Tuesday 31 August 2021

राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता !

राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता !


पुणे : राज्यात कालपासून सुरु असलेल्या पावसाने आज सकाळपासूनच जोर धरलेला दिसून येत आहे.  पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यासह इतर अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, काल व आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे.

त्यात हवामानात आर्द्रतेचं प्रमाण हे 95 टक्क्यांपर्यंत आहे. दिवसभरात अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांत अशाचप्रकारे हवामानाचं स्वरूप असणार आहे. मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील ३ ते ४ दिवस पावसाचा जोर असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

“कोरोना" रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची जबाबदारी आता "संचालकांची”, राज्य सरकारचा निर्णय.!!

“कोरोना" रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची जबाबदारी आता "संचालकांची”, राज्य सरकारचा निर्णय.!!


भिवंडी, दिं,1, अरुण पाटील, (कोपर) :
          कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी या पुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र (जनरेटर) संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत.
            रुग्णालयात अंतर्गत वीज संच मांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामुहिक जबाबदारी राहणार आहे.रुग्णालयात अंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामुहिक जबाबदारी राहणार आहे.
          उच्चदाब आणि मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, 2010 नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. 15 मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत "ना हरकत प्रमाणपत्र" मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडिट नियमीत केलेले असावे.

सचिन वाझे उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल.!!

सचिन वाझे उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात  दाखल.!!


अरुण पाटील, (कोपर), भिवंडी, दिं,31 : 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची प्रकृती बिघडल्याने त्याला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरेन हत्याकांडा बरोबरच मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला आहे . या प्रकरणात त्याला अटक केल्या नंतर त्याची रवानगी तलोजा कारागृहात करण्यात आली होती . कारागृहात वाझे यास हृदय विकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती . त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. 
विशेष म्हणजे एखाद्या गंभीर प्रकरणातल्या आरोपीवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात नेमके का दाखल करण्यात आले , हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे सचिन वाझे अटकेपूर्वी पोलीस अधिकारी असल्याने त्याचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यातच भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर सधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सचिन वाझे यास खरोखरच उपचारासाठी भिवंडी सारख्या ठिकाणी दाखल केले आहे किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावे अशी चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.

सचिन वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात मंगळवारी चार वाजता दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केला "केंद्रीय राज्य मंत्री" कपिल पाटील व आशा वर्कर्स यांचा सन्मान !!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केला  "केंद्रीय राज्य मंत्री" कपिल पाटील व आशा वर्कर्स यांचा सन्मान !!


अरुण पाटील, (कोपर), भिवंडी, दिं, ३१ :
           महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा याच्या वतीने "केंद्रीय पंचायत राज" राज्यमंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार रविवारी दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी भिवंडी तालुक्यातील पडघ्या जवळील बी. बी. पाटील न्यु इंग्लिश स्कुल कुरुंद येथे करण्यात आला आहे.  यावेळी शहापूर तालुक्यातील जय महाराष्ट्र भजनी मंडळ आवरे यांनी गाण्यातून प्रबोधन केले. तर सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल समाज कल्याण न्यासचे संस्थापक डॉ. सोन्या पाटील, कवी, साहित्यिक अन्वर मिर्जा, चित्रकार सचिन पोतदार, आशा वर्कर मनिषा पाटील, कीर्तनकार सुरेश घरत, कायदेविषयक सल्लागार अँड. विजय दिवाणे अशा विविध क्षेत्रातील नागरीकांना सन्मानित करण्यात आले. 


तसेच कोरोना काळात आपला जीव मुठीत घेवून  कोरोना आजाराची जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. म्हणून भिवंडी तालुक्यातील नंदा मोरे, राजू कोबाड, सुनिता पाटील, शबाना मोमीन, सावधान पाटील, भावना भोईर, रुपाली रमाणे, भक्ती राऊत, शोभा मोहंडूळे, चित्रा फापे, रईसा शेख, ललिता रामोशी, सारिका झुंजारराव, या ”आशा वर्कर्स  यांचा सत्कार  करण्यात आला. तर कोरोना काळात कोरोना बाधित मृत्यू पावलेले पत्रकार रतन तेजे, प्रकाश निल, दिनकर गायकवाड, यांच्या कुटूंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्य कमिटी व ठाणे जिह्या कमिटी यांच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. 

तर ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध  मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कडे सादर करण्यात आले. मुंबई -नाशिक महामार्गा वरील पडघा टोल नाका, भिवंडी येथील अंजूर फाटा - चिंचोटी रोडवरील मालोडी टोल नाका, तसेच भिवंडी - कल्याण टोल नाका व ठाणे -भिवंडी रोडवरील कशेळी टोल नाका या चारही महामार्गावर सद्या टोल वसुली सुरू आहे. मात्र या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. भिवंडी वाडा महामार्गावर तर अक्षरशः खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्तावरचा टोलनाका सद्या बंद आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हा टोलनाका सुरू होणार असल्याचे समजले आहे. मात्र या  रस्त्याची दुरुस्ती न करता हा टोलनाका सुरू केला तर सर्वांत आधी मीच हा टोलनाक्यावर कारवाई करेन असे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

पत्रकार संघाच्या कार्यक्रमा निमित्ताने अनेक नागरिकांना प्रेरणा मिळावी आणि आपण अधिक काम चागले करावे असे यावेळी केंद्रीय "पंचायत राज" राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बोलतांना सांगितले. तर पत्रकार संघाच्या विविध मागण्या केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न करेल. असे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा याच्या वतीने अनेक ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला आहे. तर सामाजिक बांधिलकी जपून आम्ही प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतो व सातत्याने नवीन उपक्रम हाती घेत असतो. असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी बोलताना सांगितले.  

अनामिका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बी. बी पाटील, प्राचार्य अनामिका विशे, आणि सहकारी शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांनी बी. बी. पाटील स्कुलचे आभार व्यक्त केले.  

यावेळी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, एस. पी. ग्रुपचे सदस्य सोन्या पाटील, महिला बाळ कल्याण सभापती श्रेया गायकर, जिल्हा परिषद सदस्य, कैलास जाधव, दयानंद पाटील, भिवंडी पंचायत समिती सभापती गुरुनाथ जाधव, पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत  गायकर, भिवंडी पंचायत समिती  सभापती रविकांत पाटील, माजी सभापती अशोक शेरेकर, बी. बी. पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष भगवान चंदे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, जिल्हा सचिव नरेश पाटील, सचिव जनार्दन मोगरे, कार्यध्यक्ष संतोष गायकर, भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे, भिवंडी शहर मनपा तालुका अध्यक्ष संजय भोईर, कार्याध्यक्ष सुराजपाल यादव, सचिव मोनिष गायकवाड, तालुका उपाध्यक्ष दीपक हिरे, सचिव मिलिंद जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष जैतु मुठोलकर, उपाध्यक्ष राजेश जाधव, मुरबाड तालुका अध्यक्ष सतिश घरत, उपाध्यक्ष शंकर करडे, सचिव दिलीप पवार, शहापूर तालुका अध्यक्ष सुनिल घरत, सचिव प्रकाश अंदाडे, भिवंडी सदस्य नितीन पंडीत, अरविंद जैसवाल, फकरे आलन खान, संदिप गुप्ता, सुनिल देवरे, अनिल पाटील आणि ठाणे जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके तर आभार पत्रकार  मेघनाथ विशे, पत्रकार मिलिंद जाधव यांनी केले.

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा, पो. सायबान केंद्र, भाताने येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणिक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा, पो. सायबान केंद्र, भाताने येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणिक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

         सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे. सामाजिक बांधिलकीचा वारसा अखंडपणे जपत आलेल्या पंचरत्न मित्र मंडळातर्फे रविवारी जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा, पो. सायबान केंद्र भाताने, ता. वसई, जि. पालघर ,येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणीक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अश्विन कांबळे (वरिष्ठ प्रबंधक -आरसीएफ), तसेच विशेष पाहुणे श्री. डी. एफ. निंबाळकर (महासचिव - सैनिक फेडरेशन महाराष्ट्र) तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड तसेच मंडळाचे पदाधिकारी वैभव घरत, हनुमंता चव्हाण, एम डिसोझा, डी. एम. मिश्रा, रहीम शेख, संतोष नाईक, रमेश पाटील, संदीप पाटील, मंदार भोपि आदी मान्यवर   उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील मेस्त्री यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे देणगीदार, शुभचिंतक, तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यापुढेही आपले असेच सहकार्य मंडळाला लाभेल या अपेक्षाही या निमिताने व्यक्त करण्यात आली. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड, खजिनदार सचिन साळुंखे यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्या वतीने मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम,वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे. कोविड-१९ काळातही लाँकडाऊन सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले. यापुर्वीही चेंबुर येथील वाशी गाव, मुंबई-७४ येथेही अन्नधान्य व मास्क वाटप करण्यात आले. प्रस्तावना करताना सांगितले की, पंचरत्न मित्र मंडळाने आजवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवश्यकच तेथे मदतीचा हात सातत्याने दिला आहे. देत आहे न यापुढेही देत राहिल. मंडळाचे कार्यकर्ते समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने सतत मदतीचा हात देत असतात. प्रत्येकाने गरजूंना मदत करावी ही मदत करत असताना जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही. तर प्रमुख पाहुणे आर.सी.एफचे वरिष्ठ प्रबंधक अश्विन कांबळे  यांनी मंडळ राबवित असलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करा. स्वःता सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा मोलाचा सल्ला यानिमिताने दिला. कोविड-१९ चे सर्व नियमानुसार हा वाटप कार्यक्रम अंत्यत साधेपणाने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ पदाधिकारी,सदस्य व सभासद, हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.

Monday 30 August 2021

ठाण्यात भाजीविक्रेत्याचा सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला, हाताची 3 बोटं छाटली.!

ठाण्यात भाजीविक्रेत्याचा सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला, हाताची 3 बोटं छाटली.!


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील, (कोपर) :
         ठाण्यात रस्त्यावर बसलेल्या एका भाजी विक्रेत्याने ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची तीन बोटं छाटली गेली असून त्यांच्या सुरक्षारक्षकाचे देखील बोट छाटले गेले आहे. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरजित यादव (वय 45) असं या हल्लेखोर भाजीविक्रेत्याचं नाव आहे. सोमवारी  संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे, 3 वर्षांपूर्वीच याच अमरजित यादववर हल्ल्याचा गुन्हा दाखल होता. या हल्लेखोराला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.
               ठाणे महापालिकेकडून सध्या शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यां विरोधात कारवाईची मोहिम उघडली आहे. सोमवार, दिं 30 संध्याकाळी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मार्केटवर कारवाई केली. त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांचे रस्ते अडवले. यावेळी फेरीवाले आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला.
           त्याचवेळी यादव नावाच्या या भाजी विक्रेत्याने रागाच्या भरात पिंगळे यांच्यावर चाकू फेकून मारला. पिंगळे यांनी तो हल्ला रोखण्यासाठी हाताने अडकवला. पण, यात त्यांची तीन बोट छाटली गेली आणि जागेवरच तुटून पडली.त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सुरक्षारक्षकाने धाव घेतली असता आरोपी यादवने त्याच्यावरही वार केले. या हल्ल्यात त्याचेही बोट तुटले.
          कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर यादवला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .परंतु या प्रकरणामुळे फेरीवाल्यांचा मुजोरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

कोकण सुपूत्र राहुल भडवळकर यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न !!

कोकण सुपूत्र राहुल भडवळकर यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न !!


मुंबई, (दिपक  कारकर) :

जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या अंगी अवगत असलेल्या विविध कला त्यास कधीच गप्प बसु देत नाही, मात्र जिद्द, मेहनत, घेण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना हे यश निश्चितच मिळते. कोकण भूमीतील अनेक सुपुत्र आज स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा मुंबई सारख्या शहरात उमटविताना दिसत आहेत. असंच एक चिपळूण तालुक्यातील डुगवे गावचे भूमिपुत्र राहुल रामचंद्र भडवळकर या रंगभूमीवरील हौशी कलाकाराने चक्क मुंबईत आपलं स्वतःचं "एक धडपड रंगभूमीसाठी" असं ओम साई म्युझिक स्टुडिओ या नावाने - अवेरे बंधू चाळ,महाराष्ट्र नगर,आप्पापाडा मालाड ( पूर्व ) येथे उभारले आहे आणि याचा उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि.२९ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाला.


आई-वडिलांच्या संस्कारातून वाढेलला राहुल मुंबईत वास्तव्य करताना आपला कौटुंबिक उदरनिर्वाह करता-करता लोककलेची प्रचंड आवड असणाऱ्या या कलाकाराने आपली खरी सुरुवात नमन/जाखडी कलेतून केली. सर्वप्रथम ओम साई नमन नाट्य मंडळ, ( मालाड - पूर्व ) यामधून त्यांनी कलाकार भूमिका साकारली. त्यांना शाहिर राजेंद्र टाकले यांनी मार्गदर्शन करत या कलाकाराला घडवले.गेले कैक दिवस स्वतःच मुंबईत रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्मित करून एक व्यावसायिक सुरुवात आणि त्याचबरोबर मुख्य हेतू नवोदित गायकांना अल्प खर्चात व्यासपीठ निर्माण करण्याचे स्वप्न त्यांचं प्रत्येक्षपणे साकार केलं आहे.

या स्टुडिओची निर्मिती करताना माझे जन्मदाते आई-बाबा व कलेतील सोबती दिनेश, प्रविण, सुहास, रुषाल, सुशांत, निलेश, सिद्धेश, अंकित, जयेश व मित्र परिवार यांनी मोलाचं योगदान दिले व हा स्टुडिओ उभा राहिला असे राहुल याने बोलताना सांगितले.

या सोहळ्याला शाहीर विकास लांबोरे,शाहीर तुषार पंदेरे, शाहीर सचिन धूमक, शाहीर प्रविण कुळये, संगितकार बेंजो मास्टर सतीश साळवी, ऑक्टोपॅड वादक - स्वप्नील गुरव, युवा समाजसेवक दीपक कारकर, कलाकार प्रशांत पाष्टे आणि मित्रमंडळी यांची उपस्थिती होती. कलाकारांना स्फूर्ती देणाऱ्या राहुल भडवळकर यांच्याबद्दल अनेकांनी शब्दसुमनांनी स्तुती करत त्यांस पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.

प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या भावाचा वल्ड बुक आँफ रेकॉर्ड 'युरोप'कडून सन्मान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला गौरव!

प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या भावाचा वल्ड बुक आँफ रेकॉर्ड 'युरोप'कडून सन्मान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला गौरव!


कल्याण, (संजय कांबळे) :

    ग्रामीण भागातून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, समाजाला उन्नतीच्या दिशेला नेऊ प्रत्येक सामाजिक कार्यात ज्यांनी आपला सिंहाचा वाटा ठेवला अश्या सर्वात तरूण समाजसेवक म्हणून नावारूपाला येत असलेल्या भाऊसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल युरोप ने घेतली असून त्यांना वल्ड बुक आँफ रेकॉर्ड युरोप ने नुकतेच सन्मानित  करण्यात आले. त्यांच्या या कामगिरी बद्दल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा गौरव केला. ते प्रसिद्ध सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद (भोसले) यांचे बंधू आहेत. 


"भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले जातात. भाऊसाहेब शिंदे यांची सामाजिक बांधिलकी सातासमुद्र पार पोहचलेली आहे". गरीब विद्यार्थ्यांनच्या शिक्षणा साठी शिंदे नेहेमी धावून जातात".

अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार पेक्षा जास्त शिबिरे घेतली एवढेच नव्हे तर अनेक आंदोलने व उपोषण करून सर्व सामन्य लोकांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्र राज्यात वृक्षारोपण केले 

गरीब व गरजूंना अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आले तसेच गरीब महिलांना संपूर्ण महाराष्ट्र भर दहा (१०) लाख साङया वाटप केल्या.

शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी राज्य सरकार कडे पाठपुरावा करून यश मिळवले.त्यांच्या या कार्याची दखल, वल्ड बुक आँफ रेकॉर्ड, युरोप यांनी दखल घेतली व त्यांना सन्मानित करण्यात आले. 

आज भाऊ शिंदे यांच्या वयाचा विचार करता अगदी 28 व्या वयात त्यांनी आपल्या कार्याची चमक दाखवली असून भाऊ शिंदे च्या कर्तबगार पणाचा आदर्श इतर तरुणांइला घेण्यासारखा आहे. त्यांनी आपले विद्यालयाचे शिक्षण पूर्ण करून नोकरींला बलिदान करत लोकांच्या सेवेत लागले. अंधाचे डोळे, अनाथानाचे नाथ, लंगड्याचे पाय, निराधारांचा आधार बनून अनेकांसाठी धावून गेले. स्वतःची परवा करता प्रत्येकवेळी समाजाच्या आणि गरजू लोकांचा विचार करत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आज अहमदनगरलाच नाही तर महाराष्ट्र मध्ये नावाजलेले व्यक्तीमहत्व म्हणून भाऊ शिंदे कडे पाहिले जाते.

*कोण आहेत भाऊसाहेब शिंदे-

प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली (ताई) भोसले सय्यद यांचे बंधू भाऊसाहेब शिंदे.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोदा तालुक्यातील भानगाव या त्यांच्या मामा च्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मुळ गाव हे नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्या नंतर त्यांचे काॅलेज चे शिक्षण अहमदनगर येथे पुर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर शिंदे यांना एका बँकेत शिपाई या पदावर घेण्यात आले त्या ठीकाण च काम पाहून त्यांना कॅशियर या पदावर प्रमोशन भेटले पण भाऊसाहेब शिंदे यांच मन मात्र तिथे रमल नाही. त्यांनी ही नोकरी सोडून थेट भेट त्यावेळी चे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब यांना दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेटले साहेबांना सांगितले मी नोकरी सोडली व पवार साहेबांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला. त्या वेळी शरद पवार साहेबांनी त्यांना विचारले आता पुढे काय करणार त्या वेळी त्यांनी साहेबांना सांगितल मला तुमच्या सारख बनायचय त्या नंतर पवार साहेबांनी त्यांना एक कानमंत्र दिला त्या नंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आणि ते काम करत करत लोकांची सेवा करण्याची संधी भाऊला मिळाली. त्याच्या दीपाली ताईचा हात डोक्यावर असल्याने अनेक प्रश्न त्यांनी तात्काळ सोडवले आहेत.त्यामुळे भाऊंच्या सामाजिक कार्याची दखल वल्ड बुक आँफ रेकॉर्ड युरोप ने घेऊन त्यांना नुकतेच सन्मानित  करण्यात आले,

त्यामुळे आपल्या राज्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवणा-या भाऊसाहेब शिंदे यांच्या या कामगिरी बद्दल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, यांनी त्यांचा यथोचित गौरव केला. यावेळी
भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन जोतिराम घुले, आंतरराष्ट्रीय चेअरमन ङाॅ.अविनाश सकुंङे, सचिन मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होते आहे.

माणगांव पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचले वयोवृद्ध महिलेचे प्राण; पोलीसांचे सर्वत्र कौतुक !!

माणगांव पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचले वयोवृद्ध महिलेचे प्राण; पोलीसांचे सर्वत्र कौतुक !!


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी माणगांव येथे सकाळी ११: १५ च्या सुमारास एर्नाकुलम-निजामुद्दीन ही ट्रेन मुंबई कडे जात असताना माणगांव शहरातील साबळे कॉलेज जवळ कोकण रेल्वे ट्रॅक वर एक वयोवृध्द महिला कौटुंबिक मानसिक त्रासाला कंटाळून झोपलेल्या स्थितीत असल्याची माहिती माणगांव पोलीसांना समजताच क्षणाचाही विलंब न करता माणगांव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस लालासाहेब वाघमोडे आणि माणगांव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार सानप व पोलीस अंमलदार साटम या पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या वयोवृद्ध महिलेला रेल्वे ट्रॅक वरून बाजूला करत आपल्या ताब्यात घेतले. आणि तिला पाणी देऊन तिची मानवतावादी भावनेतून आणि आस्थेने चौकशी केली. माणगांव पोलीसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला. त्यामुळे त्या वयोवृद्ध महिलेचे अनमोल प्राण वाचले. 
     पोलीसांनी त्या वयोवृद्ध महिलेची सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे सदर वयोवृद्ध महिलेला माणगांव तालुक्यातील भादाव येथील रहिवासी असून तिचे नाव कुसुम राणे असे असून तिच्या घरचे नातेवाईक तिला कोणीही सांभाळत नाहीत, आणि ती आजारी असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी देखील  कोणीही घेऊन जात नाहीत म्हणून ती जीवनाला कंटाळून या ठिकाणी आल्याचे समजते. माणगांव पोलीसांनी तिच्या नातेवाईकांना समज देऊन तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 
     माणगांव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस लालासाहेब वाघमोडे तसेच माणगाव पोलीस स्टेशन चे महिला पोलीस हावलदार सानप ,व पोलीस अंमलदार साटम यांनी केलेल्या मानवतावादी कामगिरीमुळे संपूर्ण माणगांव तालुक्यात आणि पोलीस खात्यात त्यांचे कौतुक होत आहे.

ओवली (दसपटी) या खेडेगावातील आदिवासी पूरग्रस्त गावकऱ्यांना रिटेनमायेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (जे.आर.एस.फार्मा) या कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !!

ओवली (दसपटी) या खेडेगावातील आदिवासी पूरग्रस्त गावकऱ्यांना रिटेनमायेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (जे.आर.एस.फार्मा) या कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
          महाड, पोलादपूरसह चिपळूण मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तेथील अनेकांची घरे पुरात सापडली तर अनेकांचा नाहक बळी गेला. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे मोठे हाल सुरू असल्याने राज्यातून ठिकठिकाणाहून मदत कार्य सुरू आहे. 


चिपळूण येथील ओवली (दसपटी) या खेडेगावातील आदिवासी पूरग्रस्त गावकऱ्यांना  रिटेनमायेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (जे.आर.एस.फार्मा) या कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मदतीत चटई १२० नग, चादर १२० नग, ब्लँकेट १२० नग, ताडपत्री ८० नग व औषधे याचा समावेश होता. 


ही मदत चिपळूण मधील पूरग्रस्त अशा योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र चिपळूण शाखेच्या कर्मचारी सौ.आशा सुहास लोवलेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. ओवली गावातील ७५ वर्षीय सरपंच सौ.पवार व माजी सरपंच श्री. शिंदे यांची या वस्तूंचे शिस्त ब्ध्द वाटप करण्यास खुप मदत झाली. यावेळी जे.आर. एस फार्मा ठाणेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.रोहित राऊत, श्री संजीव चव्हाण, श्री.रवींद्र भोसले, श्री. आदिनाथ अमुप आणि सुभाष कोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले. जे.आर. एस.फार्मा ठाणे यांनी कर्तव्य समजून दिलेला मदतीचा हात लाखमोलाचा असल्याचे मत अनेकांनी यावेळी  व्यक्त केले. आवश्यक साहित्य व औषधे वाटप केल्यामुळे अनेकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. ग्रामस्थांनी या टिमचे मनापासून आभार व्यक्त केले.

Sunday 29 August 2021

म्हारळ वरप कांबा या पुरग्रस्त गावातील वीजबिल माफ करण्याची आमदार कुमार आयलानी यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी !!

म्हारळ वरप कांबा या पुरग्रस्त गावातील वीजबिल माफ करण्याची आमदार कुमार आयलानी यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी !!


कल्याण, (संजय कांबळे) : मागील जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व यानंतर उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात असलेल्या म्हारळ, वरप,काबा या गावात मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यानें  नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदर कोरोनाकाळात अडचणीत सापडलेल्या या भागातील लोकांचे विजबील माफ करावे अशी मागणी या भागाचे आमदार कुमार आयलानी यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडे केली आहे.

कोरोनाकाळात कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप कांबा या गावांना मोठा फटका बसला होता. अनेकांचे कामधंदे बुडाले, नोकरी गेली, त्यामुळे जगायचे कसे या विचाराने जनता त्रस्त असतानाच  मागील २२ जुलै रोजी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यामुळे उल्हास नदीस पुर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले, म्हारळ गावातील शिवाणी नगर, राधाकृष्ण नगरी, विठ्ठल नगर, आण्णासाहेब पाटील नगर, म्हारळ सोसायटी, तसेच वरप मधील गावभाग, ओमसाईबाबानगर, शिवशक्ती काँलनी, दर्गानगर, टाटा पावर हाऊस, मोरयानगर, पावशेपाडा, आदी भागात पाणी भरल्याने येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कल्याण तहसीलदार कार्यालयातून तलाठी अमृता बडगुजर यांच्या माध्यमातून या परिसराचे नुकसान पंचनामे झाले आहेत. परंतु अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. अशातच विद्यूत मंडळाने सक्तीने वीजबिल वसूली सुरू केली आहे. वरप गावातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या कै. रवी बाळाराम भोईर यांच्या घराचे मीटर वीजबिल थकीत असल्याने विद्यूत कर्मचाऱ्यांनी  ते काढून नेले. त्यामुळे गावात संताप पसरला होता. यांनतर आमदार कुमार आयलानी यांनी या भागांत दौरा करून पाहणी केली होती. येथील पुराची भयानकता पाहून महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर व कोकणातील पुरग्रस्ताप्रमाणे म्हारळ, वरप, कांबा या गावातील नांगरिकांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी आमदार कुमार आयलानी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडे केली आहे. त्यामुळे उर्जामंत्री या भागाला वीजबिल माफ करून दिलासा देतात का?याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मंदिरं न उघडल्यास रस्त्यावर उतरू, अण्णांचा ठाकरे सरकारला इशारा.!

मंदिरं न उघडल्यास रस्त्यावर उतरू, अण्णांचा ठाकरे सरकारला इशारा.!


भिवंडी, दिं,29, अरुण पाटील (कोपर) :
          राज्यातील मंदिरं (temples ) उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकानं, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का? जिथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hazare) संतापले असून  मंदिरं जर उघडली नाहीतर जनतेसाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही अण्णांनी दिला.
              अहमदनगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरं उघडण्यासाठी सरकाराकडे पाठपुरावा करावा असं साकडं घातलं आहे .मदिरं उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाही. 10 दिवसात जर मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर राहील, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.
            तसंच, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज 84 वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या  समाधी स्थळा जवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले ? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावी, अशी मागणीच अण्णांनी केली.
            वसंत लोढा यांनी यावेळी मंदिर बचाव कृतीसमितीने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती देवून पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृताखाली उग्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलं

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्यांचे आरक्षण आज आठ वाजल्यापासून झाले सुरू !!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्यांचे आरक्षण आज आठ वाजल्यापासून झाले सुरू !!


रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या आतापर्यंत जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा आज करण्यात आली. वांद्रे-मडगाव-वांद्रे ही विशेष तिकीट दर असलेली पूर्णपणे आरक्षित गाडी मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून सुटेल. दुसऱ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ती मडगावला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वसई, पनवेल मार्गे रवाना होईल. गाडीला १८ डबे असतील. ही गाडी बुधवारी, ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आपला परतीचा प्रवास करेल. दुसरी विशेष गाडी उधना (गुजरात) ते मडगाव आणि परत या मार्गावर धावणार आहे. ही गाडीही विशेष तिकीट दराची आणि पूर्णपणे आरक्षित असेल. उधना येथून ही गाडी गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी सुटेल. गुजरातमधील नवसारी, वलसाड, वापी, त्यानंतर पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई मार्गे ही गाडी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे पोहोचेल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरून मडगावकडे रवाना होईल. या गाडीला १५ डबे असतील. ही गाडी शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. या गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सुरू होणार आहे, याबाबतची माहिती मात्र एल के वर्मा मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे देण्यात आली आहे.

*हि वेळही निघून जाईल* *- संत राजिन्दर सिंह जी महाराज*

*हि वेळही निघून जाईल*
*- संत राजिन्दर सिंह जी महाराज*


प्रत्येक मनुष्याला जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो टाळता येत नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण आपले जीवन मार्गक्रमण करीत असताना चढ-उतारांना सामोरे जातो, तेव्हा आपण शांतता गमावून अस्थिर होऊ इच्छितो का? आपण आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेमुळे स्वतःला प्रभावित होऊ दिले, तर आपल्याला असे वाटेल की आपण सर्व वेळ रोलर कॉस्टर वर चाललो आहोत. म्हणजेच आपण आनंदाच्या अतिउच्च शिखरावरून निराशेच्या खोल गर्तेत पोहोचू आणि मग पुढच्या क्षणी आनंदाच्या शिखरावर परत येऊ.  

हा सततचा बदल अनेकदा भय, ताण आणि दहशत निर्माण करतो. कारण पुढे काय होईल हे आपल्याला कधीच माहीत नसते. कालांतराने भीती व तणाव असलेली हि अवस्था आपल्या मनाचा अविभाज्य भाग बनते. आपण शांत आणि तणावमुक्त होऊ शकत नाही, कारण जीवनातील चढ-उतारांवर आपले काही खास नियंत्रण नसते. आपण शांति व तणावरहित जीवन कसे जगायचे? 

जीवनात वादळ आणि समृद्धी च्या दरम्यान एक शांत जागा शोधून आपण समतोल जहाजात स्थिर होऊ शकतो. आपण ध्यान-अभ्यास व प्रार्थनेद्वारे शांत अवस्थेत पोहोचू शकतो. आपल्या अंतरात  सर्व दिव्यशक्ती आहेत. आपण फक्त शरीर आणि मन नसून आत्मा आहोत. आत्मा ज्योती, प्रेम आणि आनंदाने परिपूर्ण आहे. कसं काय? तर आत्म्याचा दिव्य स्रोत परमात्मा हा पूर्ण, ज्योती, प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे. आत्मा त्याच्याशी सदैव जोडलेला असतो. सृजनशील शक्ती म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच तत्त्वाने बनले आहेत. जर आपण दररोज काही वेळ नित्य नियमाने ध्यान-अभ्यास केला तर आपण सुद्धा परम आनंद प्राप्त करू शकतो. तेव्हा कुठे जीवनात आपण बाह्य परिस्थितीमुळे विचलित होणार नाही. शांति आणि समन्वयाने परिपूर्ण भरलेल्या ठिकाणी कसे पोहोचायचे ते आपण शिकू शकतो. ज्यामुळे जीवनाच्या चढ-उतारा नंतरही आपल्याला चिरंतन शाश्वत आनंद मिळत राहील. आपण आपल्या अंतरातील स्थिर अशा अवस्थेस पोहोचू शकतो जे जीवनातील चढ-उतारांशिवाय आपणास शाश्‍वत आनंद देऊ शकेल.

जेव्हा पुढील भविष्य काळात आपल्याला काही कष्ट होतील तेव्हा आपण लक्षात ठेवावे की, " ही वेळही निघून जाईल".  हे पाच शब्द आपल्याला या संकटातून सहजपणे आणि विश्वासपूर्वक बाहेर येण्यास मदत करतील. हे आपणास लक्षात आणून देतील की, आपण आपल्या अंतरातील शांति च्या स्थानाला ध्यान-अभ्यासाद्वारे शोधू शकतो.

तसेच पुढील भविष्य काळात आपण खूप आनंदी असू तेव्हाही आपण लक्षात ठेवावे की," ही वेळही निघून जाईल", जेणेकरून या क्षणांचा आपण आनंद घेऊ शकू. ही वेळ गेल्यानंतर आपण उदास होता कामा नये. हे आपल्याला लक्षात आणून देतील कि हा आनंदाचा क्षण नष्ट होईल आणि कष्टाचे दिवस येतील, परंतु हा आनंद पुन्हा परत येईल. हे आपणास आठवण करून देतील की आपण ध्यान-अभ्यासाद्वारे आपल्या अंतरातील शांति स्थळाचा शोध घ्यावा, कारण तेच आपल्याला चिरशांति प्रदान करेल.

मिशन : सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2
सदस्य (अमृता) - 084510 93275

"आई-बाप" काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलं'', सामनाच्या रोखठोकमधून पुन्हा एकदा नारायण राणेंवर हल्लाबोल.!

"आई-बाप" काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलं'', सामनाच्या रोखठोकमधून पुन्हा एकदा नारायण राणेंवर हल्लाबोल.!


अरुण पाटील, भिवंडी, दिं 29 :
            शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यासोबतच संजय राऊतांनी राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि नीलेश राणे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केलं आहे. टीका करणे आणि स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्याचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलंय, असं राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
          मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्याने कारवाई केली तर राणे यांच्यावरील कारवाई म्हणजे घटनाबाहय़ असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री कोणीही असोत, त्यांचा जाहीर उपमर्द करण्याचा अधिकार कोणालाच नाही. राणे हा अपराध वारंवार करीत राहिले! त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहेत.
            राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. "तुम्ही बिनबापाचे आहात काय?" असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल.
          उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?
         राणे महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारची विधाने करीत आहेत तो केंद्रीय मंत्री म्हणून मर्यादांचा, परंपरांचा भंग आहे व पंतप्रधान मोदी यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे फार मोठे परिणाम 
भोगावे लागतील. एका  गुजरात निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच’ असा करताच भाजपने मोठाच हल्लाबोल केला. मोदी तर जाहीर सभांतून मला ते "नीच" म्हणाले हो म्हणून अश्रू ढाळत होते. मणिशंकर यांच्या ‘नीच’ शब्दाची गांभीर्याने दखल घेऊन काँग्रेसने अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्याची हिंमत व नैतिकता दाखविली. नारायण राणे यांनीही तोच गुन्हा केला, पण भाजप त्यांना सरळ पाठीशी घालत आहे.
            भारतीय जनता पक्ष हा संस्कार, संस्कृती, नैतिकतेवर भर देणारा पक्ष आहे. निदान त्यावर त्यांची प्रवचने तरी असतात, पण संस्कार व संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आले की हात वर करायचे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जे घडवले जात आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली हे दुःख समजू शकतो. पण म्हणून महाराष्ट्रातील टोलेजंग व्यक्ती व राज्याच्या संस्कृतीवर हल्ला करत राहणे योग्य नाही.
        नारायण राणे यांना राजकीय मर्यादा आहेत. त्यांचे सगळय़ात मोठे भांडवल म्हणजे ते बोलताना, वागताना मर्यादांचे भान ठेवीत नाहीत. हे भांडवल तोकडे पडत असल्यामुळेच भाजपमध्ये मर्यादा सोडून वागणारे बाहेरचे लोक वापर करण्यासाठी लागतात. “या बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलण्याची सुतराम शक्यता नाही. उलट या सगळय़ांचे परिणाम भाजपास भोगावे लागतील. भाजपास अस्वस्थता, अस्थिरतेची वाळवी लागेल. राणे यांच्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये बहुजन समाज विरुद्ध इतर अशी सरळ फाळणी होईल. राणेच ती करतील. त्या विघटनास सुरुवात झाली आहे.

मानिवली गावचे रघूनाथ गायकर यांची कल्याण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती !!

मानिवली गावचे रघूनाथ गायकर यांची कल्याण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती !!


कल्याण, (संजय कांबळे) : शांत, संयमी आणि वैचारिक बैठक असलेले मानिवली गावचे सुपूत्र रघूनाथ राजाराम गायकर यांची न्यू  महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कल्याण तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर आपण तालुक्यातील पोलीस पाटलांच्या ज्या अडचणी, प्रश्न आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.


महाराष्ट्र राज्यात पोलीस पाटील हा अंत्यत महत्त्वाचा घटक आहे, गाव पातळीवर तो शासनाने डोळे व कान म्हणून काम करीत असतो. स्वर्गीय गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात पोलीस पाटलांचे खूप महत्त्वाचे योगदान होते. या समितीचे ते निमंत्रक म्हणून काम करत होते. राज्यात सध्या २७ हजार ७२० पोलीस पाटील कार्यरत असून सुमारे १२ हजाराच्या आसपास पोलीस पाटलांची पदें रिक्त आहेत.


पोलीस पाटील हे पद महसुल व पोलीस या दोन्ही विभागाशी संबंधित पद असून गावातील कायदा व सुव्यवस्था व  इतर अनेक शासकीय कामामध्ये पोलीस पाटील हे शासनाला मदत करत असतात. अशा न्यू महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कल्याण तालुका अध्यक्ष पदी मानिवली गावचे रघूनाथ राजाराम गायकर यांची नियुक्ती राज्य अध्यक्ष पंढरीनाथ नारायण पाटील यांनी केली आहे.

रघूनाथ गायकर हे उच्च शिक्षित असून शेतकरी देखील आहेत. विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक  कार्यात नेहमी यांचा सक्रीय सहभाग असतो. सर्व सामान्य माणसाच्या मदतीला धाऊन जाणारा पोलीस पाटील यांची ओळख असून त्यांची कल्याण तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने तालुक्यातील सर्व गावाच्या पोलीस पाटलांनी समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कल्याण तहसीलदार दिपक आकडे, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, जनाधार निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा एस के फिल्म प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख संजय कांबळे आदींनी रघूनाथ गायकर यांचे अभिनंदन केले आहे. तर आपण तालुक्यातील पोलीस पाटलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वरीष्ठांच्या मार्गदर्शना नुसार  प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष रघूनाथ गायकर यांनी सांगितले.

Saturday 28 August 2021

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात आढळली १४ मुले कोरोना पाँझिटिव्ह !!

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात आढळली १४ मुले कोरोना पाँझिटिव्ह !!


कल्याण : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या १४ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. घटनेनंतर बालसुधारगृहात एकच खळबळ माजली आहे. यामध्ये ४ मुले अपंग आहेत. महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये संबंधित मुले कोरोना बाधित आढळली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही मुलांना ताप आणि खोकला झाला होता. त्यामुळे या बालसुधार गृहातील मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यानंतर यापैकी १४ मुलांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. १४ मुलं कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बालसुधारगृहाने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. गुरूवारी एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये २५ मुलांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातले १४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. उल्हासनगर महापालिकेचे पीआरओ युवराज भदाणे यांनी ही माहिती दिली की १४ मुलांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर १० कर्मचाऱ्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट आम्ही केली आहे. त्या टेस्टचे निकाल अद्याप यायचे आहेत.

ठाकूरपाडा गोवेली येथील आदिवासी बांधवाना मिळणार बोरवेलचे पाणी, एक वर्षांपासून बंद होती बोरवेल ?

ठाकूरपाडा गोवेली येथील आदिवासी बांधवाना मिळणार बोरवेलचे पाणी, एक वर्षांपासून बंद होती बोरवेल ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गापासुन एक ते दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकूरपाडा गोवेली येथील आदिवासी वाडीत गेल्या वर्षी खोदलेली बोरवेल नादुरुस्त झाल्याने बंद पडली होती. परंतु आता पत्रकार संजय कांबळे यांच्या पुढाकाराने ही बोरवेल लवकरच दुरुस्ती होणार असल्याने येथील आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे.


गोवेली ग्रामपंचायत हद्दीत ठाकूरपाडा ही आदिवासी वस्ती आहे. साधारण पणे ५०/६० घरे असलेल्या या वाडीत गेल्या वर्षी जिप शाळेच्या बाजूला बोरवेल खोदण्यात आली होती. सुदैवाने १५० फुटावर पाणी लागल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत होते. या पाण्यामुळे आजूबाजूच्या नांगरिकांना तसेच शाळेतील इयत्ता १ ली ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होत होता. परंतु काही कारणांमुळे ही बोरवेल नादुरुस्त झाली. यांच्या आजूबाजूला पालापाचोळा, गवत वाढले होते.


गोवेली गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर अर्धा ते एक  किमी अंतरावर दुसरी एक बोरवेल आहे, तिच्या वर मोटर बसवून गावात पाणी आणले आहे. परंतु लाईट गेली किंवा काही अडचणी आल्या तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, किंवा गणपत हिंदोळे यांच्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. असे येथील महिलांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची बोरवेल दुरुस्ती करुन मिळावी अशी मागणी पत्रकार संजय कांबळे यांच्या कडे बोलून दाखवली.

त्यांनी ताबडतोब येथे भेट देऊन बोरवेलची पाहणी केली. बोरवेल परिसरातील वाडलेले गवत, पालापाचोळा स्वच्छ करण्याच्या सूचना येथील सुरेश हिंदोळे, सोमा हिंदोळे व इतर तरुण मंडळीला सांगितले व त्वरित भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जिप ठाणे या विभागातील आर व्ही लव्हाटे यांना ही अडचण सांगितली, त्यांनी ही ताबडतोब या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व या बोरवेलचे सिंलेडर पँरेल तुटल्याचे सांगितले. लगेचच दुरुस्ती साठी पाऊले उचलली. तसे पाहिले तर कल्याण तालुक्यात २८४ बोरवेल आहेत. दर महिन्यात १५/२० बोरवेल दुरुस्त केल्या जातात. हातपंप, वाँल, वाशार, चैन तुटणे अश्या दुरुस्या निघतात. तर काही गावात लहान मुले किंवा इतर बोरवेल मध्ये दगड व इतर काही टाकल्याने नादुरुस्त होतात. असे लव्हाटे यांचे म्हणने आहे.

गोवेली ठाकूरपाडा येथील बोरवेल च्या दुरुस्ती चे काम प्राधान्याने हाती घेतल्याने ते येत्या सोमवार पर्यत पुर्ण होऊन आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे. त्यामुळे येथील गोवेली ग्रामपंचायतीच्या माझी सदस्यांं श्रीमती सुरेखा दुंदा हिंदोळे, सामाजिक कार्यकर्ते गणपत हिंदोळे, गुरुनाथ हिंदोळे, विठ्ठल हिंदोळे, सोमा हिंदोळे, सुरेश हिंदोळे, गुलाब हिंदोळे, रेश्मा हिंदोळे, कमल हिंदोळे आणि बुधाजी हिंदोळे, आदींनी पत्रकार व भूजल सर्वेक्षण विकास विभागाचे कर्मचारी यांचे आभार मानले आहे.

पुढील आठवडय़ात राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज !!

पुढील आठवडय़ात राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज !!


पुणे : ऑगस्ट महिन्यात चांगल्या पावसाच्या खंडानंतर गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस फारकाळ टिकला नसला, तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरिपाला जीवदान मिळाले. पुढील आठवडाभरात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सातत्याने पडणारे खंड, कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सून हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. पुढील दोन आठवड्यांत पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या अंदाजानुसार २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईतील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीच्या घरात सापडलं घबाड; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.!!

मुंबईतील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीच्या घरात सापडलं घबाड; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.!!भिवंडी, दिं,28, अरुण पाटील (कोपर) :
           मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत या कारवाई अंतर्गत मुंबईतील आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या वर्षी 24 मे रोजी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड याला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती.
           या नथू राठोडच्या चौकशीत त्याच्या उत्पन्ना पेक्षा तब्बल 555 टक्के जास्त इतकी संपत्ती आढळली असून ही संपत्ती ३ कोटी ४९ लाख ९ हजार ३८४ इतकी आहे. कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 या कलमाखाली नथू राठोड याला अटक करण्यात आली होती. गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत तक्रारदाराचे घराची दुरुस्ती करिता परवानगी मिळवण्यासाठी तक्रारदाराने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता पण अनेक दिवस त्याला परवानगी नाकारली जात होती. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी आरे नथू राठोड यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तक्रारदार याला त्याच्या घराच्या दुरुस्ती करता परवानगी देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरे नथू राठोड यांनी मंजुरी देण्याचे कबूल केले. मात्र त्याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात असलेल्या अरविंद तिवारी या शिपाईची भेट घेण्यास सांगितले.
            अरविंद तिवारी याने नथू राठोड यांच्या वतीने तक्रारदाराला एक लाख रुपये लाच मागितली आणि त्यानंतर तडजोडी अन ती ५० हजार रुपये लाचेची रक्कम देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराला ही रक्कम द्यायची नसल्याने तक्रारदाराने नथू राठोड यांच्यासंबंधी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली या तक्रारीची शहानिशा करण्याकरता मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला या अनुषंगाने वरळी दूध डेरी येथे अरविंद तिवारी याने तक्रारदाराला भेटायला बोलावले होते. त्यानुसार तक्रारदार एसीबीच्या सांगण्याने वरळी दूध डेरी येथे गेला आणि तेथे अरविंद तिवारी याला ५० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना २४ मे २०२१ या दिवशी रंगेहात अटक केली होती.
           या प्रकरणी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी चौकशी केली असता अशाच पद्धतीने आरे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड याने भरपूर काळी माया जमवलेली आहे, असं मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांच्या सुत्रांमार्फत कळालं असून याआधारे मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरी धाड टाकली असता या धाडीत तब्बल 3 कोटी 46 लाख दहा हजार रुपये रोख रक्कम नथू राठोड यांच्या घरी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली होती. ही सर्व रक्कम नथू राठोड याने कशी कमवली आणि कोणाकडून लाच घेतली त्याचबरोबर कोणत्या कामाकरता लाच घेतली होती, या सर्व बाबींची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.
         आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड याचे अधिक चौकशी केली जात असून नथू राठोड याची उघड उघड चौकशी झाली असून आता नथू राठोड यांच्या आणखी संपत्तीची चौकशी देखील मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येणार आहे.

Friday 27 August 2021

सोनटके येथील पोलीस पाटील हल्ला प्रकरणी आरोपींवर वाढीव कलम दाखल ; आरोपी फरार !

सोनटके येथील पोलीस पाटील हल्ला प्रकरणी आरोपींवर वाढीव कलम दाखल ; आरोपी फरार !


भिवंडी, उमेश जाधव -: भिंवडी तालुक्यातील सोनटक्के गावातील पोलीस पाटील दिपक पाटील यांच्यवर गावातील गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या हल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरू आहेत. 


याप्रकरणी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रुपेश भगत हा दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने पत्नीने पती रुपेश विरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असता गावचे पोलीस पाटील या नात्याने तालुका पोलिसांनी पोलीस पाटील दीपक पाटील यांना आरोपी रुपेश भगत यास पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा निरोप देण्यास सांगितले असता पोलिसांचा निरोप रुपेश यास दिला असता या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांनी पोलिस पाटील कवाड येथे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी गाठून या दोघांनीही लाकडी दांडक्यानी व लाथाबूक्यांनी मारहाण करून पोलीस पाटील यांना गंभीर जखमी केले. 


या मारहाण प्रकरणी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र जखमी पोलीस पाटील हे शासकीय सेवक असल्याने आरोपींवर गंभीर गुन्ह्याची नोंद व्हावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील यांच्या कुटुंबियां बरोबरच पोलीस पाटील संघटना, बाळकडू पत्रकार संघ तसेच श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आली होती. शुक्रवारी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर गंभीर गुन्हा दाखल केल्याची मागणी केल्या नंतर शुक्रवारी तालुका पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात कलम ३५३ सह इतर गंभीर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील दोन्ही आरोपी अजूनही फरार असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

इडीने लावली सीडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 5 कोटींच्या मालमत्तेवर जप्त.!

इडीने लावली सीडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 5 कोटींच्या मालमत्तेवर जप्त.!


भिवंडी (कोपर), अरुण पाटील दि. २७ :
         राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  एकनाथ खडसे यांनी माझ्यावर कारवाई केल्यास मीच सीडी लावीन अशी धमकी दिली होती. आता एडीनेच शिडी लावत खडसे   यांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव  येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
              भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी ईडीकडून केली जात आहे. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ही ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
        MIDC अधिकाऱ्यानं जबाबात मोठा खुलासा केला. या खुलासामुळे एकनाथ खडसे याचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. जमिनीचे भाव कमी करायला गिरीशने भाग पाडले होते. 22 कोटींची जमीन 3.75 कोटींना विकण्यास दबाव होता, असं अधिकाऱ्यानं आपल्या जबाबात म्हटलं आहे. तसंच शासकीय महसूल बुडवण्यासाठी दबाव केला होता. जमिनीची किंमत कमी दाखवल्यानं स्टॅम्प ड्युटी देखील कमी भरावी लागली. निबंधक विभागाने जमिनीचे हस्तांतर करण्यास नकार ही दिला होता, असं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
         2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला, असा आरोप ईडीनं केला आहे. या भूखंडाचा बाजारभाव 31 कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड MIDCच्या मालकीचा होता, असं ईडीनं म्हटलं आहे.त्यामुळे इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? तसंच गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा Source काय? या सवालांच्या आधारे ईडीनं तपास सुरु केला होता.

कोकणवासीय पूरग्रस्त बांधवाना शिव शक्ती बाल मित्र बहिरवली ग्रामीण, मुंबई आणि पुणे मंडळाकडून कर्तव्य दक्ष मदतीचा हात !

कोकणवासीय पूरग्रस्त बांधवाना शिव शक्ती बाल मित्र बहिरवली ग्रामीण, मुंबई आणि पुणे मंडळाकडून कर्तव्य दक्ष मदतीचा हात !


कोकण : 

२२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते, अनेकांचे संसार उध्वस्त झाले पावसाच्या पाण्याने लोकांना २ ते ३ दिवस घराच्या छतावर राहावे लागले असता अनेक संकटाना सामोरे जावे लागत होते.


 पुराचे पाणी ओसरल्यावर लोकांच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट होती घरामध्ये खूप मोट्या प्रमाणात चिखलाचा थर साचला होता अशा परिस्थितीत शिव शक्ती बाल मित्र मंडळातील लोकांनी सतत तीन दिवस चिपळूण व खेड या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवून आपले कर्तव्य जोपासत समाजच ऋण फेडण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले आणि काही दिवसात त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ताट, वाटी, ग्लास, चहाचा कप, निरंजन, फिनेल, डेटॉल, मच्छर अगरबत्ती, ब्लॅंकेट, टॉवेल, सतरंजी अश्या एकूण अकरा वस्तूंचे चिपळूण या ठिकाणी लोकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप करून कोकणातील लोकांना कर्तव्य दक्ष मदत करून आपले दायित्व जपले आहे, यासाठी ग्रामीण, मुंबई व पुणे मंडळ, तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते यांचे मित्र परिवार, नातेवाईक आणि यामध्ये जि. प.प्रा. शाळा बहिरवली मराठी शाळेचे माजी शिक्षक यांनी देखील आर्थिक स्वरूपात मदतीचा हात पुढे केला.

कोकणवासीय पूरग्रस्त बांधवाना शिव शक्ती बाल मित्र बहिरवली ग्रामीण, मुंबई आणि पुणे मंडळाकडून कर्तव्य दक्ष मदतीचा हात !

कोकणवासीय पूरग्रस्त बांधवाना शिव शक्ती बाल मित्र बहिरवली ग्रामीण, मुंबई आणि पुणे मंडळाकडून कर्तव्य दक्ष मदतीचा हात !


कोकण : 

२२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते, अनेकांचे संसार उध्वस्त झाले पावसाच्या पाण्याने लोकांना २ ते ३ दिवस घराच्या छतावर राहावे लागले असता अनेक संकटाना सामोरे जावे लागत होते.


पुराचे पाणी ओसरल्यावर लोकांच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट होती घरामध्ये खूप मोट्या प्रमाणात चिखलाचा थर साचला होता अशा परिस्थितीत शिव शक्ती बाल मित्र मंडळातील लोकांनी सतत तीन दिवस  चिपळूण व खेड या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवून आपले कर्तव्य जोपासत समाजच ऋण फेडण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले. आणि काही दिवसात त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ताट, वाटी, ग्लास, चहाचा कप, निरंजन, फिनेल, डेटॉल, मच्छर अगरबत्ती, ब्लॅंकेट, टॉवेल, सतरंजी अश्या एकूण अकरा वस्तूंचे चिपळूण या ठिकाणी लोकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप करून कोकणातील लोकांना कर्तव्य दक्ष मदत करून आपले दायित्व जपले आहे,यासाठी ग्रामीण, मुंबई व पुणे मंडळ,तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते यांचे मित्र परिवार, नातेवाईक आणि यामध्ये जि. प.प्रा.शाळा बहिरवली मराठी शाळेचे माजी शिक्षक यांनी देखील आर्थिक स्वरूपात मदतीचा हात पुढे केला.

Thursday 26 August 2021

ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे शाहत्तर कुंटूबाचे घरांचे स्वप्नं होणार साकार, सर्वोत्कृष्ट तालुक्याचा मान मुरबाडला !!

ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे शाहत्तर कुंटूबाचे घरांचे स्वप्नं होणार साकार, सर्वोत्कृष्ट तालुक्याचा मान मुरबाडला !!


कल्याण, (संजय कांबळे) : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महा आवास अभियान काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी आवारातील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये जिल्ह्यातील ९३७६ कुंटूबांंचे घरांचे स्वप्नं साकार झाले आहे.तर सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून मुरबाडला प्रथम क्रमांक मिळाला आहे त्यामुळे सर्वत्र प्रशासन व पदाधिकाऱी यांचे कौतुक होत आहे.


सर्वांसाठी घरे २०२२ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्याकरीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करून गुणवत्तावाढीसाठी जिल्हात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्यात आले. 


या अभियान काळावधीमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना महाआवास अभियान पुरस्कार आणि महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे महानगरपालिका महापौर नरेश म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा, पोलीस आयुक्त जय जीत सिंह, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी जिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आदी अधिकारी उपस्थित होते. 


आज अखेर ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ६१८८ घरकुल पूर्ण करण्यात आली, यापैकी अभियान काळात ६४५ घरकुल पूर्ण करण्यात आली तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये ३१८८ घरकुले पूर्ण करण्यात आली असून अभियान कालावधीमध्ये ४४२ घरकुले पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.

सर्वोत्कृष्ट तालुका ( प्रधानमंत्री आवास योजना)

प्रथम क्रमांक - मुरबाड 

द्वितीय क्रमांक - भिवंडी 

तृतीय क्रमांक - कल्याण 

सर्वोत्कृष्ट तालुका ( राज्य पुरस्कृत योजना)

प्रथम क्रमांक - कल्याण 

द्वितीय क्रमांक - मुरबाड

तृतीय क्रमांक - भिवंडी

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट क्लस्टर ( प्रधानमंत्री आवास योजना)

प्रथम क्रमांक - हाजीमलंगवाडी, ता.अंबरनाथ 

द्वितीय क्रमांक - दिघाशी ता.भिवंडी

तृतीय क्रमांक - साकडबाव- ता.शहापूर 

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट क्लस्टर ( राज्य पुरस्कृत आवास योजना)

प्रथम क्रमांक - वैशाखरे ता.मुरबाड

द्वितीय क्रमांक - आवाळे ता.शहापूर

तृतीय क्रमांक - शेलार ता.भिवंडी 

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ( प्रधानमंत्री आवास योजना)

प्रथम-ग्रामपंचायत राया, ता.कल्याण

द्वितीय क्रमांक -ग्रामपंचायत झाडघर ता.मुरबाड 

तृतीय क्रमांक - ग्रामपंचायत वांगणी, ता.अंबरनाथ

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ( राज्य पुरस्कृत आवास योजना)

प्रथम- ग्रामपंचायत काकडपाडा, ता.कल्याण

द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आंबेशीव ता.अंबरनाथ

तृतीय - ग्रामपंचायत माळ, ता.मुरबाड 

संख्येनुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत ( प्रधानमंत्री आवास योजना)

ग्रामपंचायत कोळीशी, ता.मुरबाड, ग्रामपंचायत शिंदगाव ता.मुरबाड, ग्रामपंचायत दहिगाव ता.शहापूर 

संख्येनुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत ( राज्य पुरस्कृत आवास योजना)

ग्रामपंचायत एकलहरे ता. मुरबाड, ग्रामपंचायत कलभोंड, ता.मुरबाड, ग्रामपंचायत खरीवली ता. शहापूर अशाप्रकारे जिल्ह्यातील सुमारे ९३७६ कुंटूबियांना हक्काचे घर मिळत असून अजूनही काही गावात लाभार्थी आहेत की ज्यांना घरकुलांची नितांत आवश्यकता आहे, या संदर्भात मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार यांना विचारले असता ते म्हणाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, माझे सर्व अधिकारी व कर्मचारी सभापती, उपसभापती, लोकप्रतिनिधी सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, लाभार्थी व नागरिकांच्या सहकार्याने मुरबाडला सर्वोत्कृष्ट तालुक्याचा मान मिळाला.

 

'मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह' येथे कोविड १९ महालसीकरण मोहीम संपन्न !

'मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह' येथे कोविड १९ महालसीकरण मोहीम संपन्न !


मुंबई, (केतन भोज) ; महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, युवासेना प्रमुख व पालकमंत्री श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून व रिलायन्स फाऊंडेशनच्या आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या सहकार्याने मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह घाटकोपर पश्चिम येथे एकूण ४३०० नागरीकांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले. 


दि.२४ व २५ ऑगस्ट रोजी पार पडलेली ही लसीकरण मोहीम शिवसेना सचिव श्री.सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना ईशान्य विभागप्रमुख श्री. राजेंद्र राऊत व विभागसंघटिका सौ. भारती बावदाणे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. 


यासाठी श्री. संजय मशिलकर, मंदार चव्हाण, अजिंक्य वाणी, रिलायन्स फाऊंडेशनचे श्री.आरीश व डाॅ. संदेश तसेच एन विभाग प्रभाग समिती अध्यक्षा सौ. स्नेहल मोरे, स्थानिक नगरसेविका डॉ. सौ. अर्चना भालेराव, विधानसभा समन्वयक श्री.संजय (दादा) भालेराव, उपविभाग प्रमुख श्री. सुनील मोरे, श्री. विजय पडवळ, विधानसभा संघटक श्री.शशिकांत थोरात, उपविभाग संघटीका सौ.संजना सारंग, सह संघटक श्री. सुनिल पाटील तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका एन वार्ड आरोग्य अधिकारी श्री. खांदाडे यांचे विशेष सहकार्य या कोविड १९ लसीकरण मोहिमेला लाभले. ही महालसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखेच्या सर्व पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी च्या कार्यकर्ते यांनी कठोर परिश्रम घेतले.

सोनटक्के गावातील पोलिस पाटील दिपक पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला !! 'भिंवडी रूग्णालयात उपचार सूरू'

सोनटक्के गावातील पोलिस पाटील दिपक पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला !!
'भिंवडी रूग्णालयात उपचार सूरू'


भिवंडी, उमेश जाधव -: भिंवडी तालुक्यातील सोनटक्के गावातील पोलीस पाटील दिपक पाटील यांना गावातील गावगुंडांनी प्राणघात हल्ला केला. या हल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी झाले, असून त्यांचा डावा पाय फँक्चर झाल्याने त्यावर भिंवडीच्या इंदिरा गांधी रूग्णालयात उपचार सूरू आहेत.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, रूपेश भगत यांच्या भांडणाचा भिवंडी तालुका पोलिसांचा निरोप पोलिसपाटलांनी दिल्याच्या राग मनात धरून पोलिस पाटलांना कवाड येथे एकटे गाठून दोघा हल्लेखोरांनी लाकडी दांडक्यानी व लाथाबूक्यांनी मारहाण करून जखणी केले आहे. या मारहाणीत पोलिस पाटील दिपक दाजी पाटील यांच्या नाकाला, पाठित व डोळ्याला दूखापत झाली आहे. गणेश मारूती भगत व रूपेश राजाराम भगत अशी हल्लेखोराची नावे आहेत. या संदर्भात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर शासकीय कामात अडथला आणल्या प्रकरणी व शासकीय कर्मचाऱ्याला गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस पाटील संघटनेचे कोकण विभखगीय अध्यक्ष साईनाथ पाटील, भिंवडी तालूका अध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी भिंवडी तालूका पोलिसाकडे केली आहे. चौकशी करुन योग्य कलम लावून कारवाई करण्यात येईल अशी माहिती भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी सांगितले.

'बीस साल बाद' : सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा जिकल्यानंतरही कामगार न्यायच्या प्रतीक्षेत.!

'बीस साल बाद' : सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा जिकल्यानंतरही कामगार न्यायच्या प्रतीक्षेत.!


भिवंडी, दिं,26, अरुण पाटील (कोपर) :

           वीस वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला तीन कामगारांना उच्च न्यायालयात यश आले. तरीही भिवंडी पालिका प्रशासन केवळ त्या तीन कामगारांच्या विरोधात लाखो रुपये खर्च करून सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कामगार विरोधातील याचिका फेटाळून महापालिका प्रशासनाला चपराक लगावली आहे. आता त्या निकालास दीड महिना उलटून गेला तरी, निकालानुसार अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासन चालढकल करत असल्याचे त्या कामगारांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उघड झाले आहे. यामुळे 'बीस साल बाद' सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळवूनही कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले आहे.
                कामगार न्यायालयाने कामावर घेण्याचे होते आदेश देऊनही, मात्र भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात 2001 साली हंगामी बदली वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या दहा कामगारांना कामावरून अचानक कमी केले होते. त्या विरोधात अनेकांनी न्यायालयात दाद मागितली असता कामगार न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशाने अनेकांना कामावर रुजू करून घेतले. पण, विनोद पांडुरंग पाटील, सुगेश शांताराम दिवेकर, जितेंद्र विठ्ठल काबाडी या तीन कामगारांबाबत निर्णय न झाल्याने या तिन्ही कामगारांनी कामगार न्यायालयात दाद मागितली असता 2019 मध्ये कामगार न्यायालयाने प्रत्येकी तीन लाख नुकसान भरपाई व 2001 पासून सेवेत घेण्याचे आदेश दिले.
            आजही कामगार न्यायालयाच्या आदेशाला पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयानेही तीन कामगारांच्या बाजूने निकाल देत, तीन लाख रुपये न देता 2010 पासून सेवेत घेण्याबाबत तडजोड करण्याचे सुचविले. त्यावेळी तत्कालीन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहमती दर्शविली. दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी उच्च न्यायालयातील तडजोड अमान्य करत यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय उशिराने घेतला. त्यामुळे 2001 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगार कुटुंबियांवर आर्थिक बेरोजगारीची टांगती तलवार आजही कायम आहे.
               भिवंडी पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात लाखो रुपये खर्च करून कामगारांच्या बाजूला लागलेल्या निर्णयाला आव्हान दिले. विशेष म्हणजे एकदा उच्च न्यायालयासमोर तडजोड मान्य केली असताना पुन्हा त्यास आव्हान देणे चुकीचे असल्याचे नमूद करत पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका 4 जुलै रोजी फेटाळली. पण, त्यास दीड महिना उलटूनही त्यांना अजूनही कामावर रुजू करून घेत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
               या प्रकरणी पालिका प्रशासन विनाकारण वेळकाढूपणा करीत असून जनतेच्या लाखो रुपये पैशांची धूळधाण करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचा आरोप नगरसेवक अरुण राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे 20 वर्षानंतर न्यायालयीन लढा देणाऱ्या तीन कामगारांना तात्काळ सेवेत रुजू करून घेण्याबाबत स्थायी समितीने निर्णय घेतला होता. तसेच भिवंडीतील आमदार महेश चौघुले, रईस शेखसह अनेक नगरसेवकांनी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करून या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यासाठी विनंत्या केल्या. मात्र, पालिका प्रशासन व आस्थापना विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विलंब लावत असल्याबद्दल स्थानिक आमदारांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पालिकेचे विधी अधिकारी अनिल प्रधान यांच्याशी संर्पक साधला असता, त्या 3 कामगारांना कामावर रुजू करून घेण्यासाठी प्रस्ताव पालिकेच्या आस्थापना विभागाकडे पाठविल्याचे सांगितले.

Wednesday 25 August 2021

शिव सेना - युवा सेना ईशान्य मुंबई विभाग क्र.८ यांच्या वतीने कोव्हिड १९ भव्य महालसीकरण मोहीम संपन्न !

शिव सेना - युवा सेना ईशान्य मुंबई विभाग क्र.८ यांच्या वतीने कोव्हिड १९ भव्य महालसीकरण मोहीम संपन्न !


मुंबई, (केतन भोज) ; शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, युवासेनाप्रमुख व पालकमंत्री श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतुन व रिलायन्स फाऊंडेशनच्या आणि महापालिकेच्या सहकार्याने ईशान्य मुंबई विभाग क्र.८ मधील गोवंडी येथील शिवम हायस्कुल, शिवाजीनगर येथील ज्ञानसंपदा हायस्कुल, घाटकोपर पूर्व येथील राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज टेक्निकल स्कुल तर घाटकोपर पश्चिमेस माता रमाबाई ठाकरे रुग्णालय आणि मनोरंजन हाॅल येथे एकूण १५००० नागरीकांचे यशस्वीपणे लसिकरण करण्यात आले. 


यावेळी नागरिकांनीही या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिनांक २३ आॅगस्ट, २४आॅगस्ट व २५ आॅगस्ट रोजी पार पडलेली हे भव्य लसीकरण मोहीम शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.


यासाठी श्री.संजय मशिलकर,मंदार चव्हाण, रिलायन्स  फाऊंडेशनचे श्री.निधी गौरव, श्री.आरीश व डाॅ.संदेश तसेच एन वार्ड आरोग्य अधिकारी श्री.खांदाडे, एम पूर्वचे शिवकुमार यांचे विशेष सहकार्य यावेळी लाभले. नगरसेवक विठ्ठल लोकरे, समिक्षा सक्रे, परमेश्वर कदम, अर्चना भालेराव, सुरेश पाटील, अश्विनी हांडे व एन विभाग प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे तसेच उपविभाग प्रमुख तात्या सारंग, हेमंत साळवी, अख्तर शेख, गणेश नायडु,चंद्रपाल चंदेलिया,बाबू दरेकर,सुनिल मोरे, विजय पडवळ, प्रकाश भेकरे, विलास पवार व सर्व शाखाप्रमुख, महीला आघाडी, युवासेना यांनी तीन दिवस अतोनात मेहनत घेऊन ही लसीकरण शिबीरे यशस्वी केली.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...