मडगाव गोवा.. येथे दिनांक 24, 25 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय स्तरावर ग्रामपंचायत मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे हक्कासाठी लढाई व्यापक व्हावी म्हणून अखिल भारतीय ग्रामपंचायत कर्मचारी फेडरेशन (आल इंडिया विलेज पंचायत वर्कर्स फेडरेशन) ची स्थापना राष्ट्रीय अधिवेशन घेऊन करण्यात आली.. फेडरेशनचे नियमावली तयार करण्यात येऊन तिच्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आली.
या अधिवेशनासाठी दहा राज्यातून प्रतिनिधी आले होते, त्यात गोवा महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळा, कर्नाटक, बिहार, गुजरात, मेघालय, मणिपूर या दहा राज्यातील 150 प्रतिनिधींचा समावेश होता अधिवेशाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले, त्यांनी आपल्या भाषणात थांबण्याचे स्वागत केले व ग्रामपंचायत सभेत ते म्हणाले की पंचायत राज्य व्यवस्थेत ग्रामपंचायत कर्मचारी हा महत्त्वाचा दुवा असून या त्यांची तंत्र माहिती शासनाला काम येते, त्यांनी कर्तव्य पार पाडली तर हक्क नाकारले जाणार नाहीत असा उपदेश केला अधिष्ठान अध्यक्ष स्थानी काँग्रेस नामदेव चव्हाण, बिंदेश्वर सिंग कॉम्रेड मिस रिडा फी हे होते मुख्यमंत्री म्हणाले की, सरपंचांपेक्षाही कर्मचाऱ्यांना जास्त माहिती असते तलाठी, ग्रामसेवक होते पण कर्मचारी त्या ठिकाणी नोकरी करतो, घरकुल दिव्यांग योजना, पाणीपुरवठा, शौचालय, आर्थिक विकासाचे योजना, शासकीय योजना राबवण्यात कर्मचाऱ्यांच्या मोलाचा वाटा आहे. असे सांगून ते म्हणाले गोवा राज्यात लागू केले आहे सातवा पे कमिशन लागू करू असे आश्वासन त्यांनी दिले या अधिष्ठाला पंचायत राज्यमंत्री श्री मोविण गोदीनहो देखील सहभागी होते.. उपस्थिती होती, अधिवेशनाला मुख्य मार्गदर्शन आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले हे होते या अधिवेशनाचा मुख्य प्रस्ताव गोव्यातील आयटक नेते काम्रेड क्रिस्तोफर फ्रान्सिस्को यांनी मांडला, त्यावर दहा राज्यातील प्रतिनिधींनी चर्चा केली त्यांच्या त्यांच्या राज्यातील माहिती सांगितली, दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात नंतर अखिल भारतीय पातळीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी एक कमिटी निवडण्यात आली तीत महाराष्ट्राचे प्रतिनिधी असे.
संस्थापक पदाधिकारी ...
काॅ.क्रिस्टोफर फ्रांसिस्कॉ (गोवा) अध्यक्ष, काॅ.नामदेव चव्हाण (महाराष्ट्र) महासचिव, ॲड.राहुल जाधव (महाराष्ट्र) कोषाध्यक्ष, काॅ. मिलिंद गनविर (महाराष्ट्र) पश्चिम क्षेत्रीय सचिव, काॅ.सखाराम दुर्गुड़े (महाराष्ट्र) ऊपाध्यक्ष, काॅ. श्याम चिंचने (महाराष्ट्र) (सहसचिव), कार्यकारिणी सदस्य काॅ.मंगेश म्हात्रे, काॅ.ए.बी.कुलकर्णी...
अशांचा समावेश आहे .. या राष्ट्रीय अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र आय टक सचिव शाम काळे, प्रा तानाजी ठोंबरे, शिवकुमार गणवीर, का अमृत महाजन, का उज्वल गांगुर्डे, वसंत वाघ,.रमेश विसावे, गोविंद म्हात्रे या २० राज्य पदाधिकारी प्रतिनिधींचा सहभाग होता आदिवासी नाचे अधिवेशनाचे आयोजन गोव्याचे नेते काँ प्रसन्न उटगी, राजू मंगेशकर, संतोष नाईक यांनी अत्यंत नियोजनबद्ध केले.....
*अमृत महाजन राज्य सचिव ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ* +91 98605 20560
No comments:
Post a Comment