Sunday 28 February 2021

कल्याण मुरबाड महामार्ग बेवारस, मलिदा कोणाला तर त्रास जनतेला?

कल्याण मुरबाड महामार्ग बेवारस, मलिदा कोणाला तर त्रास जनतेला?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड नगर या महामार्गावरून ये जा करणारी अवजड वाहने, रस्त्यावर अनाधिकृत पणे उभी राहणा-या गाड्या यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि केवळ 'कलेक्टर' ची भूमिका बजावणारे वाहतूक पोलीस यामुळे सध्या कल्याण मुरबाड महामार्ग हा बेवारस झाला आहे. त्यामुळेच मलिदा खातो कोण व त्रास कोणाला असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कलेक्शन अर्थात कलेक्टर हे कोणाला म्हटले जाते हे माहीत नाही असा वाहनचालक, ड्रायव्हर, वाहतूक पोलीस किंवा पोलीस अथवा एंजट शोधून सापडणार नाही. त्यामुळे काही पोलीस मुद्दाम गर्दीची ठिकाणे ड्युटी मागून घेतात, आता यांच्या मदतीला रितसर वार्डन दिले आहेत. त्यामुळे आता हे बिनधास्त, काही करा बळीचा बकरा वार्डन, अर्थात सर्वच वाईट अथवा भ्रष्टाचारी नाहीत हेही तितकेच खरे आहे. उन वारा पाऊस धुळ, धूर अशा जिवघेण्या अडचणीत ही इमानेइतबारे ड्युटी करणारे आहेत. पण करतो एखाद्या आणि नशिबाला येते सर्वाच्या, असो कल्याण मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणारा नगर हा महामार्ग वाहतुकींच्या दृष्टीने खूपच महत्वाचा मानला जातो. परंतु सध्या हा महामार्ग बेवारस आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण या मार्गावरील वाहतूक कोंडी ही धोबीघाट पर्यंत उल्हासनगर शहर वाहतूक शाखा नियंत्रित करते. येथून पुढे म्हणजे म्हारळ ग्रामपंचायत हद्दीपासून ते रायते नदी व पुढील गोवेली पोलीस चौकीचे पोलीस यावर देखरेखीखाली वाहतूक चालते.
म्हारळ पोलीस चौकीत एक वाहतूक पोलीस आहेत त्यांच्याकडे इतका "अधी +भार" आहे की विचारता सोय नाही, ते कसे वाहतूक नियंत्रण करतात हे सर्व श्रुत आहे. तसा त्यांच्या कामाचा डंका वाजतोय, म्हारळ वाईन शाॅप समोरील वाहनांची गर्दी म्हारळ पाडा, वरप, टाटा पॉवर, पेट्रोल पंप येथील वाहतूक कोंडी, बजरंग हार्डवेअर चे रस्त्यावरील अतिक्रमण, मॅरेज हाॅल समोर रस्त्यावर अनाधिकृत उभ्या केलेल्या गाड्या, जागोजागी निर्माण झालेले रिक्षा स्टँड, यामुळे इको व रिक्षा यांच्यात उडणारे खटके यातून  मिळणाऱ्या 'कोंबडा पाट्या' काळी पिवळी चे सेक्शन, अवजड वाहनांचा अधिभार या सर्वांमुळे या मार्गावर कोणीही विनामास्क, विनाहेलमेट, विधाऊट लाईन्स, ओव्हर्ससीट चालण्यास जणू काही परवानगीच देण्यात आली आहे.. कालच भले मोठे एक अतिअवजड वाहन ऐन गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी ११/१२ च्या दरम्यान म्हारळ, वरप, कांबा, रायते अशा गर्दीच्या गावातून जाताना दिसले, विशेषतः येथे कोणताही वाहतूक पोलीस किंवा पोलीस नव्हते. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. दुर्दैवाने काही अपघात घडला असता तर याला कोण जबाबदार? अशी वाहने शक्यतो रात्री च्या वेळी रस्ता खाली असताना सोडायला हवीत, परंतु येथे असे दिसले नाही. त्यामुळे याचा त्रास मात्र जनतेला व या रस्त्यावरून ये जा करणा-या नागरिकांना होतो आहे. याबाबत आ किसन कथोरे यांना विचारले असता ते म्हणाले 'हा विषय येत्या अधिवेशनात उपस्थित केला जाईल तसेच रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे पाठपुरावा करण्यात येईल'.

Saturday 27 February 2021

कल्याण डोंबिवली महानगरपपालिका क्षेत्रातील गोरगरीब, गरजु रूग्णांसाठी आता तज्ञ‍ डॉक्टरांच्या सेवादेखील महापालिका रूग्णालयातील बाहय रूग्ण विभागात (OPD) उपलब्ध !

कल्याण डोंबिवली महानगरपपालिका क्षेत्रातील गोरगरीब, गरजु रूग्णांसाठी आता तज्ञ‍ डॉक्टरांच्या सेवादेखील महापालिका रूग्णालयातील बाहय रूग्ण विभागात (OPD) उपलब्ध !


कल्याण, (कडोमपा, जनसंपर्क विभाग) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बाई रूक्मिणीबाई रूग्णालय, शास्त्रीनगर रूग्णालय येथे तज्ञ खाजगी डॉक्टरांच्या पॅनलच्या माध्यमातून "1 मार्च 2021" पासून (OPD) बाहयरूग्ण विभागात रूग्णांसाठी तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये फिजीशियन नेत्रचिकित्सा, शल्यचिकित्सा, नाक कान घसा, दंत चिकित्सा तपासणी साठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत रूग्णासाठी तपासणी सेवा पुरविल्या जाणार आहेत. महानगरपालिकेच्या रूग्णालयात आता या सुविधांची उपलब्धता केल्यामुळे सर्वसामान्य गरजू रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

रूक्मिणीबाई रूग्णालयात बाहय रूग्णालय विभागात (OPD) :-

1) फिजीशियनची तज्ञ सेवा बाई रूक्मिणीबाई रूग्णालयात बुधवार आणि गुरूवार उपलब्ध होईल.

2) नेत्रचिकित्सा (Opthalmist) ची तज्ञसेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात सोमवार आणि शुक्रवार उपलब्ध होईल.

3) शल्य चिकित्सा (Surgeon) ची तज्ञसेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात बुधवार आणि शनिवार उपलब्ध असेल.

4) नाक, कान, घसा (ENT) ची तज्ञसेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात सोमवार आणि शुक्रवार उपलब्ध असेल.

5) दंत चिकित्सा (Dental) ची तज्ञ सेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात मंगळवार आणि शुक्रवार उपलब्ध असेल.

शास्त्रीनगर रूग्णालयात बाहय रूग्णालय विभागात (OPD) :-

1) फिजीशियनची तज्ञ सेवा शास्‍ञीनगर रूग्णालयात शुक्रवारी उपलब्ध असेल.

2) नेत्रचिकित्सा (Opthalmist) ची तज्ञसेवा शास्‍ञीनगर रूग्णालयात मंगळवार आणि गुरूवारी उपलब्ध असेल.

3) नाक,कान,घसा (ENT) ची तज्ञसेवा शास्‍ञीनगर रूग्णालयात मंगळवार आणि गुरूवारी उपलब्ध असेल.

तज्ञ खाजगी डॉक्टरांच्या मार्फत बाहय रूग्ण‍ विभागात तपासणी सुविधा सुरू होत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब, गरजू रूग्णांना दिलासा मिळणार आहे. या तज्ञ डॉक्टर सेवेचा लाभ रूग्णांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.

स्कूल बसचे चाक अकरा महिन्यांपासून रुतलेलेच ! "शाळा पुन्हा बंद झाल्याने चालक-मालक हवालदिल"....

स्कूल बसचे चाक अकरा महिन्यांपासून रुतलेलेच !

"शाळा पुन्हा बंद झाल्याने चालक-मालक हवालदिल"....


पुणे : करोनाची स्थिती मध्यंतरी काही प्रमाणात निवळल्यामुळे शाळा सुरू झाल्या आणि स्कूल बसही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र करोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतल्यामुळे शाळा बंद झाल्याने स्कूल बस चालक-मालक आणि सहायक हवालदिल झाले आहेत.
 
तब्बल अकरा महिन्यांपासून करोना संकटाच्या गाळात रूतलेले राज्यातील एक लाखांहून अधिक स्कूल बसचे चाक अद्यापही मोकळे होऊ शकले नाही. 

टाळेबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यामुळे माल आणि प्रवासी वाहतुकीतील वाहने सुरू झाली असली, तरी शाळा बंदमुळे स्कूल बस सुरू होऊ शकल्या नाहीत. 
करोनाची स्थिती काहीसी निवळल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय त्या-त्या स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला होता. 

त्यानंतरही स्कूल बसला परवानगी देण्यात आली नव्हती. काही दिवसांत अधिकृतपणे स्कूल बस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, राज्यात पुन्हा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आणि शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे स्कूल बस सुरू होण्याची शक्यता पुन्हा मावळली. 

अकरा महिन्यांपासून स्कूल बस बंद असल्याने त्यावरील चालक-मालक आणि विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या सहायकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. 
अनेक जण भाजी विक्री किंवा इतर काहीतरी कामधंदा करून कशीबशी गुजराण करीत आहेत. 

वाहने बंद असल्याने राज्य शासनाने डिसेंबरपर्यंत करात माफी दिली होती. ही मुदत आता संपली आहे. बॅका किंवा वित्त संस्थांचे हप्तेही सुरू आहेत. त्याचप्रमाणे विम्याबाबत कोणतीही सवलत मिळालेली नाही. व्यवसाय बंद असताना स्कूलबस चालकाच्या डोक्यावर अप्रत्यक्ष कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.

अपघातात जखमी झालेल्या गाईवर सर्जरी केल्यानंतर डॉक्टरही चक्रावले !!

अपघातात जखमी झालेल्या गाईवर सर्जरी केल्यानंतर डॉक्टरही चक्रावले !!

"पोटात सापडलं असं काही"….....


फरिदाबाद : रस्त्यावर फेकला जाणारा कचरा, प्लास्टिकची योग्य विल्हेवाट होत नसल्यास काय होऊ शकतं याबद्दल सर्वांनाच जागरुक करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
फरिदाबाद येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या गाईवर सर्जरी करण्यात आली असता डॉक्टरही चक्रावून गेले. 
गाईवर जवळपास चार तास सर्जरी सुरु होती. 
यावेळी गाईच्या पोटात तब्बल '७१ किलो प्लास्टिक' सापडलं. इतकंच नाही तर 'नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, पिन, सुई' अशा अनेक गोष्टी आढळल्या.

ही घटना आपल्या सर्वांनाच जागं करणारी असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत. गाईवर सर्जरी करण्यासाठी तीन सदस्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. गाई वरील सर्जरी यशस्वी झाली असली तरी गाय मात्र अद्यापही धोक्यात आहे. पुढील १० दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत अशी माहिती "डॉक्टर अतुल मौर्य" यांनी बोलताना दिली आहे. 

एका कारने दिलेल्या धडकेत गाय जखमी झाली होती. 
गाईला जनावरांच्या देवाश्रय रुग्णालयात नेण्यात आलं. 
यावेळी गाय आपल्या पोटावर लाथ मारत असल्याचं डॉक्टरांना आढळलं. पोटदुखीमुळे गाईला प्रचंड वेदना होत होत्या. डॉक्टरांनी काही चाचण्या आणि एक्स-रे काढल्यानंतर पोटात धोकादायक गोष्टी असल्याचं समोर आलं. यानंतर सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाईचं पोट साफ करण्यासाठी आम्हाला चार तास लागले. 

यामध्ये 'प्लास्टिक' सर्वाधिक होतं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. याशिवाय नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, पिन, सुई अशा अनेक नष्ट न होणाऱ्या गोष्टीही सापडल्या आहेत. 

आपल्या सर्वांसाठीच ही धोक्याची घंटा असल्याचं ते म्हणाले आहेत.

समीर खाडिलकर यांनी मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात !!

समीर खाडिलकर यांनी मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने जेष्ठ नागरिकांना  दिला मदतीचा हात !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

                  कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता समीर खाडिलकरही याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. आज दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. यापुर्वीही माझी वसुंधरा मित्र, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य समाजसेवक समीर खाडिलकर यांनी ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातील दिवा गणेश नगर आणि बी.आर.आर नगर येथील गरजूंना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे. तर ईशान्य मुंबईतील ३० जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार, मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना अन्नधान्य किटचे वाटप (वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले. नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते. आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात. ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत समाजसेवक समीर खाडिलकर कायमस्वरुपी बोलताना व्यक्त करतात.

            यापुर्वीच त्याच्या सेवाभावी कार्याची दखल घेत खार पूर्व येथील "श्री स्वामी समर्थ" कृपासिंधू सामाजिक संस्था(नोंदणीकृत)अध्यक्ष सुनिल मांजरेकर, सल्लागार रविंद्र आंब्रे यांनी समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे. तसेच भा.म.सेना राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे (संपादक शिववृत्त), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड.आनंदजी गुगळे यांनी "कोविड योध्दा" या सन्मानपत्राने गौरविले. तसेच साप्ता. धगधगती मशाल मुंबईचे संपादक भीमराव धुळप, पाक्षिक आदर्श वार्ताहर संपादक पंकजकुमार पाटील यांच्यासह विविध संस्था, संघटना व वर्तमानपत्र यांनीही समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्रने गौरव केला आहे. समीर खाडिलकर यांना कोविड योध्दा सन्मानपत्र प्राप्त झाल्यानंतर अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शिवाय आज मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी येथे गरजवंत जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप केल्याबद्दल अनेकांनी समीर खाडिलकर यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले. तर अमृत नगर, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून समीर खाडिलकर यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.

Friday 26 February 2021

दुसऱ्या टप्प्यात करोना प्रतिबंधक लसीकरण खूप महत्त्वाचं !! का ते समजून घ्या…....

दुसऱ्या टप्प्यात करोना प्रतिबंधक लसीकरण खूप महत्त्वाचं !!

का ते समजून घ्या…....
 

मुंबई : येत्या एक मार्चपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. करोनाला रोखण्याच्या दृष्टीने हा टप्पा खूप महत्त्वाचा असणार आहे. 

कारण या फेजमध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार आहे. करोनापासून सर्वाधिक धोका हा याच वयोगटाला आहे.

त्यामुळे करोना प्रतिबंधक लसीकरणाचा हा टप्पा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे.

सध्या संपूर्ण देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. यात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये करोना वाढ चिंताजनक अशी आहे.

दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी आक्रमक रणनिती आखून काम करावे लागेल. त्यामुळे करोना फैलावण्याचा संसर्ग, मृत्यूदर कमी होईल तसेच मूळ व्हायरसमध्ये होणारे म्युटेशन म्हणजेच परिवर्तन देखील कमी होईल. 
सध्या देशात करोना रुग्णांची, जी संख्या वाढलीय, त्यामागे व्हायरसमध्ये झालेले म्युटेशन म्हणजे परिवर्तन मुख्य कारण असू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय. आक्रमक रणनिती आखून लसीकरण करण्यात फायदा आहे, असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. 

४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या गटात कोणाचा समावेश करणार, ते सरकारने अजून स्पष्ट केलेलं नाही. 
ज्यांना सर्वाधिक धोका आहे, अशा नागरिकांना प्राधान्य दिले जाईल, असे गुलेरिया म्हणाले. 

“करोनामुळे मृत्यूचा धोका" असलेल्यांचे विशेष गट बनवण्यात आले आहेत. ज्यांना ह्दयविकार, मधुमेह आणि कर्करोग आहे, त्याशिवाय अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आणि स्टेरॉईडवर असलेल्या रुग्णांचा या गटात समावेश होतो असे गुलेरिया इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.

सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार !! "केंद्र सरकारची नियमावली जाहीर"

सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार !!

"केंद्र सरकारची नियमावली जाहीर" 


दिल्ली : सोशल मीडियाचा होणारा वापर आणि गैरवापर या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणार चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जात असल्याच्या देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अशी अनेक प्रकरणे मे. न्यायालयापर्यंत देखील गेली आहेत. 

या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने यासंदर्भातली नवीन नियमावली जारी केली आहे. देशात सेवा देणारे फेसबुक, ट्वीटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांना ही नियमावली बंधनकारक केली जाणार आहे. 

यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे. 'सोशल मीडियाला' भारतात व्यवसाय करण्याची पूर्ण मुभा आहे.
त्यांचं स्वागत आहे. सोशल मीडियाच्या युजर्सच्या तक्रारी निवारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. 

आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आक्षेपार्ह फोटो टाकले जात आहेत. देशाच्या नागरी व्यवस्थेला धक्का लावणाऱ्या बाबी घडत आहेत. सोशल मीडिचा वापर दहशतवादी, देशविघातक शक्तींकडून केला जातो. मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज देखील चालवल्या जातात.  आर्थिक घोटाळे केले जात आहेत, असं रवीशंकर प्रसाद यावेळी म्हणाले. 

सोशल मीडिया कंपन्यांसाठी काय असेल नियमावली ? 

१) तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. तो तक्रार २४ तासांत नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचं निवारण करेल .
२) जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल .

'पत्रकार बाळासाहेब भालेराव' यांना जिल्हा राजमाता जिजाऊ स्वाबलंबन शासकीय पुरस्काराने सन्मानित.!!

'पत्रकार बाळासाहेब भालेराव' यांना जिल्हा  राजमाता जिजाऊ स्वाबलंबन शासकीय पुरस्काराने सन्मानित.!!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील गेली वीस ते पंचवीस वर्षे पत्रकारांचे काम अगदी जोरदार करत असताना आपल्या लेखणी च्या माध्यमातून समस्या व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी समाज सेवेसाठी स्वःताला समर्पित करून पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच तालुका स्तरावर प्रचार व प्रसिद्धी देऊन महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल दैनिक पुढारी चे मुरबाड तालुका प्रतिनिधीं बाळासाहेब यांना जिल्हा स्तरीय राजमाता जिजाऊ स्वाबलंबन शासकीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


सदर सन्मान ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह संपन्न झाला... यावेळी प्रकल्प जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासह अभियान  संचालक छायादेवी शिसोदे. मुरबाड तालुका अभियान व्यवस्थापन गुलाब चव्हाण, अनिल राठोड, रामदास एगडे, महादु भोईर, ममता मसरुकर, यांच्यासह जिल्ह्यातील बचत गट महिला वर्ग उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे त्यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद यांचे झालेले संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे त्यांचे कामही खूप चांगले आहे त्याच धर्तीवर आज जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार काही बचत गटांना देण्यात आले आदर्श पत्रकार म्हणून बाळासाहेब भालेराव यांना जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन शासकीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे आणि त्यांचं काम खूप मोलाचं आहे त्यांनी महिला बचत गटातील विविध स्तरावर चांगले वृत्तपत्रांमध्ये लेखन केले त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांचे अभिनंदन केले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी कार्यक्षेत्र बदलाची नोंद संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी : 'उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार'

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी कार्यक्षेत्र बदलाची नोंद संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी :
'उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार'


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांपैकी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण, यांचे कार्यक्षेत्र 11 तालुक्यांपुरते मर्यादित आहेत. या 11 तालुक्यांपैकी 2 तालुके अलिबाग व पेण हे मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (MMRTA) कार्यक्षेत्रात समाविष्ट आहेत. इतर तालुके प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) रायगड मध्ये समाविष्ट आहेत.
    नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबईच्या दि. 24 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पेण व अलिबाग संपूर्ण तालुके MMRTA कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे या बदलाची नोंद ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांच्या परवान्यावर संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी. यासाठी त्याबाबत योग्य बदल करुन घेण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील परवाना शाखेशी संपर्क साधावा. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्यातर्फे सर्व नवीन ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी वाहनमालकांना ज्यांनी अद्याप परवाना घेतला नाही, अशा वाहनमालकांनी, कार्यक्षेत्राप्रमाणे विहित परवाना शुल्क भरुन परवाना घ्यावा. अन्यथा, वाहनांची नोंदणी निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

महाआवास अभियान अंतर्गत तालुक्यातील मंजूर लाभार्थी कार्यशाळा आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न!

महाआवास अभियान अंतर्गत तालुक्यातील मंजूर लाभार्थी कार्यशाळा आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न! 


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र शासनाच्या महा - आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील १०० दिवसांच्या मंजूर घरकुल कार्यशाळेचे तसेच डेमो होम कोनशिला चे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकतेच गोवेली येथील जिवनदीप महाविद्यालय पार पडले.


प्रथम दिपप्रज्वलन झाल्यानंतर या विभागाच्या विस्तार अधिकारी विशाखा परटोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक घरकुल योजना रखडलेल्या होत्या. परंतु आता शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे एकही घरकुल रखडणार नाही. असे सांगून सन २०१७ /१८ मध्ये एकही घर पेंडिंग नाही. केवळ माता रमाई घरकुल योजनेची १४ घरे निधी अभावी थांबली आहेत. तीही लवकरच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


तर कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी सांगितले की कल्याण तालुका सर्वच घरकुल योजनांच्या बाबतीत जिल्ह्य़ात प्रथम क्रमांकावर आहे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शक्य झाले आहे . तसेच कल्याण पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, विस्तार अधिकारी, कर्मचारी ग्रामसेवक, सरपंच यांचे योगदान मोठे आहे सातत्याने सलग दोन वर्षे आपण प्रथम क्रमांक मिळाला आहे काही ठिकाणी जागेची अडचण आली तेथे आमदारांच्या सल्ल्याने लाभार्थ्यांना खाजगी जागा उपलब्ध करून दिली. आणि यामुळेच कल्याण तालुक्याची मान ताठ असल्याचे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे चे विस्तार अधिकारी संतोष पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की सन २०१९/२० मध्ये ६हजार २९२ घरकुलांना मंजुरी दिली तर अभियानांतर्गत ३८८ ना मंजुरी मिळाली पण निधी अभावी अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार किसन कथोरे यांनी मात्र तालुक्यातील कातकरी समाजाविषयी चिंता व्यक्त केली. ते आता हा समाज अडाणी व मागासलेला असल्याने यांचे जिवनमान दिवसेंदिवस कमी होत आहे अशीच परिस्थिती राहिली तर हा समाज नामशेष होईल अशी भीती व्यक्त करुन आपण वाडित जायला हवे, त्याच्या पर्यत योजना पोहचल्या पाहिजे या समाजाला मदतीची गरज आहे असे सांगून त्यांची कामे केली तर पुण्य मिळेल असा सल्ला दिला. पुर्वी माझ्या मतदारसंघात पाटलांच्या म्हशीला घर, पण आदीवाशी बेघर अशी स्थिती होती पण ती मी मोडून काढली.गरीबाला घर मिळालेच पाहिजे, असे आपणही काम करायला हवे. काही अडचणी आल्या तर आपण मार्ग काढू असे बोलून तालुक्यातील ग्रामपंचायती २० टक्के निधी खर्च करीत नसल्याचे बाब त्यांनी स्पष्ट केली, जनसुविधा, महिला बालकल्याण, अंपग, असे निधी खर्च झाले नाहीत तर ते परत जातात तसे आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय गोवेली शेजारी डेमो होम चे पायाभरणी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, कल्याण पंचायत समितीचे उपसभापती रमेश बांगर, माझी सभापती रंजना देशमुख, भारत टेंभे, जिप सदस्या कविता भोईर सदस्य पांडुरंग म्हात्रे, प्रभारी उप अभियंता कुंभारे गटशिक्षणाधिकारी पाटील, डेमो हाऊचे इंजिनिअर गगे, हेरलेकर, या विभागाच्या विस्तार अधिकारी श्रीमती विशाखा परटोले, विस्तार अधिकारी व्ही आर चव्हाण, श्री संत, श्री हरड गोवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा दिपक जाधव, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक, लाभार्थी आदी मान्यवर उपस्थित होते !

Thursday 25 February 2021

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना करोना ; नागपुरात उपचार सुरू !!

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना करोना ; नागपुरात उपचार सुरू !!


नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी त्यांना नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी ही माहिती दिली आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना गेल्या ७ दिवसांपासून ताप आणि खोकला होत होता. त्यामळे त्याची परवा करोनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत RTPCR negative आली. पण असे असले तरी देखील ताप आणि खोकला औषध घेऊनसुद्धा कमी होत नव्हता. त्यानंतर आज चंद्रपूरमध्ये त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तेथे सीटी स्कॅन आणि इतर ब्लडटेस्ट चेकअपमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी दिलीय. त्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी त्याना नागपुरातील रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना धंतोलीतील मोहरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये डॉ. आमटे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अनिकेत आमटे यांनी केले आहे. 

नीरव मोदीला यू.के .मधल्या मे. कोर्टाचा झटका !! भारताकडे होऊ शकते प्रत्यर्पण.....

नीरव मोदीला यू.के .मधल्या मे. कोर्टाचा झटका !!

भारताकडे होऊ शकते प्रत्यर्पण.....
 
दिल्ली : हजारो कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीला यू.के.मधल्या मे.कोर्टाने झटका दिला आहे. प्रथमदर्शनी नीरव मोदी विरोधात पुरावे आहेत, असे मे.कोर्टाने म्हटले आहे.
 
नीरव मोदीचे हस्तांतरण केले, तर त्याला न्याय मिळणार नाही असे सांगणारा एकही पुरावा नसल्याचे निरीक्षण मे.कोर्टाने नोंदवले आहे. 

१४ हजार कोटीच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे मे.कोर्टाने म्हटले आहे. ४९ वर्षीय नीरव मोदी व्हि.डि.ओ. लींकच्या माध्यमातून मे.कोर्टासमोर हजर राहिला. नीरव मोदी व अन्य कारस्थानकर्ते यांच्यात संबंध होते, असे वेस्टमिनिस्टर मे.कोर्टाचे न्यायाधीश सॅम्युल गुझी यांनी म्हटले आहे. यात पी.एन.बी. बँकेचे अधिकारीही आहेत.
 
“नीरव मोदी कायद्याने व्यवसाय करत होता, हे मी मान्य करणार नाही. मला एकही प्रामाणिकपणाचा व्यवहार दिसलेला नाही. 
या प्रक्रियेत काहीतरी घोटाळा आहे” असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

कल्याण : तब्बल 1 कोटी 18 लाखांहून अधिक कर थकवल्याविरोधात केडीएमसीने कल्याण पश्चिमेतील व्हीएलसीसी या नामांकित ब्युटी पार्लर सील केले आहे !

कल्याण : तब्बल 1 कोटी 18 लाखांहून अधिक कर थकवल्याविरोधात केडीएमसीने कल्याण पश्चिमेतील व्हीएलसीसी या नामांकित ब्युटी पार्लर सील केले आहे !
 
कल्याण, ऋषिकेश चौधरी : एकीकडे कोवीडविरोधात महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली असतानाच दुसरीकडे कर थकबाकीदारांविरोधातही प्रशासकीय यंत्रणा आक्रमक झाली आहे. तब्बल 1 कोटी 18 लाखांहून अधिक कर थकवल्याविरोधात केडीएमसीने कल्याण पश्चिमेतील व्हीएलसीसी या नामांकित ब्युटी पार्लर सील केले आहे. 


कर निर्धारक विनय कुलकर्णी यांच्या आदेशावरून कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.थकीत करदात्यांना दिलासा देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी केडीएमसी प्रशासनाकडून 'अभय योजना' जाहीर करण्यात आली होती. ज्याचा लाभ अनेक लहान मोठ्या थकबाकीदारांनी घेतल्याचे दिसून आले. तर महापालिका प्रशासनाकडून थकीत कराचा भरणा करणेबाबत या नामांकित ब्युटी पार्लरला वारंवार स्मरणपत्र, नोटीसही बजावण्यात आली. परंतु या पार्लर व्यवस्थापनाकडून महापालिकेच्या या पत्रांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामूळे आज दुपारी 'ब प्रभाग क्षेत्र' कार्यालयातील कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने हे ब्युटी पार्लर सील केले. तब्बल 1 कोटींपेक्षा अधिकचा कर थकवल्याप्रकरणी केडीएमसीकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

नव्या वाहनांचा प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर, विरोधी" पक्षनेत्यांनाही नवी गाडी" ;

नव्या वाहनांचा प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर, विरोधी" पक्षनेत्यांनाही नवी गाडी" ; 

प्रस्तावाला विरोध करणारे भा.ज.पा. नगरसेवक मात्र गैरहजर........


ठाणे : करोना संकटामुळे उत्पन्नात घट झाल्याने पुढील आर्थिक वर्षासाठी काटकसरीचा संकल्प महापालिका प्रशासनाने सोडला असला तरी, दुसरीकडे मात्र सत्ताधारी शिवसेनेने  झालेल्या स्थायी समितीत कोणत्याही चर्चेविना नव्या वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर करून हौस भागवून घेतली. 

या प्रस्तावाविरोधात भूमिका मांडण्याच्या तयारीत असलेले विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनाही शिवसेनेने नवे वाहन देण्याची सूचना करत शांत केल्याने त्यांनीही चुपी साधली. 

तर, गेल्या दोन दिवसांपासून या प्रस्तावाला कडाडून विरोध करणारे भा.ज.पा.चे नगरसेवक मात्र सभेला गैरहजर होते. त्यामुळे कोणत्याही विरोधाविनाच हा प्रस्ताव मार्गी लागला असून त्यात आता विरोधी पक्ष नेत्यांच्या वाहनाच्या खर्चाची भर पडली आहे. 

करोना संकटाच्या काळात महापालिकेला विविध करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी तूट आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पुढील वर्षासाठी काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला. 

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही पालिका पदाधिकाऱ्यांनी मात्र नवी वाहनांची मागणी केली होती. त्याआधारे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती, वर्तकनगर आणि माजिवाडा प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यासाठी एकूण ७ नवीन वाहने खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी ७० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. 

या प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका होऊ लागली होती.

शहरात स्वस्त घरांची निर्मिती, वसई-विरारमध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली !

शहरात स्वस्त घरांची निर्मिती, वसई-विरारमध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली !

चटई क्षेत्रफळात वाढ.......


वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली असून यामुळे बांधकामासाठी तिप्पट वाढीव चटई क्षेत्रफळ मंजूर करण्यात आले आहे. 

यामुळे शहरात परवडणाऱ्या स्वस्त घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा दावा केला जात आहे.
 
वसईच्या हरित पट्ट्याला धक्का न लावता पर्यटन, उद्योग आदी क्षेत्राला चालना मिळणाऱ्या तरतुदी या नव्या नियमावलीत करण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास योजनाही शहरात लागू करता येणार आहे. 

मुंबई वगळता संपूर्ण राज्यात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली असावी यासाठी नगरविकास खात्याने तत्कालीन प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आराखडा तयार करून तो २८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर हरकती आणि सूचना मागविल्यानंतर तो प्रसिध्द करण्यात आला. ही नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. 

या नव्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे वसई विरार क्षेत्रात सर्वाधिक ४.८ चटईक्षेत्रफळ (एफ.एस.आय.) मिळणार आहे. त्यात १.१० मूळ चटईक्षेत्रफळ, ०.५ इतके अधिमूल्य (प्रीमिअम) भरून अतिरिक्त चटईक्षेत्रफळ, १.४० इतके विकास हक्क हस्तांतरण (टी.डी.आर.) आणि ०.६ अतिरिक्त चटईक्षेत्रफळ असा अंतर्भाव आहे. रस्त्याची किमान रुंदी ३० मीटर आवश्यक आहे. 

यामुळे मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊन सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तातील घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. यापूर्वी केवळ एक हे मूळ चटईक्षेत्रफळ आणि १.४ इतका टी.डी.आर. होता.

पर्यटकांची देशांतर्गत भटकंतीला पसंती....

पर्यटकांची देशांतर्गत भटकंतीला पसंती....
 

पुणे : टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी पर्यटनाचे दोन्ही हंगाम हातून पूर्णपणे गेले असले तरी आता हळूहळू पुन्हा एकदा पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे.

उन्हाळी सुट्टीत सहलीला जाण्यासाठी पर्यटन कंपन्यांकडे नोंदणी सुरू केली आहे. सद्य:स्थितीत देशांतर्गत भटकंतीवरच सारा भर असल्याचे दिसत आहे. टाळेबंदी शिथिल होऊ लागल्यानंतर शहरानजीकच्या पर्यटनात हळूहळू वाढ होत गेली. दिवाळी आणि नाताळच्या काळात स्वत:च सहलींचे नियोजन करून नागरिकांनी भटकंती सुरू केली. 

पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून आखलेल्या सहलींचे प्रमाण आणि प्रतिसाद अत्यल्पच होता. आता मात्र परराज्यातील, दूरच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन पर्यटकांनी सुरू केले आहे. एप्रिल ते मे या दरम्यानच्या सहलींसाठी नागरिकांनी नोंदणी सुरू केली आहे. पुढील सहा महिन्यांत ६७ टक्के पर्यटक भटकंतीसाठी उत्सुक असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आल्याचे पर्यटन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

करोनाचे सावट कायम गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांचे वाढलेले आकडे, पुन्हा टाळेबंदीबाबत सुरू झालेली चर्चा यामुळे सध्या लगेचच उन्हाळी सुट्टीच्या सहलींवर परिणाम दिसत नाही. मात्र पुढे काय होणार याची धास्ती पर्यटन कंपन्यांना आहे. ‘क्रूझ’ पर्यटनाबाबत उत्सुकता देशांतर्गत वाहतूक, दळणवळण सुरू झाले असले तरी परदेशी दळणवळण मात्र अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. 

अनेक देशांमध्ये परदेशी नागरिकांवर बंदी आहे. 
भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणेही मोजकीच आहेत. त्यामुळे सध्या देशांतर्गत पर्यटनावरच कंपन्या आणि पर्यटकांचीही अधिक भिस्त आहे. त्यातही वेगळी ठिकाणे, क्रूझ यांबाबत पर्यटकांमध्ये अधिक उत्सुकता आहे. 

परदेशातील ठिकाणांमध्ये दुबई, मालदिव आणि इजिप्तसाठी नोंदणी होत असल्याची माहीती पर्यटन कंपन्याच्या प्रतिनिधिंनी सांगितले.

लवकरच ‘वॉटर टॅक्सी’ची सफर !! "मुंबईतून वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जे.एन.पी.टी., रेवसकडे झटपट प्रवास".......

लवकरच ‘वॉटर टॅक्सी’ची सफर !!

"मुंबईतून वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जे.एन.पी.टी., रेवसकडे झटपट प्रवास".......


मुंबई : मुंबईतून जलमार्गाने वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जे.एन.पी.टी., रेवस आदी परिसरात झटपट पोहोचण्याचे मुंबईकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून ‘भारतीय सागरी परिषदे’च्या (इंडियन मेरिटाइम समिट) निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि विविध कंपन्यांमध्ये याबाबत नुकतेच सामंजस्य करार करण्यात आले. परिणामी, येत्या काही महिन्यांतच नागरिकांना ‘वॉटर टॅक्सी’ची सफर घडणार आहे. 

बंदर आणि सागरी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी ‘बंदर, नौवहन आणि जलमार्ग’ मंत्रालयाने २ ते ४ मार्च दरम्यान ‘भारतीय सागरी परिषदे’चे (मेरिटाइम इंडिया समिट) आयोजन केले आहे. ही परिषद आभासी पद्धतीने होणार असून, त्या निमित्ताने विविध सामंजस्य करार करण्यात येत आहेत. 

मुंबई पोर्ट ट्रस्टने दोन दिवसांत एकूण सात हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून एकूण २० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली. 

या सामंजस्य करारांमुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी वॉटर टॅक्सी सुविधा सुरू करण्यास चालना मिळाली आहे.मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे या सेवेचे नियोजन केले जाणार असून ही सेवा खासगी चालकांमार्फत चालवली जाईल.यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कॅटामरान, लाँच यांचा वापर करण्यात येईल, असे पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नेरुळ आणि बेलापूर येथे जेट्टीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल.

परिणामी पुढील दोन महिन्यांमध्ये तिथे ही सुविधा सुरू होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या सेवेचे प्रवासभाडे किती असावे यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

रंगमंच कामगारांवर उपासमारीचे संकट !! अनेक नाटके सुरू न झाल्याचा परिणाम.....

रंगमंच कामगारांवर उपासमारीचे संकट !!

अनेक नाटके सुरू न झाल्याचा परिणाम..... 


मुंबई : नाटकांच्या प्रयोगांना परवानगी मिळाली असली तरीही मर्यादित प्रेक्षकसंख्या, पुन्हा टाळेबंदी होण्याची भीती यामुळे ठरावीक नाटकांचे ठरावीकच प्रयोग सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. 

नाटक व्यवसायाच्या या कासवगतीमुळे पडद्यामागील कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगमंच कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून या कामगारांच्या कुटुंबीयांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. 

टाळेबंदी शिथिलीकरणामध्ये नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली. मर्यादित प्रेक्षकसंख्येत काही नामवंत कलाकारांची नाटके सुरू ही झाली, मात्र आर्थिक अडचणी, प्रेक्षक न येण्याची भीती यांमुळे मोठ्या प्रमाणावर नाटके अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत. 
या नाटकांवर पूर्णत: अवलंबून असलेले रंगमंच कामगार भविष्याकडे डोळे लावून बसले आहेत.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात विविध नाट्यसंस्थांनी रंगमंच कामगारांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत केली. त्या आधारावर कसेबसे काही महिने कामगारांनी काढले. त्यानंतर आता नाटकांच्या प्रयोगांसोबत आपला रोजगारही पुन्हा सुरू होईल, अशी आशा त्यांना वाटली; जी खरी होऊ शकली नाही. 

प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, संगीत संयोजक इत्यादी रंगमंच कामगार गेली अनेक वर्षे स्वत:ला झोकू न देऊन रंगभूमीची सेवा करत आहेत. इतर कोणतेही कौशल्य अवगत करण्याची गरज त्यांना कधी जाणवली नव्हती. 
त्यामुळे टाळेबंदीत एकाएकी रोजगार गेल्यानंतर ‘पुढे काय?’ हा प्रशद्ब्रा त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला. 

काहींनी भाजीविक्रीसारखे व्यवसाय स्वीकारले आहेत, मात्र त्या क्षेत्राचे आवश्यक तेवढे ज्ञान नसल्याने तिथे फार काळ टिकाव लागण्याची शक्यता नाही.

जकात नाक्यांचा व्यावसायिक वापर "वाहतूक, व्यावसायिक हब तयार करण्याचा विचार" !

जकात नाक्यांचा व्यावसायिक वापर "वाहतूक, व्यावसायिक हब तयार करण्याचा विचार" !

मुंबईबाहेरून येणाऱ्या गाड्या वेशीवरच थांबणार.....

मुंबई : वस्तू आणि सेवा कराची (जी.एस.टी.) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जुलै २०१७ पासून ओस पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेचा वापर करण्यासाठी पालिकेची पुन्हा सल्लागाराकडून प्रस्ताव मागवले आहेत. 
दहिसर, मुलुंड, ऐरोली, वाशी, मानखुर्द अशा पाच जकात नाक्यांच्या १६ एकर जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक हब उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. 

रिकाम्या असलेल्या जागेच्या वापरातून पालिकेला महसूल मिळू शकणार आहे. 

या जागेवर वाहतूक हब उभे राहिल्यास मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवासी गाड्या तिथेच थांबवल्या जाणार आहेत. 
पालिकेची जकातवसुली १ जुलै २०१७ पासून बंद झाल्यामुळे शहराच्या सीमांवर असलेले पाचही जकात नाके गेल्या चार वर्षांपासून ओस पडले आहेत.

या जकात नाक्यांवर अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण होऊ नये म्हणून या जागेचा वापर करण्याबाबत विविध सूचना नगरसेवकांनी केल्या होत्या. काही वर्षांपूर्वी पालिकेने या जागेच्या वापरासाठी सल्लागारांकडून प्रस्तावही मागवले होेते. मधल्या काळात पालिकेने ही जागा सागरी मार्गाच्या कामासाठी कार्यशाळा म्हणून वापरण्याचे ठरवले होते. मात्र सागरी मार्गापासून जकात नाके दूर असल्यामुळे तो पर्यायही नाकारण्यात आला. 
त्यामुळे आता पालिकेने पुन्हा जागेच्या विकासासाठी सल्लागारांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

सल्लागारांना ९ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 
जकात नाक्यांवर वाहतूक हब उभारल्यानंतर मुंबई बाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या तिथे थांबवल्या जाणार आहेत. तसेच ट्रक टर्मिनलही उभारण्यात येणार आहे.त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रदूषणही कमी होईल.

इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या, "आठवड्याभरात भाज्यांच्या किमतीत १५ ते २० रुपयांनी वाढ'"........

इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या, 

"आठवड्याभरात भाज्यांच्या किमतीत १५ ते २० रुपयांनी वाढ'"........


नवी मुंबई : मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आता सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. 
इंधनदरवाढीचा परिणाम भाजी मंडईवर जाणवू लागला आहे. 

आठवड्याभरात भाज्यांच्या किंमतीत किमतीत १५ ते २० रुपयाने वाढ झाली आहे. त्याची झळ सर्वसमान्यांना सोसावी लागत आहे. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक तसेच किरकोळ भाजीपाला बाजारावर जाणवू लागला आहे. 'ऐन भाजीपाल्याच्या हंगाम' असताना भाजीपाल्याच्या किमती कमी होण्याऐवजी वाढत आहेत. 

घाऊक बाजारात किलामागे १० ते २० तर किरकोळ बाजारात १५ ते २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. 
सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक असतानाही दर वाढत असल्याने  घाऊक भाजी विक्रेते सांगत आहेत.

करोना काळात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे आणि सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसाने भाजी पाल्याचे भाव गगनाला भिडले होते. यामुळे करोना काळात कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या स्वयंपाक घराचे गणित सुद्धा बिघडले होते.
 
पण टाळेबंदीत आणलेली शिथिलता आणि  डिसेंबर महिन्याच्या थंडीच्या आगमनाबरोबर भाज्यांची आवक वाढली. यामुळे घाऊक बाजारातले भाज्यांचे दर जलद गतीने खाली येऊ  लागले होते. याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

पण मागील काही दिवसात इंधन दरवाढीमुळे भाजीपाला वाहतुकीचा खर्च वाढल्याने पुन्हा भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. 

जानेवारी महिन्यापेक्षा १० ते १५  टक्केपर्यंत या महिन्यात भाव वाढ झाली आहे. तर येणाऱ्या काळात अधिक दर कमी होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Wednesday 24 February 2021

मुजोर बॕक मॕनेजरचा उर्मट पणा !! **बँकेचे हित जपण्या पलीकडे ग्राहकांना इतर बँकेत जाण्याचा सल्ला **

मुजोर बॕक  मॕनेजरचा उर्मट पणा !!

**बँकेचे हित जपण्या पलीकडे ग्राहकांना इतर बँकेत जाण्याचा सल्ला **
 
मुरबाड, (मंगल डोंगरे) : कोरोना संकटाचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या मुरबाड शहरातील एकमेव व महत्त्वाची शाखा असलेल्या बॕक आॕफ महाराष्ट्र या शाखेत जाणाऱ्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. खातेदारांना एका कामासाठी अनेक हेलपाटे तर मारावे लागतातच, परंतु खातेदारांशी सौजन्याने वागण्याचे सौजन्य सूद्धा दाखविले जात नाही. सामान्य, अशिक्षित खातेदारांना, नागरिकांना बॕक व्यवस्थापना कडून उद्धट व उर्मट पणाची भाषा चक्क बॕक मॕनेजर करत आहे. शेतकरी, अशिक्षित नागरिक, महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांना उद्धट, उर्मट पणाची भाषा वापरली जाते. या शाखेत मॕनेजर पदावर असलेला के.एच. रोहिदास म्हणतो की आमच्या बॕंकेत ग्राहक आलेच पाहिजेत, तेव्हाच आमची बॕक चालेल अस नाही. ग्राहकांना जर आमच्या शाखेत ञास होत असेल तर त्यांनी खुशाल इतर बॕंकेत जावे. असा सल्ला हे महाशय ग्राहकांना देतात. इथे नविन खातेदारांना खाते उघडल्यावर दोन दिवसांनी अकाउंट नंबर, पंधरा दिवसांनी पास बुक दिले जाते, याशिवाय चेक क्लिअरन्सला पंधरा ते विस दिवसाचा कालावधी लागतो. पास बुक अपडेट साठी तशीच अवस्था. सर्वसामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या या बॕंकेत जर ग्राहकांना अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर सामान्य खातेदारांनी काय करायचे असा प्रश्न येथे येणारे खातेदार करत आहेत, दरम्यान शाखाधिकारी विशाल चंन्द्रा यांच्या कडे विचारणा केली असता माझ्या कॕबिन मध्ये आलेल्या व्यक्तीला हवी ती माहिती मी हिंदी भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

राष्ट्रवादी युवा कार्याध्यक्षांचे सुप्रिया सुळेना निवेदन !! **सुप्रिया सुळे यांनी घेतली कार्यकर्ता आढावा बैठक **

राष्ट्रवादी युवा कार्याध्यक्षांचे सुप्रिया सुळेना निवेदन  !!    **सुप्रिया सुळे यांनी घेतली कार्यकर्ता आढावा बैठक **


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या आढावा बैठकीत युवा कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यातील अनुसूचित जाती - जमातींच्या मुलामुलींना शासकीय वस्ती शाळा मंजुर करण्यासाठी  लेखी निवेदन दिले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर नामदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र ऊप  प्रदेशाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे, ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई वेंखडे, नगरसेवक आषिश दामले ईंत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे तसेच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मध्यस्थी मुळे प्रकल्पग्रस्तांचे उद्याचे आक्रोश आंदोलन ,आमरण उपोषण तुर्तास स्थगीत !!

अरुणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांच्या लेखी आश्वासना मुळे तसेच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मध्यस्थी मुळे प्रकल्पग्रस्तांचे आजचे आक्रोश आंदोलन ,आमरण उपोषण तुर्तास स्थगीत !!


सिंधुदुर्ग / वैभववाडी :
अरुणा प्रकल्पाचे ठेकेदार, जलसंपदा आणि पुनर्वसन विभाग तसेच गावीतील बुवा सह तिन दलालांनी प्रकल्पग्रस्तांची सगळ्याच बाबतीत फसवणुक केल्याच्या निषेधार्थ तसेच अरुणा प्रकल्पाचा बंद केलेला पाण्याचा विसर्ग तात्काळ सुरु करुन बुडालेल्या घरांचे पंचनामे करा नुकसान भरपाई द्या. या व इतर मागण्यांनसाठी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकल्पाच्या आंबडपाल कुडाळ येथील मुख्य कार्यालयावर पुकारलेले आक्रोश आमरण उपोषण कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांनी दिलेल्या लेखी आश्वासना मुळे तसेच कोरोना च्या पार्शभुमी वर वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केलेल्या मध्यस्थी मुळे तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहीती लढा संघर्षाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्ररेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, अशोक नागप, मनोहर तळेकर, मुकेश कदम, आरती कांबळे, सानीका कांबळे, यांनी दिली. 


अरुणा प्रकल्पाचे नव निर्वाचीत कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांनी भेट घेऊन पाण्याचा विसर्ग चालु करुन बुडालेल्या घरांचे पंचनामे करा आणि प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या. पनर्वसन गावठणात ठप्प असलेली नागरी सुविधांची कामे पुर्ण करा. किंजळीचा माळ पुनर्वसन गावठण मांगवली गावठणाला जोडा, कुंभारवाडी गावठणात साईबाबा मंदिरासाठी स्वतंत्र भुखंड देऊन ताबा पावती द्या. या व इतर मागण्याच्या संदर्भात चर्चा करुन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आंबडपाल येथील कार्यकारी अभियंता यांच्या मुख्य कार्यालया वर आक्रोश आंदोलन आमरण उपोषण करण्याचा निर्धार अरुणा प्रकल्पग्रस्तांनी केला होता. 

दरम्यान कार्यकारी अभियंता एम. एस.कदम आंबडपाल कुडाळ यांनी अधिक्षक अभियंता दक्षिण कोकण पाठबंधारे मंडळ सिंधुदुर्ग ओरोस, यांच्या माध्यमातुन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजीत करण्यात आलेली असुन आपल्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार क्षेत्रीय समस्या निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुर्तास आमरण उपोषण स्थगित करावे असे लेखी पत्राद्वारे अरुणा प्रकल्पग्रस्तांना तातडीने कळवण्यात आले आहे. या लेखी आश्वासनामुळे तसेच वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी कोरोना च्या वाढत्या प्राधुभाँवामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करण्याच्या संदर्भात मध्यस्थी केल्यामुळे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी २५ फेब्रुवारी २०२१ चे आंबडपाल येथील प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयावर आयोजीत केलेले आक्रोश आमरण ऊपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. 

जो पर्यन्त अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायमागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यन्त अरुणा प्रकल्पग्रस्तांचा न्याय हक्काचा लढा सुरुच राहील. असे ही लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्ररेटरी अजय नागप, खजिनदार विलास कदम, अशोक नागप, मनोहर तळेकर,
मुकेश कदम, आरती कांबळे, सानीका कांबळे, यांनी दिली.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी 3 शाळांची होणार निवड !!

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी 3 शाळांची होणार निवड !!

"महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन करणार अमंलबजावणी"

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील 3 शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात निवड करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा धोरणास पूरक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत (mvstf) शालेय शिक्षण विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व बालभारतीच्या मदतीने राज्यात जिल्हा परिषदेच्या “मिशन 100 आदर्श शाळा”हा उपक्रम राबविला जाणार आहे. 
     महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील शाळांमध्ये या अभियानाची अमंलबजावणी जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी करण्यात येणार असल्याचे ग्राम सामाजिक परिवर्तन चे जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये यांनी माहिती दिली आहे.
      ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा, आरोग्य पोषण, आनंदादायी शिक्षण आदी उद्दिष्टे राहणार असून या शाळांच्या निवडीबाबत ही योजना महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानात (mvstf) समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी राहणार आहे. शाळेची पटसंख्या 100 च्या पुढे असणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील शाळांसाठी किमान 60 पटसंख्या असणे हा निकष ठेवण्यात आलेला आहे. 
      शाळेची इमारत निर्लेखन झालेली नसावी, शाळेला स्वत:ची जागा असावी, गावामध्ये उत्स्फूर्त सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी बिगर आदिवासी भागात येणाऱ्या शाळेतील गावांनी 10 टक्के लोकसहभाग ( 5 टक्के लोकवाटा व 5 टक्के श्रमदान ) देणे अपेक्षित आहे. 
 ग्राम सामाजिक परिवर्तन (VSTF) मार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग पादर्शक पध्दतीने होण्यासाठी लोकसहभाग आधारित उपक्रम घेणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातून ज्या 3 शाळांची या योजनेत निवड होईल, त्या शाळांमध्ये शासनाच्या कृती संगमातून सुध्दा भौतिक सुविधांवर काम होणे अपेक्षित आहे. गावास विविध योजनांमधून मिळालेले पुरस्कार, शाळेतील शिक्षकांना पुरस्कार, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमात सहभाग असलेल्या शाळेची प्राधान्याने या उपक्रमात निवड करणे अपेक्षित आहे. या शाळांना भेटी देवून शाळा विकास आराखडा तयार करण्यात येईल.

Tuesday 23 February 2021

तर मुंबईतही लॉकडाउन......! "पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत"

तर मुंबईतही लॉकडाउन......! 

"पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत"
 
मुंबई : करोना साथ आटोक्यात आल्यानं मुंबईतील जनजीवनानं पुन्हा गती घेतली होती. मात्र, पुन्हा एकदा करोनामुळे ब्रेक लागण्याची भीती दिसू लागली आहे.
फेब्रुवारीपासून मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. 

मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला असून, आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. 
तसेच परिस्थिती बिघडली तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. 

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर इमारतींमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. घरातील एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांच्या अहवालात कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित असल्याचे आढळून येत आहे. 
मुंबईतील रुग्णवाढीचा दर डिसेंबरनंतर घसरला होता. 
तो ०.१२ टक्क्यांवर स्थिर झाला होता. मात्र हा दर वाढून आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर काळजीची बाब म्हणजे मुंबईतील काही विभागांमध्ये हा दर ०.३० टक्क्यांच्याही पुढे आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. 

मुंबईतील करोना परिस्थितीविषयी बोलताना पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले,”रुग्णसंख्या वाढत आहेत, हे मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. आता आम्ही कारवाईही सुरू केली आहे. 

लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी घेतली जाते. पण, प्रत्यक्षात ३०० ते ४०० लोकांना बोलवतात. 
अशा लोकांवर कारवाई सुरू केली आहे. नाईट क्लबवरही कारवाई सुरू केली आहे. सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही ज्या रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जातो, त्यांच्यावरही कारवाई सुरू केली आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील.

करोनामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर !! अंबरनाथ", बदलापुरातील इच्छुकांची धाकधूक वाढली, खर्चाचे गणित कोलमडण्याची भीती"........

करोनामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर !!

"अंबरनाथ, बदलापुरातील इच्छुकांची धाकधूक वाढली, 
खर्चाचे गणित कोलमडण्याची भीती"........


अंबरनाथ : राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने टाळेबंदी पुन्हा जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मात्र याचा थेट फटका पुन्हा एकदा अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या नियोजनास बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पालिकेच्या निवडणुका होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेक इच्छुकांनी गेल्या एप्रिल महिन्यापासूनच याची तयारी सुरू केली. 

मात्र आता निवडणुका पुढे जाण्याच्या शक्यतेने इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. जनसपंर्क कायम ठेवण्यासाठी होणारा लाखोंचा खर्च आता हाताबाहेर जात असल्याने खर्चाचे गणित कोलमडण्याचीही भीती आहे. 
गेल्या एप्रिल महिन्यात अपेक्षित असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुका अजूनही जाहीर होऊ शकलेल्या नाहीत.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात या निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणांची घोषणा करण्यात आली होती. 

मात्र त्यानंतर करोनाच्या टाळेबंदीमुळे निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या. 
जानेवारी महिन्यापासून मतदार यादी पुनर्रचना, दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. येत्या १ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल. तर त्यानंतर ८ मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी जाहीर होईल. 

मात्र त्याच वेळी राज्यात करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे. जाहीर कार्यक्रम, सभा, संमेलने, आंदोलने, प्रचार कार्यक्रम थांबवण्याचे आवाहन खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे.

सोशल डिस्टन्सींग, मास्कच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोन लेडीजबारसह एकूण पाच बार सील : महापालिकेची धडक कारवाई !!

सोशल डिस्टन्सींग, मास्कच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोन लेडीजबारसह एकूण पाच बार सील : महापालिकेची धडक कारवाई !!


"नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश"

ठाणे (२३) : सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करूत ते पाचही बार काल रात्री उशीरा सील केले. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

          कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून ही कारवाई केली.

       या कारवाईतंर्गत नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्ग दोन लेडीज बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा लेडीज बार उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला.

          त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सन सिटी या लेडीजबारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले.

          दरम्यान, या पाचही आस्थापनांवर महापालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिला आहे.

गरीबांनी कसं जगायचं ? "लॉकडाउनबद्दल मुंबईकरांच्या संमिश्र भावना"..

गरीबांनी कसं जगायचं ? 

"लॉकडाउनबद्दल मुंबईकरांच्या संमिश्र भावना".....

 
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील आकडे चिंता वाढवणारे आहेत. 

त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरु झाली असून सर्वसामान्यांच्या मनात या लॉकडाउनने धास्ती निर्माण केली आहे. 

करोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन करायचा पण त्यामुळे आर्थिक प्रश्न उभे राहणार त्याचं काय ? 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं. 

या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने मुंबईकरांची लॉकडाउनबद्दलची मत जाणून घेतली.

मुरबाड मध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु !!

मुरबाड मध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता,राज्य सरकारने घेतलेल्या निर्णायाची सर्वत्र अमंलबजावणी होत आहे. याशिवाय मागील वर्षी कोरोना संकटात सापडलेल्या मुरबाडकरांनी सुरक्षित राहावे. 


यासाठी मुरबाड, नगरपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, आजपासून मुरबाड शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची सुरवात झाली आहे. पोलीस बंदोबस्त सोबत घेवून नगरपंचायत कर्मचारी फौजफाट्यासह, मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठ व तीनहात नाक्यावर तपासणी सुरु केल्याने विनामास्क मोकाट फिरणा-या मुरबाड करांना आज दंडाचा फटका बसला आहे. पहिल्याच दिवशी 36 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तेव्हा
 मुरबाडच्या नागरिकांनो सावधान...आता मास्क न लावल्यास होणार शंभर रुपये दंड. तसेच लग्न कार्यात मंगळ कार्यालयांवर सुद्धा नियमापेक्षा 50 पेक्षा जास्त लोकसंख्या आढळून आल्यास कडक कारवाई होणार आहे....मुरबाड शहरात आजपासून मास न लावणा-यांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. विनामास्क फिरणा-यांवर व्यक्तींवर  प्रत्तेकी शंभर रुपये दंड आकारण्यात आला आहे. नगरपंचायतीकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे...मंगळ कार्यालय, लग्न समारंभात, व सार्वजनिक कार्यक्रमात पन्नास पेक्षा जास्त संख्या असल्यास होणार कठोर कारवाई...सर्वत्र कारवाई सुरू असताना आता मुरबाड मधेही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे... आता विनामास्क फिरणा-यांवर दररोज ही कारवाई सुरू असणार आहे.. अशी माहिती नगरपंचायत मुरबाड कडून देण्यात आली आहे. तसेच मुरबाडच्या नागरिकांनी आपलं मुरबाड सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Monday 22 February 2021

अरूणा प्रकल्पग्रस्तांचे 25 फेब्रुवारी 2021रोजी अंबडपाल कार्यालयावर आक्रोश आंदोलन, उपोषण !!

अरूणा प्रकल्पग्रस्तांचे 25 फेब्रुवारी 2021रोजी अंबडपाल कार्यालयावर आक्रोश आंदोलन, उपोषण !!


सिंधुदुर्ग, प्रतिनिधी :

अरुणा प्रकल्पाचे ठेकेदार,जलसंपदा विभाग,आणि पुनर्वसन विभागांने  प्रकल्पग्रस्तांची सगळ्याच बाबतीत फसवणुक केलेली असुन अरुणा प्रकल्पाचा बंद केलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा तात्काळ सुरु करा, धरणात बुडालेल्या घरांचे पंचनामे करा, आणि प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई द्या या व ईतर मागण्यांच्या पुर्ततेसाठी अरुणा प्रकल्पग्रस्त २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आंबडपाल कुडाळ येथील प्रकल्प कार्यालया वर आक्रोश आंदोलन उपोषण करणार आहेत. या बाबत चे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता एम.एस. कदम यांना २२ फेब्रुवारी २०२१ रोजी दिल आहे.

लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पाच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप,महिला आघाडी सचीव आरती कांबळे, अभिषेक कांबळे आदिं चा या शिष्टमंडळात समावेश होता. 

४ जानेवारी २०२१ रोजी अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला होता. त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे १३० घरां पैकी काही घरे पाण्याच्या बाहेर दिसु लागताच २ फेब्रुवारी २०२१ रोजी अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग अचानक बंद करण्यात आल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी अरुणा प्रकल्पाच्या पिचींग चे आणि कालव्याचे काम बंद पाडलेले आहे. 

गेले महिनाभर हे काम पंधरा वर्षात पहिल्यांदाच निर्णायक पणे प्रकल्पग्रस्तांनी बंद केले आहे. पाणी बंद तर काम बंद असा इशारा देत अरुणा प्रकल्पग्रस्तांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी वैभववाडी तहसिल कार्यालयावर केलेले लक्षवेधी आमरण उपोषण ही कमालीचे यश्स्वी झाले होते. 

२२ फेब्रुवारी २०२१ रोजी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप, महिला आघाडी सचीव आरती कांबळे, अभिषेक कांबळे आदी पदाधीकार्यांनी नव्याने आलेले कार्यकारी अभियंता एम.एस.कदम यांची आंबडपाल येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थीतीमध्ये बंद केलेला पाण्याचा विसर्ग सुरु करा, बुडालेल्या घरांचे पंचनामे करुन नुकसान भारपाई द्या, पुनर्वसन गावठणात ठप्प असलेली नागरी सुवीधांची कामे पुर्ण करा, किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाण मागवली पुनर्वसन गावठणाला जोडा,
कुंभारवाडी येथे श्री साईबाबा मंदीरासाठी स्वतंत्र भुखंड देऊन ताबा पावती द्या. या व इतर मागण्यांच्या पुर्तते साठी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी अरुणा प्रकल्पग्रस्त आंबडपाल येथील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर आक्रोश आंदोलन, आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पाच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप,महिला आघाडी सचीव आरती कांबळे, अभिषेक कांबळे यांनी दिली. 

दरम्यान पावणे दोन वर्षा नंतर आम्हाला जिल्हाधिकारी मॅडम यांनी निवासी भुखंड बदलुन दिले आहेत.गेले एक महिना आमच्या भुखंडातील पत्राशेड , रस्ता, लाईट व संरक्षण भिंत इत्यादिंची मागणी करुन ही का दिली जात नाही. दोन हजार कोटी पेक्षा जादा निधी शासनाने दिलेला आहे जर पत्राशेड आणि संरक्षण भिंत तुम्हाला देता येत नसेल तर हा पैसा गेला कुठे असा सवाल महिला आघाडीच्या अध्यक्षा सुचिता चव्हाण आणि महिला सचिव आरती कांबळे यांनी कार्यकारी अभियंत्यां समोर उपस्थित केला केला आहे.

२५ तारखे पर्यन्त आमच्या भुखंडातील गैरसोय दुर केली नाही तर राॅकेल च्या कॅन सह आक्रोश आंदोलनात आम्ही दोघी सहभागी होणार आहोत पुढे घडणा-या घटनेस आपण जबाबदार असाल असा इशारा आरती कांबळे व सुचीता चव्हाण यांनी दिला आहे.
-------------------------------------

स्की अँड स्नोबोर्ड राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातिल तीन खेळाडूंची स्पर्धेत निवड...

स्की अँड स्नोबोर्ड  राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातिल तीन खेळाडूंची स्पर्धेत निवड... 
 
      
ठाणे, अविनाश ओंबासे - काश्मीर गुलबर्ग येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ज्युनियर "स्की अँड स्नोबोर्ड" प्रशिक्षण व स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा या स्पर्धेत खेळाडूंनि सहभाग घेतला होता, २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण व निवड चाचणीचे आयोजन केले होते.
     ६ फेब्रुवारी या कालावधीत स्की अँड स्नोबोर्ड राज्यस्तरीय स्पर्धा पार पाडल्या, या स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गट सहभागी झाला होता. या स्पर्धेत मुलिंच्या गटात *कु. सोनाली बबन शेलार* व मुलांच्या गटात *कु. शुभम मोहन पाटील यांना सुवर्ण पदक व *कु. पंकज कुमार अवधेश कुमार याला रौप्य पदक* मिळाले.
        हा पुर्ण खेळ बर्फाछादित खेळला गेला. स्पर्धकाला एक हजार मीटर स्कीचे लक्ष पुर्ण करायचे होते. आगामी खेळो इंडिया गेलो या स्पर्धेसाठी यातून  खेळाडू निवडले जाणार आहेत. *"आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशन व इंडियन ऑलिंपिक असोसिएशन "* प्रमाणित हि स्पर्धा आहे. प्रशिक्षक *कु.मयुर महादेव इंगोले* यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. 
         या स्पर्धेसाठी "ठाणे जिल्हा स्कीअँड स्नोबोर्ड असोसिएशनचे" अध्यक्ष सुनील मेने, उपाध्यक्ष महादेव इंगोले, मनोज इंगोले, सदस्य सिध्देश दरेकर, राकेश अहिरेकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

न्या.रोहिणी आयोगाच्या शिफारशीचे ओ बी सी असोसिएशन तर्फे स्वागत! परंतु यासाठी जातवार जनगणना करणे गरजेचे : विलासराव पाटील

न्या.रोहिणी आयोगाच्या शिफारशीचे ओ बी सी असोसिएशन तर्फे स्वागत! परंतु यासाठी जातवार जनगणना करणे गरजेचे : विलासराव पाटील


    बोरघर/माणगांव, (विश्वास गायकवाड) : न्या. रोहिणी आयोगाने ओ बी सी संवर्गात समाविष्ठ सर्व जातींना लाभ मिळावा यासाठी चार गट करुन त्यात २७% आरक्षणाचा कोटा विभागला जावा यासाठी केंद्र सरकारला शिफारस केलेली आहे. या शिफारशीचे ओ बी सी विद्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष व अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री विलासराव पाटील यांनी स्वागत केले आहे. 
     १९९२ साली मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार ओबीसी संवर्गाला शिक्षण व नौकरीत २७%आरक्षण लागु झाले या संवर्गात केद्रिय यादीत २६३३ जातींचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील फक्त काही जातीनाच अधिक लाभ मिळत आहे. असा निष्कर्ष न्या. रोहिणी आयोगाने नोंदवला आहे. 
     यातील १० जातींना २७ टक्के पैकी एक चतुर्थाश लाभ झालेला आहे. तर ३७ जातीना तीन चतुर्थाश आरक्षणाचा लाभ झालेला आहे तर ३७ जातीना दोन तृतीयांश लाभ मिळत आला आहे. तर १०० जाती तीन चतुर्थाश आरक्षणाचा लाभ उठवत आहेत. तर २६३३ पैकी २४८६ जातींना २७% पैकी ५.४% जागाही मिळत नाहीत. त्यामुळे यात समाविष्ठ असलेल्या जातीना ४ वर्गात विभागून अनुक्रमे २%.६% .९% आणि १०% आरक्षण मिळणार आहे. पहिल्या वर्गात १६७४ जाती असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वर्गात ५३४ जाती तिसऱ्या वर्गात ३२८ जाती असण्याची शक्यता आहे. आणि चौथ्या प्रवर्गात फक्त ९७ जातींचा समावेश असू शकतो यामुळे ओबीसीच्या लाभापासून वंचीत असलेल्या जातींना लाभ मिळून त्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. या आयोगाची स्थापना २ ऑक्टोबर २०१७ साली झाली होती हा आयोग पुढील महिन्यापासून विविध राज्यांचा दौरा करणार आहेत. तर यापुर्वीच ११ राज्यांमध्ये अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे. परंतु हे सर्व करण्यासाठी जातवार जनगणना करुन त्यांची वर्गवारी करणे गरजेचे आहे. 
     १९३१ नंतर भारतात जातवार जनगणना झालेली नाही. तसेच न्या. रोहिणी आयोगाने वर्गवारी करण्यासाठी जातवार जनगणना करणे गरजेचे असून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दयावा अशी लेखी मगणी केंद्र सरकारकडे केलेली होती.
   त्यानुसार केंद्र सरकारने २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत जातवार जनगणना करुन पारदर्शकपणे ओबीसीतील सर्व जातींना नैसर्गिक न्याय मिळेल. त्यामुळे २०२१ मध्ये होणाऱ्या डिजीटल जनगणनेत जातवार जनगणना व्हावी अशी मागणी विलासराव पाटील यांच्यासह ओबीसी असोसिएशन व अखिल भारतीय माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

स्वराज्य कोकण कला मंच (मुंबई)चा नालासोपारा येथील पहिला प्रयोग हाऊसफुल !!!

स्वराज्य कोकण कला मंच (मुंबई)चा नालासोपारा येथील पहिला प्रयोग हाऊसफुल !!!

"आयोजक डॉ. संजय जाधव आणि प्रकाश नाडकर यांचे रसिकांनीमानले आभार"


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/दिपक मांडवकर) :

            नालासोपारा पूर्व साई छाया विद्या मंदिर जिजाईनगर येथे आयोजक  डॉ. संजय जाधव,  प्रकाश नाडकर आणि  दिपक मांडवकर यांच्या विद्यमाने स्वराज्य कोकण कला मंच (मुंबई) चा प्रयोग पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक किसन बंडागळे आणि डॉ. संजय जाधव यांचे चिरंजीव तरुण नेतृत्व कु. सिद्धेश संजय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. स्वराज्य कोकण कलामंच (मुंबई) प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासीक वघनाट्य (श्रीमंतयोगी राजा सह्याद्रीचा) हा वगनाट्य कार्यक्रम सादर झाला. कोरोना पार्श्वभूमीवर एक वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम हॉल, नाट्यगृह बंद असताना कलाकारांचे तसेच अनेक सांस्कृतिक मंचाचे खूप नुकसान झाले. परंतु पुन्हा नालासोपारा येथे या कार्यक्रमासाठी चारशे रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे गेल्या वर्षीचे स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढत पुन्हा या वर्षीही हा कार्यक्रम चारशेहून अधिक रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे स्वराज कोकण कलाकारांनी पुन्हा आपली सिद्धता खरी करून दाखवली व रसिक मायबाप प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकानी अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणारे कलाकार  संदेश येद्रे आणि जिजाऊंच्या भूमीकेत कु. सोनाली शिंदे, अफजल खान, औरंगजेब, सरजेराव, तानाजी मालुसरे, मावळे, सेनापती सर्वांनी आपली भुकिमा रशीकांना भाऊन गेली. 

तर या कार्यक्रमाचे निर्माते दिग्दर्शक  राजेश येद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे वगनाट्य सादर करताना उत्कृष्ट कलाकार या स्वराज कोकण कलामंच (मुबई) मध्ये घडवत असल्याचे दिसून आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोजक मंडळातील चाळीस सभासदांनी अगदी उत्कृष्ठपणे पार पाडले. रंगमंचामध्ये प्रवेश करताना प्रत्येक प्रेक्षकांना मास्क लावून बसवण्याची जबाबदारी घेऊन, प्रत्येकाला सामाजिक अंतर पाळून बसवण्यात आले. कार्यक्रम हाऊसफुल झाल्यानंतर आयोजक प्रकाश नाडकर यांनी सर्व कलाकार आणि प्रेक्षकांसहित सर्व चाळीस सभासदांचे आभार मानले. असेच सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत असे मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केले.

Sunday 21 February 2021

करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा !!

करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा !!
 

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पालिकेच्या एल विभाग कार्यालयाने ही कारवाई केली आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या मजल्यावर ही महिला राहत होती. मात्र प्रतिबंधित कालावधी संपण्याच्या आतच ही महिला मुंबईबाहेर गेली असल्याचे आढळून आले आहे. तसेच तिच्या घरी काम करणारी महिला कुत्र्याला घेऊन रोज सायंकाळी फिरायला जात असल्याचेही आढळून आले. 

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्वच निर्बंध आता कडक केले आहेत. 
नियमांचे पालन न केल्यामुळे पालिकेने एका महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 
केली आहे. 

पवई येथील एव्हरेस्ट हाइट या इमारतीतील एक रहिवासी करोनाबाधित झाले होते. १४ फेब्रुवारीला त्यांचा अहवाल आला होता. त्यामुळे ते राहत असलेला मजला पालिकेच्या एल विभागाने प्रतिबंधित केला. या मजल्यावरील अन्य रहिवाशांनाही कोणीही वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाऊ नये, असे सांगण्यात आले होते. तशा सूचना सोसायटीच्या व्यवस्थापक आणि सचिवांना देण्यात आल्या होत्या. तसेच या मजल्यावर तसा फलकही लावण्यात आला होता, अशी माहिती एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी दिली. दरम्यान, १७ फेब्रुवारीला पालिकेचे पथक पाहणीसाठी गेले असता रुग्णाच्या मजल्यावर राहणारी कामिया वर्मा ही महिला प्रतिबंधित क्षेत्राचे नियम धुडकावून परवानगी न घेताच मुंबईबाहेर गेल्याचे आढळून आले. ही महिला  परतली नव्हती, असे या पथकाला समजले. 

त्यामुळे अखेर या पथकाने तिच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये व साथरोग नियंत्रण कायद्यान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुसुत्री अंगिकारा : अरुणभाई गुजराथी

जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुसुत्री अंगिकारा : अरुणभाई गुजराथी 

"रोटरी क्लब चोपडा यांचा सुवर्णमोहत्सव उत्साहात साजरा".


चोपडा, (प्रतिनिधी) :
चोपडा रोटरी क्लबला ५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त सुवर्ण मोहत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी बोलत होते .
  

कार्यक्रमाची सुरवात कु.गौरी पाटील हिने गणेश वंदना या सुंदर नृत्याने तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली , गायक पंकज पाटील यांनी शिवजयंती चे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एकच "राजा इथे जन्मला" हे गीत वेशभूषेत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. '१९७१ ते २०२१ या ५० वर्षांच्या' कालखंडात चोपडा रोटरीने राबविलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले. तसेच आत्तापर्यंत ज्यांनी रोटरीचा अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली त्या सर्व रोटरीचा अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला व दिव्यंगत रोटेरियन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच रोटरी इंटरनॅशनल ने चोपडा रोटरीच्या ५० वर्ष दिलेल्या सेवेसाठी 'विशेष सन्मान पत्र रोटरी चे विद्यमान अध्यक्ष नितीन अहिरराव' यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी सहप्रांतपाल योगेश भोळे यांनी चोपडा रोटरीला शुभेच्छा दिल्या .
      
माजी प्रांतपाल रोटे. राजेंद्र भामरे यांनी चोपडा रोटरी क्लबने ५० वर्षात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत, क्लबने मॅचींग ग्रँड आणि इंटरनॅशनल ग्रँड साठी प्रयत्न करावे असे सांगत क्लबच्या उपक्रमांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर रोटे. डॉ.आनंद झुणझुणवाला यांनी सुवर्ण महोत्सवी सोहळ्या निमित्त शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा सौ. आशा वाघजाळे यांनी करून दिला

कार्यक्रमाचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी आपल्या मनोगतात म्हणाले की चोपडा क्लब हा गौरवशाली परंपरा असणारा आहे. ५० वर्षात रोटरीच्या विरोधात एकही बातमी नाही, हे वैशिष्ट्य आहे. समाजाला गराजानुरुप उपक्रम रोटरीने राबविले आहेत. सेवेला अंत नाही. सेवेपुढे अल्प विराम नाही की पूर्ण विराम नाही. वृक्ष संवर्धनासाठी रोटरीने काम केले पाहिजे. रोटरीने समाजाला संजीवनी दिली. मानवतेचा, मैत्रीचा, सेवेचा विचार आणि संस्कार दिला. इथे समाजातल्या सर्व क्षेत्रातली लोक एकत्रित काम करतात. रोटरीची चतुसुत्री जीवनाच्या सर्व क्षेत्रात मार्गदर्शक आहे. चरित्र, चारित्र्य घडवण्याचे व्यासपीठ रोटरी आहे, माझ्या कुटुंबातील चार सदस्य रोटेरियन आहेत व तीन पिढ्या रोटरीत सक्रीय आहेत. रोटरी एक चळवळ असून गौरवशाली परंपरा आहे, 1972 साली मी रोटरीचा अध्यक्ष असताना त्यावर्षी भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा चोपडा रोटरीने दररोज ५०० लोकांना फक्त पन्नास पैशात भाजी - भाकरी उपलब्ध करून दिली होती. मैत्रीतून रोटरीचा जन्म झाला असल्याचे सांगत जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुसूत्री अंगिकारली पाहिजे असे त्यांनी सांगितले .

रोटरीच्या उपक्रमांचे लाभार्थी असलेले मानव सेवा तिर्थ केंद्राचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी 'उन्हात असलेल्या मानव सेवा तिर्थाला सावली दिली' असे सांगत रोटरीचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच माजी प्रेसिडेंट डॉ. परेश टिल्लू यांनी मनोगतात 'रोटरीने मला काय दिले?' याविषयी अनुभव कथन केले.

चोपडा रोटरीचा स्थापना दिवस केक कापून साजरा करण्यात आला. ५० वर्षापासून सदस्य असलेले ज्येष्ठ रोटे. बी.एम.पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून हा आनंद साजरा केला. माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, भावी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, सहप्रांतपाल योगेश भोळे, क्लब प्रेसिडेंट नितीन अहिरराव, सेक्रेटरी अॅड. रुपेश पाटील यांची मंचावर उपस्थिती होती.
     
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा रोटरीचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केले, सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले तर आभार रोटरीचे सचिव रूपेश पाटील यांनी मानले...

दलित वस्ती सुधार योजनेचा गैर वापर करणाऱ्या विरोधात बेमुदत उपोषणा इशारा !!

दलित वस्ती सुधार योजनेचा गैर वापर करणाऱ्या विरोधात बेमुदत उपोषणा इशारा !!


कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे भ्रष्ट अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर व त्यांना पाठीशी घालणारे खडकपाडा पोलीस स्टेशन विरोधात ॲट्रॉसिटी नुसार कारवाई करण्यासाठी आरपीआय प्रणित डी बी एन संघटना, आरपीआय आठवले गट, आर पी आय आंबेडकर गट व मनसे या समविचारी पक्ष संघटनांनी खडकपाडा पोलीस स्टेशन ला भेटी देवून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला 


कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कल्याण मिलिंद नगर येथील दलित वस्तीत  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार निधीतून शौचालय मंजूर झाले होते मात्र मिलिंद नगर या दलित वस्तीला शौचालय पासून वंचित ठेवून ज्या विभागात शौचालयाची गरज नाही व दलित वस्तीही नाही अशा भवानी नगर मध्ये सदर निधी वळवून भवानी नगर मध्येच शौचालयाचे काम सुरू केले आहे याबाबत 3 फेब्रुवारी रोजी अ प्रभाग अधिकारी, संबंधित कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर व अधिकाराचा गैरवापर करणे, दलित वस्तीतील लोकांना सार्वजनिक संपत्ती च्या वापरा पासून वंचित ठेवणे, त्याला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे, महाराष्ट्र शासन व केडीएमसी मुख्यालयातील लोकसेवकास खोटी माहिती पुरवणे, तसे खोटे दस्तावेज तयार करणे, दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर करणे यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ब प्रभाग अधिकारी, कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारित कायदा 2015 ॲट्रॉसिटी नुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी आरपीआय प्रणित डी बी एन संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा यांना तक्रारी अर्ज दिला होता या अर्जावर 20 फेब्रुवारीपर्यंत खडकपाडा पोलीस स्टेशन ने कोणतीही कारवाई केली न केल्यामुळे पोलीस अधिकारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व कॉन्टॅक्टर यांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर व अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे केडीएमसी अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर व खडकपाडा पोलीस ठाणे यांच्या विरोधात आरपीआय प्रणित डीबीएन संघटना, आरपीआय आठवले गट, आरपीआय आंबेडकर गट, मनसे या समविचारी पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने 20 फेब्रुवारी रोजी कल्याण येथील डीसीपी कार्यालय, एसीपी कार्यालय, वरिष्ठ निरीक्षक पोलीस ठाणे खडकपाडा यांना भेटी देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी आरपीआय प्रणित डी बि एन संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मिलिंद वानखेडे, आरपीआय आठवले गट कल्याण शहराध्यक्ष संतोष जाधव, आरपीआय आंबेडकर गट कल्याण शहराध्यक्ष संजय जाधव, मनसे कल्याण विद्यार्थी सेना शहर सह सचिव गणेश नाईक, सुनील उतेकर, सुनील शिंदे, राजू शिंदे, पंकज डोईफोडे, शाखा अध्यक्ष दिलीप गायकवाड आदींसह असंख्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा विक्रम !!

कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा विक्रम !!


कल्याण, अविनाश ओंबासे : ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची कल्याण येथील जलतरण पट्टू कु. श्रावणी संतोष जाधव हिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 कि.मी. सागरी अंतर 3. तास 43 मी पोहून पूर्ण केले... कल्याण ची सागर कन्या म्हणून ओळख असणारी 


श्रावणी जाधव हिने पोहून हे अंतर पार केले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक विक्रम करणारी कल्याणची डोली पाटील...तिच्या पावलावर पाऊल ठेवत श्रावणी येणे मोठी मजल मारली आहे..

श्रावणी हिने हे अंतर पार केल्यानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई च्या माजी महापौर सौ. स्नेहल आंबेकर व स्थायी समिती सदस्या नगरसेविका सौ सुजाता सानप आणि स्विमिंग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे श्री किशोर शेट्टी व संतोष पाटील उपस्तिथ होते. व रुपाली रेपाळे ह्यांनी  निरीक्षक म्हणून काम पहिले. जलतरण पट्टू चे  स्विमिन्ग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे हार्दिक अभिनंदन....

कल्याण मधील डॉक्टर क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न !!

कल्याण मधील डॉक्टर क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न !!


कल्याण, अविनाश ओंबासे (क्रीडा प्रतिनिधी) : कल्याण मधील "इंडियन मेडिकल असोसिएशन, कल्याण" यांच्या वतीने कल्याण मधील सर्व डॉक्टर एकत्र येऊन... गेल्या वर्षभरात कोरोना साठी घेत असलेली मेहनत.... आणि सतत चालू असलेले काम.... या मधून थोडी उसंत घेत.... कल्याण मधील सर्व डॉक्टर क्रिकेट स्पर्धेसाठी क्रीडांगणावर एकत्र आले होते...


या क्रिकेट स्पर्धे मध्ये पुरुषांचे 6 संघ तर महिलांचे 2 संघ अशा 8 संघांमध्ये ही स्पर्धा पार पडली..

या स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद मेडीहोप मोन्स्टस् ने तर उपविजेेपद कृश क्रुझर्स ने पटकवले तर महिला गटाचे विजेतेपद अमेझॉन वॉरियर्स तर उपविजेतेपद टोरांटो क्वींनस ने हसील केले.. या स्पर्धेला युथ काँग्रेस प्रदेश सचिव ब्रिजकिशोर दत्त, संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी चे संचालक संतोष पाठक उपस्थित होते..

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ प्रदीप शेलार, डॉ. संदेश रोटे,  डॉ प्रशांत पाटील यांनी मेहनत घेतली.. तर स्पर्धेत पंच म्हणून परेश हिंदुराव व योगेश शिंदे यांनी कामगिरी पार पाडली..

“राज्यात राजकीय, सामाजिक व धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी”.....

“राज्यात  राजकीय, सामाजिक व धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी”.....
 
मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे.
 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. आपल्या राज्यात पुन्हा एकदा करोना डोकंवर काढतोय. करोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ ते पंधरा दिवसात कळेल. 

मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. 
त्यानुसार  सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच. 

लॉकडाउन नको असेल तर नियम पाळा. येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल.असं देखील त्यांनी सांगितलं आहे.तसेच, कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. 

पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. 
शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा.

नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार. असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हणाले.

मास्क न घालता दुसऱ्यांदा आढळल्यास एक हजार रुपये दंड........

मास्क न घालता दुसऱ्यांदा आढळल्यास एक हजार रुपये दंड........
 
पुणे : राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही करोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता अधिक कडक भूमिका घेतली जात आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नवे आदेश काढले आहेत. 

त्यानुसार आता पुण्यात मास्क न घालता पहिल्यांदा आढळणाऱ्यास ५०० रुपचे दंड व तोच व्यक्ती पुन्हा जर मास्क न घालता आढळला तर त्याच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. 

कोविड -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पारीत केलेले आदेश, निर्देश, ए.ओ.पी. इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सही, शिक्क्यानिशी परिपत्रक काढण्यात आलं आहे. 
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमेवत झालेल्या व्हि.डि.ओ. कॉन्फरन्समध्य देण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचाय समिती, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/ विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी.

कार्यालयीन वेळा बदलाव्यात, महाराष्ट्रासह पाच राज्यांत रुग्णवाढ !!

कार्यालयीन वेळा बदलाव्यात, महाराष्ट्रासह पाच राज्यांत रुग्णवाढ !!


दिवसभरात १३,९९३ बाधित धोरण ठरविण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी.......

मुंबई : नवी दिल्ली महाराष्ट्रासह पाच राज्यांतील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली. 

सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी  मागणी मुख्यमंत्र्यांनी  निती आयोगाच्या बैठकीत केली. 

निती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे सहभागी झाले होते. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी करोना निर्बंध शिथिल झाल्यापासून करण्यात येत आहे. सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते.

ती टाळण्यासाठी केंद्राने आपल्या कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.
पाच राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधील एकूण रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण ७५.८७ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...