Monday, 31 August 2020

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वन्यजीव हल्ल्यात जखमी झालेल्याना मदतीचे वाटप !!

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वन्यजीव हल्ल्यात जखमी झालेल्याना मदतीचे वाटप !!   


मुरबाड (मंगल डोंगरे) ' वन्य जीव  हल्ल्यात जखमी झालेल्या अथवा म्रुत्यु पावलेल्याना वनविभागाच्या वतीने दरवर्षी काही ना काही आर्थिक मदत  दिली जाते. त्याच अनुषंगाने नागरिकांना दिली जाणारी आर्थिक मदत, या
वर्षी  वन विभाग मुरबाडतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात काही पिडीत नागरिकांना -
'कार्यसम्राट आमदार'
*मा.श्री.किसन कथोरे साहेबांच्या उपस्थितीत
मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.


त्यात खालील लाभार्थ्यांचा समावेश आहे.
श्री.अशोक हरी बरतड मु.तळ्याचीवाडी(बिबट्याचा हल्ला, रक्कम रु.७५,९७९/-)

मधुकर लक्ष्मण हिंदुराव
मु.रावगांव,( शेतीपिक नुकसान,
रक्कम रु.२५,०००/-)

श्रीम्.इंदुबाई श्रीराम खंडवी, लव्हाळी (बिबट्याचा हल्ला, रक्कम रु.२०,०००/-) 


याप्रसंगी श्री.विकास भामरे(वनक्षेत्रपाल मुरबाड पुर्व, श्री.कपिल पवार (वनपाल किशोर) श्री. सुनिल पांडुळे,श्री. धर्मा खुणे इ. उपस्थित होते.
इतरही अनेक पिडीतांना या मदतीच्या धनादेशाचे वाटप वन विभाग मुरबाडतर्फे करण्यात येणार आहेत.

कोरोना गंभीर त्यात मुरबाड तालुक्यात ठरले सहा योद्धे खंभीर !!

कोरोना गंभीर त्यात मुरबाड तालुक्यात ठरले  सहा योद्धे खंभीर !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : कोरोना सारख्या गंभीर आजारात कोरोनाच्या भीतीनं गरीब श्रीमंत सारखाच गांजला असल्याने चार महिन्यापासून मनुष्यच माणसाचा वैरी झाल्यासारखा एकमेकांशी व्यवहार करीत असले तरी ह्या परिस्थितीत ही काही भले बहादर कोरोना सोबत रोजच्या रोज संघर्ष करताना दिसून येतात. शासकिय कोविड २ टेस्ट विभागात ज्यांची नेमणूक झाली ते भिती पोटी पळून गेले मात्र सहा कोरोना योद्धे रोजच ७० ते ७५ रुग्णांची कोविड टेस्ट करून स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावत असल्याचे वास्तव मुरबाड आरोग्य विभागा समोर आले आहे.
                ज्या रुग्णाचे संशयित नमुने घेण्यात येऊन कोविड सेंटर मध्ये १)कोविड सॉफ्टटेस २)ऍन्टी जनटेस्ट ह्या दोन टेस्ट करून यांत कोविडचं निदान केले जाते. ह्या अत्यंत घातक असल्याने ह्या टेस्ट घेणाऱ्याचा संबंध थेट कोविड १९ शी येत असतो. ह्या टेस्ट ज्या ठिकाणी केल्या जातात त्या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारींनी प्रतिनियुक्त केलेले  आरोग्य कर्मचारी कोरोना भीती पोटी येथे काम करण्यास स्पष्ट नकार देत काम नाकारले. अशा ठिकाणी सेवा देण्यासाठी तालुक्याची सहा कोरोना योद्धे स्वताहुन सरसावले यांत
 १) टेक्निशियन - मोहपे, पाणगांवकर,खुटणकर, तर धसई आरोग्य केंद्रावरील दोन आरोग्य कर्मचारी १) संभाजी भोईर २) नितीन ईसामे व त्यासोबत या कोविड सेन्टरांत साफ सफाई करणारा संजय मोरे यांनी स्वताहून ह्या सेवेत झोकून दिल्याने तसे पाहता हे खरे कोविड योद्धे म्हणन्यास वावगे ठरणार नाही. व खरे अर्थाने कोविड योद्धेची भूमिका जर कोणी बजावत असेल तर हे ते सहा योद्धे होय. सध्या तालुक्यात कोरोना पोझिटीव्ह रुग्णांची संख्या ५५६ पैकी बरे झालेल्यांची संख्या ४०९ असून रोजच नवीन रुग्णांची भर पडत आहे. व असे असून देखील हे कोरोना योद्धे कंभीरपणे असलेल्या परिस्थितिशी दोन हात करत आहेत व रोज मृत्यूला सामोरे जात आहेत.

मिशन बिगीन अगेन: ठाकरे सरकारची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरू-काय बंद !!

मिशन बिगीन अगेन: ठाकरे सरकारची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरू-काय बंद !!


मुंबई - राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवीन निमयावली जाहीर केली असून राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.

*काय आहे नवीन नियमावली ?जाणून घ्या काय सुरू काय बंद*

कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहील

राज्यातील हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार
शाळा महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

३० सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही

खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे

चित्रपटगृह ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील

मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही

सिनेमागृह, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरिअम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही पुढील काळापर्यंत बंद ठेवली जाणार

मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा, प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा.

सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही तर, अंत्यविधी साठीदेखील २० पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाहीत.

राज्य सरकारने नियमांमध्ये आणखी शिथिलता दिली असली तरी सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयात मास्क, सोशल डिस्टंसिंग त्यांचे पालन बंधनकारक राहणार आहे.घरातील ६५ वयाच्या वरील नागरिकांचे व दहा वर्षाखालील बालकांची विशेष काळजी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

राज्यात एक सप्टेंबर पासून स्वस्त धान्य दुकानदारांचा संप, गोरगरिबांची उपासमार होणार? संपाबाबत संभ्रमता!

राज्यात एक सप्टेंबर पासून स्वस्त धान्य दुकानदारांचा संप, गोरगरिबांची उपासमार होणार? संपाबाबत संभ्रमता!




कल्याण (संजय कांबळे) : कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी जिवावर उदार होऊन गोरगरिबांना धान्य वितरित केले. यामध्ये अनेक दुकानदारांना कोरोनाची लागण झाली तर काहिचा मृत्यू झाला. पण तरीही शासन दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या विरोधात महाराष्ट्र राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार उद्या पासून म्हणजेच १संप्टेबर पासून संपावर जात असून यामुळे ऐन कोरोनोच्या संकटात गोरगरिबांची उपासमार होणार असे वाटते तर संप होणार की नाही याबाबत मात्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संप होणार असलेबाबत चे पत्र आॅल महाराष्ट्र  रेशनिंग शाॅपकिपर फेडरेशन चे अध्यक्ष माझी खासदार गजानन बाबर यांनी शासनास दिले आहे.
देशातील कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लाॅकडाऊण लागू केले. या काळात गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकारच्या धान्य योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये सरसकट मोफत धान्य, तर दोन तीन रुपये किलो तसेच १२रुपये किलो गहू तांदूळ यांचा समावेश होता. परंतु अनेक रास्त भाव दुकाने ही संगणकांनी जोडल्याने थंम दिल्यानंतर धान्य देणे बंधनकारक करण्यात आले होते त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच स्थलांतर होणाऱ्या लोकांना देखील रेशनकार्ड विना धान्य देण्यात येत होते. यामुळे अनेक दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. यामुळे दुकानदारांना विमा संरक्षण, त्यांची आरोग्य तपासणी, केसरी कार्ड धारकांना धान्य वितरण कमिशनात वाढ, तसेच दुकानदारांना इतर सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आदी मागण्यांसाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, प्रधान सचिव, मंत्री  यांना निवेदन दिले होते. परंतु यांचे साधे चार ओळीचे उतर ही देण्याची तसदी शासनाने घेतली नाही. उलट न्यायालयाने आदेश देऊन चार आठवडे होऊनही निर्णय झाला नाही. त्यामुळे अभी नही तो कभी नही अशी हाक देत आॅल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकिपर फेडरेशन चे अध्यक्ष माझी खासदार गजानन बाबर यांनी उद्या म्हणजे १संप्टेंबर पासून राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार बेमुदत संपावर जाणार असल्याचे पत्र दिले आहे.त्यामुळे अगोदर लाॅकडाऊण मुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. शासनाने गोरगरिबांना जगवण्यासाठी मोफत व काही लोकांना अंत्यत कमी किंमतीत धान्य उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे कामधंदा नसतानाही निदान पोटतरी कसेबसे भरत होते. परंतू आता हे दुकानदारच संपावर जाणार असल्याने गोरगरिब व आदिवासी यांची उपासमार होणार आहे. 
 एकट्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हात १लाख ४६हजार प्राधान्य व अंत्योदय लाभार्थी कार्डधारक आहेत. तर सुमारे ५९२ रेशनिंग दुकाने आहेत त्यामुळे संप असेल तर त्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण होणार असे जिल्हय़ाचे डि एस ओ, आर बी थोटे यांनी सांगितले. तसेच रास्त भाव  दुकानदारांच्या संपा बाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर ठाणे जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जयराम मेहेर यांना विचारले असता ते म्हणाले उद्याच्या संपाबाबत साशंकता आहे. काही निर्णय घ्यायचे आहेत. त्यांनी या बाबतीत स्पष्ट बोलण्यास नकार दिला. तर कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि ठाणे जिल्हा डि एस ओ आर बी थोटे यांनी देखील संपाबाबत माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक सप्टेंबर चा संप होणार की नाही हे उद्याच कळेल.

राज्यात एक सप्टेंबर पासून स्वस्त धान्य दुकानदारांचा संप, गोरगरिबांची उपासमार होणार? संपाबाबत संभ्रमता!

राज्यात एक सप्टेंबर पासून स्वस्त धान्य दुकानदारांचा संप, गोरगरिबांची उपासमार होणार? संपाबाबत संभ्रमता!


कल्याण (संजय कांबळे) : कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी जिवावर उदार होऊन गोरगरिबांना धान्य वितरित केले. यामध्ये अनेक दुकानदारांना कोरोनाची लागण झाली तर काहिचा मृत्यू झाला. पण तरीही शासन दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या विरोधात महाराष्ट्र राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार उद्या पासून म्हणजेच १संप्टेबर पासून संपावर जात असून यामुळे ऐन कोरोनोच्या संकटात गोरगरिबांची उपासमार होणार असे वाटते तर संप होणार की नाही याबाबत मात्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संप होणार असलेबाबत चे पत्र आॅल महाराष्ट्र  रेशनिंग शाॅपकिपर फेडरेशन चे अध्यक्ष माझी खासदार गजानन बाबर यांनी शासनास दिले आहे.
देशातील कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लाॅकडाऊण लागू केले. या काळात गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकारच्या धान्य योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये सरसकट मोफत धान्य, तर दोन तीन रुपये किलो तसेच १२रुपये किलो गहू तांदूळ यांचा समावेश होता. परंतु अनेक रास्त भाव दुकाने ही संगणकांनी जोडल्याने थंम दिल्यानंतर धान्य देणे बंधनकारक करण्यात आले होते त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच स्थलांतर होणाऱ्या लोकांना देखील रेशनकार्ड विना धान्य देण्यात येत होते. यामुळे अनेक दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. यामुळे दुकानदारांना विमा संरक्षण, त्यांची आरोग्य तपासणी, केसरी कार्ड धारकांना धान्य वितरण कमिशनात वाढ, तसेच दुकानदारांना इतर सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आदी मागण्यांसाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, प्रधान सचिव, मंत्री  यांना निवेदन दिले होते. परंतु यांचे साधे चार ओळीचे उतर ही देण्याची तसदी शासनाने घेतली नाही. उलट न्यायालयाने आदेश देऊन चार आठवडे होऊनही निर्णय झाला नाही. त्यामुळे अभी नही तो कभी नही अशी हाक देत आॅल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकिपर फेडरेशन चे अध्यक्ष माझी खासदार गजानन बाबर यांनी उद्या म्हणजे १संप्टेंबर पासून राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार बेमुदत संपावर जाणार असल्याचे पत्र दिले आहे.त्यामुळे अगोदर लाॅकडाऊण मुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. शासनाने गोरगरिबांना जगवण्यासाठी मोफत व काही लोकांना अंत्यत कमी किंमतीत धान्य उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे कामधंदा नसतानाही निदान पोटतरी कसेबसे भरत होते. परंतू आता हे दुकानदारच संपावर जाणार असल्याने गोरगरिब व आदिवासी यांची उपासमार होणार आहे. 
 एकट्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हात १लाख ४६हजार प्राधान्य व अंत्योदय लाभार्थी कार्डधारक आहेत. तर सुमारे ५९२ रेशनिंग दुकाने आहेत त्यामुळे संप असेल तर त्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण होणार असे जिल्हय़ाचे डि एस ओ, आर बी थोटे यांनी सांगितले. तसेच रास्त भाव  दुकानदारांच्या संपा बाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर ठाणे जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जयराम मेहेर यांना विचारले असता ते म्हणाले उद्याच्या संपाबाबत साशंकता आहे. काही निर्णय घ्यायचे आहेत. त्यांनी या बाबतीत स्पष्ट बोलण्यास नकार दिला. तर कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि ठाणे जिल्हा डि एस ओ आर बी थोटे यांनी देखील संपाबाबत माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक सप्टेंबर चा संप होणार की नाही हे उद्याच कळेल.

ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात सदतीस वर्षे सेवा केल्यानंतर ही पदोन्नती नाहिच, सेवा निवृत्ती निमित्त कल्याण गटशिक्षणाधिका-यांनी व्यक्त केली खंत?

ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात सदतीस वर्षे सेवा केल्यानंतर ही पदोन्नती नाहिच,
सेवा निवृत्ती निमित्त कल्याण गटशिक्षणाधिका-यांनी व्यक्त केली खंत?


कल्याण (संजय कांबळे) : अंत्यत हाल, अपेष्टा, समस्या, अंणत अडचणींना तोंड देत गेली ३७ वर्षे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवा देणाऱ्या कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला जगदीश अत्तरदे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील खंत व्यक्त केली. परंतु मला आयुष्यात खूप चांगली माणसं भेटली त्यामुळे मी खूप सुखी व आंनदी आहे असे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.


कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा डिसेंबर २०१९ रोजी त्यांच्याकडे आली. शासनाच्या आदेशाची अंत्यत कठोर पणे अंमलबजावणी करणा-या व तितक्याच मनमिळावू व समजून सांगणा-या शिक्षणाधिकारी अशी त्यांची ओळख कल्याण तालुक्यात निर्माण झाली होती. मुळात उच्च शिक्षित असलेल्या श्रीमती शशिकला अत्तरदे मॅडम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सडवली जिल्हा परिषद शाळेपासून१९८३ मध्ये केली. ग्रामीण व अंत्यत मागासलेले हे गाव असल्याने या गावात लाईट, मेणबत्ती असा प्रकार नव्हता. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती तर विद्यार्थी होते केवळ ६०, अशाही परिस्थितीत दररोज ८/१० किमी अंतर पायी चालत जाऊन शाळेत जावे लागत होते. अशी ९ते १० वर्षे सेवा केल्यानंतर विवाह जमल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व ठाणे जिल्हा परिषदेत रुजू झाल्या. येथेही ठाणे जिल्ह्यातील अंत्यत मागास म्हणून ओळखला जाणारा शहापूर तालुका मिळाला. १९९१ मध्ये तालुक्यातील सावरोली जिप शाळांमध्ये अध्यापन सुरू झाले. तोच केवळ ६ महिन्यातच आईचे निधन झाले. त्यामुळे कुंटूबाची सर्व जबाबदारी यांच्या वर पडली. येथेही दळणवळणाच्या सोईची बोंबाबोंब. त्यामुळे मैत्रीण माधुरी रडे व स्वतः आडगाव ते सावरली असा सायकलवरून प्रवास सुरू केला. दोन मुली तोही ग्रामीण भागात इतका लांब सायकल वरून प्रवास करतात. याचे आजूबाजूच्या लोकांना अप्रूप वाटायचे. काहींनी विचारण्याचा प्रयत्न केला पण ध्येय निश्चित होते व जिद्द मनात होती. त्यामुळे काही अडचणी आल्या नाहीत.
शहापूर तालुक्यातील ३वर्षाच्या सायकलस्वारी नंतर अंबरनाथ तालुक्यात बदली झाली. येथे सेवा झाल्यानंतर विस्तार अधिकारी म्हणून बढती मिळाली व पुन्हा शहापूर तालुक्यात बदली झाली. येथूनही ठाणे व कल्याण येथे बदली झाली. अखेर डिसेंबर २०१९रोजी कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अत्तरदे मॅडम यांच्या कडे आला. या ८ ते ९ महिन्याच्या कालावधीत त्यांनी अंत्यत चांगले काम केले. कामचुकार शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी बदली प्रकरणी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करणा-या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याच्या काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी यांनीच केली. प्रसंगी कठोर व तितक्याच मनमिळावू व शांत स्वभावाच्या अत्तरदे मॅडम यांनी कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा चेहरा मोहरा बदलला. गेली ३७ वर्षे त्यांनी शिक्षण विभागात इमानेइतबारे सेवा केली. याकाळात आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून कधीही कुणाचीही हुजरेगिरी केली नाही. तर आपल्या कार्यातून क्षेष्ठत्व सिद्ध करून त्या प्रशासनात आदर्श ठरलेल्या आहेत. त्यांनी या काळात अनेक विद्यार्थी घडवले जे आज विविध क्षेत्रात नामांकित हुद्द्यावर काम करत आहेत.
आज श्रीमती शशिकला अत्तरदे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. कोरोनाचे संकट घोंघावत असताना देखील शेकडो शिक्षक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व आशिर्वाद घेण्यासाठी कल्याण पंचायत समितीला येत आहेत. या निमित्ताने त्यांना विचारले की तुमच्या इतक्या प्रदीर्घ सेवा काळात कोणत्या गोष्टींची खंत व कोणती घटना सर्वाधिक आंनद देणारी असा प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या "गेल्या २४ वर्षे सेवा काळात पदोन्नती मिळेल असे वाटत होते पण मिळाली नाही याची खंत वाटते तर आयुष तुमच्या सारखे पत्रकार, लोकप्रतिनिधी, तसेच सुरेश पवार, जरग, भारती, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिक शिकायला मिळाले असे त्यांनी सांगितले. तर या प्रसंगी कल्याण तालुक्यातील अनेक शिक्षकांनी लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी श्वेता पालवे मॅडम आणि पत्रकार संजय कांबळे यांनी सेवानिवृत्ती निमित्ताने श्रीमती शशिकला अत्तरदे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.

Sunday, 30 August 2020

फ्यूचर ग्रुप का रिलायन्स इंडस्ट्रीजने किया अधिग्रहण !!

फ्यूचर ग्रुप का रिलायन्स इंडस्ट्रीजने किया अधिग्रहण !!



मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीज की सब्सिडियरी कंपनी रिलायंस रीटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) फ्यूचर ग्रुप की रीटेल एंड होलसेल बिजनेस और लॉजिस्टिक्स एंड वेयरहाउसिंग बिजनेस का अधिग्रहण करने जा रही है. कंपनी ने शनिवार को प्रेस रिलीज जारी कर इसकी जानकारी दी. इससे रिलायंस फ्यूचर ग्रुप के बिग बाजार, ईजीडे और FBB के 1,800 से अधिक स्टोर्स तक पहुंच बनाएगी, जो देश के 420 शहरों में फैले हुए हैं. यह डील 24713 करोड़ में फाइनल हुई है.

इससे फ्यूचर ग्रुप की रीटेल और होलसेल बिजनेस रिलायंस रीटेल एंड फैशन लाइफस्टाइल लिमिटेड (RRFLL) के अंतर्गत आ जाएगी.  RRFLL मर्जर के बाद फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड में निवेश भी करेगी. वह 1200 करोड़ प्रेफरेंशियल इश्यू के जरिए निवेश करेगी और फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड में 6.09 फीसदी हिस्सेदारी खरीदेगी.

ईशा अंबानी ने क्या कहा

डील के बाद रिलायंस रीटेल की डायरेक्टर ईशा अंबानी ने कहा कि हम छोटे व्यापारियों के साथ सक्रिय सहयोग के हमारे अनूठे मॉडल के साथ रिटेल इंडस्ट्री के विकास की गति को जारी रखने की उम्मीद करते हैं. हम देश भर में अपने उपभोक्ताओं को अहमियत प्रदान के लिए हम प्रतिबद्ध हैं.

स्कीम के तहत रीटेल और होलसेल उपक्रम को रिलायंस रिटेल एंड फैशन लाइफस्टाइल लिमिटेड (RRFLL) में स्थानांतरित किया जा रहा है, जो RRVL की पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी है. लॉजिस्टिक्स और वेयरहाउसिंग को RRVL में ट्रांसफर किया जा रहा है. अधिग्रहण के हिस्से के रूप में फ्यूचर ग्रुप फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेड (FEL) में कुछ कंपनियों का विलय करेगा

मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा सेल्फीच्या नादात आईसमोर दुर्दैवी मृत्यू. !

मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा सेल्फीच्या नादात आईसमोर दुर्दैवी मृत्यू. !                        
                        
भिवंडी, प्रतिनिधी : कामावरी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. बुडालेल्या दोन्ही भावांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमक दलाला यश आलं आहे. मासेमारी करताना सेल्फी काढण्याचा मोह या दोघांना आवरला नाही आणि त्यात या दोघांचा मृत्यू झाला. शहबाज अन्सारी आणि शाह आलम अन्सारी अशी मृतांची नावं आहेत.

नदीत पडून दोन भावांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाज आणि शाह आलम हे दोघे भाऊ काल (२९ ऑगस्टला) संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथील कामवारी नदीत चाविंद्रा पेट्रोल पंपाच्यामागे मासे पकडण्यासाठी आले होते. यावेळी या दोघांची आई देखील त्यांच्यासोबत होती. मासेमारी करताना सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. भावाला बुडताना बघून दुसऱ्या भावाने पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही सख्खी भावंड पाण्यात बुडाली. आईसमोर ही दोन्ही मुलं पाण्यात वाहून गेली.

आईने केलेल्या आरडाओरडीमुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरूणांनी तातडीने पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केलं. रात्री साडे सातला शाह आलम यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्दैवी घटनेमुळे मिल्लत नगर भागात शोककळा पसरली आहे.

शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन !!

शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन !!


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : केंद्रात असणाऱ्या बीजेपी सरकारने आल्यापासून घटनेतील एकेक कलम बाद करायला सुरुवात केली आहे. अलिकडे बीजेपी सरकारने शेतकऱ्यांना संपवणारे शेतकरी विरोधी तीन अध्यादेश पारित केले आहेत. हे अध्यादेश म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे अध्यादेश आहेत. म्हणून हे अध्यादेश बीजेपी सरकारने मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा. या हेतूने राष्ट्रीय किसान मोर्चाने १६ ऑगस्ट पासून ३१ राज्यात व ५५० जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय किसान मोर्चाने येत्या सोमवारी ३१ ऑगस्ट २०२० रोजी देशातील सर्व ३१ राज्यातील सर्व खासदार मतदार संघात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत खासदारांच्या पुतळ्याचे दहन करण्याचे ठरविले आहे. 
         या आंदोलनात सर्व शेतकरी हितार्थी संघटनांनी, शेतकरी बांधवांनी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामगारांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा द्यावा व आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे. 
        हे आंदोलन दोन भागात म्हणजे श्रीवर्धन मतदार संघाचे आंदोलन माणगाव या ठिकाणी व मावळ मतदार संघातील आंदोलन पनवेल या ठिकाणी होणार आहे. 
        तरी सर्वांना विनंती करण्यात येते की, श्रीवर्धन मतदार संघातील शेतकरी व शेतकरी संघटना पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी सर्वांनी सोमवार, दिनांक ३१/८/२०२० रोजी दुपारी ठिक २ वाजता माणगाव या ठिकाणी उपस्थित राहावे अशी संयोजकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनंती केली आहे.

Saturday, 29 August 2020

वसई विरार महानगरपालिकेच्या ई वार्ड अंतर्गत हनुमान नगर येथे सुरू आहे अवैध बांधकाम !!

वसई विरार महानगरपालिकेच्या ई वार्ड अंतर्गत हनुमान नगर येथे सुरू आहे अवैध बांधकाम !!


'अधिकाऱ्यांचे कानावर हात'

वसई, प्रतिनिधी : वसई विरार महानगरपालिकेच्या ई वार्ड अंतर्गत हनुमान नगर, नालासोपारा (प.) येथे राकेश साकला ह्या भूमाफियाचे अनधिकृत बिल्डिंगचे काम सुरू आहे. राकेश साकला याने या आधी सुध्दा अनेक अनधिकृत बांधकामे केली आहेत. याच्या हनुमान नगर येथील अनधिकृत बांधकामाविरूध्द स्थानिक नागरिक, समाजसेवक व पत्रकार यांनी तक्रारी केल्या आहेत तरी हे बांधकाम सुरूच आहे. कष्ट करून स्वतःची जमापुंजी माणूस स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी खर्च करतो पण राकेश साकला सारखे अनधिकृत बांधकाम व्यावसायिक (भूमाफिया) यांच्या कडून तो फसविला जातो.
या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी असतात पण ई प्रभाग क्षेत्र वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी अनेक तक्रारी येऊन सुध्दा त्यांना काहीच माहिती नाही असे दाखवितात व काही तरी कारणे देऊन कारवाई टाळण्याचे प्रयत्न करतात.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना समाजसेवक रिपब्लिकन विकास आघाडीचे वसई तालुका अध्यक्ष विष्णू भाई यांनी ‌हे अनधिकृत बांधकाम जर महानगरपालिकेने निष्कासित नाही केले तर या विरुद्ध आंदोलन स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन करण्यात येईल असे सांगितले.
आता तरी ई वार्ड प्रभागातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी या अनधिकृत बांधकामांवर लगेच कारवाई करतील असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.

मंदिरे खुली करण्यासाठी मुरबाड मध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन !!

मंदिरे खुली करण्यासाठी मुरबाड मध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : कोरोना महामारी संकटात सगळीकडे लाँकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीत शाळा, काँलेज,सह उद्योग, धंदे,कारखाने ,कार्यालये,ते मंदिरे, देवस्थाने ही बंद ठेवण्यात आली होती. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत आहे.उद्योग धंद्यांसाठी माणसे हळूहळू हिम्मत करून घराबाहेर पडु लागली आहेत. अशातच सर्वत्र  मंदिरे देवस्थाने बंद आहेत. ती तात्काळ खुली करावीत यासाठी आज भाजपा च्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मंदिरांसमोर घंटानाद आंदोलने करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर मुरबाड शहरासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात मंदीरे सुरु करा या मागणीसाठी अनेक धार्मिक संस्था व देवस्थानांच्या वतीने  आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व खासदार मा.श्री.कपिल पाटील साहेब व भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार मा.श्री.किसन कथोरे साहेब* यांच्या सूचनेनुसार मुरबाड शहरातील हनुमान मंदिर, राममंदिर, शंकर मंदिर, जैन मंदिर, जोगेश्वरी मंदिर* इ. ठिकाणी  घंटानाद आंदोलन करून या *आंदोलनाला पाठिंबा देऊन मंदिरे सुरू करण्याची मागणी राज्यसरकारकडे करण्यातआली .


     सदर आंदोलनात भाजपा मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव सर, शहर अध्यक्ष सुधीरभाई तेलवणे,  जिल्हा महिला अध्यक्षा शीतलताई तोंडलीकर, मुरबाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा छायाताई चौधरी, उपनगराध्यक्षा अर्चनाताई विशे, नितीन मोहपे सर ,माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी , माजी नगरसेवक मोहन दुगाडे ,दिलीप देशमुख, संतोष (माऊली) चौधरी, वार्ड अध्यक्ष बाळू  तेलवणे* इ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 
        बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या रमाधाम वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करताना ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ कायम फुलविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वांच्या आशीर्वादातून आणि सहकार्यातून प्रयत्न केला आहे, असे भावूक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले. 
     खोपोली परिसरातील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमाच्या पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या नव्या सुसज्ज वास्तूचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई,सामना वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका रश्मी ठाकरे, डॉ. संजय उपाध्ये हे मान्यवर सहभागी झाले होते.    
      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मुलांना संघर्ष करायला नको म्हणून प्रत्येक आई-वडील स्वतः काबाडकष्ट करतात. परंतु काळाच्या ओघात मुले त्यांची स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दूर जातात. अशा वेळी ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविता यावा, त्यांचे स्वतःचे घर असावे,आयुष्य असावे, त्यांना आधार असावा, वात्सल्य मिळावे यासाठी दूरदृष्टीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांनी रमाधाम उभे करण्याचे ध्येय बाळगले. ते पूर्ण केले. या वास्तूच्या पुनर्विकासानंतर येथील ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने आशिर्वादाने पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. हे करीत असताना स्व. बाळासाहेबांनी इथली निसर्गसंपदा टिकविण्याच्या सूचनेचे परिपूर्ण पालन करण्याची काळजी घेण्यात आली आहे. येथील प्रत्येक ज्येष्ठांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईलच तसेच या रमाधामची संकल्पना स्व. बाळासाहेबांनी व शिवसैनिकांनी जपली आहे, जाेपासली आहे, यापुढे आपण सर्वांनी मिळून ती अशीच यशस्वीपणे जोपासू,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. तसेच या वास्तूच्या निर्मितीसाठी आणि पुनर्विकासासाठी रतन टाटा, जमनालाल बजाज ट्रस्ट, श्री. जिंदाल,श्री.मित्तल, सुप्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू, प्रमोद नवलकर,सुधाकर चुरी, अनिल देसाई, काकासाहेब,सुनील चौधरी, विजय शिर्के अशा अनेक व्यक्तींनी हातभार लावला, या सर्वांचे आभारही मानले.
        या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पद्मविभूषण खासदार शरद पवार, पद्मविभूषण रतन टाटा, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
      रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी रमाधामच्या जुन्या आठवणींना स्वतःच्या मनोगतातून उजाळा दिला.तर डॉ.संजय उपाध्ये यांनी आयुष्य कशाला म्हणायचे,मन प्रसन्न ठेवण्याचे महत्त्व, जगणं सुंदर कसे बनवावे याबद्दल अतिशय समर्पक शब्दात प्रबोधन केले. 
       सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी कवी वसंत बापट यांची "देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना"  तसेच संत तुकारामांची "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती" ही गाथा ऐकविली.

बृहन्मुंबई पोलिस सहकारी पगारदार पतसंस्थेचे संचालक हरिष आंधळे यांनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा !!

बृहन्मुंबई पोलिस सहकारी पगारदार पतसंस्थेचे संचालक हरिष आंधळे यांनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा !!


मुंबई, अहमद शेख : बृहन्मुंबई पोलिस सहकारी पगारदार पतसंस्थेचे युवा व लाडके संचालक हरीष आंधळे हे नेहमीच एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये लोकप्रिय आहेत तसेच यांचा मुळ स्वभाव कोमल व परिस्थीतीची जाणीव असणारा असुन ते त्यांच्या स्वभावानुसार प्रत्येकाला ज्यांना गरज आहे त्यांचा मदतीला त्यांना शक्य असेल त्या प्रमाणे उभे रहातात.
या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे तसेच ते मित्रपरिवारात व सहकारी यांच्यात लाडके आहेत. देशावर आलेले कोरोनाचे संकट त्यात सुध्दा यांनी त्यांना शक्य असेल असे भरीव कार्य आपल्या परिसरात आपले सहकारी व मित्र यांच्यासोबत समाजासाठी केले.
त्यांनी आपल्या सर्व सहकारी व मित्रपरिवार यांना गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Friday, 28 August 2020

म्हारळ येथील खदाणीत बुडून गणेशभक्तांचा मृत्यू, मृतदेह शोधण्यात पावसामुळे अडचणी?

म्हारळ येथील खदाणीत बुडून गणेशभक्तांचा मृत्यू, मृतदेह शोधण्यात पावसामुळे अडचणी?


कल्याण (संजय कांबळे) : बंद असलेल्या खदाणीत गणेश विसर्जन करु नये म्हणून वारंवार सांगून ऐकत नसल्याने अखेर पोलीस स्टेशन ला पत्र दिले तरीही न ऐकणा-या एका गणेश भक्तांचा म्हारळ गावातील जयहिंद नामक खदाणीत बुडून नुकताच मृत्यू झाला आहे त्याचा मृतदेह अद्यापही सापडला नाही. पावसामुळे तो शोधण्यात अडचणी येत आहेत. या घटनेने गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. 
पोलीस आणि ग्रामस्थ यांच्या कडून मिळालेल्या माहितीवरून 
अमोल पवार वय १९ वर्षे रा विठ्ठलवाडी हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने म्हारळ गावातील त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. तो मित्रांबरोबर गणेश विसर्जनासाठी जयहिंद खदाणीत गेला होता ही खदाण ५०/६० फुट खोल असून पावसामुळे तुडूंब भरलेली आहे. अमोल व त्याचा मित्र पाण्यात उतरले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने अमोल बुडाला त्याचा मित्र कसातरी वाचला असे ग्रामस्थांनी सांगितले.काल उशीर पर्यंत अमोलचा शोध घेतला पण मुसळधार पडणा-या पावसामुळे शोद घेण्यात अडचणी येत होत्या. 

कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातील शेवटच्या टोकास जावसई गावास लागून असलेल्या डोंगर व टेकड्या परिसरात मोठय़ा प्रमाणात दगड खाणी आहेत. शेजारी उल्हासनगर सारखे मोठे व विकसनशील शहर असल्याने बांधकामाला लागणारे मटेरियल, खडी, डबर, येथून सहज मिळत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला. त्याच वेळी लोकसंख्या देखील वाढली. अगदी लोकवस्ती इतकी वाढली की डोंगर, टेकड्या, अगदी खदाणीत चाळी उभ्या राहिल्या. त्यामुळे येथेही अपघात मरणा-याची संख्या देखील वाढतच होती. यामुळे साहजिकच येथील खदाणी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली. याचा परिणाम म्हणून काही खदाणी बंद पडल्या आहेत. 
अशातीलच दिपक कुकरेजा नामक मालकाची जयहिंद खदाणी गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. येथे मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी निर्माण झाल्याने व बाजूला उल्हासनगर शहर असल्याने परिसरातील अनेक तरुण या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी, मोजमजा करण्यासाठी येतात शिवाय गणेशोत्सव काळात येथे गणेश मुर्ती विसर्जन करतात यामुळे येथे अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत. 
याला कंटाळून जयहिंद खदाणी मालकाने येथील तरुण व नागरिकांना येथे विसर्जन करु नये असे सांगितले. परंतु गेल्या १० वर्षापासून येथे विसर्जन केले जाते. गणेश भक्तांना विरोध केला असता दारु पिऊन येवून आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते असे जयहिंद खदाणीच्या मॅनेजरने सांगितले त्यामुळे याला कंटाळून आपणच टिटवाळा पोलीस ठाण्यात पत्र ही दिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 
दरम्यान अमोल पवार याचा मृतदेह अद्यापही सापडला नसून कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तर सध्या गणेशोत्सव साजरा होत आहे, त्यामुळे खदाणी मालकाने जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. म्हणून या मालकाला कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार असल्याचे म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी सांगितले. तथापि अमोल पवार या गणेशभक्तांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शाँर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत संसार जळुन खाक!!

शाँर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत संसार जळुन खाक!!


मुरबाड : (मंगल डोंगरे) ऐन गौरी गणपती सणात धसई येथील एक घराला आग लागून घरातील जीवनावश्यक वस्तू जळुन खाक झाल्या आहेत. 


घटनास्थळी   तात्काळ महसूल विभागाचे धसई तलाठी संतोष पवार यांनी जागेवर जाऊन नुकसानीचा पंचनामा करण्यात येऊन १ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

  टोकावडे पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या व धसई महसूल विभागातील धसई गावातील सुनिता मारुती सुरोशे यांच्या राहत्या  घरात अचानक आग लागल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य कपडालत्ता ते जीवनावश्यक सर्व वस्तू खाक झाले. या आगीत किमान १ लाख ५७ हजाराचे नुकसान झाल्याचे व ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे महसूल विभागाचे तलाठी संतोष पवार यांच्या पंचनाम्यात नमूद मयत असून या महसूल तात्काळ मदत मिळण्याबाबत प्रयत्न केले आहेत.

प्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे आयुक्त डाॅ. शर्मा यांचे आदेश : ४ सप्टेंबरपासून होणार जोरदार कारवाई. !

प्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे आयुक्त डाॅ. शर्मा यांचे आदेश : ४ सप्टेंबरपासून होणार जोरदार कारवाई. !


ठाणे (28 ऑगस्ट,) : ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांची प्रभाग समितीनिहाय यादी येत्या सोमवारपर्यंत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिले असून या सर्व अनधिकृत बांधकामांवर ४ सप्टेंबरपासून जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.

शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, कोरोना कोविड १९ च्या चाचणींची संख्या वाढविणे आणि मालमत्ता कर वाढविणे याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज सर्व उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी प्रत्येक सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या प्रभागामधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून ती यादी सोमवारपर्यंत आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्याचे आदेश दिले. सदरची यादी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रभागांमध्ये एकाचवेळी निष्काषणाची व्यापक मोहिम ४ किंवा ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची संख्या कमी झाली आहे ही चांगली बाब असली तरी गाफिल राहून चालणार नाही असे स्पष्ट करून महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी यापुढे मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढावी यासाठी सहाय्यक आयुक्तांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. यामध्ये शिथीलता खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

मालमत्ता कर वसुलीबाबत बोलतना त्यांनी स्पष्ट केले की सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर निरीक्षकांना प्रभागातील नवीन मालमत्ता शोधून त्यांना कर आकारणी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच किती नवीन मालमत्तांना कर आकारणी केली त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा असे सूचित केले.

भाविकांचे श्रद्धास्थान मंगळग्रह मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी मंगळग्रह जन्मोत्सव साजरा !!

भाविकांचे श्रद्धास्थान मंगळग्रह मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी मंगळग्रह जन्मोत्सव साजरा !!


अमळनेर, प्रतिनिधी : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवनिमित्त २८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे ५ वाजेला मंगळग्रह सेवा जळगाव येथील ख्यातनाम धावपटू सी.ए.डॉ. रविंद्र खैरनार यांनी त्यांची पत्नी सौ. अल्का व मुलगा कैवल्य यांच्यासह श्री मंगळ ग्रहाच्या मूर्तीवर विशेषपंचामृत अभिषेक केला. त्यानंतरअत्यंत सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूप बाल श्री मंगळाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावले जातात. हा मान मिळालेले योगेश पांडव यांनी वाजत गाजत नवे ध्वज मंदिरात आणले. संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलिप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव,सौ.जयश्री साबे,सौ.सुनीता कुलकर्णी यांनी त्यांचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. ध्वजपूजनानंतर तो कळसावर वमुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला. दरम्यान धावपटू म्हणून श्री. खैरनार यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मंगळ ग्रह सेवा संस्थेने त्यांना गौरविले.कोरोना मुळे मोजक्याच भाविकांची उपस्थिती होती.केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते.त्यांना प्रसाद भंडारी,तुषार दीक्षित व देवेंद्र वैद्य यांनी सहकार्य केले.

महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांचा पाठपुरावा !

महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांचा पाठपुरावा !


        बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.  निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचा कायम स्वरुपी बेस कॅम्प जिल्ह्यात स्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा आपत्ती प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे काम जलदगतीने व्हावे तसेच आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल दिनांक २७ ऑगस्ट रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे व संबंधितांना तसे आदेश देण्यात आले आहेत.  
          तसेच महाड येथे कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे, त्यानुसार याबाबत शासन स्तरावर कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांचा पाठपुरावा !

महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांचा पाठपुरावा !


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.  निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचा कायम स्वरुपी बेस कॅम्प जिल्ह्यात स्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा आपत्ती प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे काम जलदगतीने व्हावे तसेच आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल दिनांक २७ ऑगस्ट रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे व संबंधितांना तसे आदेश देण्यात आले आहेत.  
          तसेच महाड येथे कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे, त्यानुसार याबाबत शासन स्तरावर कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

गणेशोत्सव काळात बाप्पा प्रसन्न नाहिच कोरोनोच्या रुग्ण संख्येत वाढच?

गणेशोत्सव काळात बाप्पा प्रसन्न नाहिच कोरोनोच्या रुग्ण संख्येत वाढच? 


कल्याण (संजय कांबळे) : संपूर्ण जगात कोरोना कोव्हीड या विषाणूंचा धुमाकूळ सुरू असतानाच आपल्या विघ्नहर्त्या च्या आगमनाने कोरोनाचा नायनाट होईल या आशेवर असणाऱ्या गणेश भक्तांची घोर निराशा झाली आहे. कारण गणेशोत्सवाच्या पाच दिवसाच्या काळात कोरोना अॅक्टिव रुग्णांची संख्या तब्बल २०० च्या आसपास गेली आहे तर कंटेन्मेंट झोण ची आकडे ३०० च्या घरात पोहोचली आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेष करून मुंबई, ठाणे व कोकणात याचे सर्वाधिक प्रमाण असते. परंतु सध्या जगासह देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. समाधानाची बाब म्हणजे यंदा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तर बहुतेक मंडळांनी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. परंतु घरगुती गणेशोत्सवात नांगरिकानी म्हणावी तशी काळजी घेतली नाही असे वाटते. त्यांची धारणा होती की बाप्पा चे घरी आगमण झाल्यावर कोरोनावर विघ्नहर्ता विजय मिळवून भक्तांची सुटका होईल पण त्यांची घोर निराशा झाली असे गणेशोत्सव काळातील पाच दिवसाच्या आकडेवारी वरुन दिसून येते.
याच्या कारणांचा शोध घेतला असता असे समोर आले की गणेशोत्सव वेळी सोशलडिस्टींग चे पालन झाले नाही, आरतीच्या वेळी गर्दी झाली, सॅनिटायझर व मास्क वापरले नाही, कोणतेही सुरक्षेचे उपाय न करता  पत्यांचे डाव रंगले, दिड, तीन, आणि पाच दिवसाच्या गणेश विसर्जनाला खाजगी वाहनातून तोबा गर्दी आदी कारणे आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कल्याण ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंत अॅक्टिव रुग्णाची संख्या १८५ वर गेली आहे. तर पाॅझिटिव पेंशंट ६०१ झाले आहेत, संस्थात्मक कोरोनटांइग ची संख्या २१५५ तर होमकोरोंटाईंग १२५१, तसेच कंटेन्मेंट झोन च्या संख्येत वाढ होईन ती २९० वर पोहोचली आहे. या सर्वामध्ये कोरोनाने मरण पावणा-याची संख्या २३ इतकीच आहे ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे यावर्षी कोरोना चा भंयकर राक्षक विघ्नहर्ता विघ्नेश्वरावर भारी पडला असेच म्हणावे लागेल!

Thursday, 27 August 2020

अमळनेरला शुक्रवारी होणार श्री मंगळ जन्मोत्सव... 'घरीच राहून श्री मंगळ देवतेचे नामस्मरण करण्याचे संस्थानाचे आवाहन'...

अमळनेरला शुक्रवारी होणार श्री मंगळ जन्मोत्सव... 'घरीच राहून श्री मंगळ देवतेचे नामस्मरण करण्याचे संस्थानाचे आवाहन'...



अमळनेर, प्रतिनिधी : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात दरवर्षाप्रमाणे या वर्षीही भाद्रपद शुद्ध दहाच्या मुहूर्तावर अर्थात २८ ऑगस्ट रोजी श्री मंगळ जन्मोत्सव होणार आहे. मंदिराचा जुना ध्वज काढून नवीन ध्वज लावण्यात येईल. हा मान सामाजिक कार्यकर्ते तथा मंगलभक्त योगेश पांडव यांना दिला जातो.
        मंदिरात पहाटे पाचपासून विशेष पंचामृत अभिषेक प्रारंभ होतो. सकाळी सहाच्या सुमारास श्री. पांडव नवे ध्वज घेऊन सहकुटुंब सहपरिवार वाजतगाजत मंदिरात दाखल होतात. त्यानंतर सजविलेल्या पाळण्यात प्रतिमात्मक स्वरूपात श्री मंगळ देव ग्रह देवतेला श्रीफळ स्वरूप ठेवले जाते व जन्मोत्सव साजरा केला जातो. विधीवतरित्या ध्वजपूजन होवून नवे ध्वज मंदिराच्या कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर लावले जातात. भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात न येता घरीच राहून श्री मंगळ देवतेचे नामस्मरण करावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.

Wednesday, 26 August 2020

महाड दुर्घटनेत वाचलेल्या त्या चार वर्षीय मुलांचे पालकत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले !

महाड दुर्घटनेत वाचलेल्या त्या चार वर्षीय मुलांचे पालकत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले !


   बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन लहानग्यांचे पालकत्व नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे.
मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत. तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला असून त्याचे कुटुंबीय मात्र सुदैवी ठरले नाहीत.
या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे श्री. शिंदे यांनी जाहीर केले आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 
या दुर्घटनेचे वृत्त समजताच श्री. शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग दिला होता. ठाणे महापालिकेची २ आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाची तुकडीही श्री. शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे.
"८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे," असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Tuesday, 25 August 2020

एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा, या उपक्रमार्तगत मराठी नाटक समूहाची कलाकारांना मदत !!

'एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा, या उपक्रमार्तगत मराठी नाटक समूहाची कलाकारांना मदत !!


कल्याण (संजय कांबळे) : मराठी नाटक समूहाच्या “एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा” ह्या उपक्रमाअंतर्गत, रंगमंच कामगार अर्थात पडद्यामागील कलावंतांना मदतीचं वाटप मागील मे 2020 पासून सुरू झालेले असून प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते प्रंशात दामले यांच्या सारखे शंभर हुन अधिक कलाकार या समूहाचे सदस्य आहेत. 
संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडाला. लाॅकडाऊण लागू झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून कोणतेही क्षेत्र वाचले नाही. त्यातल्यात्यात चित्रपट व नाट्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. मोठ्या कलाकारांना तसा फारसा फरक पडला नाही. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची बिकट अवस्था झाली होती हे ओळखून अभिषेक मराठे या तरुणाने मराठी नाटक समूहाची स्थापना करुन एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवून यामध्ये प्रायोगिक, व्यावसायिक, जेष्ठ, कनिष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक, कवी, निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ, प्रेक्षक, आणि समीक्षक यांचा समावेश केला. सर्व नियोजन व्हाट्सअप्प ग्रुप वर करुन नामांकित अशा रंगकर्मींना एकत्र आणले. यामध्ये प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर, पुरुषोत्तम बेर्डे, सचिन गोस्वामी, कौशल इनामदार,, कुमार सोहनी, चं प देशपांडे, यांच्या सारखे १०० हुन अधिक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. या सर्वाच्याच मदतीतून मे 2020 -मध्ये 275 पडद्यामागील कलाकारांना प्रत्येकी रुपये 2,500/- प्रमाणे एकूण रुपये 6,87,500चे वाटप केले. तर जून मध्ये 316 पडद्यामागील कलावंतांना रुपये 2,500/- प्रमाणे एकूण रुपये 7,लाख90,हजार आणि जुलै महिन्यात - 318 पडद्यामागील कलावंतांना प्रत्येकी रुपये 2500/- प्रमाणे एकूण 7,लाख95 हजार रुपये व आता ऑगस्ट 2020 -मध्ये तब्बल 324 पडद्यामागील कलावंतांना प्रत्येकी रुपये 2,500/- प्रमाणे एकूण रुपये 8लाख ,10,हजार - इतक्या रक्कमेचे वाटप दिनांक 09 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ह्या कालावधीत पूर्ण झालेली आहे.
मदतनिधी वाटपाच्या ह्या चौथ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट 2020 ह्या महिन्यामध्ये वापट केलेल्या वर्गवारीचा विचार केला तर यामध्ये - 
नेपथ्य कामगार – 145, साहित्य विभाग – 22, ध्वनीव्यवस्था – 15, 
व्यवस्थापक – 25, रंगभूषा, केशभूषा – 23, प्रकाशयोजना – 27, द्वारपाल – 15, 
कपडेपट – 15, उपहारगृह कर्मचारी – 04, चालक – 10, बुकिंग क्लार्क – 22, जाहिरात विभाग - 01असे 
एकूण - 324 कामगारांना मदत मिळाली आहे. 
मे, जून, जुलै आणि ऑगस्ट ह्या चार महिन्यांमध्ये मिळून एकूण रुपये 30,लाख 82,हजार 500/- रुपयांचे मदतनिधी वाटप समूहाने पूर्ण केलेले आहे.
सदर रक्कम ही थेट त्या त्या पडद्यामागील कलावंतांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने ह्या मदतीचा थेट फायदा त्या त्या कलावंतांना होत आहे
आता सप्टेंबर महिन्यासाठी मदतनिधी जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आणि रसिक भरभरून प्रतिसाद देत आहेत ही अत्यंत आनंदाची उत्साहाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.असून ही मदत नाट्य व्यवसाय सुरू होईपर्यंत  देण्याचा मानस आहे. असे अभिषेक मराठे यांनी सांगितले. तर मराठी नाटक समूहाचे आशीर्वाद मराठे यांना विचारले असता ते म्हणाले '


- नवीन स्थापन झालेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकार्‍यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ह्या ठिकाणच्या प्रायोगिक रंगकर्मींचा समन्वय घडवून प्रायोगिक नाटकांसाठी विशेष काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी पहिली झूम सभा यशस्वी संपन्न केली आणि त्यासंदर्भात पुढे काय करता येईल हयबद्दल विचार विनिमय सुरू आहे. 
हयाबरोबरच विविध नाट्यविषयक अनेक उपक्रम करण्याचा मानस आहे. व्हाट्सअप समूह असून देखील आपण समाजासाठी अनेक चांगले उपक्रम करू शकतो हे आमच्या समूहाने आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे. आमच्या कार्यावरुन अनेकांनी प्रेरणा घेऊन आपले उपक्रम सुरू केलेले आहेत.

राज्यात ३हजार १६५ नवीन वाढीव तलाठी सजे तर ५२८ महसुली मंडळे, ठाणे जिल्हात ७२ नवीन तलाठी सजांची निर्मिती, कल्याण मध्ये एक तर मुरबाड मध्ये तीन महसूल मंडळे!

राज्यात ३हजार १६५ नवीन वाढीव तलाठी सजे तर ५२८ महसुली मंडळे, ठाणे जिल्हात ७२ नवीन तलाठी सजांची निर्मिती, कल्याण मध्ये एक तर मुरबाड मध्ये तीन महसूल मंडळे!


कल्याण (संजय कांबळे) : राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ या विचार करून राज्यात एकूण ३ हजार १६५ नवीन वाढीव तलाठी सजे आणि ६ तलाठी सजा करीता १ मंडल अधिकारी या तत्त्वाप्रमाणे वाढीव तलाठी सजे साठी तब्बल ५२८ महसुली मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सुमारे ७२ नवे तलाठी सजे निर्माण होत आहे. तर कल्याण तालुक्यातील म्हारळ व मुरबाड मधील शिवळे, म्हसा आणि टोकावडे येथे नवीन मंडळांची निर्मिती करण्यात आल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
राज्यातील महसूल गोळा करण्याचे अंत्यत महत्त्वाचे काम महसूल विभाग करतो. पण वाढती लोकसंख्या व झपाटय़ाने होणारे नागरिकरण यामुळे महसूल यंत्रणेनेवर कमालीचा कामांचा ताण वाढला आहे. या यंत्रणेचा खूप महत्त्वाचा व स्थानिक पातळीवर काम करणारा कर्मचारी म्हणजे तलाठी होय.
साधारण पणे ६तलाठी सजा करीता १ महसूल मंडल असे तत्व आहे. त्यानुसार सजांची फोड पुनर्रचना करनेकामी नवीन सजा चे नकाशे सिमा निश्चिती, व नवीन सजाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असावे या बाबतीत अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार उपविभाग निहाय उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यांच्या कडून साजांची निश्चिती करण्यात आली होती. या सजांचा व त्यातील समाविष्ट गावांच्या बाबतीत जनतेच्या हरकती व सूचना पुराव्यानिशी मागविण्यात आल्या होत्या. परंतु तहसीलदार उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर,ठाणे यांनी प्रारुप अधिसूचितील तलाठी सजे व गावे बरोबर असल्याचे कळविले आहे. तथापि कल्याण व शहापूर तहसीलदार यांनी दुरुस्ती करणे सांगितले होते
शासन निर्णयानुसार राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकरण यानुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली नाही विचारात घेता राज्यात एकूण ३१६५ नवीन वाढीव तलाठी साझे व ६तलाठी साझे करीता १ महसूल मंडळे या तत्त्वाप्रमाणे ५२८ नवीन महसूल मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात ७२ नवीन सजे निर्माण झाले आहेत.
या अगोदर कल्याण तालुक्यात ५ मंडळ अधिकारी सजा होते यामध्ये कल्याण, अप्पर कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा आणि नडगाव यांचा समावेश होता. परंतु म्हारळ, वरप कांबा या गावांची वाढणारी लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारे नागरिकरन यांचा विचार करून म्हारळ बु. या नवीन मंडल अधिकारी महसूल विभागाची नवनिर्मिती केली आहे यामध्ये तलाठी सजा म्हारळ बु. कांबा, रायते, वसत शेलवली आणि वाहोली यांचा समावेश असून म्हारळ बु., म्हारळ खु. कांबा, वरप, रायते, गोवेली, पिंपळोली, आणे भिसोळ, वसत शेलवली, आंबिवली तर्फे चोण, जांभूळ, मोहिली, नांलिबी, वाहोली, दहागाव, मांजर्ली, आपटी तर्फे चोण, आपटी तर्फे बा-हे अशा १८ गावांचा यात सहभाग आहे. म्हारळ बु. हे नवीन महसूल मंडळ अधिकारी निर्माण झाल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली असून यामुळे नागरीकाचा वेळ व पैसा वाचणार आहे.
कल्याण प्रमाणेच मुरबाड तालुक्यात देखील ३ नवीन मंडल अधिकारी निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये शिवळे म्हसा आणि टोकावडे या महसूल विभागाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या अगोदर मुरबाड तालुक्यात ५ मंडळ सजा होते आता त्यामध्ये ३वाढल्याने एकूण ८ मंडल अधिकारी झाले आहेत. शिवळे मंडल अधिकारी अंतर्गत कोलठण, भालूक, ठाकरे नगर, पवाळे, टेंभरे, पिंपळगाव, शिवळे, कोंडेसाखरे, नढई, आंबेळे (बु) डेहणोली, माल्हेड, खाटेघर, कळमखांडे, जामधर, खंदारे, कुडवली, देवपे, आणि देवगाव, तर म्हसा मंडल मध्ये मानिवली शि, बेहरे, शिरवली, सासणे, न्हावे, तोंडली, म्हसा काचकोळी, माणगाव, शिलंद, कान्होळ, चिरड, पाटगाव, भाळेगाव, चंद्रपूर, माहेरघर, डोंगरन्हावे, आगाशी, आंबेटेंभे या गावांचा तर टोकावडे मंडल मध्ये टोकावडे, हेदवली, करचौडे, तळवली बा, शिरोशी, शाई, मांदोशी, बुरसुंगे, वेळूक, शेलगाव, आळवे, खेड, वनोटे, बेळगाव, रांजणगाव, खापरी, उमरोली, मानवली, किसळ, इंदे, सायले, साजगाव, पारगाव, माळ, चोसाले, आंबिवली, कोचरे इत्यादी गावांचा समावेश आहे.
कल्याण, मुरबाड तालुक्याप्रमाणे अंबरनाथ, भिवंडी व शहापूर येथे ही काही तलाठी सजे व मंडल आधिकारी विभाग वाढले आहेत. यासंदर्भात कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले "वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारे नागरिकांरन यामुळे महसूल विभागावर कामाचा ताण वाढतो तो यामुळे कमी होईल व नांगरिकाचीही सोय होईल.

महाड इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

महाड इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार


         बोरघर / माणगांव  ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील महाड शहरात  काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन इमारत काल दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली.  
       या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घटनास्थळाला भेट देवून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले.
        श्री.वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तसेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप व नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती जगताप यांच्यासोबत चर्चा करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना मदत व पुनर्वसन  विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. 
       याशिवाय या दुर्घटनेत  उध्वस्त झालेल्या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून ती मदत तातडीने देण्याचे  निश्चित प्रयत्न केले जातील, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

महाड तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल तर दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : 'पालकमंत्री कु.अादिती तटकरे'

महाड तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल तर  दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : 'पालकमंत्री कु.अादिती तटकरे'
      
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवार,दिनांक २४ ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
     महाड शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत  कोसळल्यानंतर रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.
       यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी  डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
        या दूर्घटनेत बारा व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सदर इमारत  पाच मजली असून तिला ए आणि बी अशा दोन विंग होत्या. सदर इमारतीचे बांधकाम सात ते आठ वर्षांपुर्वी झाले होते. इमारतीच्या दोन्ही विंग मधील काही सतर्क लोकांना सदर इमारतीच्या दुर्घटनेची चाहूल लागताच ते तात्काळ इमारतीच्या बाहेर पडले. 
      सदर इमारतीच्या  दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल  करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येईल, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केल्याचे तसेच दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही काही लोक ढिगार्याखाली अडकले असल्याची शक्यता त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बचाव पथके आणि तीन एनडीआरएफ ची बचाव पथके श्वानपथकाच्या मदतीने युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य करीत असल्याची  माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Monday, 24 August 2020

रोटरी क्लब चोपडा कडून गणपती मंडळांना निर्माल्य संकलन बॉक्स व मास्क चे वाटप.!!

रोटरी क्लब चोपडा कडून गणपती मंडळांना निर्माल्य संकलन बॉक्स व मास्क चे वाटप.!!


चोपडा वार्ताहर,: रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून ती फक्त शैक्षणिक व आरोग्य यावरच कार्य करत नसून ती पर्यावरण सुरक्षितेचा देखील भान ठेवून कार्य करीत असते त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब चोपडा ने आज २२ ऑगस्ट २०२० रोजी भगवान गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी निर्माल्य संकलनासाठी २० मोठ्या गणेश मंडळांना "निर्माल्य संग्रह बॉक्स" वाटप करण्यात आले (भगवान गणेशला अर्पण करून झालेल्या फुलांच्या माळा व फुले त्यास निर्माल्य म्हणतात.)गणेश उत्सवादरम्यान निर्माल्य गोळा होते व ते तसेच नदीमध्ये विसर्जित करण्यात येते व त्या त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते ते टाळण्यासाठी रोटरी क्लब चोपडा ने पुढाकार घेऊन चोपड्यातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांना निर्माल्य संकलन बॉक्स तसेच यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव पाहता मास्क वाटप केले.


गणपती विसर्जनाच्या दिवशी गोळा झालेले सर्व निर्माल्य रोटरी क्लब ची टीम सदर गणपती मंडळांकडून गोळा करून ते सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरले जाईल व त्यामुळे पर्यावरणाचे जतन होईल असे रोटरीचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी सांगितले.
*विसर्जनासाठी "रोटरी सेवा ट्रॅक्टर्स"ची सेवा*
सर्व लहान मोठे गणपती विसर्जन करण्यासाठी रोटरी कडून ट्रॅक्टरची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केलेली आहे तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरातील गणपती,विसर्जनासाठी "रोटरी सेवा ट्रॅक्टर" वर आणून द्यावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष नितीन अहिरराव,सचिव रुपेश पाटील, प्रकल्पप्रमुख प्रफुल्ल गुजराथी,चंद्रशेखर साखरे, व्हि.एस.पाटील, वेले आर.सी.सी. अध्यक्ष विकेश पाटील व सर्व रोटरी सदस्यांनी  केले आहे.

बाप्पा बोलला माझ्याशी !! 'डॉक्टर सुनिता चव्हाण'

बाप्पा बोलला माझ्याशी !! 'डॉक्टर सुनिता चव्हाण'


मुंबई, विष्णु गुप्ता : मुंबईतील बोरिवली येथे रहाणाऱ्या डॉक्टर सुनिता चव्हाण ह्या हळूवार मनाचे व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिस सोबत आपले कविमन जिवंत ठेवले. त्यांचा "हळवे पाषाण" हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून त्यांच्या सर्वांच्या मदतीला उभे रहाण्याचा स्वभाव हळूवार मनामुळे कोणालाही न दुख:विण्याचा स्वभाव अशा डॉक्टर सुनिता चव्हाण यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्या भावी पिढीला आदर्श आहेत.
डॉक्टर सुनिता चव्हाण यांच्या देवघरातील गणेश ...


डॉक्टर सुनिता चव्हाण यांच्या मनात गणेश चतुर्थीला घरातील गणेशाची आराधना करताना उमटलेले भाव 'मनोगत' : 

"बाप्पा बोलला माझ्याशी" 
    बाप्पाला नमस्कार करुन मागे वळत होतेच तर बाप्पा मला बोलताना दिसला..."अरे बाप्पा,आज चक्क तू बोलतो आहेस"

  "अग,मी आज खुप खुश आहे..तुम्ही  आज माझी साधी,स्वच्छ आणि सोज्वळ रूपात स्थापना केली आहे..या साधेपणातच खुप भक्तिभाव दिसतोय त्यामुळे मी खूप खुश आहे."
        बाप्पा इतक्या समाधानाने बोलत होता कि माझं मन भरुन आलं.मी त्याच्या चरणाजवळ बसत बोलले,"बाप्पा, मंगलमूर्ती,गणेशा,गजानन विघ्नहर्ता खूप नाव आहेत तुला तरी पण आम्ही  जेव्हा बाप्पा म्हणतो ना तेव्हा आपल्या पालनकर्त्याला मनापासून साद देतो अशी भावना निर्माण होते,अंतःकरण सुखावते आणि आपोआपच तुझ्यात आणि आमच्यात एक सहजतेचा बंध बनतो आणि तू आमचा होतोस.देवाधिदेवांमध्ये तू खुप  जवळचा,अगदी निकटचा वाटतोस कारण तू आमच्या घरी येऊन आमच्यातील एक होऊन राहतोस.. कोणाच्या झोपडीत,कुणाच्या घरी तर कोणाच्या बंगल्यात."
    "म्हणून तर मी दरवर्षी तुमच्याकडे येतो तुमचं प्रेम,तुमची भक्ती मला इकडे ओढून आणते."
   "तू जेव्हा घरी येतोस ना बाप्पा तेव्हा असं वाटतं की मी माझं सर्व सुख,दुःख,आनंद,चिंता सांगत असताना तू एका वडीलधार्या माणसाप्रमाणे किंवा एका जिवलग मित्राप्रमाणे तू मनःपूर्वक ऐकून घेतो आहेस आणि तुझ्या अस्तित्वाच्या गंधाने तू आम्हाला धीर देतो आहेस मग आमच्या दुःखाला तुझ्या प्रसन्नतेची फुंकर  मिळते आणि सारं घर चैतन्यशील होऊन जातं.जे काही आणि जसं काही मिळेल तसे आम्ही तुझी सेवा करतो.तू कधीही कोणत्या गोष्टीचा हट्ट नाही करत आम्ही जे देतो ते तू आनंदाने स्वीकारतोस"
   "हो पण या वेळेस मी खूप समाधानी आहे.कुठे गोंगाट नाही,गर्दी नाही,तुम्हा सर्वांची चिंता,आनंद सर्व ऐकून घेण्यास खूप शांत वेळ मिळाला त्यामुळे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि समजल्या पण. दिखाव्याच्या आणि आवाजाच्या गर्दीत तो भक्तिभाव कुठेतरी हरवून गेला होता असं वाटत होतं.पण आता पाहिलंस ना..मला सोन्या रुप्याची,अलंकारांची गरज नाही,मी शाडूच्या मुर्तीत,लालभडक जास्वंदी मध्ये किती रुबाबदार वाटतो,दुर्वा आणि आघाड्याच्या हिरवा रंगात खुलून दिसतो.मला आवडणारे मोदक, लाडू,खीर हे बाकीच्या प्रसादापेक्षा किती चविष्ट वाटतात.मलाही साधेपणा आवडतो.आज कित्येक घरांमध्ये मुलांनी,मोठ्या माणसांनी, बायकांनी स्वतःच्या हाताने शाडूचे गणपती बनवून त्याची पूजा केली आहे.मी कलेचा दाता आहे त्यामुळे खूप आनंदी आणि समाधानी आहे."
     माझं मन पण समाधान पावलं.गणेशाचं मन ख-या अर्थाने आज मनाला भिडलं.."तू येतोस,तू राहतोस पण तुला नक्की  काय हवं असतं ते आज समजलं..तू आम्हाला नेहमीच तुझ्या घरी जाण्यापूर्वी  आमच्यातील नकारात्मतेला दूर करून सकारात्मकतेची बीज रुजवून जातोस,आशेची पालवी देऊन जातोस..या दोन्हीमुळे आमच्यात आत्मविश्वासाची हिरवळ निर्माण होते त्यामुळे कोणत्याही कार्याला मेहनत आणि श्रध्देच्या जोरावर यशरुपी फुले आणि फळांची चव चाखण्यास आम्ही प्रयत्नशील राहतो..तुझ्या उदारतेचे आम्ही नेहमी कृतज्ञ आहोत..तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव आहे आणि अशीच राहु दे बाप्पा"🙏🏻
     "अरे माझी कृपादृष्टी नेहमीच तुमच्यावर असते पण तुम्ही...तुम्ही या दिखाव्याच्या,आवाजाच्या आणि स्पर्धेच्या इतके आहारी गेला होतात की तुम्हाला बाकी दुसरं काही सुचतच नव्हतं..भक्तिभाव कुठेतरी हरवून गेला होता असं जाणवत होतं..आता हा कोरोना आला आहे,त्याने तुम्हाला ख-या जीवनाची दिशा दाखवली आहे... तो जसा आला तसा जाणारही आहे...पण या वेळेत जे तुम्ही शिकलात ते विसरून जाऊ नका..पुन्हा त्याची पुनरावृत्ती करु नका...अगदी अंतकरणापासून जागे व्हा..आज घराघरांमध्ये आपल्या परिवारासोबत राहताना मलाही आनंद झाला. तुम्ही माझी प्रत्येक मंडळांमध्ये किती विभागणी करता..लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्रित  करण्यासाठी माझी स्थापना केली पण त्या ध्येयाला आज आकर्षण आणि प्रसिद्धीच्या चकाकीने कुठवर नेऊन ठेवले आहे..मंडळात माझी उंची आणि व्याप्ती वाढऊ नका..तुमच्या कर्तृत्वाची उंची वाढवा आणि सामाजिक बांधिलकी दाखवून तिथे कार्यरत राहून मंडळाचा विकास करा.. हाच गणेश उत्सवाचा खरा अर्थ आहे.  तुम्हाला जाणीव आहे..तुम्ही नक्कीच हे करू शकाल..त्याकडे लक्ष द्या"
  "हो बाप्पा,या कोरोनामुळे बऱ्याच गोष्टींची,चुकांची जाणीव झाली आहे आम्हाला.आम्ही आता त्याची पुनरावृत्ती नाही करणार.माफ कर आम्हाला.🙏🏻
"आता माझे विसर्जन कराल ते घरातील पाण्यात..एखाद्या कुंडीत.. किंवा बनवलेल्या छोट्या तलावात करा मग मी इथेच विरघळून तुमच्या आसपास नेहमीच राहीन..तुमचे रक्षण करायला..प्रेरणा द्यायला..धीर द्यायला..आनंदात सहभागी व्हायला."
"हो बाप्पा..नक्कीच"असे म्हणून मी नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि पहाते तर बाप्पा पुन्हा आहे तसा आसनस्थ होता.
    पण आज मला गणेश चतुर्थीचे खरे महात्म्य समजले होते आणि त्याचा श्री गणेशा आपण प्रत्येकाने करायला हवा...हा संकल्प मी केला आणि तुम्ही? 
🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🌺🙏🏻 

©️®️ डाॅ.सुनिता चव्हाण,मुंबई.

कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे वतीने नुतन आगार व्यवस्थापक श्री तेजस गायकवाड यांचे स्वागत !

कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे वतीने नुतन आगार व्यवस्थापक श्री तेजस गायकवाड यांचे स्वागत !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील राज्य परिवहन श्रीवर्धन आगारात नुकतेच नव्याने हजर झालेले आगार व्यवस्थापक श्री तेजस गायकवाड यांचे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वागत समारंभ कार्यक्रम दिनांक २४/०८/२०२० रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीवर्धन आगारात आयोजित केला होता. 
      या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत श्री राहुल गायकवाड यांनी सांगितले की, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना ही गेली साठ वर्षे रा.प.महामंडळामध्ये कार्यरत असून तसेच ही संघटना महापुरुषांचे विचार धारा घेऊन पुढे जात आहे आज या देशावर महापुरुषांची विचारधारा राज्य करीत असून कास्ट्राईब संघटनेचे सभासद त्याचे पाईक आहेत तसेच कास्ट्राईब राज्य परिवहन संघटना ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न तळमळीने सोडणारे एकमेव संघटना आहे. 
       आगार व्यावस्थापक श्री तेजस गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की सर्व कर्मचारी मला सहकार्य करा कोणत्याही कर्मचार्‍यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी सक्षम आहे, कोणत्याही कर्मचाऱ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही.असे मत व्यक्त केले.    
     सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री मंगेश चांदोरकर,श्री के डी वाघमारे,श्री श्रीकांत ठोसर,श्री अनिल मोरे,  श्री एस बी झरे, श्री उमेश मोरे,श्री भीमराव सूर्यवंशी,  श्री भिमराव धाकडे,श्री एस बी साळवी,श्री एस बी कोळी,  श्री रावसाहेब चित्ते, श्री धनराज चामणार, श्री शंकर इंगोले,श्री गोविंद खटके, श्री प्रमोद लाड, श्री नितीन कर्जावकर,श्री नाशिर पटेल, श्री राजेंद्र काशीद इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, 23 August 2020

पालकमंत्री कु.अादिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन तालुक्यासाठी सुसज्ज कार्डियाक ॲम्बुलन्सचे लाेकार्पण...

पालकमंत्री कु.अादिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन तालुक्यासाठी सुसज्ज कार्डियाक ॲम्बुलन्सचे लाेकार्पण... 
        
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील    श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पुढील आवश्यक उपचाराकरिता नेण्यासाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या ॲम्बुलन्सचे आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज  श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे लोकार्पण करण्यात आले.
      पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून सुसज्ज अशी कार्डियाक ॲम्बुलन्स उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आली.    
       यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मधुकर ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भरणे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, दर्शन विचारे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी  हे उपस्थित होते. 
        काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री कु.तटकरे, खासदार सुनिल तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयाकरिता 108 ॲम्बुलन्स सेवा तसेच डिजिटल क्ष-किरण मशीन उपलब्ध  करून देण्यात आले होते.

डीवायएसपी शशिकिरण काशिद आणि पोलीस निरीक्षक रामदास इंगवले कोरोनावर मात करून जनसेवेत पुनःश्च रुजू झाल्याने माणगांवात आनंदाचे वातावरण !

डीवायएसपी शशिकिरण काशिद आणि पोलीस निरीक्षक रामदास इंगवले कोरोनावर मात करून जनसेवेत पुनःश्च रुजू झाल्याने माणगांवात आनंदाचे वातावरण ! 


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक माननीय श्री. रामदास इंगवले साहेब आणि डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद साहेब यांनी आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना तथा कोवीड १९ वर मात करून ते पुनःश्च आपल्या कर्तव्यावर तथा ड्यूटी वर रूजू झाले आहेत त्यामुळे माणगांव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वर्गात आणि संपूर्ण माणगांव तालुक्यातील समग्र जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
     माणगांव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक माननीय श्री. रामदास इंगवले साहेब यांनी माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य कठोर डीवायएसपी शशिकिरण काशिद साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात माणगांव तालुक्यातील जनतेच्या हितासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील भुरट्या चोर्या, दरोडे रोखण्यासाठी व त्यांना पायबंद घालण्यासाठी माणगांव तालुक्यातील विविध भागात गस्त वाढविल्या, तसेच हातभट्टी   दारूबंदी, ग्रामीण भागातील वादविवाद, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली, माणगांव बाजारपेठेतील मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी माणगांव बाजारपेठेतील मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा नो पार्किंग जागेत पार्किंग करणारे वाहन चालक, महामार्गालगत फूटपाथवर अतिक्रमण करून बसणारे छोटे मोठे दुकानदार, टपरी वाले यांच्या विरोधात धडक कारवाई करूनअनेक धाडसी निर्णय घेऊन अमुलाग्र बदल घडवून आणले. त्यामुळे माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले साहेब आणि डीवायएसपी शशिकिरण काशिद साहेब हे दोन्ही कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी माणगांव तालुक्यातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरले असून माणगांव तालुक्यातील सर्व धर्मिय, सर्व समाज घटकातील जनता आणि त्यांच्या मध्ये एक अतूट विश्वासार्ह नाते निर्माण झाले आहे. 
     कोरोना तथा कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन काळात हे दोन्ही पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कधीही आणि कुठेही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. 
    पोलीस खात्याच्या प्रेरणादायी '' सदरक्षणाय खलनिग्रहणाय '' या ब्रीदवाक्या प्रमाणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या या दोन्ही पोलीस अधिकार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या दोन्ही पोलीस अधिकार्यांनी या काळात शासनाच्या नियमानुसार  कोरोंटाईन होऊन योग्य औषधोपचार घेऊन आपल्या प्रचंड व दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर तथा कोवीड १९ वर यशस्वीरीत्या मात करून पुनःश्च आपल्या कर्तव्यावर तथा ड्यूटी वर ते नव्या जोमाने रूजू झाले आहेत. आपले दोन्ही कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी कोरोनावर मात करून आल्यामुळे माणगांव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाच्या वेळी त्यांच्यावर माणगांव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी यांनी पुष्पवृष्टी करून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले साहेब आणि डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद साहेब दोघेही कोरोना मुक्त होऊन आपल्या कर्तव्यावर पुनःश्च रुजू झाल्याने माणगांव तालुक्यातील सर्व जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण तहसील कार्यालयात कोरोनाचा धुमधडाक्यात प्रवेश, काही दिवस कार्यालय बंद?

कल्याण तहसील कार्यालयात कोरोनाचा धुमधडाक्यात प्रवेश, काही दिवस कार्यालय बंद?


कल्याण (संजय कांबळे) :  कल्याण तालुक्याचे महसूल केंद्र म्हणून ओळखले जाणारे कल्याण तहसील कार्यालयात कोरोनाचा अगदी धूमधडाक्यात प्रवेश झाला असून तब्बल ८ कर्मचाऱ्यांना कोरोनोचा लागण झाल्याने हे कार्यालय पुढील काही दिवस बंद रहाणार की नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुरु ठेवणार हे उद्या म्हणजे सोमवारी कळणारे आहे.
कल्याण पंचायत समितीच्या बाजूला आणि कल्याण रेल्वे स्टेशन पासुन अगदी हाकेच्या अंतरावर कल्याण तहसीलदार कार्यालय आहे त्यामुळे येथे सदैव नागरिकांची गर्दी असते. परंतु कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील गर्दी काहीशी कमी झाली आहे. परंतू कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या ना त्या कारणाने लोकांशी सतत संपर्क येत असतोच.
कल्याण तहसील कार्यालय हे ब्रिटिश कालीन आहे. या कार्यालया अंतर्गत सहा मंडल अधिकारी येत असून यामध्ये अप्पर कल्याण, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा, नडगाव, आणि नव्यानेच अस्तित्वात येणारे म्हारळ यांचा समावेश आहे. तलाठी व मंडल आधिकारी असे ३५ कर्मचारी असून तहसील कार्यालयात ४० कर्मचारी आहेत. हे संजय गांधी, बिनशेती, अभिलेख, टपाल, निवासी नायब तहसीलदार, पुरवठा, सेतू आपत्ती निवारण कक्ष, आणि तहसीलदार आदी विभागात काम करतात. यातील तब्बल ८ कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली असून ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
तालुक्यातून महसूल जमा करण्याचे अंत्यत महत्त्वाचे काम हे कार्यालय करते. शिवाय जागा जमिनीच्या नोंदी, कुळकायदा केसेस, वारस नोंदी, आदी विविध प्रकारच्या प्रकरणात तालुका मॅजेस्टिक म्हणून तहसीलदार काम करतात. त्यामुळे वादी प्रतिवादी असे अनेक शेकडो लोक या कार्यालयात येत असतात. शिवाय आपत्ती व्यवस्थापन मध्ये हे कार्यालय खूपच महत्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे याचा सतत लोकांशी संपर्क येतो म्हणून कोरोनोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस कल्याण तहसीलदार कार्यालय बंद राहील असे कळते. परंतू सेतू सुविधा सुरुच राहिल असे सांगून तहसीलदार कार्यालय देखील लोकांची गैरसोय होत असेल तर बंद ठेवणार नाही असे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले. 

Friday, 21 August 2020

कल्याण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कोरोना काळातील कामांचा अभिमान वाटतो - महिला व बालकल्याण सभापती !!

कल्याण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कोरोना काळातील कामांचा अभिमान वाटतो - महिला व बालकल्याण सभापती !!


कल्याण (संजय कांबळे) : मी जा भागातून आले तो आदीवाशीचा डोंगराळ व द-या खो-याचा मागास भाग आहे. तेथील पालकांना रोजगाराची मोठी चिंता असते. त्यामुळे तिकडे कुपोषणाचे थोडेसे जास्त प्रमाण आहे. त्या मानाने कल्याण तालुक्यातील पालक जागृत व सक्षम आहेत. त्यामुळे कोरोनोच्या वाढत्या काळात देखील येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी खूपच चांगले काम केले आहे. याचा मला अभिमान वाटतो असे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे यांनी तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्रात आयोजित कोरोना कोव्हीड सुरक्षा साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचे वापट प्रसंगी गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर महिला व बालकल्याण समितीच्या व ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती जयश्री सासे, वृशाली शेवाळे, सभापती मॅडमचे पती भगवान तारमळे, कांबा गावचे ग्रामस्थ धिरडे महाराज पत्रकार संजय कांबळे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती उषा लांडगे, सुपरवायझर निलिमा घनगाव आणि जांभूळ बिटातील म्हारळ वरप कांबा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.


तत्पूर्वी महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला तारमळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर सदस्या जयश्री सासे, व वृशाली शेवाळे यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आपल्या भाषणात सभापती रत्नमाला तारमळे पुढे म्हणाल्या ", मी नुकताच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची सूत्रे हाती घेतली असून जिल्ह्य़ात सर्व बीटनां भेटी देऊन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोनोच्या संकट काळात अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांनी आत्मविश्वासाने काम केले. आपल्या परिसरातील स्वच्छता व रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे. कारण तूम्ही सतत लहान बालकाच्या संपर्कात येतात. त्यामुळे तुम्ही आईचे काम करता. कारण आई ही आई असते दुधावरची साय असते. त्यामुळे तूमचे काम मोठे आहे. मी ज्या भागाचे नेतृत्व करते तो मागासलेला परिसर आहे. तेथील लोकांना पोट कसेही भरायचे याची चिंता वाटत असते त्यामुळे बालकाकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि म्हणूनच तिथे सॅम व मॅम च्या बालकांचे प्रमाण जास्त आहे. पण तुमचे काम अभिमानास्पद आहे. असे सांगून तूमच्या अडी अडचणी, समस्या अथवा नाविन्यपूर्ण काही योजना राबविण्याची असल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असे त्या म्हणाल्या व कल्याण एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
तर जिल्हा परिषद सदस्य श्रीमती जयश्री सासे आपल्या भाषणात म्हणाल्या, तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे खरेच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मी जिल्हा परिषदेच्या बैठकीत सतत तत्पर असते. तर सदस्या श्रीमती वृशाली शेवाळे म्हणाल्या ', तुमच्या कामापासून आम्ही प्रेरणा घेतो. इतक्या अडचणी काळात देखील कोणत्याही प्रकारची तक्रार न करता तूम्ही काम करत आहेत. तूमचे आभार मानायला हवेत, तुम्ही काळजी घेऊन काम करावे असा सल्ला त्यांनी दिला.
तर याप्रसंगी पत्रकार संजय कांबळे म्हणाले, आज कल्याण तालुक्यातील कोरोनोच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज तालुक्यातील १९ गावात एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिंहाचा वाटा आहे. या घर सांभाळून कोरोचे काम करित असून याच ख-या कोरोना योध्दे आहेत. त्यामुळे शासनाने यांच्या कामांची दखल घ्यायला हवी. असे बोलून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नुकताच पदभार मिळालेल्या कल्याण एकात्मिक बालविकास अधिकारी उषा लांगडे यांनी सांगितले की कल्याण तालुक्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. त्यामुळे कल्याण तालुका ठाणे जिल्ह्यातील पहिला तालुका आहे. अशा योजना राबविणारा आहे असे सांगून तालुक्यात ८ बीट असून यातील जांभूळ बीटा अतर्गत येणाऱ्या म्हारळ वरप कांबा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सॅनिटायझर, हॅन्डवाॅश, मास्क आणि फेससीड चे प्रातिनिधिक स्वरूपात वापट करण्यात आले असून हा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी म्हारळ येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ललिता पाटील, अलका भोईर, दिपिका विंचू, योगिता जाधव, संगीता म्हात्रे, जयश्री देशमुख, जयश्री सुर्यराव, रोहिणी सुर्यराव, राखी बुरांडे, सुरेखा धनगर, सुजाता सुर्यराव आदी चा गौरव करण्यात आला. या छोटेखानी व सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपरवायझर निलिमा घनघाव यांनी केले. 
यावेळी म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या परिसरातून अंगणवाडी सेविका व कर्मचारी उपस्थित होत्या. 
 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने...