डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी उत्साहात !!
*डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये* आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
या ग्रंथ दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. हातात पवित्र ग्रंथ, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंग आणि विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला. शाळेचा परिसर जणू पंढरपूरच्या वारीचे स्वरूप धारण करून गेला.
शाळेतील सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसमवेत ग्रंथ दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला. पालकांनीदेखील विद्यार्थ्यांना वारकरी वेशभूषेत तसेच आकर्षक तुळशी वृंदावनासह पाठवून उपक्रमाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना संतपरंपरा, महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ग्रंथांचे महत्त्व, भक्ती, संस्कार, शिस्त आणि एकात्मतेचे मूल्य यांची प्रेरणा देण्यात आली.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा भक्तिमय व संस्कारमय सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.
सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment