भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!
भिवंडी, काल्हेर ग्रामपंचायत येथील जमीन सर्वे नंबर २५८ गुरुचरण या जागेवरील दोन इमारतीचे अनधिकृत बांधकामे.
भिवंडी, दिं, ०५,अरुण पाटील, (कोपर) :
भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गुरुचरण महाराष्ट्र शासन या जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असतानाच सद्या भिवंडी तालुक्यातील तलाठी सजा काल्हेर येथील काल्हेर ग्राम पंचायतिच्या नावावर असलेल्या सर्वे नंबर २५८ या गुरुचरण महाराष्ट्र शासन या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे नुकत्याच उपअधीक्षक भूमी अभिलाखे ,भिवंडी यांच्या शासकीय झालेल्या मोजणीत सिद्ध झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
सविस्तर हकीगत अशिकी,उपअधीक्षक भूमी अभिलेखा, भिवंडी यांच्या तर्फे मोजणी कर्मचारी श्रीमती.योगिता पवार मॅडम यांनी जावक क्रं.२४९९, मो.र.क्रं ०२५९६५ नुसार दिं, २३/७/२०२५ रोजी जमीन सर्वे नंबर २५८ गुरुचरण महाराष्ट्र शासन काल्हेर ग्रामपंचायत, या जमिनीची मोजणी केली होती.
त्यानुसार सदर मोजलेल्या जमिनीची हद्द दाखविण्यासाठी जावक क्रमांक ३६१९, दिनांक २९/९/२०२५ रोजी निश्चित केले होते.त्यावेळी जमीन सर्वे नंबर २५८ गुरुचरण महाराष्ट्र शासन काल्हेर ग्रामपंचायत या जागेत अतिक्रमण करून अनधिकृत दोन इमारतीचे बांधकाम झाल्याचे दिसून आले आहे. ही दोन्ही बांधकामे कशेळी गाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाने काल्हेर गावातील काही व्यक्तींना हाताशी धरून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून या जागेत अतिक्रमण करून दोन अनधिकृत बांधकामे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या विषयात कशेळी गावातील एक बांधकाम व्यावसायिक काल्हेर गावातील शासनाच्या गुरुचरण जागेवर अतिक्रमण कसा करू शकतो हा चर्चेचा विषय बनल्याने यात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय बळावत आहे.
त्यामुळे अतिक्रमण करून झालेल्या या दोन अनधिकृत बांधकाम बाबत काल्हेर ग्रामपंचायत ही दोन्ही बांधकामे निष्कासित करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे यांच्याकडे पाठपुरावा करणार की, पुन्हा आर्थिक व्यवहार करून सदर प्रकरण दडपून सदर अतिक्रमित बांधकामांना खुला पाठिंबा देणार या कडे काल्हेर व परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.जर या अतिक्रमणा बाबत काल्हेर ग्रामपंचायतीने योग्य निर्णय "न"घेतल्यास काल्हेर ग्रामपंचायतिच्या व अतिक्रमणा विरोधात उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल होणार असल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजले आहे.
No comments:
Post a Comment