Thursday 29 October 2020

महात्मा फुले पोलिस स्टेशनची आणखी एक गौरवास्पद कामगिरी !!

महात्मा फुले पोलिस स्टेशनची आणखी एक गौरवास्पद कामगिरी !!


कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची झालेली वाढ हा पोलिसांसाठी एक चिंतेचा विषय झाला होता. अशातच दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी उल्हासनगर येथील संभा रामा धुळे ह्यांचा मोबाईल रेल्वे स्टेशन परिसरातील कल्याण दरबार हॉटेल समोरून पायी जात असताना मागून काळ्या रंगाच्या सुझुकी अॅशेस वरुन आलेल्या दोघांतील मागच्या इसमाने त्यांच्या शर्टाच्या खिशातून  मोबाईल हिसकावून घेत पलायन केले. संभा रामा धुळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चिकाटीने मेहनत करून आरोपी १) अविनाश उर्फ लाला विठ्ठल चिकणे, वय २०, रा. उंबर्डे, कल्याण. २) मुनवर मोहम्मद शेख, वय १७, रा. नवीन गोविंदवाडी, कल्याण. यांना अटक करून ६०,००० रुपये किंमतीची सुझुकी अॅशेस, व २८,००० रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा ८८,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच २४ ऑक्टोबर २०२० रोजी सुध्दा वलीपीर रोड, बैलबजार, कल्याण येथे अरहम खलीद टमणे, रा. बाजारपेठ, कल्याण उभे असताना त्यांच्या खिशातून अॅक्टिव्हा गाडीवरून येऊन खिशातून मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले, त्याचा सुध्दा तपास चिकाटी व हुशारीने करून निखिल मंगल ठाकरे, वय २१, रा. सोनाळे, ता. भिवंडी यास अटक करून ९८,००० रुपयांचे ७ मोबाईल व ४५,००० रुपयाची अॅक्टिव्हा असा मुद्देमाल हस्तगत केला.
वरील सर्व कामगीरी मा. पोलिस आयुक्त, ठाणे, विवेक फणसाळकर, मा. सह पोलीस आयुक्त, ठाणे, सुरेशकुमार मेकला, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण विवेक पानसरे, सहायक पोलिस आयुक्त, कल्याण, अनिल पोवार, वपोनि नारायण बनकर, पो. नि.(गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, सपोनि प्रकाश पाटील, सपोउनि जयवंत शिंदे, पोहवा विजय भालेराव, किरण शिर्के, शशिकांत निकाळे, पोना. मनोहर चित्ते, नरेश दळवी, सुनील भणगे, रामचंद्र मोरे, जितेंद्र चौधरी, पोशि. दिपक सानप, योगेश पवार यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...