Wednesday, 30 June 2021

राज्यात आज परत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ दिसून आली ! रिकव्हरी रेट 96.02 टक्के तर मृत्यूदर 2.01 टक्के !

राज्यात आज परत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ दिसून आली ! रिकव्हरी रेट 96.02 टक्के तर मृत्यूदर 2.01 टक्के !



मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10, 353 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,19,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.02% टक्क्यावर गेला आहे.

तर राज्यात आज 141 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 16 लाख 37 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 61 हजार 404 (14.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 17 हजार 926 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 173 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी सुप्रियाताई सुळेंचा वाढदिवस साजरा !! **तर कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांनी आदिवासी मुलीला दत्तक घेऊन दिल्या शुभेच्छा **

मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी सुप्रियाताई सुळेंचा वाढदिवस साजरा !! 

**तर कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांनी आदिवासी मुलीला दत्तक घेऊन दिल्या शुभेच्छा **  


मुरबाड, (मंगल डोंगरे) : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा होत असताना, याचेच औचित्य साधुन मुरबाड मध्ये हि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मुरबाड तालुक्यात व्रुक्षारोपन, महिलांसाठी मोफत पँनकार्ड वाटप शिबीर, ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँंग्रेसचे मुरबाड तालुका कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांनी खाटेघर -सदुची वाडी येथील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या सिया बाळकृष्ण वाघ, या आदिवासी कातकरी समाजातील मुलीला दत्तक घेवून तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी यावेळी स्विकारली असुन, तिला आज संपूर्ण पाठ्य पुस्तके, वह्या, दफ्तर, वाँटरबँग, गणवेश, तसेच संपूर्ण वर्षेभरासाठी येणाऱ्या शैक्षणिक फि"चे पैसे रोख स्वरूपात देवुन ख-या अर्थाने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. सदर प्रसंगी मुरबाड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिपक वाघचौडे, शहर सचिव शिवाजी नवले, मुरबाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांच्यसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील सहाय्यक शिक्षक, शिक्षणसेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची याचिका दाखल करणार : प्रोटॉन !

राज्यातील सहाय्यक शिक्षक, शिक्षणसेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची याचिका दाखल करणार : प्रोटॉन ! 
    

        बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे श्री. एन. बी.कुरणे सर राष्ट्रीय महासचिव, श्री. संतोष घरत सर राज्य उपाध्यक्ष, श्री. गणेश पाटील सर जिल्हा अध्यक्ष, श्री. दिपक मोरे जिल्हा प्रभारी, प्रोटॉन संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री. धनंजय पवार सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. सुर्यकांत कासे सर, भारत मुक्ती मोर्चा, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. महेश जाधव सर तसेच विजय जाधव, संदीप गायकवाड, अनिल मोरे, विजय मोरे, संतोष पोटले, तैमूर गोविलकर, सलीम उके, मिथुन चांदोरकर, मोहन जाधव, रोहन तांबे. रफीक कार्डेकर, शकील वस्ता यांना  सहाय्यक शिक्षक ( परिविक्षाधीन ) शिक्षणसेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील शिक्षणसेवकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
      याप्रसंगी स्टार ढाबा, म्हसळा येथे राज्यातील शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत मान्यवरांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेने बामसेफच्या वकील लॉबीशी कायदेशिर चर्चा करून शिक्षणसेवकांच्या समस्या लक्षात घेऊन शिक्षणसेवक यांना सहकार्य करण्याची पूर्णपणे तयारी दर्शविलेली आहे. आजवर राज्यातील प्रस्थापित सर्व शिक्षक संघटनांनी शिक्षणसेवक यांचा फक्त शिक्षक पतपेढी निवडणुका आणि आपल्या संघटनेच्या राजकारणा पुरता वापर केलेला आहे. 
       मात्र शिक्षणसेवक यांच्या मूळ समस्या सोडविण्यासाठी प्रस्थापित शिक्षक संघटना आणि संघटनेचे शिक्षक आमदार यांनी कधीही पुढाकार घेतला नाही. शिक्षणसेवकांच्या समस्येला प्रस्थापित शिक्षक संघटनांच्या निवेदनात दुय्यम स्थान देण्यात येत होते. तसेच सद्यस्थितीत शिक्षक संघटना स्वतः त्यांच्या मूळ समस्या सोडविण्यास असमर्थ असल्याने शिक्षणसेवक हे प्रस्थापित शिक्षक संघटनाकडून नाउमेद होते. 
        मात्र महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षणसेवकांचे शिक्षणसेवक रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका टाकण्याची तयारी राष्ट्रिय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या ऑफशूट विंग प्रोटॉन (ऑल इंडिया प्रोफेसर, टीचर अँड नॉन टिचींग असोशिएशन) या संघटनेने दर्शविलेली आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम शिक्षणसेवक बांधवांना आग्रहाची नम्र विनंती आहे की, पहिल्यांदा स्वतःहून कोणीतरी आपल्या मूलभूत समस्येला निःशुल्क न्यायिक लढा देण्यासाठी तयारी दर्शविलेली आहे. 
      तेव्हा आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन प्रोटॉन संघटनेच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहिलो पाहिजे. जेणेकरून संघटनेला आपला न्यायिक लढा लढण्यास मोलाची मदत होईल. तेव्हा राज्यांतील सर्व जिल्ह्यातील तमाम शिक्षणसेवक बांधवांना विनंती आहे कि, आपण जास्तीत जास्त संख्येने प्रोटॉन संघटनेचे सभासद व्हावे. सभासद होण्यासाठी संपर्क करा. आपल्या जिल्ह्यातील प्रोटॉन पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गोव्यात पर्यटन खुलं, कोविड निगेटिव्ह रिपोर्टचीही गरज नाही, मात्र दोन्ही लशी घेणे बंधनकारक.!

गोव्यात पर्यटन खुलं, कोविड निगेटिव्ह रिपोर्टचीही गरज नाही, मात्र दोन्ही लशी घेणे बंधनकारक.! 
   
          
अरुण पाटील, भिवंडी :        
             गोवा (Goa) हे असं ठिकाण आहे जेथे केवळ देशातूनच नाही परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. गोव्यातील समुद्र, तेथील संस्कृती, मासे सर्वच अनोख असं आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून लोकांना कोरोनामुळे घरात बसावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचं निमित्त साधून लोक घराबाहेर पडत होते. आता नव्या निर्बंधांमुळे नागरिकांना सायंकाळी 5 नंतर घरात राहणे अनिवार्य असेल.
               दरम्यान मूड फ्रेश करण्यासाठी गोवा हा पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आता गोव्यात  जाण्यासाठी नागरिकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आणणं अनिवार्य नसेल. तर ज्या नागरिकांनी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या आहेत, ते गोव्यात पर्यटनासाठी येऊ शकतात.राज्य सचिवालयात पत्रकारांशी बातचीत करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत  (मुख्यमंत्री -गोवा, डॉ. प्रमोद सावंत )  यांनी सांगितलं की, गोव्यात संक्रमण दर 6 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, व त्यांच्याकडे याचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. ही अट पूर्ण केली असेल तर ते पर्यटनासाठी आलेले असो वा व्यवसायाच्यादृष्टीने, त्यांना अडविण्यात येणार नाही.
         पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील मोठ्या रेल्वे स्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधा वाढवण्यासाठी खासगी लॅबसोबत चर्चा सुरू आहे. शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिंएट समोर आल्यानंतर सीमा भागांवर अधिक कडक लक्ष दिलं जात आहे. गोव्यात अद्याप एकही डेल्टा प्लस व्हेरिंएटचा रुग्ण आढळला नाही.

धी कुणबी सहकारी बँक लि.मुंबईच्या व्यवस्थापकीय मंडळ चेअरमन पदी अँड. पी. टी. करावडे यांची निवड !

धी कुणबी सहकारी बँक लि.मुंबईच्या व्यवस्थापकीय मंडळ चेअरमन पदी अँड. पी. टी. करावडे यांची निवड !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

          रिझर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सहकारी बँका मार्गदर्शन तत्वानुसार धी कुणबी सहकारी बँक लि. मुंबई व्यवस्थापकीय मंडळ (Board of management) चेअरमनपदी अँड. पी. टी. करावडे (B.E.Civil, LL.B., DMS., MBA finance) यांची निवड करण्यात आली आहे. अँड.परशुराम करावडे MIDC रत्नागिरी येथून नुकतेच कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाले असून सद्यस्थितीत त्यांचा वकिली व्यवसाय सुरू आहे.निवड झालेल्या अन्य पाच सदस्य मान्यवरांमध्ये सी. ए निलेश श्रावक, सी ए स्वेछा अंत्या करकरे, सी.ए विठ्ठल धो. चिविलकर, सी.ए उमेश आंग्रे, अँड अक्षया द. चिविलकर शर्मा यांचा समावेश आहे. सर्व निवड झालेल्या मान्यवरांना संगमेश्वर तालुक्यातील अनेक संस्था,समाज शाखा,युवक मंडळ शाखा, मंडळ पदाधिकारी व सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.

Tuesday, 29 June 2021

राज्यात रिकव्हरी रेट पोहचला ९६ टक्क्यांवर ! तर दिवसभरात २३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !

राज्यात रिकव्हरी रेट पोहचला ९६ टक्क्यांवर ! तर दिवसभरात २३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !



मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण 8 हजार 623 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात 231 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 21 हजार 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (मृत्यूदर) 2.01 टक्के आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 58 लाख 09 हजार 548 इतकी झाली आहे.

राज्यात सध्या 1 लाख 17 हजार 098 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 60 लाख 51 हजार 633 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 06 लाख 21 हजार 377 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कल्याण शहरात जातीवाचक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास कल्याण पोलिसांकडून केराची टोपली !

कल्याण शहरात जातीवाचक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास कल्याण पोलिसांकडून केराची टोपली ! 


कल्याण, आदर्श भालेराव : कल्याण पूर्वेतील जागेच्या वादातून अमरण उपोषण साठी बसलेले अमिताभ गुलाब सिंग ठाकुर यांनी त्याच्या व्हिडीओ मध्ये सरकारी अधिकारी याना घाणेरडे शिव्या देत असताना अनुसूचित जाती जमाती मध्ये मोडणाऱ्या चाभार जाती बदल एका जातीच्या उल्हेख चांभार चोर म्हणून करतो व्हिडिओ व्हायरल झालं असल्याने अनुसूचित जाती जमातींच्या लोकांच्या भावना दुखावल्या असल्याने सोशल मीडियावर निषेध नोंदवत असताना अश्या प्रकारचा मेसेज व्हायरल होताना दिसून येत आहे.

अमिताभ गुलाब सिंग ठाकूर तू उपोषण कर तुझी गणी रास्त असेलही पण तू काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना, चोर चांभार हा शब्द कसा वापरू शकतो ..( एका जातीच्या उल्हेख तू चोर म्हणून करतो ) "आधी चांभार समाजाची माफी माग" ठाकूर तुझ्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो ..

या ठाकूर वर atrocity ऍट्रॉसिटी गुन्ह्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिचे .. असा मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. तरी कल्याण पोलीस प्रशासन गंभीर दिसत नाही अशी चर्चा बहुजन समाजात होताना दिसून येत आहे. अनुसूचित जाती जमाती मध्ये तेढ निर्माण करणारे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण राज्यात निषेध नोंदविला जात आहे. सदर व्हिडिओ मध्ये तेढ निर्माण करणारे वाक्य असताना देखील पोलीस प्रशासन गप्प दिसून येत आहे. याची दखल घेत कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे कार्यकर्ते  गेले असताना कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाहूराज साळवे यांनी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा नोंद करण्यास मनाई केली. सदर तक्रार दाखल करण्यास गेले कार्यकर्ते यांचा अर्जही स्वीकार केला नाही ही गंभीर बाब जातीवाचक व्हिडीओ वायरल झाला असताना देखील पोलिसांच्या निदर्शनास आणण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये केलेल्या कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत त्यांच्यावर अक्षय घेऊन त्यांची तक्रार घेण्यास मनाई केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. शहरात पोलीस यंत्रणा असमर्थ दिसून येत आहे.  या बाबत काही संघटनेने एका युवती वर झालेल्या लैंगिक अत्याचारांची घटनेचं दखल पोलिसांनी न घेतल्याबद्दल काही सामजिक संघटने कल्याण तहसीलदार कार्यालयात निषेध नोंदवून लेखी अर्ज दिले आहे. अशी चर्चा होत  असताना दिनाक 26 जून 2021 रोजी जागेच्या वादातून उपोषण कर्त्यानी प्रशासन अधिकारी याना सोशल मीडियावर अश्लील शिव्या देत एका जातीच्या उल्हेख तू चोर म्हणून करतो या पोलीस प्रशासनाकडून कोणतेही हलचल होताना दिसत नाही. अशी ही चर्चा जनते मध्ये होत आहे. या बाबत बहुजन समाज पेटून उटल्याची बातमी व्हायरल होताना दिसत आहे. अनेक बहुजन समाजातील लोकांकडून निषेध ही नोंदविल्या जात आहे. पोलीस प्रशासनाने व्हिडिओ बाबत दखल न घेतल्यास राज्य भर तहसीलदार कार्यालयावर निषेध नोंदविले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रा कडून मिळाली आहे.

सदर पोलिसांनी व्हिडीओ ची दखल घेतली नाही तर बहुजन संघटने द्वारे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निषेध नोंदवले जातील ॲट्रॉसिटी सारख्या जातीवाचक घटनेवर पोलीस गंभीरपणे दखल घेत नाही याबाबतही शोकांतिका व्यक्त करत सदर व्हिडिओचा निषेध नोंदवत आहेत. सदर अनेक संघटनेने अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे धाव घेतली आहे असे संघटनांचे पदाधिकारी यांनी माहिती दिली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा यांच्या कार्यालयात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दाखल्याबाबत अर्जदारावर पोलीस उपनिरीक्षक प्रीती वटकर याची बेकायदेशिर दंडात्मक कारवाई ! "विरोधात अर्जदाराची राज्य सुरक्षा आयोगाकडे धाव"

सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा यांच्या कार्यालयात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दाखल्याबाबत अर्जदारावर पोलीस उपनिरीक्षक प्रीती वटकर याची बेकायदेशिर दंडात्मक कारवाई !  "विरोधात अर्जदाराची राज्य सुरक्षा आयोगाकडे धाव" 


मुबई : कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात पीडित महिलेने आपल्या सासर विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार राहत्या घरातून बेदखल केल्याप्रकरणी सासु घरात घेत नसल्याने पीडित महिला नसीम साखरकर यांनी मदतीसाठी स्थानिक पोलीस किडवाई नगर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली असता. राहत्या घरातून सुनेला बेदखल केल्या बाबत पिडीत महिला नसीम साखरकर यांनी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक याच्या कडे तक्रार नोंदविण्यास गेले असता पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास मनाई केल्या मुळे पिढीत महिलेने प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव यांच्या निदर्शनास आणून दिले .प्रहार ने दखल घेत तत्काळ महिला बाळ संरक्षण अधिकारी कल्याण यांनी महिलेची तक्रार घेत कल्याण कोर्टात डोमेस्टिक वायलेंस( DV)  विरोधात न्यायालय दावा दाखल केला. व सदर महिलेला राहत्या घरातून बेदखल केल्याप्रकरणी न्यायालयाने पीडित महिलेच्या सासू यांना नोटीस बजावल्या असताना देखील सदर गैरअर्जदार न्यायालयात उपस्थित राहिले नाही. त्यामुळे महिला बालकल्याण यांनी सदर पीडित महिलेला घरातून मारहाण करून बेदखल केल्या प्रकरणी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार भारतीय दंड संहिता कलम 498 अन्वय गुन्हा दाखल करण्यासाठी महिलेच्या सासरी हद्दीतील पोलीस स्टेशन येथे अर्ज देण्यास सांगितले होते. सदर पीडित महिलेने झालेल्या अत्याचाराबाबत अर्ज तयार करून सहायक पोलीस आयुक्त माटुंगा येते अर्ज केला. सदर अर्ज किडवाई स्थानिक पोलिस स्टेशन येथे तपास कामी पाठविण्यात आला असताना  पोलिसांनी अर्जाची कोणतेही तपास न करता सदर महिलेचा गुन्हा नोंद होणार नाही पीडित महिलेच्या अर्जात तथ्य आढळून येत नसल्याने अशी उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा नोंद न करता  महिलेला पोलीस स्टेशन मधून अपमानित करण्यात आले. 

निर्णय : सन 1992 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी प्रथम दर्शनी पहिली खबर वाचून त्या प्रमाणे गुन्हा दाखल करावा. त्या पहिल्या खबरीचा खरे-खोटेपणा पाहू नये. क्रिमिनल प्रोसीजर कोड कलम १५४(१) प्रमाणे गुन्हा दाखल करावा. असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत हरियाणा राज्य= वी = भजन लाल" A.I.R १९९३ S.C ६०४= १९९२ S.S.C [Cr.] ४२६= १९९२ Cr.L.j.५२७ असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कायदेशीर तरतुदी पाहणे आवश्यक असतानादेखील स्थानिक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्ज तपास अधिकारी सर्वोच्च न्यायालयाचे कोणते आदेश  मानत नसल्याचे निष्पन्न होत आहे.

याच्या विरोधात पीडित महिलेने सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा यांची भेट घेतली असता पीडित महिला व त्यांचे मुल अजीम साखरकर सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या निवेदन करत असताना सहाय्यक पोलीस आयुक्त यांना कौटुंबिक हिंसाचार विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आदेश याचं पालन पोलीस करत नसून तक्रारदारास उद्धटपणे वागणूक देतात अशी तक्रार केली असता पोलिसांविरुद्ध तक्रार केल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या दालनात असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रीती हटकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कौटुंबिक हिंसाचाराचे तक्रार घेऊन आलेल्या पीडित महिलेच्या मुलावर अजीम जोहर साखरकर याच्यावर  बेकायदेशीर LAC no- 202/ 2021 अन्वये रुपये 1200 दंड लावून आपल्या पदाचा गैर फायदा घेत पोलिसांना कायदा दाखवतो सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवतो याचा राग मनात ठेवून त्यांनी अजीम साखरकर यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. असता ही घटना सदर तत्काळ पोलीस उपायुक्त विजय पाटील याच्या निदर्शनास आणून दिली सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा यांनी बेकायदेशीर झालेल्या कारवाई ची दखल घेत कारवाई पोलीस उपनिरीक्षक यांनी मनात राग ठेवून पदाचा गैर वापर करून बेकायदेशीर कारवाई केली असल्याचे पिडीत महिलेला सहाय्यक पोलीस आयुक्त याच्या कडून सांगण्यात आले. व सदर झालेली कारवाई बेकायदेशीर पोलीस उपनिरीक्षक प्रीती यांनी केली आहे. भरलेला दंड आपण परत घ्यावा असे सागितले असता सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या सांगण्यावरून पीडित महिला व त्यांचे बोल दंडाची रक्कम देण्यास गेले असता. पोलीस उपनिरीक्षक यांनी कोणताही दंड आपणास परत दिला जाणार नाही आपण ती पावती घेऊन कोर्टात गेले तरी चालेल असे सांगितले. सदर पीडित महिलेने सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे आपणास आदेश आहे झालेली कारवाई बेकायदेशीर आहे आपण त्यांच्या आदेशाचे पालन करावे असे सांगितले असताना  देखील अद्यापही पोलीस उपनिरीक्षक यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त याचे आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. असे पिडीत महिलेने सागितले आहे. 

सदर पोलीस स्टेशन ला कौटुंबिक हिंसाचार गुन्ह्यात तक्रार दाखल न करता पोलीस स्वतःची मनमानी करून तक्रार निकाली काढत असल्यामुळे विवाहित महिलेला न्याय मिळविण्यास अनेक संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये गेलेल्या महिलेला अपमान व गैरवर्तणूक करणाऱ्या आपल्या पदाचा गैरवापर करून अर्जदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी म्हणून पीडित महिलेने महीला आयोग. पोलीस महासंचालक. गृह मंत्रालय. सह  राज्य सुरक्षा आयोग यांच्याकडे धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्देश व आदेश असताना देखील काही पोलिस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या मनमानी कारभार करत कर्तव्यात कसूर करत आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाची घटना घडली असताना देखील पोलीस आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे महिलेने लेखी स्वरूपात महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्याकडे लेखी अर्ज करून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिला यांनी केली आहे. पोलीस उपायुक्त बेकायदेीररित्या झालेल्या कारवाई करणाऱ्या अधिकारी याच्यावर कारवाई न केल्यास पोलीस आयुक्त मुबई  याच्या दालना समोर उपोषण करनार असे माहिती पिडीत महिलेच्या मुलाने दिली आहे.

कोसले येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

कोसले येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !


टिटवाळा, उमेश जाधव -: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच पालकमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख वसंतजी लोणे यांच्या नेतृत्वाखाली कोसले गावचे भाजपा कार्यकर्ते व पळसोली सेवा सोसायटीचे उपचेअरमन लक्ष्मण भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.


यावेळी भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे, ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती कुंदन पाटील, भिवंडी पंचायत माजी उपसभापती प्रकाश भोईर, विष्णु चंदे, तालुका कार्यकारिणी सदस्य तुकाराम कडव, युवासेना जिल्हा सचिव अल्पेश भोईर, संपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण रमेश बांगर, तालुका सहकार अध्यक्ष अनिल चौधरी, युवासेना समन्वयक संतोष सुरोशी, तालुका सचिव नामदेव बुटरे तसेच विभागातील शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी एकमताने काम करावे, जर जुने शिवसैनिक काम करीत नसतील तर नव्या लोकांना काम करण्याची संधी दिली पाहिजे, इतरांपेशा आपलेच जास्त शत्रु आहेत. त्यामुळे संघटना वाढत नाही. यापुढे प्रत्येक शिवसैनिकांनी गावागावामध्ये शिवसेना शाखा वाढवून पक्ष वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. इतर पक्षाचे कार्यकते शिवसेनेत प्रवेश करतात तेव्हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, तसच ननी न कार्यकारणीबाबत परवानगी देण्यात यावी असेही सांगितले. जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना सहकार्याच्या भावनेतून काम करावे असे सांगितले. यावेळी लताताई भोईर याची शिवसेनेच्या पळसोळी महीला उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

नढई ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर यश ! तहसिलदारांच्या आदेशाने परंपरागत रस्ता होणार मोकळा !!

नढई ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर यश ! तहसिलदारांच्या आदेशाने परंपरागत रस्ता होणार  मोकळा !!


मुरबाड- ( मंगल डोंगरे ) : नढई ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भुमी व शेतकऱ्यांच्या शेतीवाडी कडे जाणाऱ्या परंपरागत वहिवाट असलेल्या रस्त्यावर सोसायटी आॕफ पिलार बाॕम्बे यांनी अतिक्रमण करुन संरक्षक भिंतीचे बांधकाम केले होते त्याविरोधात ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, हरकती घेतल्या होत्या, परंतु सोसायटी आॕफ पिलार बाॕम्बे यांनी त्यांना न जुमानता सदर भिंतीचे बांधकाम सुरुच ठेवले होते. अखेर तहसिलदार मुरबाड यांना ग्रामस्थांनी विनंती करुन  लक्ष देण्याची  मागणी केली. 


ग्रामस्थांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय पुराव्यांसह सादर केला  तहसिलदार तथा दंडाधिकारी मुरबाड यांनी दि. २२/ ६ / २०२१ रोजी सोसायटीचे प्रतिनिधी, ग्रामस्थ , सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन काॕंग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, आर.पी.आय. (सेक्यूलरचे) ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंन्द्र चंदने  यांना समवेत  घेऊन स्थळ पाहणी करुन  घेतली.


तसेच दि. २६ जून रोजी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन सोसायटी आॕफ पिलार बाॕम्बे ने केलेले संरक्षक भिंतीचे बांधकाम ७ दिवसांत पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सामनेवाला यांनी भिंतीचे बांधकाम न काढल्यास ग्रामसेवक यांनी ते निष्कासीत करावे व यापुढे भाविष्यात अडथळा निर्माण होईल असे बांधकाम करु नये. अशी ताकीद सामनेवाला यांना तहसिलदार तथा दंडाधिकारी यांनी दिली आहे. तहसिलदार यांनी दिलेल्या निर्णयामुळे गेले अनेक दिवस नढई ग्रामस्थ जो संघर्ष करत होते त्यांच्या लढ्याला अखेर यश आल्याचे दिसून येत आहे.

नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाइलवर डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन मोबाइल ॲप किंवा NVSP वरून नवीन मतदार हे e-EPIC डाउनलोड करू शकतात. संबंधित मतदारांनी ते डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. 
      रायगड जिल्ह्यातील 12 हजार 832 नवीन मतदारांपैकी आतापर्यंत 4 हजार 366 मतदारांनी E-epic डाऊनलोड करून घेतले आहेत. उर्वरित 8 हजार 466 मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 
     ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते. शिवाय e-EPIC हे मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये किंवा digi locker मध्येही ठेवता येते. ते गहाळ किंवा खराब होण्याचा प्रश्न उदभवत नाही. मतदारांना आपले e-EPIC मतदार पोर्टल: 

http://voterportal.eci.gov.in/  किंवा एनव्हीएसपी: https://nvsp.in/ किंवा मतदार 

हेल्पलाईन मोबाइल ॲप Android -https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen  

iOS -  https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004 
याद्वारे डाऊनलोड करता येणार आहे. 

       या सुविधेत आपले e-EPIC मोबाईल / डेस्कटॉपवर डाउनलोड करण्यायोग्य असून डिजिटली मोबाईलवर संग्रहित करता येते. हे स्वतः मुद्रण (print) करण्यायोग्य आहे तसेच प्रतिमा आणि लोकसंख्याशास्त्रासह सुरक्षित QR कोड उपलब्ध आहे.
     e-EPIC डाऊनलोड करण्याची प्रक्रिया Register Login on NVSP/ Voter Portal, EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक नमूद करणे, नोंदणीकृत मोबाईलवर पाठविलेला OTP तपासून घेणे, e-Epic डाउनलोड करणे अशा प्रकारे आहे.
     या सुविधेची कार्यपद्धती एक व्यक्ती एक मोबाईल नंबर असलेले मतदार हे मतदार हेल्पलाईन App किंवा मतदार पोर्टलवर किंवा स्वतःच्या मोबाइल क्रमांकाने नोंदणी करून e-EPIC डाउनलोड करून घेऊ शकतात, अशी आहे.
माहे डिसेंबर 2020 व दि. 15 जानेवारी 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या नवमतदारांनी वर नमूद केलेल्या माध्यमांद्वारे e-Epic आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती निधी चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी केले आहे.

शहापूर तालुक्यावर शोककळा " स्वराज्यरक्षक संभाजी " मधील खाशाबा हरपला, अवघ्या 29व्या वर्षी !

शहापूर तालुक्यावर शोककळा " स्वराज्यरक्षक संभाजी " मधील खाशाबा हरपला, अवघ्या 29व्या वर्षी !


अरुण पाटील, भिवंडी, दिं.29 :
           अभिनेता उज्ज्वल धनगर याचं वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. उज्ज्वलने "स्वराज्यरक्षक संभाजी" मालिकेतून अभिनयाची छाप सोडली होती. वयाच्या 29 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर उज्ज्वलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचारादरम्यान उज्ज्वल याचा मृत्यू झाला. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत उज्ज्वलने खाशाबा ही भूमिका साकारली होती. शिवाय त्याने ‘क्राईम पेट्रोल’, ‘लक्ष्य’ या मालिकांमध्ये देखील काम केलं होतं.  उज्ज्वल अनेक कार्यक्रमांमध्ये निवेदन देखील करायच्या. त्याच्या अकाली जाण्याने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
             शहापूर तालुक्यातील सापगाव या लहानशा ठिकाणाहून आलेला उज्ज्वल अभिनय क्षेत्रात त्याची ओळख निर्माण करत होता.त्याच्या निधनाने शहापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तो सध्या टिटवाळा या ठिकाणी राहत होता. त्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेसह ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबा साकारला होता. त्या मुळे खाशाबा ही त्याची ओळख बनली होती. सध्या तो क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेसाठी शूटिंग करत होता.
           मीडिया अहवालांनुसार, शनिवारी देखील त्याने क्राइम पेट्रोलचे शूटिंग संपवले आणि त्यानंतर रविवारी नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्याबरोबर जेवणंही केले होते.सोमवारी त्याच्या छाती आणि पोटात दूखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला डिस्चार्जही देण्यात आला, मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा एकदा भरती करावं लागलं होतं. यावेळी मात्र तो परतला नाही. उपचारादरम्यान उज्ज्वलने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या सह कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उज्ज्वलसाठी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पतीच्या हृदयविकाराच्या उपचारासाठी धावनाऱ्या बारामतीच्या लता करे आजींचा इंडियन आयडॉल मध्ये गौरव, सोनू कक्करने केली 1 लाखांची मदत !

पतीच्या हृदयविकाराच्या उपचारासाठी धावनाऱ्या 
बारामतीच्या लता करे आजींचा इंडियन आयडॉल मध्ये गौरव, सोनू कक्करने केली 1 लाखांची मदत !


अरुण पाटील, भिवंडी, दिं.19 :
       बारामती येथील लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक पताकावला होता.
           लता करे आजी यांनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकून अवघ्या महाराष्ट्राला आपली दखल घेण्यास भाग पाडले. पण, त्यामागील त्यांचा संघर्ष सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला. नुकताच लता करे यांनी  इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा संघर्ष ऐकून गायिका सोनू कक्कर यांनी 1 लाख 21 हजार  रूपयांची आर्थिक मदत दिली.
       बारामती येथील लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदय विकारावरील उपचारा साठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना त्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले. पतीच्या उपचारासाठी वयाच्या 64 व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक झाले.
         त्यानंतर सलग 3 वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. 'लता भगवान करे, एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
        इंडीयन आयडॉल हा गाण्याच्या रिॲलिटी शोमध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी झाले असून या मध्ये गायिका सोनू कक्कर, हिमेश रेशमिया,अनु मलिक जज्ज म्हणून काम पाहत आहे. तर आदित्य नारायण कार्यक्रमाचे होस्ट म्हणून काम पाहत आहेत.

Monday, 28 June 2021

दिलासादायक : आज सोमवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व मृत्यूंच्या संख्येत मोठी घट !

दिलासादायक : आज सोमवारी राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व मृत्यूंच्या संख्येत मोठी घट !


मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाल्याचे यला मिळाले. रविवारी ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ६ हजार ७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच १० हजार ८१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के एवढे झाले आहे. 

आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० लाख ४३ हजार ५४८ झाली व राज्यात आजपर्यंत एकूण ५८,००,९२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के एवढे झाले असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ८७४ इतकी झाली आहे. 
तर रविवारी १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर सोमवारी १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. 


डॉ. योगेश कापूस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन... ग्रामीण रुग्णालय गोवेलीचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते...

डॉ. योगेश कापूस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन...

ग्रामीण रुग्णालय गोवेलीचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते...


टिटवाळा, उमेश जाधव -: गोवेली ग्रामीण रुग्णालयाती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कापूसकर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्याचे वय ४९ होते. डॉक्टरांच्या जाण्याने गोवेली ग्रामीण रुग्णालय तसेच परीसरात शोककळा पसरली आहे.


डॉ. योगेश कापूसकर गेली सात वर्षा पासून गोवेली ग्रामीण रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पहात होते. त्यांना सोमवारी सकाळी  छातीत दुखायला लागल्याने ते कल्याण येथील मेट्रो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.  उपचार सुरू  असता त्यांची प्राणज्योत मावळली. कापूसकर यांनी दोन वर्षे कोरोना काळात मोठ्या प्रमाणात काम केले. तसेच सध्या सतत कोरोना लसीकरणासाठी ते गोवेली ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होते. परीसरातील लहान थोरांसह सर्वांचे ते लाडके डॉक्टर झाले होते. या घटनेने एक अनुभवी डॉक्टरला रुग्ण व प्रशासन मुकले आहे. डॉक्टरांच्या पश्चात दोन मुली, पत्नी व आई असा परीवार आहे.

मराठी कलावंत उज्वल धनगर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.."हरहुन्नरी कलाकार हरपला"..

मराठी कलावंत उज्वल धनगर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.."हरहुन्नरी कलाकार हरपला"..


टिटवाळा, उमेश जाधव -: मराठी रंगभूमीवर, चित्रपट सृष्टी तसेच टिव्ही वरील मराठी व हिंदी विविध मालिकांमध्ये काम केलेला कलावंत उज्वल धनगर यांचे सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्याचे वय २९  वर्षे होते. या घटनेने मांडा-टिटवाळा शहरासह लगातच्या परीसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


मुळचा शहापूर तालुक्यातील सापगाव येथील रहिवासी असलेला उज्वल धनगर हा गेली १५ वर्षांपासून टिटवाळा येथे रहातो. २००८ पासून फिल्मी दुनियेत पदार्पण करत  अनेक मराठी चित्रपट, हिंदी-मराठी मालिका व नाटकांमध्ये आपल्या कलेचा ठसा उमटवला होता. 


तसेच विविध सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात तो अतिशय उत्कृष्ट असे सुत्रसंचलन करत असे. नेहमी आपल्या अदाकारीने व सुत्रसंचलनाने लोकांना हसविण्याचे काम करत असे. स्वराज्य रक्षक संभाजी राजे या मालिकेतील त्याची खाशाबा ही व्यक्ती रेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. अशा प्रकारे अनेक मालिकांमध्ये त्याने अतिशय उत्कृष्ट भूमिका केलेल्या आहेत. नुकताच तो शनिवारी सोनी टिव्ही वरील क्राईम पेट्रोलींग या हिंदी मालिकेचे सुटींग संपून घरी आला होता. रवीवारी स्थानिक नगरसेवक संतोष तरे व समाजसेवक महेश ऐगडे यांच्या सोबत रात्री जेवण केले. 


सोमवारी सकाळी सहा वाजता अचानक उज्वलला छातीत व पोटात दुखायला लागले म्हणून तो टिटवाळा येथील महागणपती रूग्णालयात गेला. डॉक्टरांशी बोलून ॲसिडिटी झाल्यासारखे वाटते म्हणून गोळी घेतली व फेरफटका मारून घरी आला. नंतर पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून महागणपती रूग्णालयात आई-वडीलां सोबत गेला. डाॅक्टरांनी इसीजी लावली असता तो मृत झाला असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सर्वांना हसवणार उज्वल आज रडवून गेला. एक हरहुन्नरी कलावंत हरपला असल्याची खंत टिटवाळाकर व्यक्त करत आहेत. त्याच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक व सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

कल्याण-मुरबाड महामार्गावर रायते गावाजवळ रिक्षा व इनोवा कार मध्ये अपघात..! "अपघातात कारचालक गंभीर जखमी"

कल्याण-मुरबाड महामार्गावर रायते गावाजवळ रिक्षा व इनोवा कार मध्ये अपघात..! "अपघातात कारचालक गंभीर जखमी"

..इनोवा कार व रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान..


टिटवाळा, उमेश जाधव -: राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याण-मुरबाड दरम्यान रायते गावाजवळ मध्ये भीषण अपघात झाला असून यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी गोवेली रुग्णालयातून उल्हासनगर येथील सेंटर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


शनिवार रात्री आठ वाजताच्या सुमारास कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग ६१ वर कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ रिक्षा क्रमांक एम एच ०५ डीओ ७२५८ व इनोवा क्रमांक एम एच ०४ डीई ६३९६ या दोन वहानांत भिषण अपघात झालाय. 


रिक्षा रायते गावातील असून इनवो कार ही मुंब्रा येथील आहे. यात रायते गावातील रिक्षा चालक नरेश चाहू सुरोशी हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वहानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टिटवाळा पोलिस ठाण्याच्या गोवेली चौकीचे पोलिस कर्मचारी विकास कांबळे व इतर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाँ योगेश कापूसकर यांचे हद् य विकाराच्या झटक्याने निधन, ग्रामीण भागावर शोककळा !

गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाँ योगेश कापूसकर यांचे हद् य विकाराच्या झटक्याने निधन, ग्रामीण भागावर शोककळा ! 


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण जनतेचे, डॉक्टर, सर्वसामान्य जनतेची आपुलकीने विचारपूस करुन त्यांचेवर औषध उपचार करणारा' आपला माणूस' अशी ज्यांची ओळख निर्माण झाली होती, असे गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाँ योगेश कापूसकर यांचे हद् य विकाराच्या तीवृ झटक्याने आज सकाळी नुकतेच निधन झाले आहे,त्यामुळे ग्रामीण भागावर शोककळा पसरली आहे. 


कल्याण तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी १९९२च्या आसपास ग्रामीण रुग्णालय सुरु झाले,या रुग्णालयामुळे जवळपास ७०/८०गावातील ग्रामीणजनतेला आरोग्यसुविधा मिळू लागलीह होती, डाँ रोहिदास वाघमारे, केम्पि पाटील, इंगळे, असे दिग्गज वैद्यकिय अधिका-यांनी येथे सेवा बजावली, अंत्यत अडचणीच्या काळात येथे डाँ योगेश कापूसकर यांची गोवेली रुग्णालयात वैद्यकिय अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली, लाईट पाणी, कर्मचारी, रुग्णवाहिका, अशा अनंत अडचणी असतांना, त्यांनी आपल्या मनमिळाऊ,आणि प्रेमळ स्वभावाने अनेक प्रश्न सोडवले, कोरोनाच्या संकटात अंत्यत धेर्याने प्रशासन सांभाळून कोरोना पेंशटवर उपचार केले, त्यांच्या प्रयत्नाने वरप येथे कोरोना कोवीड सेंटर सुरू झाले. कोरोना कोविड लसीकरण मोहिमेच्या अंत्यत गोंधळाच्या परिस्थितीत गोवेली ग्रामीण रुग्णालयात मात्र लसीकरण सुरळीत सुरु होते याचे सर्वश्रेय डाँ कापूसकर यांच्या नियोजनालाच जाते, अशा अंत्यत गुणी व जनतेची नाडी बरोबर ओळखलेल्या डाँ योगेश कापूसकर यांचे आज सकाळी हद् याच्या तीवृ झटक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात आई वडिल पत्नी, दोन मुली व भाऊ असा मोठा परिवार असून म्हारळ गावातून त्यांच्या अंत् यात्रेला मोठा जनसमूदाय उपस्थित होता.

भिवंडीत वेश्यागमन करून बाहेर आलेल्या तरुणाने केला हवेत गोळीबार,जमावाने दगडफेक करताच काढला पळ !

भिवंडीत वेश्यागमन करून बाहेर आलेल्या तरुणाने केला हवेत गोळीबार,जमावाने  दगडफेक करताच काढला पळ !


अरुण पाटील, भिवंडी, दिं.28 :
       शहरातील बदनाम गल्ली येथे देह व्यापार करणाऱ्या हनुमान टेकडी या भागात वेश्या गमन करून बाहेर आलेल्या दोघा व्यक्तीं पैकी एकाने हवेत गोळीबार करून दहशत माजवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे फरार झालेआहे.
         मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान टेकडी परिसरात वेश्या गमन करण्यासाठी दोन तरुण आले होते. एका कारमधून आलेल्या दोघा व्यक्तींनी एक महिलेसोबत वेश्यागमन केलं. त्यानंतर खोली बाहेर पडल्यावर कोणत्या तरी कारणावरून त्या दोघानं पैकी एकाने गल्लीत उभे  राहत आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. सदरची व्यक्ती रस्त्यावर येऊन आपल्या कारजवळ आली असता जमलेल्या जमावाने त्यांच्या दिशेने दगडफेक केली असता त्यांनी तेथून पळ काढला. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुपतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न फक्त (रू.५५,५५५/- ) रूपयाचा धनादेश सुपुर्द !

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुपतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न फक्त (रू.५५,५५५/- ) रूपयाचा धनादेश सुपुर्द !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
          आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुपतर्फे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न फक्त (रू.५५,५५५/- ) रूपयाचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव खासदार श्री. विनायक राऊतसाहेब, शिवसेना सचिव श्री. अनिल देसाईसाहेब उपस्थित होते. तसेच ग्रूपचे संस्थापक,संचालक श्री.संतोष पाटील, संचालक श्री.सुर्यकांत कडू, अध्यक्ष श्री.रविंद्र जाधव, उपाध्यक्ष श्री.अवि राऊत व श्री.यशवंत खोपकर, सेक्रेटरी श्री.दिलीप गावडे, उपसेक्रेटरी श्री.वसंत सोनावणे व श्री.अनिल कांबळे, खजिनदार श्री.गणेश काळे, उपखजिनदार श्री.दत्तात्रेय घुले व श्री.बाळासाहेब निकम,कार्यालय प्रमुख श्री.रणजीत नरवणकर, उपकार्यालय प्रमुख श्री.प्रविण कोरपे व श्री.दिपक चौधरी, सल्लागार सौ.समीता बागकर, सौ.वासंती गोताड, श्री.अशोक कोळंबकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप !

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
          शिवसेना ५५ वा वर्धापनदिनाचे औचित्य साधून आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप करण्यात आले तसेच आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे सभासद श्री.लवेश म्हात्रे यांना ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना या व्हाटसअप ग्रुपतर्फे एकत्र आणण्याचे काम केले ते या ग्रूपचे संस्थापक, संचालक श्री.संतोष पाटील यांचा देखील ग्रूप सदस्यांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रूपमधील सुर्यकांत कडू, रविंद्र जाधव, दिलीप गावडे, यशवंत खोपकर, वसंत सोनावणे, अनील कांबळे, गणेश काळे, दत्तात्रेय घुले, प्रविण कोरपे, अशोक कोळंबकर, हेमंत पाटील, दिलीप पाटील, प्रविण कुडेकर, जितेंद्र जैन, आप्पा कुलकर्णी यांच्यासह सदस्य व सभासद  तसेच शिव सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे उपविभाग अध्यक्ष पदी संदेश मोरे यांची निवड !

मनसे उपविभाग अध्यक्ष पदी संदेश मोरे यांची निवड !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

           महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेची पूर्व तयारी सुरू केली असून अनेक प्रभागात सक्रिय कार्यकर्त्यांना पदावर बढती देऊन पक्ष बळकट करण्याची संधी दिली आहे. घाटकोपर विधानसभा क्षेत्रात ही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश पांडुरंग मोरे यांची प्रभाग क्रमांक १२६ आणि १२७ या प्रभागाकरिता उपविभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १२६ व १२७ च्या उपविभाग अध्यक्ष पदी संदेश पांडुरंग मोरे यांची नियुक्ती करून राज ठाकरे यांनी नुकतेच कृष्णकुंज येथे संदेश मोरे यांना नियुक्ती पत्र देऊन मिळालेल्या संधीचे सोने करून पक्ष वाढवाल अशी आशा व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्याची उपविभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संदेश पांडुरंग मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा आणि विरार येथे महिलांच्या मोफक्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !

संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा आणि विरार येथे महिलांच्या मोफक्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !


नालासोपारा-विरार - (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) :

          नालासोपारा- विरार येथे संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य आणि महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमात ३१५ महिलांनी सहभाग घेतला. तर गेल्या दोन वर्षान पासून संतोष अगबुल प्रतिष्ठाण कोरोना काळात  अहोरात्र प्रत्येक नागरिकांना विविध सेवा पुरवत आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असताना कोरोना रुग्णांना प्लाझ्मा सुवीधा सुद्धा पुरणव्यात येत आहे. आजच्या महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणी साठी विविध ठिकाणा वरून महिलांनी सहभाग घेतला तर मुलुंड येथील महिलांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला.  प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज प्रत्येक सभासद अगदी उत्सुकतेने आपले काम आणि जबाबदारी पार पाडत असताना सर्वाना पाहायला मिळाले. तर सर्व उपस्थित मान्यवर आणि हिमोग्लोबिन शिबिरात सहभागी झालेल्या भगिनींचे आणि या आयोजित शिबीर सहकार्यास सहभाग देणारे साथीया ब्लड बँकचे सर्व डॉ. आणि सहकाऱ्यांचे प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांनी आभार मानले.

मुजोर संस्थाचालकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान ! 'फी साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई व्हावी' -- दिव्या ढोले

मुजोर संस्थाचालकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान !

'फी साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई व्हावी' -- दिव्या ढोले
 

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
         राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या समोर काही मुजोर शिक्षणसंस्था आणि संस्थाचालकांमुळे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोनामुळे खालावलेली आर्थिक किंवा इतर कारणांमुळे ज्या पाल्यांचे शालेय शुल्क बाकी आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी मागील वर्षाची फी भरलेशिवाय आवश्यक असणारी कागदपत्रे देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक तक्रारी  राज्यात उघडकीस आल्या आहेत. मागील दीड वर्षापासून राज्यात थैमान घातलेल्या कोरोनामुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी शिथील करण्यात आलेल्या नियमांमुळे सगळी परिस्थिती पुन्हा एकदा सुरळीत होऊ लागली आहे अशी चिन्ह दिसत आहेत. काही संस्थांमध्ये शालेय शुल्क जमा न केल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देणे किंवा आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यात टाळाटाळ करणे असे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा खाजगी संस्थांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी पालक वर्ग करताना दिसत आहेत.त्यामुळे याबत भाजपच्या महाराष्ट्र सचिव दिव्या ढोले यांनी आवाज उठवल्याने सरकारमधील मंत्री आणि प्रशासन जागे झाले. इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना जर वरील अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांना राज्यातील शासकीय/महापालिका-नगरपालिका अंतर्गत शाळा किंवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा असे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले. मात्र देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे राज्य सरकारने ऊशीरा घेतलेल्या या निर्णयावर समाधान व्यक्त करतानाच राज्यातील पालकांनी यावर काही आक्षेपही नोंदवले आहेत.

"मागील वर्षीपासुन सुरु असलेल्या लॉक डाऊनमुळे आम्हाला आधीच अनेक आर्थिक संकटांंना तोंड द्यावे लागते आहे. त्यातच खासगी शाळांनी विद्यार्थ्यांकडे बाकी राहिलेले शालेय शुल्क जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची अशा प्रकारे अडवणूक करणे चूक आहे असे संतप्त सवाल पालकांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना भाजपच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले म्हणाल्या की, " खासगी शाळांनी प्रलंबित राहिलेल्या शालेय शुल्काबाबत संयम आणि समजुतीची भुमिका घ्यावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते, मात्र काही मुजोर खासगी शाळा पुर्णपणे दुर्लक्ष करत आपला असंवेदनशीलपणा दाखवून देत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसोबतच आता डेल्टा प्लस या नव्या व्हायरसचा धोका दिवसागणिक बळावतो आहे, त्यामुळे शाळा सुरु न करता ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करावा लागणार आहे. मात्र जरा काही शाळा अशाप्रकारे विद्यार्थ्यांना अडचणीत आणू पाहत असतील तर ते नक्कीच खपवून घेतले जाणार नाही. सरकारने ९ वी, १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निर्णय घेतला आहे, मात्र त्या निर्णयातुन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यातून का डावलले आहे ? " असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

          "खासगी शाळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना घरातच बसवणार असतील तर राज्य सरकारने अंतर शिक्षण उपक्रमाअंतर्गत राज्य शिक्षण मंडळाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षनाचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा. वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर अशा मुजोर शाळा आणि संस्था चालकांची दादागिरी मोडून काढली पाहिजे" असे दिव्या ढोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Sunday, 27 June 2021

शिवकन्या प्रतिष्ठान व आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरजूंना कपड्यांचे वाटप !

शिवकन्या प्रतिष्ठान व आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरजूंना कपड्यांचे वाटप !


त्रंबकेश्वर, उमेश जाधव -: समाज सेवेचा वसा घेतलेल्या शिवकन्या प्रतिष्ठान व आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार  दि. २६ जून रोजी मु. ढोलेवडी ता. त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे अनेक गरजू ग्रामस्थांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. 


आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्रचे कल्याण तालुका संपर्क प्रमुख ओमकार कोळी, आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या रणरागिणी कक्ष पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.माही चौधरी, आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्रचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष कु. जिज्ञासा चौधरी, आरंभ प्रतिष्ठान मुरबाड ग्रामीण संपर्क प्रमुख देवेश चौधरी या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी पालघर व नाशिक जिल्ह्यामध्ये आरंभ प्रतिष्ठानच्या कार्याला मोठ्या उत्साहात व जोरित सुरुवात झाली आहे. तसेच वाडा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. 


यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती : "आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या रणरागिणी कक्ष पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.माही चौधरी" यांनी दिली.

चोपडा येथे "रोटरी भवन" चे भूमिपूजन संपन्न "चोपडा रोटरीचे पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न साकार होणार" : मा.अरुणभाई गुजराथी

चोपडा येथे "रोटरी भवन" चे भूमिपूजन संपन्न 
"चोपडा रोटरीचे पन्नास वर्षापूर्वीचे स्वप्न साकार होणार" : मा.अरुणभाई गुजराथी


चोपडा वार्ताहर : रोटरी क्लब चोपडा हे आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. चोपडा रोटरी क्लब गेल्या पन्नास वर्षापासून अविरत निस्वार्थ सेवा करीत आली आहे. दिनांक २४ जून २०२१ रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल मा. शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लब चोपडा ला सदिच्छा भेट दिली असता त्याचे औचित्य साधून  त्यांच्या शुभहस्ते रोटरी क्लब चोपडा व चोपडा रोटरी सेवा संस्था यांच्या रोटरी भवन चे भूमिपूजन करण्यात आले. रोटरी भवनासाठी चोपडा नगरपरिषदेने जवळपास दहा हजार स्क्वेअर फुट एवढी जागा शिरपूर रोड वरील हरेश्वर कॉलनी येथे उपलब्ध करून दिली आहे. त्याचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कळविले आहे .
आदरणीय शब्बीर शाकीर यांनी सपत्नीक भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या भाषणामध्ये रोटरी क्लब चोपडा चे पन्नास वर्षापूर्वी चे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तर प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी चोपड्याला गौरवशाली अशी परंपरा असल्याचे सांगितले तसेच रोटरी क्लब चोपडा ने केलेल्या कार्याचे कौतुकही केले.
मा. शब्बीर शाकीर यांचा सत्कार चोपडा रोटरी सेवा संस्थेचे अध्यक्ष अशिषभाई गुजराथी यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी यांचा सत्कार रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केला.
मा. सौ मनीषाताई चौधरी- नगराध्यक्ष, चोपडा नगरपरिषद चोपडा, मा. टॉबी भगवागर- डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, कॉन्फरन्स चेअर मा. अतुल शाह, गटनेते मा. जीवनभाऊ चौधरी, सह प्रांतपाल मा. योगेश भोळे, सुवर्ण महोत्सवी वर्षाचे  रोटरी क्लब चोपडा चे प्रेसिडेंट नितीन अहिरराव, चोपडा रोटरी सेवा संस्था चे अध्यक्ष अशिष गुजराथी, रोटरी क्लब चोपडा सेक्रेटरी ॲड. रुपेश पाटील, चोपडा रोटरी सेवा संस्था उपाध्यक्ष एम डब्ल्यू पाटील, सेक्रेटरी ॲड. अशोक जैन, सौ पुनम गुजराती, प्रफुल्ल गुजराथी, पंकज बोरोले, रमेश वाघजाळे, व्ही एस पाटील, डॉक्टर शेखर वारके, धीरेंद्र जैन, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, प्रदीप पाटील, अनिल अग्रवाल, ॲड. अशोक जैन, प्रसन्ना गुजराथी, दीपक लोहाणा व इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार ! रिकव्हरी रेट ९५.९१ तर मृत्यूदर २ टक्के !

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार ! रिकव्हरी रेट ९५.९१ तर मृत्यूदर २ टक्के !

मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून मृत्यूंच्या संख्येत मात्र घट झाली आहे. याशिवाय, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांच्यावर आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित आढळले असून १४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.० टक्के एवढा आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २१ हजार २८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २२ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज ८ हजार ५६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत ५७ लाख ९० हजार ११३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.९१ टक्के एवढं झालं आहे.

संकष्टी चतुर्थीलाही भाविकांनी घेतले बंद दाराडून बाप्पाचे दर्शन.. "भाविकांत नाराजी"... रिक्षा चालक आणि पुजा साहित्य विक्रेते शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत

संकष्टी चतुर्थीलाही भाविकांनी घेतले बंद दाराडून बाप्पाचे दर्शन..  "भाविकांत  नाराजी"... 

रिक्षा चालक आणि पुजा साहित्य विक्रेते शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत 


टिटवाळा, उमेश जाधव -: गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मंदिर कधी उघडणार असा सवाल रवीवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांनी सरकारला केला आहे. 

राज्यभरात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक कडक निर्बंध लावण्यात आले होते. रुग्णांची आकडेवारी आटोक्यात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी हे निर्बंध काही नियमावली ठरवून शिथील करण्यात आले. बियर बार, वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारूचे दुकाने हॉटेल, लग्नाचे हॉल, सलून पार्लर आदींना सरकारने काही नियमावली ठरवून  उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र मंदिरे उघडण्यात बंदी ठेवण्यात आली आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारे म्हणून मोठी ख्याती पावलेले सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा येथे आहे. हे मंदिर गेल्या दोन वर्षात केवळ तीन महिने सुरू होते.
मात्र मंदिरांच्या बाबतीत अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे रविवारी   टिटवाळा येथे संकष्टी चतुर्थीला आलेल्या भक्तगणांमध्ये नाराजीचा सूर होता. येथील श्री सिद्धिविनायक मंदिर हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेरील बंद दरवाजातूनच बाप्पाचे दर्शन घेऊन काहीशा नाराजीने माघारी परतावे लागल्याचे पाह्यला मिळाले.‌ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी होणार नाहीत असे कार्यक्रम टाळावेत असे जनतेला आव्हान केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत.  संकष्ट चतुर्थीला दरवेळी टिटवाळा येथील गणेश मंदिरात  मोठ्या प्रमाणात भाविक-भक्तांची गर्दी उसळत असते. परंतु शासनाच्या आदेशामुळे  टिटवाळा गणपती मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आले. मुख दर्शन घेण्यासाठी  काही तुरळ भक्तगण टिटवाळ्यात दाखल झाले. पण त्यांना नाराज होऊन बंद दरवाज्यातून दर्शन घेऊन परतावे लागले. तसेच येथील पुजा साहित्ये विक्रेत्ये व रिक्षा वहातूक यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. 

 “संकष्ट चतुर्थी असूनही आज मंदिर बंद आहे. हे एक भाविक म्हणून त्रासदायक आहे, पण लवकरच हे संकट दूर होईल. हा बाप्पा दुःखहर्ता आहे. आलेले संकट लवकरच टळेल ” -  संजय पारेकर, भाविक

वटपौर्णिमेच्या पुर्व संधेला सावित्रीला आपले तोडलेले घर परत दिले बनवून.. आदिवासी विधवा महिलेचे घर लोकसहभागातून राहिले उभे..

वटपौर्णिमेच्या पुर्व संधेला सावित्रीला आपले तोडलेले घर परत दिले बनवून..

आदिवासी विधवा महिलेचे घर लोकसहभागातून राहिले उभे..


टिटवाळा, उमेश जाधव -: चवरे-म्हसरोंडी येथील वनविभागाच्या कारवाईत जमीनदोस्त केलेले सावित्री बबन फसाळे या कातकरी विधवा महिलेचे घर श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी बांधून पूर्ण करून दिले. भर पावसात सदर घराचे काम पूर्ण केले. 


वनविभागाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भाऊ यांनी ठरवल्या प्रमाणे शुक्रवार दिनांक २५ जून रोजी कल्याण तालुक्यातील असंख्य महिला कार्यकर्त्यां घर बांधणीसाठी उभ्या राहिल्या व सावित्री बाईच घर एका दिवसात उभ करून दिले.


भर पावसात आपला संसार उघड्यावर आलेल्या सावित्रीच्या डोळ्यात या वेळी आपलं घर परत उभ राहील म्हणून आनंदश्रू पहायला मिळाले. संघटनेच्या सभासद यांनी श्रमदानंतून हे घर पूर्ण करून दिले. यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष विष्णू वाघे, तालुका कातकरी घटक प्रमुख वासुदेव वाघे, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे, जिजा वाघे, धाकळू शेळके, लक्ष्मी वाघे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर इंदिरानगर व सलमान चाळ वासियांच्या पाण्याचा प्रश्न सुटला : 'आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन कामाचा शुभारंभ संपन्न'!

अखेर इंदिरानगर व सलमान चाळ वासियांच्या पाण्याचा प्रश्न सुटला : 'आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन कामाचा शुभारंभ संपन्न'!


टिटवाळा, उमेश जाधव -: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असणारे मांडा- टिटवाळा येथील इंदिरानगर व सलमान चाल या ठिकाणच्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.‌ याबाबत  रहिवाशांनी स्थानिक आमदार यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. आमदार भोईर यांनी कुठल्या बद्दल विचार न करता आपल्या आमदार निधीतून दहा लाखांचा निधी पाईपलाईनसाठी दिला असून, रविवारी  यांचा भूमिपूजन केला. 


गेली चार ते पाच वर्षापासून इंदिरानगर व सलमान खान येथील हजारो रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असून देखील या रहिवाशांना  पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.‌ 


याबाबत रहिवाशांनी शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख किशोर सुक्ला, नगरसेवक संतोष तरे व स्थानिक शिवसेना कार्यकर्ते दादा खिस्मतराव, ज्ञानेश्वर मढवी, विजय देशेकर, जयेश वाणी यांची भेट घेतली. त्यांनी आमदार भोईर यांची भेट घेऊन इंदिरानगर व सलमान चाळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला. आमदार भोईर यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता  इंदिरानगर येथील पाईप लाईन  कामासाठी दहा लाखाचा व सलमान चाळ मांडा पश्चिम करीता आठ लाखांचा आमदार निधी देण्याचे आश्वासन दिले. रवीवारी याच  पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख किशोर सुक्ला, नगरसेवक संतोष तरे, माजी नगरसेवक मयूर पाटील, विभाग प्रमुख दादा खिस्मतराव, युवा सेनेचे जयेश वाणी, ग्राहक संरक्षणचे विजय देशेकर, उपविभागीय प्रमुख दिलीप पातकर, शाखा प्रमुख ज्ञानेश्वर मढवी, नरेश पाटील, बाळा भोईर, प्रल्हाद पाटील, युवा सेना कल्याण उपशहर प्रमुख प्रविण भोईर, उपविभाग प्रमुख रेवणनाथ पाटील, बिलाल खान, जक्की खलीफा आदींसह मान्यवरांसह कार्यकर्ते व रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई मधील "ताज हॉटेल'' मध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल कराडमधील मुलाने केल्याचे उघड.!

मुंबई मधील "ताज हॉटेल'' मध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल कराडमधील मुलाने केल्याचे उघड.!


अरुण पाटील, भिवंडी, दिं.27 : काही दिवसांपूर्वी मुंबईतील मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा मेल आला होता. या संदर्भात पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मुंबईतील कुलाबा परिसरातील " ताज हॉटेल " मध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल आला होता. दरम्यान, हा कॉल एका 14 वर्षीय लहान मुलाने केला असल्याचे माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

         ताज हॉटेलच्या कार्यालयात सदरचा निनावी कॉल आला होता. या कॉलद्वारे " ताज हॉटेल "मध्ये बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ यासंदर्भात मुंबई पोलिसांना याची सूचना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जाऊन तपासणी केली. सदरचा हा कॉल बनावट असल्याचे समोर आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ताज हॉटेलची तपासणी केली असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बॉम्ब आढळून आलेला नाही.

          " ताज "या पंच तारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन आल्यानंतर या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. या मध्ये आणखी एक खुलासा होत आहे. ताजच्या मॅनेजमेंटला आलेला कॉल हा एका लहान मुलाने केला होता, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदर या कॉलद्वारे ताज हॉटेलमध्ये 2 बंदुकधारी व्यक्ती घुसणार असून, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती.

         " ताज हॉटेल "ला धमकीचा कॉल केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील कराड येथील 9 वीत शिकणाऱ्या मुलाची व त्याच्या वडिलांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अल्पवयीन मुलाने ताज हॉटेलला कॉल करून या हॉटेलमध्ये दोन बंदूकधारी व्यक्ती शिरणार असून, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी दिली होती. मात्र, या गोष्टीची कल्पना या मुलाच्या वडिलांना नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. सदरच्या या अल्पवयीन मुलाने फोन करून, ताज हॉटेलच्या मागच्या गेटवर सुरक्षा वाढवा, कारण 2 व्यक्ती मास्क घालून बंदूक घेऊन ताजमध्ये घुसणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी याचा तपास करत सदरच्या अल्पवयीन मुलाला शोधून काढले असून पुढील चौकशी सुरू आहे.

माणगांव तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्ष पदी संतोष सुतार तर उपाध्यक्ष पदी विश्वास गायकवाड यांची सर्वानुमते निवड ! नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत !!

माणगांव तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्ष पदी संतोष सुतार तर उपाध्यक्ष पदी विश्वास गायकवाड यांची सर्वानुमते निवड  ! नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत  !! 


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : रविवार दिनांक २७ जुन २०२१ रोजी माणगांव विश्राम गृह येथे माणगांव तालुका प्रेस क्लबच्या झालेल्या मिटिंग मध्ये माणगांव तालुका प्रेस क्लबची नुतन कार्यकारिणी प्रस्थापित करण्यात आली. सदर मिटिंग मध्ये सर्वानुमते माणगांव तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी संतोष सुतार तर उपाध्यक्ष पदी विश्वास गायकवाड व सौ. आरती म्हामुणकर, कार्याध्यक्ष पदी गौतम जाधव, सेक्रेटरी पदी हरेश मोरे, खजिनदार पदी सचिन वनारसे,प्रमुख संघटक पदी पदमाकर उभारे, प्रमुख  सल्लागार पदी उत्तम तांबे, कायदेशीर सल्लागार पदी डॉ.संजयजी सोनावाणे, प्रमुख सल्लागार पदी विनोद सापळे, सदस्य वैभव टेंबे, योगेश ढेपे आणि पूनम धुमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
     कोविड १९ च्या पार्श्वभूमीवरील शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून माणगांव तालुका प्रेस क्लब आयोजित सदर मिटिंग च्या सुरुवातीला कोविड १९ या आजाराने पत्रकारिता व अन्य क्षेत्रात काम करत असताना निधन झालेल्यांना माणगांव तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून अत्यंत दुःखद अंत करणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
      या नंतर माणगांव तालुका प्रेस क्लबची नुतन कार्यकारिणी प्रस्थापित करण्यात आली. नुतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांना त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर मावळत्या कमिटीची सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या मिटिंग मध्ये रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांवर प्रेस क्लब ची ध्येय, धोरणे आणि सामाजिक उपक्रम, तसेच रायगड प्रेस क्लब संचालित आदर्श शेतकरी पुरस्कार शेताच्या बांधावर या पुरस्कारासाठी माणगांव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी निवड करण्या संदर्भात नियोजन करण्यात आले. या नंतर सदर सभेची तथा मिटिंग ची सांगता करण्यात आली.

Saturday, 26 June 2021

नवी कोरोनाबाधित रुग्णसंख्या दहा हजाराच्या आसपास ! दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू ; मृत्यूदर २ टक्के !

नवी कोरोनाबाधित रुग्णसंख्या दहा हजाराच्या आसपास ! दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू ; मृत्यूदर २ टक्के !



मुंबई : महाराष्ट्रात आज (26 जून) दिवसभरात कोरोनाचे 9812 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 10 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रशासनाची चिंता कायम आहे. दरम्यान, दिवसभरात 179 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,20,881 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत.

गेल्या 24 तासात राज्यात 9,812 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

राज्यात सध्या 1 लाख 21 हजार 251 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 8,752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,81,551 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 179 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.0 टक्के एवढा आहे.

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद ! तब्बल ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस !!

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद ! तब्बल ७ लाख २६ हजार  ५८८ नागरिकांना लस !!



मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला असतानाच देशात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लस आणि भारत बायोटेकची लस मोठ्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच काही भागांमध्ये रशियाच्या स्पुतनिक-वी या लसीला देखील देण्यास सुरुवात झाली आहे. देशात खूप वेगाने लसीकरण चालू आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने आज लसीकरणाच्या बाबतीत नवीन विक्रम रचला आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र रोज नवीन विक्रम रचत असल्यानं सर्वच स्तरातून महाराष्ट्राची वाह वाह होत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने...