Sunday 21 February 2021

करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा !!

करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा !!
 

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पालिकेच्या एल विभाग कार्यालयाने ही कारवाई केली आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या मजल्यावर ही महिला राहत होती. मात्र प्रतिबंधित कालावधी संपण्याच्या आतच ही महिला मुंबईबाहेर गेली असल्याचे आढळून आले आहे. तसेच तिच्या घरी काम करणारी महिला कुत्र्याला घेऊन रोज सायंकाळी फिरायला जात असल्याचेही आढळून आले. 

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्वच निर्बंध आता कडक केले आहेत. 
नियमांचे पालन न केल्यामुळे पालिकेने एका महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 
केली आहे. 

पवई येथील एव्हरेस्ट हाइट या इमारतीतील एक रहिवासी करोनाबाधित झाले होते. १४ फेब्रुवारीला त्यांचा अहवाल आला होता. त्यामुळे ते राहत असलेला मजला पालिकेच्या एल विभागाने प्रतिबंधित केला. या मजल्यावरील अन्य रहिवाशांनाही कोणीही वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाऊ नये, असे सांगण्यात आले होते. तशा सूचना सोसायटीच्या व्यवस्थापक आणि सचिवांना देण्यात आल्या होत्या. तसेच या मजल्यावर तसा फलकही लावण्यात आला होता, अशी माहिती एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी दिली. दरम्यान, १७ फेब्रुवारीला पालिकेचे पथक पाहणीसाठी गेले असता रुग्णाच्या मजल्यावर राहणारी कामिया वर्मा ही महिला प्रतिबंधित क्षेत्राचे नियम धुडकावून परवानगी न घेताच मुंबईबाहेर गेल्याचे आढळून आले. ही महिला  परतली नव्हती, असे या पथकाला समजले. 

त्यामुळे अखेर या पथकाने तिच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये व साथरोग नियंत्रण कायद्यान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...