Saturday 26 September 2020

उद्योग मंत्रालयाचे निर्णयाने शेकडो प्रकल्पग्रस्तांना रोजगार !!

उद्योग मंत्रालयाचे निर्णयाने शेकडो प्रकल्पग्रस्तांना रोजगार !!


'मात्र कामगार कायद्याचे निर्णयायाने शेकडो कामगार बेरोजगार.'

मुरबाड (मंगल डोंगरे) : बारवी धरणाचे उंची वाढीमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना सुमारे 21 वर्षाच्या प्रदिर्घ संघर्षाने आमदार किसन कथोरे यांचे सहकार्याने यश आले असुन राज्याचे उद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बाराशे तरुणापैकी 209 तरुणांना रोजगार दिल्याने तालुक्यातील सुशिक्षित तरुणामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले असले तरी केंद्र सरकारचे उद्योग मंत्रालयाने कामगार विरोधी धोरणाची अमलबजावणी मुरबाड मध्ये करत शेकडो कामगारांना बेरोजगार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने इतर कामगारामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
           महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिपत्याखाली असलेल्या बारवी धरणामुळे ठाणे मुंबई या शहरांना पाणी पुरवठा होत असताना ते पाणी कमी पडत असल्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणाची उंची वाढविली त्यामुळे परिसरातील 12 गावे वाड्या पाडे हे पाण्याखाली जात असल्याने त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करुन त्यानां त्यांचे जमिनीचा व घरांचा मोबदला दिला जाईल व घरटी एका व्यक्ती स शासकीय नोकरी दिली जाईल असे आश्वासन दिले होते.औद्योगिक विकास महामंडळाने दिलेल्या अश्वासनाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची पुर्तता करण्यात गेली 21 वर्षे चालढकल होत होती. परंतु या प्रकल्पग्रस्तांसाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी शासनदरबारी संघर्ष करुन प्रकल्पग्रस्तांना त्यांचे जागेचा व घराचा मोबदला मिळवुन दिला. आणि घरटी एकास शासकीय नोकरी अशा सुमारे बाराशे तरुणांना नोकरीत सामावुनघेण्याचा महत्वपुर्ण प्रश्न मार्गी लावुन सुमारे 209 जणांना पहिल्या टप्प्यात नेमणुकीचे आदेश प्राप्त केले. असुन त्यांना 1 आक्टोबर पासुन कामावर हजर होण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिले आहेत.हा सुवर्ण सोहळा मुरबाड मँन्युफँक्चर असोसिएशनचे सभाग्रुहात पार पडला त्याप्रसंगी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी. मुरबाडचे सभापती. श्रीकांत धुमाळ. बारवी प्रकल्प पिडीत संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर.भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव ,हरेश पुरोहित. रामभाऊ दळवी.पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या सह शेकडो प्रकल्पग्रस्त व तरुण वर्ग उपस्थित होते. 


        * केंद्र सरकार च्या कामगार विरोधी धोरणाची अमलबजावणी आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड एमआयडीसीतील टेक्नोक्राफ्ट कंपनीत केली असुन त्यामध्ये सुमारे 10ते12 वर्षापासुन कायम असणाऱ्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची पुर्व सूचना न देता अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेऊन कामगारावर उपासमारीची वेळ आणली आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांनी आज गेटसमोर तिव्र निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.


       * नेहमीच मुरबाड मधिल प्रकल्पांचा  आणि विकासाचा पँटर्न आपण महाराष्ट्र भर राबविणार तसेच तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वेगवेगळे उद्योग सुरु करण्यासाठी सरळगाव व पाटगाव येथे नव्याने एमआयडीसी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आमदार किसन कथोरे यांना विचारले असताना टेक्नोक्राफ्ट कंपनीत ज्या कामगारांना कमी केले आहे. त्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही .असे आमच्या मुरबाड प्रतिनिधीशी बोलताना  सांगितले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...