Sunday, 30 September 2018

टिटवाळयात नगरसेवक संतोष तरे यांचा, विकास कामांचा धुमधडाका

टिटवाळयात विकास कामे होत आहेत, सर्व पक्षीय नेत्यांच्या निधीतून

नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांच्या प्रयत्नांना यश

टिटवाळा - जैनेंन्द्र सैतवाल
             टिटवाळा हे शहर भारतात महागणपती सिद्धिविनायका साठी प्रसिद्ध आहे. येथे संपूर्ण भारतातील गणेश भक्त येत असतात. त्यामुळे या शहराकडे सर्व जनतेचे लक्ष असते. टिटवाळा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा ध्यास  येथील स्थानिक नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांनी घेतला आहे. टिटवाळयातील रस्ते, अंतर्गत रस्ते, चाळीतील रस्ते, पाणी व्यवस्था चोख व व्यवस्थित व्हावी या साठी त्यांनी या कामांसाठी निधी कमी पडू नये म्हणून सर्व पक्षीय नेत्यांकडून टिटवाळयाच्या विकासासाठी निधी खेचुन आणला आहे.
           शहरातील अंतर्गत रस्त्या मध्ये घर-आंगण सोसायटी ते नारायण नगर हा रस्ता खूपच खराब झाला होता त्यासाठी या रस्त्याचे दोन टप्प्यात काम करून एका टप्प्यात भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून २५ लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे  तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या महापौर निधीतून २५ लाख रुपये असे संपूर्ण ५० लाख रुपये निधीतून, घर-आंगण सोसायटी ते नारायण नगर सोसायटी पर्यंतचा  रस्ता तयार होत आहे.
            दुसरी कडे रुंदा रोड वर असलेल्या बालाजी नगर येथे विधान परिषदेचे काँग्रेस चे आमदार संजय दत्त यांच्या १० लाख रुपये आमदार निधीतून लेकरं टाइल्स बसविण्याचा शुभारंभ, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव मोरेश्वर (आण्णा) तरे व नगरसेवक संतोष काशीनाथ तरे यांनी भूमिपूजन करून केला. या प्रसंगी बालाजी नगर येथील रहिवाशांनी नगरसेवक संतोष तरे यांना येथील परिस्थिती प्रत्यक्ष दाखविली होती. त्याची दखल घेत नगरसेवकांनी निधी मिळवून दिला व लगेच टाइल्स लावण्याच्या कामाला सुरुवात केली. लवकरच येथे मनपाच्या नळाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे नगरसेवक संतोष तरे यांनी या प्रसंगी सांगितले.
             या कार्यक्रमाला राहुल जाधव, मोहन तरे, दिलीप सोनवणे सर, मुस्तफा सय्यद, आनंद जाधव, निलेश डोंगरे, सागर वाकळे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बालाजी नगर मधील महिला मंडळ व नागरिक उपस्थित होते.
       

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...