Friday 30 April 2021

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्मे, आंदोलक यांच्या अनमोल योगदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती !!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०७ हुतात्मे, आंदोलक यांच्या अनमोल योगदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती !!


स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी '' संयुक्त महाराष्ट्र चळवळ '' हा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा लढा उभारण्यात आला होता. तत्कालीन कॉग्रेस नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी चौपाटी येथील सभेत कॉग्रेस जिवंत असेपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. तर स. का. पाटील यांनी यावचंद्र दिवाकरों म्हणजे सुर्य चंद्र असेपर्यंत किंवा पुढील पाच हजार वर्षे महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. गुंडगिरी ला योग्य जाब मिळेल. मुंबई केंद्र शासित राहील असे प्रक्षोभक विधान केले. आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन अधिक तीव्र झाले. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सत्तेचा गैरवापर करत आंदोलकांना उधळून लावण्यासाठी आंदोलकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आणि एकही गोळी वाया जाणार नाही असा आदेश पोलीसांना देऊन निष्ठूरपणे गोळीबार करायला लावला या संपूर्ण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आंदोलनात तब्बल १०७ जणांनी आपल्या अनमोल प्राणाची आहुती दिली. या हुतात्म्यांच्या अनमोल योगदानातून आणि सदर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आग्रही भूमिका असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, एस एम जोशी, प्र के अत्रे, लोकशाहिर अणाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर, श्रीपाद डांगे, भाई उद्धवराव पाटील इत्यादींच्या अथक प्रयत्नानंतर १ मे १९६० रोजी अर्थात कामगार दिनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई महाराष्ट्राला मिळाली व भारताच्या नकाशावर  महाराष्ट्र राज्य उदयास आले. 
        महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्या नंतर महाराष्ट्र स्थापनेचा सोहळा ३० एप्रिल १९६० रोजी रात्री ११ : ३० वाजता मुंबई राजभवनाच्या विस्तिर्ण आवारात सुप्रसिद्ध शहनाई वादक रामलाल यांच्या शहनाईच्या मंगल सुरांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य दिव्य अशा अलिशान विचार मंचकाची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी महाराष्ट्राची उत्सवमुद्रा लामणदिवा झळकत होता. 
     ३० एप्रिल च्या रात्री बरोबर १२ वाजता कार्यक्रमाचे उदघाटक देशाचें प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी सर्वांसमोर १ मे १९६० पासून नवं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं अशी अधिकृतपणे घोषणा केली. आणि त्याचक्षणी मुंबई शहरातील सर्व कापड गिरण्यांच्या भोग्यांनी मुंबईचे आसमंत दुमदुमून निघाले. मुंबई शहरातील मंदिर, चर्च आदी प्रार्थना स्थळांतून घंटानाद घणाणू लागले. रेल्वे गाड्यांच्या शिट्यांचा एकच आवाज सुरू झाला. जहाजांचे भोंगे साद देऊ लागले. सदर पूर्व नियोजित ध्वनी संयोजनेतून उद्योग नगरी मुंबईतील विविध घटकांच्या अस्तित्वाचे व सहभागाचे प्रतिक दर्शविण्यात आले. या ऐतिहासिक मंगल कार्यक्रम प्रसंगी मंचकावर अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. 
      सदर कार्यक्रम प्रसंगी राज्यपालांच्या भाषणा नंतर प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंचे भाषण झाले. या नंतर आभार प्रदर्शनाच्या भाषणात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या काळ्या फत्तरातील हा मराठमोळा सदैव तयार राहिल अशी ग्वाही देऊन जवाहरलाल नेहरूंना राष्ट्र कार्यात महाराष्ट्र कार्यरत राहिल अशी ग्वाही दिली. 
      त्याच दिवशी अर्थात १ मे रोजी नवनिर्माण महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मंत्रीमंडळाच्या शपथविधी या कार्यक्रमासाठी मुंबई च्या नव्या सचिवालया समोर भव्य शामियाना उभारण्यात आला होता. या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजता शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. 
     या मध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मंत्रीमंडळ प्रस्थापित झाले ते पुढील प्रमाणे... 
यशवंतराव चव्हाण - ( मुख्यमंत्री, गृह, उद्योग खाते ) बाळासाहेब भारदे ( सहकार मंत्री ) बाळासाहेब देसाई  ( शिक्षण मंत्री ) पी के सावंत ( कृषी मंत्री ) मारोतराव कन्नमवार ( दळणवळण व बांधकाम मंत्री ) वसंतराव नाईक ( महसूल मंत्री ) शेषराव वानखेडे ( अर्थमंत्री ) एस  जी काजी ( पुरवठा मंत्री ) डी झेड पळसपगार ( शहर विकास ) भगवंतराव गाडे  ( ग्रामविकास ) शंकरराव चव्हाण ( वीज पाटबंधारे ) शांतीलाल शहा ( विधी ) ति रा नरवणे ( समाजकल्याण ) जे एच होमी तल्यारखान ( पर्यटन ) असे महाराष्ट्र राज्याचे पहिले मंत्रीमंडळ प्रस्थापित झाले.  *लेखन - पत्रकार विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव, रायगड भ्रमणध्वनी ८००७२५००१२ / ९८२२५८०२३२*

भिवंडीतील " समाज कल्याण न्यास "या संस्थेच्या वतीने वतीने पालघर व ठाणे जिल्ह्यातील सर्व कोव्हीड सेंटरला बेडशीट चे वाटप !!

भिवंडीतील " समाज कल्याण न्यास "या संस्थेच्या वतीने वतीने पालघर व ठाणे जिल्ह्यातील सर्व 
कोव्हीड सेंटरला बेडशीट चे वाटप !!

      महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुन्हा समाजसेवेला सोन्या पाटील यांची जोमाने सुरुवात.
   
 
अरुण पाटील, भिवंडी :
        भिवंडी तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात पोहचलेली संस्था " समाज कल्याण न्यास" महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी गेल्या १५ दिवसाच्या कोरोना काळात मृत्यूशी झुंज देत लढाई जिंकली आहे. त्यामुळे कोरोना ही महामारी  काय आहे याची जाणीव त्यांना झाली आहे. संपूर्ण जगातील वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या एकूण तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना कशा प्रकारे पसरला आहे व कोविड सेंटरमध्ये  नागरिकांचे  काय हाल होत आहे. कोणाला बेड नाही तर कोणाला ऑक्सिजन नाही तर, बेडवर बेडशीट नाहीत हे पाहून एकूणच त्यांचे मन रमत नव्हते. कोरोना संकटनातून  ते सुख रूप घरी येताच त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला नव्या उमेदीने सुरुवात केली आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनी पालघर व ठाणे जिल्ह्यातील सर्व कोव्हिड सेंटरला बेडशीट चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी प्रत्यक्ष प्रतिनिधींशी बोलताना दिली. श्री सोन्या पाटील यांनी गरीब, गरजू लोकांना व गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत तर केलीच पण महाराष्ट्रातील दुर्लक्षित आदिवाशी बांधवाना पण त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे व देत आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने, व त्यांनी केलेल्या आरोग्यदायी प्रार्थानेमुळे मी आज सुख रूप बरे होऊन  घरी पोहचलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. असेच आपले प्रेम माझ्यावर कायम टिकून राहावे  हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझ्या वतीने आपना सर्वांचे मनापासुन आभार मानतो असे भावनिक विनंती त्यांनी सर्वांना केली आहे.

कोरोनाच्या काळातही ग्रामपंचायतीचा कर भरायला येणाऱ्या नागरिकांसाठी समाजसेवक दत्तू सांगळे यांनी दिल्या खुर्च्या! आमदारांना ठणकावले?

कोरोनाच्या काळातही ग्रामपंचायतीचा कर भरायला येणाऱ्या नागरिकांसाठी समाजसेवक दत्तू सांगळे यांनी दिल्या खुर्च्या! आमदारांना ठणकावले?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या काळातही ग्रामपंचायतीचा प्रामाणिकपणे कर भरायला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, सोशलडिंस्टिंग चे पालन व्हावे यासाठी म्हारळ गावातील समाजसेवक दत्तू सांगळे यांनी म्हारळ ग्रामपंचायतीला १०  खुर्ची दान केल्या असून यावेळी गावातील लोकांना वा-यावर सोडणा-या आमदार कुमार आयलाणी यांना देखील विविध प्रश्नांवर ठणकावले. त्यामुळे त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतुक होत आहे.


कोणत्याही ग्रामपंचायतीचा आर्थिक डोलारा हा त्या गावातील नागरिकांनी भरणाऱ्या टॅक्स वर अवलंबून असतो. सध्या सर्वत्र कोरोनाच्या संकटामुळे सर्व संस्थांचा आर्थिक गोंधळ उडाला आहे. विविध प्रकारचे टॅक्स वेळेवर भरला जात नसल्याने विकास कामे करण्यात अडचणी येत आहेत. अनेक जण कोरोना चे कारण पुढे करून टॅक्स भरण्याचे टाळत आहेत. परंतु याला कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत अपवाद ठरत आहे. येथील नागरिक इमानेइतबारे टॅक्स भरायला येत असतात. सुमारे ६० /७०हजार लोकसंख्येच्या या गावात ग्रामपंचायत कार्यालयात अपुरी जागा व कोरोनाची गंभीर परिस्थिती यामुळे कर भरायला येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रंसगी त्यांना उभे राहून किंवा कार्यालयाबाहेर उन्हात ताटकळत टॅक्स भरावा लागतो हे ओळखून म्हारळ ग्रामपंचायतीच्या सदस्यां श्रीमती बेबीताई सांगळे यांचे पती समाजसेवक दत्तू सांगळे यांनी ग्रामपंचायतस १० खुर्च्या भेट दिल्या.
यावेळी म्हारळ ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक अशोक परमार, सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी काही नागरिकांनी समाजसेवक दत्तू सांगळे यांना सांगितले की, आम्हांला लसीकरणासाठी खूप लांब जावे लागते, येथे सोय नाही, आमदार लक्ष देत नाहीत. असे समजताच सांगळे यांनी या भागाचे आमदार कुमार आयलाणी यांना फोन करून ठणकावले, आपण लोकप्रतिनिधी आहात, आपले जनतेच्या प्रति काही कर्तव्य नाही का? आपली यंत्रणा काय करते असे बोलून या भागातील नागरिकांसाठी कोरोना कोविड लसीकरण केंद्र वरप किंवा म्हारळ येथे सुरू करावे असे सांगितले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील ही अडचण सांगण्यात आली आहे असे सांगळे यांनी सांगितले.
खरेच समाजसेवक दत्तू सांगळे यांचा नागरिकांसाठी केलेले प्रयत्न व जनतेच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींना विचारलेला जाब नक्कीच कौतुकास्पद आहे. असा प्रयत्न प्रत्येकांनी करायला हवा तेव्हाच सर्वसामान्यांना सोईसुविधा मिळेल.

Thursday 29 April 2021

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार !! "येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यातील गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत करणार"

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार !!

"येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यातील गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत करणार"


        बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले येत्या दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आपल्या एक महिन्याच्या वेतनातून राज्यातील आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत. कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाऊन च्या काळात आंबेडकरी गायक कलावंतांची परिस्थिती हालाकीची झाली आहे. राज्यात अजून 15 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या काळात आंबेडकरी गायक शाहीर लोककलावंतांना आर्थिक विवंचना आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून आंबेडकरी कलावंतांना कोणतेही कार्यक्रम मिळालेले नाहीत. गत वर्षी कोरोना रोखण्यासाठी झालेल्या लॉक डाऊन मुळे आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती चे जाहीर  कार्यक्रम करण्यात आले नाही. यंदाही नेमका 14 एप्रिल आंबेडकर जयंती पासून राज्यात लॉक डाऊन लागला असल्याने आंबेडकरी कलावंतांना  कार्यक्रम मिळालेले नाहीत.दोन्ही वर्षी आंबेडकरी कलावंतांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आंबेडकरी गायक कलावंतांना येत्या दि.1 मे रोजी प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत ना.रामदास आठवले करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांना महिन्याला 2 लाख रुपये वेतन मिळत असून एक महिन्याचे वेतनाचे 2 लाख रुपये त्यांनी आंबेडकरी कलावंतांना मदत म्हणून वाटणार आहेत.

Wednesday 28 April 2021

आमदार कुमार आयलाणी यांनी संकटात तीन गावांना सोडले वा-यावर? उपसरपंचाचा गंभीर आरोप !

आमदार कुमार आयलाणी यांनी संकटात तीन गावांना सोडले वा-यावर? उपसरपंचाचा गंभीर आरोप !


कल्याण, (संजय कांबळे) : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यापासून  ते आजपर्यंत या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या म्हारळ, वरप, आणि कांबा या गावाकडे कायम दुर्लक्ष केलेल्या भाजपाचे आमदार कुमार आयलाणी यांनी कोरोनाच्या संकटात देखील काहीही मदत केली नाही. असा गंभीर आरोप वरप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश कडू यांनी केला आहे. कल्याण तालुक्यातील  म्हारळ वरप कांबा ही गावे उल्हासनगर शहरानजीक आहेत. सन १९९४/९५ मध्ये म्हारळ आणि वरप या दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. म्हारळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या ६०/७० हजाराच्या वर आहे तर वरप आणि कांबा ग्रामपंचायतीची १५ /२० हजाराच्या आसपास आहे. झपाटय़ाने नागरीकरण झाल्याने येथे मुलभूत सोईसुविधा पुरवताना ग्रामपंचायतीची नाकी नऊ येत आहे. प्रारंभी ही गावे उल्हासनगर महानगरपालिकेत समाविष्ट होती. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठा लढा देऊन ही गावे वेगळी केली होती. यावेळी सिंधी मराठी हा मुद्दा भंयकर चर्चेत आला होता.
गावे जरी महानगर पालिकेतून वेगळी झाली तरी मतदारसंघ मात्र उल्हासनगर विधानसभा असाच राहिला. तरीही येथील नागरिकांनी ते मान्य केले. ते या आशेवर की येथील आमदार आपल्या कडे लक्ष देतील, पण ग्रामस्थांची घोर निराशा झाली. कारण मागील २००५ च्या महापुरात म्हारळ वरप कांबा या गावाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले, उल्हासनगरातील विविध संस्था व सिंधी  बांधवांनी भरपूर मदत केली. परंतु लोकप्रतिनिधी कुठे दिसले नाहीत. अशीच परिस्थिती मागील वर्षांपासून सुरू आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका म्हारळ वरप कांबा या गावांना बसला, बेड नाही, रुग्णवाहिका नाही, वेळेवर औषध उपचार नाही. त्यामुळे अनेकांचा जीव गेला. मात्र स्वतः ला लोकप्रतिनिधी म्हणवणारे आमदार कुमार आयलाणी यांना याचे काही सोयरसुतक नव्हते. प्रचंड वाढणा-या या लोकसंख्येच्या गावाकरीता स्वतंत्र कोरोना कोविड सेंटर असावे असे अनेकांचे म्हणणे होते. पण येथेही आमदार साहेब कुठेही दिसले नाही. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता किंवा इतर अनेक सोईसुविधा साठी या लोकप्रतिनिधीनी ग्रामस्थांची कधी बैठक आयोजित केली नाही. ऐवढेच नव्हे तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भंयकर रुग्ण वाढले असताना, वरप कोरोना कोविड सेंटर मध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या असताना, यामध्ये आॅक्शिजन, पाणीपुरवठा, आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच पेंशट यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
आज इतक्या मोठ्या म्हारळ वरप कांबा पावशेपाडा, पठारपाडा, नाणेपाडा, वाघेरापाडा, वरप आदीवाशी वाडी आदी लोकसंख्येच्या गावातील लोकांना कोरोना कोविड लसीकरणासाठी कित्येक किलोमीटर अंतरावरील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र व गोवेली ग्रामीण रुग्णालय येथे जावे लागते आहे. हे दुर्दैवी नाही का? असा प्रश्न उपसरपंच निलेश कडू यांनी उपस्थित केला आहे. तसेच आज कल्याण ग्रामीण २७ गावे परिसरातील आमदार राजू पाटील हे त्यांचा मतदानाची संबंध नसतानाही म्हारळ वरप कांबा या गावातील लोकांसाठी वरप कोरोना कोविड सेंटर करीता मदत करतात आणि आमचे हक्काचे, जे आमचे नेतृत्व करतात ते आमदार कुमार आयलाणी या गावाकडे ढुंकूनही पाहत नाही याला काय म्हणावे? याचा नागरिकांनी गंभीर विचार करावा असे आवाहन उपसरपंच निलेश कडू यांनी केले आहे.

Tuesday 27 April 2021

महाराष्ट्राने लसीकरण ओलांडला दिड कोटीचा टप्पा !! "आरोग्यमंत्री राजेश टोपे"

महाराष्ट्राने लसीकरण ओलांडला दिड कोटीचा टप्पा !! "आरोग्यमंत्री राजेश टोपे"


मुंबई, २७ : राज्यात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने देखील गती घेतल्याचे दिसत आहे. काल राज्याने पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करत विक्रमाची नोंद केली होती. तर, आजच्या लसीकरणामुळे आता महाराष्ट्राने लसीकरणात दीड कोटींचा टप्पा देखील ओलांडला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, असं टोपेंनी सांगितलं आहे.

"महाराष्ट्राने आज(मंगळवार) दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून, एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 

"काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे." असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.

शिक्षण सेवकांना कोरोना कामगिरीवर नियुक्त करू नये म्हसळा शिक्षण सेवकांचे तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन !!

शिक्षण सेवकांना कोरोना कामगिरीवर नियुक्त करू नये म्हसळा शिक्षण सेवकांचे तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन !!
       
                 
      बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : शासनाच्या माध्यमातून शिक्षण सेवकांना रुपये ६०००/ सहा हजार रुपये मानधनावर राबविण्यात येते, त्यात कुठलेही लाभ न देता अनेक कामांसह कोरोना निर्मुलना संबंधित कामे शिक्षणसेवकांकडुन करून घेत असल्याने शेवटी आज सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी म्हसळा तालुक्यातील सर्व शिक्षणसेवकानी एकत्र येऊन कोरोना कामगिरीवर नियुक्ती करण्यात येऊ नये अशी रोकठोक भूमिका घेत शिक्षण राज्यमंत्री मा. श्री. बच्चू कडू साहेब,  तहसीलदार साहेब म्हसळा, गट विकास अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी म्हसळा यांना सामुहिक रीत्या लेखी निवेदन दिले. 
      सदर निवेदनाच्या माध्यमातून शिक्षणसेवकांना शिक्षणसेवक कालावधीत ६००० मानधना व्यतिरिक्त कायम स्वरुपी शिक्षकांसारखा कुठलाही शासकीय लाभ मिळत नाही. मेडिकल रजा, आरोग्य विमा, कर्ज, शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार, प्रोत्साहन भत्ता, अग्रिम यासारखा कुठलाही शासकीय लाभ शिक्षणसेवकांना मिळत नाही. तसेच बऱ्याच जिल्ह्यात शिक्षणसेवकांचा कोरोना कामगिरीवर असताना कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आणि संबंधिताचा परिवाराला कुठलाही शासकीय लाभ देण्यात आलेला नाही ही कैफियत मांडून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले. 
      तसेच म्हसळा प्रशासनाने निवेदन दिल्यानंतर सुद्धा शिक्षण सेवकांची कोरोना कामगिरीवर नियुक्ती केली आणि एखाद्या शिक्षण सेवकांचा जीवितास धोका उद्भवल्यास पर्यायी त्याचा मृत्यू झाल्यास कायदेशीररीत्या स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी वर्ग आणि सर्वस्वीपणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहील अशी निवेदनामार्फत आपली स्पष्ट भूमिका नमूद केली. 
       म्हसळा प्रशासनाने देखील शिक्षणसेवकांप्रती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना कोरोना कामे देऊ नयेत असं म्हसळा तालुक्यातील सर्व वरिष्ठ शिक्षकांचेही एकमत आहे. तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचेही या गोष्टीला पाठींबा आहे. तेव्हा म्हसळा प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून रुपये ६००० एवढ्या तुटपुंज्या मानधनावर कुठलाही लाभ न घेता काम करत असलेल्या शिक्षण सेवकांना कोरोना कामगिरीवर नियुक्त करू नये. असे लेखी निवेदन म्हसळा शिक्षण सेवकांनी म्हसळा तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी म्हसळा यांना दिले.

विद्युत मंडळाची बत्ती गुल, लसीकरण हाऊसफुल्ल, सोशलडिंस्टिंगचा फज्जा, कोरोनाची मज्जा?

विद्युत मंडळाची बत्ती गुल, लसीकरण हाऊसफुल्ल, सोशलडिंस्टिंगचा फज्जा, कोरोनाची मज्जा?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाचा वाढता पार्दूभाव रोखायचा असेल तर लसीकरण मोठ्याप्रमाणात झाले पाहिजे या शासनाच्या अवाहनाला राज्यातील सर्वच भागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अगदी सुट्टीच्या दिवशी देखील लसीकरण सुरू केले आहे. परंतु कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात काल म्हणजे सोमवारी विद्यूत मंडळांने  त्यांच्या कामासाठी पुर्ण दिवस लाईट बंद केल्याने लसीकरण होऊ शकले नाही. यांचा परिणाम मात्र आज म्हणजे मंगळवारी प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिसून आला. येथील प्रत्येक लसीकरण केंद्र हाऊसफुल्ल झाले होते. त्यामुळे सोशलडिंस्टिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. तर कोरोनाला संसर्गासाठी मजेशीर वातावरण निर्माण झाले होते.


राज्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. कुठे ही रुग्णालयात जागा नाही, आॅक्शिजन बेड, व्हॅन्टेलटर मिळत नाही. अनेकांचा तडफडून मृत्यू होत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ पाहत आहे. आभाळच फाटले आहे. शासनाकडून केले जाणारे उपाययोजना तोकड्या पडत आहेत. यामुळे शासनाने ब्रेक द चैन हा कार्यक्रम हाती घेतला. व राज्यात संचारबंदी लागू केली. हे करतानाच कोरोनाचा वाढता पार्दूभाव रोखायचा असेल तर लसीकरण मोठ्याप्रमाणात झाले पाहिजे म्हणून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण मोहिम सुरू केली.
केवळ ठाणे जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा विचार केला तर कालपर्यंत कल्याण ८ हजार ४,अंबरनाथ ९ हजार ९५२, भिवंडी २८ हजार ७५७, मुरबाड १२ हजार ४३९, शहापूर १४ हजार ९८५, असे एकूण ७४ हजार १३७, इतके नागरिकांना कोरोना कोविड लसीकरण देण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातील  निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक म्हणजे ६ हजार च्या वर लसीकरण झाले आहे. दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १७०० तर ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे २ हजार ११० इतक्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
आरोग्य अधिकारी व कर्मचारी सिस्टर, आशा वर्कर, जीव धोक्यात घालून हे लसीकरण करत आहेत कल्याण तालुक्यातील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र, खडवली केंद्र, निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे लसीकरण मोहिम सुरू आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी देखील लसीकरण सुरू आहेत. असे असताना काल म्हणजे सोमवारी विद्यूत मंडळांने सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी पुर्ण दिवस लाईट बंद केली होती. मेंटेनन्स कामासाठी हा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे कोरोना कोविड लसीकरण मोहिमेचे बहुतेक काम हे तांत्रिक असल्याने व त्यासाठी लाईट असणे आवश्यक असते त्यामुळे लाईट अभावी खडवली, गोवेली, आणि दहागाव येथे लसीकरणामध्ये अडचणी येत होत्या. दहागाव व गोवेली येथील लसीकरण बंद करण्यात आले होते. यांना आज म्हणजे मंगळवारी बोलावण्यात आले होते. त्यामुळे गोवेली ग्रामीण रुग्णालयात व दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रंचड गर्दी उसळली होती. दुर्दैवाने येथे सोशलडिंस्टिंगचा पुर्ण फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. कोरोनाला रोखायचा असेल तर सुरक्षित अंतर ठेवा असे वारंवार सांगितले जाते पण येथे तेच पायदळी तूडवले जात होते. त्यामुळे कोरोनाला आळा बसेल का? हा खरा प्रश्न आहे तर 
याहूनही मोठा धोका पुढे आहे तो म्हणजे १ मे पासून १८ वर्षापुढील सरसकट सगळ्यांना कोरोना कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. तेव्हा हे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर आणि केंद्रे पुरेशी आहेत का? ऐवढ्यावर गर्दी नियंत्रण करता येईल का? की पुन्हा सोशलडिंस्टिंगचा फज्जा उडून कोरोना चा उद्रेक होईल अशी भीती वैद्यकीय अधिकारी व्यक्त करतात. तसेच यावर उपाय काय? असे विचारले असता ते म्हणाले 'सध्या शाळा, कॉलेज, महाविद्यालये, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहे. यांचा लसीकरणासाठी उपयोग केला तर. आमच्या वरील ताण कमी होईल. खरेच यामध्ये तथ्य वाटते आहे. शासनाने याचा जरूर विचार करायला हवा! 

Sunday 25 April 2021

अनिल देशमुखांवरील कारवाई हा पूर्व नियोजित कट- हसन मुश्रीफ.

अनिल देशमुखांवरील कारवाई हा पूर्व नियोजित कट- हसन मुश्रीफ. 


अरुण पाटील, भिवंडी :
         माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. यावरून आता राजकारण तापू लागले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट आहे. यात लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल. यातून देशमुख निर्दोष सुटतील असे ते म्हणाले.
           अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी एनआयएकडे तपास देऊन किती दिवस झाले. तरी त्याचा तपास लागत नाही. वाझेंचे नाव मुख्य आरोपी म्हणून आले. त्यांची पोलीस कोठडी संपून न्यायालयीन कोठडी सुरू झाली. तरी या प्रकरणाचा छडा का लागला नाही, अशी विचारणाही मुश्रीफ यांनी यावेळी केली.
        मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे पत्र ज्या वेळी प्रसिध्द झाले. तेंव्हाच मी म्हणालो होतो की, हा नियोजित कट आहे. देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंग दिल्लीत गेले. पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि एनआयएकडे हा तपास गेला. पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणे म्हणजे भाजपाने विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेले कट-कारस्थान असल्याचा हल्लाबोल मुश्रीफ यांनी केला आहे. हा सगळा प्रकार राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. पण तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

ठाण्यात कोविड रुग्णाला ICU बेड देण्यासाठी डॉक्टरनेच घेतली दीड लाखांची लाच !

ठाण्यात कोविड रुग्णाला ICU बेड देण्यासाठी डॉक्टरनेच घेतली दीड लाखांची लाच !


अरुण पाटील, भिवंडी : 
         संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक  पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोविड रुग्णांना  उपचारासाठी बेड मिळत नाहीयेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या संकट काळातही अनेकजण गैरफायदा घेत पैसे उकळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे.
         ठाणे महानगरपालिकेने कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ग्लोबल कोविड रुग्णालयत  उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना बाधितांवर मोफत उपचार करण्यात येतात. मात्र, या रुग्णालयात कोविड बाधित रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणी ठाणे मनपाकडे तक्रार करुन पोलिसांतही धाव घेतली. वसईतील रुग्णाच्या नातेवाईकाकडून दीड लाख रुपये घेण्याचा आरोप त्यांनी केला होता.
         या प्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर मनपाकडून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात डॉ. परवेझ, श्रीमती नाजनीन, अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्लोबल रुग्णालयाचे काम हे मेसर्स ओमसाई आरोग्य केअर प्रा. लिमिटेडला देण्यात आलेले आहे. यांच्यातर्फेच या पाचही जणांची रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांना संशय आहे की, आरोपी डॉक्टर परवेझ याने यापूर्वीही अशाच प्रकारे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैसे घेतले असावेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, हा संपूर्ण प्रकार खूपच धक्कादायक आहे.

कोविड रुग्णांच्या सोयीसाठी कल्याण डोंबिवली महापालिका 2 प्लांट सह प्रहार च्या प्रयत्नाने 3 ऱ्या होणार ऑक्सीजन प्लांट ची उभारणी, मंत्री कोट्यातून 'राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू' याच्याकडे निधीची मागणी - डॉ आदर्श भालेराव

कोविड रुग्णांच्या सोयीसाठी कल्याण डोंबिवली महापालिका 2 प्लांट सह  प्रहार च्या प्रयत्नाने 3 ऱ्या होणार ऑक्सीजन प्लांट ची उभारणी, मंत्री कोट्यातून 'राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू' याच्याकडे निधीची मागणी - डॉ आदर्श भालेराव 


कल्याण, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना  साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता बऱ्याच वेळेला भासते आणि ऑक्सिजन अभावी रुग्ण गंभीर अवस्थेत जातो, हे वेळेवर ऑक्सिजन कमतरता मुळे अनेक रुग्ण दगावले आहेत. हे परस्थिती टाळण्यासाठी, कोविड रुग्णांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने आता PSA टेक्नोलॉजी वर आधारित 2 ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठीचे  कार्यादेश नुकतेच 2 कंपन्यांना दिले आहेत. त्या जागी 3 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावे यासाठी प्रहार जन शक्ती पक्ष तर्फे  कामगार मंत्री मा ना ओमप्रकाश उर्फ बच्चु भाऊ कडू याच्याकडे मेल करून मंत्री कोट्यातून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी द्यावे अशी मागणी प्रहार जन शक्ती पक्ष तर्फे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शन खाली कल्याण तालुका संघटक डॉ अंबादास उर्फ आदर्श भालेराव यांनी केली आहे. प्रहार ने घेतलेल्या भूमिका लक्षात घेवून इतर हॉस्पिटल व  इतर पक्षाच्या कार्यकर्त्याने आप आपल्या प्रयत्नाने  निधी उपलब्ध करून ऑक्सीजन प्लांट साठी महापालिकेला सहकार्य करावे असे ऑक्सिजन प्लांट उभारावेत  जेणे करून रुग्ण कमतरतेमुळे दगावणार नाहीत जेणे करून कल्याण डोंबिवली महापालिकेला सहकार्य करून ऑक्सीजन प्लांट उभे करावे  असे आवाहन कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव यांनी केले आहे.

या कंपन्यांची यंत्रणा हवेतील ऑक्सिजन शोषून महापालिकेसाठी सदर ऑक्सिजन  प्लांट द्वारे पुरवणार आहे. 24 तासात 175 ते 200 जंबो सिलेंडर भरतील इतका ऑक्सिजन सदर प्लांट मार्फत निर्माण होईल. सदर प्लांट कार्यान्वित होण्यासाठी सुमारे 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्लांटमध्ये निर्माण होणार ऑक्सिजन महापालिका नव्याने उभारत असलेल्या कोविड हॉस्पिटल मध्ये वापरला जाईल. या ऑक्सीजन प्लांट उभारणी मुळे क्रिटिकल अवस्थेतील कोविड रुग्णांना बराच दिलासा मिळणार आहे.

Saturday 24 April 2021

महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन !! "मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक"

महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन !! 


"मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक"

पुणे - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर (७९) यांचे पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  वाहिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. निगवेकरांच्या पुण्यातील निवासस्थानी कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

डॉ. अरुण निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.१९९८-२००० या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर कार्यरत होते. यानंतर २००० ते २००५ या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते.याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते.

भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांच्या निधनामुळे आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुर्तवडे कातळवाडी येथे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन !!

मुर्तवडे कातळवाडी येथे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक कारकर) :

           चिवळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी येथील श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळ (तांबेवाडी) मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे होणारा श्री हनुमान जन्मोत्सव यावर्षी देखील साजरा होणार असून दिवसेंदिवस वाढत जाणारा कोव्हिड - १९ (कोरोना व्हायरस) चा वाढता प्रादुर्भाव यामुळे या काळातील शासकीय नियमांचे पालन करून अगदी साधेपणात हा उत्सव साजरा करण्याचा मंडळाने निर्धार केला आहे.मंडळातर्फे प्रतिवर्षी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावेळी मात्र सांस्कृतिक कार्यक्रम न होता अनेक वर्षांची परंपरा मंडळ जपत हा उत्सव दि.२६ व २७ एप्रिल २०२१ रोजी श्री हनुमान मंदिर येथे पार पडणार आहे.

म्हारळ वरप कांबा या बेवारस गावांना मनसे आमदार राजू पाटील यांचा आधार, वरप कोरोना कोविड सेंटर साठी मदत !!

म्हारळ वरप कांबा या बेवारस गावांना मनसे आमदार राजू पाटील यांचा आधार, वरप कोरोना कोविड सेंटर साठी मदत !! 


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या, तसेच सर्वात जास्त त्रास सोसावा लागलेल्या आणि सर्वाधिक जीव गमवावा लागलेल्या म्हारळ वरप कांबा या गावातील नागरिकांना ऐन संकटाच्या काळात 'बेवारस' सोडलेल्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी ने यावेळी दुसर्‍या लाटेत देखील मागील प्रमाणेच दुर्लक्ष केले. परंतु मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कोरोनाचे भंयकर संकट ओळखून ऐन गरजेच्या वेळी वरप कोरोना कोविड सेंटर साठी सुमारे दिड लाख रुपये किमतीचे साहित्य दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावावर पहिल्यापासून अन्यायच झाला आहे. ही गावे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने या गावाकडे कायमच दुर्लक्ष झाले आहे. येथील लोकप्रतिनिधींनी केवळ एक ओटबॅक म्हणूनच या गावाकडे पाहिले. याला गावातील काही मतलबी मंडळी जबाबदार आहेत हे नाकारुण चालणार नाही.
मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावाची बिकट अवस्था झाली होती. ही गावे ना ग्रामीण ना शहरी भागात मोडत असल्याने येथील कोरोना पेशंट ना बेड, रुग्णवाहिका ना वेळेवर औषध उपचार मिळत नव्हता. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. यावेळी येथील आमदार कुमार आयलाणी यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही असा आरोप ग्रामस्थांचा आहे. माझी आमदार कै ज्योती कालाणी यांनी या गावाकडे थोडेफार लक्ष दिले होते. पण इतर लोकप्रतिनिधींनी गावातील अडी अडचणी, समस्या, प्रश्न याचा विचार केला नाही, किंवा या विषयावर बैठक घेतली नाही. अशातच वरप येथे कल्याण ग्रामीण भागातील रुग्णांनासाठी कोरोना कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होऊ लागली. यातून राधा स्वामी संत्सग या धार्मिक संस्थेने स्वत चे प्रशस्त असा हाॅल दिला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री दर्जा प्रकाश पाटील, झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे, कल्याण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य,अधिकारी व कर्मचारी पत्रकार आदींनी मोठे प्रयत्न केले व अखेर राधा स्वामी संत्सग वरप कोरोना कोविड सेंटर सुरू झाले. पण तरीही आमदार महाशयांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या परिसरात त्यांच्या विरोधात कमालीचा संताप पसरला आहे.
कसेबसे हे कोविड सेंटर सुरू झाले. परंतु येथे अनेक उणीवा राहिल्या. सरकारी काम अन सहा महिने थांब या म्हणी प्रमाणे निधी अभावी अनेक कामे रखडली, जसे आॅक्शिजन बेड, व्हॅन्टीलेटर, आदी पण याबाबतीत कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना वरप कोरोना कोविड सेंटर साठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तात्काळ आमदार राजू पाटील यांनी वाॅटर कुलर, रो प्युवर, डसबीन, स्प्रे पंप, आदी आवश्यक साहित्य सुमारे दिड लाख रुपये किमतीचे साहित्य दिले. त्यामुळे काही प्रमाणात या कोविड सेंटर ची अडचण दूर होणार आहे.
तसे पाहिले तर आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण भागाचे आमदार आहेत, येथील स्थानिक आमदार कुमार आयलाणी हे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथे पाणी नाही, इतर अडचणी आहेत. पण या आमदारांना याचे काही सोयरसुतक नाही त्यामुळे पुढील निवडणुकीत याची किंमत मोजावी लागेल तसेच त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे अनेक ग्रामस्थांनी बोलून दाखवले. तर मनसेचे आमदार राजू पाटील यांचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे. 

बुंरगुडा फेम भारुडरत्न निरजंन भाकरे यांचे निधन, राज्य व देशाबाहेर समाजप्रबोधन, अनेक पुरस्कारांनी सन्मानीत !!

बुंरगुडा फेम भारुडरत्न निरजंन भाकरे यांचे निधन, राज्य व देशाबाहेर समाजप्रबोधन, अनेक पुरस्कारांनी सन्मानीत !!


कल्याण, (संजय कांबळे) : 'बुंरगुडा होईल बया ग तुला बुंरगुडा' या भारुडातून समाजप्रबोधन करणारे तसेच अनेक मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारुडरत्न निरजंन भाकरे यांचे नुकतेच दु:खद निधन झाले असून कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे 


निरंजन भाकरे यांचा जन्म. १० जून १९६५ औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे झाला. निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातुन, भारुडांच्या माध्यमातुन अख्ख्या महाराष्ट्राची मने जिंकली होती. सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, दम दमा दम, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, धिना धिन धा, तसेच झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे, अवघा रंग एक झाला, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र माझा इ. अशा अनेक कार्यक्रमांमधुन निरंजन भाकरे यांनी रसिकांच्या मनात घर केले होते. "तुला बुरगुंडा होईल बया गं" या भारुडानं तर महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांनी गाजवुन टाकली होती.


खरे तर भाकरेंना वडिलांकडूनच भजनाची परंपरा लाभली. वडील झोळणीत घालून झोकां देत भजन, पोवाडे गात. यातूनच नकळत त्यांच्यावर कलेचे संस्कार होत गेले. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे औरंगाबाद एमआयडीसीमध्ये लुपीन या औषध निर्मिती कंपनीत १० रुपये हजेरीने कामाला लागले. लग्न झालं, आणि संसाराचा गाढा ओढत त्यांनी छोट्या-मोठ्या कलापथकांतून पेटीवादक म्हणून पैसा कमवण्यास सुरुवात केली. अशातच कलापथकाच्या दौऱ्यावर असताना ठाणे जिल्ह्यात एक चहाच्या टपरीवर ‘लोकसत्ता’ वाचताना अशोकजी परांजपे यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं आणि जणू त्यांना आशेचा नवा किरण दिसू लागला. निरंजन भाकरेंनी अशोकजींची भेट घेण्यासाठी औरंगाबाद गाठले. अशोकजींनी विचारपूस करत ‘तुला लोककलेबद्दल काही येतंय का?’ असं विचारताच भाकरेंनी त्यांना भारूड म्हणून दाखवलं. त्यांना ते आवडलं व पुढे भाकरे त्यांच्याच कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणे दर शनिवार, रविवार घरी जाऊ लागले. अशोकजींनी सुद्धा भारूड कलेबद्दल त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पुढे अशोकजींना सोंगी भारुडाचे शूटिंग करायचे होते. अशोकजींनी इंडियन नॅशनल थिएटरच्या तंत्रज्ञांच्या सोबतीने भाकरेंना घेऊन सोंगी भारुडाचे शूटिंग केले. त्यांना आणि आय.एन.टी. च्या कर्मचाऱ्यांना ते फारच आवडले. इथूनच निरंजन भाकरेंच्या भारूड प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भाकरेंची भारुडं महाराष्ट्रभर गाजू लागली. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली. पुढे त्यांनी १९९६ ते २००० मध्ये व्यसनमुक्ती पहाट अभियानात सतत चार वर्षे प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. अशीच यशाची उंच शिखरे गाठत असताना पुन्हा अशोकजींनी भाकरेंचे सोंगी भारूड मुंबईकरांना दाखवायचे ठरविले. त्या अनुषंगाने अशोकजी निरंजन भाकरेंच्या भारुडाची जाहिरात सुद्धा वर्तमानपत्रातून स्वतः प्रसिद्ध करत होते.
या प्रयोगानंतर निरंजन भाकरेंचे आयुष्यच बदलून गेले. त्यातच पुढे दया पवार प्रतिष्ठान संकल्पनेतून तसेच डॉ. प्रकाश खांडगे यांच्या लेखणीतून “लोकोत्सव” हा कार्यक्रम ठाणे येथे संपन्न होणार होता. त्या कार्यक्रमातदेखील भारूड सादर करण्याची संधी भाकरेंना चालून आली. भाकरेंनी सादर केलेला बुरगुंडा अशोक हांडेंना खूप आवडला. पुढे त्यांनी “मराठी बाणा” या आपल्या कार्यक्रमात भाकरेंना बुरगुंडा सादर करण्याची संधी दिली गेली आणि भारूडकार निरंजन भाकरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले. भारूडकार म्हणून प्रकाशझोतात असतानाच त्यांना २००७ चा राज्य सांस्कृतिक लोककला पुरस्कार त्यांच्या पत्नीसह जाहीर झाला.

'मराठी बाणा’ मुळे महाराष्ट्रसह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश इतकेच काय तर अमेरिकेतील शिकागो इथल्या रसिकांनादेखील त्यांच्या बुरगुंडा भारुडाची जादू अनुभवायला मिळाली. परंतु या दरम्यान, वडीलभावाने भाकरेंना घर आणि गावापासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. संपत्तीचं वाटप व्हावं म्हणून तगादा लावला. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना सोबतीला असलेले कलावंत त्यांच्या पासून तोडले. पण त्याही परिस्थितीत शिवसिंग राजपूत या सोंगाड्या सहकाऱ्याने भाकरेंना मदतीचा हात दिला. हिमतीने भाकरेंनी पुन्हा पार्टी बांधली. पुन्हा एकदा एकनाथी भारूड गाजू लागले. त्याचेच फळ म्हणून अखिल भारतीय नाट्य संमेलने, साहित्य संमेलने, लोककला संमेलने, संत गाथा अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांतून त्यांनी आपले लोककलेचे सादरीकरण केले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर निरंजन भाकरे परव्युतर पदवी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत येऊन विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत आहेत. 

नुकतीच निरंजन भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी चर्चेत होती. मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली.  या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. भारुडाला जिवंत ठेवणारा हा गुणी कलावंत नेहमी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत असे. रहिमाबाद सारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचे सामाजिक भानही तितकेच प्रखर होते. निरंजन भाकरे यांनी लॉक डाऊन च्या दरम्यान गरीब कुटुंबांना किराणा साहित्य मदत करून सामाजिक कार्य केले होते. त्यांनी आपल्या कार्यक्रमांद्वारे अनेकांना व्यसनमुक्त केले तसेच ते आजारी गरीब कलावंतांना वैद्यकीय खर्चाची मदत नेहमीच करत आले होते. लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव होता, पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते. 

अशा गुणी कलाकाराचे नुकतेच निधन झाले असून यामुळे कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.' त्यांच्या जाण्याने समाजप्रबोधन करणारा तसेच भारुड हा कलाप्रकार देश विदेशात पोहचवणारा चांगला, कलाकारास मुकलो अशी प्रतिक्रिया जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ़ चोपडा तर्फे 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशिन्सचे लोकार्पण !!

रोटरी क्लब ऑफ़ चोपडा तर्फे 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशिन्सचे लोकार्पण !!


चोपडा, वार्ताहर : कोरोना महामारीमुळे नागरिक सर्वत्र त्रस्त आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अशावेळी रुग्णांना काहीसा दिलासा देण्यासाठी म्हणून रोटरी क्लब चोपडाने 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन आज 23 एप्रिल 2021 पासून तत्काळ उपलब्ध करून दिले आहे. 
चोपडा शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन हे सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे. जे  कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते अशा रुग्णांना हे काँसंट्रेटर ऑक्सिजन मशीन मिळू शकणार आहे. यावेळी मा. प्रांत शिंदे साहेब व तहसीलदार अनिल गावित साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष  नितिन अहीरराव, सचिव रुपेश पाटिल, AG पुनम गुजराथी, डॉ ललित चौधरी, एम डब्लू पाटिल, अरुण सपकाले, महेंद्र बोरसे सर, प्रफ्फुल गुजराथी, प्रवीण मिस्त्री, चंद्रशेखर साखरे, सुनील महाजन, अर्प्रित अग्रवाल, पंकज बोरोले, चेतन टाटिया उपस्थित होते.
विजेवर चालणारे हे मशिन हवेतुन आणि पात्रता मधुन ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सक्षम आहे. मिनीटाला 5 ते 10 लिटर्स इतका ऑक्सिजन पुरवठा करता येवू शकतो.सद्यस्थितीत हे मशिन कोरोना रुग्नांसाठी वरदान ठरत आहे.बाहेर वाढलेल्या ऑक्सिजन सिलेंडर च्या किंमती व टंचाई पाहता व वापरण्यास सोपे असल्याने हे मशिन उपयुक्त आहे.
शरिरातील ऑक्सिजन ची पातळी 90% ते 92% च्या खाली आल्यावर ऑक्सिजन सपोर्ट लागतो.डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्या रुग्णांना ह्या मशिनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करता येईल. काही रुग्ण कोविड मधुन बरे झाल्या नंतर ही त्यांना कित्येक महिने ऑक्सिजन ची गरज भासते.अशा होम आयसोलेशनच्या रुग्नांसाठी हे मशिन फारच उपयुक्त ठरतं आहे.
गरजु रुग्णांनी यमुनाई हॉस्पिटल,समर्थ पॅलेस समोर,यावल रोड येथील रोटरी क्लब च्या "रुग्ण सेवा" या ऑर्थोपेडिक लायब्ररी येथे मोब.न.80876 71216, 9823355599 वर संपर्क करावा असे आवाहन चोपडा रोटरी क्लब कडून करण्यात आले आहे.

वरील फोटो :- मा.प्रांत शिंदे साहेब, मा.तहसीलदार अनिल गावित साहेब, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव व रोटरी सदस्य यांच्या उपस्थितीत गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना मशीन सुपूर्द करतांना.

Thursday 22 April 2021

बनावट मंत्रालय प्रतिनिधीचे ओळखपत्र बनवणाऱ्या पोलीस पाटलासह एकाला अटक !!

बनावट मंत्रालय प्रतिनिधीचे ओळखपत्र बनवणाऱ्या पोलीस पाटलासह एकाला अटक !!
 
भिवंडी / प्रतिनिधी :
पोलिसांनी वाहन अडवू नये तसेच टोल नाक्यावर टोल वाचवण्यासाठी मंत्रालय प्रतिनिधी असल्याचे बोगस ओळखपत्रे बाळगणाऱ्यासह ओळखपत्रे बनवून देणाऱ्या पोलीस पाटलाला भिवंडी नारपोली पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध शासनाची फसवणूक करून बोगस दस्तऐवज वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर तुळशिराम पाटील (४७) व उमेश वसंत तरे (५२) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
ज्ञानेश्वर हा जेसीबी ठेकेदार असून उमेश हा कशेळीगाव येथील पोलीस पाटील आहे. कोरोनाच्या अनुषंगाने नारपोली पोलिसांनी माणकोली नाका येथे नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी ज्ञानेश्वर पाटील याचे वाहन तपासणीसाठी अडवण्यात आले. ज्ञानेश्वर याने पोलिसांना ओळखपत्र काढून दाखवले त्या ओळख पत्रावर व्ही.आय.पी सुरक्षापत्र, पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि पोलीस निरीक्षक विषेश शाखा ठाणे अशी राजमुद्रा असलेले स्टॅम्प, हुद्दा मंत्रालय प्रतिनिधी मुख्यमंत्री दौरा असे लिहण्यात आले होते.
नाका बंदीवरील पोलिसांना संशय येताच त्यांनी ज्ञानेश्वर याला साहेब कुठल्या विभागात काम करतात तुम्ही असे विचारताच ज्ञानेश्वर गोंधळला, त्याला काहीच सांगता येत नसल्याचे बघून पोलिसांचा संशय खरा ठरला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो भिवंडीतील आलिमघर येथे राहणार असून त्याचा जेसीबी भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय असल्याचे त्याने सांगितले. टोल नाक्यावर टोल भरावा लागू नये तसेच पोलिसांनी अडवू नये म्हणून ज्ञानेश्वर याचा साडू कशेळी गावचा पोलीस पाटील उमेश तरे याने सहा महिण्यापुर्वी ४ हजार घेऊन ओळखपत्र बनवून दिल्याची कबुली दिली. 

महिलेला फेसबुक मैत्री पडली महागात,आयफोन भेट देण्याच्या बहाण्याने ४ कोटी उकळले !!

महिलेला फेसबुक मैत्री पडली महागात,आयफोन भेट देण्याच्या बहाण्याने ४ कोटी उकळले !!


पुणे - एका ६० वर्षीय महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत झालेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. आयफोन गिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेची तब्बल ३ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केली.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महिला प्रतिष्ठित व्यक्ती असून एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. मागील वर्षी त्यांचा फेसबुक खात्यावर एका अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांच्यातच चॅटिंग सुरू झाले. समोरील व्यक्तीने आपण ब्रिटनमध्ये असल्याचे सांगून एका मोठ्या कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी मोबाईल नंबर घेतला आणि व्हाट्सअप द्वारे त्यांचे चॅटिंग सुरू झाले.

दरम्यान मागील सप्टेंबर महिन्यात फिर्यादी यांचा वाढदिवस झाला.यावेळी आरोपीने त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आयफोन पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना आणखी फोन करून आयफोन पाठवला असून तो दिल्लीतील कस्टम विभागात पडल्याचे सांगितले. आयफोन सोडवून घेण्यासाठी काही पैसे भरावे लागतील असे सांगत आरोपीने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी लाखो रुपये भरण्यास भाग पाडले. दरम्यान त्यांनी वेळोवेळी ३ कोटी ९८ लाख रुपये भरूनही आयफोन न मिळाल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरु आहे

**धर्मगुरू नामदेव महाराजांच्या शंभर वर्षीय वडिलांचे अपहरण**

**धर्मगुरू नामदेव महाराजांच्या शंभर वर्षीय वडिलांचे अपहरण**


मुरबाड, {मंगल डोंगरे} - भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास ,मथुरा उत्तर प्रदेश चे प्रमुख धर्मगुरू श्री नामदेव महाराज हरड यांच्या शंभर वर्षे वय असलेल्या वडिलांना जमिनीच्या वादातून त्यांच्या रहात्या घरांतून अपहरण केल्याची घटना घडली असून तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबत नामदेव महाराजांनी मुरबाड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली असून पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आहे.


          भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरा, उत्तर प्रदेश चे प्रमुख धर्मगुरू व महाराष्ट्रात २०१५ साली झालेल्या नासिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे संपर्क प्रमुख असलेले श्री नामदेव महाराज हरड यांचे मुरबाड तालुक्यातील नागाव हे गाव. या गावात त्यांची पत्नी, मुले व शंभर वर्षीय वडील आंबो हरड हे रहात आहेत. आंबो हरड यांची वयोमानानुसार स्म्रूती गेली आहे. त्यांचे पाच दिवसांपूर्वी नामदेव महाराज हे घरी नसताना सकाळी दहा अकरा वाजताचे, सुमारास काही व्यक्तींनी घरातून अपहरण करून नेले आहे. हे अपहरण गावातील माझ्या जवळच्या नातेवाईकांनी जमिनीच्या वादातून केले असावे असा दावा नामदेव महाराजांनी केला असून याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. नामदेव महाराजांच्या वडिलांचे अपहरण झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच एकच खळबळ माजली आहे. 

** मला देशपातळीवर नव्हे तर संपूर्ण जगात धार्मिक पातळीवर विविध शेकडो सन्मानाने सन्मानित केले असून माझ्या वडिलांचे अपहरण करणे हे निंदनीय आहे. माझी सर्व संपत्ती अपहरणकर्त्यांनी घ्यावी. परंतु माझ्या वडिलांची सुटका करावी ." -- नामदेव महाराज हरड**

*" याबाबत आमच्या पोलिसांनी चौकशी केली असता असे समजले आहे की, हा घरगुती जमीनीच्या वादातून सख्या भावांचा वाद आहे. आमचा तपास सुरु आहे. "दत्तात्रय बोराटे ,पोलीस निरीक्षक, मुरबाड पोलीस स्थानक"**

टोकावडे येथे शॉर्टसर्किटने घरालाआग लागून गरीब शेतक-याचे लाखोंचे नुकसान!!

टोकावडे येथे शॉर्टसर्किटने घरालाआग लागून गरीब शेतक-याचे लाखोंचे नुकसान!!


मुरबाड, {मंगल डोंगरे} - तालुक्यातील टोकावडे येथील एका शेतघराला विजेचे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण शेतघर जळून खाक झाले आहे. यामध्ये भात, शेतीसाठी लागणारे साहित्य, अवजारे, पेंढा इ. सामग्री जळून खाक झाली आहे.


         तालुक्यातील टोकावडे येथील प्रतिथयश शेतकरी हरेश धोंडू कोयते व सुभाष धोंडू कोयते यांचे गावातच एक शेतघर आहे. यामध्ये शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे, साहित्य, १२० कट्टे भात, दोन शेती पंप इंजीने, विहिरीतील गाळ काढणारी कॉरी, ट्य्र्क्टरचे चार टायर, पॉवर टिलरचे डिक्ससहीत दोन टायर, पिव्हिसी पाईप, दोनशे वासे, दोन हजार कौले, सागली दरवाजे व लाकडे इ. ठेवली होती. आज सकाळी अकरा वाजताचे दरम्यान घरातील विजवाहक वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. घरात भाताचा पेंढा असल्याने आगीने रौद्ररूप धारण करून घरातील सर्व वस्तू अंदाजे चार ते पाच लाख रू.किमतीच्या जळून खाक झाल्या आहेत. याबाबत येथील समाजसेवक प्रकाश पवार यांनी तात्काळ तहसीलदार यांना माहिती देऊन व तलाठी बोलावून पंचनामा केला आहे.

पोलिसांच्या तक्रारीनंतर भाईंदर मधील बारमधील बारबालांच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई !!

पोलिसांच्या तक्रारीनंतर भाईंदर मधील बारमधील बारबालांच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई !!


अरुण पाटील, भिवंडी :
          भाईंदर पूर्वेच्या मिड लाईफ या ऑर्केस्ट्रा बारमधील अंतर्गत अनधिकृत बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई केली. पोलिसांनी सदर बारमध्ये बारबालांना लपवण्यासाठी बांधलेल्या खोल्या व वाढीव बांधकामावर कारवाई साठी पत्र दिले होते. 
        पोलिसांनी महिन्याभरा पूर्वी मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली असता यामध्ये बारबालांना लपवण्यासाठी अनधिकृत गुप्त खोल्यांचे बांधकाम आढळून आले होते. मोहित घोष हा सदर बारचा चालक आहे. या प्रकरणी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मीरा भाईंदर महापालिकेला पत्र देऊन सदर बेकायदा बांधकाम तोडण्याबाबत कळवले होते. 
        त्याअनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी उपायुक्त अजित मुठे यांना तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुठे यांनी विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी दामोदर संखे, कनिष्ठ अभियंता दुर्वेश अहिरे व योगेश अहिरे यांच्यासह स्थळ पाहणी केली असता त्यांना बेकायदा बांधकाम आढळून आले होते . 
        पालिकेने बंदिस्त खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकले तसेच बांधकाम धारकावर एम.आर.टी.पी. अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यास दिले. परंतु पोलिसांना सदर अनधिकृत बांधकाम आढळून आले होते मात्र 
महापालिकेचे स्थानिक प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांना मात्र ते समजले नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांमुळे मूरबाडकरांना मिळणार 10 टन प्राणवायू !! **पिकेल तिथे विका; अन्यथा निघा-आँक्सीजन कंपनीला आमदार किसन कथोरे यांचा सज्जड इशारा **

आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांमुळे मूरबाडकरांना मिळणार 10 टन प्राणवायू !!

**पिकेल तिथे विका; अन्यथा निघा-आँक्सीजन कंपनीला आमदार किसन कथोरे यांचा सज्जड इशारा **

**अखेर 10 टन प्राणवायूची मागणी मान्य**


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटर मध्ये व्हेंटिलेटर सुविधा सुरू करण्याची मागणी वारंवार होत असल्याने  त्यासाठी लागणारा प्राणवायू मुरबाडच्या कंपनीने द्यावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी कंपनी व्यवस्थापनाला भेट घेऊन 10 टन प्राणवायू पुरवण्याचे मागणी मंजूर करुन घेतली आहे. 


मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसदिवस वाढ होत आहे. मुरबाड शहरात ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये 50 हुन जास्त रुग्णशय्या वाढविण्याचा विचार सुरू आहे. सध्या 60 ऑक्सिजन सिलेंडर, 2 व्हेंटिलेटर असलेले कोविड सेंटर सुरू केले आहे. त्याच बरोबर कोविड रुग्णांवर व्हेंटिलेटर लावून उपचार व्हावेत. यासाठी तहसीलदारांना वारंवार निवेदने दिली आहेत.  मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दखल घेऊन मुरबाड विधानसभा क्षेत्रातील शासकीय कोविड सेंटर व कोविड वर उपचार करणारे खाजगी दवाखाने यांना लागणारा प्राणवायू मुरबाड औद्योगिक क्षेत्रात उत्पादीत करणाऱ्या प्रँक्झिअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुरवावा यासाठी कंपनीला पत्र दिले होते. परंतू कंपनीने दुर्लक्ष केल्याने आमदारांनी स्वतः एफडीएचे अधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या समवेत कंपनीस भेट देऊन प्रथम मूरबाडला प्राणवायू द्या, अन्यथा निघा. जिथे पिकते तिथे मिळणार नसेल तर तुमची गरज काय असे ठणकावून सांगितले. त्यामुळे कंपनीने प्रथम मूरबाडला 10 टन प्राणवायू पुरवला जाणार  असल्याची मागणी मान्य केली आहे. परंतू हा प्राणवायू डोंबिवली येथील नोंदणीकृत ठेकेदारामार्फत पुरवला जाणार असल्याने अधिक वेळ जाणार आहे.

  "ऑक्सिजन माझ्या मुरबाडमध्ये तयार होतो नि तो मुरबाडच्या रुग्णांना मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग? म्हणून स्वतः प्रथमता कंपनीला भेट देऊन मूरबाडला 10 टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी मान्य करायला लावल्याने मुरबाड करांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे".
-

Wednesday 21 April 2021

पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंचतर्फे आँनलाईन गायन स्पर्धेचे आयोजन !!

पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंचतर्फे आँनलाईन गायन स्पर्धेचे आयोजन !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
           कोकण म्हणजे नररत्नांची खाण आणि पारंपरिक लोककलेची शान,कोकणातील अनेक लोककला काळानुसार लोप पावत चालल्या आहेत.त्यातील काही लोककला फक्त सणासुदीपुरत्याच मर्यादित न ठेवता त्या मध्ये पारंपरिक आणि आधुनिक समतोल साधून त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, व्यावसायिक झाल्या पाहिजेत, कोकणातील कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठीच कोकणातील बरेच लोककलाकार आप-आपल्या प्रमाणे प्रयत्न करीत आहेत. त्यापैकीचं एक कमी कालावधीत नावलौकिक मिळवलेलं पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच होय.कोकणातील लोककला सर्वांना ज्ञात राहाव्यात यासाठीच पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. नमन, जाखडी-नृत्य अर्थात शक्तीतुरा, भारूड, नाटक या सारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कोकणातील पारंपारिक संस्कृती नवीन पिढीला आपल्या कुटुंबसमवेत पाहवयास यावे,यासाठी प्रयत्नशील राहत आहेत.
                 पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच नेहमीच नवनवीन कलाकारांना संधी उपलब्ध करून देत आला आहे. परंतु आज कोव्हिड मुळे सर्व जनता आणी प्रामुख्याने  कलावंत मंडळी घरात बसलेली आहेत. कलावंताना आपली कला शांत बसू देत नाही, म्हणून आम्ही पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच आँनलाइन गायन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो. आपली कला असंख्य लोकांपर्यंत पोहोचवु शकतो. स्पर्धेच्या अधिक माहीती व व्हीडिओ पाठवण्यासाठी अनिल गराटे- ९७०२१३७७८० अविनाश गराटे- ९५९४९४७९१२ या व्हाटसअप क्रमांकवर संपर्क करावा.तसेच avianilkalamanch@gmail.com या ईमेलवर व्हिडिओ पाठवावा.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ ते १२ या वयोगटासाठी ३०/- रु.प्रवेश फी असून १३ ते १८ व १९ ते ३५ वयोगटासाठी ५०/- रु.प्रवेश फी असून ती अंकीता गोणबरे- ८९२८७६७९४७ / पवन पाटमसे- ७०२१०५५०१४ या गुगळ पे नंबरवर पाठवावी.या स्पर्धेच्या नियम व अटीमध्ये १) गाण्याचा कालावधी ३ ते ४ मिनींटांचा असावा व स्पर्धकाला व्हिडिओच्या सुरुवातीला आपले संपूर्ण नावं व स्पर्धक क्रमांक सांगणे अनिवार्य आहे. २) व्हिडिओ स्वीकारण्याची अंतिम तारीख २३/०४/२०२१ असेल. ३) व्हिडिओ अविअनिल कलामंच या  युट्यूब चॅनेलवर प्रसारित झाल्यावर स्पर्धकांना गाण्याच्या लिंक  २४/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ या कालावधीत शेअर करता येतील .४)स्पर्धेचा निकाल  ६० टक्के  हा स्पर्धकांच्या मिळालेल्या  लाइक्स , व्हिडिओ अपलोड केल्यापासून ते अंतिम तारीख (२४/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ )यावर अवलंबून असेल व ४० टक्के निकाल हा परिक्षकांवर अवलंबून असेल .५) स्पर्धा व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग चालणार नाही, तसे आढळल्यास तो स्पर्धक बाद करण्यात येईल. ६)स्पर्धेचा अंतिम निकाल आयोजकांतर्फे कळवण्यात येईल व कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करून पारितोषिक व सन्मानपत्र लोककला सेवक संस्था महाराष्ट्र, या संस्थेकडून मुंबईतील संस्थेच्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र  देण्यात येईल.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून शाहिर संदिप मोरे,रुदाली दळवी काम पहाणार आहेत.स्पर्धेत सहभाग घेण्याकरता खालील लिंकवर क्लिक करून माहीतीभरा. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfzVP3Ore-qN_lme_lazfMzdY5voiT9Fghvxsgjdaeh_sgC_g/viewform?usp=sf_link अअसे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tuesday 20 April 2021

दहावीच्या परीक्षा रद्द! शालेय शिक्षणमंत्री जाहीर केला निर्णय !!

दहावीच्या परीक्षा रद्द! शालेय शिक्षणमंत्री जाहीर केला निर्णय !!


मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय सोशल मिडियाद्वारे जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.

देशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. देशातील राष्ट्रीय पातळीवरील मंडळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने तसेच आयसीएसई बोर्डाने देखील दहावीची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाची देखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

आजपासून महाराष्ट्र शासनाने लागू केली नवीन नियमावली !!

आजपासून महाराष्ट्र शासनाने लागू केली नवीन नियमावली !!


वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी :

१) किराणा दुकाने सकाळी ७ ते ११
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
५) अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११
९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार
या बाबींचे जनतेने पालन करावे.

* हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.
* धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
* आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
* भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
* दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.
* चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
* कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.
* शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
* स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
* विवाह समारंभास बंदी राहील.
* चहाची टपरी, दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* सिनेमाहॉल, नाट्य गृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.
* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
* सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
* सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
* व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.
* बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, '100 कोटी वसुली' प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता.!

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, '100 कोटी वसुली' प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता.!
     
        
अरुण पाटील, भिवंडी :
           शंभर कोटी वसुली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने  तपास सुरू केला होता हा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे  नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह एकूण सात जणांचे जबाब नोंदवले आहे. या जबाबातून अनेक धक्कादायक, खुलासे झाले असून या खुलाशांची शहानिशा तसेच वस्तू जन्य परिस्थितीजन्य तांत्रिक असे विविध पुरावे गोळा करून लवकरच शंभर कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल करू, असं सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे.
               सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभर कोटी वसुली प्रकरणी सीबीआयने ज्यांचे ज्यांचे जबाब नोंदवलेले आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनी या शंभर कोटी वसुली प्रकरणी थेट आणि सविस्तर माहिती सीबीआयला दिली असून या माहितीची शहानिशा करण्याकरता सीबीआयने एक विशेष पथक स्थापन केले आहे. तर काही साक्षीदारांकडून करण्यात आलेले दावे हे देखील तपासली जाणार असून जर यामध्ये हाती पुरावे लागले तर शंभर कोटी वसुली प्रकरणी फक्त गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही तर यामध्ये अटक होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
          माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. या आरोपासंदर्भात सीबीआयने परमवीर सिंग यांचा सविस्तर जबाब नोंदविला आहे. याच आधारे या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती तसंच काही ठोस पुरावे हाती लागल्याचा दावा सीबीआय सूत्रांनी केला आहे. तसंच अनिल देशमुख यांनी तसेच त्यांचे दोन पीए यांनी दिलेला जबाब सीबीआय पुन्हा पडताळून पाहणार असून जर गरज पडली तर या तिघांसह आणखीन दोन व्यक्तींना सीबीआय पुन्हा चौकशी करता बोलावू शकतात अशी माहिती देखील सीबीआयने दिली आहे.
            तर 20 एप्रिलच्या दिवशी सीबीआय प्राथमिक चौकशी अहवाल न्यायालयात सादर करणार होते. मात्र आता मिळत असलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने पहिल्या सुनावणीदरम्यान सीबीआय तपास यंत्रणेला स्पष्ट केलं होतं की, 'या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करू शकता आणि कारवाईदेखील करू शकता तसंच जर तुम्हाला त्या प्रकरणात काही तथ्य वाटत नसेल तर तसा क्लोजर अहवाल न्यायालयात सादर करावा.'
            दुसरीकडे सीबीआय करत असलेल्या तपासावर याचिकाकर्ते जर समाधानी नसतील तर तशी माहिती त्यांनी न्यायालयाला द्यावी. त्यानुसार, न्यायालय सीबीआय या तपास यंत्रणेला त्याबद्दल जाब विचारणार असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याच अनुषंगाने आता सीबीआय प्राथमिक चौकशी अहवाल तयार करत असून लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असं एका सीबीआयच्या अधिकार्‍याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नेमका गुन्हा कोणाच्या विरोधात दाखल होतो आणि कोणाच्या अडचणींमध्ये वाढ होते हे सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतरच स्पष्ट होईल.

राज्यात संचारबंदी लागू ! शेतकरी करु लागले पावसाळ्यापुर्वी कामांचा निपटारा !!

राज्यात  संचारबंदी लागू ! शेतकरी करु लागले पावसाळ्यापुर्वी कामांचा निपटारा !!


कल्याण, (संजय कांबळे) :
सर्वत्र कोरोनाच्या संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या पार्दूभावा मुळे आता सर्व आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सुध्दा सकाळी सात ते अकरा ही वेळ दिला आहे. त्यामुळे यावेळचा शेतकऱ्यांनी सदुपयोग केला असून पावसाळ्यापूर्वीची कामे वेगाने सुरू केली आहेत.


गेल्या वर्षी कोरोना मुळे अनेकांची जीवन पध्दती बद्दलली, उद्योग धंदे, नोकरी याची पुरती वाताहात झाली. शेतकरी देखील यातून वाचले नाहीत. सर्वाचेच कोरोना मुळे मोठे नुकसान झाले. जिवीत व वित्त हानी झाली होती. यातून कसेबसे सावरत असतानाच पुन्हा देशात कोरोना ची दुसरी लाट उसळली. यावेळी मात्र कोरोनाने कहरच केला. दिवसागणिक हजारो रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह येवू लागले. त्यामुळे आॅक्शिजन बेड, व्हन्टेलिटर, औषधे यांचा तूटवडा भासू लागला. पर्यायाने अनेकांचा मृत्यू झाला व होत .अनेक पेंशट बेड साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. खर्ची, जमीनीवर, रिक्षात, जिधे जागा मिळेल तेथे उपचार करण्यात येत आहेत.
शासनाने ब्रेक द चैन साठी १४ एप्रिल पासून राज्यात जमावबंदी, संचारबंदी लागू केली. परंतु यानंतरही कोरोनाच्या रुग्णांना मध्ये वाढच होत आहे हे लक्षात घेऊन आता अत्यावश्यक सेवा देखील मर्यादित वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता सर्वांना घरीच रहावे लागणार आहे. मात्र यावेळचा आपटी गावातील शेतकरी वंसत शिसवे, रवी शिसवे आणि राजेश शिसवे यांनी पावसाळ्यात लागणार लाकूड फाटा फोडून तो सुरक्षित ठिकाणी,  पावसाळ्यात  भिजणार नाही अशा ठिकाणी रचून ठेवला जात आहे. या बरोबरच शेतीची राबणी, बांधबंदिस्ती, नांगरणी, अशी कामे देखिल सुरू केली आहेत.
आपटी गावा प्रमाणेच रायते, मानवली, कांबा, चोरे, जांभूळ, वसत, घोटसई, गोवेली, पिंपळोली, फळेगाव गेरसे कोसले उशीद, आदी कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू आहेत. 

Monday 19 April 2021

कणकवली तालुक्यातील साकेडी येथे महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांचे स्मारक उभारणारा अवलिया !!

कणकवली तालुक्यातील साकेडी येथे महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांचे स्मारक उभारणारा अवलिया !!


कल्याण, (संजय कांबळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची अनेक शिल्पे, मुर्त्या पुतळे आहेत. परंतु ज्या भारतरत्नाला भिमाई सारख्या महामातेने जन्म दिला. त्या मातेचे कुठेही काही नाही. याचा विचार करून संदेश जाधव यांनी त्यांच्या मुळगावी म्हणजे साकेडी तालुका कणकवली येथे महामाता भिमाजी रामजी आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक निर्माण केले असून सध्या येथे भिम अनुयायाची अभिवादन करण्यासाठी गर्दी वाढली आहे.


सहा खेड्यांचे मिळून बनलेले गाव म्हणजे साकेडी हे गाव कृषीसंपन्न विकासभिमुख नव्या बदलांचा स्विकार करणारे आणि पुरोगामी विचारांचे आहे! साकेडी गावात सर्व जातीधर्माचे लोक रहातात म्हणून, समानतेचा संदेश देणारे धर्मनिरपेक्षता जपणारे अशी या गावाची विकास कामातील आघाडी हिचं येथील सुजान नागरिकांच्या कार्य कतृत्वाची जाणिव करून देते.
साकेडी गावातून रेल्वे धावत असली तरी या ठिकाणी रेल्वे स्थानक नाही, मात्र शहरापासून जवळचे व मुंबई गोवा महमार्गाच्या लगतचे गाव म्हणून, या गावाचे म्हत्व वाढत गेले आहे ! आजच्या घडिला कृषी विकास रस्ते शैक्षणिक सुविधा आणि धार्मिकता जोपासणारे या गावात हिंदू, मुस्लिम-ख्रिच्चन,बौध्द या प्रमुख धर्मांच्या समाजाचे या ठिकाणी वास्तव्य आहे !
साकेडी गावातील लोक संख्या एकूण ११८३ आहे! कुंटूब २९१ आहेत, पोस्ट ऑफिस आहे, आरोग्य केंद्र आहेत, बालवाडी आहेत, १ ते ८ वि-पर्यंत मराठी शाळा आहे ! अश्या साकेडी गावात महामाता भिमाई चे स्मारक उभारले आहे !
साकेडी या गावात विश्वरंत्न डॉ. बाबा-साहेब आंबेडकरांच्या आई-वडिलांची आठवणी म्हणून! आदरणीय, महामाता भिमाई रामजी आंबेडकर स्मारक २०१८ मध्ये, उभारण्यात आले, त्या स्मारकाचे साकेडी गावातील जाती धर्मातील लोकांच्या साक्षिने दिनांक "६जानेवारी२०१९" मध्ये आद. दिलीप राव मुकुंदराव आंबेडकर म्हणजे डॉ. बाबा-साहेब आंबेडकर यांचे नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ! तसेच डॉ.बाबा-साहेब आंबेडकर यांचे, थोरले बंधु बाळाराम रामजी आंबेडकर यांची मुलगी सखूबाई तांबुसकर यांचा नातू आद. सुनिल गंगाधर तांबुसकर हे उद्घाटन वेळी न येता, त्यांनी २०० साडी महिलां साठी तसेच, १०० बुध्दचरि्त्र याचे योग्य दान केले आणि प्रथम वर्धापनदिन या वेळी स्वता मुंबई वरून भिमाईचे स्मारक, पहाण्यास येणार्या साठी खास मुंबई ते साकेडी अशी मोफत बस केली होती, आल्या नंतर भिमाईच्या मुर्ती-ला सोन्याचि नंथ दांन केली तसेच, १४ एप्रिल २०२१ रोजि महामाता भिमाई स्मारकामध्ये डॉ.बाबा-साहेब आंबेडकर यांची भव्य मुर्ती-भेट दिली.
विश्वरंत्न डॉ. बाबा-साहेब आंबेडकर यांना जन्म देणारी आदरणीय, महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांचे स्मारक पहाण्यास तमाम समाजातील, बौध्द-बंधु आणि भगिनींनी यावे आपण, एक वेळ निदान येऊन-जा, आणि पवित्र स्मारकाला भेट द्यावी, असे जाहीर आवाहन संदेश जाधव यांनी केले आहे पत्ता : 'महामाता भिमाई रामजी आंबेडकर स्मारक मु.गावे साकेडी तालुका. कणकवली जि.सिंधुदूर्ग.' एक वेळ जरुर निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येकांने यायलाच हवे.

Sunday 18 April 2021

मुंबईमध्ये बेड शोधण्यासाठी धावपळ करताय? केवळ एका क्लिकवर घरबसल्या मिळवा माहिती.

मुंबईमध्ये बेड शोधण्यासाठी धावपळ करताय? केवळ एका क्लिकवर घरबसल्या मिळवा माहिती.
 

अरुण पाटील, भिवंडी : राज्यातील कोरोना स्थिती  अतिशय चिंताजनक आहे. दिवसाला साठ हजाराहून अधिक बाधित रुग्ण सापडत आहेत. शनिवारी तर 67 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने साठ हजाराच्या जवळपास असलेला रुग्णांचा आकडा आता 70 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने सापडणाऱ्या या रुग्णांना बेड s मिळणे कठीण झालं आहे. जवळपास सर्वत्र खाटांची संख्या कमी पडत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला नेमकं कुठं न्यायचं, असा प्रश्न नातेवाईकांना पडतो आणि त्यांचा गोंधळ उडतो. यासाठी मुंबईतील प्रशासनाने रुग्णालयातील बेडची उपलब्धता घरबसल्या तपासण्यासाठी एक लिंक तयार केली आहे. ज्याद्वारे आपल्याला नेमका कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.
              बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सादरीकरणात सांगितले की, येत्या आठवड्यात शहरातील 156 रुग्णालयांमधील बेडची संख्या सध्याच्या 20,504 खाटांवरून 22,000 करण्यात येईल, तर सध्या 4,122 बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली.
                पालिका प्रशासनाने रुग्णांना डॉक्टरांच्या नियमित देखरेखीखाली जंबो कोरोना केंद्रामध्ये दाखल करण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकीय प्रयोगशाळांनाही 24 तासात चाचणी अहवाल जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण माहिती खाटांची माहिती घेऊ शकतो. ही लिंक दर 2 तासांनी अपडेट केली जात असते. 
             दरम्यान, मुंबईत शनिवारी 8 हजार 834 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 70 हजार 832वर पोहोचला आहे. शनिवारी 52 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 294वर पोहोचला आहे. 6 हजार 617 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 69 हजार 961 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 87 हजार 369 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 44 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 94 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 1 हजार 169 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 48 लाख 99 हजार 5 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Saturday 17 April 2021

जनतेला आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा देण्यास शासन-प्रशासन कटिबद्ध : पालकमंत्री आदिती तटकरे

जनतेला आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा देण्यास शासन-प्रशासन कटिबद्ध : पालकमंत्री आदिती तटकरे


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : कोविड-19 चा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, परिस्थिती चिंताजनक होत आहे. मात्र शासन व प्रशासन जनतेला आवश्यक त्या आरोग्य सोयी-सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज येथे केले.   
       जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी जिल्हास्तरीय कोविड प्रतिबंधक उपाययोजना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.
      यावेळी खासदार सुनील तटकरे, सर्वश्री आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के- पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर हे प्रत्यक्ष तर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार रवीशेठ पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.सचिन गुंजाळ, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त संजय शिंदे, तहसिलदार विजय तळेकर, अलिबाग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.घासे यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
    पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेऊन जनतेला जास्तीत जास्त आरोग्य सोयी सुविधा पुरविण्यात येतील. लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात येईल. मात्र त्याआधी खाजगी रुग्णालयांशी समन्वय साधून कोविड व्यतिरीक्त असलेल्या रुग्णांच्या उपचारासंबंधीची व्यवस्था व नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग्य ते नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल. लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नवीन इमारतीत 90 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
    कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शासनाकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य त्या प्रमाणात लस उपलब्ध करून देणेबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या की, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या पाहता व बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या पाहता आता त्यांच्यावर कठोर कारवाईस सुरुवात करावी, गर्दी करणाऱ्यांवर मास्क न घालणाऱ्यावर, करोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाईचे धोरण अवलंबवावे. ग्रामीण भागात लग्नसमारंभ कार्यक्रमांवर लक्ष ठेवावे, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी जनतेमध्ये जनजागृती करावी, लोकांचे प्रबोधन करावे आणि तरीही लोक प्रतिबंधक नियमांचे करीत नसल्यास कठोर कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या.
     बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरणच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन करीत असलेल्या व येणाऱ्या काळात आवश्यक असणाऱ्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबतची सविस्तर माहिती उपस्थित सर्वांना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, येत्या सोमवारपासून जिल्ह्यासाठी "कोविड रुग्णालय बेड व्यवस्थापन" सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच शासनाने नेमून दिलेल्या निकषात बसणाऱ्या खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात येत आहे. शिवाय दर पंधरा दिवसाला आवश्‍यक व योग्य पात्रता धारण करीत असलेल्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात येत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुबे व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनीही पोलीस विभागाकडून करोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती उपस्थितांना दिली.
    यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी जास्तीत जास्त आवश्यक वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांची ज्या ज्या माध्यमातून शक्य आहे त्या त्या माध्यमातून भरती करावी, कोविड- नॉन कोविड रुग्णाच्या उपचारांबाबत नियोजन करावे, विशेषतः ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा याची जबाबदारी स्वतंत्रपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावी, अशा सूचना मांडल्या.
    आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविधा तत्परतेने मिळणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
   आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बेडची सोयीसुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा तसेच लसीकरणाबाबत सुरळीत पुरवठा व्हावा, याकरिता आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मांडल्या.
   आमदार महेंद्र थोरवे यांनी जम्बो कोविड रुग्णालय स्थापित होण्याच्या दृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
    आमदार भरत गोगावले यांनी पोलादपूर, महाड, माणगाव भागात बेडची सुविधा व अन्य आरोग्य सुविधा सक्षमपणे उभी करण्याची तयारी असल्याचे सांगून या भागासाठी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी पुरवावेत, अशी मागणी केली.
    आमदार रवीशेठ पाटील यांनी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना ऑक्‍सिजनचा व रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा व्हावा, अशी सूचना केली तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णांचा आरटीपीसीआर चा अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावा, वैद्यकीय अधिकारी कर्मचार्‍यांची भरती त्वरित करावी, ऑक्सिजनचा पुरवठा, कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा वेळेत व्हावा, अशा सूचना मांडल्या.
    या बैठकीच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर निश्चित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले व जनतेला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच वय वर्ष 45 वरील सर्वांनी लसीकरण करून घेणे, याबाबत आवाहन केले.
       बैठकीच्या शेवटी ऑक्सिजनच्या पुरवठयाबाबत समन्वयाची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, कोविड प्रतिबंधक लसबाबतच्या समन्वयाची जबाबदारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी तर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी समन्वयाची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्यावर सोपविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

ठाणे जिल्हायातील ग्रामीण जनतेला दिलासादायक बातमी, भिवंडी तालुक्यातील सावाद येथे ऑक्सिजनयुक्त रुग्णालय कार्यान्वित !!

ठाणे जिल्हायातील ग्रामीण जनतेला दिलासादायक बातमी, भिवंडी तालुक्यातील सावाद येथे ऑक्सिजनयुक्त रुग्णालय कार्यान्वित !!


कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील एकमेव सर्व सोई युक्त अद्यायावत असे कोविड ग्रामीण रुग्णालय भिवंडी तालुक्यातील सावाद येथे आजपासून कार्यान्वित झाले असून ८०० बेडचे हे रुग्णालय ऑक्सिजनयुक्त असणार आहे. विशेष म्हणजे हे रुग्णालय केवळ ग्रामीण भागासाठी आरक्षित असल्याने आता तरी कल्याण, भिवंडी, शहापूर अंबरनाथ आणि मुरबाड मधील कोरोना पाॅझिटिव्ह पेशंटवर आॅक्शिजन अभावी जीव घमावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच आताच्या बिकट काळात ही दिलासादायक व आनंद देणारी बातमी म्हणावी लागेल.


राज्यात कोरोना ची दुसरी लाट उसळली आहे. सर्वच ठिकाणी कोरोना पेंशट भयानक वाढत आहेत. सर्व रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. जागा मिळेल तेथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका बेडवर तीन ते चार पेंशट, जमीनीवर, खुर्चीत, रिक्षात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व्हॅन्टेलिटर, ऑक्सिजन बेड केव्हाच संपले आहे. रेमडिसिवीर औषधाचा तूटवडा आहे यातही काही ठग काळाबाजार करीत आहेत. शहरी भागातील नागरिकांना कसेबसे बेड उपलब्ध होत आहेत. पण ग्रामीण भागातील रुग्णांची अवस्था खूपच बिकट झाली आहे आॅक्शिजन बेड न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला आहे. अशा परिस्थितीत वरप येथील राधा स्वामी संत्सग कोरोना कोविड सेंटर सुरू झाले खरे परंतु येथे आॅक्शिजन न मिळाल्याने येथील पेंशट ना बाहेर पाठविण्याची नामुष्की ओढवली.


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर तालुक्याचा विचार केला तर कल्याण तालुक्यात २१ हजार ७९४ इतके हायरिस्क पेशंट असून २ हजार १३६ अॅक्टिव, १९७० बाधित, घरी विलगीकरण १ लाख ५७ हजार ७२९, प्रतिबंधीत क्षेत्र २५ तर आतापर्यंत १४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहापूरात ४ हजार ३११ एकूण रुग आहेत. येथील १६२ गावात कोरोना बाधित पेंशट आहेत. तर १३६ पेंशट ना जीव गमवावा लागला आहे. भिवंडी तालुक्यात ८ हजार ९१५ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत २५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात तब्बल १४० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पडघा २४, दिवाअंजूर ७, खारबाव ४२, कोन ३२, वज्रेश्वरी ५, दापाड ८, आनगाव २१, चिलीपाडा १ अशी कोरोनाची संख्या असून यातील मुरबाड व अंबरनाथ येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोन न उचल्याने त्यांची आकडेवारी मिळू शकली नाही. असे असले तरी तेही काही हजारात असतील यात शंका नाही. त्यामुळे या सर्वाना हक्काचे व सर्व सोईसुविधा युक्त हाॅस्पिटल हवे अशी मागणी वारंवार होत होती. ती आता सावाद येथील कोरोना कोविड रुग्णालयाने पुर्ण झाली आहे. यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते सुरु झाले नव्हते.

पण आज पासून सावद येथील कोविड ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित होत आहे. काल रात्री जिल्हा रुग्णालयातून सावद येथे १५ रुग्णांना संदर्भित करण्यात आले असून त्यांना दाखल करून घेण्यात आलेले आहे. सावद येथे ऑक्सिजनची उपलब्धता असून ८०० खाटांचे रुग्णालय आहे. हे रुग्णालय ठाणे ग्रामीण साठी आरक्षित करण्यात आलेले असून ठाणे ग्रामीण भागातील सर्व रुग्णांना ही सुविधा आज पासून उपलब्ध होणार आहे.
ठाणे ग्रामीण भागातील ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांना त्या त्या कार्यक्षेत्रातील कोविड केअर सेंटर म्हणजेच सी सी सी मध्ये संदर्भित करण्यात येईल. आणि ज्या रुग्णांना ऑक्सिजन ची गरज आहे म्हणजेच ज्यांचा spo2 हा ९४ पेक्षा कमी आहे अशा रुग्णांना सावद येथील रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे. आज पासून ठाणे ग्रामीण भागातील रुग्णांना सावद येथील covid ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजनची गरज भासल्यास सावद येथील रुग्णालयात भर्ती करण्यात येईल.

प्रतिक्रिया :
राजेश नार्वेकर *(जिल्हाधिकारी, ठाणे) मध्यंतरी कोरोनाचे संकट कमी झाल्याने याकडे थोडेफार दुर्लक्ष झाले होते. परंतु आता पुर्ण क्षमतेने हे रुग्णालय कार्यान्वित झाले आहे. तरीही नागरीकांनी नियम पाळावेत, शासनास सहकार्य करावे.

*किशोर पंडित (नाका कामगार) शहापूर
भिवंडी तालुक्यातील सावाद येथील कोरोना रुग्णालय हे ग्रामीण भागातील रुग्णांना वरदान ठरणार आहे. पण शासनाने आमच्या सारख्या गोरगरीबांचा विचार करावा.

Friday 16 April 2021

ठाणे जिल्ह्यात रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष !

ठाणे जिल्ह्यात रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष !


ठाणे  : सध्या रेमडिसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांची खूपच धावाधाव होत आहे त्याच पार्श्वभूमीवर  जिल्हा स्तरावर रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत होणेसाठी जिल्हा स्तरावर रेमडेसिवीर  नियंत्रण कक्ष आणि समन्वय व संनियंत्रण पथक स्थापन करण्यात  आला आहे.

कोविड १९ या आजाराच्या उपचारासाठी वापर होणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा वाढत्या रुग्ण संख्येच्या प्रमाणात कमी असल्याने त्याचा काळाबाजार करुन अवाजवी किमतीत विक्री होत असल्याचे राज्यातील काही घटनांवरून निदर्शनास येत आहे. सदर पार्श्वभूमी विचारात घेऊन रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध होणेसाठी कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच  जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसीव्हीर जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास  सुरू करण्यात आला आहे.

हे आहेत अधिका-यांचे नंबर ..

रेमडेसीवीर समन्वयन व संनियंत्रण  पथक उपजिल्हाधिकारी  (सामान्य प्रशासन) बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार(सर्वसाधारण) आर व्ही तवटे,संपर्क क्रमांक-८३६९४१३७२७ ,सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग,एम आर पाटील, संपर्क क्रमांक- ८७८८२३३८९४ , औषध  निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, प्राची चव्हाण संपर्क क्रमांक-९८२०५९२११२  असे आहेत.
नियंत्रण कक्ष क्रमांक - ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ व टोल फ्री क्र. १०७७ असा आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी, नि.अ.पावसकर संपर्क क्रमांक ९८१९८५६५८७, अन्न सुरक्षा अधिकारी, दि. स. हरदास संपर्क क्रमांक - ९८९२१८०७६०, महसूल सहायक, कुणाल भालेराव संपर्क क्रमांक - ८२९१३५०९२७, महसूल सहायक, सयद सुलेमान संपर्क क्रमांक - ९८१९४०४४११,महसूल सहायक, स्वप्नील चव्हाण संपर्क क्रमांक - ९७६४४०८५४५, हे अधिकारी  व कर्मचारी नियंत्रण कक्ष पथक म्हणून सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.

अन्न सुरक्षा अधिकारी, व्य. व. वेदपाठक संपर्क क्रमांक ९८६७७११३५०, अन्न सुरक्षाअधिकारी, प्र. पु सुर्यवंशी संपर्क क्रमांक - ८३६९५८६९५२, अव्वल कारकून, राजेश नरुटे संपर्क क्रमांक - ८१०८५०९९७४,महसूल सहायक, प्रविण उबाळे संपर्क क्रमांक - ७०३८६६६२८७, महसूल सहायक, देवेंद्र सावंत संपर्क क्रमांक - ९८३३७२०१७२ हे अधिकारी व कर्मचारी  नियंत्रण कक्ष पथक म्हणून दुपारी ३ ते १० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.

अन्न सुरक्षा अधिकारी, प्र. म. देशमुख संपर्क क्रमांक - ९९२०९५५५६२, अन्न सुरक्षा अधिकारी,रा.स.ताकाटे संपर्क क्रमांक-९४०४९७३१७४, महसूल सहायक किरणकुमार सुरडकर संपर्क क्रमांक - ९५४५८८१८८३,महसूल सहायक, गणेश मोरे संपर्क क्रमांक - ८०८०७८६४५६,शिपाई, ओमकार वैती, संपर्क क्रमांक - ८१६९१७१८१० हे अधिकारी व कर्मचारी नियंत्रण कक्ष पथक म्हणून रात्री १०  ते सकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध  राहतील. असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
----------
 

एकशे अडुसष्ट वर्षांपूर्वी धावली मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे गाडी. !!

एकशे अडुसष्ट वर्षांपूर्वी धावली मुंबई ते ठाणे
दरम्यान पहिली रेल्वे गाडी. !!
     
      
अरुण पाटील, भिवंडी :
         एकशे अडुसष्ठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी(जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे )स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना देशाला प्रगतीपथावर  नेणार्‍या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोह मार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली.
       या उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्या शिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला. तेव्हा पासूनच नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.
              १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , स्थानिक लोक  उपस्थित होते. १४ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद लोकांना मिळाला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली , जज्ज चार्लस् जॅक्सन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती. आणि १६ एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला.
                तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्या बरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे दिसत  होते. काळे पोषाख घातलेले खलाशी इंजिनाच्या पोटात,फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क पुढे जाऊ लागली. लोक बोलू लागले की , पुराण काळात आपण अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रज म्हणजे देवाचा अवतार, अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग , शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच, पण गायी, बैल भेदरले आणि कुत्री  पिसाळल्यासारखी  भुंकू लागली. एकीकडे लष्करी बँडही वाजत होता. बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा लोकांना चमत्कार  वाटत होता.

         या चमत्कारावर लगेच गाणे केले गेले
*सायबाचा पोर कसा अकली रे*
*बिना बैलाची गाडी कशी हाकली रे*

             सामान्य माणसे आगगाडीमध्ये बसायला घाबरायची.त्यांची भीती घालवण्यासाठी सामान्य नागरीकांनी प्रवास करावा म्हणून प्रवास करणाऱ्याला १ रु. बक्षीस देण्यात येईल हे जाहीर केले आणि लोक रेल्वेप्रवास करू लागले.बोरीबंदर-ठाणे हे अंतर २१ मैलांचे (३४ किमी) आहे. हे अंतर कापायला गाडीने तब्बल १ तास १२ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्या जवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर ,डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि दुपारी ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली ,तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही ही गाडी पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. त्या काळी ठाणे स्थानक छोटं आणि कौलारू होतं. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन संध्याकाळी ६.३० वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटांनी गाडी पुन्हा बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली.
             असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास. कोणत्याही चमत्काराला देवत्व बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले, 'चाक्या म्हसोबा '. पहिल्या रेल्वे गाडीला १४ डबे होते. तिस-या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे होते. त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत नसे. त्यामुळे स्वाभाविकपणेच या गाडीला ‘बकरा गाडी’ असे संबोधले जात असे.

       काळ बदलला तसे रेल्वेचे रूप बदलत गेले. ऐश आराम  करण्यासाठी सुद्धा रेल्वे सुरु झाल्या. सध्या भारतात अश्या ५ खास गाड्या चालवल्या जातात
*१) महाराजा एक्सप्रेस* 
*२) पॅलेस ऑन व्हील्स*
*३) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स*
*४) दि  गोल्डन  चॅरिओट*
*५) डेक्कन ओडिसी*  
भारतीय रेल्वेच्या महाकाय  जाळ्याला  सलाम , सलाम,सलाम .

!! प्रभो शिवराया !! - प्रासंगिक कविता (संतोष गावडे / पत्रकार - वृत्तपत्र लेखक)

प्रासंगिक कविता --------------------- !! प्रभो शिवराया !! झुकेल मस्तक सदैव अमुचे महाराज तुमच्या चरणी ते सुर्य चंद्र अन् तारे जोव...