Wednesday, 28 September 2022

"शिंदे गटाचा दसरा मेळावा" कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न !

"शिंदे गटाचा दसरा मेळावा" कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न !


औरंगाबाद,(सिल्लोड), अखलाख देशमुख, दि २८ : ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले असून जनसामान्यांत प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. त्यामुळे बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याची सभा ना भूतो ना भविष्य अशी ऐतिहासिक सभा होईल असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

*पूर्वतयारी बैठकीला शिवसैनिकांची प्रचंड उपस्थिती*

आज बुधवार रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दसरा मेळावा संदर्भात पूर्वतयारी बाबत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. शहरातील शिवसेना भवन परिसरात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला जवळपास ३ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला मंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन केले. मुंबई ला जाण्यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी जेवण, चहा, पाणी, नास्ता यासह रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक यासारख्या आवश्यक सोयी सुविधा प्रवास दरम्यान शिवसैनिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.

*मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन*

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २० तास लोकांची कामे करतात त्यामुळे विरोधकांची झोप उडाली असल्याची मिश्किल टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम राज्यात होत असल्याने एकनाथ म्हणजे लोकनाथ अशी भावना जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.
बैठकीस शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...