Thursday 31 March 2022

कचरा संकलनासाठी तैनात केलेल्या सायकल रिक्षांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद !

कचरा संकलनासाठी तैनात केलेल्या सायकल रिक्षांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद !


कल्याण, बातमीदार : महापालिका क्षेत्रात असलेल्या झोपडपट्टी परिसरात, दाटीवाटीच्या वस्तीत तसेच अरुंद गल्ली बोळात महापालिकेचे मोठी कचरा वाहने कचरा संकलनासाठी आत जाऊ शकत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाने २५ सायकल रिक्षा प्राथमिक टप्प्यात खरेदी केल्या असून त्यापैकी काही सायकल रिक्षा आय प्रभागात आणि काही सायकल रिक्षा अ प्रभागात कचरा संकलन वाहतूकीसाठी देण्यात आल्या आहेत.


आज आय प्रभागातील कचरा संकलन करणा-या सायकल रिक्षांनी गोळवली, पिसवली, आशेळे, दावडी या परिसरातील अरुंद रस्त्यावर, झोपडपट्टी परिसरात फिरून तेथील नागरिकांकडून कचरा संकलित केला. अ प्रभागातील गाळेगाव, मोहना, बंदरपाडा, मांडा पश्चिम येथील झोपडपट्टी परिसरात आणि दाटीवाटीच्या परिसरातील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडूनही आज या सायकल रिक्षांमार्फत कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेचे कचरा संकलित करणारे वाहन प्रत्यक्ष दारात पाहून नागरिकांनी स्वतःहूनच ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करत महापालिकेच्या सायकल रिक्षांना चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमध्ये पहिल्या स्थानावर !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमध्ये पहिल्या स्थानावर !!

    
भिवंडी, दिं,३१, अरुण पाटील (कोपर) :
         इंडियन एक्सप्रेसने २०२२ मधील १०० सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जाहीर झाली असून  यात  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर  आहेत.
          देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. इंडियन एक्सप्रेसने २०२२ मधील १०० सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे.

क्रमांक १ नरेंद्र मोदी, पंतप्रधान (२०२२)

क्रमांक 2 अमित शहा, गृहमंत्री (२०२२)

क्रमांक 3 मोहन भागवत, संघप्रमुख (२०२२)

क्रमांक 4 जेपी नड्डा, भाजप अध्यक्ष (२०२२)

क्रमांक 5. मुकेश अंबानी, उद्योगपती (२०२२)

क्रमांक 6 योगी आदित्यनाथ, यूपीचे मुख्यमंत्री (२०२२)

          यूपीचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी २०२१ मधील १३ व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामागील कारण म्हणजे यूपीमध्ये भाजपचा शानदार विजय. २०१७ मध्ये भाजपने यूपीमध्ये पीएम मोदींच्या करिष्म्यावर निवडणूक जिंकली होती. मात्र २०२२ ची निवडणूक हा योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा निर्णय मानला जात आहे.
         विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने काम केले त्याला लोकांनी दाद दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असून, देशातील १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत ते अजूनही पहिल्या क्रमांकावर असल्याचे या यादीतून दिसून आले आहे. 
        कोरोना महामारीमुळे उद्भवलेले संकट आणि त्यावरील लसीचे व्यवस्थापन, विधानसभा निवडणुकीत भाजपची मजबूत झालेली स्थिती यामुळे पंतप्रधान मोदींची प्रतिमा उंचावली आहे. याशिवाय, अलीकडेच, युक्रेनमधून २२००० हून अधिक तरुण भारतीयांना घरी आणण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे कौतुक केले गेले आहे.

राज्य सरकारचा निर्णय "महाराष्ट्रात हटवले कोरोनाचे सर्व निर्बंध" ! आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द !!

राज्य सरकारचा निर्णय "महाराष्ट्रात हटवले कोरोनाचे सर्व निर्बंध" ! आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द !!


मुंबई, बातमीदार : कोरोना निर्बंधांतून महाराष्ट्र मुक्त झाला आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र मास्कचा वापर करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. नवीन होणारी रुग्णवाढ देखील कमी आहे. तसेच बहुतांश लोकांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल केले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येणार आहे. सर्व सण साजरे करणे तसेच मिरवणूकांवर बंदी हटवली.

दरम्यान, मास्कचा वापर हा ऐच्छिक असल्याची माहिती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको. आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. 

स्त्री परिचर यांचे थकीत पगार अदा करा.. कॉमरेड अमृत महाजन

स्त्री परिचर यांचे थकीत पगार अदा करा.. कॉमरेड अमृत महाजन


चोपडा, बातमीदार.. जळगाव जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्र/ केंद्रे मध्ये कार्यरत आरोग्य सेविकान बरोबर 500 स्त्री परिचर अत्यंत कमी म्हणजे तीन हजार रुपये दरमहा पगारावर काम करतात. त्यांना कुठल्याही प्रकारे प्रवास भत्ता मिळत नाही पदरचे पैसे खर्च करून त्यांना खेडोपाडी आरोग्य सही जावे लागते. हे कमी की काय? तेही वेळेवर मिळत नाही. गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्यांना हे तुटपुंजे वेतनही देणेत आलेले नाही त्याची उपासमार होत आहे तरी ते देण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आयटकचे उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन स्त्री परिचार जिल्हा संघटनेच्या संघतिका श्रीमती वंदना पाटील जळगाव, पुष्पा ठाकूर, मंगला माळी, सायरा बाई तडवी, श्रीमती बोदडे, नंदा पाटील, विजया पाटील, श्रीमती चिंचो रे, श्रीमती बारी यांनी केली आहे.

आता गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ॲम्बीस प्रणालीचा होणार वापर --गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील

आता गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ॲम्बीस प्रणालीचा होणार वापर --गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील


भिवंडी, दिं,३१ अरुण पाटील (कोपर) :
          गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांमार्फत ॲम्बीस प्रणालीची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली तसेच आता महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली ही ११२ या क्रमांकावरून तीन स्तरावर काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
          गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता राज्य पोलिस दलाच्या वतीने ॲम्बीस प्रणालीची मदत घेतली जाणार आहे. सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुब्बुळ इत्यादीचा एकत्र डेटाबेस हा ॲम्बीस प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
            ॲम्बीस प्रणालीच्या माध्यमातूनच गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, हातांचे ठसे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅनिंग साठवण्यासाठी ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढवणारी ठरेल, असा विश्वास वळसे-पाटील यांनी व्यक्त केला. तसेच या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास मदत होणार आहे.
            पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरत आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत आहे. आता केवळ बोटांचे ठसेच नाही तर हातांचे, तळवे, चेहरा आणि डोळ्यांचे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवले जात आहेत. यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
             शंभर क्रमांक डायल करून महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला कळवले जात होते. मात्र आता ११२ हा क्रमांक डायल करून या प्रतिसाद प्रणालीला संपर्क करता येणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रणालीचा गुढीपाडव्याला उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती वळसे- पाटील यांनी दिली.
             महाराष्ट्रातील सर्व जिल्हा नियंत्रण केंद्राद्वारे ही प्रणाली वापरली जाणार असून, आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी या प्रणालीचा वापर केला आहे. पोलिसांकडून दिला जाणारा प्रतिसादाचा वेळ हा दहा ते वीस मिनिटांवर असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे कमीत कमी वेळात तक्रार कर्त्यापर्यंत पोलिसांना पोहोचणे शक्य होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच तक्रारकर्ता जीपीएसद्वारे ट्रँक केला जात असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होत आहे.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक कैलास मेधाने यांच्या कामाचे केले कौतुक !!

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक कैलास मेधाने यांच्या कामाचे केले कौतुक !!


ठाणे, (संजय कांबळे) : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असताना, नागरिकांना सुरक्षित अंतर, मास्क आणि सँनिटायझरचा वापर या त्रिसूत्री चा अवलंब करण्याचे अवाहन महाराष्ट्र शासन करीत असताना अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कलाक्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री यांच्या माध्यमातून 'जा लढवया तू मावळ्यां' या प्रेरणादायी, स्फूर्ती, उर्जा, आत्मविश्वास वाढवणा-या गाण्यातून संपूर्ण कोरोना योध्दांना मानवंदना देणाऱ्या चित्रपट निर्माते दिग्दर्शक कैलास मेधाने यांच्या या कामाचे कौतुक ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नुकतेच केले.


नाशिक जिल्ह्यातील दिडोंरी या मागास तालुक्यातील खेडले या छोट्याशा गावात कैलाश मेधाने यांचा जन्म झाला. आईवडिलांच्या गरीबी मुळे कैलास यांना जिवनाचीच घ्रूणा वाटत होती. ही परिस्थिती बदलाची असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही खुणगाठ मनाशी बांधून मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण केले. सुदैवाने महिंद्रा अँड मंहिद्रा मध्ये नोकरीही लागली, पंरतु यातून पैसा मिळेल पण माझ्या आईवडिलांची एक वेगळी ओळख, या मुलाचे ते आईवडील अशी समाजाप्रती ओळख निर्माण करण्यासाठी नोकरी सोडून मुंबई चा अर्थात मायानगरी चा रस्ता धरला. स्वाभाविक च सुरुवातस अंनत अडचणींना तोंड देत १/२चित्रपट १०/१२ मालिका मिळाल्या, यामध्ये अँक्टर म्हणून काम मिळाले. परंतु अशी छोटी मोठी कामे करुन जिवनातील धेय्य साध्य होणार नाही, हे लक्षात आल्याने हळूहळू दिग्दर्शनाकडे वळलो.


जिद्द, चिकाटी, काहीतरी शिकण्याची उर्मी आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे असिस्टंट, क्लाँँप मारण्यापासून ते टिसीआर लिहण्यापर्यत क्ँस्टूयम कुम्यानिटी टि ऐ डी, फिल्म, वेबसिरीज, सिरीयल, असिस्टं केले. हे करत करत ते असोशियट पर्यंत चा प्रदिर्घ प्रवास झाल्यावर स्वतः काहीतरी करायचे असे ठरवले असतानाच, महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला.


शासन त्यांच्या पातळीवर विविध उपाययोजना करत होते. नागरिकांना अवाहन करत होते. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, नर्स, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, पत्रकार, पोलीस, लोकप्रतिनिधी हे आप आपल्या परिने कर्तव्य पार पाडत होते. त्यामुळे अशा संकटसमयी आपणही काहीतरी वेगळं करावं या हेतूने "जा लढवया तू मावळ्यां', हे गाणं मराठी-नाट्य चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्री यांनी घेऊन केले, आयुष्यातील पहिल दिग्दर्शन केलेल्या या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात सन्मानाने गायीले, दाखवले जाऊ लागले, शासनाच्या आरोग्य विभागाने तर यांचे तोंडभरून कौतुक केलं, अनेक जिल्हाधिका-यानी समाधान व्यक्त केले.


या गाण्यातून डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील कोरोना योध्दांंना मानवंदना देण्याचा हा प्रयत्न खूपच यशस्वी झाला. यातून अनेकांना, लढण्याची प्रेरणा, शक्ती, प्रोत्साहन, मिळाले. या गाण्याने केलाश मेधाने हे यशस्वी दिग्दर्शक म्हणून सिध्द झाले.

यानंतर त्यांनी २५ पेक्षा अधिक अल्बम काही चित्रपट, वेबसिरीज, मालिका, केल्या. यानंतर मोठा प्रोजेक्ट करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. तसेच अनेक शासकीय योजना, प्रोजेक्ट वर काम करण्याची इच्छा त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे व्यक्त केली. 

त्यांनी देखील विविध विषयावर मोलाचे मार्गदर्शन करुन विविध शासकीय प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची संधी देऊ असा विश्वास दिला. यावेळी श्री मेधाने यांना विचारले असता ते म्हणाले, मला संकट काळात सुजित सुरवसे, ख्यातनाम मेकअप आर्टिस्ट संजय प्रभाकर, किरन वाघ, सचिन निबंकर, सचिन देवा, योगेश मेधाने, समीर कोंडा आदीनी मदत केल्याचे सांगितले. तर भविष्यात कैलाश मेधाने हे यशस्वी व मोठा दिग्दर्शक म्हणून फिल्म इंन्डस्टिज मध्ये दिसतील असा विश्वास प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजय प्रभाकर यांनी व्यक्त केला याप्रसंगी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊसचे टिमप्रमुख तथा पत्रकार संजय कांबळे हे ही उपस्थित होते..

शिवसेना शाखा १५ आणि १७ च्या वतीने गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन !!

शिवसेना शाखा १५ आणि १७ च्या वतीने गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन !!


मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
          गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त 
गुढी उभारून पारंपारीक वेशभूषा पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. वॉर्ड नंबर १५ आणि १७ च्या रहीवाशांना सर्वांना विनंती आहे की या निमित्ताने आपली उपस्थिती अनिवार्य आहे. ते पण पारंपरिक वेशभूषेत लहान मुलांना व महिलांना विशेष करून विनंती आहे ताई, माई, अक्का यांनी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ काढून नक्की यावे. हा आपला सर्वांचा घरचा उत्सव आहे. शनिवार दिनाक ०२/०४/२०२२ रोजी ब्रम्हा विष्णू मंदिर शिंपली गाँव येथे सकाळी ७:३० वाजता या उत्सवला सुरुवात होईल तर शिवसेना शाखा १५, आदित्य कॉलेजच्या मागे समाप्त होणार आहे. शिवसेना  शाखा क्र १५ व १७ आणि शिवबा मित्र मंडळतर्फे जल्लोष आणि आनंदोतस्व एकत्रीत साजरे करू या. तरी रहिवाशांनी मोठया संख्येने या कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपविभाग प्रमुख दामोदर म्हात्रे, शाखा प्रमुख श्री. सुनिल पाटील, शाखा प्रमुख श्री सचिन म्हात्रे शिवसेना शाखा १५ आणि १७ च्या महिला -पुरुष, युवा पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांनी केले आहे.

Wednesday 30 March 2022

दोन वर्षाच्या कोरोना काळावधी नंतर मुरबाड मध्ये जल्लोषात साजरा होणार गुढीपाडवा !! दोन वर्षाच्या कोरोना काळावधी नंतर मुरबाड मध्ये जल्लोषात साजरा होणार गुढीपाडवा !!

दोन वर्षाच्या कोरोना काळावधी नंतर मुरबाड मध्ये जल्लोषात साजरा होणार गुढीपाडवा !!

**नववर्ष स्वागत याञेची मुरबाड नगरीत जय्यत तयारी **


मुरबाड, मंगल डोंगरे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष खंड पडलेल्या गुढीपाडवा नववर्ष स्वागत याञेची मुरबाड मधे जय्यत तयारी सुरु आहे. यंदा ब-यापैकी निर्बंध शिथिल झाल्यामुळे  मुरबाड नगरपंचायत व नववर्ष स्वागत समिती यांच्या सयुंक्त पुढाकाराने २ एप्रिल गुढिपाडव्याला भव्य अशी स्वागत याञा काढली जाणार असून स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना व कार्यकर्त्यांंना तशा सूचना दिल्या आहेत. 


मुरबाड शहरातील सर्व रस्ते पाण्याने साफ करुन प्रत्येक घरासमोर, चौकात रांगोळ्या काढल्या जाणार आहेत. हिंदू नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्याचे ठरले असून स्वतः आमदार कथोरे या मिरवणूकीत सहभागी होणार आहेत. शाळेय मुलांचे लेझीम पथम, ढोल पथक, भजन मंडळ, आकर्षक सजवलेली बैलगाडी, झेंडे, पताका, यांचा मिरवणूकीत समावेश होणार असून महिलांची बाईक रॕलीचे विशेष आकर्षण असणार आहे. त्याच बरोबर महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्वागत समितिच्या वतिने केले गेले असून नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे स्वागत समितिचे अध्यक्ष असणार आहेत. 


अशा या भव्यदिव्य होणाऱ्या स्वागत याञेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वागत समितिच्या वतिने करण्यात आले आहे.

कल्याण रेल्वेस्थानक परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटले !!

कल्याण रेल्वेस्थानक परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटले !!


कल्याण ,बातमीदार : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पहाटेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका प्रवाशाचा मोबाईल लुबाडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती


कल्याण रेल्वे पोलिसांनी केवळ वर्णनावरुन सहाय्यक आयुक्त विजय दरेकर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत या चोरट्याला अवघ्या दोन तासात कल्याण बैलबाजार परिसरातून अटक केली आहे. मोनू चाळके असं या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसानी सांगितले आहे.

दरम्यान, या चोरट्यांकडून पोलिसांनी चाकू आणि चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे. अटक केलेला मोनू चाळके हा अंबरनाथ येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात आधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे


अवैध रेती उपसा करणाऱ्या विरोधात कल्याण डोंबिवलीत कारवाई !!

अवैध रेती उपसा करणाऱ्या विरोधात कल्याण डोंबिवलीत कारवाई !!


कल्याण, बातमीदार : खाडी परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेती उपसा होत असते. मंगळवारी दुपारी वाळू उपसा करत असलेल्या रेती माफियांवर तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


कल्याणमधील दुर्गाडी रेतीबंदर आणि डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरु होता. या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात हलविली जात होती. रेती उपसा करणारे ड्रेजर्स, बाज, बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या. त्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली. थेट खाडीत बोटीने पाहणी करीत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला.

तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणाऱ्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. पथक उपसा करणाऱ्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या घेत पळ काढला. कारवाई पथकाने सात रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड या पथकाने नष्ट केली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे.

Tuesday 29 March 2022

ठाण्यात सांडपाण्याची टाकी साफ करताना योग्य खबरदारी "न" घेतल्याने दोघा मजुरांचा मृत्यू !! "हि दुसरी घटना"

ठाण्यात सांडपाण्याची टाकी साफ करताना योग्य खबरदारी  "न" घेतल्याने दोघा मजुरांचा मृत्यू !! "हि दुसरी घटना"


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
            ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंब्रा भागात कौसा स्टेडियमजवळील एका सोसायटीच्या सांडपाणी प्रक्रिया टाकीची साफसफाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी "न" घेतल्याने दोन मजूरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आता या प्रकारणात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
             ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात टाकी साफ करताना कामगारांच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. याआधी रविवारी ठाण्यातील हरिनिवास सर्कल जवळील चार मजली इमारतीच्या टाकीची साफसफाई करताना दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
            काल सायंकाळी मुंब्रा येथील कैसा स्टेडियमजवळील ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारात हनुमान विकांती कोरपकवड (वय २५) व सूरज राजू माधवी (वय २२, दोघे रा. डोंबिवली) सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी खाली उतरले होते. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दोघेही टाकीतून बाहेर न आल्याने सोसायटीतील लोकांनी खाली पाहिले. दोघेही कामगार बेशुद्ध अवस्थेत होते. दोघांनाही तातडीने जवळच्या प्राईम क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन्ही मजुरांना मृत घोषित केले. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. सुरवातीला अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करून तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
          रविवारी दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर अद्याप कोणताही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नसून, या संदर्भात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लाऊडस्पीकरने होणारी अजान बंद करा व सण साजरे करण्यासाठी परवानगी द्या - भाजपची मागणी.

लाऊडस्पीकरने होणारी अजान बंद करा व सण साजरे करण्यासाठी परवानगी द्या - भाजपची मागणी.


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
                राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यापासून हिंदू नाराज असून, हिंदूंच्या  सणांवर निर्बंध घालून हिंदूंच्या आनंदावर विर्झन घालण्याचं काम केलं असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. त्यातच आता गुढी पाडव्याला निघणाऱ्या शोभा यात्रेसाठी, राम नवमीच्या मिरवणुका काढण्यासाठी आणि सण जल्लोषात साजरे करण्यासाठी परवानगी द्या, या साठी भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.
              भाजपने यावेळी मशिदीमधून अजानमुळे मुंबईकर नाराज असल्याचं देखील सांगितले आहे. ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात, मात्र ध्वनि प्रदूषणाचं मोठं कारण हे मशिदीवरून लाऊड स्पीकरने दिली जाणारी अजान असल्याचं मत भाजपच्या शीष्ट मंडळाने यावेळी व्यक्त केले. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राहुल नार्वेकर आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
              भाजपकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षानिमित्त अनेक ठिकाणी यात्रेचं आयोजन केलं जातं. अशा यात्रेच्या स्वागतासाठी मुंबईत तयारी सुरु आहे. त्यामुळे या यात्रेला परवानगी द्यावी. तसंच रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि हनुमान जयंती हे सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी देखील या वेळी करण्यात आली आहे.

विकेल ते पिकेल अभियानातून शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होईल - किसन मुळे "जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन ; कृषि महोत्सवात अन्नधान्य प्रदर्शनी व विक्री"

विकेल ते पिकेल अभियानातून शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होईल - किसन मुळे

"जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन ; कृषि महोत्सवात अन्नधान्य प्रदर्शनी व विक्री"


बुलडाणा, बातमीदार, दि. २८ : राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असते. वाढत्या उत्पादकतेतून शेतमालाचा दर्जा चांगला ठेवत शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होणे काळाची गरज आहे. ग्राहकाभिमुख विचार करीत जे विकेल ते पिकविले पाहिजे. राज्य शासन यासाठी विकेल ते पिकेल अभियान राबवित आहे. या अभियानातून शेतमालाची मूल्यसाखळी विकसित होत आहे, असे प्रतीपादन अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी आज केले. 


स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय एकदिवसीय कृषि महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन फित कापून जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात आले. या उद्घाटनीय कार्यक्रमाचे आयोजन २८ मार्च रोजी करण्यात आले. त्यावेळी विभागीय कृषि सहसंचालक श्री. मुळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, बुलडाणा कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन अभियंता डॉ. प्रमोद बकाने, कृषि विकास अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे, कृषी उपसंचालक श्री. बेतीवार, उपविभागीय कृषि अधिकारी सर्वश्री संतोष डाबरे, श्री. पटेल, श्री. मिसाळ, डॉ. पीडीकेव्ही समिती सदस्य विनायक सरनाईक, कृषि विज्ञान केंद्र जळगांव जामोदचे प्रमुख विकास जाधव, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कोटे आदी उपस्थित होते. उद्घाटनांनतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक स्टॉल ला भेट देत पाहणी केली. 


शेतमालाच्या जास्तीत जास्त विक्रीसाठी ग्राहकाभिमुख विपणन व्यवस्था उभारण्याचे आवाहन करीत विभागीय कृषि सहसंचालक श्री. मुळे म्हणाले, शेतमालाचा दर्जा चांगला ठेवण्यात यावा. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करावे. शेतमाल जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी शेतमालाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या स्मार्ट उपक्रमात शेतकरी उत्पादक कंपनीला ६० टक्के अनुदान देण्यात येते. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. 

प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक म्हणाले, कृषि महोत्सवातून विचारांची देवाण – घेवाण होते. तसेच शेतीतील नवनवीन प्रयोग, उपक्रम व तंत्रज्ञानाचीही देवाण घेवाण होते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे अशाप्रकारचे आयोजन करता आले नाही. आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे कृषि क्षेत्रातील ज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी नांद्राकोळी गावचे शेतकरी तथा माजी सरपंच संजय काळवाघे यांनी पोकरा योजनेचे लाभ सांगितले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्याहस्ते कृषि विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पॉकेट डायरी व हस्तपत्रकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर मागील काळात राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त व पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बाळकृष्ण वासुदेव पाटील कंडारी ता. नांदुरा, विठोबा दंदाळे खल्याळगव्हाण ता. दे. राजा, प्रल्हाद संपत गवते मंगरूळ ता. चिखली, सौ. अनिता रामसिंग पवार, मलगी ता. चिखली, संजय ज्ञानेश्वर चिबळे, भगवान आश्रुजी काकडे टिटवी ता. लोणार, विमलताई विजयराव टापरे, वच्छला नारायण कोकाटे, सौ. वसुधा विजय चांगडे, श्रीकांत पवार पाडळी, विजय भुतेकर सवणा ता. चिखली, जयश्री संजय पाखरे रोहीणखेड ता. मोताळा, महेश उन्हाळे तांदुळवाडी ता. मलकापूर, रूपेश थोरात धानोरा ता. नांदुरा, अनिल मेटांगे येऊलखेड ता. शेगांव, ताराबाई गजानन करळे मडाखेड ता. जळगांव जामोद, मोहन आगरकर बोडखा ता. संग्रामपूर, खासदार प्रतापराव गणपतराव जाधव मादनी ता. मेहकर, प्रकाश विठोबा नरवाडे बागुलखेड ता. लोणार, प्रदीप जायभाये रूमणा ता. सिं. राजा, विकास चेके सरंबा ता. दे. राजा, अमद घट्टे सायखेड ता. संग्रामपूर, रामेश्वर रिंढे मेहकर आदींचा समावेश होता. संचलन उमेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन उपसंचालक श्री. बेतीवार यांनी केले. कार्यक्रमाला शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी, शेतकरी गट, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समृद्धी महामार्गाच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी !!

समृद्धी महामार्गाच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी !!                         
                                                           
बुलडाणा, बातमीदार, दि. 29 : राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मेहकर जवळील फर्दापूर इंटरचेंज जवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, माजी वनमंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड, तहसिलदार संजय गरकल, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान मंत्री श्री. शिंदे यांनी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेच्या परिसरात गल्ली बोळातील अरुंद रस्त्यांवरील कचरा गोळा करणेसाठी आता महापालिकेच्या ताफ्यात २५ सायकल रिक्क्षा तैनात होणार !

महापालिकेच्या परिसरात गल्ली बोळातील अरुंद रस्त्यांवरील कचरा गोळा करणेसाठी आता महापालिकेच्या ताफ्यात २५ सायकल रिक्क्षा तैनात होणार !


कल्याण, बातमीदार : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड कालावधीतही २५ मे २०२० रोजी महापालिका क्षेत्रात शुन्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात झाली होती. महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेनुसार कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर रहावी, यासाठी घनकचरा विभागातील अधिकारी/कर्मचारी, उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा संकलन करणे ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे यासाठी अविरत प्रयत्‍न करीत आहेत. या प्रयत्नांमुळे महापालिका क्षेत्रात आता सुमारे ९० - ९५ टक्के कच-याचे वर्गीकरण होवू लागले आहे.

महापालिकेने कच-यापासून बनविलेल्या सेंद्रीय खताला मोठया प्रमाणावर मागणी  असून महापालिकेच्या उंबर्डे आणि बारावे येथील प्रकल्पांवर गत वर्षभरात सुमारे १० हजार मेट्रीक टन खताची निर्मिती करण्यात आली आहे, तथापि महापालिकेच्या काही भागात अरुंद रस्ते, गल्‍ली बोळ असल्यामुळे सदर ठिकाणी कचरा संकलनासाठी महापालिकेची मोठी वाहने पोहचू शकत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी कचरा संकलन होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे तेथील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींचे निवारण करण्याकरीता महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत आता २५ सायकल रिक्क्षांची खरेदी करण्यात येणार असून या सायकल रिक्क्षा अरुंद रस्त्यांवर, गल्ली बोळात फिरुन कचरा गोळा करणार असल्यामुळे अशा ठिकाणी राहणा-या नागरिकांचे कच-याबाबतच्या समस्येचे निवारण होवून त्यांना दिलासा मिळणार आहे.

काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर आतापर्यंत फक्त ३४ लोकांकडून संपत्ती खरेदी !!

काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर आतापर्यंत फक्त ३४ लोकांकडून संपत्ती खरेदी !!


भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
           पृथ्वीवर स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्या नंतरही संपत्ती खरेदी करण्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आतापर्यंत  राज्यातील ३४ लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. ५ ऑगस्ट, २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरसाठीचे कलम ३७० संपुष्टात आणून जम्मू-काश्मीर तसेच लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली होती.
           जम्मू-काश्मीरमधील संपत्ती खरेदीबाबत बसपाचे खासदार फजलुर रहमान यांनी प्रश्न उपस्थित केला होता. बाहेरच्या राज्यातील लोकांनी ज्या भागात संपत्ती खरेदी केली आहे. त्यात जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यांचा समावेश आहे, असे नित्यानंद राय यांनी नमूद केले.
           कलम ३७० रद्द होण्याआधी तत्कालीन जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होता आणि तेथे केवळ स्थानिक नागरिकच संपत्तीची खरेदी करू शकत होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत निमलष्करी दलाशी संबंधित बाराशे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहितीही सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून नारायण राणे यांना मोठा दिलासा, जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यावर कारवाई केली जाणार नाही !!

मुंबई महानगर पालिकेकडून नारायण राणे यांना मोठा दिलासा, जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यावर कारवाई केली जाणार नाही !!


भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
            मुंबई महापालिकेने जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेणारे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पालिकेने दिलेली नोटीस मागे घेण्यात येत असल्याचं राज्याच्या महाअधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. त्यामुळे आता राणेंच्या बंगल्यावर कारवाई केली जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
            सुनावणी दरम्यान महापालिकेने केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांना मोठा दिलासा देणारी माहिती न्यायालयाला दिली. सुनावणी दरम्यान राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार राणेंच्या बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मागे घेण्यात आलेत.
             नारायण राणे यांनी ही नोटीस मागे घेण्यात यावी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला पालिकेने महाधिवक्त्यांच्या माध्यमातून, “आम्ही ही नोटीस मागे घेत आहोत,” असं सांगितलं आहे. नारायण राणेंना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्यांना हे बांधकाम हटवण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला जो उद्या संपणार होता.
             राणेंनी बंगल्यात अनेक ठिकाणी आराखड्याच्या विरूद्ध बांधकाम केल्याचा पालिकेचा दावा असून पालिकेने बांधकाम नियमित करून घेण्याची संधीच दिली नाही असा दावा राणेंनी याचिकेत केला होता. एकिकडे याचिकेत काहीही बेकायदेशीर नाही असा दावा असताना मग बांधकाम नियमित करण्याचा प्रश्नच कुठे येतो? असा प्रश्न २२ मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान पालिकेने याचिकेसंदर्भात युक्तिवाद करताना उपस्थित केला.
            यावेळी कोर्टाने बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी नारायण राणे यांनी केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे पालिकेला आदेश दिले होते. तसंच निर्णय विरोधात असल्यास बांधकामावर तीन आठवडे कारवाई न करण्याचेही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. हा कालावधी उद्या संपत होता. त्यापूर्वीच पालिकेने आता नोटीस मागे घेतल्याचं स्पष्ट केलंय. आता हे बांधकाम अधिकृत करण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.
          नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे पालिका राणे यांच्या बंगल्याची तपासणी केली गेली होती. तसेच, या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले होते.
          बंगल्यातील अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत हटवण्यास सांगितले होते. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, राणेंना नोटीस जारी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत हे अनधिकृत बांधकाम हटवण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती.
          नोटीसनुसार, जर बेकायदेशीर बांधकाम निर्धारित वेळेत हटवले नाही तर, पालिका ते पाडेल आणि पाडण्यासाठी लागणारे शुल्क बीएमसीच्या मूल्यांकन विभागाकडून वसूल केले जाईल. नोटीसमध्ये असा इशारा देण्यात आला होती की, “तुम्ही दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम ४७५ अ अंतर्गत तुमच्यावर कारवाई करेल असे नोटिसीत म्हटले होते.
          २१ फेब्रुवारी रोजी, नागरी अधिकार्‍यांच्या पथकाने सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुहू परिसरात असलेल्या नारायण राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर वेळोवेळी राणेंना कालावधी वाढवून देत अखेर आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र आता ही नोटीस मागे घेण्यात आल्याने राणे यांना दिलासा मिळाला आहे.

२८/ २९ मार्च दोन दिवसांचा संप चोपडा येथेही सुरू ! "तहसीलदार यांना आयटक तर्फे निवेदन सादर"

२८/ २९ मार्च दोन दिवसांचा संप चोपडा येथेही सुरू ! 
"तहसीलदार यांना आयटक तर्फे निवेदन सादर"


चोपडा, बातमीदार ..महाराष्ट्र राज्य कामगार संघटना कृती समिती तर्फे २८/ २९ मार्च २०२२ रोजी दोन दिवसीय संपात सहभागी आहोत याची जाणीव शासनाला करून देण्यासाठी आयटक अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे चोपडा नायब तहसीलदार श्री सय्यद साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. 


तत्पूर्वी अल्पबचत भवन पटांगणात सुलोचना भदाणे अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला त्यात पुष्पावती मोरे, सुरेखा पाटील, मदतनीस प्रतिनिधी व आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन, तालुका अध्यक्ष वत्सला पाटील यांनी मार्गदर्शन केले. 


निमगवहान बीट अध्यक्ष संध्या पाटील सखुबाई पाटील, मनीषा पाटील, घोडगाव बीट अध्यक्षा पुशपावती मोरे यांचे नेतृत्वात सुरेखा पाटील, कल्पना पाटील, ललिता पाटील, शकुंतला मोरे, राजश्री मोरे, सुलोचना शांताराम पाटील, कुमुदिनी कोळी, दिपाली पाटील, गणेश महाजन आदीं चे सह्यांचे १६ मागण्यांचे निवेदन मध्ये म्हटले आहे की. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार सहिता रद्द करावेत व पूर्वीचे २९ कामगार कायदा लागू करा. 


सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा. असंघटित कर्मचाऱ्यांचे पगार २२ हजार ₹ करा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वाढीव पगारासाठी आर्थिक तरतूद करा पेट्रोल डिझेल दरवाढ गॅस दरवाढ रद्द करा सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा विज कायदा रद्द करा. २८/ २९ मार्च २०२२ या दोन दिवसाच्या घोषित संपात देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी सहभाग घेतला असून त्यात आयटक सिटू इंटर वाहतूक संघटना हिंद मजदुर सभा. बँक, विमा, टपाल, संरक्षण, खान, विज क्षेत्रात २० कोटी असंघटित जनतेचा समावेश आहे असे जळगाव जिल्हा आयटक ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे..


म्हारळ गावात साईबाबा पँनेलचा महिला स्नेह मेळावा, पैठणी जिंकण्यासाठी महिलांची तूफान उपस्थिती !!

म्हारळ गावात साईबाबा पँनेलचा महिला स्नेह मेळावा, पैठणी जिंकण्यासाठी महिलांची तूफान उपस्थिती !!


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या हिट लिस्टवर असल्याने गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात न गेलेल्या महिला साई बाबा पॅनल आयोजित महिलस्नेह मेळावा (हळदीकुंकू) समारंभात  पैठणी जिंकण्यासाठी तूफान सहभागी होऊन उत्साहात पार पडला.


या मेळाव्यात म्हारळ व परिसरातील असंख्य महिलांची उपस्थिती  होती.


कार्यक्रमात कोरोना काळात तसेच उत्तम आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, नर्स पत्रकार संजय कांबळे व आशासेविका यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच शिक्षणक्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या काही शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचा सुद्धा गौरव करण्यात आला महिलांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे खास आकर्षण होते खेळ खेळूया पैठणीचा सुप्रसिद्ध निवेदक श्री हेमंत नारायण झुंजारराव सर यांनी आपल्या भाषा शैलीने सर्व उपस्थित महिलांचे मन जिंकले. खूप साऱ्या महिलांनी खेळात भाग घेऊन आनंद व्यक्त केला. तसेच आयोजकां कडून पैठणी साडी, मानाची नथ तसेच खूप सारे बक्षिसे देण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी म्हारळ ग्रामपंचायत च्या उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सौ वेदिका विवेक गंभीरराव, सौ मनीषा किशोर वाडेकर, सौ लक्ष्मी राजन चव्हाण यांचा सोबत मी म्हारळकर च्या महिलांनी खूप मेहनत घेतली तसेच माजी उपसरपंच निलेश शिवाजीराव देशमुख, उपतालुका प्रमुख म.न.से. कल्याण विवेक सुरेश गंभीरराव, ग्रामपंचायत सदस्य किशोर गोविंद वाडेकर व म.न.से. विभाग अध्यक्ष राजन शांतीलाल चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व उत्कृष्ट नियोजन केलं गेलं.

गेल्या दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे आम्हाला कुठे ही जाता आले नाही, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता आले नाही, परंतु आता कोरोना चे निर्बंध शिथिल केल्याने आम्ही सर्व जणी या मेळाव्यात सहभागी झालो, खूप सुंदर व देखणा हा मेळावा झाला असे बचतगटाच्या अध्यक्षा श्रीमती एस एस कांबळे यांनी सांगितले.

अखेर म्हारळ पोलिस चौकीचे नामकरण(बारसे)झाले, नवीन चौकीतून कामकाज सुरू! पुर्ण वेळ अधिका-याचे काय ?

अखेर म्हारळ पोलिस चौकीचे नामकरण(बारसे)झाले, नवीन चौकीतून कामकाज सुरू! पुर्ण वेळ अधिका-याचे काय ?


कल्याण, (संजय कांबळे) : शिवसेना पदाधिकारी व तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यातील प्रंचड शाब्दिक वाक् युद्धा नंतर गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या म्हारळ पोलिस चौकीचे अखेर नुकतेच नामकरण (बारसे) पार पडले असून आता नवीन चौकीतून कामकाज सुरू झाले आहे. परंतु काही मोजकेच अधिकारी सोडले तर या चौकीस पुर्ण वेळ अधिकारी काय लाभले नाही, त्यामुळे आता तरी ही परिस्थिती बदलणार का? की 'येरे माझ्या मागल्या' असे होणार याबाबत परिसरात चर्चा आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ हे गाव सर्वाधिक लोकसंख्या असलेले मोठे गाव/ शहर आहे, याच बरोबर लागूनच असलेली वरप कांबा या गावाची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. यामुळे येथील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुन्हेगारी वाढत आहे. हे सगळं नियंत्रित ठेवण्यासाठी एमआयडीसी रोड समोर म्हारळ पोलीस चौकी २०/२५ वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली. या चौकीला अनेक पोलीस अधिकारी येवून गेले. पण काही मोजकेच अधिकारी सोडलेतर कोणी ही पुर्ण वेळ चौकीला दिला नाही. त्यामुळे वरीष्ठच नाही, तर आम्ही का बसायचे?असे इतर कर्मचाऱ्यांना वाटत असल्याने कोणाचा कोणाला मागमूस राहिला नाही, याचा फायदा गुन्हेगारांनी घेतला,खून,हाणामाऱ्या, मारामारी, बलात्कार, चैन स्नँकिंग, लुटालूट गाड्या तोडफोड आदी प्रकार वाढले,या संदर्भात पोलिसांना विचारले की, अपुरे कर्मचारी हे तुणतुणे वाजलेत म्हणून समजा, परंतु अशाही परिस्थितीत, पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, बालाजी पांढरे, पीएसआय, बंजरग रजपूत आदी नी काही प्रमाणात येथील गुन्हेगारी आटोक्यात आणली. त्यामुळे या म्हारळ पोलीस चौकीने अनेक चांगले वाईट प्रंसग,घटना, पाहिल्या होत्या, पण तरीही या चौकीस साधी नावाची पाटी कधी लागली नाही.

येथे सदैव लोकांचा राबता असायचा, पण पावसाळ्यात, येथे पाणी भरु लागल्याने, तसेच ही चौकी अपुरी पडू लागल्याने, शिवाय पकडलेले आरोपी ठेवण्यासाठी येथे जागा नसल्यामुळे ही चौकी इतरत्र हलवावी, तसेच म्हारळ गावासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे द्यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करु लागले होते. त्यामुळे सध्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी व म्हारळ पोलीस चौकीचे तत्कालीन पीएसआय यांच्या पुढाकाराने म्हारळ गावाच्या प्रवेशद्वारासमोर नवीन चौकी बांधण्यात आली.

त्यामुळे जुन्या म्हारळ चौकीला कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती ने टाळा लावला हे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहताच,तेथे जाऊन चौकीला शिवसेनेचे भगवे झेंडे लावले,व चौकीसमोर खुर्च्या टाकून बसले, परंतु ही वार्ता तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी राजू वंजारी यांना कळताच ते घटनास्थळी धाव घेतली. व यावेळी शिवसेना पदाधिकारी व त्यांच्यात शाब्दिक वाक् युद्ध झाले. व यातून म्हारळ पोलीस चौकीस,कल्याण तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत म्हारळ पोलिस निवारा केंद्र'असे नामकरण (बारसे) झाले व तसा फलक चौकीवर लागला,

सध्या या नवीन पोलीस चौकीवर कागदोपत्री सुमारे१३ अधिकारी, कर्मचारी नेमणूकीस असल्याचे दिसून येते, परंतु प्रत्यक्षात या चौकीला किती पोलीस अधिकारी व कर्मचारी बसतात, उपस्थित असतात,गुन्हेगारी आटोक्यात येते की नाही? हे येणारा काळच ठरवेल,हे जरी खरे असले तरी, गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या म्हारळ पोलीस चौकीस तिच्या हक्काचे नाव मिळाले हे समाधान कारक आहे.

Monday 28 March 2022

नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान !!

नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान !!


कल्याण, संजय कांबळे :
       नवनाथ रणखांबे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल  जागतिक आंबेडकरवादी  साहित्य महामंडळाच्या वतीने  दीक्षाभूमी, नागपूर येथील ऑडिटोरियम सभागृहात  दुपारी १२ वाजता  प्रमुख अतिथी भंते नागार्जून सुरई ससाई (अध्यक्ष, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नवनाथ रणखांबे यांना देऊन गौरविण्यात आले आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन, पुरस्कार वितरण समारंभ, ग्रंथ प्रकाशन व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात  संपन्न झाला. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे : अध्यक्ष (जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ), उदघाटन डॉ. चंद्रशेखर मेश्राम (आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ञ), डॉ.रवींद्र तिरपुडे (कार्यवाह), डॉ. गोविंदराव कांबळे (कार्याध्यक्ष), सुजित मुरमाडे (सरचिटणीस), डॉ. सुमा  टी. रोडनवर (हिंदी विभाग प्रमुख, मंगलूर विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते. 
        नवनाथ रणखांबे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य वैचारिक चळवळच्या आंदोलनात आघाडीवर असणारे व्यक्तिमत्त्व  आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा आपल्या लेखणीच्या  माध्यमातून ते प्रचार आणि प्रसार करीत आहेत .
      "नागपूर हे ऐतिहासिक शहर प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  घेतलेल्या धम्मदीक्षा सोहळ्यामुळे या शहराची नोंद जगाच्या इतिहास झाली आहे. बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र, धम्मक्रांतीचे विध्यपीठ, प्रेरणापीठ, क्रांतिपीठ, विचरपीठ, तत्वज्ञानपीठ, शक्तीपीठ, वैचारिक आंदोलनाचे नागपूर शहर याठिकाणी आज पहिल्यादाच आलो आहे. तो ही  डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी ! नागपूरच्या साहित्यिकांनी  माझ्य 'जीवन संघर्ष'  पुस्तकावर परीक्षणे लिहिल्यामुळे येथील साहित्यिक आणि या शहरातील प्रसार माध्यमाद्वारे मी अगोदरच येथे पोहचलो आहे. या शहराचा आणि माझा पिढ्यानपिढ्याचा संबंध आहे. डॉ. बाबासाहेब हेच माझी प्रेरणा, ऊर्जा आणि शक्ती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन मी  विविध क्षेत्रात कार्य करीत आहे. आज त्यांच्या नावाने मिळणारा मानाचा पुरस्कार दीक्षाभूमीवर मला मिळतो आहे याचा आनंद होतो आहे. सत्कार्य करण्यासाठी  मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळली आहे. आता अजून माझ्यावर सामाजिक जबाबदारी आणि बांधिलकी वाढलीआहे." असे नवनाथ रणखांबे यांनी यावेळी बोलतांना मत व्यक्त केले.

*स्वतंत्र संपादक पत्रकार संघ या एनजीओ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन व राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न* कल्याणच्या वृत्त निवेदिका सौ ललीता मोरे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !

*स्वतंत्र संपादक पत्रकार संघ या एनजीओ चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन व राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न* 

कल्याणच्या वृत्त निवेदिका सौ ललीता मोरे राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !


मुरबाड, प्रतिनिधी - स्वतंत्र संपादक पत्रकार  संघाचा प्रथम वर्धापन दिन व पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे औचित्य साधून मुरबाड येथे नुकतेच राष्ट्रीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ रोजी कुणबी समाज हॉल, म्हसा रोड, मुरबाड, जिल्हा- ठाणे येथे हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रात सामाजिक हिताचे भान राखून अनमोल असे योगदान देणार्‍या अनेक सेवाभावी व्यक्ती - समाजसेवकांचा  एनजीओ च्या वतीने अत्यंत मानाचा असा 'राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला .


मुरबाड तालुक्यातील कुणबी समाज हॉल, म्हसा रोड मुरबाड येथे या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .


आजच्या बदलत्या युगात सोशल मीडिया चा जागर आहे, अशा स्पर्धेच्या युगात प्रबोधन कारक सत्य न्याय भूमिकेने पत्रकारिता आपले स्थान टिकवून आहे, या संघाने अश्याच कार्याला सुरुवात केली आहे असे विचार या सोळ्याचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय प्रवचनकार ह. भ. प . कोरडे महाराज यांनी या समयी आपल्या भाषणात व्यक्त केले . 


स्वतंत्र संपादक पत्रकार  संघाचा प्रथम वर्धापन दिन व  पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील व्यक्तींच्याअनमोल अशा योगदानाची दखल घेऊन एनजीओ मार्फत अत्यंत मानाचा असा 'राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 'उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, कल्याणच्या उत्कृष्ट वृत्तनिवेदिका व समाजसेविका सौ. ललीता मोरे, परेल मुंबईच्या श्यामा पवार, वाशी नवी मुंबईतील संपादक संजय सावंत या सारख्या अनेक व्यक्तिंना  पुरस्कार देवून गौरविण्यात आले .


कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योती शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष गौरव शेलार,  मुंबईचे पोलीस अधिकारी रामदास अहिरे, पंजाबचे अध्यक्ष अमन मेहरा, रजनी सिंग, हायकोर्टचे सुप्रसिद्ध वकील सुधीर लंभाटे, राष्ट्रीय प्रवचनकार महाराज निलेश कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.


जागतिक रंगभूमीदिनी कल्याणात बालनाट्य महोत्सव !!

जागतिक रंगभूमीदिनी कल्याणात बालनाट्य महोत्सव !!


कल्याण,बातमीदार :- दि. २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. विविध शहरात विविध प्रकारे साजरा केला जातो. या वर्षी सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण शहरात बाल रंगभूमी परिषदेने आ. प्र. के. अत्रे रंगमंदिरात जागतिक रंगभूमी दिन बालनाट्य महोत्सव आयोजित करून साजरा केला. 


कल्याण शहरात नव्याने स्थापना झालेल्या बालरंगभूमी परिषदेने जागतिक रंगभूमी दिनाचे अवचित्य साधून दि. २७ मार्च रोजी आ. अत्रे रंगमंदिरात बालनाट्य महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष व बालरंगभूमी परिषदेचे कार्याधक्ष्य श्री. शिवाजी शिंदे, प्रमुख कार्यवाहक श्री. रवींद्र सावंत, कला साहित्य संस्कृतीचे जिल्हाध्यक्ष श्री. हेमंत यादगिरे, नाट्य परिषद कल्याण शाखा व बालरंगभूमी परिषद कल्याणच्या उपाध्यक्षा श्रीमती प्रिती बोरकर, बालरंगभूमी परिषद कल्याणचे अध्यक्ष श्री सतिश देसाई, प्र. कार्यवाह श्रीमती सुजाता कांबळे डांगे, कोषाध्यक्ष श्री. दीपक चिपळूणकर, जेष्ठ रंगकर्मी मेधन गुप्ते, सिटी न्युजच्या संपादिका पत्रकार श्रीमती चारुशीला पाटील, *स्फुर्ती फाउंडेशनच्या विश्वस्त सौ शिल्पा बजरंग तांगडकर, * या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन झाले.
बालनाट्य महोत्सवाची सुरुवात अनुराग कल्याण संस्थेच्या 'इस्कॉट' या बालनाट्याने झाली. याचे लेखक अमोल जाधव तर दिग्दर्शक दीपक चिपळूणकर यांनी केले होते. त्यानंतर नुतन ज्ञानमंदिर कल्याण (पूर्व) या शाळेच्या लेखिका व दिग्दर्शिका विजयालक्ष्मी प्रशांत सणस यांचे 'वन ब्रेक' हे बालनाट्य सादर झाले. शेवटी सुरेश शेलार लिखित व सुशिल शिरोडकर दिग्दर्शित 'रेस टू' हे बालनाट्य सादर करण्यात आले. बालनाट्य महोत्सवातील या तीनही बालनाट्यांना रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तीनही बालनाट्य प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उस्फुर्त प्रतिसाद दिला. आमच्या शाळेला प्रथमच अत्रे नाट्यगृहात बालनाट्य सादर करण्याची संधी दिल्याबद्दल सणस म्याड्म यांनी श्री शिवाजी शिंदे व टीमचे आभार मानले. अनेक नवीन उपक्रम राबविणार असून, 17 एप्रिल ते 24 एप्रिल बालनाट्य शिबीर घेणार असल्याचे श्री शिवाजी शिंदे यांनी सांगितले. प्रेक्षकांमध्ये कल्याणकर रंगकर्मी सोबत सुनंदा जाधव, कवयित्री गावंडे, महिला सामाजिक कार्यकर्त्या रसिका गायकवाड, मीनाक्षी आहेर, करुणा कावखडे, नूतन ज्ञानमंदिराच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग तसेच कल्याण पुर्व व पश्चिमेचे जेष्ठ नागरिक महिला रंजना माने, कल्पना महाले, सुंदराबाई बाई शिरसाट, अनिता उकंडे, आशा रहाणे, सोनु सावंत, पार्वती सोनवणे, रेखा जोखदंड, प्रतिभा कणसे, लहान मुलांमध्ये संस्कृती, स्फूर्ती, साक्षी वर्षा, वेदा, गुड्डी, उपस्थित होते, 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल पितळे, मेघा शृंगारपुरे, ऐश्वर्या भारगुडे, सिद्धेश यादगिरे, सुरेश शिर्के, दीपक नाईक, सीताराम शिंदे, प्रशांत जावडेकर यांनी परिश्रम घेतले.

श्री मोरेश्वर मित्र मंडळ, वीर आयोजित कब्बडी सामान्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री मोरेश्वर मित्र मंडळ, वीर आयोजित कब्बडी सामान्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद !


कोकण, (दिपक कारकर) :

गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री मोरेश्वर मित्र मंडळ (खालची जावळे वाडी) आयोजित वीर गाव अंतर्गत भव्य कब्बडी सामने दि. १८ मार्च २०२२ रोजी पार पडले.स्पर्धेचं पहिलं पर्व छानदार व रंगतदार बनले.दरम्यान विद्यार्थी गुणगौरव  सोहळा घेऊन विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्य गुणांचे भरभरून कौतुक केले.


स्पर्धेतून अंतिम विजेता रायझिंग सन (कळकेवाडी), उपविजेता श्री मोरेश्वर नवतरुण A (वरची जावळे वाडी) तर तृतीय चषक मानकरी कब्बडी संघ (घेवडे वाडी) आदी संघांनी स्पर्धेत बाजी मारली, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू - राहुल भुवड (रानपाट वाडी), उत्कृष्ट पकड पट्टू : किरण आग्रे (कळकेवाडी), उत्कृष्ट चढाईपट्टु : वैभव दुर्गोळी (कळके वाडी) या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून स्पर्धेत आपलं नाव उंचावले.

मंडळाचे अध्यक्ष रमाकांत जावळे, उपाध्यक्ष दशरथ जावळे, खजिनदार जगदीश जावळे, उपखजिनदार नितीन जावळे, सचिव सोमनाथ जावळे, सहसचिव चंद्रकांत जावळे, सल्लागार उदय जावळे, विजय जावळे, शशिकांत जावळे, रमेश जावळे, रामचंद्र जावळे, कामेश जावळे आणि वाडीतील कार्यकर्ते मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ व अनेक देणगीदार/ हितचिंतक यांच्या अथक योगदानाचे पंचक्रोशीतील दर्जेदार आयोजन असणाऱ्या या कब्बडी स्पर्धेचे अनेक स्तरांतून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

शहापूरमध्ये ७० आणि ७२ वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार करणाऱ्या २२ वर्षीय भूषण हिंदोळेला अटक !!

शहापूरमध्ये ७० आणि ७२ वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार करणाऱ्या २२ वर्षीय भूषण हिंदोळेला अटक !!


भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :
        वयाची सत्तरी पार केलेल्या दोन महिलांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकमेकींच्या शेजारी राहणाऱ्या दोन वृद्ध महिलांवर बलात्कार करण्याऱ्या २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या बहाण्याने घरात शिरलेल्या चोराने दोघींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये  रविवारी हा प्रकार समोर आला. वाशिंद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
           ७० आणि ७२ वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी २२ वर्षीय भूषण हिंदोळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तो शहापूरचाच रहिवासी आहे. वाशिंद पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे .
              २० मार्च रोजी भूषणने ७० वर्षीय महिलेच्या घरात घरफोडी केली. त्याच वेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो शेजाऱ्यांच्याही घरात घुसला. तिथे ७२ वर्षांच्या महिलेवरही त्याने लैंगिक अत्याचार केले अशी माहिती पोलिसांनी दिली.
           आरोपी भूषण हिंदोळे याच्यावर बलात्कार आणि इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघी महिलांनी घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजे २३ मार्चला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २५ मार्चला आरोपीची धरपकड करण्यात आली.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...