Sunday 30 September 2018

महात्मा गांधी जयंतीला उपवासास बंदी

गांधी जयंतीदिनी उपवासालाही सरकारची बंदी. 

लोकांचे दोस्तचा ईव्हीएमविरोधी  सामूहिक उपवास कार्यक्रम दडपण्याचा सरकारचा प्रयत्न  

  मुंबई दि 28 ( प्रतिनिधी )
             "लोकांचे दोस्त" संघटने तर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी सामुहिक उपवास कार्यक्रमाला सरकारने परवानगी नाकारली आहे. गांधी जयंती दिनी ' उपवास ' करून सरकार विरुद्ध बोलता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. तर उपवासालाही बंदी घालणारे सरकार सरळ सरळ आणीबाणीच का घोषित करत नाही, असा सवाल लोकांचे दोस्त संघटनेचे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी केला आहे.  
               लोकांचे दोस्तांच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत जुहू चौपाटीवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर सामूहिक उपवास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र स्थानिक सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी रवि भिलाणे, काशिनाथ निकाळजे आणि सतशील मेश्राम यांच्या वर कार्यक्रम करू नये म्हणून नोटीस बजावली आहे. तसेच अटक करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र उपवास करण्याला बंदी का ? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी दिलेले नाही. सरकार विरुद्ध बोलता येणार नाही असाच पोलिसांचा पवित्रा असल्याचे दोस्तांनी स्पष्ट केले. मात्र सरकार ने कितीही दबाव टाकला तरीही ईव्हीएम विरोधी उपवास करणारच असा निर्धार लोकांचे दोस्तांनी व्यक्त केला आहे.
      
संपर्क: रवि भिलाणे,9892069941
काशीनाथ निकाळजे,9322239222
सतशील मेश्राम,9833936807

जळगावात गुणवंत विद्यार्थी व महापौर यांचा सत्कार

दिगंबर जैन तरुण बहुद्देशीय मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी व महापौर सिमाताई भोळे यांचा सत्कार संपन्न.

जळगाव - (प्रतिनिधी)
            दिगंबर जैन तरुण बहुद्देशीय मंडळ, जळगावतर्फे जिह्यातील सैतवाल (जैन) समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सौ.सिमाताई भोळे यांची जळगावच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला होता.
           ओक मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला आ.राजूमामा भोळे, महापौर सिमाताई भोळे, नरेश खंडेलवाल, डाॕ.स्वप्निल सैतवाल (जामनेर), जमनादास भाटीया यांची उपस्थिती होती.
           या कार्यक्रमात जिल्ह्यातील ३८ गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थींनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोबतच नवनिर्वाचित महापौर सिमाताई भोळे यांचा दिगंबर जैन तरुण बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे करण्यात आला.
          यावेळी अध्यक्षा उषा राजेंद्र सुलाखे, भारती दिपक फुलमोगरे, संगीता महावीर सैतवाल, सिमा गणेश डेरेकर, मंगला धन्यकुमार जैन, ज्योती अजय सुर्यवंशी, वर्षा दिपक जैन, कविता कारंजकर, लक्ष्मीबाई चतुर, आशा राजेंद्र सैतवाल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाॕ. स्वप्निल सैतवाल होते. तर प्रास्तविक धन्यकुमार जैन, आभार दिपक फुलमोगरे तर सुत्रसंचालन महावीर जैन नशिराबादकर यांनी केले.
            कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश डेरेकर, धन्यकुमार जैन, महावीर सैतवाल, राजेंद्र सुलाखे, दिपक फुलमोगरे, विश्वनाथ चतुर, दिपक काळे, अजय सुर्यवंशी, श्रीकृष्ण चतुर, सतीश सुर्यवंशी, सचिन आरतकर, जितेंद्र कारंजकर, विजय सैतवाल, तेजस डेरेकर, अभिषेक सुलाखे, प्रफुल सैतवाल, गौरव सैतवाल यांनी परिश्रम घेतले.

टिटवाळयात नगरसेवक संतोष तरे यांचा, विकास कामांचा धुमधडाका

टिटवाळयात विकास कामे होत आहेत, सर्व पक्षीय नेत्यांच्या निधीतून

नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांच्या प्रयत्नांना यश

टिटवाळा - जैनेंन्द्र सैतवाल
             टिटवाळा हे शहर भारतात महागणपती सिद्धिविनायका साठी प्रसिद्ध आहे. येथे संपूर्ण भारतातील गणेश भक्त येत असतात. त्यामुळे या शहराकडे सर्व जनतेचे लक्ष असते. टिटवाळा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा ध्यास  येथील स्थानिक नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांनी घेतला आहे. टिटवाळयातील रस्ते, अंतर्गत रस्ते, चाळीतील रस्ते, पाणी व्यवस्था चोख व व्यवस्थित व्हावी या साठी त्यांनी या कामांसाठी निधी कमी पडू नये म्हणून सर्व पक्षीय नेत्यांकडून टिटवाळयाच्या विकासासाठी निधी खेचुन आणला आहे.
           शहरातील अंतर्गत रस्त्या मध्ये घर-आंगण सोसायटी ते नारायण नगर हा रस्ता खूपच खराब झाला होता त्यासाठी या रस्त्याचे दोन टप्प्यात काम करून एका टप्प्यात भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून २५ लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे  तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या महापौर निधीतून २५ लाख रुपये असे संपूर्ण ५० लाख रुपये निधीतून, घर-आंगण सोसायटी ते नारायण नगर सोसायटी पर्यंतचा  रस्ता तयार होत आहे.
            दुसरी कडे रुंदा रोड वर असलेल्या बालाजी नगर येथे विधान परिषदेचे काँग्रेस चे आमदार संजय दत्त यांच्या १० लाख रुपये आमदार निधीतून लेकरं टाइल्स बसविण्याचा शुभारंभ, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव मोरेश्वर (आण्णा) तरे व नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांनी भूमिपूजन करून केला. या प्रसंगी बालाजी नगर येथील रहिवाशांनी नगरसेवक संतोष तरे यांना येथील परिस्थिती प्रत्यक्ष दाखविली होती. त्याची दखल घेत नगरसेवकांनी निधी मिळवून दिला व लगेच टाइल्स लावण्याच्या कामाला सुरुवात केली. लवकरच येथे मनपाच्या नळाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे नगरसेवक संतोष तरे यांनी या प्रसंगी सांगितले.
             या कार्यक्रमाला राहुल जाधव, मोहन तरे, दिलीप सोनवणे सर, मुस्तफा सय्यद, आनंद जाधव, निलेश डोंगरे, सागर वाकळे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बालाजी नगर मधील महिला मंडळ व नागरिक उपस्थित होते.
       

निंभोरा येथे रस्त्यावर बनला तलाव, नागरिक हैराण.

निंभोरा येथे गटारीचे घाणपाणी रस्त्यावर.
नागरिक त्रस्त.

निंभोरा-
दस्तगिर खाटीक -

            प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी देशभरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन करत आहे मात्र निंभोरा निंभोरा येथे ग्राम  पंचायतिने याला प्रतिसाद दिलेला दिसत नाही वार्ड क्र .६ स्टेशन परीसरातील नविन निर्माणाधीन गटारीमुळे घाण पाण्याचे भले मोठे डबके तयार झाले असुन त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे व दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नरकयातना भोगाव्या लागत असुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
      भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत संपुर्ण देशासह राज्यात अनेक सामाजीक संस्था व राजकीय पुढारी स्वच्छता अभियान राबवत आहे.मात्र स्टेशन परीसरात गटारीचे  सांडपाणी कोणताही विचार न करता रस्त्यात सोडल्यामुळे पाण्याचे डबके साचुन डासांची समस्या प्रंचड वाढली असुन मोठा त्रास सहन करावा लागत आहे
        ग्राम पंचायत प्रशासनाच्या   नियोजनशुन्य कारभारामुळे   आरोग्याच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असुन जनतेचे हाल होत आहे तरी संबधीत वरीष्ठअधिकार्यानी लक्ष द्यावे अशा मागणी परीसरातील नागरीकांनी घेतली असुन यापुढे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Saturday 29 September 2018

टिटवाळयात शौर्य दिवस साजरा करण्यात आला

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतिने "शौर्य दिवस(सर्जिकल स्ट्राईक दिवस-२९ सप्टेंबर)" साजरा करण्यात आला.

  मांडा-टिटवाळा परिसरातील भारतीय सैन्यातील सैनिक,माजी सैनिक अाणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट व गौरव केला.

टिटवाळा - २९/९/१८

            अाज दि.२९ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताची मान संपुर्ण जगामध्ये अभिमानाने उंचावली. या अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरी बद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतिने संपुर्ण देशभर  "सर्जिकल स्ट्राईक-२९ सप्टेंबर हा दिवस  "शौर्य दिवस"  म्हणुन साजरा करण्यात अाला.
           या वर्षीपासुन दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यात येणार अाहे. अापल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे अाणि सार्वभौमत्वाचे प्राणपनाने रक्षण करणारा, अापत्तीच्या काळात अापदग्रस्त देशबांधवांच्या मदतीलाही धावुन जाणारे, उन्हातान्हाची,थंडी पावसाची वा कोणत्याही संकटाची पर्वा नकरता अापली कर्तव्ये चोखपने बजावणारे देशाचे बहाद्दुर सैनिक हे अापल्यासाठी अादराचा अाणि अभिमानाचा विषय अाहे.
            त्यामुळे या शौर्य दिनाच्या औचित्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेशजी टिळेकर यांच्या अादेशानुसार अाणि भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर,भाजपा जिल्हा सचिव तथा उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली अाज मांडा-टिटवाळा परिसरातील भारतीय सैन्यातील  सध्या कार्यरत असनारे सैनिक नवनाथजी लावंड, माजी सैनिक बबनजी केदारे, रमापती त्रिपाठी, तातेराव फड, एकनाथ सावंत, बाजीराव महाडिक, कोनकर अाप्पा अाणि राजेंद्रजी खरात यांच्या घरी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी उपहापौर सौ.उपेक्षाताई भोईर यांच्यासहित  सदिच्छा भेट दिली व त्यांच्या हस्ते " भारतीय सैन्यातील सैनिक/माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबांचा यथोचित सन्मान अाणि गौरव करण्यात अाला. त्यांच्याशी संवाद साधण्यात अाला. तसेच सैनिकानी सुध्दा सैन्यामध्ये असतानाच्या विविध अाठवणींना उजाळा दिला.पहिल्यांदा या देशामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या मुळे "वन रॅन्क वन पेंशन" योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात पेंशन ची रक्कम वाढल्याची भावना व्यक्त करण्यात अाली.        पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम सुरु केल्याचे व अामच्या घरी येऊन सदिच्छा भेट देऊन, अामच्याशी संवाद अाणि कुटुंबासहित गौरव केल्यामुळे हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम चालु केल्याचे समाधान व्यक्त केले.
          याप्रसंगी उपमहापौर सौ.उपेक्षाताई भोईर, मोहने-टिटवाळा मंडळ मा.सरचिटणीस शक्तिवान भोईर, युवा मोर्चा प्रदेश सचिव परेश गुजरे, पुराणिक सर, अनिलजी फड, युवा मोर्चा जिल्हा सचिव देवेंद्र सावंत, जिल्हा सचिव वैभव पुजारी, जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ भगत, सुरज गोरे, समाधान पाटील अाणि भुपेंद्र ससाणे यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.

Friday 28 September 2018

भुसावळ येथे श्री १००८ इंद्रध्वज महामंडळ विधान पुजेचे आयोजन

भुसावळ येथे दिगंबर जैन समाजा तर्फे श्री १००८ इंद्रध्वज महामंडळ विधान, लघु पंचकल्याणक, गजरथ महोत्सव चे आयोजन.
भुसावळ -
जैनेंन्द्र सैतवाल -
            जळगाव जिल्ह्यातील व मध्य रेल्वेचे सर्वात महत्त्वाचे जंक्शन स्टेशन म्हणजे भुसावळ. या नगरी मध्ये दिगंबर जैन समाजातर्फे दि. १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०१८ या कालावधीत श्री १००८ इंद्रध्वज महामंडळ, लघु पंचकल्याणक, व गजरथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
             हा आनंदी महोत्सव प.पू. वात्सल्य रत्नाकर मुनींश्री १०८ स्वात्मनंदीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व सानिध्यात संपन्न होणार आहे.
            कार्यक्रम उत्सव हा संतोषी माता हॉल, प्रोफेसर कॉलनी, मातृभूमी चौक भुसावळ येथे होणार आहे.
       दिगंबर जैन नूतन मंदिराचे अध्यक्ष सतीश रवींद्र साखरे यांनी सर्व धर्मबंधुना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संपर्कासाठी अध्यक्ष यांचा मो. नं. 88 62 00 55 38 .

Tuesday 25 September 2018

कल्याण पूर्व स्कायवाक जेष्ठ नारीकांनी केला खुला

कल्याण पूर्व रेल्वे स्कायवॉक उदघाटन
कल्याण - (इम्तियाज खान )
           कल्याण पूर्व (कोळसे वाडी कडे जाणारा) ला नव्याने तयार झालेल्या रेल्वे स्कायवॉक  काही कारणाने उदघाटन होऊ न शकल्याने वापरात नव्हता. त्यामुळे  स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन नाईलाजाने बोगद्याचा वापर करावा लागत होता. वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन काही हालचाल करत नव्हती.
           आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकांच्या आग्रहाखातर जेष्ठ नागरिकांच्या हस्ते फित कापून ,उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवला व नागरिकांना पेढे वाटुन जलोष करण्यात आला.  नागरिकां करीता स्कायवॉक खुला करण्यात आला .यावेळी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शरदजी गवळी, जिल्हाचे युवा नेते सुभाषजी गायकवाड, राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हा अध्यक्ष मनोजजी नायर, कल्याण पूर्व चे विधानसभा कार्यअध्यक्ष जानू वाघमारे , डोंबवली शहर विधानसभा विध्यार्थी अध्यक्ष हर्ष चौधरी ,कल्याण पूर्व  विधानसभा विध्यार्थी अध्यक्ष अनमोल गवळी व इतर विध्यार्थी काँग्रेस चे पदधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकण विभाग पत्रकार संघातर्फे ब्लॅंकेट वाटप

कोकण विभाग पत्रकार संघातर्फे ब्लॅंकेट वाटप

मुरबाड - (सचिन पोतदार )
            मुरबाड च्याआदिवासी भागात शाळकरी मुलाना शालेय वस्तू व ब्लॅंकेट वाटप उपक्रम कोकण विभाग पत्रकार संघटना कर्जत यांचे तर्फे करण्यात आला.
          ता मुरबाड ता व युनिकोन सिक्युरिटी चे कल्याण यांच्या छोटासा प्रयत्न पाहायला मिळाला.  या वेळी गावातील रहिवाशांनी कडून आलेल्या पाहुण्यांच कौतुक करून अभिनंदन केले.
        अति दुर्गम भागातील शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनींना  शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. जि. प. शाळा झुगरे वाडीतील विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी सरकार अनेक योजना राबवते.
तरीही सामान्य जनतेने अश्या शालेय गरजू विद्यार्थ्यांना काही मदत करण्याचा थोडासा प्रयत्न केला. यावेळी अनेक समाज सेवक यांनी आज रोजी शाळेमध्ये जाऊन आदिवासी मुल्लांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणण्याचा प्रयत्न केला.

Monday 24 September 2018

टिटवाळयात नारायण नगरचे रस्त्याचे स्वप्न पूर्ण होणार

टिटवाळयातील नारायण नगर ते रेश्माई शाळे पर्यंतच्या रस्त्याचे  डाम्बरीकरण.

आमदार निधीचा पुरेपूर उपयोग
टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल )
             महागपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या टिटवाळा शहरात, स्थानिक नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांनी शहरातील अंतर्गत रस्त्यांकडे आपले लक्ष वळविले आहे. त्यासाठी कल्याण चे आमदार नरेन्द्र पवार यांच्या सहकार्याने आमदार निधी टिटवाळयातील विकास कामासाठी खेचुन आणला आहे.
            त्याच अनुषंगाने शहरातील नारायण नगर ते घर- आंगण पर्यंतचा रस्ता खूपच खराब होता तशा तक्रारी स्थानिकांनी नगरसेवकांच्या निदर्शनात आणून प्रत्यक्ष हा रस्ता दाखविला. त्यानुसार दोन टप्प्यात हा रस्ता तयार करण्याचे आश्वासन तरे यांनी दिले. पहिल्या टप्प्यात नारायण नगर ते रेश्माई विद्यालय पर्यंत चा रस्ता आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून करण्यासाठी आमदारांना पत्रव्यवहार करून या रस्त्या साठी २५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.
             त्यानुसार आज आमदार नरेंद्र पवार यांनी स्वतः उवस्थिती लावून या रस्त्यांचे भूमी पूजन केले. हा रस्ता लवकरात लवकर डांबरी करण करून नागरिकांना उपलब्ध होईल असे ते या वेळी म्हणाले.
टिटवाळयासाठी अडीच कोटी निधी आमदारांनी देण्याचे कबूल केल्यामुळे येथील अंतर्गत रस्त्यांची समस्या सुटेल असे नगरसेवक संतोष तरे या वेळी म्हणाले.
            टिटवाळा शहरासाठी उपमहापौर सौ.उपेक्षा शक्तिवान भोईर यांचेही नेहमी सहकार्य असते असे राष्ट्रवादी पक्षाचे सोनवणे सर यांनी मत व्यक्त केले.
           या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे सचिव मोरेश्वर ( आण्णा) तरे, सय्यद चाचा, बेडसे, मोहन तरे, दीपेश तरे, अमित तरे, महेश एगडे, तसेच भाजप चे युवा अध्यक्ष अमोल केदार, मोहन मंडळाचे शक्तिवान भोईर, वैभव पुजारी, बजरंग अग्रवाल, भगत, नारायण नगरचे अध्यक्ष व पदाधिकारी, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Friday 21 September 2018

कल्याणची कु. वैभवी चव्हाण हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड.

कल्याणची कु.वैभवी विलास चव्हाण हिची राष्ट्रीय स्पर्धे साठी महाराष्ट्र संघात निवड

कल्याण -
इम्तियाज खान -
              कल्याणच्या नेतेवली येथील सिद्धार्थ विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु. वैभवी विलास चव्हाण हिची आटया-पाटयाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
         १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय आटया-पाटया अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा मुलींच्या संघाने कर्णधार कु. वैभवी चव्हाण , हिच्या नेतृत्वाखाली तृतीय स्थान पटकाविले. या कामगिरी च्या जोरावर तिची महाराष्ट्राच्या संघाच्या २८ ते ३० या कालावधीत पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
          ठाणे जिल्हा आटया-पाटया असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्याच बरोबर अंकुर अहिरे विद्यार्थी सहायता प्रतिष्ठाण चे सचिव सौ शोभा गुप्ते, सिद्धार्थ विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ ज्योत्स्ना चाळसे, सौ. कल्पना शेवाळे व सर्वशिक्षकांनी तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
            मुलींच्या संघाला राज्यस्तरीत स्पर्धेसाठी अविनाश नलावडे, संजय काळे, प्रवीण खाडे, कु. रोशन सकपाळ, कु. अक्षय बक्कम, यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Thursday 20 September 2018

तानाजी तात्यांना आदरांजली.

तानाजी तात्यांचे अपुर्ण कार्य व चळवळ पुढे चालू ठेवणे हिच खरी आदरांजली ठरेल  !!
====================
मुरबाड -
श्री. मंगल डोंगरे -
               मराठा सेवा संघाचे कोकण विभागाचे माजी अध्यक्ष तथा मुलुख मैदानी तोफ म्हणजेच तांनाजी तात्या घरत यांचे 10 सप्टेंबर 2018 रोजी आकस्मित निधन झाले आणि मुरबाड तालुक्यासह अखंड मराठा सेवा संघ एका खंद्या विचारांच्या मार्गदर्शकाला पोरका झाला.आज त्यांचा स्म्रुतीशेष आदरांजली चा कार्यक्रम कुणबी भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी तात्यांच्या आपल्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत तात्यांची प्रचंड इच्छा असलेले कार्य आणि चळवळ पुढे चालू ठेवणे हिच खरी तात्यांना आदरांजली ठरेल असे अनेकांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केले.
           शासकीय सेवेत असलेले तानाजी घरत अर्थात तात्या यांचा आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा 1990 च्या दशकातील संपर्क म्हणजेच मुरबाड तालुक्यात पडलेली परिवर्तनाची एक ठिणगी.आणि तात्यांनी स्वतःला समाज कार्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाहून घेतले.मराठा सेवा संघाच्या चळवळीतुन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर समाजातील अनिष्ठ रुढी-परंपरावर घणाघात केला.ब्राम्हणी विचाराने बुरसटलेल्या लोकांना प्रवाहात आणुन एक दिवसीय सामुदायिक विवाह पद्धतीनेे अनेकांना कर्मकांडातुन बाहेर काढले.व गावागावात तरुण मंडळी उभी करून अनेक लढे उभारले. कुणबी सेना, कुणबी समाज संघटना, परमार्थिक शेतकरी समाज,या मार्फत ही तात्यांनी प्रबोधनाचे मोठे काम उभे केले.तात्यांचे विचार, अपुर्ण कार्य आणि त्यांची चळवळ पुढे सतत चालू ठेवणे,हिच खरी तानाजी तात्या घरत यांना आदरांजली ठरेल असे अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना व्यक्त केले.यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातुन तात्यांचे समर्थक उपस्थित होते.ज्यांनी तात्यां पासुन विचार आणि प्रेरणा घेवून आपल्या कार्याला सुरुवात केली.आणि चळवळीत सहभागी झाले.ते तात्यांच्या जाण्याने पोरके झाले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.तात्यांनी आपला देहदान केला होता.मात्र ऐनवेळी शितपेटी उपलब्ध नसल्याने अग्नी संस्कार करण्यांत आले.पुढे तिस-या दिवशी राख सावरल्या नंतर कोणतेही कार्य करु नये असे त्यांचे म्हणण्यानुसार त्यांच्यख मुलांनी,भाऊ बंदानी कोणतेही कार्य न करता थेट आदरांजली चा कार्यक्रम ठेवला होता.या श्रद्धांजली साठी अनेक समाजातुन,संघटनांतुन त्यांचे चाहते हजारोंच्या संख्येने मुरबाड येथील कुणबी समाज भवन येथे हजर होते. तात्यांच्या आठवणी कायम राहव्यात यासाठी पालघर येथे वाचनालय सुरू करण्याचे पालघर जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्षानी सुचित केले.तखत्यांनी कधीच खोट्या प्रतिष्ठेवर विश्वास ठेवला नाही,ना पैशावर कधी प्रेम केले.परखड विचारांचे ज्वलंत अग्नीकुंड असलेले तात्या आपल्या विचाराने,कार्याने अमर झाल्याचेही अनेकांनी यावेळी सांगितले.





गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...