Wednesday, 30 March 2022

दोन वर्षाच्या कोरोना काळावधी नंतर मुरबाड मध्ये जल्लोषात साजरा होणार गुढीपाडवा !! दोन वर्षाच्या कोरोना काळावधी नंतर मुरबाड मध्ये जल्लोषात साजरा होणार गुढीपाडवा !!

दोन वर्षाच्या कोरोना काळावधी नंतर मुरबाड मध्ये जल्लोषात साजरा होणार गुढीपाडवा !!

**नववर्ष स्वागत याञेची मुरबाड नगरीत जय्यत तयारी **


मुरबाड, मंगल डोंगरे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष खंड पडलेल्या गुढीपाडवा नववर्ष स्वागत याञेची मुरबाड मधे जय्यत तयारी सुरु आहे. यंदा ब-यापैकी निर्बंध शिथिल झाल्यामुळे  मुरबाड नगरपंचायत व नववर्ष स्वागत समिती यांच्या सयुंक्त पुढाकाराने २ एप्रिल गुढिपाडव्याला भव्य अशी स्वागत याञा काढली जाणार असून स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना व कार्यकर्त्यांंना तशा सूचना दिल्या आहेत. 


मुरबाड शहरातील सर्व रस्ते पाण्याने साफ करुन प्रत्येक घरासमोर, चौकात रांगोळ्या काढल्या जाणार आहेत. हिंदू नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्याचे ठरले असून स्वतः आमदार कथोरे या मिरवणूकीत सहभागी होणार आहेत. शाळेय मुलांचे लेझीम पथम, ढोल पथक, भजन मंडळ, आकर्षक सजवलेली बैलगाडी, झेंडे, पताका, यांचा मिरवणूकीत समावेश होणार असून महिलांची बाईक रॕलीचे विशेष आकर्षण असणार आहे. त्याच बरोबर महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्वागत समितिच्या वतिने केले गेले असून नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे स्वागत समितिचे अध्यक्ष असणार आहेत. 


अशा या भव्यदिव्य होणाऱ्या स्वागत याञेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वागत समितिच्या वतिने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...