Sunday, 30 August 2020

शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन !!

शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन !!


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : केंद्रात असणाऱ्या बीजेपी सरकारने आल्यापासून घटनेतील एकेक कलम बाद करायला सुरुवात केली आहे. अलिकडे बीजेपी सरकारने शेतकऱ्यांना संपवणारे शेतकरी विरोधी तीन अध्यादेश पारित केले आहेत. हे अध्यादेश म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे अध्यादेश आहेत. म्हणून हे अध्यादेश बीजेपी सरकारने मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा. या हेतूने राष्ट्रीय किसान मोर्चाने १६ ऑगस्ट पासून ३१ राज्यात व ५५० जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय किसान मोर्चाने येत्या सोमवारी ३१ ऑगस्ट २०२० रोजी देशातील सर्व ३१ राज्यातील सर्व खासदार मतदार संघात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत खासदारांच्या पुतळ्याचे दहन करण्याचे ठरविले आहे. 
         या आंदोलनात सर्व शेतकरी हितार्थी संघटनांनी, शेतकरी बांधवांनी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामगारांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा द्यावा व आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे. 
        हे आंदोलन दोन भागात म्हणजे श्रीवर्धन मतदार संघाचे आंदोलन माणगाव या ठिकाणी व मावळ मतदार संघातील आंदोलन पनवेल या ठिकाणी होणार आहे. 
        तरी सर्वांना विनंती करण्यात येते की, श्रीवर्धन मतदार संघातील शेतकरी व शेतकरी संघटना पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी सर्वांनी सोमवार, दिनांक ३१/८/२०२० रोजी दुपारी ठिक २ वाजता माणगाव या ठिकाणी उपस्थित राहावे अशी संयोजकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...