Thursday 26 August 2021

ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे शाहत्तर कुंटूबाचे घरांचे स्वप्नं होणार साकार, सर्वोत्कृष्ट तालुक्याचा मान मुरबाडला !!

ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे शाहत्तर कुंटूबाचे घरांचे स्वप्नं होणार साकार, सर्वोत्कृष्ट तालुक्याचा मान मुरबाडला !!


कल्याण, (संजय कांबळे) : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महा आवास अभियान काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी आवारातील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये जिल्ह्यातील ९३७६ कुंटूबांंचे घरांचे स्वप्नं साकार झाले आहे.तर सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून मुरबाडला प्रथम क्रमांक मिळाला आहे त्यामुळे सर्वत्र प्रशासन व पदाधिकाऱी यांचे कौतुक होत आहे.


सर्वांसाठी घरे २०२२ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्याकरीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करून गुणवत्तावाढीसाठी जिल्हात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्यात आले. 


या अभियान काळावधीमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना महाआवास अभियान पुरस्कार आणि महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे महानगरपालिका महापौर नरेश म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा, पोलीस आयुक्त जय जीत सिंह, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी जिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आदी अधिकारी उपस्थित होते. 


आज अखेर ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ६१८८ घरकुल पूर्ण करण्यात आली, यापैकी अभियान काळात ६४५ घरकुल पूर्ण करण्यात आली तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये ३१८८ घरकुले पूर्ण करण्यात आली असून अभियान कालावधीमध्ये ४४२ घरकुले पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.

सर्वोत्कृष्ट तालुका ( प्रधानमंत्री आवास योजना)

प्रथम क्रमांक - मुरबाड 

द्वितीय क्रमांक - भिवंडी 

तृतीय क्रमांक - कल्याण 

सर्वोत्कृष्ट तालुका ( राज्य पुरस्कृत योजना)

प्रथम क्रमांक - कल्याण 

द्वितीय क्रमांक - मुरबाड

तृतीय क्रमांक - भिवंडी

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट क्लस्टर ( प्रधानमंत्री आवास योजना)

प्रथम क्रमांक - हाजीमलंगवाडी, ता.अंबरनाथ 

द्वितीय क्रमांक - दिघाशी ता.भिवंडी

तृतीय क्रमांक - साकडबाव- ता.शहापूर 

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट क्लस्टर ( राज्य पुरस्कृत आवास योजना)

प्रथम क्रमांक - वैशाखरे ता.मुरबाड

द्वितीय क्रमांक - आवाळे ता.शहापूर

तृतीय क्रमांक - शेलार ता.भिवंडी 

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ( प्रधानमंत्री आवास योजना)

प्रथम-ग्रामपंचायत राया, ता.कल्याण

द्वितीय क्रमांक -ग्रामपंचायत झाडघर ता.मुरबाड 

तृतीय क्रमांक - ग्रामपंचायत वांगणी, ता.अंबरनाथ

संचित प्रगती व अभियान प्रगती नुसार सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ( राज्य पुरस्कृत आवास योजना)

प्रथम- ग्रामपंचायत काकडपाडा, ता.कल्याण

द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आंबेशीव ता.अंबरनाथ

तृतीय - ग्रामपंचायत माळ, ता.मुरबाड 

संख्येनुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत ( प्रधानमंत्री आवास योजना)

ग्रामपंचायत कोळीशी, ता.मुरबाड, ग्रामपंचायत शिंदगाव ता.मुरबाड, ग्रामपंचायत दहिगाव ता.शहापूर 

संख्येनुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत ( राज्य पुरस्कृत आवास योजना)

ग्रामपंचायत एकलहरे ता. मुरबाड, ग्रामपंचायत कलभोंड, ता.मुरबाड, ग्रामपंचायत खरीवली ता. शहापूर अशाप्रकारे जिल्ह्यातील सुमारे ९३७६ कुंटूबियांना हक्काचे घर मिळत असून अजूनही काही गावात लाभार्थी आहेत की ज्यांना घरकुलांची नितांत आवश्यकता आहे, या संदर्भात मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार यांना विचारले असता ते म्हणाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, माझे सर्व अधिकारी व कर्मचारी सभापती, उपसभापती, लोकप्रतिनिधी सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, लाभार्थी व नागरिकांच्या सहकार्याने मुरबाडला सर्वोत्कृष्ट तालुक्याचा मान मिळाला.

 

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...