Friday 30 September 2022

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते ऐके डिजिटल फोटो स्टुडिओचे म्हारळ येथे उद्घाटन !

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते ऐके डिजिटल फोटो स्टुडिओचे म्हारळ येथे उद्घाटन !


कल्याण, (प्रतिनिधी) : सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतः उद्योजक बना अशी सरकारचे आवाहन असते त्याला अनुसरून म्हारळ परिसरातील सुशिक्षित तरूणांने सुरू केलेल्या ऐके डिजिटल फोटो स्टुडिओ चे उद्घाटन उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते आज झाले,


यावेळी त्यांच्या समवेत कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे, म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गजानन कुटेमाटे, प्रिती अँकेडमी स्कूल व ज्युनिअर काँलेजचे प्राचार्य बंजरग शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.


सध्या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, अशातच राज्यातील अनेक मोठे उद्योग धंदे गुजरात राज्यात गेले आहेत,त्यामुळे यामध्ये भरच पडली आहे, त्यामुळे सरकारी नोकरीच्या मागे न  धावता स्वतः चा उद्योग सुरु करावा म्हणून म्हारळ परिसरातील अमोल खेडेकर या तरुणाने प्रिती अँकेडमी स्कूल व ज्युनिअर काँलेज समोर डिजिटल फोटो स्टुडिओ सुरू केला आहे, त्यांचे उद्घाटन आज फित कापून उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले.


या फोटो स्टुडिओमुळे म्हारळ गावातील हजारो नागरिकांची सोय होईल, असा विश्वास यावेळी आमदार महोदयांनी व्यक्त केला.

अमोल खेडेकर यांनी फोटो क्षेत्रातील मान्यवरांच्या कडे प्रशिक्षण घेतले असून, गेली अनेक वर्षे तो या क्षेत्रात कार्यरत आहे, त्यामुळे डिजिटल युगात हे फोटोग्राफी महत्त्वाची असल्याचे त्यांने सांगितले.

२०२६ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शहरे कचरामुक्त होणार !

२०२६ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शहरे कचरामुक्त होणार !

स्वच्छ महाराष्ट्र नागरी (२.०) चा 'मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे' आणि 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' यांच्या हस्ते शुभारंभ....


मुंबई, अखलाख देशमुख, दि ३० : सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्य सुनिश्चित करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाच्या १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रियेसह महाराष्ट्रातील सर्व शहरे स्वच्छ व कचरामुक्त करणे, हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी (२.०) सुरू होत असून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम आज सकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला.

स्वच्छता चळवळ निर्माण व्हायला हवी, सर्वांनी एकत्रितपणे स्वच्छतेची शपथ घ्यायला हवी. आपले शहर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे समजून प्रत्येकाने या चळवळीत सामील व्हायला हवे, स्वच्छतेच्या सर्व उपक्रमांसाठी शासन स्तरावरून आवश्यक सहकार्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी नगर विकास विभागाकडे मागणी केल्यास पूर्णत सहकार्य करण्यात येईल, असे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याशिवाय भुयारी गटारात काम करताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू होणार नाही, याची खबरदारी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. हे काम नवीन तंत्राचा वापर करून कसे करता येईल याकडे विशेष लक्श देण्याच्या सूचना मा.मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांनी नगर विकास विभागाला दिल्या. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०) ही आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी एक उत्तम संधी आहे, त्यामुळे या अभियानात सहभागी होऊया, असे आवाहन मा.मुख्यमंत्र्यांनी केले.

 स्वच्छ महाराष्ट्र नागरी २.० मध्ये महाराष्ट्रातील सर्व नागरी स्वराज्य संस्था घेण्यात आल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरी भाग या अभियानात समाविष्ट असल्याने संपूर्ण शहराचा कायापालट होणार आहे, हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.० मध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरे २०२६ पर्यंत कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत ४१२ स्थानिक स्वराज्य संस्थांना कचरामुक्त शहराचे तीन स्टार मानांकन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतर ओडिइफ प्लस प्लस म्हणजेच हगणदारी मुक्त शहरानंतर आवश्यक असणाऱ्या अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन होणार आहे. तसेच Water Plus cities यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रात शंभर टक्के पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी केंद्र शासनाकडून १२, ४०९ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

आरोग्य सेवा आयुक्तपदी 'मा. तुकाराम मुंढे' रुजू !

आरोग्य सेवा आयुक्तपदी 'मा. तुकाराम मुंढे' रुजू !


मुंबई, अखलाख देशमुख, दि ३० : मा. श्री. तुकाराम मुंढे भा.प्र.से. यांनी आज शुक्रवार दिनांक ३० सप्‍टेंबर २०२२ रोजी आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान या पदाचा पदभार मा. डॉ. एन. रामास्‍वामी भा.प्र.से. यांचेकडून स्विकारला.

त्‍यानंतर त्‍यांनी विविध आरोग्‍य कार्यक्रम व कार्यालयीन व्‍यवस्‍थेचादेखील आढावा घेतला. यावेळी आरोग्‍य आयुक्‍तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री मुंढे यांनी सहजसाध्‍य, लोककेंद्रित, पारदर्शी, गुणवत्‍तापूर्ण व परिणामकारक आरोग्‍य सेवा राज्‍यातील जनतेला उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटीबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना आरोग्‍य अधिका-यांना केल्‍या. आरोग्‍य आयुक्‍तालयापासुन ते ग्रामपातळीपर्यंत सार्वत्रिक, सहजसाध्‍य व माफक आरोग्‍य सेवा राज्‍यातील जनतेला पूरविण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍याच्‍या सर्व निर्देशांकांवर उत्‍कृष्‍ठ कामाची अपेक्षा व्‍यक्‍त करताना आरोग्‍याच्‍या सर्व भागधारकांना विश्‍वासात घेऊन काम करण्‍याच्‍या सुचना अधिका-यांना केल्‍या. सार्वजनिक आरोग्‍य सेवा ही अत्‍यावश्‍यक सेवा असुन शासकीय आरोग्‍य संस्‍था २४ तास कार्यरत राहतील व आरोग्‍य सेवांपासुन राज्‍यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले आहेत.

*बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटायला शिवसैनिक दसरा मेळाव्याला स्वंयस्फुर्तीने येणार -- विरोधी पक्षनेता अंबादास दानवे*

*बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटायला शिवसैनिक दसरा मेळाव्याला स्वंयस्फुर्तीने येणार -- विरोधी पक्षनेता अंबादास दानवे*


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. ३० : शिवसेनेच्या परंपरेनुसार शिवतीर्थावर ऐतिहासिक अतिविराट दसरा मेळावा होणार आहे या मेळाव्यात आपल्याला बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटायचे आहे, या मेळाव्यास पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब संबोधित करणार आहेत, प्रत्येक शिवसैनिकाला या मेळाव्याची आतुरता लागली आहे, शिवसैनिक स्वंयस्फुर्तीने दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येणार असे प्रतिपादन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी संभाजीनगर मध्य व पश्चिम शहराच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पूर्वतयारी बैठकीत केले.

देशभरात या मेळाव्याची चर्चा होत आहे, घराजवळ सभा असली तर ज्यांना २५ लोक जमा होत नाहीत ते मुंबईला २५ हजार लोक कसे आणतील हा मोठा प्रश्न असून या नुसत्या त्यांच्या वल्गणा, गप्पा आहेत.
एकही बस बूक नाही हे सारे जनतेच्या मनात धूळ फेक करत आहे, ह्या गोष्टीला जास्त गांभीर्य देण्याची गरज नाही. या मेळाव्यास जास्तीत जास्त मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही याप्रसंगी ना. दानवे यांनी केले.

दसरा मेळावा निमित्त आजच्या पूर्वतयारी बैठकीस पश्चिम विधानसभा मतदारसंघातली
उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विधानसभा संघटक सुशील खेडकर, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, सुनिता आऊलवार, सुनीता देव, कलाताई ओझा, अनिता मंत्री, उपशहरप्रमुख प्रमुख ठेंगडे ,किशोर कछवाह, हरिभाऊ हिवाळे, बापू पवार, वसंत शर्मा, अंबादास मस्के, संतोष मरमट, उपतालुकाप्रमुख गणेश नवले, विष्णू जाधव, कृष्णा राठोड ,सचिन गरड, उद्योजक कैलास भोकरे ,विनोद सोनवणे, सुरेश गायके, प्रकाश कमलानी, नंदू लबडे, माजी नगरसेवक गजानन बारवाल, सुभाष शेजवळ, सीमा चक्रनारायण, जना कांबळे, प्राध्यापक संतोष बोर्डे, राजीव वाकूडे, मोहन तिरचे, बंडू वाघचौरे ,राहुल यल्दी, देविदास पवार, संतोष बारसे, कैलास राठोड, नितीन पवार, रोहन आंचलिया, राजू परब, पवन जयस्वाल, सुनील शिंदे, अनिल लहाने, विलास पाटील, दीपक क्षीरसागर, बजाजनगर शहरप्रमुख सागर शिंदे, दत्तात्रय वर्पे, लखन सलामपुरे ,दीपक कानडे, अमोल पोटे, प्रवीण चंदन, विश्वास येवले, नामदेव सागडे ,त्र्यंबक जगताप, सतीश शिंदे, ज्ञानेश्वर गोल्हार, सतीश हिवाळे,गोरख सोनवणे, रवी ढगे, विक्रम खडके, संजीवन सरोदे, जगदीश वेताळ, विजय यादव, अनिल थोटे ,जयद्रथ लोखंडे, कैलास पाटील, अनिल कोंडापल्ले, क्रांती जयस्वाल, हर्षवर्धन त्रिभुवन, रवी गांगे, किसन कणसे, भार्गव गुरुजी, रामदास वाघमारे, मोहन मामा मस्के, सुखराज हिवराळे,कल्याण चक्रनारायण,सत्यवान रगडे, मनोज जोगदंड ,संतोष जाटवे, युवा सेनेचे आदित्य दहिवाल, सागर वाघचौरे ,यश पागोरे, नितीन ढोकरट, आकाश हिवाळे, ईश्वर पाटील, किरण गायकवाड, शुभम आडे, विक्की गिरे, नवनाथ काळे, महिला आघाडीच्या अरुणा भाटी ,रेणुका जोशी, जिजा घोडके, सारिका शर्मा, सुचिता आंबेकर आदी महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*त्याचप्रमाणे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत* उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात ,विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी ,महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप ,कलाताई ओझा ,सुनीता ताई देव, शोभा ताई बडे ,नलिनी महाजन, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, हिरा सलामपुरे ,संजय हरणे ,चंद्रकांत इंगळे, संदेश कवडे, माजी नगरसेवक सचिन खैरे ,रूपचंद वाघमारे, किशोर नागरे, राजू इंगळे, हेमंत दीक्षित, गौरव पुरंदरे ,विनायक देशमुख ,रणजीत दाभाडे, ज्ञानेश्वर शेळके ,सुरेश मामा पवार, सुरेश फसाटे, राजेंद्र साबळे, किरण गणोरे, वैजनाथ मस्के आधी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पोषण आहार अभियानाची सांगता....

महापौरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पोषण आहार अभियानाची सांगता.... 


जळगाव, दि. ३० : सही पोषण देश रोशन, प्रत्येक घर पोषण उत्सव हे अभियान ९ ते ३० सप्टेंबर पर्यंत मनपातर्फे शहरात राबविण्यात आले होते. आज राष्ट्रीय पोषण आहार अभियान उत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी मातांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बेबी केअर किटचे वाटप करून सेविकांना महापौर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका तथा जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनील महाजन , शहराचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे, महापालिका आयुक्त डाँ. सौ.विद्या गायकवाड, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, सहकारी, अंगणवाडी सेविका मदतनीस आदी उपस्थित होते.

*शिवसेनेला गाडी आणि माणसे भाड्याने आणण्याची गरज नाही.* -- *विरोधी पक्षनेता अंबादास दानवे*

*शिवसेनेला गाडी आणि माणसे भाड्याने आणण्याची गरज नाही.* -- *विरोधी पक्षनेता अंबादास दानवे*


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : शिवसेनेला गाडी आणि माणसे भाड्याने आणण्याची गरज नाही, सच्चा शिवसैनिकांना भाडोत्री माणसे जमवावी लागत नाही, असे उद्गार विरोधी पक्षनेता ना.अंबादास दानवे यांनी शिवसेना दसरा मेळावानिमित्त आयोजित पूर्वतयारी व नियोजन बैठकीत केले. औरंगाबाद पुर्व विभागाच्या शिवसैनिकांच्या बैठकीत बोलत होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी विरोधकांनी मेळाव्यासाठी १० हजार गाड्या बुक केल्यावरुन चांगलाच समाचार घेतला , या गाड्या महाराष्ट्रासाठी का देशासाठी बुक केल्या ज्यांना २५ लोक जमवता आले नाहीत, ते २५ हजार लोक कसे आणतील, या फक्त फुकटच्या घोषणा आहेत.
सर्व दिखावूपणा असून,खोकेवाल्यांनी काय दिवे लावलेले आहेत ते महाराष्ट्राला माहित आहे. एक नेता एक विचार हा गद्दाराचा विचार आहे.खोके आजूनही घरातच आहेत.

मुंबईत देवीला ४० महिषासूरांचा राजकीय दृष्ट्या नायनाट कर असे मागणे मागितले आहे.हे दिवे फडफड करायले लागले आहेत भविष्यात त्यांना बुजवायचे काम आपणाला करायचे आहे. एकही शिवसैनिक घरी राहता कामा नये, आम्ही गाडी, माणसे भाड्याने लावणार नाही आम्ही सक्षम शिवसैनिक आहोत, उपस्थित शिवसैनिकांनी १० सैनिक आणले तर खूप झाले, जिथे कमी तिथे आम्ही सक्षम शिवसैनिकांची फौज आमच्याकडे आहे. दसरा मेळावाची सभा ऐतिहासिक सभा होणार आहे. असा संकल्प व्यक्त करुन औरंगाबाद पूर्व मतदारसंघ भविष्यात जिंकायचा असा निर्धार यावेळी केला.
या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूर्वचे उपाध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी व कामगार नेते शरद कुलकर्णी यांचा ना. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचा सत्कार करुन स्वागत केले.

या बैठकीचे प्रास्तविक करताना विधानसभा संघटक राजू वैद्य म्हणाले औरंगाबाद पूर्व मतदार संघ कट्टर शिवसैनिकांचा असून या मतदारसंघातून हजारो कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्यासाठी येण्याचे आव्हान केले.

उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विधानसभा संघटक राजू वैद्य शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप, समन्वय कलाताई ओझा, उपशहरप्रमुख संतोष खेंडके, दिग्विजय शेरखाने, वामनराव शिंदे, आनिल जैस्वाल, शिवा लुंगारे, जयसिंग होलीये, मकरंद कुलकर्णी, रमेश दहीहंडे, सचिन वाघ, संतोष कांबळे, अल्प संख्याक संघटक अखिल शेख,विभाग प्रमुख बापु कवळे, अजय गटाने, राजु चव्हाण, सुनील धात्रक, रवी गायकवाड, सोपान बांगर, पुरुषोत्तम पानपट, लक्ष्मण पीवळ, धनराज गवळी, सोमनाथ नवपुते, उपविभाग प्रमुख दत्ता निंबाळकर, सूर्यकांत देवकर, शंकर भारती, गणेश वैष्णव, छगन साबळे, धनराज मांडवे, कमलेश तीळवे, योगेश नलावडे, दीपक पवार, खंडु आवटे, ईंद्रजीत जायभाय, भिकनराव शेंदुरकर, गणेश कुर्हे, शेषराव कोरडे, शरणाअप्पा केदारे, बद्रे आप्पा, लिंबेकर साहेब, संजय मनमाडकर, संदीप शिंदे, विनोद मिसाळ, जालिंदर क्षिरसाठ, गणेश कुलकर्णी, पंडित बोरसे, मा.नगरसेवक मीनाताई गायके, गजानन मनगटे, विरभद्र गादगे, सूर्यकांत जायभाय, विजय वाघमारे, मधुकर वाघमारे, मनीष दहीहंडे, कमलाकर जगताप, सुभाष परदेषी, मनोज गांगवे, शाखा प्रमुख कैलास तिवळकर, राम केकान, प्रशांत डिघुळे, भास्कर खेडकें, दीपक संभेराव, रामेश्वर साठे, मंगेश वादवानी, प्रशांत देशमुख, बद्रीनाथ ठोंबरे, सचिन गोखले, अरुण गव्हाड, चंद्रकांत देवराज, सोमनाथ धायगुडे, रवी तावडे, अनिल पवार, उपशाखाप्रमुख भरत ढवळे, ईश्वर शिंदे, गणेश जैस्वाल, धनराज बनस्वाल, अर्जुन सरोसे, उद्धव चौधरी, साईनाथ जाधव, लक्ष्मण बताडे, शंकर शिंदे, सिद्धार्थ वाडमारे, रामदास गायके, कमलेश वैष्णव, रमेश तायडे, सुभाष जोहरले, सुभाष माघोडे, रवींद्र पाठक, नवनाथ घोडके, अशोक पवार, गणेश सोनवणे, निलेश तरते, अंकुश देवरे, अभय शेजवळ, सोनू अहिले, रामदास गायके, दुर्गादास देशपांडे, शिवाजी चौरे, सचिन सुल्ताने, दत्ता शिंदे, नवनाथ बिडवे, मकरंद अंबेकर, उद्धव थोरे, सुभाष परदेशी, मंचक पाटील, सुरेश साखरे, संदीप अहिरे, रामेश्वर मानकापे, सुंदर सोनवणे, पवन काळे, बंडू कांबळे, नाना जगताप, कांता पाटील, विनोद मोटे, प्रणव प्रतापुरे, संतोष जाधव, निलेश तरते, संतोष जाधव, सीताराम काळदाते, सुनील शहाणे, अमोल टेकाळे, रमेश इंदूरकर, अमोल देशमुख, संजय कोरडे, शरद कुलकर्णी, अनिल सावणे, आबा तौर, मुरलीधर ससे, दुर्गादास देशपांडे, युवासेना रामेश्वर कोरडे, समाधान पाटील, बळीराम देशमाने, विकास लुते, सागर कत्री, प्रशांत कुर्हे महीला आघाडीच्या उपजिल्हा संघटक नलिनी ताई बाहेती, सुनंदा खरात, जयश्री लुंगारे, दुर्गा भाटी, विधानसभा संघटक, मीरा ताई देशपांडे, शहर संघटक विद्या ताई अग्नीहोत्री, भागूबाई शिरसाठ, उपशहर संघटक सीमा गवळी, आरती साळुंके, विभाग संघटक सुनीता पाटील, मीना थोरवे, बेबी ताई गावंडर शाखा संघटक अनिता खोंडकर, सुकन्या भोसले सुवर्णा सूर्यवंशी, मीना खोतकर आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थित एकात्मिक बाल विकास प्रकल्प कल्याण यांचा 'पोषण माह' कार्यक्रम संपन्न !

आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थित एकात्मिक बाल विकास प्रकल्प कल्याण यांचा 'पोषण माह' कार्यक्रम संपन्न !


कल्याण, (संजय कांबळे) : महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद ठाणे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'पोषण माह, या अतिशय देखण्या कार्यक्रमाचे आयोजन म्हारळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने प्रिती अँकेडमी स्कूल व ज्युनिअर काँलेज म्हारळ येथे आमदार कुमार आयलानी यांच्या प्रमुख उपस्थित व कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


यावेळी झेडपी सदस्यां जयश्री सासे, वृशाली शेवाळे, कल्याण पंचायत समितीच्या सदस्यां रंजना देशमुख, दर्शना जाधव, म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रगती कोंगिरे, उपसरपंच अश्विनी देशमुख, वेदिका गंभीरराव, बेबीताई सांगळे, प्रमिला इंगळे प्रकाश चौधरी, मधू राणे, कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भगत, सदस्य सोनाली उबाळे, वरप ग्रामपंचायत सदस्य दिपीका भोईर,कल्याण पंचायत समितीच्या बालविकास अधिकारी अर्चना पवार, पर्यवेक्षिका उषा लांडगे, जांभूळ बिटाच्या सुपरवायझर प्रज्ञा निपुर्ते, कार्यालयात क्लार्क, मुख्यसेविका आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ, वरप, कांबा या भागातील अंगणवाडी इमारतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, म्हारळ नदी किनारी स्मशानभूमी, तसेच घाट, कांबा येथील तलावाचे सुशोभीकरण, जँगिग ट्रक, गार्डन, आदी विविध विकास कामासाठीच लाखोंचा निधी दिला आहे. आपण मागणी करावी ती मंजूर करण्याची जबाबदारी मी घेतो, असे त्यांनी सांगितले.


तर झेडपी सदस्यां जयश्री सासे यांनी म्हारळ, वरप, कांबा या भागात अंगणवाडी इमारतीचा प्रश्न असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे कौतुक केलं, गरोदर माताची ते मोठ्या प्रमाणात काळजी घेतात असे सांगितले, तसेच म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी जाधव यांनी ही सेविका व मदतनीस यांच्या कामाचे कौतुक केले.याप्रसंगी झेडपी सदस्यां वृशाली शेवाळे, कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता अजय जाधव, सदस्यां रंजना देशमुख, दर्शना जाधव, सरपंच प्रगती कोंगिरे यांचीही भाषणे झाली.


यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी जांभूळ बिटातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनविलेल्या विविध रेसीपीची चव घेतली, तसेच त्यांनी बनविलेल्या फोटो प्रर्दशनाचे उद्घाटन ही केले, यावेळी अनेक बालकांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सामूहिक पसायदान घेऊन या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.


*दरोड्यातील कुविख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद*

*दरोड्यातील कुविख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद*


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : पोलीस ठाणे पाचोड हद्दीत दिनांक २२/०६/२०२२ रोजी दाभरुळ शिवारात रात्रीचे वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन गंभीर दरोडयाचे गुन्हे घडले होते,  त्यानुसार पोस्टे पाचोड येथे गुरंन २१०/२०२२ कलम ३९५ भादवी व गुरंन २११/२०२२ कलम ३९५ भादवी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, औरंगाबाद ग्रामीण, यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमंलदार यांना गुन्हयात सहभागी असेलेले आरोपी निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखने यापूर्वी सदर गुन्हे उघडकिस आणुन आरोपी नामे शाहरूख आब्रश्या पवार रा. टाकळी अंबड ता. पैठण व रोहीदास ऊर्फ रोहया रामभाऊ बर्डे रा. चौडांळा ता. पैठण यांना अटक केली होती व इतर आरोपीतांना निष्पन्न केले होते , त्यानुसार निष्पन्न *फरार आरोपी नामे नितीन ऊर्फ नित्या मिश्रीलाल चव्हाण रा. मालेगाव खुर्द ता. गेवराई जि . बिड* याचे मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागिल दोन महिन्यापासुन होते परंतु तो सतत त्याचे राहण्याची ठिकाणे बदलत होता , तो सध्या प्रॉपर बीड शहरात आलेला असल्याची गोपनिय बातमी मिळाली तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तो सध्या मा . जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या आवारात असल्या बाबत खात्री पटल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २९ / ०९ / २०२२ रोजी बीड शहरात गेले व तेथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखा बीडचे अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेऊन वरील आरोपीताचा जिल्हा व सञ न्यायालय परिसरात शोध घेत असता तो मा. न्यायालयाच्या गेटसमोर नगर रोडवर उभा असलेला दिसला त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्याच्या जवळ गेले असता सदर आरोपीसोबत असलेल्या त्याच्या महिला नातेवाईक यांनी स्थागुशाचे पथकासोबत हुज्जत घालुन, पोलीसांनी आरोपीस घेऊन जाऊ नये म्हणुन मज्जाव केला व सदर महिलांनी त्यांच्या अंगातील कपडे स्वतः फाडुन घेऊन, सार्वजनिक ठिकाणी नग्न होऊन आरडोओरड करुन अंगविक्षेप केला तसेच पोलीस पथकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. 

तरीही स्थागुशा औरंगाबाद ग्रामीणच्या पथकाने नितीन मिश्रीलाल चव्हाण, वय २५ वर्ष, रा. मालेगाव खुर्द ता. गेवराई जि.बीड यास ताब्यात घेतले आहे. सदर महिलांना स्थानिक महिला पोलीस अंमलदार व दंगाकाबु पथक बीडच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पो. ठाणे शिवाजी नगर बीड येथे आणले, पथकातील पोउपनि प्रदीप ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो. ठाणे शिवाजीनगर , बीड येथे शासकीय कामात अडथळा करणे, शासकीय नौकराने आपले कर्तव्य पार पाडू नये म्हणुन मज्जाव करणे बाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयातील आरोपी नामे नितीन मिश्रीलाल चव्हाण याचे विरुध्द दरोडा, जबरी चोरी अशा स्वरुपाचे खालील प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत .

१) पाचोड २१० / २०२२ कलम ३९५ भादंवि

२)पाचोड २११/२०२२ कलम ३९५ भादंवि 

३) पैठण २०४ /२०२२ कलम ३९४, ३४ भादंवि

सदर आरोपीस पो. ठाणे पाचोड येथे गुन्हयाचे पुढील तपासकामी जमा करण्यात आ औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील आणखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे सदर आरोपीकडुन उघड होण्याची शक्यता आहे .

सदरची कामगिरी मा. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, मा. पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक, * औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उप निरीक्षक प्रदीप ठुबे, पोना शेख नदीम, शेख अख्तर, वाल्मीक निकम, विजय धुमाळ, पो. अंमलदार रामेश्वर धापसे, राहुल गायकवाड यांनी केली आहे.

*जिल्हयात मुले पळविणारी टोळी सक्रिय ही फक्त अफवा … संशयीताची माहिती पोलीसांना द्या .. कायद्या हातात घेऊ नये .. पोलीस अधीक्षक, मनीष कलवानिया

*जिल्हयात मुले पळविणारी टोळी सक्रिय ही फक्त अफवा … संशयीताची माहिती पोलीसांना द्या .. कायद्या हातात घेऊ नये .. पोलीस अधीक्षक, मनीष कलवानिया 


औरंगाबाद दि ३० सप्टेबंर: औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात मुले पळविणारी टोळी आली आहे तसेच त्यांची वाहने फिरत आहेत अशी अफवांचे पेव मोठया प्रमाणावर सोशल मिडीयाचे माध्यमांतुन नागरिकांमध्ये पसरली आहे. 

वास्तवीक अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुध्दा औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात घडलेला नाही. अशा घटनाबाबत पोलीसांना मिळणा-या माहितीला जिल्हा पोलीस दल हे सक्रिय व तत्परतेने जलद प्रतिसाद देत आहे. परंतु पोलीसांचे चौकशी मध्ये या फक्त अफवा असल्याचे निष्पन्न होत आहे.
 अशा अफवा मध्ये नागरिक हे त्यांचे परिसरात आलेल्या अनोळखी महिला, पुरूष, फिरस्ती व्यक्त्ती, भिकारी, यांची कोणतीही खातरजमा नकरता केवळ त्यांचे वेशभुषा व हालचालीवरून त्यांना मुले पळविणारी टोळीतील सदस्य असल्याचा संशय धरून जमाव जमवुन मारहाण करतात किंवा बांधुन ठेवता तसेच संशयीत वाहनाची तोडफोड करण्याच्या घटना मोठया प्रमाणावर घडत आहेत.
  याबाबत काही घटना पुढील प्रमाणे आहेत.
1) दिनांक 28/9/22 रोजी जालना जिल्हयातील भोकरदन ते जालना रोडवर सखाराम जाधव यांचे दुचाकीला भरधाव वेगातील कारचालकाने धडक दिली व यामध्ये त्यांचा नातु दिपक झरे (वय 6 वर्ष) हा कारच्या बोनटवर आदळला. व कारचालकाने त्याला तसेच 8 किमी सिल्लोड च्या दिशेने नेले यादरम्यान मुलाच्या ओरडण्याने नागरिकांना कारमध्ये मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आल्याने त्यांनी कारचा पाठलाग करून कार अडवुन 800 ते 1000 लोकांचे जमावाने कारची तोडफोड करून त्यातील पवन संजय बनकर वय 35 रा. गोळेगाव ता. सिल्लोड व इतर एक याला बेदम मारहाण केली. परंतु घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज व त्यांचे पथकाने तात्काळ सिल्लोड शहर सिमेलगत मुठोळ फाटा ता. भोकरदर येथे जात उग्र जमावाचे तावडीतुन कार मधील जखमी पवन बनकर यांना शिताफिने जमावाचे तावडीतुन बाहेर काढुन त्यांचा जिव वाचवला आहे.

2) दिनांक 20/9/22 रोजी सिल्लोड ग्रामीण हद्यीतील पळशी या गावातील शाळकरी मुलाचे टोळीने अपहरण केल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली होती. यावेळी सुध्दा सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जलद प्रतिसाद देत संपुर्ण जिल्हयात नाकाबंदी करून संशयीत वाहनाची तपासणी वेगाने सुरू केली. तसेच शेजारील बुलठाणा, जालना, जळगाव, औरंगाबाद शहर, अहमदनगर जिल्हा सिमा सुध्दा सर्तक ठेवत नाकबंदी करून वाहनतपासणी वेगाने सुरू केली होती. तसेच एक पथक अपहरण मुलाची माहिती गोळा करीत असतांना त्यांना चौकशीत ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

3) दिनांक 21/9/22 रोजी पोलीस ठाणे वडोदबाजार हद्यीतील आळंद येथे पांढ-या रंगाचे सुमो वाहन आले असुन त्यामध्ये मुले पळविणारी टोळी असल्याची माहिती परिसरात पसरली व भितीची वातावरण निर्माण झाले परंतु तात्काळ वडोदबाजार पोलीसांनी आळंद येथे जात संशयीत वाहनाचा शोध घेतला व ती अफवा निघाली.

 *नागरिकांना आवाहन,* 
 औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील नागरिकांना आवाहन केले आहे कि, औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात कुठेही लहान मुले पळवुन नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय नाही. जिल्हयात अशा प्रकारे सोशल मिडीयाचे माध्यमातुन या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवुन नये किंवा भिती बाळगु नये. 

जिल्हा पोलीसांनी या अफवेची शहानिशा व सखोल चौकशी केली असता ही अफवा तत्यहीन व खोटी असल्याची खात्री झाली आहे. शाळा, महाविद्यालय, परिसरात पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सर्तक असुन अशा घटनांना जलद प्रतिसाद दिला जातो त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती बाळगु नये. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. 

घर गल्ली, किंवा परिसरात संशयास्पद अनोळखी व्यक्ती, वाहन, आढळल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. स्वत:हुन अशा संशयास्पद व्यक्तीस मारहाण अगर वाहनास तोडफोड, करु नये कायदा हातात घेऊ नये.

1) सोशल मिडीयावरिल कोणतीही माहिती नागरिकांनी स्वत: पडताळणी केल्या शिवाय पुढे फॉरवर्ड करू नये. 

2) तुमच्या कडे आलेले मेसेज हे फॉर्वर्डेड असल्याचं पाहु शकता

3) व्हिडीओ, ऍ़डिओ पाहुन त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका. जो पर्यंत त्याची पडताळणी होत नाही किंवा पोलीस तुम्हाला सांगत नाहीत तो पर्यंत नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल गोष्टीवर विश्वास ठेवु नये.

4) सोशल मिडीयावर मुलांच्या अपहरणा संदर्भात काहीही आलं आणि तुम्हाला संशयास्पद वाटल तर तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. पोलीसांना माहिती द्या.

5) शाळा, महाविद्यालय, गावात, किंवा गल्ली व परिसरात संशयास्पद व्यक्ती, वाहन फिरतांना आढळुन आल्यास तात्काळ 112 क्रमांकावर किंवा स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती द्यावी.

6) जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचे व्हिडीओ, संदेश, विनाकारण व्हायरल करून जाणीवपुर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळुन आल्यास त्याचे विरूध्द सक्त कायदेशिर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

 *नागरिकांना संशय असल्यास खालिल क्रमांकावर पोलीसांना तात्काळ माहिती द्यावी. नमुद क्रमांक हे 24 तास नागरिकांसाठी कार्यान्वित आहेत.* 
1) डायल 112 ( हेल्पलाईन )  
2) नियंत्रण कक्ष औरंगाबाद ग्रामीण - 0240 – 2381633, 2392151
3) व्हाट्सअँप क्रमांक - 9529613104

Thursday 29 September 2022

*अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत*

*अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत*
------
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय* मुंबई, अखलाख देशमुख, दि. २९, :- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 

*अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा*
आतापर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

*आतापर्यंत सुमारे ३९५४ कोटी रुपयांचा मदत निधी वितरित*
राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

*मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ*
● औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
● जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
● परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
● हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र
● बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
● लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र
● उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
● यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
● सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र

*एकूण क्षेत्र-* ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र
*एकूण निधी* – सुमारे ७५५ कोटी रुपये

औरंगाबाचा खासदार भाजपचा होणार तथा देशात 400 खासदार हे लक्ष - "संजय केनेकर" प्रदेश सरचिटणीस भाजप

औरंगाबाचा खासदार भाजपचा होणार तथा देशात 400 खासदार हे लक्ष - "संजय केनेकर" प्रदेश सरचिटणीस भाजप


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २९ :- देशभरामध्ये मा.नरेंद्र मोदींना पुन्हा भारताचा पंतप्रधान करण्या साठी 2024 च्या लोकसभा निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीने 400 पेक्षा अधिक खासदार हे निवडून आले पाहिजेत या साठी अभियान राबविण्यात येत आहे , त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांचा लोकसभा प्रवास हा भारतीय जनता पार्टीने लावला आहे ,ज्या मतदारसंघात भाजप कधीच लढली नाही अशा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने विशेष अशी रणनीती आखण्यात आली आहे ,त्या साठी भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये 144 पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघांमध्ये पूर्ण ताकतीनिशी उतरली असून त्या अभियानाचा भाग म्हणून केंद्रीय वने व पर्यावरण , रोजगार मंत्री भूपेंद्र सिंग यादव हे या अभियानांतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये , दिनांक तिस व एक (वार शुक्रवार व शनिवार ), या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेले आहेत , या अंतर्गत विविध समाज घटकांच्या भेटीगाठी घेणार आहेत तसेच संघ कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे , बुथ प्रमुख ,पन्ना प्रमुख व प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांच्या सोबत बैठक घेणार आहे.त्या नंतर भाजप कोर कमिटीची बैठक आय एम य हॉल येथे होणार आहे.
 
तसेच मोदी सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचतात का ? याचा देखील ते आढावा घेणार आहेत ,शासन दरबारी अनेक जनतेचे कामे अडकतात ,तसेच शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचतात का ? याचा देखील ते आढावा घेणार आहेत, या मध्ये 144 लोकसभा मतदारसंघ वर लक्ष्य केंद्रित करून देशांमध्ये 400 पेक्षा अधिक खासदार 2024 मध्ये निवडून आणण्या साठी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत . अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली आहे ,असे विविध प्रवास दौरे विविध मंत्र्यांचे सर्व लोकसभा क्षेत्रात लागणार आहेत , या मध्ये मा. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्या साठी एक एक खासदार अतिशय महत्त्वाचा आहे.त्या साठी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरली असून औरंगाबाद मध्ये भाजपचा खासदार निवडून आणण्या साठी पूर्ण शहर जिल्हा व भाजपचे सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत , केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव या विषयात देखील या बैठकीमध्ये या प्रवास दौऱ्यामध्ये चर्चा होणार आहे असे प्रदेश सरचिटणीस तथा शहरजिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी कळवले आहे.

*औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ ; निवडणूकीसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची नोंदणी*

*औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ ; निवडणूकीसाठी नोंदणी अधिकाऱ्यांची नोंदणी*


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. 29 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी नमूना-19 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व पदनिर्देशीत अधिकारी मिळून 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे दिली. 

विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस उपायुक्त (सा.प्र.) जगदीश मिनियार, उपायुक्त (पुनर्वसन) पांडुरंग कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त (मागासवर्गीय कक्ष) शिवाजी शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 

1 ऑक्टोंबर 2022 रोजी मतदार नोंदणीची जाहिर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नोंदणीला सुरूवात होणार आहे. 15ऑक्टोबर 2022 रोजी नोटिसीची प्रथम पूर्नप्रसिध्दी, 25 ऑक्टोंबर रोजी नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी केली जाणार आहे. 7 नोव्हेंबर नमूना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम दिनांक. 19 नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई, 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2022 दावे व हरकती स्वीकारले जाणार आहेत. 25 डिसेंबर, 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली. भारताचा नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती ज्याचा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासी आहेत आणि 1 नोव्हेंबर, 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षापैंकी एकूण तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करीत असल्यास मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र असेल असे सांगून निवडणूक अर्हता संदर्भात सविस्तरपणे माहिती श्री.केंद्रेकर यांनी यावेळी बैठकीत दिली.

*पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला विविध विभागांचा आढावा*

*पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला विविध विभागांचा आढावा* 


            औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि.29 : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी आज जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला. विभाग प्रमुखांकडून विकास कामांची माहिती घेत जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी विभाग प्रमुखांना यावेळी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी आज विविध यंत्रणांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी शितल महाले तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

            जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकास कामे, रस्त्यांची कामे, प्राथमिक शाळा इमारत बांधकाम, दलितवस्ती सुधार योजना, कोल्हापूर बंधाऱ्यासाठी तीन हजार गेटची आवश्यकता असून यासाठी पावणेचार कोटी रुपयांची आवश्यकता, स्मशान भुमीच्या शेडचे काम तसेच सौंदर्यीकरणासाठी निधीची उपलब्धता, तालुकास्तरावर दिव्यांग भवन उभारणे, 63 केव्ही ची क्षमता वाढ करुन ती 100 केव्ही करणे, आवश्यकतेनुसार रोहित्राची उपलब्धता करण्यासाठी निधीची उपलब्ध करुन देणे, विभागीय क्रिडा संकुलाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणे, घाटी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी करणे अशा अनेक विभागांच्या कामांची माहिती यावेळी विभाग प्रमुखांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांना या बैठकीत दिली.

*सरपंचांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गरज !* - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

*सरपंचांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गरज !* - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन 

 'स्वच्छता ही सेवा' अभियानअंतर्गत सरपंच संवादाचे आयोजन 


*मुंबई / जळगाव, अखलाख देशमुख, दि. २९ :- राज्यात 'स्वच्छता ही सेवा' अभियान राज्य व केंद्र सरकार द्वारे विविध उपक्रमाद्वारे राबवले जात आहे. सरपंचांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गरज असून सदर अभियान हे सर्व्हेक्षणापुरता भाग न राहता तो सवयीचा भाग होण्याची गरज आहे. गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असे प्रतिपादन सरपंच संवाद साधतांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

दि.१५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या अभियानात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "स्वच्छता के लिए एकजुट भारत' मोहिमेअंतर्गत सरपंच संवादाचे ऑनलाईन प्रणालीव्दारे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यातील प्रत्येक तालुका पंचायत समिती कार्यालयातून संबधित तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमांतर्गत गावागावामध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. गावातील कचराकुंडया व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा खोतांच्या ठिकाणी सुका व ओला कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत. कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या (SUP) दुष्परिणामांबद्दल सभेचे आयोजन करावे. पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करण्याचा उपक्रम यासारखे विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी प्रयत्न करून दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छतेची प्रतिज्ञा घ्यावी, दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत दिवस निमित्ताने ग्रामसभांचे आयोजन करुन हागणदारी मुक्त अधिक (ODF Plus) अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण झालेल्या गावांचे ODF Plus अंतर्गत ठराव घ्यावेत, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांनी दिल्या.
 
गतवर्षात केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या विविध अभियान अंतर्गत देशस्तरावरील १ आणि पश्चिम विभागीय राज्यामध्ये विविध ०६ पारितोषिके राज्याला प्राप्त झाली आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाला पश्चिम विभागीय राज्यामध्ये द्वितिय क्रमांक प्राप्त झाला आहे. ही सर्व पारितोषिके सरपंचांनी स्वच्छता मोहिमेला दिलेल्या नेतृत्वामुळे असल्याचे नमूद करून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

सद्यस्थितीत राज्यात ३,८८६ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) म्हणून गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव पारित करुन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली आहेत. यामध्ये २,९८० गावे थ्री स्टार (मॉडेल) या प्रवर्गामध्ये जाहीर केली आहेत. त्याबदल पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले. 

सरपंच संवादामध्ये औरंगाबाद, नांदगाव, रोहा, वाशीम, वाळवा, कोरेगाव, ब्रम्हपुरी या तालुक्यातील सरपंचांनी उपस्थित केलेल्या स्वच्छतेच्या व जल जीवन अभियानसंदर्भातील विविध मुद्यांवर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत राज्यात झालेल्या प्रगतीची माहिती सहसचिव तथा अभियान संचालक, अभय महाजन यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांनी केले.

दत्तनगर डोबिवली येथील अपात्र लाभार्थी पात्र घोषित ! 'इतर अपात्रा'ना सुध्दा पात्र घोषित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

दत्तनगर डोबिवली येथील अपात्र लाभार्थी पात्र घोषित !

'इतर अपात्रा'ना सुध्दा पात्र घोषित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी


कल्याण, बाळकृष्ण मोरे / खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी घोषित केल्याप्रमाणे बीएसयुपी प्रकल्पाची घरे लवकरच लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात येतील व डोंबिवली दत्तनगर येथील ९० अपात्र लाभार्थ्यांना पात्र घोषित करून सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच नियमानुसार कल्याण (प.) येथील शेकडोंच्या संख्येने पात्र, अपात्र, फेटाळलेले वंचित यांचे सुध्दा पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एलान बर्मावाला यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांना पत्र लिहून केली आहे.

या बाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने जसे दत्तनगर डोबिवली येथील अपात्र लाभार्थ्यांना पात्र घोषित करण्यात येत आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतू कल्याण (प.) येथील मागील १८ वर्षांपासून पात्र, अपात्र फेटाळलेले वंचित असे विस्थापितांना अडकवून घरांपासून वंचित ठेवलेल्या लाभार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दत्तनगरच्या ९० बरोबरच कल्याण (प.) मधील शेकडोच्या संख्येने पात्र, अपात्र यांना सुध्दा पात्र घोषित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे व अपात्र ठरवून फेटाळलेले अर्ज याचा देखील विचार करून बीएसयुपी योजनेत समाविष्ट करून त्यांचे पुर्नवसन करण्यात यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

बीएसयुपी योजना केंद्र सरकारने २००५ / २००६ मध्ये जवाहलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरोत्थानच्या अंतर्गत झोपडपट्टी वासियांसाठी तयार केली होती. बीएसयुपी ची घरे झोपडपट्टी वासियाच्या पुनर्वसनासाठी केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे संयुक्त उपक्रम असल्याने कडोंमपा क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टी धारकांना त्यामध्ये पुनर्वसनाचा अधिकार आहे. असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थेद्वारे मा. ठाणे जिल्हा पालकमंत्री, नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून व पत्र देवून अठरा वर्षापासून पुर्नवसनाची वाट पाहत असलेल्या लोकांच्या पुर्नवसन करण्याची विनंती केली आहे. परंतू त्यावर कडोमपाद्वारे कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

तरी आपण सर्वच कडोंमपा क्षेत्रातील नागरिकांना एकाच नजरेने पाहून सर्वच लोकांचे पुर्नवसन करण्यात पुढाकार घ्यावा व कल्याण डोंबिवली मधील नागरिकांमध्ये भेदभाव व पक्षपात होणार नाही, याची दक्षता घ्यावी व मागील वर्षानुवर्षे पात्र, अपात्र, फेटाळलेले, वंचित या मध्ये अडकून पडलेल्या कल्याण शहरांतील लोकांना आपण न्याय द्यावा व सर्वांचे पुर्नवसन लवकरात लवकर करावे, हीच आपणाकडून अपेक्षा असे या पत्रात असमर्थ सेवाभावी संस्थेचे एलाण बर्मावाला यांनी म्हटले आहे.

भगव्याशी प्रतारणा करून गद्दारी करू नका "शिवसेना नेते चंद्रकांत खैरे" यांचे आवाहन !!

भगव्याशी प्रतारणा करून गद्दारी करू नका
"शिवसेना नेते चंद्रकांत खैरे" यांचे आवाहन !!


औरंगाबाद (लातूर), अखलाख देशमुख, दि २९ : सध्या महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका. शिवसेना फोडणारे माझे शत्रू आहेत. मी कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपणही भगव्या झेंड्याशी प्रतारणा करत गद्दारी करू नका, असे आवाहन शिवसेना नेते तथा "मराठवाडा संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे" यांनी शिवसेना लातूर ग्रामीण जिल्हा आढावा बैठकीत येथील भागीरथी मंगल कार्यालय, उदगीर शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, ५ तारखेला दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, शिवतीर्थ येथे होणार आहे. आपण दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहून विचारांचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यात शिवतीर्थ येथे वाजत गाजत व शिस्तीत या. आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत आपली ताकत दाखवून जास्तीत जास्त सदस्य निवडून देण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हा संघटिका डॉ. शोभा बेंजरगे, सुनीता चाळक यांनी मनोगत व्यक्त केले. तर, प्रास्ताविक तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश मद्रेवार गणेश माने यांनी केले.
यावेळी नगरसेवक वीरभद्र गादगे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी लक्ष्मण पेटकर, शैलेश वडगावे, बाळासाहेब डोंगरे, अंगद पवार, सचिन दाणे, भारत सांगवीकर, अ‍ॅड. प्रवीण मगर, हरिभाऊ साबदे, गुणवंत पाटील, संगम टाले, कैलास पाटील, दिलीप पाटील, संतोष रोडगे, बालाजी ठाकुर, अरुण बिरादार, दत्ता गोरे, अनिल ढोबळे, अय्या, राजन हाके, अ‍ॅड. पांडुरंग बुंदराळे, तिरुपती पाटील, संतोष अदठराव, मुक्तेश्वर पाटील, लहू बारवाड, अनिकेत फुलारी, गजानन होनराव, बलभीम मधुरकर, शंकर धोंडापुरे, शहरप्रमुख दत्ता मोरे, मन्मथ बोधले, नगरसेवक संदीप चौधरी, संजय देशमुख, शिवलिंग धुळशेट्टे, अंकुश कोनाळे, कैलास पाटील, मुन्ना पांचाळ, व्यंकट साबणे, अरुणा लेंडाणे, उपतालुकाप्रमुख ऍड रामदास काकडे, मनोज पाटील, बाळू वडले, प्रदीप पाटील मोरतळवाडीकर, श्याम तवर, ततेराव जाधव, लखन घोणसे, विष्णु चिंतालवार, अविनाश राठोड,रमेश वाघमारे, शिवराम तेलगे, शेख नूरसाब, संजय तोंडचिरकर, दत्ता तोंडचिरकर, हणमंत इंगलवाड, माधव मोहटे बोरंगाव, नवनाथ गायकवाड, प्रदीप गायकवाड, श्रीरंग गायकवाड, बालाजी पुरी, प्रदीप पाटील लिंबगाव, दत्ता विठ्ठल मोरतळे, ऋषिकेश नामदेव मोरतळे, विशाल भरत मोरतळे, संगमेश्वर बिरादार,पवन मोरे, पवन घोडपडे, रणजित बिरादार, निखिल चिंचोले, अभिजित चव्हाण, चैतन्य शिंदे, गुणवंत बिरगे, रमाकांत मदने, माणिकप्रभु जलकोटे, वैजनाथ जळकोटे, सीताराम सोनकांबळे, ज्ञानेश्वर बिरादार, गुलाब बिरादार, ज्ञानेश्वर शिंगे, बाबू भारती सुकणी, जयपाल चव्हाण, संदीप हरडगे, अमोल म्हस्के, विशाल घाळे, सचिन बिरादार, संजय डोंगरगाव, थोरे दीपा, थोरे प्रीती, अनिता कांबळे, मांजरे कमलाबाई, उशाबाई दुवे, शिवनंदा कदम, प्रजा सूर्यवंशी, हिरा सुर्यवंशी, धोंडूबाई वाघमारे, भारतबाई पांढरे, शिवनंदा कांबळे, आशाबाई कांबळे, सखुबाई सुर्यवंशी, आशा जाधव, महादेवी जाधव, कोमल भोसले, लक्षमनबाई सुर्यवंशी, जयश्री रीमा, सुशीलबाई गायकवाड, अर्चना शिंदे, जयश्री थोरे, अर्चना उळे यांच्यासह अहमदपूर विधानसभा, उदगीर विधानसभा, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आजी, माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक विभागप्रमुख, बूथप्रमुख, शाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांचा शिवसेनेत प्रवेश......
अभंगे फाउंडेशन अध्यक्ष सुशांत जाधव शेल्हाळकर, तसेच मुस्लिम समाजातील २० युवकांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

*सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा कुऱ्हा (मुक्ताईनगर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन समस्यांबाबत केली विचारणा...*

*सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा कुऱ्हा (मुक्ताईनगर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन समस्यांबाबत केली विचारणा...*


जळगाव, (मुक्ताईनगर), अखलाख देशमुख दि २९ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा कुऱ्हा (मुक्ताईनगर) येथिल बँक कर्मचारी व व्यवहारांबाबत परिसरातील खातेधारक, व्यापारी, शेतकरी व विद्यार्थी यांच्या अनेक तक्रारी होत्या, त्याबाबत आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी कुऱ्हा शाखेला भेट देऊन समस्यांचा पाढा वाचून कर्मचाऱ्यांच्या वागणुकी बाबत विचारणा केली, तसेच विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे दूरध्वनीद्वारे तक्रार करून, तत्काळ समस्या सोडविणे बाबत सुचना केल्या.

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, माजी पं.स.सदस्य राजेंद्र सवळे, मुक्ताईनगर शहराध्यक्ष पंकज कोळी, भाजयूमो तालुका उपाध्यक्ष श्री.पवन पाटील, भाजयुमो तालुका सरचिटणीस मयूर महाजन, अ.जा. तालुकाध्यक्ष संतोष झनके ई. उपस्थित होते.

निर्यातक्षमता वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

निर्यातक्षमता वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी निमा अरोरा


अकोला दि २९ सप्टेबंर:- जिल्ह्यातील उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात अधिक सजग होऊन आपल्या उत्पादनांची निर्यातक्षमता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी शासनामार्फत विविध टप्प्यांवर मार्गदर्शन सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा लाभही उद्योजकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.

जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उद्योग संचालनालय,उद्योग विभाग, लघु उद्योग विकास बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने दी अकोला अर्बन बॅंक येथे ‘गुंतवणुक वृद्धी, निर्यात प्रचलन,एक जिल्हा एक उत्पादन’ याविषयावर उद्योजकांचे दोन दिवसीय (दि.२९ व ३०)प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. 

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या विभागीय व्यवस्थापक मंजुषा जोशी,जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक नयन सिन्हा, उद्योग लघुभारतीचे आशिष चंद्रा, अकोला इंड्स्ट्रीयल असो. चे उन्मेष मालू,व्यवसाय सुलभता ‘मैत्री सेवा’ चे राजकुमार कांबळे, सिड्बी नागपूरचे व्यवस्थापक आशिष मुनगट तसेच जिल्ह्यातील उद्योजक, सनदी लेखापाल, बॅंकर्स आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, ‘एक जिल्हा एक उत्पादन’, या विषयावर लक्ष केंद्रीत करतांना आपल्या जिल्ह्यातील कृषी आधारीत उद्योगावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. शासनातर्फे उद्योगांच्या उत्पादनांच्या निर्यातवृद्धीसाठी व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. या संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा. आपल्या उद्योगातील संभाव्य अडचणींचा योग्य आढावा घेऊन त्यावर मात करुन पुढे वाटचाल करावी. व्यवसाय करतांना प्रत्यक्ष अनुभव घेणे हे अधिक महत्त्वाचे असते. आपल्या जिल्ह्यातील नवकल्पनांना वाव द्यावा. निर्यात क्षेत्रातील विविध बाबींचे, कायद्याच्या ज्ञानाचे आदान प्रदान करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित उद्योजकांना केले.

सुरुवातीला उद्योग प्रदर्शन दालनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक निलेश निकम यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. अकोला जिल्ह्यातूनही निर्यातीस मोठा वाव असल्याचे स्पष्ट करुन अकोला जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन जया भारती यांनी केले.

"घोणस अळी ओळख व व्यवस्थापन"

"घोणस अळी ओळख व व्यवस्थापन"


औरंगाबाद, अखलाख देशमुख दि. २९ : काही दिवसापासून ऊसावर अळी आढळून आली आहे. जिची ओळख बोली भाषेमध्ये स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. या अळीचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले, त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती दिसुन येते तसेच त्याबद्दल बरचसे गैरसमज निर्माण झाले आहेत.

अळीची ओळख :-

या अळीला स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक अळी असेही म्हणतात. ही एक पंतगवर्गिय कीड असून ती लीमाकोडिडे (स्लग कैटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पंतग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकत नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षाकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. अशा काट्याच्या खाली विष ग्रंथी असतात. ही एक स्वः संरक्षणाची रणनीती आहे. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या कीडीला अकाली आपला स्पर्श झाल्यास काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात.

आढळ :- ही कीड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये ही आढळून येते.

खाद्य वनस्पती :-  ही बहुभक्षी प्रकारातील कीड आहे. विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते.

पिकांसाठी किती धोकादायक :-

ही अळी पिकाचे फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव पिकाच्या काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात आणि मोठे नुकसान होते.

अळीच्या काट्यांचा दंश झाल्यास काय होऊ शकते :-

या गटातील अळ्या त्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात.  त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे हा आहे. अळी लोकांच्या मागे जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्याठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. अशा काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात, दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो. विष हे सौम्य स्वरूपाचे असते परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा लक्षणे ही तात्पुरत्या स्वरुपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात. परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरीता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. काही लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या अॅलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, अॅलर्जी या सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगून अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ताबडतोब करावयाचे उपाय अथवा उपचार :-

काही तज्ञ सूचित करतात की चिकट टेप प्रभावित भागात हलक्या हाताने लावून काढावा त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.
 
अळीचे नियंत्रण:-

कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टिन बेंझोएट, फ्लूबेंडामाईड सारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांद्वारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते. तरी सर्वांनी कोणत्याही "केसाळ" किंवा "काटेरी" अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळीमुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत. 
       
माहिती स्त्रोत :- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, अकोला

Wednesday 28 September 2022

अखिल भारतीय ग्राम पंचायत कर्मचारी फेडरेशन ची गोव्यात स्थापना..!

अखिल भारतीय ग्राम पंचायत कर्मचारी फेडरेशन ची गोव्यात स्थापना..!
 

मडगाव गोवा.. येथे दिनांक 24, 25 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय स्तरावर ग्रामपंचायत मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे हक्कासाठी लढाई व्यापक व्हावी म्हणून अखिल भारतीय ग्रामपंचायत कर्मचारी फेडरेशन (आल इंडिया विलेज पंचायत वर्कर्स फेडरेशन) ची स्थापना राष्ट्रीय अधिवेशन घेऊन करण्यात आली.. फेडरेशनचे नियमावली तयार करण्यात येऊन तिच्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आली.


या अधिवेशनासाठी दहा राज्यातून प्रतिनिधी आले होते, त्यात गोवा  महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळा, कर्नाटक, बिहार, गुजरात, मेघालय, मणिपूर या दहा राज्यातील 150 प्रतिनिधींचा समावेश होता अधिवेशाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले, त्यांनी आपल्या भाषणात थांबण्याचे स्वागत केले व ग्रामपंचायत सभेत ते म्हणाले की पंचायत राज्य व्यवस्थेत ग्रामपंचायत कर्मचारी हा महत्त्वाचा दुवा असून या त्यांची तंत्र माहिती शासनाला काम येते, त्यांनी कर्तव्य पार पाडली तर हक्क नाकारले जाणार नाहीत असा उपदेश केला अधिष्ठान अध्यक्ष स्थानी काँग्रेस नामदेव चव्हाण, बिंदेश्वर सिंग  कॉम्रेड मिस रिडा फी हे होते मुख्यमंत्री म्हणाले की, सरपंचांपेक्षाही कर्मचाऱ्यांना जास्त माहिती असते तलाठी, ग्रामसेवक होते पण कर्मचारी त्या ठिकाणी नोकरी करतो, घरकुल दिव्यांग योजना, पाणीपुरवठा, शौचालय, आर्थिक विकासाचे योजना, शासकीय योजना राबवण्यात कर्मचाऱ्यांच्या मोलाचा वाटा आहे. असे सांगून ते म्हणाले गोवा राज्यात लागू केले आहे सातवा पे कमिशन लागू करू असे आश्वासन त्यांनी दिले या अधिष्ठाला पंचायत राज्यमंत्री श्री मोविण गोदीनहो देखील सहभागी होते.. उपस्थिती होती, अधिवेशनाला मुख्य मार्गदर्शन आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले हे होते या अधिवेशनाचा मुख्य प्रस्ताव गोव्यातील आयटक नेते काम्रेड क्रिस्तोफर फ्रान्सिस्को यांनी मांडला, त्यावर दहा राज्यातील प्रतिनिधींनी चर्चा केली त्यांच्या त्यांच्या राज्यातील माहिती सांगितली, दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात नंतर अखिल भारतीय पातळीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी एक कमिटी निवडण्यात आली तीत महाराष्ट्राचे प्रतिनिधी असे.

संस्थापक पदाधिकारी ...  

काॅ.क्रिस्टोफर फ्रांसिस्कॉ (गोवा) अध्यक्ष, काॅ.नामदेव चव्हाण (महाराष्ट्र) महासचिव,  ॲड.राहुल जाधव (महाराष्ट्र) कोषाध्यक्ष, काॅ. मिलिंद गनविर (महाराष्ट्र) पश्चिम क्षेत्रीय सचिव, काॅ.सखाराम दुर्गुड़े (महाराष्ट्र) ऊपाध्यक्ष, काॅ. श्याम चिंचने (महाराष्ट्र) (सहसचिव), कार्यकारिणी सदस्य काॅ.मंगेश म्हात्रे, काॅ.ए.बी.कुलकर्णी...

अशांचा समावेश आहे .. या राष्ट्रीय अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र आय टक सचिव शाम काळे, प्रा तानाजी ठोंबरे, शिवकुमार गणवीर, का अमृत महाजन, का उज्वल गांगुर्डे, वसंत वाघ,.रमेश विसावे, गोविंद म्हात्रे या २० राज्य पदाधिकारी प्रतिनिधींचा सहभाग होता आदिवासी नाचे अधिवेशनाचे आयोजन गोव्याचे नेते काँ प्रसन्न उटगी, राजू मंगेशकर, संतोष  नाईक यांनी अत्यंत नियोजनबद्ध केले..... 

*अमृत महाजन राज्य सचिव ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ* +91 98605 20560

"शिंदे गटाचा दसरा मेळावा" कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न !

"शिंदे गटाचा दसरा मेळावा" कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न !


औरंगाबाद,(सिल्लोड), अखलाख देशमुख, दि २८ : ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले असून जनसामान्यांत प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. त्यामुळे बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याची सभा ना भूतो ना भविष्य अशी ऐतिहासिक सभा होईल असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

*पूर्वतयारी बैठकीला शिवसैनिकांची प्रचंड उपस्थिती*

आज बुधवार रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दसरा मेळावा संदर्भात पूर्वतयारी बाबत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. शहरातील शिवसेना भवन परिसरात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला जवळपास ३ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला मंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन केले. मुंबई ला जाण्यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी जेवण, चहा, पाणी, नास्ता यासह रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक यासारख्या आवश्यक सोयी सुविधा प्रवास दरम्यान शिवसैनिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.

*मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन*

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २० तास लोकांची कामे करतात त्यामुळे विरोधकांची झोप उडाली असल्याची मिश्किल टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम राज्यात होत असल्याने एकनाथ म्हणजे लोकनाथ अशी भावना जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.
बैठकीस शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग व्यापक लोकहितासाठी करावा - ॲड.राम शेलकर

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग व्यापक लोकहितासाठी करावा - ॲड.राम शेलकर


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. 28 : माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत नागरिकांना माहिती उपलब्ध करून देतांना व्यापक जनहिताचा विचार करावा असे जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ॲड. राम शेलकर यांनी सांगितले.  

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाचे प्रभोदय मुळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखेचे जन माहिती अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत नागरिकांनी मागणी केलेल्या माहितीच्या अर्जावर वेळेत माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती कोणती आणि किती उपलब्ध करून द्यावी याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नागरिक या संज्ञेत संघटना, संस्था, पक्ष याचा समावेश होत नाही. यामुळे जनमाहिती अधिकारी यांनी याबाबत कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अधिनियमाची अंमलबजावणी करावी. व्यापक उद्दिष्ट, जनहित नसणाऱ्या माहिती अधिकार अर्जाबाबत माहिती नाकारण्याचा अधिकार आहे. प्रशासन पारदर्शक आणि गतीमानते बरोबरच लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न देशामध्ये माहिती अधिकार अधिनिमयाच्या अंमलबजावणीने साध्य करण्यात आला आहे. असे ॲङ शेलकर यांनी सांगितले.

आर एस पी व नागरी संरक्षण दलाची सत्र प्रवेश सभा कल्याण येथे यशस्वीरित्या संपन्न !!

आर एस पी व नागरी संरक्षण दलाची सत्र प्रवेश सभा कल्याण येथे यशस्वीरित्या संपन्न !!

*कल्याण आर एस पी पथकाचा कामगिरीमुळे महाराष्ट्रातील लोकांना आर एस पी चे महत्व कळाले::: वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील.*. 

*कल्याण मध्ये आर एस पी युनिट चे खरे कर्तव्य समजले:: एसीपी वाहतूक धर्माधिकारी यांचे प्रतिपादन.* 

*रस्ता सुरक्षा हा विषयाचे महत्व वाढवण्यासाठी गृहखाते पोलीस विभाग व शिक्षण शिक्षण विभागाचे सहकार्य महत्त्वाचे आहे:: हिराजी पाटील यांचे मनोगत* 


कल्याण, ( मनिलाल शिंपी ) : महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर (RSP & CD) अंतर्गत ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मती ललिता दहीतुले यांच्या आदेशानुसार, आर एस पी चे राज्यसचिव हिराजी पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली, कल्याण वाहतूक उपायुक्त धर्माधिकारी साहेब, अंबरनाथ वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील साहेब, आरटीओ चे मोटार वाहन निरीक्षक धात्रक साहेब, उपाध्यक्ष संजय भैलुमे, कोकण विभागीय समन्वय समिती सदस्य एडवोकेट के डी पाटील, पुणे विभागीय समादेशक श्रीमती प्रतिमा हरिभक्ते, समन्वय समिती प्रमुख अनिल कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत, कल्याण पश्चिम नूतन माध्यमिक विद्यालय येथे प्रवेश सत्र सभेच्या आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी नूतन विद्यालयाचां आर एस पी बालसैनिकांनी मान्यवरांना मानवंदना दिली. दीप प्रज्वलानंतर एस पी बालसैनिक विद्यार्थिनींनी स्वागत गीत यशवंत सादर केले. शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तरटे साहेब यांनी प्रशासन अधिकारी व्ही. व्ही सरकटे यांचे शाल बुके देऊन स्वागत केले. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे ठाणे जिल्हा समादेशक मणिलाल शिंपी यांच्यासह अधिकाऱ्यांनी येथोचित सन्मान केला. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की कल्याण मध्ये आल्यानंतर कल्याणची ट्रॅफिक समस्या खूप गंभीर होती अशावेळी शिंपी सरांनी संपूर्ण आर एस पी युनिट सह आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच कोरोना सारख्या काळात हे कल्याण मधील आर एस पी शिक्षक स्वतःच्या जीवाची परवा न करता ..कल्लू गल्ली पाडी जाऊन लोकांना वीस संस्थान कडून मदत उपलब्ध करून देत होते. 


आम्हाला महाराष्ट्रातून आमच्या पोलीस विभागाचे फोन येत होते की कल्याण मध्ये आरएसपी पथकाची कामगिरी पाहून आमच्याकडे असे आरएसपी शिक्षक पथक व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. खरोखर कल्याणचा आर एस पी युनिट मुळे महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला आणि लोकांना आर एस पी चे महत्व कळाले. खरोखर आर एस पी विषय हा गरजेचे आहे आणि आरएसपी अधिकारी पथकाचे कार्य हे कौतुकास्पद आहे ते सांगितले. एसीपी धर्माधिकारी साहेब यांनीही मार्गदर्शनपर बोलताना सांगितले की कल्याण मध्ये आल्यावर 31 डिसेंबर हा दिवस सगळे एन्जॉय करतात अशा प्रसंगी कल्याण चे आर एस पी अधिकारी पथक मी बंदोबस्त करताना पाहिले ही माहीत नव्हते की एवढे अधिकारी कसे या ठिकाणी आहेत तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की ए आर एस पी अधिकारी शिक्षक आहेत. खरोखर अगदी मन लावून कल्याण आर एस पी शिक्षक कर्तव्य बजावीत आहेत त्यामुळे आम्हाला आरएसपीच्या सार्थ अभिमान आहे अशा शब्दात कौतुक केले व आर एस पी विषयासंदर्भात शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी काही गरज भासली तर आम्ही नेहमी मदतीसाठी तयार आहोत असे आश्वासन दिले. परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक सातक साहेब यांनी रस्ता सुरक्षा विषयाचे धडे, वाहतुकीचे नियम हे शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनसामान्यापर्यंत पोहोचतील आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल म्हणून आर एस पी हा विषय प्रत्यक्ष आहे तुम्ही राबविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असे सांगितले. कोकण विभागीय समिती सदस्य एडवोकेट के डी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आर एस पी हा विषय पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून आपल्या आर एस पी शिक्षक अधिकाऱ्यांमुळे पोलीस प्रशासनाला विशेष सहकार्य होते आणि आपत्कालीन परिस्थितीत आपण पोलीस विभागाला आणि प्रशासनाला मदतीसाठी सहकार्य करणे आवश्यक आहे पोलीस विभागाकडून व शिक्षण विभागाकडून आरएसपी साठी नेहमीच भरीव मदत आपल्याला होत असते. कल्याण आर एस पी पथकाने फक्त कल्याणपुरतं मर्यादित न ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आर एस पी ची नवीन अशी ओळख निर्माण करून दिली आहे आर एस पी चे महत्व प्रशासन आणि पोलीस विभागाला देखील कल्याण आर एस पी पथकामुळेच मोठ्या प्रमाणात जाणीव झाली आहे. आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली मधील आर एस पी अधिकारी त्यांनी कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीपासूनच पोलीस विभाग आणि प्रशासनास मोलाचे सहकार्य केले आहे. कल्याण डोंबिवली आर एस पी च्या कर्तव्याची व कामगिरीची दखल शासकीय पातळीवर देखील घेण्यात आली असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यापुढे ठाणे जिल्ह्यात जास्तीत जास्त आर एस पी पथक नोंदणी करून शाळा रजिस्टर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. समन्वय समिती सदस्य प्रतिमा हरिभक्त मॅडम यांनी आर एस पी ची कार्यप्रणाली आर एस पी ची रचना व आर एस पी विषयाचे ध्येय धोरणे याविषयी मार्गदर्शन केले. समन्वय समिती प्रमुख अनिल कुंभार यांनी आरएसपी चे महत्व आणि आरएसपी चे कार्य याविषयी नवीन संकल्पना अमलातील असे सांगितले. कोकण विभागीय राज्य सचिव हिराजी पाटील यांनी सांगितले की आर एस पी विषय आणि आर एस पी अधिकारी यांनी आपल्या शाळेपासून आर एस पी चे कर्तव्य सुरू करावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा पथकाची नोंदणी करून आर एस पी चे महत्व व वाहतूक नियमांचे पालन याविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासन व शिक्षण विभाग याची मदत घेणे आवश्यक आहे. वाहतूक विभाग परिवहन विभाग यांच्या सहकार्याने आर एस पी चे विविध उपक्रम आपण राबवले पाहिजेत व आपत्कालीन परिस्थितीत पोलीस विभागाला त्यांच्या आदेशानुसार मदत करणे आवश्यक आहे. तसेच आरएसपी अधिकारी यांनी कर्तव्य करताना आपल्याला कोणी चुकीचे ठरवणार नाही याची काळजी घ्यावी व आपल्याकडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही याबाबत तत्परता बाळगावी असे सांगितले. सदर सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी नूतन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले, संस्थेचे पदाधिकारी यांनी आर एस पी चा कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल शिंपी सरांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी शारदा मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील, सम्राटअशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, विद्या सेवक पतपेढीचे उपाध्यक्ष मुख्याध्यापक प्रशांत भामरे, भाजपा शिक्षका आघाडीचे बोरनारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पी अधिकारी अनंत किनगे यांनी केले. महाराष्ट्र राज्य आर एस पी चे उपाध्यक्ष संजय भैलुमे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कार्यक्रमाची रूपरेषा पाहून कल्याण डोंबिवली ठाणे आर एस पी अधिकारी युनिटचे कौतुक आणि अभिनंदन केले. यावेळी गेल्या २१ वर्षापासून आर एस पी चे तन-मन-धनाने अगदी मनापासून कर्तव्य करणारे ठाणे जिल्ह्याचे समादेशक दिलीप स्वामी यांच्या समन्वय समितीतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

खानवलीची आदर्श कार्यकारी सोसायटी सभा उत्साहात संपन्न !!

खानवलीची आदर्श कार्यकारी सोसायटी सभा उत्साहात संपन्न !!


लांजा, दिपक मांडवकर/ विनायक खानविलकर :

लांजा तालुक्यातील खानवली गावातील आदर्श विविध कार्यकारी सोसायटी खानवलीची वार्षिक सभा सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि पंशक्रोशी बौद्धजन विकास मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र गंगाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करत पार पडली. यावेळी सभेपुढे मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इत्तिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले . यावेळी सभासदांच्या उपस्थितीमध्ये पुढील वर्षासाठी कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली. 


यावेळी सन २०२१-२२ सालच्या हिशोब तपासणी अहवालाचे वाचन करत संस्थेचे सचिव संतोष धामणे यांनी वाचन करत आगामी येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेची सभासद संख्या वाढवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक कशी सेवा देता येईल यावर मार्गदर्शन केले . यावेळी या सभेसाठी संस्थेचे माजी चेअरमन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर दादा भिडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन नरेंद्र पवार म्हणाले कि संस्थेच्या कर्जधारांकडे असणारे थकीत कर्ज जास्तीतजास्त वसूल करून आणि जास्तीतजास्त कर्ज वितरण करून संस्थेचे कामकाज अधिक गतिमान कस करता येईल याकडे मी आणि माझे संचालक मंडळ अधिकाधिक लक्ष देणार आहोत. यावेळी सभेसाठी जमलेले ग्रामस्थ यांनी सभेचे अध्यक्ष आणि सोसायटीचे विद्यमान चेअरमन नरेंद्र पवार यांच्या कामावर समाधान व्यक्त करत त्यांचं कौतुक केलं. या सभेसाठी सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश दळवी, मनोहर भिडे, निलेश खानविलकर , वाघोजी खानविलकर , प्रल्हाद कालकर, रवींद्र कानडे, प्रदीप गार्डी, यशवंत मांडवकर, अनंत खरात, दिलीप लाखण, शीतल भिडे,  संगीता कालकर, सचिव संतोष धामणे उपस्थित होते. यावेळी लावगण येथील श्रीराम मित्रमंडळाचे ज्येष्ठ सहकारी जितेंद्र खानविलकर यांनी सोसायटी संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करत सोसायटीची जनरल सभा अध्यक्षांच्या परवानगीने पूर्ण करण्यात आली.

*नालासोपारा मधिल एकमेव समेळगाव येथिल स्मशानभूमीची दुर्दशा ; प्रेत जळण्यास २४ तासाच्या वर लागतात तसेच प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती ...*

धक्कादायक बाब....
*नालासोपारा मधिल एकमेव समेळगाव येथिल स्मशानभूमीची दुर्दशा ; प्रेत जळण्यास २४ तासाच्या वर लागतात तसेच प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती ...*
 *रूचिता अमित नाईक*
*अध्यक्षा समेळगाव कॉंग्रेस* 


वसई, प्रतिनिधी : नालासोपारा (प) मधिल एकमेव समेळगाव येथे स्मशानभूमी आहे नालासोपारा (प) हा परिसर दाट लोकवस्तीचा परिसर आहे जास्त लोकसंख्या असल्याने मृत्युदर हि त्याप्रमाणात आहे.
सर्वात आधी मी कॉंग्रेस पक्षाच्या वतिने विद्युत शवदाहीनी बसवण्याची व सुरू करण्याची मागणी केली होती. विद्युत शवदाहिनी बसवली पण अद्याप पर्यंत महापालिकेला विद्युत शवदाहिनी सुरू करण्यास मुहूर्त मिळत नाही.


स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडे ठेवण्याची कोणती हि सोय नसल्याने पावसामुळे लाकडे भिजल्याने अंत्यसंस्कारावेळी प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाकडे भिजलेली असल्याने अंत्यसंस्कारावेळी अडचण निर्माण होत आहे. लाकडे ओली असल्याने ते पेटत हि नाही त्यामुळे किमान 8 ते10 टायर आणि डिझेलचा भरपुर वापर करून हि प्रेत जळण्यास 24 तास लागतात काहि प्रेत अर्धवट जळत असल्याने यामुळे प्रेताची विटंबना होत असल्याचा रूचिता नाईक यांनी चिंता व्यक्त केली.


या साऱ्या प्रकारामुळे नागरीक आणि मृतांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते आणि बराच वेळ वाया जात आसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. स्मशानभूमीत सुपरवायझर एकच असल्याने त्यांची वेळ सकाळी ७ ते ३ आहे ३ नंतर व रात्रीच्या वेळेस सुपरवायझर नसल्याने येथिल कर्मचारी यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार येथिल कर्मचारीनी केली.


स्मशानभूमीची दुरूस्ती तसेच सोयीसुविधा व विद्युत शवदाहिनी सुरू करण्याबाबत आणि प्रभाग समिती ई चे सहाय्यक आयुक्त वनमाळी व प्रभाग समिती बांधकाम विभागाचे अधिकारी संख्ये तसेच स्मशानभूमीची देखभाल करणारे थोरात यांची त्वरीत हकालपट्टी करून सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी कॉंग्रेस समेळगाव अध्यक्षा रूचिता नाईक या मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे.

जळगाव जिल्हा शैक्षणीक संस्था चालक संघटनेची सर्वसाधारण सभा मुक्ताईनगर येथे संपन्न !!

जळगाव जिल्हा शैक्षणीक संस्था चालक संघटनेची सर्वसाधारण सभा मुक्ताईनगर येथे संपन्न !! 


जळगाव दि २८ सप्टेबंर: जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेची वार्षिक सर्व साधारण सभा मुक्ताईनगर येथे पार पडली, यावेळी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. शिरीष दादा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती तर संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी संघटनेच्या कार्याध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक विजय पवार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव एस.डी.भिरुड, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, बंडू दादा काळे, एस ए भोई सर, रविंद्र निकम, उपाध्यक्ष जिवन खिंवसरा,उपाध्यक्ष व्हि टी जोशी,सरचिटणीस संजय सोमाणी, उप कार्याध्यक्ष
महेंद्र मांडे, शैलेश राणे, डॉ. नरेंद्र कोल्हे, मधुकर पवार, डॉ. राणीदास डाकलिया, निलेश खलसे, घनश्याम बडगुजर, रविंद्र निकम या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह वाय एस महाजन सर, सोपान दुट्टे, गणेश तराळ, वसंतराव पाटील, रोहिदास ढाके, अंकुश चौधरी, बि यु पानपाटील, रविंद्र महाजन, सुनिल बढे, शाम तायडे, दिलीप सिंग पाटील, रविंद्र निकम, बाळासाहेब देशमुख, विजय कुमार कोटेचा, दयाराम नेटके, मधुकर पवार, तुकाराम पाटील, दादासाहेब चव्हाण, संतोष सोनवणे, अनिल चौधरी, दत्तात्रय चौधरी, निखिल मुंदडे, अरुण वाणी, विजय पाटील, हेमराज इंगळे, अशोक पाटील, उमेश पाटील, किशोर पाटील आणि इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday 27 September 2022

"राज्य शासनाच्या निवड प्राधिकरणांनी निवड केलेल्या ७८ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ति पत्र प्रदान"

"राज्य शासनाच्या निवड प्राधिकरणांनी निवड केलेल्या ७८ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ति पत्र प्रदान" 


मुंबई दि २७ सप्टेबंर: राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या #मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे, त्यातील ७८ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग (ईएसबीसी) प्रवर्गास सरळसेवेत १६ टक्के आरक्षणाचा निर्णय २०१४ मध्ये झाला होता. त्यास उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. २०१८ मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) यास सरळसेवेत १३ टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी या कायद्याला स्थगिती दिली होती. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायलयाने हा कायदा रद्द केला.

न्यायालयीन स्थगिती, कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन,२०१५ व २०२० या वर्षांत शासकीय पद भरतीला निर्बंध होते. मात्र २०१४ ते ९ सप्टेंबर २०२० या कालावधीत जी शासकीय पदभरती झाली त्यातील नियुक्तीकरिता शिफारस व पात्र उमेदवारांना न्यायालयीन स्थगिती आदेश, #कोरोना लॉकडाऊनमुळे मराठा समाज तसेच अन्य प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले नव्हते.

ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवांराची नियुक्तीबाबत कायदा समंत करण्यात आला. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात ८ सप्टेंबर २०२२ रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आणि २१ सप्टेंबर २०२२ शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

अधिसंख्य पदांवर नियुक्ती देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या १०६४ आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, महसुल व वन विभाग, कृषी, पदुम, वित्त, ग्रामविकास, नगरविकास, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह, राज्य उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग अशा विविध विभागांमध्ये विविध संवर्गात त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यातील सर्वाधिक ७४३ उमेदवार हे ऊर्जा विभागातील आहे. महानिर्मिती, महावितरण यामधील ७४३ पैकी सुमारे ६० टक्के उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...