असा मुद्देमाल हस्तगत केला.
वरील सर्व कामगीरी मा. पोलिस आयुक्त, ठाणे, विवेक फणसाळकर, मा. सह पोलीस आयुक्त, ठाणे, सुरेशकुमार मेकला, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण विवेक पानसरे, सहायक पोलिस आयुक्त, कल्याण, अनिल पोवार, वपोनि नारायण बनकर, पो. नि.(गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, सपोनि प्रकाश पाटील, सपोउनि जयवंत शिंदे, पोहवा विजय भालेराव, किरण शिर्के, शशिकांत निकाळे, पोना. मनोहर चित्ते, नरेश दळवी, सुनील भणगे, रामचंद्र मोरे, जितेंद्र चौधरी, पोशि. दिपक सानप, योगेश पवार यांनी केला आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेंतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण !

"बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेंतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या “बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना त्यांच्या शैक्षणिक उन्नतीकरिता व शिक्षणास प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते रु. 5 हजार च्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
       यावेळी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, विस्तार अधिकारी (सां.) श्रीमती रंजिता थळे तसेच यशस्वी विद्यार्थीनींचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

माजी पंचायत समिती सदस्य अनिल भाऊ घरत यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा ! *अतिदुर्गम भागातील 100 रक्तदात्यांनी घेतला सहभाग **

माजी पंचायत समिती सदस्य अनिल भाऊ घरत यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा !
*अतिदुर्गम भागातील 100 रक्तदात्यांनी घेतला सहभाग **


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य तथा आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक अनिल भाऊ घरत यांनी दरवर्षी थाटामाटात साजरा होणारा आपला वाढदिवस कुठलाही प्रकारचा गाजावाजा न करता अतिशय साधेपणाने व रक्तदान शिबिर आयोजित करून व स्वतः रक्तदान करून साजरा केला. 
यावेळी अतिदुर्गम भागातील शंभर रक्तदात्यांनी रक्त दान केले. ज्यांनी ज्यांनी यावेळी रक्त दान केले.त्या रक्तदात्यांना स्टीमर मशीन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


               मुरबाड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ' रक्ताचा तुटवडा होत असताना मुरबाड मधील पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत यांनी आपला वाढदिवसाचा गाजावाजा नकरता संपूर्ण दिवस कुटुंबा पासून दूर राहून रक्तदान शिबीरराचे आयोजन करून स्वतः रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त केला. या वेळी प्रत्येक रक्तदात्याला गेली आठ महीन्यापासून कोराना आजारामुळे बाधीत रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता भासत असून 'मागणी पेक्षा पुरवठा कमी होता असल्याने मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून, कच्छ युवक संघ कल्याण यांच्या वतिने अॅन्करवाला रक्तदान अभियान अंतर्गत टोकावडे येथील वनविभागाच्या सभागृहात रक्तदान शिबीर पार पडले.
           मुरबाड पंचायत समितीचे  माजी सदस्य अनिल घरत यांचा 37 वा वाढदिवस निमित्त अतिदुर्गम भागातील जवळपास शंभर दात्यांनी रक्तदान केले.रक्त संकलन, संकल्प ब्लड बँक कल्याण यांनी केले. यावेळी शिबीरास टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, पंचायत समिती उपसभापती अरुणा खाकर, पं.स .सदस्या सीमा घरत यांनी शिबीरास भेट दिली.

Wednesday 28 October 2020

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी वसईत शनिवारी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन !

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी वसईत शनिवारी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन !


"३१ ऑक्टोबर रोजी किसान अधिकार दिवस पाळणार" 

वसई  : शेतकरी व कामगारांवर अन्याय आणि त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकार आणू पाहत असलेल्या कायद्यास कडाडून विरोध करण्यासाठी वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे शेतकरी अधिकार दिवस पाळून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवार दि . ३१ ऑक्टोबर २०२० रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे हुतात्मा दिन आहे. याच दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे किसान अधिकार दिवस पाळण्यात येणार आहे. तसे पत्र नुकतेच वसई तहसीलदारांना देण्यात आले आहे. भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या होऊ घातलेल्या शेतकरी, शेतमजूर तथा कामगार विरोधी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वसई विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते सायं . ४.०० या वेळेत हुतात्मा चौक, पापड़ी, वसई येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे शेतकरी, शेतमजुर, कामगारवर्ग व नागरिकांच्या घरोघरी जाऊन सह्यांची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली आहे .

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रक्रिये विरुध्द प्रहार जन शक्ती पक्ष जाणार मुंबई उच्च न्यायलयात ! - *अंबादास भालेराव*

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रक्रिये विरुध्द प्रहार जन शक्ती पक्ष जाणार मुंबई उच्च न्यायलयात ! - *अंबादास भालेराव*


कल्याण : प्रभाग क्रमांक 45 च्या वार्ड रचनेत वा आ आ यो परिसर, बीएसयूपी परिसर, रमाबाई नगर परिसर वार्ड रचनेत समाविष्ट न केल्यास प्रहार होणार आक्रमक 
कल्याण प्रभाग रचनेच्या घेतलेल्या हरकतीवर योग्य ती दाद न मिळाल्याने  प्रभाग क्षेत्र ४५ कचोरे प्रभागात  सन २००५ मध्ये कल्याण पश्चिम मतदारसंघ १३८ मधील रस्ता रुंदी करणातील हजारो कुटूंब बेघर होऊन कल्याण ग्रामीण १४४ मतदारसंघात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने  वाल्मिकी आंबेडकर आवास योजना अंतर्गत पुनर्वसन केले होते. कल्याण तालुक्यात अनेक जागी रस्ता रुद्दी करून रूम निष्काशीत करून अनेक नागरिकांना कचोरे येते स्थलांतर केले होते. पण २००५ पासून स्थलांतर झालेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणी दुरुस्ती केली गेली नसल्याने गेल्या पंधरा वर्षा पासून वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरातील नागरिकांना विकास कामा पासून वंचित ठेवलं गेले आहे.  

     वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरातील नागरिकांचे मतदान प्रभाग क्रमांक ४५ मध्ये नसल्याने त्या परिसरात आज पर्यत कोणतेही नगरसेवक निधी  खर्च करण्यात आले नाही असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक अंबादास भालेराव यांनी केला आहे. २००५ साली पुनर्वसन केलेल्या परिसराकडे पालिकेने किंवा निवडून आलेल्या नगरसेवकाने आपली निधी खर्च केली नाही त्यामुळे पालिकेने पुनर्वसन केलेल्या परिसरात नळ शोचालाय, गटारे नाले ,ड्रेनेज रस्ते, पथदिवे, क्रीडांगण, शाळा आरोग्य सेवा, पासून सतत वंचित राहावा लागला आहे. 

सन २००५ पासून पालिकेने कोणतेही विकास निधी खर्च केला नाही. महापालिकेत एकूण १२२ वॉर्ड आहेत. प्रभाग क्रमांक ४५ प्रभागात मतदार संख्येत तफावत आढळल्या आहेत. वॉर्ड रचना करताना  २००१ आणि २००५ चा निकष पकडला आहे. पण २००५  ची वॉर्ड रचना २००१ मधील जनगणनेच्या आधारे केली होती तर २०१५ वॉर्ड रचना 2011 जनगणना आधारे करण्यात आली होती. पन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना चा उल्लेख प्रभाग क्रमांक ४५ च्या मतदारसंघाच्या यादीत आला पाहिजे होता पण वार्ड रचना करते वेळी २००५ पासून प्रभाग क्रमांक  ४५ मध्ये असलेल्या परिसराची वार्ड रचनेत उल्लेख केला गेला नाही तशी पुरवणी यादी जोडली गेली नाही तेच निकष २०२० च्या ही प्रभाग रचनेसाठी लावले जाणार आहेत, असा आक्षेप घेऊन भौगोलिक रचना लक्षात घेतली नसल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक यांचे म्हणणे आहे 

प्रभाग क्रमांक 45 च्या मतदारसंघाच्या यादीत वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसर व रमाबाई नगर परिसर व बीएसयूपी परिसराची प्रभाग रचनेत नमूद करून सर्व मतदारांची नवीन मतदार नोंदणी स्थलांतर नोंदणी दुरुस्ती करून पुरवणी यादी परिसराचा उल्लेख केला पाहिजे अन्यता गेल्या १५ वर्षा पासून विकास निधी पासून वंचित ठेवलेल्या लोकांची तक्रार लक्षात घेऊन ३००० हजार मतदारांना मतदानाच्या हक्का पासून वंचित ठेवून विकास निधी पासून वंचित ठेवल्याचे निष्कर्ष घेवुन प्रभाग क्रमांक ४५ मधील वाल्मिकी आंबेडकर आवास योजना रमाबाई नगर परिसर व बीएसयूपी परिसराची मतदार नोंदणी करावी मतदार यादीत नावे समाविष्ट करून घ्यावी अन्यता प्रभाग क्रमांक ४५ मध्ये होणारया पालिकेच्या निवडणूकिला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात याचीका दाखल करणार असे अंबादास भालेराव यांनी माहिती दिली. 
 
प्रभाग क्रमांक ४५ मधील वाल्मिकी आबेडेकर आवास योजना परिसरातील सर्व नागरिकांच्या मतदार नोंदणी योग्य रित्या व्हावे जेणे करून वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरातील सर्व नागरिकांना पालिकेच्या होणाऱ्या निवडणूकित आपल्या हक्काच्या उमेदवाराला मतदान करण्याचा हक्क बजावता आलं पाहिजे म्हणून सर्व मतदारांची नोंदणी साठी प्रहार जमशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक यांनी प्रांत कार्यालयात स्थलांतर झालेल्या सर्व नागरिकाच्या नोंदणी प्रभाग क्रमांक  कचोरे ४५ च्या यादीत समाविष्ट करण्यासाठी  निवेदन दिले आहे. निवेदन देऊन सुद्धा मतदार नोंदणी अधिकारी, BLO मतदार नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ।करत आहेत त्याकरिता  पालिकेच्या पोट निवडणूकिच्या आगोदर मतदारांची नोंदणी केली गेली नाही तर होणाऱ्या पालिकेच्या निवडणूकित प्रभाग क्रमांक ४५ कचोरे प्रभागात निवडणूक होऊ जो पर्यत वाल्मिकी आंबेडकर आवास योजना रमाबाई नगर परिसर बीएसयूपी परिसराची नोंद  यादीत होणार नाही  व सर्व मतदार मतदान करण्यासाठी सक्षम होणार नाही यासाठी  मुबई उच्च न्यायालयात स्थगिती  घेऊ असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक अंबादास भालेराव यांनी केले आहे.

आेबीसींच्या मागण्यांसाठी बारा बलुतेदारांना घेवून मा.खा.हरिभाऊ राठोड बसणार उपोषणास !!

आेबीसींच्या मागण्यांसाठी बारा बलुतेदारांना घेवून मा.खा.हरिभाऊ राठोड बसणार उपोषणास !!ठाणे,प्रतिनिधी - ओबीसीमधील अतिमागासांना मिळणार्‍या आरक्षणाचे फायदे आज पर्यंत मिळाले नाहीत. परिणामी, राज्यातील बारा बलुतेदार समाज मोठ्या प्रमाणात विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळे या बलुतेदारांना स्वतंत्र 4 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी ओबीसी, भटकेविमुक्तांचे नेते मा. खा. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 29) राज्यभर जिल्हाधिकारी/ तहसील कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मा. खा. हरिभाऊ राठोड हे स्वत: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजेपासून उपोषणाला बसणार आहेत
गुरव, कुंभार, कासार, मिस्त्री, लोहार, न्हावी, पांचाळ, धोबी, शिंपी, सोनार, वाडी - खाती, सोनार-बंजारा, हे राज्यातील बारा बलुतेदार समाज सद्या 19 टक्के आरक्षणामध्ये आहे, परंतु या 19 टक्के आरक्षणामध्ये त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही, कारण ओबीसी मधल्या ज्या पुढारलेल्या जाती आहे, ह्या संपूर्ण आरक्षणाचे लाभ उचलत आहे, म्हणून 19 टक्के आरक्षणा मधून वेगळे 4 टक्के स्वतंत्र आरक्षण दयावे अशी मागणी, माजी खासदार व माजी आमदार तथा आरक्षणाचे अभ्यासक, हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार या न्यायालयाच्या निवाड्यानुसार हे आरक्षण राज्य सरकार देऊ शकते असेही त्यांचे मत आहे.
या संदर्भात महाराष्ट्रात बारा बलुतेदारांचे हे जनआंदोलन तीव्र करण्यासाठी येत्या गुरुवार दि 29 ऑक्टोबर, 2020 रोजी दुपारी 12 वाजता सर्व तालुका आणि जिल्हा कचेरीवर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचे जाहीर आवाहन, माजी खासदार व माजी आमदार तथा आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड तथा बारा बलुतेदार समाजाचे सर्वश्री प्रा.प्रकाश सोनवणे, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ.पी.बी.कुंभार, अरुण शिंपी, प्रताप गुरव, रंजन दीक्षित, पराग अहिरे, बाबूसिंग कडेल, विजय बिरारी यांनी बारा बलुतेदार समाजाला केले आहे

पालघर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराबाबत युवा प्रहार ग्रुप ने पुकारलेल्या उपोषणाला देवा ग्रुप फाउंडेशनचा जाहीर पाठिंबा !!

पालघर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराबाबत युवा प्रहार ग्रुप ने पुकारलेल्या उपोषणाला देवा ग्रुप फाउंडेशनचा जाहीर पाठिंबा !!


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
             सोमवार दि.२६/१०/२०२० पासून जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे विक्रमगड येथील युवा प्रहार ग्रुप ने पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे झालेल्या कामाबद्दल तसेच भ्रष्टाचाराबद्दल बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणास देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच पालघर जिल्हा यांच्या तर्फे जाहीर पाठिंबा दिला तसेच उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व उपोषण यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

      यावेळी देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.सुजित (पप्या भाई) ढोले, सचिव मा.श्री.तानाजी भाऊ मोरे, माजी कार्याध्यक्ष सुनील भाऊ गोरे, संघटक रवींद्र भाऊ पाटील तसेच स्वाभिमानी संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.जितेश (बंटी भाऊ) पाटील, प्रसाद भाई पाटील, निकेश सपाट, मनोज फोडसे, नितेश जाधव तसेच त्यांचे सहकारी व देवा ग्रुप फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सानप, उपजिल्हाध्यक्ष उमेश पाटील, संघटक संदीप पालवे, वसई तालुका उपाध्यक्ष सिद्धेश कदम, पालघर तालुका अध्यक्ष सुशांत धानवा, सचिव हरेश राऊत, मनोर विभाग प्रमुख कल्पेश दळवी तसेच इतर सदस्य पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते.

सिध्दी कामथ यांची अ.भा.म.चि.महामंडळच्या तक्रार निवारण समिती सदस्य पदी नियुक्ती !!

सिध्दी कामथ यांची अ.भा.म.चि.महामंडळच्या तक्रार निवारण समिती सदस्य पदी नियुक्ती !!


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
    पक्षविरहीत सामाजिक राष्ट्रीय संघटना म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय महाक्रांती सेना (नोंदणीकृत)च्या राष्ट्रीय प्रवक्त्या सिद्धीताई विनायक कामथ (अभिनेत्री/समाजसेविका) यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळतर्फे "तक्रार निवारण समिती" च्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र अ.भा.म.चि.महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिले. सिध्दी कामत यांची कोरोना काळात केलेली मदत लक्षात घेऊन विविध संस्था व मिडियातर्फे "कोरोना योध्दा" या सन्मानपत्रने गौरव केलेला आहे. सिध्दी कामत महामंडळाचे ध्येयधोरण व उदिष्ट्ये तसेच घटना नियमांच्या अधिन राहून प्रमाणिकपणे काम करतील व  तक्रारदारांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करतील असे मत अनेकांकडून या नियुक्ती नंतर व्यक्त करण्यात आले. सिध्दी कामथ यांच्या या नियुक्तीबद्दल अ.भा.म.चि, महामंडळ कोल्हापूर प्रमुख कार्यालय तसेच मराठवाडा विभागीय कार्यालय, मुंबई शाखा कार्यालय, औरंगाबाद/सातारा विभागीय कार्यालय, पुणे शाखा कार्यालय पदाधिकारी व सदस्य,सभासद त्याचप्रमाणे अविनाश सकुंडे (राष्ट्रीय अध्यक्ष), संजय जाधव पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष) वकील आघाडी , आनंद गुगळे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) सुलेमानभाई खान (मुंबई जिल्हा अध्यक्ष) यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी,सदस्य व विविध सामाजिक संघटना, मित्रपरिवारातर्फे अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत !!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत !!

 'धर्मराज्य पक्षा'ची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे पत्राद्वारे मागणी


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
                प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ठाणे शहरात सुमारे ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे उघड झालेले आहे. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची अशी असून, एकट्या ठाणे शहरात सामाजिक सुरक्षिततेबाबत अशी दुरवस्था असेल, तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किती भयावह परिस्थिती असावी? असा सवाल 'धर्मराज्य पक्षा'ने उपस्थित करून, त्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची मागणी केली आहे. नुकतीच मुंबई, अंबरनाथ आणि पंढरपूर या ठिकाणी पोलिसांना झालेली मारहाण पाहता, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली असावी, याबाबत चिंता व्यक्त करून, याच अनुषंगाने पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत, सन २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाची गृहविभागाने प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. आगामी सणासुदीचा काळ बघता, तसेच घातपाताची शक्यता लक्षात घेता, महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांच्या मोक्याच्या व संवेदनशील  ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत आणि याची गंभीरपणे नोंद घेण्याची विनंती नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

               सप्टेंबर-२०११ मध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कार्यशाळेला तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील, तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली होती. तेथील सुरक्षा यंत्रणांची पाहणी करण्याबरोबच कोणत्या यंत्रणा महाराष्ट्रात आणता येतील याचाही आढावा त्यावेळी गृहमंत्र्यांनी घेतला होता. १९६७ साली स्कॉटलंडमध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही बसविण्यात आला होता. तिथल्या कोणत्याही आस्थापनेत चोख सुरक्षाव्यवस्था असते. एवढे असूनही तिथली सुरक्षाव्यवस्था 'फ्रेंडली सिक्युरिटी'सारखी भासते. याच पार्श्वभूमीवर, २०११ साली सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने, स्कॉटलंड यार्डच्या धर्तीवर मुंबईत व संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा राबविण्याचा निर्णय प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलून दाखवला होता. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्राधान्याने उल्लेख केला होता. यादरम्यान, मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या निमित्ताने आर.आर. पाटील यांनी मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी दुर्दैवाने त्यानंतर मात्र, राज्य सरकारने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात गांभीर्याने कार्यवाही केल्याचे जाणवले नाही. त्याचाच परिपाक म्हणून, ठाणे शहरात ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असल्याचे ठामपणे सांगता येईल, असे देशपांडे यांनी नमूद केले आहे. तरी, महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री या नात्याने, करदात्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या मागणीचा विचार करावा आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट दर्जाची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करून, ती सक्षमपणे कार्यान्वित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी केली आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत !;

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत !;


 'धर्मराज्य पक्षा'ची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे पत्राद्वारे मागणी


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
                प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ठाणे शहरात सुमारे ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे उघड झालेले आहे. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची अशी असून, एकट्या ठाणे शहरात सामाजिक सुरक्षिततेबाबत अशी दुरवस्था असेल, तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किती भयावह परिस्थिती असावी? असा सवाल 'धर्मराज्य पक्षा'ने उपस्थित करून, त्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची मागणी केली आहे. नुकतीच मुंबई, अंबरनाथ आणि पंढरपूर या ठिकाणी पोलिसांना झालेली मारहाण पाहता, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली असावी, याबाबत चिंता व्यक्त करून, याच अनुषंगाने पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत, सन २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाची गृहविभागाने प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. आगामी सणासुदीचा काळ बघता, तसेच घातपाताची शक्यता लक्षात घेता, महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांच्या मोक्याच्या व संवेदनशील  ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत आणि याची गंभीरपणे नोंद घेण्याची विनंती नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

               सप्टेंबर-२०११ मध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कार्यशाळेला तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील, तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली होती. तेथील सुरक्षा यंत्रणांची पाहणी करण्याबरोबच कोणत्या यंत्रणा महाराष्ट्रात आणता येतील याचाही आढावा त्यावेळी गृहमंत्र्यांनी घेतला होता. १९६७ साली स्कॉटलंडमध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही बसविण्यात आला होता. तिथल्या कोणत्याही आस्थापनेत चोख सुरक्षाव्यवस्था असते. एवढे असूनही तिथली सुरक्षाव्यवस्था 'फ्रेंडली सिक्युरिटी'सारखी भासते. याच पार्श्वभूमीवर, २०११ साली सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने, स्कॉटलंड यार्डच्या धर्तीवर मुंबईत व संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा राबविण्याचा निर्णय प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलून दाखवला होता. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्राधान्याने उल्लेख केला होता. यादरम्यान, मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या निमित्ताने आर.आर. पाटील यांनी मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी दुर्दैवाने त्यानंतर मात्र, राज्य सरकारने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात गांभीर्याने कार्यवाही केल्याचे जाणवले नाही. त्याचाच परिपाक म्हणून, ठाणे शहरात ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असल्याचे ठामपणे सांगता येईल, असे देशपांडे यांनी नमूद केले आहे. तरी, महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री या नात्याने, करदात्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या मागणीचा विचार करावा आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट दर्जाची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करून, ती सक्षमपणे कार्यान्वित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी केली आहे.

हिंदू सणांसाठी मराठी जनांसाठी फक्त "मनसे" !!

हिंदू सणांसाठी मराठी जनांसाठी फक्त "मनसे" !!


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
               लोअर परळ मधील आदित्य सेवा मंडळ, मोतिराम दयाराम चाळ येथे अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. सध्या सदर चाळ ही पुनर्विकास प्रक्रियेत आहे. अशा परिस्थितीमध्ये विकासक त्या जागेत उत्सव साजरा होऊ नये म्हणून प्रयत्नांत होता म्हणजेच त्याचा उत्सव करण्यास विरोध होता असे स्थानिकांना समजले त्यांनी त्यासाठी परवानगी सुद्धा मागितली परंतु टाळाटाळ झाली सदर बाबीची तक्रार स्थानिक रहिवाशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोअर परळ प्रभाग १९८ येथील शाखा अध्यक्ष अमोल देसाई यांच्याकडे केली त्यानंतर त्यांनी लागलीच विकासकाला धारेवर धरून उत्सव साजरा करायला देण्यास भाग पाडले. उप विभाग अध्यक्ष दत्ता पाटील व उपशाखा अध्यक्ष - सुहास नर, दिनेश निकम, शैलेश अहिर, निरंजन पाटील, समीर गोवळकर, उपवॉर्ड अध्यक्ष - अवधूत घाडीगावकर, संकेत आव्हाड व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. उत्सव साजरा करता आला म्हणून आदित्य सेवा मंडळ यांनी मनसे  पदाधिकारी  यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रथमच नैसर्गिकरित्या जुळ्या मुलांचा जन्म !! "आदिवासी महिलेने मानले डॉक्टरांचे आभार".

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रथमच नैसर्गिकरित्या जुळ्या मुलांचा जन्म !! "आदिवासी महिलेने मानले डॉक्टरांचे आभार".


मुरबाड :--(मंगल डोंगरे) : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा सुविधा नसल्यामुळे आदिवासी महिलांना प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते.परंतु तेथेही भुल तज्ज्ञांच्या अभावी शस्रक्रिया विभाग बंद असल्याने गोरगरीब जनतेला खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असताना आज सरळगाव आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रातील लक्ष्मी हिलम वय 30 वर्षे हि आदिवासी महिला प्रसुतीसाठी आली असता डॉ. हेमंतकुमार खंबायत व डॉ. विक्रांत गुजर तसेच डॉ. स्वप्नील वाघचौडे यांनी सदर महिलेच्या गंभिरतेचा आणि परिस्थितीचा विचार करुन रुग्णालयात शस्रक्रिया विभाग नसताना त्या महिलेची नैसर्गिकरित्या प्रसुती केली असता त्या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिल्याने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात जुळ्या बाळांना नैसर्गिकरित्या जन्म देणारी हि पहिलीच महिला असल्याने नातेवाईकांनी या डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत.

           तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि खाजगी हाँस्पिटलचे संगनमताने गोरगरीब जनतेची लुटमार होत असल्याने किरकोळ आजारावर मोफत उपचार घेण्यासाठी तसेच प्रसुतीसाठी महिला  ग्रामीण रुग्णालयात धाव घेत असल्या तरी गेले अनेक दिवस ग्रामीण रुग्णालयात भुलतज्ञ नसल्यामुळे शस्रक्रिया विभाग बंद आहे. त्यामुळे एखादी जोखमीची प्रसुती आली तर ते डॉक्टर. त्या महिलेला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवितात. तेथे गेल्यानंतर त्या महिलेची नैसर्गिकरित्या प्रसुती होते व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना दोष दिला जातो. असे असताना आज सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कार्यक्षेत्रातील व्यापारी मानिवली येथील आदिवासी  महिला लक्ष्मी हिलम हिला पहिल्या दोन मुली असताना पुन्हा गरोदर होती परंतु आता तीच्या पोटात दोन मुले असल्याने तेथील डॉक्टरांनी तीला ग्रामीण रुग्णालयात पाठविले. परंतु तेथे असणाऱ्या डॉ. खंबायत यांनी सदर महिलेच्या गंभिरतेचा आणि आर्थिक परिस्थिती चा विचार करुन या महिलेची येथेच प्रसुती करायची म्हणुन डॉ. गुजरे व वाघचौडे यांचेशी विचार विनिमय केला आणि त्यांनी त्या महिलेची प्रसुती करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी एका खाजगी हाँस्पिटल मधिल महिला प्रसुती तज्ज्ञांची मदत घेऊन काही वेळातच या महिलेची नैसर्गिकरित्या प्रसुती केली असता त्या महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला असुन दोन्हीही बाळांची व आईची प्रक्रुती हि सुखरूप आहे.  

             सदर डॉक्टरांनी अथक प्रयत्नाने हि प्रसुती केली असली तरी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात हि प्रथम जुळ्या बाळांना नैसर्गिकरित्या जन्म देणारी  पहिलीच महिला असुन डॉक्टरांनी केलेल्या विशेष कामगिरीचे नागरिकामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

महात्मा गांधी विद्यालय धसईच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची पालक वर्गाची मागणी ..

महात्मा गांधी विद्यालय धसईच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची पालक वर्गाची  मागणी  ..


मुरबाड (मंगल डोंगरे) :
मुरबाड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय धसई कडून पालक व विद्यार्थ्यां कडुन अवाच्यासव्वा फी साठी लबाडणूक होत असल्याची तक्रार पालकाकडून होत असुन; संबंधित कारभाराची चौकशीची ही मागणी होत असुन; सदर प्रकरणी मुख्यमंत्री ते शिक्षण मंत्र्याकडे लेखी तक्ररी द्वारे दाद मागली जात आहे .


शिक्षणमहर्षी म्हणून लौकिक असलेल्या स्व.शांताराम भाऊ घोलप यांच्याच गावात विद्यार्थ्यांना सक्तीच्या फी वसुलीला सामोरे जावे लागत असल्याने पालक वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विद्यार्थ्यांना सायन्स, आर्ट, टेक्निशियन या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ७ हजार ५ हजार रुपये फी तसेच जनसेवा शिक्षण मंडळाच्या इमारतीसाठी १७० रु.अशा एकुण ११ वेगवेगळ्या प्रकारच्या कारणासाठी पैसे घेण्यात येतात. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यालयाचे प्राचार्य मागिल तिस वर्षांपासून कार्यरत असुन ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांन कडुन हजारो रुपये घेऊन १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना १७ नंबर चा फॉर्म भरून परीक्षेसाठी प्रवेश दिला जाऊन परीक्षा चालू असताना खुलेआम विद्यार्थ्यांना कॉफीॅंचा पुरवठा केला जातो. परीणामी अभ्यास केला नसलेले विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात. या सर्व गैर प्रकारा बाबत अनेक वेळा वर्तमानपत्रातून फोटो सहीत बातम्या येऊन सुध्दा कारवाई होत नसल्याने पालक वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे येथील प्राचार्यांनी अशा गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमविली असुन या बाबत अनेक पालकांनी वारवार चौकशी करूनही काही होत नसल्याने मुजोर झालेल्या प्राचार्याना परिस्थीतीच भान राहिल नाही. गेले सहा महिने कोरोनाच्या महामारीत शेतकरी पालक वर्ग अन्नाला मोहताज झाला असतानाच परतीच्या पावसाने भाता सोबत शेतकरीच अडवा केला असुन दृष्काळसदृश्य परिस्थीतीत होरपळलेल्या शेतक-याच्या मुलांना येथे प्रवेश घेण्यासाठी एक रुपया देखील फि कमी केली जात नाही व पुर्ण रक्कम दिल्या शिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रवेशासाठी भरला जाणारा फार्म त्याचे देखील २० रुपये आकारले जातात. या विद्यालयातील अनागोदी कारभाराची चौकशी  करण्यात येऊन येथे गेले तीसवषॆ पालकांची विद्यार्थ्याची लुटमार करुन कोट्यावधीची  बेहिशोबी मालमत्ता करणा-या प्राचार्याची चौकशीची मागणी होत आहे.

Tuesday 27 October 2020

विविध मागण्यांसाठी सिटु संघटनेची मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक !! **हल्ला बोल करीत कंपनी व्यवस्थापनाचा निषेध **

विविध मागण्यांसाठी सिटु संघटनेची मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक !!
**हल्ला बोल करीत कंपनी व्यवस्थापनाचा निषेध **


मुरबाड (मंगल डोंगरे) : गेल्या काही महिण्यापासून मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांची मनमानी वाढली असुन त्याचा फटका स्थानिक कामगारांना बसत असुन, अचानक पणे कुठलीही पुर्वसुचना न देता धानिवली येथील पाँवर प्लान बंद करून 60 कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ आज सिटु संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी तिनहात नाका ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढून धडक देण्यात आली.


            यावेळी या मोर्चात सुमारे दोनशे ते अडीचशे कामगार सहभागी झाले होते. कोरोना संकट असल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुचवलेल्या नियमांचे पालन करत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोहचल्यावर संघटनेचे प्रतिनिधी यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करत, धानिवली येथील पाँवर प्लान मधील कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे. फ्युज्यो ग्लास कंपनीची थांबवलेली पगार वाढ करून कंपनी बाहेर असलेल्या कामावर घेण्यात यावे. अँरोफार्मा कंपनी सुरू करण्यात यावी. मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी पद्धत बंद करावी. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कामगारांच्या पसंतीच्या युनियन सोबत चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे. अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सिटु संघटनेच्या वतीने शिष्ट मंडळाने मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांना देऊन कामगारांना न्याय देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे काँ.देविदास आडोळे; काँ.विजय विशे; प्रशांत महाजन; संतोष काकडे; दिलीप कराळे; सागर भावार्थ; मनिष फोडसे; चंद्रकांत राणे; रामचंद्र भोईर; सुनील लाटे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह शेकडो पिडीत कामगार उपस्थित होते.

पोलिस चौकीला रोटरी क्लब चोपडा कडून फॅन व ट्यूबलाइटची सस्नेह भेट‌!

पोलिस चौकीला रोटरी क्लब चोपडा कडून फॅन व ट्यूबलाइटची सस्नेह भेट‌!


चोपडा, प्रतिनिधी : करोना काळात ज्यांनी खरे कोरोना योद्धा म्हणून आपले कर्तव्य बजावले, जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी उन्हाळ्याच्या कडक उन्हातही आपली सेवा अविरत बजावली अश्या पोलीस बांधवांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील  बूथ वर फॅन व ट्यूब लाईट नसल्याचे रोटरी क्लब चोपडा च्या निदर्शनास आले व लगेच वरील सुविधा पुरविण्याचे ठरविण्यात आले, चोपडा येथील शिवाजी महाराज चौकातील पोलीस चौकीसाठी रोटरी क्लब, कंचोपडा तर्फे आपली सामाजिक जबाबदारी म्हणून फॅन आणि ट्यूबलाईट भेट देण्यात आले.
   चोपडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक माननीय ठेंगे साहेब यांच्या उपस्थितीत बूथ वरील पोलीस कर्मचाऱ्यांना रोटरीच्या मेंबर्स यांच्या उपस्थितीत सदर साहित्य देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. 
    सदर कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील,पंकज बोरोले,अनिल अग्रवाल, विलास कोष्टी, चंद्रशेखर कोष्टी, प्रकाश पाटील, शिरीष पालीवाल, डॉ अमोल पाटील, अरुण सपकाळे, प्रदीप पाटील, निखिल सोनावणे, अर्पित अग्रवाल, चेतन टाटीया, गौरव महाले, पृथ्वीराज राजपूत, शशिकांत पाटील, धीरज अग्रवाल व मनोज पाटील, रोटरी चे वरिष्ठ सदस्य एम डब्लू पाटील ई. रोटरी सदस्य उपस्थित होते. तर प्रकाश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

Monday 26 October 2020

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून दिवे आगार गणेश मंदिर दरोड्यातील फरार मोक्यातील आरोपीस अटक !

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून दिवे आगार गणेश मंदिर दरोड्यातील फरार मोक्यातील आरोपीस अटक !


नासिक : येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दि १९-१०-२०२० रोजी घरफोडी व चोरीचा  प्रकार झाला होता, त्या अनुषंगाने दाखल झालेला गुन्हा उघडकिस आणणेबाबत *मा श्री सचिन पाटील साहेब पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मा श्री समरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार* सपोनि भिसे व सपोनि राजपूत यांनी पथके तयार करून पोलीस स्टेशन हद्दीतील राहणाऱ्या गुन्हेगारांच्या  हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळवून चेकिंग केली असता अशी माहिती मिळाली
   *येवला वैजापूर सीमेवर असणारे बिल्वानी गाव ता वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे एक इसम संशयित रित्या वावरत असल्याची माहिती मिळाली*
 सदर माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरातून कटावणी, टॉमी, पक्कड, स्क्रू ड्राइवर, तीन टॉर्च लाइट, एक चॉपर, एक चाकू असे घरफोडीचे साहित्य जमा करण्यात आले होते.
संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे *नाव शिवा जनार्धन काळे रा मौजे बिल्वानी ता वैजापूर जिल्हा औरंगाबाद* असे सांगितले होते सदर आरोपीला न्यायालयाने पोलीस  कोठडी दिली होती त्या दरम्यान अधिक तपास चालू असताना असे माहिती मिळाली.
     *सन  २०१२ मध्ये दिवे आगार गणेश मंदिरामध्ये दरोडा टाकून दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून गणेश मूर्ती चोरल्याचे प्रकरण गाजले होते* सदर प्रकरणातील मुख्य आरोपी  सतीश उर्फ सत्या जैनू काळे याला मोक्का न्यायालयाकडून जन्मठेपी ची शिक्षा झाली होती  *सण २०१८ मध्ये सुनावणी कामी कोर्टात आणले असता आरोपीस रेल्वेने नागपूर येथे घेऊन जात असताना तो भुसावळ रेल्वे स्टेशन येथून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता तेव्हा पासून तो फरार होता.*

    नाशिक पोलीस यांनी अटक केलेल्या *आरोपीने प्रथम त्याचे नाव शिवा जनार्दन काळे असे सांगीतले होते.* त्याबाबत अधिक माहिती घेतली असता तो दिवे आगार गणपती मंदीर दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सतीश उर्फ सत्या जैनु काळे हा असल्याचे व सन २०१८ मध्ये पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेल्यानंतर *नाव बदलुन राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीवर यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, खुनासहित दरोडा* असे अनेक गुन्हे नोंद आहेत. अनेक जिल्हयांमध्ये त्याचा शोध सुरू होता. 

       *पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री सचिन पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री समरसिह साळवे यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचना प्रमाणे येवला तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि श्री भिसे, सपोनि श्री राजपूत, पोहवा सानप, पोकॉ मोरे यांचे पथकाने त्यास अटक करून प्रशंसनीय कामगीरी केली आहे.*

बोंड्ये - नारशिंगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

बोंड्ये - नारशिंगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !


"छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ( रजि. ) संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम"

कोकण; (शांत्ताराम गुडेकर /दिपक कारकर) :
          छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि इन्फिगो आय केयर हॉस्पिटल रत्नागिरीतर्फे ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये - नारशिंगे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. येथील ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये - नारशिंगे ग्रामपंचायत सभागृहात शिबिर संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शिबिर झाले. यावेळी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक/अध्यक्ष श्री.सुनिल धावडे, सचिव श्री.समीर गोताड, खजिनदार श्री.गणेश कांबळे, कार्याध्यक्ष श्री.संतोष आग्रे, संघटक श्री.समीर धावडे, मीडिया प्रमुख श्री.नितीन रोडे, प्रवक्ता श्री.संगम धावडे, सल्लागार श्री.मोहन पवार यांनी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या हर्षदा राजापकर, संकेत शिंदे, अनिल यादव आणि आदिती आग्रे या कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर तपासणी शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचा परिसरातील ११५ नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराला सरपंच सौ.सुहानी कुल्ये, उपसरपंच श्री.महेशजी देसाई, माजी सरपंच श्री.विश्राम पानगले, पोलीस पाटील श्री.प्रविणजी कांबळे, माजी पोलीस पाटील श्री.चिमाकांतजी कुल्ये, ग्रामसेवक श्री.सोनकांबळे साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ.रावणंग मॅडम इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान चे सदस्य श्री.संदेश धावडे, प्रशांत कांबळे, सुदीप पवार, निलेश कळंबटे, विजय धावडे, राहुल धावडे, तन्वी देसाई यांनी विशेष मेहनत घेतली.या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

दसरा सणाला सोन्या सोबत मास्क वाटुन ज्योती ताईंनी घेतली गावकऱ्यांची काळजी !!

दसरा सणाला सोन्या सोबत मास्क वाटुन ज्योती ताईंनी घेतली गावकऱ्यांची काळजी !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : "दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा" ही म्हण वर्षांनुवर्ष पुर्वपार परंपरेने चालत आली आहे. आणि आजही चालत आहे. मात्र यंदाच्या कोरोना संकटाने सर्वसण उत्सव यावर पाणी फेडले आहे. 


प्रत्येक जण आपापल्या जिवाची काळजी घेऊन जगण्याचा प्रयत्न करत आहे. या संकटात यंदाचा दसरा हा सण दु:खात आणि कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली साजरा झाला.यावेळी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे. 


मात्र या प्रथेला बाजूला सारत; भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्या ज्योती ताई गोडांबे यांनी "माझं गाव माझी जबाबदारी " समजून आपल्या मुरबाड तालुक्यातील कळंभे गावात घरोघरी आपट्याच्या पानांसोबत (सोन्या) मास्कचे वाटप करून आपल्या गावातील ग्रामस्थांची काळजी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पती आदर्श  आणि उपक्रमशिल शिक्षक भालचंद्र गोडांबे हे उपस्थित होते.

मुरबाड मध्ये 65 वर्षिय इसमाचा मतिमंद मुलावर लैंगिक अत्याचार !!

मुरबाड मध्ये 65 वर्षिय इसमाचा मतिमंद मुलावर लैंगिक अत्याचार !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : काल मुरबाड तालुक्यातील ठुणे गावात एका 55 वर्षिय इसमा कडून गावातील 14 वर्ष वयाच्या मतिमंद मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असुन मुरबाड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             याबाबत मिळालेली माहिती अशी कि, ठुणे गावात नवरात्रौ उत्सव असल्याने दिनांक-23/10/2020 रोजी रात्री  8-45 च्या सुमारास त्याच गावातील एक 14 वर्षाचा मतिमंद मुलगा त्या ठिकाणी खेळत होता. तेव्हा याच गावातील  65 वर्षिय मुकुंद महादु मुरबाडे हा त्या ठिकाणी येवून त्याने या मतिमंद मुलास खाऊचे आमिष दाखवून जवळच असलेल्या विहीरी जवळ हाताला धरून नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी त्या मुलाच्या गुप्तांगातुन रक्तस्राव सुरु झाल्याने तो मुलगा जोरजोराने रडू लागला. म्हणून त्या इसमाने त्यास ढकलुन दिले. तेव्हा तो मुलगा त्याच्या तावडीतुन  सुटुन  रडत घरी आला. त्यावेळी त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या काकांनी त्याची चड्डी रक्ताने खराब झाल्याचे विचारले असता, त्याने घडलेला सर्व प्रकार काकांना सांगितला. रक्तस्राव जोरात सुरु असल्यामुळे त्या मुलास प्रथमतः ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते व त्यानंतर  मुरबाड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असुन सदर इसमा विरोधात पोक्सा अंतर्गत CR 339 /2020 नुसार बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 अन्वये कलम 8,9,10, (क) व (अ) प्रमाणे आरोपीत याने मतिमंद असल्याचा फायदा घेवुन लैंगिक छळ केला म्हणून मुरबाड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने व पो.अंमलदार उदमले यांनी 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळुन त्यास अटक केली असुन पुढील तपास सुरु आहे.

कल्याणमध्ये ९ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव;सन्मान कर्तुत्वाचा,जागर स्त्री शक्तीचा...

कल्याणमध्ये ९ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव;सन्मान कर्तुत्वाचा,जागर स्त्री शक्तीचा...


कल्याण, प्रकाश संकपाळ - सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा ९ कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला.


महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांच्या पुढाकाराने कल्याण परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व कोरोना महामारीच्या काळात गरजू व गरीबांना अहोरात्र मदत करणाऱ्या कोरोना योद्धा असलेल्या ९ महिलांचा सत्कार व सन्मानपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, जिल्हाध्यक्षा नयना भोईर, जिल्हा सचिव वासंती जाधव, जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड, जिल्हा संघटक भारती कुमरे, नगरसेविका तृप्ती भोईर, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप, शहर संघटक वैशाली सोनटक्के, विभाग अध्यक्षा भारती डाकवे, सुधा शहा, उपविभाग अध्यक्षा कोमल रॉय, उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे, उपशाखा अध्यक्ष सागर कोळजे, मनवीसे अध्यक्ष विशाल वाघचौरे, समाजसेवक सतिश साळवी, पत्रकार चारुशीला पाटील, शाही मुल्ला, किरण गायकवाड, प्रथमेश जाधव, स्वप्नील कदम,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

रुपाली आळंदे, (पोलीस), अनुसया कांबळे (समाजसेविका), डॉ.वृषाली थोरात-घारगे (वैद्यकीय सेवा), स्वरा देसाई (पोलीस), विद्या आरेकर (वैद्यकीय), गीता बोरगावकर (लघु उद्योजिका), कविता लोखंडे (पत्रकार ), डॉ. तेजस्विनी माळवी (वैद्यकीय) आदींना साडी, चोळी, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांनी महिलांचा सन्मान करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंपरा असल्याचे स्पष्ट करून कोरोना महामारीच्या काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता समाजातील गरजूंना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली असून भविष्यात त्यांनी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होवो तसेच स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरूच आहे.महिलांच्या सक्षमीकरण, सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी, त्यांच्या कार्य कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी आपण नेहमीच त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. स्त्री या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि ही शक्ती सक्षम बनविणे, तिला सन्मान देणे ही समाजाची जबाबदारी आहे. असे प्रांजळ मत जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम व्यक्त केले आहे.

Sunday 25 October 2020

खान्देशात "राष्ट्रवादी शिरजोर काँग्रेस कमजोर"..

खान्देशात "राष्ट्रवादी शिरजोर काँग्रेस कमजोर"..


मुंबई - भाजपचे बहुजन नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केला आणि राज्याचे राजकारण ढवळुन निघाले खडसेंच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस ला बळ मिळाले खान्देशात जळगाव धुळे नंदुरबार असे तीन जिल्हे येतात धुळे शहराचे माजी आमदार अनिल आण्णा गोटे अगोदरच राष्ट्रवादीत डेरे दाखल झाले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढली आहे सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच आमदार आहे यापूर्वी त्यांचे पाच सहा आमदार असायचे खानदेश पूर्वी कॉंग्रेस चा बालेकिल्ला होता त्याला शह देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले परंतु काळाच्या ओघात त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांची ताकत कमी केली त्यांनाच ताकत देण्याचे काम करावे लागणार आहे खडसे लेवा पाटील समाजाचे आहेत समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे हा समाज आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडला गेला आहे असे मानण्यात येते धुळे जिल्ह्यातील अनिल आण्णा गोटे यांच्या मूळे धुळे शहरातील त्यांना मानणाऱ्या लोक राष्ट्रवादी ला जोडला गेला आहे त्यामुळे राजवर्धन कदमबांडे यांच्या पक्ष सोडल्या मूळे झालेली हानी भरून निघाली आहे त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा जोरात आली असल्याचे दिसून येत आहे.
त्या मानाने काँग्रेस पक्ष कोणतीही हालचाल करताना व डॅमेज कॅट्रोल करताना दिसत नाही खान्देशात आजही काँग्रेस ला अनुकूल वातावरण आहे धुळे नंदुरबार जिल्हा काँग्रेस चा बालेकिल्ला आहे अमरीश भाई व चंद्रकांत रघुवंशी यांचे सारखे दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडल्यावर देखील नंदुरबार जिल्ह्यातून दोन धुळे व जळगाव जिल्ह्यातुन प्रत्येकी एक अशे चार आमदार निवडून आले आहेत काँग्रेसने जर खान्देशात लक्ष दिले व सोशल इंजिनिअरिंग केले तर पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते यासाठी त्यांनी पक्षापासून दुरावलेले पारंपरिक मतदार जोडला पाहिजे  अमरीश भाई व चंद्रकांत रघुवंशी पक्षातून बाहेर पडल्यामुळे ओबीसी समाज पक्षापासून दुरावला गेला आहे त्यामुळे काँग्रेस ने खान्देशातील ओबीसी समाजासाठी काम करणारा एखादा कार्यकर्त्याला राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिली तर पक्षाच्या फायद्याचे राहील खान्देशातील वीस मतदार संघात व लोकसभेच्या चार मतदार संघात त्याचा फायदा होईल त्यामुळे काँग्रेस पक्षांसह आघाडी ला फायदा होईल परंतु काँग्रेसचे थंडा करके खाओ या काम करायचा पद्धतीमुळे त्यांचे नुकसान होते परंतु त्यांनी खान्देशात अश्याप्रकारे सोशल इंजिनियरिंग केले तर काँग्रेस फायद्यात राहू शकते.        
 एकनाथराव खडसेंच्या पक्षांतरामुळे पुन्हा एकदा खानदेश केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठया संख्येने आउट गोइंग झाले होते त्याचा फटका दोन्ही पक्षांना झाला आहे त्यामुळे ही हानी भरून काढण्यासाठी या दोन्ही पक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे सुदैवाने राज्यपाल नियुक्त आमदार करणे बाकी आहे त्याचा फायदा घेऊन खान्देशात काँग्रेसची ताकत वाढवणे गरजेचे आहे
काँग्रेस कडे उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा नाहीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड हे पूर्वीपासून काम करीत आहेत त्यात अनिल आण्णा गोटे हे धनगर समाजाचे नेते जोडून घेतले आता खडसे साहेबांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे लेवासमाज जोडला जाइल त्यामुळे त्या पक्षाची ताकत निश्चितपणे वाढली आहे
काँग्रेसने ओबीसी शिक्षक नेते विलासराव पाटील यांना संधि द्यावी.
खान्देशात काँग्रेस पक्षाला एक ओबीसी चेहऱ्याची गरज आहे ती गरज विलासराव पाटील यांच्या रूपाने पुरी होऊ शकते ते एन एस यु आय या विध्यार्थी संघटनेचे काम करीत होते ओबीसी सेल चे काम केले आहे आणि आता काँग्रेस शिक्षक सेलचे नाशिक विभागाचे पदाधिकारी आहेत मुळात त्यांचा पिंड हा चळवळीचा आहे त्यामुळे सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात त्यांनी तीन वेळेस नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातुन ओबीसी शिक्षक संघटनेतर्फे निवडणूक लढवली आहे त्यामुळे त्यांचा अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे ते माळी महासंघाचे कर्मचारी आघाडीचे सोळा वर्ष प्रदेशाध्यक्ष होते आता ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रात सामाजिक स्तरावर जनसंपर्क दांडगा आहे ओबीसी संघर्ष समिती ओबीसी विध्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन च्या माध्यमातून ओबीसी साठी खूप काम केले आहे नुकतेच त्यांनी ओबीसीच्या भवितव्यासाठी ओबीसी जनगणना हे पुस्तक काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीवजी सातव यांचे हस्ते प्रकाशित केले आहे त्यांनी यासाठी काँग्रेस कडे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी अर्ज केला आहे काँग्रेस ने त्यांना जर नियुक्त केले तर माळी समाज ओबीसी समाज व शिक्षक काँग्रेस पक्षाला जोडला जाइल  व काँग्रेस ची खान्देशात निश्चितच ताकत वाढल्या शिवाय राहणार नाही पण सद्यस्थितीत खान्देशात राष्ट्रवादी जोरात आणि काँग्रेस कोमात अशी स्थिती असल्याची चर्चा लोकांमध्ये दिसून येत आहे.

लेखक
ईश्वर आर.महाजन पत्रकार
राज्यकार्यकारणी सदस्य
महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई
9860352960,9766939950

एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी घाटकोपर-२ मुंबईच्यावतीने विभागात बेटी बचाओ...बेटी पढाओ.. ची जनजागृती !!

एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी घाटकोपर-२ मुंबईच्यावतीने विभागात बेटी बचाओ...बेटी पढाओ.. ची जनजागृती !!


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
           महिला व बालविकास,महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी घाटकोपर-२ (बीट क्र.२) सिडिपीओ राहुल मोरे, मुख्य सेविका वैयजंती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने आयोजित केलेल्या १७ ते २४ आँक्टोंबर २०२० दरम्यान बेटी बचाओ...बेढी पढाओ कार्यक्रमाअंतर्गत सर्व सेविका, मदतनीस यांनी मनपाच्या एन वार्डच्या अधिपत्यात येणाऱ्या विविध विभागात विविध कार्यक्रम घेऊन विभागात शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार केला.बेटी बचाओ..बेटी पढाओ हा संदेश देत समाजात जनजागृती केली. या कार्यक्रमात योजनेचे पदाधिकारी,मुख्य सेविका तसेच सर्व सेविका आणि मदतनीस यांची उपस्थिती होती.

Saturday 24 October 2020

जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब चोपडा कडून "पोलिओ वॉरियर्स" यांचा सत्कार !!

जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब चोपडा कडून "पोलिओ वॉरियर्स" यांचा सत्कार !!


चोपडा, वार्ताहर :
रोटरी ही 200 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि भौगोलिक क्षेत्रातील 34,000 पेक्षा जास्त रोटरी क्लबच्या 1.2 दशलक्ष सदस्यांना जोडते. त्यांचे कार्य स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांचे जीवन सुधारते, समाजातील गरजू कुटुंबांना पोलिओमुक्त जगासाठी मदत करण्यापासून मदत करते.


1985 पासून, रोटरीने १२२ देशांमधील दोन अब्जाहून अधिक मुलांच्या संरक्षणासाठी जवळपास १.२ अब्ज डॉलर्स आणि असंख्य स्वयंसेवक तासांचे योगदान दिले आहे. अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये हा आजार कायम आहे.
कोट्यवधी मुलांना अपंग करू शकणार्‍या हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग, पोलिओमुळे अर्धांगवायू होतो आणि काहीवेळा तो जीवघेणा देखील असतो. कोणताही इलाज नसल्यामुळे, सर्वोत्तम संरक्षण म्हणजे प्रतिबंध. अश्या या जगभरात पोलिओ संपवण्यासाठी लढा देणारे तसेच पोलिओ निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे चोपड्यातील डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस तसेच बूथ वरील कर्मचारी यांचा आज २४ऑक्टोंबर रोजी जागतिक पोलिओ दिना निमित्त सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात डॉ चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते पोलिओ निर्मूलन जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे  डॉक्टर चंद्रकांत बारेला यांचा सत्कार रोटरी क्लब अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केला सोबत अजय जयस्वाल, नदीम शेख फरीद, पल्लवी  देशमुख, गजानन करंदीकर, श्रीमती आरती कापुरे (आशा सेविका) श्रीमती दिव्या गोसावी (आशा सेविका) आदींचा पोलिओ निर्मूलनासाठी उत्कृष्ट सेवाकार्य केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी सचिव रुपेश पाटील, पंकज बोरोले, अनिल अग्रवाल, विलास कोष्टी, चंद्रशेखर कोष्टी, प्रकाश पाटील, शिरीष पालीवाल, डॉ अमोल पाटील, अरुण सपकाळे, प्रदीप पाटील, निखिल सोनावणे,अर्पित अग्रवाल, चेतन टाटीया, गौरव महाले, पृथ्वीराज राजपूत, शशिकांत पाटील, धीरज अग्रवाल व मनोज पाटील ई. रोटरी सदस्य उपस्थित होते.
रोटरी चे वरिष्ठ सदस्य एम डब्लू पाटील यांनी रोटरी चे पोलिओ निर्मूलन मधील योगदान या बद्दल माहिती दिली तर आभार प्रदर्शन सचिव रुपेश पाटील यांनी केले.

टेंभी बोईसर येथे अवधूत पंडित यांच्या निवासस्थानी पहिला नवचंडी यज्ञ संपन्न !!

टेंभी बोईसर येथे अवधूत पंडित यांच्या निवासस्थानी पहिला नवचंडी यज्ञ संपन्न !!


मुंबई (उत्कर्ष  शांत्ताराम गुडेकर) :
                 अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते. दुर्गामातेचे सातवे स्वरूप श्रीशक्ती-सिध्दकालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘सहार’ चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.

              टेंभी बोईसर येथे श्री.अवधूत पंडित यांच्या  घरी माता महालक्ष्मी च्या समोर AVEER ENTERTAINMENT PRIVATE LIMITED कंपनीचा पहिला नवचंडी यज्ञ संपन्न झाला. सकाळी साडे अकरा वाजता यज्ञास प्रारंभ झाला श्री.पंढरीनाथ मंडलिक गुरुजी मुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी करण्यांत आले. प्रथम परिसरातील सर्व देवतांना आमंत्रण देण्यांत आले. यजमनाना  पंचगव्य देऊन यजञोपवीत देण्यात आले. नंतर स्वस्ति वाच करून सर्व देवतांचे नामस्मरण करून कार्यक्रमाचा संकल्प करण्यांत आला त्यानंतर गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर पुण्याहवाचन करून देवाकडे कार्य सिद्दी चे मागणे मागण्यात आले. पुढे मातृका  पूजन म्हणजे शक्ती पूजन करण्यात आले त्यानंतर नांदी श्राध्द करून कार्य सिद्धी साठी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे पूजन व आशीर्वाद घेऊन आचार्यवरण करण्यांत आले नंतर सर्वतोभद्र मंडळ स्थापन करून ६२ देवतांचे पूजन करून ब्रम्ह्याची स्थापना करण्यात आली. महालक्ष्मीचे पूजन करून दोन्ही देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, शोडोष उपचाराने पूजन करण्यात आले त्यानंतर अग्नी स्थापन करून हवनास प्रारंभ झाला प्रथम पारंपरिक पद्धतीने सर्व उपचार करून गणेशाच्या अथर्वशीर्ष पठणाने आहुत्या देण्यांत आल्या त्यानंतर नवग्रह ब्रम्हा ह्यांच्या  आहूत्या मृत्युंजयाच्या आहुत्या देण्यांत आल्या नंतर मुख्य चंडी यज्ञास सुरवात करण्यांत आली त्यामध्ये पायस, पुरण, बेल पत्र, दुर्वा तसेच हवनिय द्रव्य यांच्या एक हजार आहूत्या देण्यात आल्या. नंतर परत महालक्ष्मी मातेच्या एकशे आठ आहुत्या देण्यात आल्या नंतर पूर्णाहुती मध्ये साडी चोळी नारळ फळ नैवेद्य व इतर पदार्थांचा समावेश करून पूर्णाहुती करण्यांत आली, पुढे आरती तीर्थ प्रसाद ग्रहण करून पांच ब्राम्हणांना ब्रम्ह भोज देण्यात आले तद्नंतर यजमान आणि पाहुणे मंडळींचा भोजनाचा कार्यक्रम पार पडला ब्रम्हवृंनदाना यथोचित दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले उपस्थित पाहुण्यांचा श्रीफळ चूनरी देऊन योग्य सत्कार केला तसेच उत्तर पूजन  करून अग्नीचे विसर्जन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास पत्रकार समीर खाडिलकर (नाट्य- सिने निर्माता, सदस्य- महाराष्ट्र हरित सेना वन विभाग- महाराष्ट्र  शासन), विकासक संदिप परब, शांत्ताराम गुडेकर, शरद पंडित(वडिल), विपुल पडित(भाऊ) आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या प्रयत्नातून नागरिकांसाठी दुमजली आरसीसी निर्मित तीन शौचालयाचे लोकार्पण !

नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या प्रयत्नातून नागरिकांसाठी दुमजली आरसीसी निर्मित तीन शौचालयाचे लोकार्पण !मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
       भारतीय जनता पार्टीच्या खासदार पूनम महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांदीवली विधानसभा अध्यक्ष, नगरसेवक प्रकाश मोरे यांनी आपल्या नगरसेवक निधीतून असल्फा व्हिलेज साकिनाका प्रभाग क्रमांक १५९ येथील नवनिर्मित तीन ठिकाणी नागरी शौचालयाचे लोकार्पण केले. नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या प्रभागातील लोकांची महत्वाची मागणी होती ती शौचालय बनवण्याची नागरिकांची ही गरज ओळखून विभागात अनेक ठिकाणी नागरी काम सुरू केली आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी शौचालय निर्माण केले जात असून नुकतेच दुमजली, आरसीसी निर्मित तीन शौचालयाचे लोकार्पण नगरसेवक प्रकाश मोरे यांनी केले. या उदघाटन प्रसंगी वॉर्ड अध्यक्ष परशुराम शिंदे, समाजसेवक संभाजी लाड, जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई युवा मोर्चा,सुनील दुबे, सचिन भोर, शांताराम ठुकृरूल, पांडुरंग म्हसकर, सुदाम पालवे, प्रशांत मिश्रा, अमोल नलावडे, फजी सिद्धीकी, गणेश भोसले, मधू परब, श्रीनाथजी दुबे, रुपेश भाई जैन, चौधरी शेठ आधी उपस्थित होते.

गुहागर तालुक्यातील काताळे गावाचा सुपुत्र रोहित बारस्कर साकारतोय भिंतीवर हुबेहूब चित्र !

गुहागर तालुक्यातील काताळे गावाचा सुपुत्र रोहित बारस्कर साकारतोय भिंतीवर हुबेहूब चित्र !


कोकण (शांत्ताराम गुडेकर /दिपक कारकर) :
           कोकण म्हटले की निसर्ग सौंदर्याने नटलेली रत्नाची खाणच ती! पावसाच्या थेंबाने जशी वसुंधरा हर्षित होऊन हिरवा शालू नेसून बळीराजाचे स्वागत करण्यास तयार असते आणि बळीराजा सुद्धा ह्या स्वर्गरूपी काळ्या मातीतून सोनं काढण्यास तयार होतो.अशाच कोकणच्या भूमीत रत्नागिरीच्या खाणीत अनेक कलारूपी रत्ने दररोज जन्मास येऊन अगदी ती नावलौकिक ठरली. असाच एक उमदा चित्रकार गुहागर तालुक्यात प्रत्येयाला येतोय. रत्नागिरी जिल्हातील गुहागर तालुक्यातील काताळे गावाचा सुपुत्र कु. रोहित महादेव बारस्कर सध्या आपल्या हस्तकला कौशल्याने भिंतीवर अनेक हुबेहूब चित्र रेखाटताना दिसतोय. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध कलागुण अगदी ठासून भरलेले असतात मात्र त्यांना व्यासपीठ किंवा मार्गदर्शन मिळत नाही. अगदी लहानपणापासून शिक्षणाबरोबर त्याला चित्र काढण्याची आवड होती. कुठेही बसल्या जागी समोर दिसेल ते चित्र आपल्या छोट्याच्या वहीत रेखाटायची सवय होती !म्हणता म्हणता पुढे हिच सवय त्याचा छंद होऊन गेली आणि बघता बघता तो आपल्या शंभरपानी वहीवरून तीच चित्र भिंतीवर रेखाटू लागला. अशीच त्याने आपल्या घराच्या भिंतीवर अनेक चित्र काढली आहेत. एखादं चित्र काढल्यानंतर त्यात तो त्या चित्राला ऑइलपेंट रंगाचा वापर करून तो त्या चित्राला जिवंत बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतो आहे. घरची परिस्थिती हालाखीची असताना त्याच परिस्थितीत तो आपला छंद जोपासत आहे.आपल्या ह्या परिस्थितीवर मात करून त्याला भविष्यात मोठा चित्रकार होण्याचे त्याचं स्वप्न आहे.सध्या तो अशाच कामाच्या प्रतीक्षेत आहे. या युवा चित्रकाराने भविष्यात एक मोठा चित्रकार बनावं अशी आशा अनेकांना लागून राहिली आहे. रोहितच्या कला-कौशल्याचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा तर्फ नवदुर्गा पुरस्काराने नऊ महिला सन्मानित !!

नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून  भाजपा महिला मोर्चा तर्फ नवदुर्गा पुरस्काराने नऊ महिला सन्मानित !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : आज नवरात्रौत्सवाचे औचित्य साधुन भाजपा महिला मोर्चा मुरबाड तालुका व मुरबाड शहर यांच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना नवदुर्गा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.


      जिल्हाध्यक्ष भाजपा ठाणे ग्रा. तथा कार्यसम्राट आमदार *मा. श्री.किसनजी कथोरे* साहेबांच्या
मार्गदर्शनाखाली
*मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर भाजपा महिला मोर्चा* तर्फे
तालुक्यातील आणि शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना 
*नवदुर्गा पुरस्कार* 
देऊन गौरविण्यात आले.ज्या मध्ये अहोरात्र रुग्णांसाठी मेहनत घेणाऱ्या डॉ. जयवंती जितेंद्र ठमके, वकिल सौ.वैशाली नितेश जगताप/घरत, नर्स विनया राजेंद्र बगाडे, महिला 'पोलीस कर्मचारी सौ. सुशीला निव्रुती दराणे, सौ.'विद्या प्रवीण बैरागी-शिक्षिका' आशा स्वयंसेविका-रंजना मधुकर दिघे' सफाई कर्मचारी मुरबाड नगरपंचायत भारती गणेश पतंगे' श्रीमती -ताराबाई दिलीप हुमणे-ग्रामीण रुग्णालय स्वच्छता कर्मचारी यांना नवदुर्गा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी *भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव सर, जिल्हाध्यक्षा भाजपा ठाणे ग्रा.महिला मोर्चा सौ.शितलताई तोंडलीकर, संघटन सरचिटणीस भाजपा ठाणे जि.ग्रा.
श्री.नितीन मोहपे सर, तालुका अध्यक्षा मुरबाड .महिला मोर्चा सौ.स्वराताई चौधरी, सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रा.भाजपा महिला मोर्चा सौ.सिमाताई घरत,*
सभापती मुरबाड पं.स. *श्री.श्रीकांत धुमाळ*,
नगराध्यक्षा तथा शहराध्यक्षा भाजपा मुरबाड शहर *सौ.छायाताई चौधरी*, शहराध्यक्ष भाजपा मुरबाड शहर *श्री.सुधीरभाई तेलवणे*, उपनगराध्यक्षा 
*सौ.अर्चनाताई विशे*, मुरबाड पं.स. सदस्या, नगरसेविका, पदाधिकारी भाजपा महिला मोर्चा आणि अनेक मान्यवर महिला भगिनी आवर्जून उपस्थित होत्या. या प्रेरणादायी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चिटणीस भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण *सौ. ज्योतीताई गोडांबे* यांनी केले.

बाळ कुशित असताना मातेच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू ! "चार महिन्याचे बाळ माञ सुखरूप" !

बाळ कुशित  असताना मातेच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू !     
"चार महिन्याचे बाळ माञ सुखरूप" !


मुरबाड - (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार परतीचा पाऊस पडत असतानाच गुरुवार दि. २२ रोजी तालुक्यातील तागवाडी येथे संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या  वेळेस आपल्या घरात चिमुरड्याची भूक भागवण्यासाठी उराशी घेतलेल्या चार महिन्याच्या बाळाला माऊली दुध पाजित असताना अंगावर वीज पडून त्या मातेचा जागीच मृत्यू झाला तर चार महिन्याचा बाल सुखरूप वाचला आहे. सदर विज घरावर पडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील तागवाडी (मोहघर) येथे राहणारी प्रिती रमेश मेंगाळ (वय २४) ही महिला आपल्या चार महिन्याच्या आपल्या   चिमुरड्याला उराशी घेऊन दूध पाजत असताना गुरुवारी सायंकाळच्या वेळेस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला त्यात या मातेच्या अंगावर वीज पडून मातेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर चार महिन्यांचा बालक सुखरूप असल्याची माहिती मुरबाड पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. म्हसा  महसूल विभागाकडून सूद्धा या घटनेचा पंचनामा केला गेला असल्याची माहिती नायब तहसिलदार (महसुल) बंडू जाधव यांनी दिली.               
या महिलेच्या निधनाने तागवाडी, मोहघर, पाटगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माणगाव तालुक्यातील तलाठी/मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधणीसाठी जमीन हस्तांतरण मंजूर - पालकमंत्री आदिती तटकरेंचा महत्वपूर्ण निर्णय.

माणगाव तालुक्यातील तलाठी/मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधणीसाठी जमीन हस्तांतरण मंजूर - पालकमंत्री आदिती तटकरेंचा महत्वपूर्ण निर्णय.


       बोरघर / माणगाव (विश्वास गायकवाड) : तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत बांधणी होणे आवश्यक बनले होते. नागरिकांकरिता तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असून या दृष्टीने नागरिकांना विनासायास त्यांची जमिनीविषयक तसेच अन्य तत्सम कामे होण्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. याचे महत्त्व ओळखून व गरज लक्षात घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या गावातील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारती बांधण्यासाठी जमीन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले होते.
        त्यास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी माणगाव तालुक्यातील चांदोरे, नांदवी,उणेगाव, लोणेर,दहिवली त. गाेवेले, थरमरी, हाेडगाव, जिता, तळेगाव, पन्हळघर बु., मुद्रे, खरबाची वाडी, हरकाेल, रातवड,चाच, बामणाेली, कालवण, मोर्बा, सुरवत त.तळे, पहेल, मलई काेंडवणी, साले, पोटनेर या गावांमधील तलाठी सज्जा कार्यालय इमारत बांधणीच्या दृष्टीने संबंधितांच्या मागणीप्रमाणे शासकीय जागा हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले आहेत तसेच पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले आहेत.
       या निर्णयामुळे माणगाव तालुक्यातील या गावांमधील गावकऱ्यांना अद्ययावत व सुसज्ज अशा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयातून उत्तम शासकीय सेवा व साेयीसुविधा मिळतील, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

Friday 23 October 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटीची मदत 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे' यांची घोषणा !

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटीची मदत 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे' यांची घोषणा !
*शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत*


*एकूण केंद्राकडून येणं ३८ हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत*

अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे.

मुंबई : या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे.दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल

पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. 

जिरायत, बागायत जमिनीसाठी ६८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे 

फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल

आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली.

बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.

महापालिका कर्मचा-यांची ५० हजार रुपये बोनसची मागणी !

महापालिका कर्मचा-यांची ५० हजार रुपये बोनसची मागणी !


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेची आर्थिक स्थिती खालावली असली, तरीही पालिका कामगारांकडून २०१९-२० आर्थिक वर्षासाठी ५० हजार रुपये बोनसची मागणी पुढे आली आहे. पालिका संघटनांनी पालिका आयुक्त आणि महापौरांकडे याबाबत मागणी केली आहे. दि म्युनिसिपल युनियनने पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचा-यांना २०१९-२०च्या वर्षातील उत्पन्नाच्या २० टक्के इतका बोनस देण्याची मागणी केली आहे. तर, म्युनिसिपल मजदूर संघाने ५० हजार रु. बोनसची मागणी उचलून धरली आहे.मुंबईत कोरोनाने मार्चपासून हातपाय पसरण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पालिकेची यंत्रणा कोरोनाविरोधात उभी ठाकली आहे. त्यात पालिकेच्या सर्वच विभागांनी अव्याहत सेवा देणे सुरू ठेवले आहे. त्यात पालिका कर्मचा-यांसह अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर, तंत्रज्ञ, कंत्राटी कामगारांसह अनेक जण जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना २०१९-२० आर्थिक वर्षाच्या एकूण उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पत्राद्वारे केली आहे. पालिका आयुक्त आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहिलेल्या पत्रात या मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली आहे.

तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा तहसीलदारांचे आदेश !

तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा तहसीलदारांचे आदेश !


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुका हा ९०% भातपिकावरच अवलंबुन असला तरी परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला भातपिकासोबत शेतक-याला भुईसपाट केल्याने शेतक-याना तात्काळ मदत मिळावी म्हणून कृषी विभाग; ग्रामसेवक; महसुल विभागाला पंचनामे सादर करण्याचे आदेश तहसिलदार अमोल कदम यांनी देऊन संपुर्ण तालुक्याचे पंचनामे दोनच दिवसात पार पडणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. विक्रमी उत्पादन घेणारा म्हणुन लौकिक असलेल्या मुरबाड तालुक्यात या वर्षी भाताचे पीक कापणी करण्यास सज्ज झालेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या पावसाने पुर्णपणे पाणी फेडले. भाताचे पीक घेऊन तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामासाठी तयारी सुरू करतो पण या वर्षी भाताची शेते पाण्याने तुडुंब भरली असल्याने रब्बी पिके घेण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल अशा संकटात तात्काळ आर्थिक मदत पोहचणे गरजेचे आहे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पक्ष्यांच्या नेत्यांनी या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली हे नाकारता येणार नाही. परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडे सादर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहचणे दुरापास्त आहे म्हणुन मुरबाड तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम यांनी तलाठी ग्रामसेवक, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांना दोन दिवसांत कोणताही शेतकरी मदती पासुन वंचित रहाणार नाही याची खबरदारी घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत कारण सन.२०१७ ला अश्या प्रकारचा ओला दुष्काळ पडला असता कही शासकीय कर्मचाऱ्यांनी पंचनामे करताना तसेच शासनाने कडे सादर करताना दुर्लक्ष केले होते परीणामी अनेक शेतकरी मदती पासुन वंचित राहीले होते म्हणून तहसीलदार कदम यांनी या कोणी ही वंचित राहता कामा नये हि दक्षता बाळगली आहे कोरोनाच्या महामारीत अगोदरच शेतकरी भरडाला आहे. त्यातच हे अस्मानी संकटात हलगर्जीपणा न करता पंचनामे करून तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

उरण येथील वीज निर्मिती प्रकल्पाची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली पाहणी !

उरण येथील वीज निर्मिती प्रकल्पाची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली पाहणी !
      
       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उरण येथील गॅस थर्मल पॉवर स्टेशनची आज पाहणी केली. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे वायू विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांमार्फत स्वागत करण्यात आले. 
       यावेळी त्यांनी बोकडविरा येथील प्रकल्पातील पॉवर स्टेशनची पाहणी केली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना प्रकल्पाची माहिती देत तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्राबाबत सादरीकरण केले.   
         यावेळी सातत्याने खंडित होणारी वीज आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळणेसंदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना स्थानिक गावकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले.

विस्थापित आदिवासी बांधवांची भेट घेऊन जाणुन घेतल्या त्यांच्या व्यथा !

विस्थापित आदिवासी बांधवांची भेट घेऊन जाणुन घेतल्या त्यांच्या व्यथा !


अंबरनाथ - अंबरनाथ तालुक्यातील एमआयडीसी बहनोली येथील आदिवासी पाड्यातील काही आदिवासी कुटुंबांना त्यांचे अज्ञान व निरक्षर पणाचा गैरफायदा घेऊन काही स्थानिक तथाकथित पुढा-यांनी (सरपंच आणि पोलीस पाटील) संगनमत करुन आदिवासींच्या वहीवाटीत असलेली वडीलोपार्जित जमीन एमआयडीसीतील *सिएट* कंपनीला खोटे कागदपत्रे बनवून विकली असल्याचा दावा तेथील विस्थापित आदिवासी कुटुंबांनी केला आहे.


गेल्या तीन वर्षांपासून सदर 8/9 कुटुंबांना तुम्हाला कंपनीत नोकरी देतो, प्रत्येकी र.रु. 20 लाख रुपये व जमीनीच्या मोबदल्यात तुमचे दुसरीकडे जमीन देवुन घरे बांधून देतो. अशी खोटी व फसवी आश्वासने देवुन कागदपत्रांवर निरक्षर अज्ञानी आदिवासी कुटूंबातील सदस्यांचे अंगठे घेऊन जवळपास अडीच एकर जमीन सिएट कंपनीने आजुबाजुच्या गावातील पोलीस पाटील व तथाकथित नेतेमंडळी यांच्या मध्यस्थीने बळकावून आदिवासी कुटूंबांना गावकुसाबाहेर निर्जन स्थळी तात्पुरती घरे देवुन त्यांची बोळवण करुन त्यांची फसवणूक केली आहे.
सदर जमीनीचा मोबदला तेथील मध्यस्थी करणा-या तथाकथित नेते मंडळी व पोलीस पाटील व इतरांनी हडप केल्याची व्यथा विस्थापित व पिडीत आदिवासी कुटुंबांनी *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.* संघटनेचे प्रदेश सरचिटणीस *महेंद्र तथा अण्णा पंडित.* यांचे कडे मांडली आहे.
सदर विस्थापित कुटुंबांना नागरी सुखसुविधांपासुन वंचित ठेवणा-या व फसवणुक करुन आदिवासी जमीन बळकवल्या प्रकरणी आपण सिएट कंपनी विरुद्ध  आणि त्यांना सदर जमीन व्यवहार प्रकरणात मदत करणारे पोलीस पाटील व इतरांविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवुन व आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन करण्याबाबत प्रशासनाकडे संघटने मार्फत दाद मागण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महा.राज्य प्रदेश सरचिटणीस अण्णा पंडित यांनी केले आहे. पिडीत कुटुंबियांच्या भेटी दरम्यान स्थानिक समाजसेविका किशोरी पाटील पत्रकार तथा मानवाधिकार कार्यकर्ता अजित इंगळे स्थानिक जातीवादी गावगुंडांच्या अत्याचाराने पिडीत असलेले बाळाराम शिद हे अण्णा पंडीत यांचे सोबत उपस्थित होते.

Thursday 22 October 2020

म्हाडाचे रूम मिळवून देते, मेट्रो मध्ये नोकरी लावून देते असे आमिष दाखवून युवकांकडून आणि महिलांकडून कडून 33 लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या साकीनाका येथील वंदना संजय मिश्रा हिला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

म्हाडाचे रूम मिळवून देते, मेट्रो मध्ये नोकरी लावून देते असे आमिष दाखवून युवकांकडून आणि महिलांकडून कडून 33 लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या साकीनाका येथील वंदना संजय मिश्रा हिला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !


मुंबई : बेरोजगार तरुण तरुणींना कृषी विभागात, तर काहींना मेट्रो मध्ये नोकरीला लावते, असे सांगून 33 लाख रुपये लाटणाऱ्या साकीनाका येथील वंदना संजय मिश्रा या महिलेने त्यांच्या कडून 33 लाख रुपये हडप केले, 2018 मध्ये पैसे घेऊन या सर्व जणांना तिने झुलवत ठेवले, जेव्हा या सगळ्यांना समजले ह्या  महिलेने आपली फसवणूक केली आहे तेव्हा सगळ्यानी मिळून साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये 14 /10/2020  ह्या तारखेला तिच्या विरुद्ध 420 चा गुन्हा दाखल केला, साकीनाका पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत  यांनी ह्याचा पुढील तपास एपीआय मश्चिन्द्र जाधव यांच्या कडे दिला, परंतु आज आठ दिवस झाले तरी त्या महिलेला अटक झाली नाही, ही महिला तेथील काँग्रेसची कार्यकर्ता आहे, आणि ती राजरोस पणे फिरत असते तुम्ही जर माझी अशीच तक्रार करत राहिलात तर तुम्हांला काहीच मिळणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशा तिच्या वार्ता असतात, तरी एफआरआय झाला असताना सुद्धा पोलीस तिला अटक का करत नाहीत हा मोठा मुद्दा आहे, तिला काही राजकीय लोकांचे संरक्षण आहे का? म्हणून पोलीस तिला अटक करत नाहीत? तरी वरिष्ठ अधिकारी ह्यानी लक्ष घालून ह्या महिलेला त्वरित अटक करून फसवणूक झालेल्या युवकांना न्याय मिळवून द्यावा.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...