Monday, 31 August 2026

पत्रकाराला कथित धमकीप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया आक्रमक; अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट !

पत्रकाराला कथित धमकीप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया आक्रमक; अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट !

*संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन*

*ठाणे, दि. ३१ ऑगस्ट २०२६*

डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामगाराच्या मृत्यूशी संबंधित गंभीर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारासोबत कथितरित्या अरेरावी, शिवीगाळ तसेच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून व्हॉईस ऑफ मीडियाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकरणी आज सोमवारी दुपारी व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची स्पष्ट भूमिका मांडली. पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकारी संजय जाधव यांनी दिल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

*काय आहे प्रकरण?*

कामगाराच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी आणि तपासातील महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळावी या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य तथा ‘राष्ट्रभूमी भरारी’चे संपादक गौतम गवई हे रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते.

तपासाबाबत माहिती घेण्यासाठी व काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधित तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांनी कथितरित्या अरेरावी व दादागिरीची भाषा वापरून शिवीगाळ केली, तसेच पत्रकाराविरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पत्रकारांशी अशा प्रकारे गैरवर्तन होणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी गंभीर बाब असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाने केली आहे.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रिमो गौतम वाघ, महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुरेश जगताप, जगन्नाथ जावळे, संतोष क्षेत्रे, रजनीकांत गायकवाड, ताराचंद तायडे, प्रशांत ढोणे, राजू दोंदे, देवानंद पाढेन, राजदीप जगताप यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते.

या प्रकरणी संघटनेच्या भूमिकेला पाठिंबा देत उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांचे व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन !

*दुःखद निधन*

*अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन*

*अमरावती, दि. 30 ऑगस्ट 2026*

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे वयाच्या 92 व्या वर्षी रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने गिरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व गिरी परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

*शोकाकुल - गिरी परिवार, अमरावती*

Sunday, 30 August 2026

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10/ई प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट; सहा महिने तक्रार करूनही कारवाई नाही !!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10/ई प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट; सहा महिने तक्रार करूनही कारवाई नाही !!

*डोंबिवली, प्रतिनिधी :* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 10/ई प्रभागातील अनधिकृत बांधकामे आणि विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करत नसल्याने आज दिनांक ३१ ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

*प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?*
मनोज गिरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10/ई प्रभागात सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथावर अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका विभागाकडे लेखी तक्रारी आणि पाठपुरावा करूनही पारदर्शक कारवाई झालेली नाही.

*मनोज गिरी यांच्या प्रमुख मागण्या :*
1. तक्रारीत नमूद केलेल्या सर्व ठिकाणांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करावा.
2. अनधिकृत बांधकामांच्या मंजूर नकाशे आणि परवानग्यांची तपासणी करावी.
3. विनापरवाना फेरीवाल्यांवर नियमानुसार कारवाई करून सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवावे.
4. गेल्या सहा महिन्यात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल (Action Taken Report) द्यावा.
5. वेळेत कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी.

*वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची नोंदही घेतली नाही - आरोप*
उपोषणाचा अर्ज केल्यानंतर 10/ई प्रभागातून तीन वेळा "उपोषण थांबवून सहकार्य करावे" असे पत्र आले. मात्र, चौथ्यांदा विनंती केली असता वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची साधी नोंदही घेतली नसल्याचा आरोप गिरी यांनी केला आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयात थांबूनही सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे हे सकाळी 11.30 वाजता येऊन गाडीतून न उतरताच निघून गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने कठोर व निष्पक्ष कारवाई करून लेखी अहवाल द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राखून ठेवल्याचे गिरी यांनी म्हटले आहे. 

*रेती वाहतुकीसाठी 6 लाखांची खंडणी मागितली; किनगाव जट्टू येथे गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल !

*रेती वाहतुकीसाठी 6 लाखांची खंडणी मागितली; किनगाव जट्टू येथे गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल !

*मेहकर (बुलडाणा) प्रतिनिधी :* शासनमान्य रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला अडवून 6 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील एका गावगुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*काय घडले?*
फिर्यादी दुर्गेश दिलीप अवचार (वय 25, रा. कळमेश्वर, ता. मेहकर) हे देवी तुळजाई रियल इस्टेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीने खापरखेड लाड शिवारात पुर्णा नदी पात्रातील शासकीय रेती घाट घेतला असून, तेथे नियमानुसार रॉयल्टीने रेती विक्री सुरू आहे. दुर्गेश हे रॉयल्टी पावती देण्याचे काम करतात.

दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रेती वाहतूक सुरू होती. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास चालक अक्षय म्हस्के (रा. भुमराळा) हा MH 28 BB 9789 या टिप्परमधून दोन ब्रास रेती घेऊन मेहकरकडे जात असताना, किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोडवरील नदी पुलाजवळ आरोपी अमोल प्रभाकर पालकर (रा. किनगाव जट्टू) याने टिप्पर अडवला.

*धमकी आणि शिवीगाळ*
आरोपीने फिर्यादीला घटनास्थळी बोलावून, "तुमचे रेती स्टॉक उचलणे चालू आहे, त्यासाठी मला तुमच्या मालकाकडून सहा लाख रुपये पाहिजे, तरच मी येथून वाहने जाऊ देणार" अशी धमकी दिली. फिर्यादीने वाहने अडवू नको, मालकाशी बोल असे सांगताच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारे वाहने अडवून पैशाची मागणी करत असून त्याच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे फिर्यादीने सांगितले.

या प्रकरणी आरोपी अमोल पालकर विरुद्ध कायमी अपराध क्रमांक / 2026 अंतर्गत कलम 126(2), 308(2), 352, 351(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वृत्त - समाधान मुळे

जी. के. एस. महाविद्यालयात एचआयव्ही समुपदेशन कार्यक्रम संपन्न !

जी. के. एस. महाविद्यालयात एचआयव्ही समुपदेशन कार्यक्रम संपन्न !

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव) 

इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी यांच्या वतीने जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली येथे विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सागर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर समुपदेशक करुणा भवर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही तपासणीचे महत्त्व, उपचाराच्या उपलब्ध सुविधा तसेच एचआयव्हीविषयी असलेले गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रसिका लोकरे  यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांडले, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी तसेच समुपदेशक करुणा भवर यांचे महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

मुंबई–नाशिक महामार्गावर पडघा येथे मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; दुचाकीला धडक, तिघे जखमी !

मुंबई–नाशिक महामार्गावर पडघा येथे मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; दुचाकीला धडक, तिघे जखमी !

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)

मुंबई–नाशिक महामार्गावरील पडघा येथील एम.ई.सीबी पॉवर हाऊस गेटसमोर मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवणाऱ्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांसह कंटेनर चालक  जखमी झाला असून, तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याची नोंद पडघा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. पडघा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. कंटेनर उत्तर प्रदेश राज्यातील असून, चालकाचे नाव अमित पाठक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली. दरम्यान, मुंबई -नाशिक  महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात आलेल्या ब्रेकरमुळे वाहनांचा वेग कमी झाला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. महामार्गावर अवजड वाहने चालवताना चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.

नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी !!

नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी !!

** ₹१२ कोटी हुन जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचा आरोप ; पत्रकार परिषदेत सर्व पत्रव्यवहार, कागदपत्रे, पुरावे दाखवून केली पोलखोल.

** ग्रामस्थांचा एल्गार घरपट्टी, पाणीपट्टी, बेकायदेशीर नोंदी व विकासकामांबाबत गंभीर आरोप; दोषींवर कारवाईची मागणी.

कोणतेही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय.

२ सप्टेंबर रोजी पंचायत समितीवर मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारणार,वेळ आल्यास ठिय्या आंदोलन करणार.

उरण दि. ३० (विठ्ठल ममताबादे) — नागाव ग्रामपंचायतीच्या कारभारात विविध शासकीय योजना, कर व विकासकामांच्या नावाखाली कथित गैरप्रकार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची शासकीय स्तरावर सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीने केली आहे.माऊली रिसॉर्ट म्हातवली- उरण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत 
घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, बेकायदेशीर नोंदी, बनावट कागदपत्रे तसेच विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचे आरोप संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. विकासाच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे.या कथित प्रकरणाची पंचायत समिती उरण यांच्याकडून कारवाई करण्यासंदर्भात होत असलेली टाळाटाळ तसेच विकासाच्या नावाखाली झालेला कथित अपहार याबाबतही या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून उपलब्ध शासकीय नोंदी, कागदपत्रे, निधीचा वापर आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व प्रश्नांवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने व दोषीवर त्वरित कारवाई व्हावी तसेच भविष्यात नागाव ग्रामपंचायत मध्ये कोणतेही भ्रष्टाचार होऊ नये या दृष्टीकोणातून रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता म्हातवली येथील माऊली रिसॉर्ट येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . या पत्रकार परिषदेत कथित गैरव्यवहारासंदर्भातील मुद्दे व कागदपत्रे, सर्व पुरावे, कागदपत्रे माध्यमांसमोर मांडण्यात आले.संघर्ष समितीने सांगितले आहे की ....

“विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.


नागाव ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततां प्रकरणी शासनाच्या निर्देशानुसार कठोर कारवाईची मागणी पत्रकार परिषदेत व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वप्नील माळी यांनी केली. यावेळी ते म्हणाले की नागाव ग्रामपंचायतीच्या कथित गैरकारभार, आर्थिक अनियमितता व ग्रामनिधीच्या वापराबाबत दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद, रायगड अलिबाग यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक सुनावणी घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकशी अहवाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर १८ मे २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांनी आदेश पारित करून, नागाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच चेतन गायकवाड व ग्रामविकास अधिकारी किरण केनी यांच्याकडून अनियमिततेची रक्कम वसूल करण्याबाबत तसेच महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २०१७ व  सप्टेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकातील निर्देशांचा विचार करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले असतानाही आजतगायत संबंधित दोषीवर कोणतेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.केवळ रक्कम वसूल करून प्रकरण संपविणे योग्य आहे का ?  मुख्य प्रश्न असा आहे की, चौकशीत आर्थिक अनियमितता आढळल्यास केवळ संबंधितांकडून रक्कम वसूल करणे पुरेसे आहे का ? जर सार्वजनिक निधीच्या गैरवापराबाबत केवळ आर्थिक वसुली करून प्रशासकीय अथवा फौजदारी जबाबदारी निश्चित केली जात नसेल, तर भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा कसा बसेल, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आर्थिक अनियमिततेची रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितांची जबाबदारी निश्चित करून, लागू असलेल्या कायदे व शासन निर्देशांनुसार प्रशासकीय व आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी सर्व तक्रारदारांची तसेच ग्रामस्थांची मागणी आहे.असे स्वप्नील माळी यांनी सांगितले.

सतत पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून सुद्धा लोकशाही कायदेशीर व शांततेच्या मार्गाने लढाई लढून सुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी व्यक्तीवर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने प्रशासनाचा निषेध करत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असून बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर मोर्चा नेण्यात येणार असून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. असा आक्रमक इशारा या पत्रकार परिषदेत नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सल्लागार तथा मार्गदर्शक काका पाटील यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेत नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सल्लागार काका पाटील, अध्यक्ष कल्पेश सुतार, उपाध्यक्ष विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील माळी, नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सदस्य जितेंद्र ठाकूर, नितीन म्हात्रे, वीरेंद्र म्हात्रे, कमळाकर थळी, किशोर पाटील, निखिल माळी, भारतराज थळी आदी सदस्य उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत ग्रामस्थही मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भ्रष्टाचार बाबत ग्रामस्थ वर्गामध्येही संतापाचे वातावरण होते. त्यांनीही या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला व नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीच्या  निर्णयाला, भूमिकेला जाहीर पाठिंबा देत दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामनिधीतील सर्व खर्च, १५ /१६ वा वित्त आयोग निधी, ओएनजीसी कंपनी कडुन सी एस आर फंड , वाढीव ५ कोटी ५० लाख  निधीची चौकशी, पाणी पुरवठा योजणांचा निधी, विकासकामांचे अंदाज पत्रके व प्रत्यक्ष काम , मोजमाप पुस्तिका (MB ), मूल्यांकन व पूर्णत्व प्रमाणपत्रे, निविदा व कार्यादेश, साहित्य खरेदी व स्टॉक रजिस्टर, कॅशबूक व बँक व्यवहार, ठेकेदारांना दिलेली देयके, वकिलांना अदा केलेल्या फी, महानगर गॅस सुरक्षा अनामत, पंचायत समिती फंड, नागरिकांकडून जमा झालेली कररूपाने रक्कम, दैनदिन खर्च, किरकोळ खर्च, इतर खर्च आरोग खर्च, धूरफवारणी, स्टेशनरी खरेदी, सोलर पथदिवे खरेदी, पथदिवे लाइट खरेदी कर्मचारी वेतन व मानधन, शासकीय मालमत्तेची विल्हेवाट या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून या आर्थिक व्यवहारांचे विशेष व स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे.तसेच तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, बांधकाम अभियंते, संबंधित अधिकारी कर्मचारी,कामांचे अंदाज पत्रक व मूल्यांकन करणारे अधिकारी, देयकांना मंजुरी देणारे अधिकारी, संबंधित कंत्राटदार व पुरवठादार यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम शासन निर्णय नुसार कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या कारभारात काही अनियमितता आढळल्यास संबंधित कायदे व शासकीय नियमांनुसार जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

कोट (चौकट ):- 

तक्रारदारांचा थेट सवाल.

"आर्थिक अनियमितता झाली आणि नंतर रक्कम वसूल केली, तर प्रकरण संपते का  ? "

सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत असल्यास, केवळ रक्कम वसूल करणे हा अंतिम उपाय असू नये. अनियमितता किंवा भ्रष्टाचार का झाली कोणत्या कारणामुळे झाली , त्यासाठी कोण जबाबदार आहे, निर्णय प्रक्रिया कोणी राबवली आणि ग्रामपंचायतीच्या निधीचे नुकसान का झाले, याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. अन्यथा "प्रथम निधीचा गैरवापर करा आणि नंतर रक्कम जमा करून प्रकरणातून सुटका करून घ्या" असा चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो.त्यामुळे दोषीवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. !!

उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : उरणमधील डाऊर  नगरचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी मुंबईतील प्रतिष्ठित एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पीएच.डी पदवी संपादन करून उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या दिमाखदार समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे उपस्थित होत्या.

डॉ. मोहम्मद आमिर शेख सध्या पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेतली जात असून, पीएच.डी. पदवी संपादन करणे ही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

उरण, रायगड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात त्यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे. उरण परिसरातील एका तरुणाने अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच.डी.सारखी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या या यशामुळे उरणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.

या यशाबद्दल डॉ. आमिर शेख यांनी आपले वडील  रियाज अहमद, माजी उपप्राचार्य (निवृत्त), आई श्रीमती निशात बानो, पत्नी जैनब खातून, भगिनी, मित्रपरिवार तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

डॉ. मोहम्मद आमिर शेख यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल उरण, रायगड परिसरातून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सेंट विल्फ्रेड्स महाविद्यालयात 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स महाविद्यालयात 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा !!

.               अंटार्क्टिकामधील भारतीय स्थानक प्रमुख डॉ वरूण 

पनवेल, २४ ऑगस्ट २०२६: सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पनवेल येथे राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त ‘स्पेस फ्रॉम द पोल्स’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, ध्रुवीय संशोधन आणि भारताच्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमांची माहिती देणे हा होता.

यामध्ये कॉलेजजे प्राचार्य डॉ. जयंत के. बेहेरा, जे अंतराळ विज्ञान विषयात पीएच. डी. आहेत व XXXIII भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहिमेचे ते सदस्य आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अंटार्क्टिकामधील भारतीय स्थानक प्रमुख डॉ वरूण यांच्याशी विद्यार्थी व प्राध्यापकांनी थेट व्हिडिओ संवाद साधत तेथील जीवन, वातावरण, परिसर आणि सुरू असलेल्या वैज्ञानिक कार्याची माहिती जाणून घेतली.

सेंट विल्फ्रेड्स स्टेट बोर्ड आणि CBSE शाळांच्या प्राचार्यांच्या प्रोत्साहनामुळे इयत्ता ११वी व १२वीतील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत प्रश्नोत्तर सत्रात देखील सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन संशोधन कक्ष, नैसर्गिक विज्ञान विभाग आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या  (IQAC) संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
 
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन आणि नव्या वैज्ञानिक क्षितिजांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची प्रेरणा मिळाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.

*प्रा. पंकज सरवदे*
*(वाणिज्य विभाग प्रमुख)*

वृत्त - अश्विनी निवाते 

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते बाभुळगाव येवला येथे शाखा फलक अनावरण*

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते बाभुळगाव येवला येथे शाखा फलक अनावरण*

येवला, प्रतिनिधी (सचिन ननगरे) : राष्ट्रीय रिपब्लिकन  पक्ष बाबुळगाव तालुका येवला शाखा फलक अनावरण राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. 

*"गाव तिथे शाखा"* निर्माण करणार असल्याचे यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
    
फलक उद्घाटन प्रसंगी बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी पदाधिकारी कार्यकर्ते अतोनात परिश्रम घेत आहेत त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात शाखा फलक उद्घाटन होत आहेत, प्रत्येक गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असे अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी सांगीतले. 

शाखा उदघाटनाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे, युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपीन कटारे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पवार, येवला युवा नेते तुषार वाघ, नाशिक अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष समीरभाई अन्सारी, येवला तालुका अध्यक्ष शिक्षण विभाग गजानन सुरेकर सर, तालुका उपाध्यक्ष गणेश कोतवाल, तालुका संघटक बबन वाघ, उपाध्यक्ष विजय वाघ, युवा नेते प्रशांत कटारे, अभिनव निकम,धीरज कोतवाल, सचिन देहाडे, तालुका संपर्क प्रमुख महिला आघाडी निर्मला भालेराव, बाभुळगाव शाखा अध्यक्ष कविता गायकवाड, उपाध्यक्ष स्वाती ताई सुरेकर, सचिव कविता अहिरे, कार्याध्यक्षा शिल्पा पठारे, संघटक शीतल कांबळे, खजिनदार सीमा बनसोडे, सल्लागार मनिषा बनसोडे, भारती पगारे, सुनीता बनसोडे, ताई अहिरे, ताई बाई गायकवाड, संजना गुंजाळ, मीनाताई पैठणकर, सुरेखा बनसोडे, जिजा भालेराव,सोनल बनसोडे आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत कृपा अडकूरकर प्रथम; विभागीय स्तरावर निवड !!

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत कृपा अडकूरकर प्रथम; विभागीय स्तरावर निवड !!

*पालघर, प्रतिनिधी / पंकज चव्हाण*

विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी कृपा अडकूरकर हिने जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पालघर येथील आर्यन हायस्कूलमध्ये आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कृपाने 'भारतीय ऊर्जा क्षेत्रे २०४७ : संधी आणि आव्हाने' या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर केले. भारतीय ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य, वाढती ऊर्जेची गरज, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, शाश्वत विकास तसेच २०४७ पर्यंतच्या संधी आणि आव्हानांचा तिने अभ्यासपूर्ण वेध घेतला.

*विभागीय स्तरावर निवड*

या यशामुळे कृपाची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने विज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवणे ही उत्कर्ष विद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

कृपाने मेहनत, विषयाचा सखोल अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिला मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेश्मा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

*अभिनंदनाचा वर्षाव*

कृपा अडकूरकर आणि मार्गदर्शक शिक्षिका रेश्मा जोशी यांचे मुख्याध्यापिका चित्रा ठाकूर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर झेप घेणाऱ्या कृपाच्या या यशामुळे उत्कर्ष विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून विभागीय स्पर्धेसाठी संपूर्ण उत्कर्ष परिवाराकडून तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

तिमुरेचे संकट परदेशातले असले तरी मदतीचा हात डॉ श्रीकांत शिंदे साहेबांच्या रुपाने महाराष्ट्रातून आला - भाविकांचा अनुभव

तिमुरेचे संकट परदेशातले असले तरी मदतीचा हात डॉ श्रीकांत शिंदे साहेबांच्या रुपाने महाराष्ट्रातून आला - भाविकांचा अनुभव

*मुंबई, दि. 30 ऑगस्ट 2026*

कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या आम्हा 43 यात्रेकरूंसाठी ही यात्रा अध्यात्मिक समाधानाबरोबरच मृत्यूच्या छायेतून परतण्याचा थरारक अनुभव ठरली, अशी भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली आहे.

नेपाळ-चीन सीमेवरील तिमुरे येथे आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर चीनमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना अखेर कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करून सुखरूप भारतात परतण्यात यश आले आहे.

*तिमुरे येथील भीषण आपत्तीचा अनुभव*

रुद्र टूर अँड ट्रॅव्हल मार्फत मुंबई ते काठमांडू विमानाने आणि काठमांडू ते तिमुरेपर्यंत बसने प्रवास करून यात्रेकरू तिमुरे येथे मुक्कामाला होते. तेथील हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपुलकीने स्वागत केले होते. तिमुरे बॉर्डरवर इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून ते चीनमध्ये गेले.

चीनमधील कैलास-मानसरोवर येथे पोहोचल्यानंतर तिमुरे येथे दुर्घटना घडल्याची बातमी समजली. ज्या हॉटेलमध्ये चहा-नाश्ता केला, ज्या लोकांनी सेवा केली तेच लोक, परिसरातील हॉटेल्स, वाहने, रस्ते आणि नेपाळ-चीन सीमेवरील पूल या प्रचंड आपत्तीत वाहून गेले. चिनी बाजूकडील इमिग्रेशन सेंटरची भव्य इमारत, शेकडो वाहने आणि शेकडो भाविक या आपत्तीचे बळी ठरले.

*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने सुखरूप परतले*

सागा शहरात पोहोचल्यानंतर चीन सरकारच्या निर्बंधामुळे पुढील प्रवासावर निर्बंध आले आणि नेपाळमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद झाला. यावेळी 43 भारतीय यात्रेकरू आणि 9 नेपाळी कर्मचारी अडकले होते.

या संकटकाळात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, त्यांचे निकटवर्तीय अभिजीत दरेकर, ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर, आमदार राजेश मोरे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांनी घेतलेली काळजी आणि पाठपुरावा मोठा आधार ठरला.

ठाणे आरडीसी डॉ. संदीप माने यांनी तीन दिवसांत सहा वेळा स्वतः फोन करून विचारपूस केली. हा केवळ प्रशासकीय संपर्क नव्हता तर नातेवाईकाप्रमाणे आपुलकीने संवाद साधला. तहसीलदार विकास गारुडकर, भारतीय दूतावासातील अधिकारी आणि राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने सातत्याने संपर्क ठेवत "तुम्ही एकटे नाही" असा विश्वास दिला. या यात्रेकरूं मध्ये फक्त भारतीय नव्हते त्यामध्ये भारतीय आणि लंडन, कॅनडा, फ्रान्समधील भाविक देखील होते. तसेच रुद्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे त्यांचे ९ कर्मचारी भाविकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध होते. या सर्वांनी महाराष्ट्र प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले.

.           प्रकाश माने व प्रतिक्षा माने कैलास मानसरोवर यात्रेकरू 

अखेर दि. 29 ऑगस्ट रोजी चीन-नेपाळ जोडणाऱ्या कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी 6 वाजता प्रवास सुरू करून मध्यरात्री 2 वाजता ते काठमांडू येथील हॉटेलमध्ये पोहोचले. आज रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नेपाळ एअरलाइन्सच्या RA 201 विमानाने ते सुखरूप मुंबईत परतले.

तिमुरे येथील भीषण आपत्ती ही नैसर्गिक होती. मात्र संकटानंतर नागरिकांच्या पाठीशी कोण उभे राहते ही खरी कसोटी असते आणि या कसोटीत खासदार डॉ. शिंदे आणि महाराष्ट्र प्रशासनाने माणुसकीचे दर्शन घडवले, अशा शब्दांत यात्रेकरू प्रकाश माने आणि प्रतीक्षा माने यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Friday, 28 August 2026

महाडिबीटी 2.0 वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना ऑनलाइन अर्जासाठी सहकार्य करण्याचे आवाहन !!

महाडिबीटी 2.0 वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना ऑनलाइन अर्जासाठी सहकार्य करण्याचे आवाहन !!

मुंबई : राज्यातील विजाभज, इतर मागासवर्ग व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडिबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. नवीन (Fresh) तसेच नूतनीकरण (Renewal) अर्जासाठी विद्यार्थ्यांनी नवीन महाडिबीटी आयडी/आधार लॉगिन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. आवश्यक कागदपत्रे जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, वैध प्रमाणपत्रे आदींच्या स्पष्ट पीडीएफ प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.

महाडिबीटी 2.0 वर उपलब्ध प्रमुख योजना : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांमध्ये विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाहभत्ता, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी निर्वाहभत्ता, इमाव प्रवर्गातील मुलींसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या विविध योजना तसेच विजाभज विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप यांचा समावेश आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांमध्ये इयत्ता ५ वी व ७ वी, तसेच इयत्ता ८ वी व १० वीतील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सैनिक शाळेतील प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती, तसेच PM-YASASVI मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आदी योजनांचा समावेश आहे.

महाविद्यालयांची महत्त्वाची जबाबदारी : महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना महाडिबीटी 2.0 वर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. महाविद्यालयाच्या नावाने तसेच मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची नावे, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता आणि विविध मान्यतेची माहिती पोर्टलवर अचूकपणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची आहे.

महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये. प्रलंबित अर्जांची नियमित तपासणी करून विहित मुदतीत अर्ज मंजूर करून पुढे पाठविण्याची जबाबदारी प्राचार्यांची राहणार आहे. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शिक्षण विभागाशी समन्वय साधून सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अर्जासाठी महाडिबीटी पोर्टलचा वापर : शिष्यवृत्ती अर्जासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस पोर्टलवर लॉगिन करून ‘नागरिकांसाठी लॉगिन’ किंवा ‘महाडीबीटीशिवाय प्रवेश करा’ या पर्यायातून आधार आधारित लॉगिन करता येईल. आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक अद्ययावत केल्यानंतर लॉगिन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.  लॉगिन केल्यानंतर पात्र योजनांची यादी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेची माहिती पाहून ‘Apply’ पर्यायाद्वारे वैयक्तिक, शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून अर्ज ऑनलाइन सबमिट करावा. अर्जाची प्रिंट अथवा PDF स्वरूपात प्रत जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तक्रारींसाठी ऑनलाइन सुविधा : तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणींबाबत विद्यार्थ्यांना लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाDBT हेल्पडेस्कशी ०२२-४११५०८०० / १८००१०२५३११ या क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज महाडिबीटी 2.0 प्रणालीवर भरावयाचे असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांनी या प्रक्रियेस सहकार्य करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

मटण, चिकन विक्रेत्यांना अन्नसुरक्षेबाबत मार्गदर्शन !!

मटण, चिकन विक्रेत्यांना अन्नसुरक्षेबाबत मार्गदर्शन !!

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत मटण व चिकन विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून अन्न व्यावसायिकांमध्ये अन्नसुरक्षेविषयी जागरूकता वाढवून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण मटण व चिकन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

अन्न सुरक्षा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग आणि श्री. लक्ष्मीबाजार प्रतिष्ठान ट्रस्ट, भवानी पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.  लक्ष्मीबाजार सांस्कृतिक भवन, भवानी पेठ येथे झालेल्या कार्यशाळेत परिसरातील सुमारे २०० अन्न व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत मटण व चिकन विक्रीच्या ठिकाणी अन्नाची सुरक्षितता व स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, दुकान परिसराची स्वच्छता, कच्चे व तयार अन्न यांची योग्य हाताळणी व साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छ पाणी, उपकरणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि कीटक नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत नियम व विनियमांतील तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता व सुरक्षिततेच्या मानकांची अंमलबजावणी करून ग्राहकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सहआयुक्त (अन्न) दिवाकर भोगावडे, सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांनी अन्न व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. अन्न सुरक्षा विषयक आवश्यक बाबी आणि कायदेशीर तरतुदींची माहितीही देण्यात आली.

अन्न व्यावसायिकांनी कार्यशाळेचे स्वागत करून ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण मटण व चिकन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. अशा जनजागृती व मार्गदर्शन उपक्रमांमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये अन्नसुरक्षेविषयी जागरूकता वाढून नागरिकांना सुरक्षित अन्न मिळण्यास मदत होणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांकावर नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पडघा वनविभागात विद्यार्थिनींचे रक्षाबंधन ; राखीच्या धाग्यातून वनरक्षणाचा संदेश !!

पडघा वनविभागात विद्यार्थिनींचे रक्षाबंधन ; राखीच्या धाग्यातून वनरक्षणाचा संदेश !!

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव) 

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील  पडघा वनविभाग कार्यालयात शारदा विद्यालय, पडघे येथील इयत्ता सहावी आणि सातवीच्या  विद्यार्थिनींनी वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती आपुलकी व्यक्त करण्यासोबतच वन, पर्यावरण आणि राखीच्या धाग्यातून वनरक्षणाचा  संदेश दिला. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून एकमेकांच्या संरक्षणाची आणि जबाबदारीची भावना जपणारा सण आहे. याच भावनेतून विद्यार्थिनींनी वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींच्या या अनोख्या उपक्रमामुळे वनविभाग कार्यालयातील वातावरण आनंदमय झाले.

यावेळी पडघा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ, शिपाई महेंद्र भेरे ,वाहुली वन व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश मते , शारदा  विद्यालयातील शिक्षक शिक्षक जयश्री  सोनवणे, गौरी भामरे, विशाल  देवरे, कर्मचारी सुयोग वेखंडे उपस्थित होते. यावेळी पडघा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे उपस्थितांनी सांगितले. ‘राखीच्या धाग्यातून नाते जुळले, तर निसर्गरक्षणाचा संकल्पही दृढ झाला,’ असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Thursday, 27 August 2026

२०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या आढावा अहवालात जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीए २१व्या स्थानी !!

२०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या आढावा अहवालात जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीए २१व्या स्थानी !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील (H1 २०२६) जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांच्या आढावा अहवालात २०२५ मधील २८ व्या स्थानावरून २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. जेएनपीएने २०२५ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत १३. ६ टक्के वाढ नोंदवली आहे.

गेल्या वर्षभरात कार्यात्मक कार्यक्षमता, जलद मालवाहतूक व निर्गमन, जहाज हाताळणीतील सुधारणा आणि बहुविध वाहतूक जोडणी अधिक सक्षम करण्यावर जेएनपीएने सातत्याने भर दिला आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीसमोर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही जेएनपीएने मालाची अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना राबवल्या. वाढलेल्या कार्यात्मक गरजांचे सक्षम व्यवस्थापन करत आयात-निर्यात व्यापाराची गती आणि सातत्य कायम ठेवण्यात जेएनपीए यशस्वी ठरले. आव्हानात्मक परिस्थितीतही व्यापार सुरळीत ठेवण्याची जेएनपीएची कार्यक्षमता आणि तत्परता ही जागतिक दर्जाच्या बंदरसेवांच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे द्योतक आहे.

जेएनपीएच्या या जागतिक क्रमवारीतील कामगिरीबाबत बोलताना, गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए म्हणाले, “जेएनपीएने जागतिक क्रमवारीत २१वे स्थान मिळवणे हे आमच्या टर्मिनल ऑपरेटर्स, भागधारक आणि संपूर्ण बंदर समुदायाच्या सामूहिक कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे जागतिक व्यापारातील वर्षभरातील आव्हानात्मक परिस्थितीतही विश्वासार्ह आणि कार्यक्षम माल हाताळणी सेवा देण्याची जेएनपीएची क्षमता अधिक बळकट झाली आहे. या गतीला पुढे नेत, जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे स्थान आणखी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू."

अल्फालायनर ही लाइनर शिपिंग क्षेत्रातील डेटा व व्यावसायिक माहिती सेवा पुरवणारी आघाडीची जागतिक संस्था असून, ती कंटेनर हाताळणीच्या प्रमाणाच्या आधारे जगातील बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन करते.

या क्रमवारीत झालेली सुधारणा जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे वाढते स्थान अधोरेखित करते, तसेच भारताच्या सागरी व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विकासातील जेएनपीएची वाढती भूमिका स्पष्ट करते.

महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाचा दिलदारपणा ; नितांत सुंदर व्हिएतनामचे ३५ जणांना घडवले पर्यटन !!

महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाचा दिलदारपणा !!

*# नितांत सुंदर व्हिएतनामचे ३५ जणांना घडवले पर्यटन

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांचे अनोखे दातृत्व‌ सर्वपरिचित आहे. दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. ज्यांनी केवळ विमान हा शब्द ऐकला आहे, अशा अनेकांना त्यांनी आजपर्यंत विमान प्रवास घडवला आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाच्या दिलदारपणामुळेच हायस्कूल आणि महाविद्यालयीन जीवनात लाभलेल्या सवंगड्यांसह त्यांनी चक्क ३५ जणांना १७ ते २५ ऑगस्ट असे आठ दिवस नितांतसुंदर अशा व्हिएतनामचे पर्यटन घडवले. परदेश प्रवास स्वप्नातही न पाहिलेल्यांना महेंद्रशेठ घरत यांनी व्हिएतनामची सफर घडवली. त्यांचे परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे चाकोरीबद्ध आयुष्य जगलेल्या सवंगड्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

ज्यांनी पासपोर्ट शब्द ऐकला होता, पण पासपोर्ट काढला नव्हता, त्यांनीही आठ दिवसांच्या पर्यटनात व्हिएतनामची राजधानी हनोई, त्यानंतर दा नांग, बाणा हिल, फु कॉक, हो ची मिन्ह शहर आणि मुंबई असा पाच वेळा विमान प्रवास केला आणि फाईव्हस्टार आणि थ्री स्टार हॉटेलमध्ये व्हिएतनाममध्ये राहाण्याची संधी दिली. त्यामुळे अशा सहकाऱ्यांना आकाश ठेंगणे झाले होते. क्रूझ सफर, तेथे जागोजागी असणारी बेटे, बाणा हिल येथे केबल कारमधून प्रवास आणि ते विहंगम दृश्य, दोन्ही हातावर साकारलेला पूल, तेथील उंचच उंच डोंगर रांगांतून जाणारी केबल कार, अनेक बेटांना जोडणारी जगातील सर्वाधिक लांबीची केबल कार, दा ची मिन्ह हे सुसज्ज शहर आणि व्हिएतनाम-अमेरिकादरम्यानच्या युद्धाची अंगावर काटा आणणारी दृश्य असणारे संग्रहालय आदींचे दर्शन एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांना महेंद्रशेठ घरत यांनी घडवले. त्यामुळे एम. जी. ग्रुपचे सहकारी भारावले आहेत. 

यावेळी एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांना भावना अनावर झाल्या होत्या. महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच आम्ही पहिल्यांदा विमानात बसलो. एवढेच नव्हे तर परदेशात जाऊ शकलो. त्यांनी प्रवासात जो आनंद दिला त्याला तोड नाही. त्यांनी स्वतःपेक्षा आमचीच काळजी व्हिएतनाम प्रवासात घेतली. उत्तम नियोजन आणि शिस्तप्रिय व्यवस्थापनाने प्रवासाचा आनंद द्विगुणित केला, अशा भावना पहिल्यांदाच परदेश प्रवास केलेल्या सवगंड्यांनी व्यक्त केल्या. परदेशात ३५ जणांना सांभाळणे आणि सांभाळून घेणे सोपे काम नव्हते, पण महेंद्रशेठ घरत यांनी ते लीलया पार पाडले. विशेष म्हणजे व्हिएतनाम पर्यटनासाठी असलेल्या सहकाऱ्यांच्या काही नातेवाईकांचे निधन झाले, काहींच्या घरी अडीअडचणी निर्माण झाल्या. कुणी गंभीर आजारी पडले, मात्र व्हिएतनाम प्रवासात महेंद्रशेठ घरत यांनी ज्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे, त्यांना मोलाचा आधार दिला. श्रद्धांजली वाहिली. तसेच गंभीर आजारी असणाऱ्यांवर व्यवस्थित आणि वेळेवर उपचार होतील, याची काळजी महेंद्रशेठ घरत यांनी व्हिएतनाममधूनही घेतली. त्यामुळे मोठ्या मनाचा, दिलदार आणि दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, समोरच्याच्या चेहऱ्यावरील भावना वाचणारे महेंद्रशेठ घरत, हे सद्यपरिस्थितीत एकमेव नेते असल्याच्या भावनाही व्हिएतनाम पर्यटनातील सवंगड्यांनी व्यक्त केल्या.

उरण तालुका बौद्धधम्म संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड !!

उरण तालुका बौद्धधम्म संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील बौद्ध धर्मातील नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण करण्याबरोबरच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उरण तालुक्यातील बौद्ध समाजातील नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून उरण तालुका बौद्धधम्म संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दिनेश गायकवाड, सुनील गायकवाड, परशुराम शिवशरण, एन. बी. कुरणे, सुनील जाधव आणि शैलेश तांमगाडगे, कार्याध्यक्षपदी ॲड. निलेश मर्चंड, सहकार्याध्यक्षपदी डॉ. निशा ओव्हाळ,  सरचिटणीसपदी सुनील जोशी, सहसरचिटणीसपदी आम्रपाली गायकवाड, खजिनदारपदी सदानंद गायकवाड , सहखजिनदारपदी जोती सकपाळ मॅडम, सल्लागारपदी ॲड. श्रीधर कवडे व विनायक नगावरे, प्रसिद्धीप्रमुखपदी सुयोग गायकवाड यांची निवड करण्यात आली.

यावेळी सदस्य तुकाराम खंडागळे, गणेश कांबळे (जासई), प्रकाश कांबळे (जासई), कांचन ओव्हाळ, मनोज ओव्हाळ, प्रमोद कांबळे, संतोष मोघे, शांताबाई परुळेकर, अर्चना परुळेकर, नवनीत कांबळे, आदित्य मर्चंडे, दीपक साळुंके, अरुण ओव्हाळ, ऋषिकेश कासारे, सिद्धार्थ कांबळे, सुरेंद्र नवधरे, आदित्य गायकवाड, मंगेश कांबळे, विशाल कवडे, विनायक नानावले, लखन गायकवाड, प्रकाश शरणागत, प्रकाश गायकवाड, सचिन धुळे, संतोष गायकवाड, दिपक साबळे, समर्थ कांबळे, महेश, निखिल, समीर गायकवाड, आदी सदस्य उपस्थित होते.

उरण तालुक्यातील स्थानिक बौद्ध समाजाच्या न्याय हक्कासाठी सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच  तालुका स्तरीय बुद्ध विहार उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कल्याण : 'शिव कल्याण राजा' सोहळ्यात पोवाड्यावर कथकचा अनोखा प्रयोग, रसिक मंत्रमुग्ध !!

*कल्याण : 'शिव कल्याण राजा' सोहळ्यात पोवाड्यावर कथकचा अनोखा प्रयोग, रसिक मंत्रमुग्ध !!

*कल्याण, प्रतिनिधी :* नारायणी नृत्य कला मंदिर आयोजित वार्षिक सांस्कृतिक सोहळा 'शिव कल्याण राजा' शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता कल्याण येथील सी. एम. गांधी ऑडिटोरियममध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कथक नृत्याच्या माध्यमातून मानवंदना देणारा हा सोहळा कल्याणकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

*नटराज पूजनाने सुरुवात*
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध नृत्यालंकार सौ. श्रद्धा भिडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेच्या संचालिका नृत्यालंकार शिवाई आरेकर यांनी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

*पोवाड्यावर कथकचा अनोखा संगम*
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवचरित्रावर आधारित कथक नृत्याविष्कार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातील मावळ्यांना एकत्र करून केलेली हिंदवी स्वराज्याची स्थापना हा संपूर्ण इतिहास वीररसयुक्त गीते, ओव्या आणि शाहीरी वांग्मयातील पोवाडा या काव्यप्रकारावर कथकच्या माध्यमातून सादर करण्यात आला. पोवाडा या लोककलेवर शास्त्रीय कथक सादर करण्याच्या या अनोख्या प्रयोगाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

'वेडात मराठे वीर दौडले सात', 'छाती केसरीची', 'जिजाऊ मातेचा पोवाडा' यासारख्या अजरामर गीतांवर कथक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. लहान मुलींनी सादर केलेल्या 'झुलवा पाळणा छान शिवबाचा' या गीतावरील नृत्याने आणि शिवाजी महाराजांच्या आगमनाच्या नाट्यप्रसंगाने सर्वांची मने जिंकली.

*वयाचे बंधन नाही*
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात वयाची कोणतीही मर्यादा नव्हती. चार-पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ते 18-19 वर्षांच्या युवती, संसाराची जबाबदारी सांभाळत कला जोपासणाऱ्या गृहिणी आणि प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या महिलांनीही सहभाग घेतला.

यावेळी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री. वाधरे आणि त्यांच्या पत्नी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कथक सादर केलेल्या सर्व कलाकारांचे कौतुक करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत कानडे यांनी केले.

भिवंडी तालुक्यात एफ. एफ एस .ॲपद्वारे खत विक्री सुरळीत सुरू !!

भिवंडी तालुक्यात एफ. एफ एस .ॲपद्वारे खत विक्री सुरळीत सुरू !!

** शेतकऱ्यांना घरबसल्या खत बुकिंगची सुविधा ; क्यू.आर कोड दाखवून कृषी सेवा केंद्रातून खरेदी

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव)

केंद्र शासनाच्या Framework for Fertilizer Sale ( एफ. एफ एस ) ॲपद्वारे भिवंडी तालुक्यात आजपासून खत विक्रीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे. या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक खताचे बुकिंग करता येणार असून, बुकिंगनंतर मिळणारा क्यू आर कोड निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर दाखवून खत खरेदी करता येणार आहे. खत विक्री आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार खत उपलब्ध करून देणे तसेच संपूर्ण वितरण व्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन करणे, हा एफ. एफ .एस प्रणालीचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अनावश्यक वेळ आणि त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.एफ. एफ .एस . प्रणालीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी गुण नियंत्रण निरीक्षक विवेक दोंदे यांनी तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन केंद्र चालक तसेच शेतकऱ्यांना ॲपच्या वापराबाबत आणि क्यू आर कोडद्वारे खत खरेदी करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. प्रणाली सुरू असताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक दक्षता घेतली. दरम्यान, एफ. एफ .एस. प्रणाली सुरू करण्यापूर्वी कृषी सेवा केंद्र चालकांसह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामस्तरावरही कृषी विभागामार्फत या प्रणालीबाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अडचण आल्यास तातडीने मार्गदर्शन मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे तसेच कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी महेश बनकर आणि जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे यांनीएफ. एफ .एस . प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. या प्रणालीमुळे भिवंडी तालुक्यात शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक आणि व्यवस्थित खत वितरण व्यवस्था उपलब्ध होणार आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणताही अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.

केडीएमटीची निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार; वाहतूक कोंडी !!

केडीएमटीची निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार; वाहतूक कोंडी !!
*डोंबिवली, दि. 28 ऑगस्ट 2026*

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या (केडीएमटी) बस सतत नादुरुस्त होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. आज गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डोंबिवलीतील बाजीप्रभू स्थानकातून निवासीकडे निघालेली बस मिलापनगर स्टॉपवर आल्यावर अचानक बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

*मध्येच बस बंद, प्रवाशांना उतरवले*

बस मिलापनगर स्टॉपवर आल्यानंतर नादुरुस्त झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक आणि वाहकाने बस तेथेच उभी करून प्रवाशांना तेथेच उतरवले. त्यामुळे प्रवाशांना पुढील इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागला.

आधीच निवासी मार्गावर केडीएमटी व्यवस्थापनाकडे बसचा तुटवडा असल्याने बस वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. त्यात ही बस नादुरुस्त झाल्याने निवासी ते डोंबिवली या बस फेऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे प्रवाशांना बस स्टॉपवर अधिक काळ ताटकळत थांबावे लागले.

सुमारे दीड तासानंतर केडीएमटीचा मेकॅनिक घटनास्थळी आल्यावर बसची तात्पुरती दुरुस्ती करून ती तेथून हलविण्यात आली.

*वाहतूक कोंडीत भर*

नादुरुस्त बस रस्त्यातच उभी असल्याने वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका नागरिकांना आणि वाहनचालकांना बसला. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळ असल्याने कोंडीत आणखी भर पडली.

केडीएमटीच्या सुमार दर्जाच्या बसमुळे प्रवाशांचे हाल होत असून त्याचा फायदा रिक्षाचालक घेत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

केडीएमटी निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार ! त्यामुळे वाहतूक कोंडी !!

केडीएमटी निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार ! त्यामुळे वाहतूक कोंडी !!

              कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या बस सतत नादुरूस्त होण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे प्रवासी बेजार, त्रस्त झाले आहेत. आज गुरुवारी सकाळी साडे अकरा आसपास डोंबिवली बाजीप्रभू स्थानकातून निवासी कडे निघालेली बस जेव्हा मिलापनगर स्टॉपवर आली तेव्हा ती नादुरुस्त झाल्याचे चालकाला समजल्यावर ती बस तेथेच उभी करून त्याने व वाहकाने प्रवाशांना तेथेच उतरविले. त्यामुळे प्रवाशांना पुढील इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागला. आधीच निवासी मार्गावर बस या वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. कारण केडीएमटी व्यवस्थापनाकडे बसचा तुडवडा आहे. त्यात ही बस नादुरुस्त झाल्याने अर्थातच निवासी ते डोंबिवली या बस फेऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे प्रवाशांना अधिक काळ बस स्टॉप वर थांबावे लागले. काही वेळाने केडीएमटीचा मेकॅनिक आल्यावर अंदाजे दीड तासानंतर ही बस तेथून तात्पुरती दुरुस्ती करून हलविण्यात आली आहे. 

              सदर या नादुरुस्त झालेल्या बसमुळे वाहतूक कोंडी होऊन त्याच्या फटका नागरिकांना आणि वाहनचालकांना बसला होता. त्यात शाळेच्या सुटण्याचा व भरण्याच्या वेळ असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. 
             केडीएमटीच्या या सुमार दर्जाच्या बसमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून त्याचा फायदा रिक्षावाले घेत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा येथील रहिवाशी व्यक्त करीत आहेत. 
 
वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

Wednesday, 26 August 2026

*इम्पॅक्ट न्यूज : - आंदोलनाच्या धाकाने अखेर धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे टाळे उघडले; पुण्यतिथी दिवशीच केडीएमसीला जाग !!

*इम्पॅक्ट न्यूज*

*आंदोलनाच्या धाकाने अखेर धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे टाळे उघडले; पुण्यतिथी दिवशीच केडीएमसीला जाग*

*डोंबिवली, दि. 26 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील कल्याण-डोंबिवली महापालिकेचे धर्मवीर आनंद दिघे उद्यान मागील दीड वर्षांपासून नियमित सकाळ-संध्याकाळ उघडले जात नव्हते. अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या 26 व्या पुण्यतिथीच्या दिवशीच या उद्यानाचे टाळे उघडण्यात आले.

*दीड वर्षांपासून उद्यान बंद*

या उद्यानावरील कंत्राटी सुरक्षा रक्षकाचा ठेका संपला होता. नवीन ठेकेदाराची नेमणूक न झाल्याने सुरक्षा रक्षक नसल्याने उद्यान नियमित उघडले जात नव्हते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा हिरमोड झाला होता. उद्यानातील ओपन जिम, लहान मुलांची खेळणी, जॉगिंग ट्रॅक आणि झाडे यांची देखभालही होत नव्हती.

ही बाब वारंवार कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, उद्यान विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती, मात्र योग्य कार्यवाही होत नव्हती. यासंदर्भातील बातम्या यापूर्वी 'बातमीदार माझा' मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

*आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग*

अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एमआयडीसी शाखेने धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दि. 26 ऑगस्ट रोजी याच उद्यानाच्या प्रवेशद्वारावर त्यांना श्रद्धांजली वाहून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या इशाऱ्यानंतर केडीएमसीने तत्परतेने कार्यवाही करत आज सकाळी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा एक सुरक्षा रक्षक पाठवून उद्यान उघडले. तसेच उद्यानात वाढलेली झाडी-झुडपे काढणे आणि साफसफाईचे कामही सुरू करण्यात आले आहे.

*आंदोलन स्थगित*

उद्यान उघडल्याने आणि साफसफाई सुरू झाल्याने आजचे आंदोलन धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहून स्थगित करण्यात आल्याचे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी विभाग प्रमुख राजू नलावडे, उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे आणि शाखाप्रमुख सागर पाटील यांनी सांगितले. यासाठी त्यांनी केडीएमसी आणि 'बातमीदार माझा' चे आभार मानले आहेत.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...