Wednesday 30 September 2020

मुरबाड तालुक्यात चालका अभावी सहा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका बंद "तातडीच्या उपचारासाठी रुग्णांची भटकंती"

मुरबाड तालुक्यात चालका अभावी सहा आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका बंद "तातडीच्या उपचारासाठी रुग्णांची भटकंती"


मुरबाड (मंगल डोंगरे) - कोरोना कोविड 19 या महामारीने संपुर्ण जगभरात भितीचे वातावरण असल्याने त्या महामारीला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असताना मुरबाड तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सहा आरोग्य केंद्रात वाहन चालक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारा बाबत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

             ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी. तसेच गर्भवती महिला, सर्पदंश, विंचु दंश, विषबाधा, किंवा छोटेमोठे अपघात यासाठी लागणाऱ्या उपचारासाठी बाधित रुग्णांना पायपीट होऊ नये किंवा त्यांना मोफत प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणुन राज्याचे आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राना 102 हि रुग्ण वाहिका दिलेली असताना त्या गाडीवर लागणारा ड्रायव्हर तसेच इंधन खर्चाची देखील तरतुद केलेली असते. हि वाहने देखील शासनाचे आदेशानुसार रुग्णांना तातडीची सेवा देतात. तसेच फावल्या वेळी आरोग्य केंद्रासाठी लागणारा औषध साठा हा जिल्ह्यावरुन पुरवठा होत असल्याने हि वाहने पंधरा दिवसातुन एकदा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे जात असतात .परंतु मुरबाड तालुक्यातील 9 पैकी  म्हसा,नारिवली, तुळई, धसई, सरळगाव, शिरोशी या 6 आरोग्य केंद्रात असणाऱ्या रुग्ण वाहिकांना गेल्या दोन वर्षापासून चालक नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना तातडीचे उपचारासाठी खाजगी वाहनाचा शोध घ्यावा लागतो.मात्र सध्या कोरोना कोविड 19 या जीवघेण्या आजारामुळे प्रत्येकाचे मनात भिती निर्माण झाली असल्याने खाजगी वाहन चालक या रुग्णांची वाहतुक करण्यासाठी प्रथम नकार देतात .व नंतर अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन रुग्णांचे नातेवाईकांची लुबाडणुक करतात. दरम्यान आरोग्य केंद्राची रुग्ण वाहिका हि काही वेळा मालवाहतुक करत असल्याने तीचा वापर वैद्यकीय अधिकारी हे जिल्ह्यावरुन औषध वाहतुकीसाठी करत असल्याचे हा औषध साठा आणण्यासाठी देखील त्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. व त्याचे मर्जी प्रमाणे भाडे द्यावे लागते.

           .** सदरच्या आरोग्य केंद्रात असणाऱ्या वाहनावर चालक हे इतरत्र बदली केले आहेत. तर काही ठिकाणी सेवानिवृत्त झाले असल्याने रिक्त पदे भरण्याची जबाबदारी हि गटविकास अधिकारी यांची आहे.-- श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी.

       ***सदरची रिक्त पदे भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडुन मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. ते प्राप्त होताच भरती प्रक्रिया केली जाईल-- रमेश अवचार. गटविकास अधिकारी. पंचायत समिती मुरबाड.

करोना नियंत्रणासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण - राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

करोना नियंत्रणासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण - राज्यमंत्री कु.आदिती तटकरे


महाराष्ट्र चेंबर व राजारामपुरी असोसिएशन तर्फे जनजागरण अभियानाचा शुभारंभ !

       बोरघर / माणगांव (विश्वास  गायकवाड) : करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जनजागरण आवश्यक असून त्यासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे  प्रतिपादन राज्याच्या पर्यटन, पर्यावरण, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार, विधी व न्याय, उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.   
         महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा शुभारंभ, माहितीपत्रकाचे प्रकाशन व मास्कचे अनावरण कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. 
      यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, वेदांत पाटील, सागर नागरे आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्याचा वृत्त्तांत विषद केला.       
         राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी असोसिएशनच्या रौप्य  महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवीत असल्याचे यावेळी सांगितले.

Tuesday 29 September 2020

राज्य सरकारने केल्या नवरात्रोत्सव करिता मार्गदर्शक सूचना जाहीर !!

राज्य सरकारने केल्या नवरात्रोत्सव करिता मार्गदर्शक सूचना जाहीर !!


मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. गृह विभागानं यासंदर्भातल्या सूचना जारी केल्यात .त्यामुळे या वर्षी गरबा आणि दांडिया खेळता येणार नाही. इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवही कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करावा लागणार आहे.

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली
१) नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित
२) सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवनागी घेणे आवश्यक
३) नवरात्रोत्सवासाठी मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
४) देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट , घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादित ठेवावी
५) गरबा, दांडिया इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करावेत
६) आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी
७) देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.
८) रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा.
९) रावण दहनाकरिता किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील याची काळजी घ्यावी
१०) देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
११) देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुक करणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
१२) मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच मुंडण आणि तेराव्याचा विधी करत श्रमजिवी संघटनेने केला आदिवासी विभागाचा निषेध !!

मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच मुंडण आणि तेराव्याचा विधी करत श्रमजिवी संघटनेने केला आदिवासी विभागाचा निषेध !!
 
       
मुरबाड {मंगल डोंगरे} : गेल्या मार्च- एप्रिल महिन्यांपासून शासनाने कोरोना संकटामुळे लाॕकडाऊन घोषित केला त्यामुळे रोजगार व कामधंदे पूरते बंद असल्याने अनेक आदिवासी कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. . आधिच घरात आठराविश्व दारिद्रय त्यात आदिवासींना खायची भ्रांत, परंतु महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने आज पर्यंत एक दमडीही आदिवासींना दिलीे नसल्याने, शिवाय महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने खावटी अनुदानाचे परिपञक ९ सप्टेंबरला काढले असताना, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या विभागाने गेली दोन वर्ष कातकरी कुंटुंबांचा फक्त सर्वे करण्यात घालवली असून आजपर्यंत 16,70000 /रुपये या सर्व्हेवर खर्च झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. तसेच आदिवांसीच्या मुलांना लाॕकडाऊन मधे शाळा बंद असताना शिक्षणासाठी  कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. अशक्य असणारे आॕनलाईन शिक्षणापासून ही मुले आजही दूरच आहेत .


                   अशा मृत पावलेल्या व संवेदना बोथड झालेल्या आदिवासी विभागाचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटना मुरबाड तालुका यांनी आज मुरबाड तहसिल कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच तरुणांनी मुंडन करुन  तेराव्याचा  विधी उरकून अनोखे आंदोलन केले व मुरबाड तहसिलदार यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले. या वेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट् उपाध्यक्ष गणपत हिलम, तालुका अध्यक्ष वसंत मुकणे, तालुका सचिव दिनेश जाधव ,कातकरी घटक सचिव पंकज वाघ, महिला तालुका अध्यक्षा हिरा खोडका व आदिवासी उपस्थित होते. कोरोना संकटात शासनाचे नियम पाळून ५0 पेक्षा कमी आदिवासी सामिल झाले होते.

Monday 28 September 2020

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगांव येथील महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक संपन्न !

पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगांव येथील महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक संपन्न !


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये माणगांव येथील महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. 
      महिंद्रा कंपनीचे माणगांव येथील युनिट बंद झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना कोरोनाकाळात कौटुंबिक गैरसोय होऊ नये, यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने विचार करावा शिवाय त्यांच्या वयाप्रमाणे व अनुभवाप्रमाणे माणगांव व्यतिरिक्त इतर ठिकाणच्या युनिटमध्ये पुढे सेवेत घेण्यात यावे, असेही कु. तटकरे यांनी सांगितले.
      राज्यात उद्योगाला प्रोत्साहन देतांनाच आशा प्रसंगी कामगारांना न्याय मिळावा यासाठी कंपनीने जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांना भविष्यात नव्याने कंपनी सुरू झाल्यास प्राधान्य द्यावे असेही राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी सांगितले.
      यावेळी माजी राज्यमंत्री श्री. सचिन अहिर यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याबाबत कंपनीकडून सहानुभूतीपूर्वक फेरविचार व्हावा, असे मत यावेळी मांडले. 
या बैठकीला स्थानिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी आदींची उपस्थिती होते.

कोरोनातही पशुवैदयक करतात घरोघरी गुरांचे लसीकरण !

कोरोनातही पशुवैदयक करतात घरोघरी गुरांचे लसीकरण !*शासनाकडून दखल नाही** 


मुरबाड (मंगल डोंगरे )-संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोरोना रोगाचे महामारीने खेडेगावात मोठा हाहाकार माजवलेला असताना.सर्व गावेच्या गावे बाधीत असुनही आणखी एक सरकारी अधिकारी, कर्मचारी, यांचा वर्ग मार्च महिन्यातील लाॅकडाऊन पासून कायम कार्यरत राहून शेतकरी वर्गाचे, मुक्या जनावरांवर रांत्रदिवस औषधोपचार सेवा देत आहे. पण अजूनही शासनाकडून या पशुवैदयकीय डाॅक्टरांची हवी तशी दखल घेतलेली दिसत नाही.लाॅकडाऊन काळापासून आजपर्यंत पशुसंवर्धन विभागातील पशुचिकीत्सा अखंड सुरु आहे.या विभागाचे बिगर पदवीधर पशुवैदयक हेच खरे ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांचे पशुदूत- डाॅक्टर म्हणून ओळखले जातात.आजच्या मोबाईल जमान्यात कोणताही शेतकरी आता दवाखान्यात आपली जनावरे घेऊन न येता फक्त एक फोन काॅल करुन डाॅक्टराना आपल्या गोठयावरच बोलावतो .व त्यांचे कडून गायी म्हैशीची प्रसूती करणे,गायी म्हशीचे अंग(भांडे)बसवणे,गर्भाशयातील जार काढणे,स्तनदाहावर व इतर असंख्य आजारावर उपचार करणे,जनावरांचे खच्चीकरण करणे यासह अनेक शासकीय योजना प्रचार आणि प्रसारासह गावोगावी पशुवैदयकीय शिबीरे घेणे इत्यादी अत्यंत अवघड कामे आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत.कधीकधी तर जनावरांवर उपचार करताना पशुंपासूनचे अत्यंत गंभीर आजार अनेक पशुवैदयकांना झाले आहेत.असे असतानाही आता शासनाने या गुरांचे डाॅक्टराना आणखी एक काम वाढवून दिले आहे ते म्हणजे सर्व जनावरांच्या कानाला बिल्ला मारुन त्याची ऑनलाईन  नोंद इनाफ नावाचे प्रणालीवर घेण्याचे!पूर्वीचा दुधउत्पादक शेतकरी यांचा औषधोपचार लसीकरण करणारा डाॅक्टर आता उपचार सेवा कमी आणि ऑनलाईन कामांनी आणि रोजच्या अनेक अहवाल यांनी पुरता व्यस्त केला आहे.ठाणे जिल्हा हा शहरीकरणाकडे अधिक झुकल्याने येथील पशुधनही घटले आहे.२०व्या पशुगणनेत ते सिद्ध होत आहे तरीही शासनाकडून दरवर्षी तांत्रिक कामाचे लक्षांक वाढवून दिले जात आहेत.या सर्व कामांचा बोजा वाढल्याने या संवर्गातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांना माणसिक व शारीरिक आजाराने ग्रासले आहे.या विभागातील ऐंशी टक्के कर्मचारी अती ताणाने मधुमेह, रक्तदाब व हृदयविकाराने बाधीत आहेत. तरीही आता कोरोनाचे महामारीत सर्व पशुवैदयकीय कर्मचारी घरोघरी जाऊन लाळखुरकूत रोगाचे लसीकरण व टॅगीग करीत आहेत.यामध्ये एक जनावर बांधताना किमान तीन माणसे लागतात यामध्ये शारीरिक अंतर राखणेचे नियमाला पुर्ण हरताळच फासला जातो.त्यामुळे अनेक डाॅक्टर यांना बाधा झाली तर काही बाधीत होण्याचे छत्रछायेखाली आहेत.काहीना हे काम करीत असताना अनेकदा जीवघेणे प्रसंग उद्भवले आहेत.परंतू तरीही या पशुवैदयकीय डाॅक्टराना माणसांचे डाॅक्टर  प्रमाणे मायबाप शासन व राजकीय व सामाजिक संस्था मधील नेते व कार्यकर्ते अजूनही कोरोना योद्धा मानायला तयार नसल्याने आमच्या पशुचिकीत्सकांना विमा सुरक्षा कवच नाही अशी खंत पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष डाॅ.दिलीप धानके यांनी व्यक्त केली आहे.तसेच पशुसंवर्धन विभाग कडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सुरक्षा किटचा पुरवठा देखील झालेला नाही.कोरोनाचे महामारीत तुमचे तुम्ही लढा आणि मरा हे वरीष्ठ अधिकारी यांचे या पशुवैदयकीय अधिकारी कर्मचारी यांचे  बाबत असलेले धोरण निषेधार्ह आहे.तरी जोपर्यंत कोरोनाची महामारी जात नाही किंवा या रोगाचा खेडेगावातील आलेख कमी होत नाही . तोपर्यंत या लाळखुरकूत रोगाचे लसीकरण व टॅगीग बाबतची फेरी ठाणे जिल्हाधिकारी यांनी स्थगित करावी अशी मागणी पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना ठाणे जिल्हा यांचे कडून आवाहन करण्यात आले आहे.फक्त लसीकरण व टॅगीग मोहीम तात्पुरती रद्द करावी मात्र नियमित पशुवैदयकीय उपचार सेवा आम्ही देत राहू असेही या संघटनेने कळविले आहे.

जिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्तिक प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार - खासदार सुनिल तटकरे

जिल्हा प्रशासन,राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्तिक प्रयत्नांतून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास साधणार - खासदार सुनिल तटकरे


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आधी करोनाचे संकट, त्यानंतरचे निसर्ग चक्रीवादळाचे संकट यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला बळ देण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील तर आहेच. मात्र इन्श्युरन्स कंपन्या आणि पोल्ट्रीधारकांनी सामंजस्य वृध्दींगत करुन एकमेकांमधील विश्वासार्हता टिकवावी तसेच जिल्हा प्रशासन व राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्तिक प्रयत्नातून पोल्ट्रीधारकांचा सर्वांगीण विकास निश्चित साधला जाईल, असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी आज येथे व्यक्त केला.
      जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांच्या अडीअडचणीविषयी उपाययोजना राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे इन्श्युरन्स कंपन्यांचे अधिकारी,पोल्ट्रीधारक शेतकरी असोसिएशनचे पदाधिकारी, पोल्ट्रीधारक शेतकरी यांची बैठक खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 
       यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी व पशुसवंर्धन सभापती बबन मनवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन  अधिकारी डॉ.बंकट आर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड , जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, विभागीय व्यवस्थापक शांता विश्वास, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद निंबेकर हे उपस्थित होते.  
       बैठकीच्या सुरुवातीस खासदार सुनिल तटकरे यांनी उपस्थित पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांकडून त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न समजून घेतले व त्यानंतर ते म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील छोटे-मोठे  पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींनी, कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कपंन्यांनी, विमा कंपन्यांनी  पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.  राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता काम न करता लहान लहान पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करुन बळ द्यायला हवे.  या कामाकरिता जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पातळीपर्यंत समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करावेत. छोट्या पोल्ट्रीधारकांनाही आवश्यक ते  विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे, यासाठी आवश्यक ती कार्यवाही विमा कंपन्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून करावी. कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कपंन्यांचे प्रतिनिधी ,विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व पोल्ट्रीधारक शेतकरी यांच्यात परस्पर संमतीने जो काही व्यावसायिक करार होतो, त्या कराराची प्रत संबंधित शेतकरी तसेच कंपनी असे दोघांकडेही असणे आवश्यक आहे. जसे शेतीमालाला किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याच धर्तीवर पोल्ट्रीव्यावसायिकांनाही त्यांच्या कुक्कुटपक्षांसाठी किमान आधारभूत किंमत दिली जावी, त्यादृष्टीने योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.  
        जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक व्यावसायिकांचे फेडरेशन तयार करुन त्याला सहकाराची जोड देऊन पोल्ट्रीव्यवसाय देखील नियोजित पध्दतीने चालावा यासाठी योग्य ते प्रयत्न केले जावेत, असे सांगून खासदार सुनिल तटकरे यांनी मा.पंतप्रधानांनी शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, पोल्ट्रीधारकांना मिळेल याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवावी, असे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.
        या बैठकीस विविध राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, कुक्कुटपक्षी विकत घेणाऱ्या कपंन्यांच्या प्रतिनिधींची, पोल्ट्रीव्यवसाय करणारे शेतकरी यांची उपस्थिती होती.

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा दणका, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे अधिकारी उशीद गावात?

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीचा दणका, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे अधिकारी उशीद गावात?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील उशीद गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पत्रकार संजय कांबळे यांनी विविध वृत्तपत्रातून मांडल्याने खडबडून जागे झालेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे अधिकारी आज दुपारी उशीद गावात धडकले. त्यांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग भाजपा सरकारच्या काळात सुरू केला एकूण ७१० किलोमीटर लांब आणि १२० मीटर रुंद असलेल्या या महामार्गात १० जिल्हे, ३० तालुके आणि ३२४ गावे बाधित झाली असून कल्याण शहापूर आणि भिवंडी या तालुक्यातील सुमारे ४४ गावे बाधित होत आहेत. यामध्ये कल्याण १०, शहापूर २७, आणि भिवंडी ७, गावाचा समावेश आहे. कोरोनोच्या अगोदर बाधित झालेल्या क्षेत्राचा मोबदला काही शेतकऱ्यांना मिळाला तर बहुतेक शेतकऱ्यांच्या या ना त्या कारणाने हरकत आहे त्यांचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाही. त्यातच कोरोना आला हेंरिंग थांबल्या, त्यामुळे शेतकरी "दमडी" साठी मोहताज झाले आहेत. अशातच उशीद ग्रामपंचायत हद्दीत आंबाजे गावाला जोडणारा बोगद्याचे काम सुरू झाले. डोंगराच्या कुशीत ब्लास्टिंग करून हा मार्ग तयार करण्यात येत असल्याने या स्फोटामुळे टोपलेवाडी, हल आणि उशीद गावातील शेतकऱ्यांच्या घरांना तडे गेले, भेगा पडल्या आहेत. गावातील सुरेश शंकर गायकवाड यांच्या "आवास" योजनेतून बांधून दिलेल्या नवीन घराला तडे गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आभाळच कोसळले आहे 
दरम्यान गावातील सतीश श्रीपती भोईर, शाम भाकरे आदी शेतकऱ्यांनी सरपंच, ग्रामसेवक उशीद, तहसीलदार कल्याण, आणि जिल्हाधिकारी ठाणे यांना तक्रार निवेदन दिले. सरपंच प्रवीण भोईर, आणि ग्रामसेवक विलास मिरकुटे यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे हे अर्ज समृद्धी महामार्गाचे अधिकारी व एम एस आरडीचे अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवले 
मे २०२० मध्ये केलेल्या तक्रारीला आज ५/६ महिने होत आहेत. पण कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने गावातील तरुण सतीश भोईर यांनी पत्रकार संजय कांबळे यांच्या कडे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचला. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीत विचारना केली व विविध वृत्तपत्रातून शेतकऱ्यांची बाजू मांडली. सकाळी बातम्या प्रसिद्ध होताच मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे डेप्युटी इंजिनिअर श्री कांबळे, चंद्रशेखर नामक अधिकारी व ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण भोईर यांनी गावात फिरुन बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या घरांना भेटी दिल्या. तसेच ज्या भागांना भेगा पडल्या आहेत. त्याचे फोटो देखील काढले आहेत. यावेळी उपस्थित बाधित शेतकरी सुरेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना घरांचे तडे गेल्याचे दाखवत असताना हे किरकोळ आहे. तूम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगितलं त्यामुळे शेतकरी संतापले. हा प्रकार म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 
तथापि सध्याचा काळ हा कोरोना चा आहे सर्व उद्योग धंदे, ठप्प झाले आहेत बाजार, मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही, अशात त्यांच्या तोंडातील घास वादळी पावसाने हिराऊन घेतला आहे अशा नाजुक परिस्थितीत समृद्धी च्या अधिका-यांनी शेतकऱ्यांना मदत देऊन आधार द्यायला हवा. असे तोडून बोलने योग्य होणार नाही व ते आपल्याला ही शोभणारे नाही याचा विचार करायला हवा, कारण बळीराजा जगला तर देश जगेल याचा विचार करा.

ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अंतर्गत पुगांव येथे शेतकरी मार्गदर्शन व प्रात्याक्षिक कार्यक्रम संपन्न !

ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अंतर्गत पुगांव येथे शेतकरी मार्गदर्शन व प्रात्याक्षिक कार्यक्रम संपन्न !


          बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत भूमिपुत्र सुजित रवींद्र जाधव यांनी पुगांव येथील शेतकर्यांना कृषी सल्ला व मार्गदर्शन केले. श्री. सुजित रवींद्र जाधव हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालयात आचळोली महाड जिल्हा रायगड येथे कृषिदुत म्हणून कार्यरत आहेत. 
     या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमात पुगाव गावातील प्रगतशील शेतकरी श्री. नागसेन गजानन खाडे यांची निवड करून त्यांना व उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षीद्वारे आधुनिक लागवड पद्धती, बियाणे उगवण क्षमता चाचणी, बियाणे रासायनिक व जैविक प्रक्रिया, प्रक्रियायुक्त पदार्थींना असलेली मागणी आणि ते बनिवण्याची पद्धत, कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी पिका वरील रोग व कीड व्यवस्थापन, चारावरील युरया प्रक्रिया याची माहिती दिली या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी
 चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम हाताळण्यासाठी व पारपाडण्यासाठी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. ए.एम.मुराई, कार्यक्रम समन्वयक डॉ. नेहा काळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनीषा पालवे, प्रा. व्ही. जे . गीम्हवणेकर प्रा. बडोले प्रा. पठाण प्रा. महाजन व प्रा. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

बोगस सह्यांप्रकरणाची तातडीने सुनावणी घेवून कार्यवाही करा अन्यथा उपोषण करु : रतनभाऊ कदम.

बोगस सह्यांप्रकरणाची तातडीने सुनावणी घेवून कार्यवाही करा अन्यथा उपोषण करु : रतनभाऊ कदम.


प्रशांत पानवेकर,प्रभारी जिल्हापुनर्वसन अधिकारी यांना दिले निवेदन ! 

वैभववाडी: अरुणा प्रकल्पाच्या पाण्यात घरे बुडून बेघर झालेले प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे व संतोष चव्हाण यांना मांगवली पुनर्वसन गावठणात भूखंड बदलुन देण्यात येवू नयेत यासाठी आखवणे, भोम अरूणा प्रकल्प संघर्ष कृती समिती मुंबई अध्यक्ष आकाराम नागप व सचिव जगन्नाथ जामदार यांनी केलेल्या अर्जासोबत बोगस सह्या जोडलेल्या आहेत.त्यां सर्वाना सुनावणीला बोलावून   सत्यता पडताळून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी दिला आहे. लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत,उपाध्यक्ष सुरेश जाधव, विजय भालेकर, संतोष चव्हाण,सुचिता चव्हाण, आरती कांबळे यांनी जिल्हापुनर्वसन अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे केली आहे.

या बाबत बोलतांना आरपीआय जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी सांगितले की  19 आँगस्ट 2020 रोजी आकाराम नागप व जगन्नाथ जामदार यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी तानाजी कांबळे व संतोष चव्हाण यांना मागवली पुनर्वसन गावठाण निवासी भूखंड बदलुन देवू नये असे म्हटले असून या निवेदना सोबत सुमारे 195 लोकांच्या सह्या जोडलेल्या आहेत.

195 लोकांच्या सह्या जोडलेल्या असल्या तरी गेले सहा महिणे गावातच आलेले नाहीत, गावात आहेत सही आहे पण अशा प्रकरणावर आपण सहीच केलेली नाही. आणि दहा वर्षापुवीँ मयत झालेल्यांची नावे टाकुन यादी वाढवण्यात आली आहे. आकाराम नागप आणि जगन्नाथ जामदार यांनी केलेल्या अर्जाची आणि जोडलेल्या बोगस सह्यांची सुनावणी घेऊन चौकशी करण्यात यावी.दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केली आहे. 

तानाजी कांबळे हे अन्याया विरोधात, अरूणा प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत. तू अनुसूचित जातीचे आहेत हे माहीत असुनही त्यांना ईथे नको तिथे नको म्हणुन आकाराम नागप व जगन्नाथ जमादार हे विरोध करती आहेत. हा खुला जातीभेद, जातीयवाद केला जात आहे. कुणाचे पुनर्वसन कुठे करायचे ते अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. 

उघड जातीभेद करणारांची आणि खोट्या सह्या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन कारवाई करा अन्यथा अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा लागेल,परीणामी आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी दिला आहे.
-------------------------------------

Sunday 27 September 2020

*महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे*

*महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा*
- *आरोग्यमंत्री राजेश टोपे*


मुंबई, दि. २६: राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७६ टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे. 
राज्यात पहिला रुग्ण ९ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर २५ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा १ लाखाचा टप्पाही गाठला.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या २ लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये ३, ४ आणि ५ लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही ७,८,९ आणि आज १० लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला. 
*असा पार झाला बऱ्या झालेल्या १० लाख रुग्णसंख्येचा टप्पा*
दि. २ जुलै- १ लाखाचा टप्पा - (१ लाख १ हजार १७२ रुग्ण बरे झाले)
दि. २५ जुलै- २ लाखांचा टप्पा -  (२ लाख ७ हजार १९४ रुग्ण बरे झाले)
दि. ५ ऑगस्ट- ३ लाखांचा टप्पा (३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले)
दि. १४ ऑगस्ट- ४ लाखांचा टप्पा (४ लाख १ हजार ४४२ रुग्ण बरे झाले)
दि. २४ ऑगस्ट- ५ लाखांचा टप्पा (५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले)
दि. ३ सप्टेंबर- ६ लाखांचा टप्पा ( ६ लाख १२  हजार ४८४  रुग्ण बरे झाले)
दि. १० सप्टेंबर- ७ लाखांचा टप्पा ( ७ लाख ७१५  रुग्ण बरे झाले)
दि. १७ सप्टेंबर- ८ लाखांचा टप्पा ( ८ लाख १२ हजार ३५४  रुग्ण बरे झाले)
दि. २१ सप्टेंबर- ९ लाखांचा टप्पा (९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले )
दि. २६ सप्टेंबर- १० लाखांचा टप्पा (१० लाख १६ हजार ४५० रुग्ण बरे झाले)

दिपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या !

दिपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या !


कल्याण, प्रतिनिधी : दिपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. दिपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात समाजासाठी काही सामाजिक कार्य करण्याची इच्छा असणारे असंख्य लोक जोडले गेले आहेत.
मा. दिपक भाऊ निकाळजे यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील सर्व घटकांना सामावून घेत समाजासाठी भरपूर कार्य केले आहे.
अशा सामाजिक संघटनेत काम करण्याची इच्छा कल्याण येथील उच्चशिक्षित अॅंड भावेश दत्ता पाटील व आनंद वीर यांनी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांना सांगितली यावर योगेश गायकवाड यांनी मा. दिपक भाऊ व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या अनुमतीने अॅंड भावेश दत्ता पाटील यांची कल्याण शहर कार्याध्यक्ष व आनंद वीर यांची मोहने शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केली. यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड व कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष मनोज मधुकर गायकवाड, कल्याण शहर (पुर्व) अध्यक्ष अक्षय गायकवाड, इंदिरानगर विभाग अध्यक्ष आकाश सावंत, शुभम कांबळे, श्रद्धानंद कांबळे, राकेश पाटील,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात पँथरचा विक्रमी झंझावत ! तालुका निहाय पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका !!

रायगड जिल्ह्यात पँथरचा विक्रमी झंझावत ! तालुका निहाय पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका !! 


   बोरघर / माणगाव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यामध्ये दलित युथ पँथरचा झंझावत सुरू असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पॅंथर संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे काम बहुजनांच्या न्याय हक्कासाठी संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या अधिपत्याखाली तसेच रायगड जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत सुरु आहे. २६ सप्टेंबर रोजी कर्जत येथील कडाव बुद्धविहार या ठिकाणी कर्जत, खालापूर ,पनवेल  या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्याच वेळेस संघटनेच्या माध्यमातून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
     यावेळेस उपस्थित सर्व पदाधिकारी यांना संघटनेची ध्येयधोरणे संघटनेचे संस्थापक भाईसाहेब जाधव व जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रवक्ते प्रशांत पारधे यांनी योग्य मार्गदर्शन करुन समजावून सांगितली. तसेच कर्जतमध्ये लवकरच नऊ शाखा यांचे अनावरण भाईसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे येथील पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
   या वेळेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण रोकडे, जिल्हा युवा अध्यक्ष अंकुश सुरवसे, कर्जत तालुकाध्यक्ष अक्षिरुद्ध पवार, सचिव गणेश नाईक, कार्याध्यक्ष रोहीत ढोले, युवा अध्यक्ष रोशन गोतारणे , युवा उपाध्यक्ष रोहीदास सोनावणे, प्रसिद्धी प्रमुख महेश साळवे, तसेच खालापूर तालुका उपाध्यक्ष रोशन मोरे, सचिव सुरज केदारी, युवा अध्यक्ष रोहीत गायकवाड, सल्लागार अमित केदारी, युवा उपाध्यक्ष सागर केदारी, प्रसिद्धी प्रमुख आविष्कार केदारी, संघटक ऋषिकेश जाधव, युवा सरचिटणीस मयुर कांबळे तसेच पनवेल तालुकाध्यक्ष सुदर्शन साबळे, कार्याध्यक्ष संतोष डोंगर दिवे, कामोठे शहर अध्यक्ष शैलेश कांबळे, तालुका संघटक सागर इंगोले यांना पदभार देण्यात आला.
   या वेळेस संघटनेचे संस्थापक भाईसाहेब जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापू पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा महासचिव रोहीत सकपाळ, प्रवक्ते प्रशांत पारधे महाराज शिगवण यांची प्रमुख उपास्थिती होती.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे उशीद येथील शेतकर्‍यांची बरबादी, घरांना तडे तर शेतीचे नुकसान !

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे उशीद येथील शेतकर्‍यांची बरबादी, घरांना तडे तर शेतीचे नुकसान !


कल्याण (संजय कांबळे) : माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या बोगद्याच्या कामासाठी करण्यात येणा-या भू सुंरग मुळे कल्याण तालुक्यातील उशीद गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घरांना तडे गेले आहेत तर या रस्त्याशेजारील भातशेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे.


ठाणे जिल्ह्यातील अनेक गावातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा हा महामार्ग असून यामुळे काही तासातच मुंबई हुन नागपूर ला पोहचता येणार आहे. हा मार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी शहापूर आदी तालुक्यातून पुढे जातो. प्रारंभी भू संपादनाच्या वेळी कल्याण तालुक्यातून याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. अनेक शेतकऱ्यांवर पोलीस केसेस झाल्या होत्या. जमीनीचा वाढीव मोबदला मिळाल्या नंतर हे अंदोलन निवळले होते. यांनतर ख-या अर्थाने समृद्धीचा मार्ग मोकळा झाला व कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी काम पुर्ण व्हायला आले आहे तर काही भागात अद्याप सुरू आहे. असेच कल्याण तालुक्यातील उशीद गावाच्या हद्दीत उशीद आणि शहापूर तालुक्यातील अंबार्जे यांना जोडणाऱ्या बोगद्याचे काम सुरू आहे. साधारण पणे ५५० मीटर लांबीचा हा बोगदा असून डोंगर फोडण्यासाठी मोठ्या क्षमतेचा व अधिक तीव्रतेचा ब्लास्टींग केले जाते. यामुळे येथून जवळच असलेल्या टोपलेवाडी, हल आणि उशीद येथील सुरेश गायकवाड, सतिश श्रीपती भोईर, हल येथील शाम लक्ष्मण भाकरे, अशा ४०/५० शेतकऱ्यांच्या  घरांना तडे गेले आहेत. भिंतीना भेगा पडल्या आहेत तर अनेकांचे पत्रे फुटले आहेत. हा ब्लास्टींग इतका तीव्रतेचे असतो की या गावामध्ये काही काळ भूंकप आल्यासारखे वाटते.. प्रत्येक घर हादरून जाते. यातून उडणारी धूळ व कपची मुळे रस्त्याच्या बाजूला असलेली भातशेती नापीक होते की काय अशी भीती वाटत असल्याचे येथील शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे या विरोधात नुकसान भरपाई मिळावी म्हणून सतीश भोईर, शाम भाकरे, सुरेश गायकवाड, आदी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत उशीद अरेला, तसेच तहसीलदार दीपक आकडे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे तक्रार अर्ज केले आहेत परंतू अद्यापही काही झाले नाही.
तर उशीद अरेला ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण भोईर, ग्रामसेवक विलास मिरकुटे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या अर्जानुसार गावातील बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेऊन मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे डेप्युटी इंजिनिअर आणि एम एस आरडीचे अधिकारी यांना म्हणणे पोहोचवले आहे. त्यामुळे लवकरच मदत होईल असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
दरम्यान विकास जरुर झाला पाहिजे, वेळ आणि पैसा वाचवणारा समृद्धीचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवा. पण  तूमची समृद्धी होताना शेतकऱ्यांची बरबादी होता कामा नये याचे भान ठेवायला हवे!
*प्रतिक्रिया ", मी याबाबतीत आमच्या डेप्युटी इंजिनिअरला सर्व्हे करायला सांगितले आहे रिपोर्ट येताच दुरुस्ती करुन देण्यात येईल", मुक्तेश वाडेकर, वरिष्ठ अधिकारी, एम एस आरडीसी. ठाणे.
*श्री कांबळे (डेप्युटी इंजिनिअर - समृद्धी महामार्ग) उशीद गावातील बाधित शेतकऱ्यांना भेट दिली आहे. १०/१२ लोकांच्या घरांना तडे गेले आहेत त्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
+विलास मिरकुटे,ग्रामसेवक, ग्रामपंचायत उशीद अरेला ता कल्याण.
"ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या नंतर त्या संबंधित अधिकारी व विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत."
*सुरेश गायकवाड - बाधित शेतकरी, उशीद
"अगोदर आमच्या जमीनी कवडीमोल भावाने समृद्धी महामार्गात घेतल्या. आता त्यांच्यामुळेच घरांना प्रचंड तडे, भेगा पडल्या आहेत. घर कोसळले की संपले सारे ". 

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे उशीद येथील शेतकर्‍यांची बरबादी, घरांना तडे तर शेतीचे नुकसान !

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे उशीद येथील शेतकर्‍यांची बरबादी, घरांना तडे तर शेतीचे नुकसान !


कल्याण (संजय कांबळे) : माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या बोगद्याच्या कामासाठी करण्यात येणा-या भू सुंरग मुळे कल्याण तालुक्यातील उशीद गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घरांना तडे गेले आहेत तर या रस्त्याशेजारील भातशेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनेक गावातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी असा हा महामार्ग असून यामुळे काही तासातच मुंबई हुन नागपूर ला पोहचता येणार आहे. हा मार्ग ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी शहापूर आदी तालुक्यातून पुढे जातो. प्रारंभी भू संपादनाच्या वेळी कल्याण तालुक्यातून याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. अनेक शेतकऱ्यांवर पोलीस केसेस झाल्या होत्या. जमीनीचा वाढीव मोबदला मिळाल्या नंतर हे अंदोलन निवळले होते. यांनतर ख-या अर्थाने समृद्धीचा मार्ग मोकळा झाला व कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी काम पुर्ण व्हायला आले आहे तर काही भागात अद्याप सुरू आहे. असेच कल्याण तालुक्यातील उशीद गावाच्या हद्दीत उशीद आणि शहापूर तालुक्यातील अंबार्जे यांना जोडणाऱ्या बोगद्याचे काम सुरू आहे. साधारण पणे ५५० मीटर लांबीचा हा बोगदा असून डोंगर फोडण्यासाठी मोठ्या क्षमतेचा व अधिक तीव्रतेचा ब्लास्टींग केले जाते. यामुळे येथून जवळच असलेल्या टोपलेवाडी, हल आणि उशीद येथील सुरेश गायकवाड, सतिश श्रीपती भोईर, हल येथील शाम लक्ष्मण भाकरे, अशा ४०/५० शेतकऱ्यांच्या  घरांना तडे गेले आहेत. भिंतीना भेगा पडल्या आहेत तर अनेकांचे पत्रे फुटले आहेत. हा ब्लास्टींग इतका तीव्रतेचे असतो की या गावामध्ये काही काळ भूंकप आल्यासारखे वाटते.. प्रत्येक घर हादरून जाते. यातून उडणारी धूळ व कपची मुळे रस्त्याच्या बाजूला असलेली भातशेती नापीक होते की काय अशी भीती वाटत असल्याचे येथील शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे या विरोधात नुकसान भरपाई मिळावी म्हणून सतीश भोईर, शाम भाकरे, सुरेश गायकवाड, आदी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत उशीद अरेला, तसेच तहसीलदार दीपक आकडे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे तक्रार अर्ज केले आहेत परंतू अद्यापही काही झाले नाही.
तर उशीद अरेला ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण भोईर, ग्रामसेवक विलास मिरकुटे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या अर्जानुसार गावातील बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेऊन मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे डेप्युटी इंजिनिअर आणि एम एस आरडीचे अधिकारी यांना म्हणणे पोहोचवले आहे. त्यामुळे लवकरच मदत होईल असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
दरम्यान विकास जरुर झाला पाहिजे, वेळ आणि पैसा वाचवणारा समृद्धीचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवा. पण  तूमची समृद्धी होताना शेतकऱ्यांची बरबादी होता कामा नये याचे भान ठेवायला हवे!
*प्रतिक्रिया ", मी याबाबतीत आमच्या डेप्युटी इंजिनिअरला सर्व्हे करायला सांगितले आहे रिपोर्ट येताच दुरुस्ती करुन देण्यात येईल", मुक्तेश वाडेकर, वरिष्ठ अधिकारी, एम एस आरडीसी. ठाणे.
*श्री कांबळे (डेप्युटी इंजिनिअर - समृद्धी महामार्ग) उशीद गावातील बाधित शेतकऱ्यांना भेट दिली आहे. १०/१२ लोकांच्या घरांना तडे गेले आहेत त्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
+विलास मिरकुटे,ग्रामसेवक, ग्रामपंचायत उशीद अरेला ता कल्याण.
"ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या नंतर त्या संबंधित अधिकारी व विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत."
*सुरेश गायकवाड - बाधित शेतकरी, उशीद
"अगोदर आमच्या जमीनी कवडीमोल भावाने समृद्धी महामार्गात घेतल्या. आता त्यांच्यामुळेच घरांना प्रचंड तडे, भेगा पडल्या आहेत. घर कोसळले की संपले सारे ". 

Saturday 26 September 2020

मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने रायगडावर शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न !

मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने रायगडावर शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न !


   बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : २४ सप्टेंबर १६७४ ह्या दिवशी छ्त्रपती शिवाजी महाराजांनी ६ जुन १६७४ ला झालेला पहिला वैदिक राज्याभिषेक धुडकावत दुसरा राज्याभिषेक शाक्त/तांत्रिक पद्धतीने निश्चलपुरी गोसावी ह्यांच्या हातुन करवून घेतला . ही खुप मोठी युगांतकारी घटना आहे . ह्या माध्यमातुन महाराजांनी असमानतेचा , गुलामीचा आणि पारतंत्र्याचा अशा वैदिक धर्मास फाटा देत जात्यांतक समाजव्यवस्थेचा पाया रचला. तसेच २४ सप्टेम्बर १८७३ याच दिवशी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करत आधुनिक भारतात वैदिक ब्राह्मणी धर्माला सुरुंग लावला .
       म्हणून इतिहासाला न विसरता इतिहासाचा जागर करण्याची आणि खरा इतिहास घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ने हाती घेतली आहे. गेली कित्येक वर्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड २४ सप्टेंबर हा दिवस अत्यंत उत्साहात किल्ले रायगड या ठिकाणी साजरा करते. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय #प्रवीणदादा_गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय  शाक्तशिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कोकण अध्यक्ष शिवश्री #सचिन_जगदीश_सावंतदेसाई यांच्या संकल्पनेतून सर्वप्रथम हा शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा, दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे मुख्य प्रवर्तक शेख सुभान अली यांच्या पहिल्या कार्यक्रमाने झाला. असे अनेक उपक्रम राबवत प्रतिवर्षी हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहाने आम्ही साजरा करत असतो याच राज्याभिषेक सोहळ्या दुसऱ्या वर्षी आ.#आदिती_तटकरे यांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तिसऱ्या वर्षी शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी सर यांच्या उपस्थितीत सर्व गोसावी समाज रायगडावर एकवटून निश्चलपुरी गोसावी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
      परंतु यावर्षी कोरोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडतो की नाही या विवंचनेत होतो कारण या सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या रायगड जिल्हाधिकारी तसेच पुरातत्त्व खात्याची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरणार होती.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देताच त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला 20 कार्यकर्ते घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्याची परवानगी मिळाली.
सर्व कार्यकर्त्यांनी तन, मन आणि धन देऊन हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला.
       या कार्यक्रमाप्रसंगी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष शिवश्री स्वप्नील म्हात्रे रायगडचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम शिसोदे संभाजी ब्रिगेड नवी मुंबई चे जिल्हाध्यक्ष शिवश्री सुभाष सावंत, ठाणा जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पाटील, रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री समीर म्हात्रे उरण चे तालुकाध्यक्ष जितेश पाटील चेतन मुंडकर, केतन, दीपक राजपूत, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्योग मंत्रालयाचे निर्णयाने शेकडो प्रकल्पग्रस्तांना रोजगार !!

उद्योग मंत्रालयाचे निर्णयाने शेकडो प्रकल्पग्रस्तांना रोजगार !!


'मात्र कामगार कायद्याचे निर्णयायाने शेकडो कामगार बेरोजगार.'

मुरबाड (मंगल डोंगरे) : बारवी धरणाचे उंची वाढीमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना सुमारे 21 वर्षाच्या प्रदिर्घ संघर्षाने आमदार किसन कथोरे यांचे सहकार्याने यश आले असुन राज्याचे उद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बाराशे तरुणापैकी 209 तरुणांना रोजगार दिल्याने तालुक्यातील सुशिक्षित तरुणामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले असले तरी केंद्र सरकारचे उद्योग मंत्रालयाने कामगार विरोधी धोरणाची अमलबजावणी मुरबाड मध्ये करत शेकडो कामगारांना बेरोजगार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने इतर कामगारामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
           महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिपत्याखाली असलेल्या बारवी धरणामुळे ठाणे मुंबई या शहरांना पाणी पुरवठा होत असताना ते पाणी कमी पडत असल्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणाची उंची वाढविली त्यामुळे परिसरातील 12 गावे वाड्या पाडे हे पाण्याखाली जात असल्याने त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करुन त्यानां त्यांचे जमिनीचा व घरांचा मोबदला दिला जाईल व घरटी एका व्यक्ती स शासकीय नोकरी दिली जाईल असे आश्वासन दिले होते.औद्योगिक विकास महामंडळाने दिलेल्या अश्वासनाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची पुर्तता करण्यात गेली 21 वर्षे चालढकल होत होती. परंतु या प्रकल्पग्रस्तांसाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी शासनदरबारी संघर्ष करुन प्रकल्पग्रस्तांना त्यांचे जागेचा व घराचा मोबदला मिळवुन दिला. आणि घरटी एकास शासकीय नोकरी अशा सुमारे बाराशे तरुणांना नोकरीत सामावुनघेण्याचा महत्वपुर्ण प्रश्न मार्गी लावुन सुमारे 209 जणांना पहिल्या टप्प्यात नेमणुकीचे आदेश प्राप्त केले. असुन त्यांना 1 आक्टोबर पासुन कामावर हजर होण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिले आहेत.हा सुवर्ण सोहळा मुरबाड मँन्युफँक्चर असोसिएशनचे सभाग्रुहात पार पडला त्याप्रसंगी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी. मुरबाडचे सभापती. श्रीकांत धुमाळ. बारवी प्रकल्प पिडीत संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर.भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव ,हरेश पुरोहित. रामभाऊ दळवी.पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या सह शेकडो प्रकल्पग्रस्त व तरुण वर्ग उपस्थित होते. 


        * केंद्र सरकार च्या कामगार विरोधी धोरणाची अमलबजावणी आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड एमआयडीसीतील टेक्नोक्राफ्ट कंपनीत केली असुन त्यामध्ये सुमारे 10ते12 वर्षापासुन कायम असणाऱ्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची पुर्व सूचना न देता अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेऊन कामगारावर उपासमारीची वेळ आणली आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांनी आज गेटसमोर तिव्र निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.


       * नेहमीच मुरबाड मधिल प्रकल्पांचा  आणि विकासाचा पँटर्न आपण महाराष्ट्र भर राबविणार तसेच तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वेगवेगळे उद्योग सुरु करण्यासाठी सरळगाव व पाटगाव येथे नव्याने एमआयडीसी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आमदार किसन कथोरे यांना विचारले असताना टेक्नोक्राफ्ट कंपनीत ज्या कामगारांना कमी केले आहे. त्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही .असे आमच्या मुरबाड प्रतिनिधीशी बोलताना  सांगितले.

मुरबाड तालुक्यात ठिक ठिकाणी पं.दींनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन !

मुरबाड तालुक्यात  ठिक ठिकाणी  पं.दींनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन !


मुरबाड (मंगल डोंगरे) : महान तत्वचिंतक, संघटनकर्ते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवाद व्यक्तिमत्वाचे पं दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मुरबाड तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


तर तालुक्यातील दहिगाव येथे या अनुषंगाने माझे गाव माझे कुटुंब हि मोहीम राबवुन संपूर्ण गावातील नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत मास्क सँनिटायझर,चे वाटप करून सर्व नागरीकांचे तापमान व आँक्सीजन लेवल तपासण्यात आली. तसेच संपूर्ण गाव परिसर स्वच्छ ठेवणे व मास्क वापरणे सक्ती करण्यात आली आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मुरबाड मुरबाड पंचायत  समिती सदस्या स्नेहाताई धनगर,ह्या उपस्थित होत्या.सरपंच प्रमोद जनार्धन शिंगोळे.यांच्या सह उपसरपंच कु.नवनाथ गुरुनाथ देशमुख, सदस्य श्री. सिद्धार्थ धनगर,सौ.पुजा शिंगोळे,प्रगती धनगर,सरिता देशमुख, नमिता देशमुख,नवनीत धनगर (पोलीस पाटील) जयश्री देशमुख माजी सरपंच,प्रल्हाद देशमुख, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष,इत्यादींसह अनेक नागरिक उपस्थित होते. मुरबाड शहरातील सर्व वार्डात तसेच मुरबाड तालुक्यातील प्रत्येक बुथवर  पं.दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त जिल्हा मंडल, व बुथ स्तरावर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी भाजपाचे पदाधिकारी,, नगरसेवक, तसेच कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे कापणीस आलेले भातपिक पाण्यात, शेतात पाणी, डोळ्यांत पाणी शेतकऱ्यांची अशी 'जिंदगानी'?

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे कापणीस आलेले भातपिक पाण्यात, शेतात पाणी, डोळ्यांत पाणी शेतकऱ्यांची अशी 'जिंदगानी'?कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पाऊसाने मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे कापणीस आलेले अख्खे भातपिक पाण्यात पडले असून याकडे पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते यावेळी कोरोना मुळे शेतकऱ्यांची अवस्था 'आई जेवू घालेना आणि बाप भिक मागू देईना' अशी झाली आहे.


कल्याण तालुक्यात सुमारे ६हजार हैक्टर क्षेत्रात भातपीक आणि १५० ते ३५० हैक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड केली जाते. परंतु या वर्षी कोरानामुळे होत्याचे नव्हते झाले. या बिमारीमुळे ऐन भात लावणीच्या वेळी मजूर मिळेना. शेतकऱ्यांनी कसेतरी घरच्या च्या मदतीने भात लावणी उरकून घेतली. तर ज्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली होती. तो तर कवडीमोल दराने विकावा लागला किंवा सडून कुजून गेला. कसेतरी करून भाजीपाला शेतातून बांधावर आणला तर वाहन मिळेना, वाहन मिळालेच तर मार्केट बंद, यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे खर्चापेक्षा कैक पटीने कमी मिळू लागले होते. त्यामुळे तो चिंताग्रस्त झाला होता. भातपिक हा एकच मोठा आधार होता. कारण वर्षभराचा प्रश्न निकालात निघणार होता.पीक ही चांगले आले होते. कल्याण सह मुरबाड तालुक्यात १०/१२ दिवसात भात कापणी ला सुरुवात केली जाणार होती पण गेल्या चार ते पाच दिवसात पडलेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळेगाव, मढ शेरे, उशीद वाशिंद, शिरगाव आपटी, मांजर्ली येथे उभे भात आडवे झाले आहे. मांजर्ली गावातील नघलू घारे या शेतकऱ्यांचे कापणीस आलेले भातपिक पाण्यात भिजवून गेले आहे. अशीच परिस्थिती इतर गावातील शेतकऱ्यांची झाली आहे. कोरोनोच्या संकटातून वाचलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाने आसूड ओढले आहेत. त्यामुळे आता मायबाप सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन आधार द्यावा अशी मागणी केली जात आहे.

वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर आता कर्मचार्‍यांच्या व्हेंटिलेटर वर ! प्रश्न इथले संपत नाही?

वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर आता कर्मचार्‍यांच्या व्हेंटिलेटर वर ! प्रश्न इथले संपत नाही?


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार ठरणारे वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर सुरू होण्याची चिन्हे काय दिसत नाहीत. आता या हाॅस्पिटल ला" स्टाप" मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात असून लवकरच तोही प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करुया.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात झपाटय़ाने कोरोना पाॅझिटिव रुण्गांची संख्या वाढत आहे. लाॅकडाऊण शिथिल झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. गर्दी होत आहे. दुकानदार व ग्राहक कोरोना चे कोणते ही नियम पाळत नाहीत बिर्लागेट येथे हे चित्र सर्वत्र पहायला मिळते आहे. म्हारळ वरप कांबा येथे अनेकांचा कोरोना ने बळी घेतला आहे. हे चित्र इतर गावामध्ये सुध्दा आहे. प्रत्येक गावांच्या चौकात श्रद्धांजली चे बॅनर ची संख्या वाढत आहे. सध्याच्या काळात कल्याण ग्रामीण भागात कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण शंभरीकडे जात आहे तर अॅक्टिव रुग्णाची संख्या १५४६ वर पोहोचली आहे कंन्टेनमेंट झोन ७२ झाली आहे. गावा गावात रुग्ण आढळून येत आहेत. माझे कुंटूब माझी जबाबदारी यातूनही पेंशंट वाढत आहेत. या सर्वांचा विचार करून वरप येथे कोरोना कोव्हीड सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. महसूल विभाग व कल्याण पंचायत समितीच्या माध्यमातून हे काम सुरू ही झाले. लोकप्रतिनिधी व पत्रकारांनी केलेला पाठपुराव्यामुळे वरप कोरोना कोव्हीड सेंटर सुरू व्हायच्या अगदी जवळ आले असताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी २०० च्या जागी ५०० बेड ची कल्पना मांडली. आणि होते ते पण लांबणीवर पडले. यातूनही मार्ग काढत रस्ता, शौचालय, ताडपत्री, पाणी हे प्रश्न कसेबसे सोडवून हे सुरु होणार असे दिसत असतानाच जनरेटर चा मुद्दा पुढे आला. मात्र कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी स्वत खर्च करून तीही अडचण दूर केली. अद्यापही हे रुग्णालय सुरू होत नसल्याने कालच माझे कुंटूब माझी जबाबदारी या कार्यक्रमाचे निमित्ताने गोवेली येथे आलेल्या झेडपीच्या अध्यक्षा सुषमा लोणे आणि नुकताच ठाणे जिल्हा परिषदेचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर कल्याण तालुक्यात आलेल्या श्रीमती रुपाली सातपुते यांना पत्रकार संजय कांबळे यांनी वरप कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्या बाबत प्रश्न विचारले असता मी ताबडतोब जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना विचारते तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रींकात शिंदे यांना पत्र दिल्याचे सांगितले. तर अतिरिक्त सीईओ रुपाली सातपुते यांनी ही यामध्ये लक्ष घालतो असे सांगितले पण आज माहिती घेतली असता असे कळले की आता या कोव्हीड केअर सेंटर साठी स्टाप उपलब्ध होत नाही.त्यामुळे आता पुढे काय होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तर आपण ऐवढा प्रयत्न केला हाही प्रश्न सुटेल असा विश्वास अध्यक्षा सुषमा लोणे यांनी व्यक्त केला आहे. परंतु ग्रामीण भागातील वाढणारे पेंशंट विचारात घेता हे कोव्हीड केअर सेंटर किमान पुढील महिन्यात तरी सर्व सोईसुविधा युक्त सुरू व्हावे हिच ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर टप्प्याटप्प्याने अनुदान प्राप्त झालेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या !

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर टप्प्याटप्प्याने अनुदान प्राप्त झालेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या !'ओबीसी शिक्षक असोसिएशनचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना ई-मेल द्वारे पत्र'

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व नंतर शासनाने १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागु करा याबाबत ओबीसी शिक्षक असोसिएशन जळगावच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना ईमेलवर निवेदन पाठविण्यात आले.
            महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवाच्या शर्थी) नियमावली १९८१ मधील काही नियमामध्ये दि. १०/०७/२०२०च्या अधिसुचनेव्दारे दुरुस्ती सुचविली आहे. ती अधिसुचना २००५ पुर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी घातक आहे. त्यामुळे त्या अधिसुचनेत पुर्व लक्षी कुठलेही बदल करु नयेत. तसेच नियम क्रमांक १९ निवृत्तवेतन यातील क्रमांक १ व २ च्या प्रस्तावित दुरुस्तीबत हरकत आहे. कारण
दि. ३१/१०/२००५ पुर्वी नियुक्त परंतु नंतर अनुदान आलेल्या कर्मचाऱ्यांच्या
हिताला बाधक आहे. कारण खाजगी अनुदानित शाळा तसेच तुकडया ह्या एकमेव
विभागामध्ये विनाअनुदान धोरण आहे. कारण ४ वर्ष पुर्णतः विना अनुदानावर
काम करावे लागते. ५ व्या वर्षी २०%, ६ व्या वर्षी ४०% , ७ व्या वर्षी ६०%,
८ व्या वर्षी ८०% व ९ व्या वर्षी १००% अनुदान मिळते. मुद्दा क्रमांक २ व ३ मध्ये बदल करतांना ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती
दि. ०१/११/२००५ पुर्वी झालेली असुन, त्याला त्यानंतर म्हणजे दि. ०१/११/२००५
रोजी व व त्यानंतर अनुदान मिळाले आहे असे कर्मचारी शासनाने खास करुन खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यासाठी मंजुर केलेल्या दराने व मंजुर केलेल्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र आहे म्हणुन ते सर्व कर्मचारी १९८२ च्या योजनेला पात्र असतील. दि. १०/०७/२०२० ची अधिसुचना रद्द करुन २००५ पुर्वी नियुक्ती 'दानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी व शिक्षक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी न्याय दयावा अशी मागणी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जळगांव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, महीलाध्यक्षा वसुंधरा लांडगे, तालुकाध्यक्ष सोपान भवरे,शहराध्यक्ष डि.ए.सोनवणे, जिल्हा संघटक एन.आर.चौधरी, मनोहर पाटील, प्रभाकर विंचूरकर,  सल्लागार दशरथ लांडगे,गं.का.सोनवणे यांनी केले आहे.

Friday 25 September 2020

कल्याण - मुरबाड रेल्वे मार्गाचे 50 वर्षाचे स्वप्न पूर्ती करण्याची खासदार कपिल पाटील यांची लोकसभेत मागणी !!

कल्याण - मुरबाड  रेल्वे मार्गाचे 50 वर्षाचे स्वप्न पूर्ती करण्याची खासदार कपिल पाटील यांची लोकसभेत मागणी !!


मुरबाड {मंगल डोंगरे} : मुरबाड तालुक्यातील नागरिकांकडून 50 वर्षांपासून रेल्वेची वाट पाहिली जात असून, मुरबाडमधील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकर सुरू करावे, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी काल बुधवारी लोकसभेत केली.


     भारतीय रेल्वेचे जनक असणारे  नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे गाव आहे. मात्र, मुरबाडपर्यंत रेल्वे सुरू होण्यासाठी मुरबाडवासीय 50 वर्षांपासून वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. त्या निर्णयाने हजारो मुरबाडवासीयांना दिलासा मिळाला. सध्या या रेल्वेमार्गाचा अंतिम प्रकल्प आराखडा (डीपीआर) नीती आयोगाकडे लवकरच मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मुरबाडवासियांचे पाच दशकांचे स्वप्न साकार करण्यासाठी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी काल लोकसभेत तातडीने सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधण्याच्या नियमानुसार केली.
   मुरबाड रेल्वेने जोडताना यापूर्वी   कल्याण -मुरबाड - नगर रेल्वे ,यानंतर मुरबाड  - कल्याण उपनगरी रेल्वे , तर मधल्या काळात कल्याण -टिटवाळा मार्गे - मुरबाड अश्या रेल्वे मार्गाच्या चर्चा येत होत्या. तर मागील काही महिन्यांपूर्वी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड रेल्वे चा आराखडा तयार होऊन नीती आयोगाला सुपूर्द केल्याचेही जाहीर केले होते .त्यामुळे मुरबाड रेल्वे लवकर मार्गी लागेल असे वाटत असताना पुन्हा एकदा लोकसभेत खासदार कपिल पाटील यांनी मागणी करताना नीती आयोगाला प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले , मुरबाड रेल्वे ने जोडल्यास मुरबाड मधील बेरोजगारी कमी होऊ शकते , प्रवासाचा निम्मा खर्च कमी होऊन आर्थिक स्थिती सुधारू शकते त्या मुळे मुरबाड कर गेली 50 वर्ष प्रतीक्षा करत असून राजकारणाच्या गर्तेत सापडलेला हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे अशी मुरबाड करांची अपेक्षा आहे त्यामुळे  खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत नव्याने आठवण करून दिल्याने मुरबाड करांनी आभार मानलेत 
    कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी 962 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारतर्फे 50 टक्के खर्च उचलण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या रेल्वेमार्गासाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तर मुरबाड करही सातत्याने मागणी लावून धरत आहेत.त्यात पुन्हा एकदा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील लोकसभेत शुन्य प्रहारात ह मुद्दा उपस्थित केल्याने मुरबाड करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याकडे खासदार कपिल पाटील यांनी वेधले लोकसभेचे लक्ष !! **निक्रुष्ठ कामामुळे नवा ठेकेदार नेमण्याची मागणी**

शहापूर-मुरबाड-कर्जत रस्त्याकडे खासदार कपिल पाटील यांनी वेधले लोकसभेचे लक्ष !!
**निक्रुष्ठ कामामुळे नवा ठेकेदार नेमण्याची मागणी** 


मुरबाड {मंगल डोंगरे} : नवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्याच्या निकृष्ट व संथ गतीने सुरू असलेल्या कामाकडे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेचे शून्य प्रहरात काल लक्ष वेधले.    यामुळे तीन तालुक्यातील हजारो ग्रामस्थांचे हाल होत असल्याने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून नवा ठेकेदार नेमण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.
शहापूर, मुरबाड आणि कर्जत तालुक्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या व मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे महामार्ग जोडणाऱ्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली होती. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली (548 अ) हा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. तसेच त्यासाठी ८५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामामुळे तिन्ही तालुक्यातील ग्रामस्थांचा वेगाने प्रवास होणार होता.
सद्यस्थितीत या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून निकृष्ट दर्जाचे व संथ गतीने सुरू आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे कामाचा व्याप असल्यामुळे संबंधित रस्ता राज्य सरकारच्या एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. या रस्त्याचे काम एमएसआरडीसीच्या नियंत्रणाखाली आहे. या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने सब कॉन्ट्रॅक्टर नेमून, त्याला ३ टक्क्याने काम दिले. तर सब कॉन्ट्रॅक्टरने आणखी एका सब कॉन्ट्रॅक्टरला ११ टक्क्याने काम दिले. या गोंधळात निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. त्याचा हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेचे लक्ष वेधले. 
केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याने एमएसएसआरडीकडे तत्काळ प्रस्ताव पाठवून संबंधित रस्त्याचे काम तत्काळ रद्द करावे. तसेच नव्या निविदा काढून, सध्याच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी आग्रही मागणी खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत केली.
दरम्यान, शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्याच्या निकृष्ट कामांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. गेल्या दोन वर्षांत निकृष्ट कामांमुळे रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांचा बळी गेला. तर लहान-मोठ्या पुलांची कामे अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या संदर्भात भाजपासह विविध संघटनांनी तीव्र आंदोलनेही केली आहेत. यापूर्वीही खासदार कपिल पाटील यांनी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पत्राद्वारे रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे लक्ष वेधले होते. तसेच कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

मुरबाड करांच्या मदतीसाठी सरसावले डॉ.तेजस घुडे,, ** हवालदिल न होता फक्त संपर्क साधण्याचे खुले आवाहन **

मुरबाड करांच्या  मदतीसाठी सरसावले डॉ.तेजस घुडे,,
** हवालदिल न होता फक्त संपर्क साधण्याचे खुले आवाहन **


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात कोरोना साथीचा फैलावं वाढत चालल्याने ग्रामीण भागातील लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी तालुक्यातील उंबरपाडा -- सरळगावचे  भूमिपुत्र  डॉ तेजस दिगंबर घुडे हे सरसावले असुन,तालुक्यातील जनतेने हवालदिल न होता .तात्काळ संपर्क साधण्याचे खुले आवाहन केले असुन मुरबाड करांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे .
    डॉ तेजस घुडे  हे मुरबाड चे भुमिपुत्र असुन ,सध्या ते ठाणे महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात सल्लागार म्हणून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत .व "आरोग्यं "या खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार करत आहेत. तसेच ते "रोहिणी रूग्णालय" ठाणे येथे छातीचे रोगावर तज्ञ Chest Physician म्हणून काम करत आहेत. ग्रामीण भागातील कोविड संसर्ग झालेल्या अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. ग्रामीण भागातील लोकांना खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत व सल्ला पाहिजे असल्यास त्यांचा मोबाईल फोन नंबर  9372304908 वर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Thursday 24 September 2020

बामसेफ प्रणित छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने रायगडावर छत्रपती शिवरायांचा शाक्त पद्धतीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

बामसेफ प्रणित छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने रायगडावर छत्रपती शिवरायांचा शाक्त पद्धतीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ! 
   
   
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम किल्ले रायगड येथे छत्रपती क्रांती सेना,बामसेफ, भारत मुक्ति मोर्चा, बुध्दिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय किसान मोर्चा,मूलनिवासी महिला संघ,बी.एम.पी. भारतीय विद्यार्थी मोर्चा व इतर संघटनेच्या माध्यमातून संपन्न झाला.
     सदर कार्यक्रमासाठी माननीय जिल्हा अधिकारी रायगड यांनी  २० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती. त्यानुसार कोविड १९ संदर्भातील सर्व नियम पळून आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
     छत्रपती शिवाजी महारांचा पहिला राज्याभिषेक काशीचे गागा भट यांच्या माध्यमातून १६ जून रोजी संपन्न झाला होता यासाठी मोठया प्रमाणात स्वराज्याचे द्रव्य खर्ची पडले होते. तसेच या राज्याभिषेकावर जिजाऊ माॅ साहेब खुश नव्हत्या  व इतर काही कारणाने छत्रपतींनी दुसरा राज्यभिषेक करण्याचे ठरवले. हा राज्याभिषेक निश्चल पुरी गोसावी यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. 
      निश्चल पुरी गोसावी हे तत्कालीन बौद्ध धम्माची एक शाखा तंत्रयान या पद्धतीने करण्यात आला. मात्र  हा राज्याभिषेक मनुवादी व्यवस्थेने समाजासमोर आणला नाही. वास्तविक पाहता पहिला राज्याभिषेक झाला असताना दुसरा राज्यभिषेक छत्रपतीनी का केला?  यावर चर्चा व्हायला हवी होती परंतु शिवजयंतीचा तारीख व तिथीचा वाद सुरू झाल्याने हा मुद्दा दुर्लक्षित राहिला. मात्र छत्रपतीक्रांती सेना हा राज्यभिषेक दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज आहे. तसेच हा विषय समाजासमोर आणून या राज्याभिषेका विषयी समाजात जागृती करण्याचे काम केले जाणार आहे.
     सदर कार्यक्रम ज्या निश्चलपुरी गोसावींच्या हस्ते पार पडला त्यांचे वंशज गोसावी महाराज व त्यांची टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती. पुढील वर्षी आपण हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करू व समाजात जागृती करू असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.हाटे साहेब महाड यांनी केले.आपल्या प्रस्ताविकात हाटे साहेब म्हणाले की, आज मराठा आरक्षण हा मुद्दा पेटलेला आहे. मात्र आमचा मराठा भाऊ आपला खरा इतिहास विसरला आहे. जर छत्रपती शाहू महाराजांचे आरक्षण समजून घेतले असते तर आज ही वेळच आली नसती. खरे तर मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी सर्व प्रथम बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांनी केली आहे.  त्यामुळे छत्रपती क्रांती सेना मराठयांच्या आंदोलनात त्यांच्या बरोबर आहे. तसेच आज शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम त्यांच्या विरोधात तीन कायदे पास करून करण्यात येत आहे. त्यासाठी बामसेफ त्यांच्या सर्व अपशूट विंग राष्ट्रव्यापी जन आंदोलन करणार असून यामध्ये सर्व समाजाने एकत्र आले पाहिजे असे आवाहन सदर कार्यक्रमातून करण्यात आले. सदर कार्यक्रमास बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत कासे सर, बामसेफ कोकण प्रभारी इंगळे सर, भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष विजय आवस्कर सर, संयोजक बहुजन क्रांती मोर्चा रायगड चे राम धरणे सर, राष्ट्रीय किसान मोर्चा रायगड चे प्रभारी गाडे सर, रायगड प्रोटॉन प्रभारी सचिन शिर्के, राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा मुंबई अध्यक्ष सुमित शिंदे, भारतीय विद्यार्थी मोर्चा कोकण प्रभारी संकेत कासारे, कासे मॅडम, एॅड. पवार, लामतुरे सर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण हाटे सर यांनी केले. तर सदर कार्यक्रमाला बंजारा समाज महाराष्ट्र उपाध्यक्ष आडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण !

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण !


ठाणे : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या आधी मंत्रीमंडळातील सहकारी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना पण करोनाची लागण झाली होती. यातून ते बरे झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनाही करोनाची लक्षणं जाणवल्यानंतर करोनाची चाचणी केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

माणगांव मध्ये प्लास्टिक युक्त कृत्रिम धोकादायक अंड्यांची विक्री ? संबंधित विभागाने लक्ष द्यावे...

माणगांव मध्ये प्लास्टिक युक्त कृत्रिम धोकादायक अंड्यांची विक्री ? संबंधित विभागाने लक्ष द्यावे... 


     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सद्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूचे समूळ उच्चाट करण्यासाठी शासन सर्वोतोपरी अथक प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मानवी संचार स्वातंत्र्यावर लावलेले निर्बंध लॉकडाऊन या सर्व गोष्टींमुळे लोकांची फार मोठी कुचंबणा होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरीकांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. त्या साठी नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारात ताज्या पालेभाज्या, फळे, मच्छी मटण आणि अंड्यांचा समावेश करावा असे शासनाने निर्देश दिले आहेत. 
     या सर्व वस्तू घेण्यासाठी लोकांना बाजारात तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे बाजारात गर्दी होते. गर्दीमुळे होणारा कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लोक आपापल्या गावातील जवळच्या दुकानातून अंडी विकत घेऊन आपल्या दैनंदिन आहारात अंड्यांचा समावेश करतात. 
     मात्र माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील दुकानात उपलब्ध असलेली अंडी कृत्रिम आणि प्लास्टिक युक्त घातक पदार्थांच्या मिश्रणातून बनवलेली आढळून येत आहेत. 
    सदरचा प्रकार रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बोरघर गावचे पत्रकार विश्वास गायकवाड यांनी त्यांच्या गावातील दुकानातून विकत आणलेल्या अंड्यांच्या माध्यमातून निदर्शनास आला आहे. 
     या बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे बोरघर गावातील पत्रकार विश्वास गायकवाड यांनी मंगळावर दिनांक २२ सप्टेंबर रोजी बोरघर गावातील श्री रामदास जाधव यांच्या दुकानातून विकत आणलेली एक डझन अंडी उकडल्या नंतर ती सोलून पाहिल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की सदरची अंडी ही नेहमीप्रमाणे नसून ती सकृतदर्शनी कृत्रिम स्वरूपाची दिसून आली. सदर उकळून शिजवलेल्या अंड्यांमध्ये एकाखाली एक अशी प्लास्टिक युक्त आवरणे दिसून आली. तसेच सदरची अंडी पूर्णपणे बेचव लागत होती. म्हणून त्यांनी तात्काळ ती अंडी सदर दुकानदाराला नेऊन दाखवली. दुकानदाराने त्यांना अंडी बदलून देतो म्हटले. या गोष्टीला पत्रकार विश्वास गायकवाड यांनी नकार देत सदर दुकानदाराला विचारले की, तुम्ही सदरची अंडी कोणाकडून आणली त्यांनी सांगितले की, मी सदरची अंडी माणगांव शहरातील बामणोली रोड येथील अंड्यांचे घाऊक विक्रेते श्री. जगताप यांच्या कडून आणली. पत्रकार विश्वास गायकवाड यांनी संबंधित अंडी विक्रेते जगताप यांचा मोबाईल नंबर दुकानदार रामदास जाधव यांच्या कडून घेतला. सदर माणगांव शहरातील घाऊक अंडी विक्रेते श्री जगताप यांच्या ९४०३०६६१०० या नंबर वर फोन करून त्यांना सदरचा प्रकार सांगितला. ते म्हणाले मी सांगली येथील लोटके या अंडी एजन्सी वाल्या कडून अंडी घेतो. तरी सदर बाब अत्यंत गंभीर असून निष्पाप नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम घडवून आणणारी आहे त्यामुळे सदर प्रकरणी संबंधित नियंत्रण विभागाने गांभिर्याने लक्ष केंद्रित करून सदर प्रकरणी अधिक चौकशी करून सत्यता पडताळणी करीता परिक्षण करावे हीच अपेक्षा.

मुरबाड शहरात शिवसेने तर्फे 'अमृत वेळʼचे मोफत वाटप !!

मुरबाड शहरात शिवसेने तर्फे 'अमृत वेळʼचे मोफत वाटप !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : कोरोना महामारी संकटात जनसामांन्याच्या मते  जिवदान देणारी वनौषधी व अम्रुत ठरलेली जडीबुटी म्हणजेच "गुळवेळ" हि आयुर्वेदामधे गुळवेल म्हणजे अमृतवेळ ...सध्या कोरोनाचा  वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जण अनेकानेक उपाय योजना शोधतायेत. यात गुळवेलच्या काढ्यावर  सर्वच जण भर देताना पहायला मिळतय.. गुळवेल मिळवणे कठीण जात असले तरी मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे यांच्या नेत्रुत्वा खाली, शिवसेना कार्यकर्त्यांनी मोफत गुळवेल देण्याचा उपक्रम हाती घेवुन संपूर्ण मुरबाड शहरात आज गुळवेळ चे वाटप केले.
   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जण विविध उपाययोजना करातयेत.यामध्ये सर्वाधिक भर दिली आहे ती काढे पिण्यात... सध्या कोरोना काळात अत्यंत गुणकारी असलेल्या गुळवेल ला जास्त महत्व आले आहे. मात्र ही  गुळवेल जंगलात आढळत असल्याने ती मिळवणे सर्वांना शक्य होत नाही. यासाठी नागरिकांच्या आरोग्यासाठी शिवसेना मुरबाड शहर शाखेने भिमाशंकर अभयारण्यात जाऊन ही गुणकारी गुळवेल आणून ती शहरातील सर्व कुटुंबांना वाटप करण्याचा उपक्रम हाती घेवुन नागरिकांच्या आरोग्याची का ळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
   गुळवेल ला आयुर्वेदामध्ये अमृतवेळ असेही म्हटले जाते.कशाही प्रकारचा ताप ,खोकळा ,सर्दी, असल्यास गुळवेल चा काढा दिल्याने चांगल्या पैकी फायदा होत असल्याचे म्हटले जाते तसेच अनेक छोट्या मोठ्या आजारांवर देखील गुळवेल गुणकारी असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे..

कोरोनाशी एकाकी झुंज देणाऱ्या मुरबाडकरानां आणखी नवे एक संकट नको - चेतनसिंह पवार

कोरोनाशी एकाकी झुंज देणाऱ्या मुरबाडकरानां आणखी नवे एक संकट नको - चेतनसिंह पवार 


मुरबाड  (मंगल डोंगरे) : संपूर्ण जग हादरुन सोडणा-या कोरोनाशी मुरबाडकर एक झुंज देत असताना, कल्याण -नगर या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणा-या अपघातात झालेली वाढ पाहता,काँंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी कोरोना नंतर पुन्हा मुरबाड करांवर नवीन संकट नको म्हणून 
गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, ठाणे यांना ईमेल तसेच दुरध्वनी व्दारे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील (मुरबाड ते उमरोली पि.) रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याबाबतचे निवेदन काॅंग्रेस पक्षाचे  वतीने देण्यात आले. यावेळी आपल्या आखत्यारीत  येत असलेल्या कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील (मुरबाड ते उमरोली पि.) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकी स्वार अथवा मोठ्या वाहनाचे देखील गंभीर स्वरुपाचे अपघात होवुन जिवित हानी तसेच तालुक्यांतील नागरिकांची आर्थिक हानी होवु शकते. कोरोनाच्या ह्या महाभयंकर रोगाशी नागरिक एकाकी झुंज देत असताना अजुन आपल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडुन एखाद्या संकटाचे निमंत्रण मुरबाड तालुक्यातील नागरिकांसाठी नको. असे प्रतिपादन यावेळी चेतनसिंह पवार यांनी केले . व आपण सदरच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे विनंती केली.

Wednesday 23 September 2020

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील शिवसेनेचा कोहिनुर हिरा हरपला !

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील शिवसेनेचा कोहिनुर हिरा हरपला !


कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचं कोरोनामुळे निधन झालं

गेली २५ वर्ष ते शिवसेनेचे नगरसेवक राहिले होते.कल्याणमधील शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले व सर्वसामान्य वर्गाला न्याय मिळवून देण्याची भूमिका,वेळप्रसंगी वरिष्ठांना समजुन सांगून एखाद्याचे काम पुर्ण करण्याची हातोटी आणि सभागृहात देखील अभ्यासपूर्ण विषय हाताळण्याची क्षमता असलेले ते नगरसेवक होते

देवळेकर यांच्या निधनाने कल्याणमधील शिवसेनेचे आणि पर्यायाने शहराचे कधीही भरून न  येणारे नुकसान झाले असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करीत आहेत

राजेंद्र देवळेकर यांची कोरोनाशी असलेल्या एकाकी झुंजीचा अखेर आज अंत झाल्याची वेदना सर्वपक्षीय नगरसेवकांनी बोलून दाखविली.

गोरेगाव,नांदवी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांचा सक्रिय सहभाग !

गोरेगाव,नांदवी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांचा सक्रिय सहभाग !


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सध्या रायगड जिल्ह्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असतानाच मृत्यूच्या आकडेवारीत भर पडत आहे. वाढता मृत्यूदर नियंत्रणात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम राज्यात दिनांक १५ सप्टेंबर ते होत्या२५ ऑक्टोबर दरम्यान राबविण्याचा निर्णय घेतला. 
       त्यानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिनांक १५ सप्टेंबर पासून स्थानिक लोकप्रतिनिधी,आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी यांच्यासह, सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवक यांच्या माध्यमातून या मोहिमेस जोरदारपणे सुरुवात करण्यात आली. दरम्यान या मोहिमेस जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो, याची चाचपणी करण्यासाठी बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी गोरेगाव,नांदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या मोहिमेत स्वत: सहभागी झाले. त्यांनी घरांना भेटी देत कोविड - १९ विषयी जनजागृती केली व प्रत्यक्षात थरमल स्कॅनर, ऑक्सिमीटरद्वारे घरातील सदस्यांची आरोग्य  तपासणी केली.
  या वेळी डॉ.पाटील यांच्यासोबत गटविकास अधिकारी सतीश गाढवे,माणगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.परदेशी, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद गोरेगावकर, स्वदेस फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार, स्वदेस फाऊंडेशनचे व्यवस्थापक डॉ.सचिन अहिरे, गोरेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद बागडे, आरोग्य सेविका सौ.प्रणिता मोहिरे, ग्रामपंचायत सदस्य किशोर पिसाट, आशा वर्कर उपस्थित होत्या.

कल्याण - मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस उभे भातपिक आडवे कोरोनाच्या काळात नवे संकट?

कल्याण - मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस उभे भातपिक आडवे कोरोनाच्या काळात नवे संकट? 


कल्याण (संजय कांबळे) : गेल्या दोन दिवसांपासून कल्याण आणि मुरबाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे अगोदर कोरोनोच्या संकटामुळे अर्धमेले झालेले शेतकऱ्यांची अवस्था राजाने मारलं आणि निसर्गाने झोडले तर न्याय कोणाकडे मागायचा अशी झाली आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा ही गावे सोडली तर बहुतेक गावात भात पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मुरबाड आणि शहापूर तालुक्याला तर तांदूळाचे कोठारच म्हटले जाते. 2020 हे वर्ष  सर्वांनाच धोकादायक व सत्वपरीक्षेचे ठरले आहे. ऐन भात लावणीच्या वेळी कोरोनाने डोके वर काढले. शेतीच्या कामांना मजूर मिळेना तरीही  शेतकऱ्यांनी घरातील सर्व लहान थोर सदस्यांना घेऊन भात लावणी उरकली. उशीराका होईना पाऊस चांगला पडल्याने भात पीक चांगले आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतातील कामे म्हणावी तशी पुर्ण झाली नाही पण तरीही भात पीक चांगले आल्याने शेतकरी आंनदी होता. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची दु:खात ही चांगले पीक आल्याचे समाधान वाटत होते. काही शेतकऱ्यांनी तर दसरा दिवाळीत भात कापणी करण्यासाठी बांबूचे बांद बनविण्याचे काम सुरू केले आहे. पण येथेही काळाने डाव साधला. गेल्या दोन ते चार दिवसांपासून कल्याण आणि मुरबाड तालुक्यात मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे काही दिवसानंतर कापणी ला येत असलेले भात पीक आडवे झाले आहे कल्याण तालुक्यातील फळेगाव, रायते, मानवली, घोटसई, दहागाव, खडवली, उशीद, आपटी, तर शहापूर तालुक्यातील मड, आंबार्जे, वाशिंद, शेरे, शेई, नडगाव, तर मुरबाड तालुक्यात शिरगाव, चिखले, मानवली, उमरोली, धसई आंबेटेंभे, झापवाडी, पाद-याचा पाडा, धानिवली, ब्राह्मणगाव, म्हसा, कान्होळ आदी ठिकाणी भात पीक पडल्याची माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. वरूणराजाने आता कृपादृष्टी करावी व शिल्लक राहिलेले पीक तरी आमच्या पदरात पडावे अशी विनवणी बळीराजा करित आहे. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी या साठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !!

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी या साठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !!


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना शासनाच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीचा घाट घातला जात आहे. हा सरळसरळ मराठा समाजावर अन्याय करणारा निर्णय ठरू शकतो. त्यामुळे जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शासनाने राज्यात कोणत्याही खात्याची भरती करू नये या प्रमुख मागणी साठी  संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याच्या वतीने माननीय माणगांव तहसीलदार यांना जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या समवेत लेखी निवेदन देण्यात आले. 
       या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम शिसोदे,जिल्हा सचिव शिवश्री पृथ्वीराज खाडे ,शिवश्री अनिकेत कांबळे संघटक, तालुकाध्यक्ष संदिप रेके,उपाध्यक्ष शिवश्री अजित सुतार यांच्या सह संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 
       शासनाने मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना जर पोलीस भरती केली तर तो शासनाचा निर्णय राज्यातील मराठा समाजावर किंबहूना मराठा समाजातील तरुणांवर अन्यायकारक होईल असे होऊ नये म्हणून शासनाने जनभावना लक्षात घेऊन पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी या प्रमुख मागणी साठी संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी माणगांव तहसीलदार माननीय प्रियांका आयरे मॅडम यांच्या माध्यमातून शासनाला देण्यात आले.

Tuesday 22 September 2020

युसुफ मेहेरअली सेंटरचे दीपस्तंभ तथा प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचे कोरोनामुळे निधन ! युसुफ मेहेरअली सेंटर व्यवस्थापन समिती शोकाकुल...

युसुफ मेहेरअली सेंटरचे दीपस्तंभ तथा प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचे कोरोनामुळे निधन ! 
युसुफ मेहेरअली सेंटर व्यवस्थापन समिती शोकाकुल... 


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : युसुफ मेहेरअली सेंटरच्या वाटचालीत मागील पन्नास वर्षे सहभाग असलेले सेंटरचे प्रकल्प संचालक , उपाध्यक्ष व आपटा येथील उर्दू शाळेचे संस्थापक श्री मतीन दिवाण यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. कोरोनाच्या महामारी मध्ये तारा व जवळच्या २०-२५ गावांमध्ये जावून गरजू गरीबांना मदत करण्यासाठी मतीन दिवाण यांनी एका योध्यासारखे काम केले. स्थलांतरीत लोकांची सेवा केली , सहाय्य केले. हृदयाची शस्त्रक्रिया होऊन पेस मेकर बसवलेला असताना सुध्दा सेंटरच्या कामात सातत्याने कार्यरत राहाणे हे ते कर्तव्य समजत होते. अखंड काम करण्याची जिद्द असलेले मतीन दिवाण यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने सेंटरचे अपरिमित नुकसान झाले आहे. सेंटर म्हणजे मतीन व मतीन दिवाण म्हणजे सेंटर अशी ओळख झाली होती. त्यांच्या कर्तृत्वाचा हा मैलाचा दिपस्तंभ होता ! 
       सेंटरने समाजवादी विचारांचे विधायक उपक्रम सुरू केले , प्रसंग आला तर संघर्ष केला मतीण दिवाण यांनी नेहमीच फ्रंटवर राहून नेतृत्व केले. त्यांचे उर्दू भाषेवर प्रेम होते. उर्दूनी दिलेली मोहब्बत आणि माणुसकी  त्यांचा प्राण होता. आपटा येथे सहकारी जमा करून जागा मिळवली व उर्दू शाळा सुरू केली. पुढे तिचे असे संगोपन केले की आता ज्युनिअर काॕलेजच्या रूपाने वास्तू दिमाखदारपणे मुलांचे भविष्य घडवित आहे. सेंटरने सुरू केलेले ग्रामोद्दोग हा महात्मा गांधीजी व युसुफ मेहेरअली यांच्या विचारांचा पाया आहे हे संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य  सेनानी डाॕ जी जी परिख यांनी तारा परिसरात बिंबवले , मतीन दिवाण यांनी हे  मार्गदर्शन अंगिकारले आणि शेवटच्या श्वासापर्यंत अमलात आणले. 
     डाॕ जी जी परिख व त्यांची गुरू शिष्य म्हणून ओळख संपूर्ण रायगड जिल्हा ओळखून होता. स्वयंरोजगाराचा पाया तारा संकुलात निर्माण करण्यात त्यांचे योगदान हे मोठे होते. कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करीत असताना त्यांचे निधन सेंटर साठी मोठा आघात आहे. डाॕ जीजी परिख यांचा गुणी , कर्तबगार  शिष्य व आमचा जीवाभावाचा सहकारी निघून गेल्याची हळहळ लागून राहीली आहे. केवळ सेंटरच नव्हे तर सर्व सामाजिक संघटना , संस्था व समाज यांच्याशी त्यांचे प्रेमाचे व सहकार्याचे संबंध होते . सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात दुःखाचे सावट पसरले असून रायगड जिल्ह्यातील तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर व्यवस्थापन समितीवर दुःखाची शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेने मुरबाडमध्ये राबविला कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम! विद्यार्थीसेना शहरअध्यक्ष देवेंद्र जाधव यांची कौतुकास्पद कामगिरी !!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेने मुरबाडमध्ये  राबविला कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम! विद्यार्थीसेना शहरअध्यक्ष देवेंद्र जाधव यांची कौतुकास्पद कामगिरी !!


मुरबाड {मंगल डोंगरे} : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन व अनलॉकडाऊनच्या कालावधीत मुरबाड शहरातील व तालुक्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर,परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आदी लोक आपल्या जीवाची पर्वा न करता व जोखीम पत्करून तालुक्यातील लोकांची सेवा करत आहेत . अशा खऱ्याखुऱ्या कोरोना बहाद्दरांचा  त्यांच्या घरी जाऊन व त्यांचा सन्मान करण्याची कौतुकास्पद कामगिरी नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेना मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यानी केली आहे . 'कोरोना योद्धा सन्मानपत्र' व नावाची आकर्षक व सुंदर फ्रेम देऊन देवेंद्र जाधव यांनी मुरबाड शहरातील व तालुक्यातील  सन्मानजनक व्यक्तींचा सन्मान करण्याची कामगिरी करुन अनेक कोरोना योद्धा यांचा  याप्रसंगी सन्मान  केला आहे. ज्यामध्ये मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार बंडू उर्फ अण्णा जाधव, मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे, मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छाया चौधरी , मुरबाड नगरपंचायतीचे मुख्या धिकारी परितोष कंकाळ, मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंतकुमार  खंबायत, मुरबाडचे गुप्तहेर पोलीस मेजर विनायक खेडेकर, केटीव्ही न्युज चॅनेलचे प्रतिनिधी भरत दळवी,दैनिक पुढारीचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव, दैनिक सागरचे प्रतिनिधी आनंत घागस, दैनिक ठाणे वैभवचे प्रतिनिधी मंगल डोंगरे,दैनिक जीवनदीप वार्ताचे प्रतिनिधी दिलीप पवार, महाराष्ट्र लाईव्ह मुरबाड न्युज चॅनेलचे प्रतिनिधी  लक्ष्मण पवार,एन. टिव्ही  न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी अरुण ठाकरे, स्वप्नज्योती टाइम्स चॅनेलचे संस्थापक नामदेव शेलार, महाराष्ट्र माझाचे सचिन पोतदार , मुरबाड बदलापूर अपडेटचे प्रतिनिधी चेतन पोतदार , जनशक्ती न्यूजचे प्रतिनिधी  जीवन शिंदे,  शब्द मशालचे प्रतिनिधी किशोर गायकवाड  आदींचा याप्रसंगी देवेंद्र जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यानी घरोघरी जाऊन यथोचित सन्मान केला आहे. " संपूर्ण मुरबाड तालुका एकजूट होऊन कोरोना महामारीशी लढत आहे. अशा कठीण परिस्थितीत  अनेक कोरोना योद्धा मुरबाडच्या जनतेसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे. आपल्या सेवेने आज सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. आपल्या धैर्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुरबाड शहर तर्फे आम्ही सलाम करत आहोत." अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र जाधव यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना  दिली .  यावेळी देवेंद्र जाधव यांच्यासोबत आजीम मणियार, सचिन जाधव,उमेश सोनावणे,आकाश लिहे, ऋषिकेश तेलवणे,सिद्धेश रोठे,श्रेयस तेलवणे ,सुशील बैरागी,अजय यशवंतराव ,विकास गुप्ता, भूषण माळी, प्रथमेश भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रात कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांना सुरक्षा द्या !! ** मुरबाड,बदलापुर मध्ये निवेदन देवून भाजपा महिला मोर्चा ची मागणी **

संपूर्ण महाराष्ट्रात कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांना सुरक्षा द्या !!
      ** मुरबाड,बदलापुर मध्ये निवेदन देवून भाजपा महिला मोर्चा ची मागणी **


मुरबाड ( मंगल डोंगरे ) गेल्या मार्च महिण्या पासुन महाराष्ट्रासह देशभरात पसरलेल्या कोरोना साथ रोगाने
सर्वत्र  महामारीची परिस्थिती गंभीर होत असताना, महाराष्ट्रात कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या  घटनांची इतर ठिकाणी  पुनरावृत्ती होऊ नये या साठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल  पाटील तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शना खाली भाजपा महिला मोर्चा ठाणे कमिटीच्या वतीने आज बदलापुर नगर परिषद व पोलीस स्टेशन तसेच  मुरबाड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार मुरबाड यांना निवेदन देवून  महिला रुग्णांच्या संरक्षणाची मागणी करण्यात  आली आहे. 


दिवसेंदिवस  कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.अशा घटनांची इतर ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी  म्हणून,ज्या ज्या ठिकाणी कोव्हीड हाँस्पिटल आहेत. त्या, त्या ठिकाणी महिला रुग्णांसाठी स्वतंत्र वाँर्ड निर्माण करून महिला डॉक्टर,नर्स,स्वच्छता कर्मचारी, यांची नेमणूक करण्यात यावी.तसेच तात्काळ सी.सी.टी.व्ही. कँमेरे बसविण्यांत यावेत.आणि प्रत्येक कोव्हिड सेंटरसाठी महिला काँन्स्टेबल ची चोवीस तासासाठी नेमणूक करून गस्तीसाठी महिला पोलीस देण्याची तरतूद व्हावी.या सर्व मागण्यांसाठी  खास  भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या कमिटीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्र भर प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या आदेशाने ठिक ठिकाणी निवेदने देण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून मुरबाड पोलीस ठाण्यात व मुरबाड तहसीलदारांना निवेदन देऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चा ठाणे महिला अध्यक्षा शितल तोंडलीकर यांनी केली आहे.यावेळी माजी उपसभापती सिमाताई घरत,उपसभापती अरुणा खाकर,नगराध्यक्षा छाया ताई चौधरी,नगरसेविका उर्मिला ठाकरे,पं.स.सदस्या स्वरा चौधरी,स्नेहा धनगर,,महिला सदस्या अर्चना पिसाट,शिल्पा देहरकर,अनिता कथोरे,सुरेखा गायकर ,राणे मँडम, यांसह मोठ्या संख्येने कमिटीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...