संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा आणि विरार येथे महिलांच्या मोफक्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !
नालासोपारा-विरार - (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) :
नालासोपारा- विरार येथे संतोष अगबुल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य आणि महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमात ३१५ महिलांनी सहभाग घेतला. तर गेल्या दोन वर्षान पासून संतोष अगबुल प्रतिष्ठाण कोरोना काळात अहोरात्र प्रत्येक नागरिकांना विविध सेवा पुरवत आहेत. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असताना कोरोना रुग्णांना प्लाझ्मा सुवीधा सुद्धा पुरणव्यात येत आहे. आजच्या महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणी साठी विविध ठिकाणा वरून महिलांनी सहभाग घेतला तर मुलुंड येथील महिलांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला. प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज प्रत्येक सभासद अगदी उत्सुकतेने आपले काम आणि जबाबदारी पार पाडत असताना सर्वाना पाहायला मिळाले. तर सर्व उपस्थित मान्यवर आणि हिमोग्लोबिन शिबिरात सहभागी झालेल्या भगिनींचे आणि या आयोजित शिबीर सहकार्यास सहभाग देणारे साथीया ब्लड बँकचे सर्व डॉ. आणि सहकाऱ्यांचे प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. संतोषजी अगबुल यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment