सेंट विल्फ्रेड्स महाविद्यालयात 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा !!
पनवेल, २४ ऑगस्ट २०२६: सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पनवेल येथे राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त ‘स्पेस फ्रॉम द पोल्स’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, ध्रुवीय संशोधन आणि भारताच्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमांची माहिती देणे हा होता.
यामध्ये कॉलेजजे प्राचार्य डॉ. जयंत के. बेहेरा, जे अंतराळ विज्ञान विषयात पीएच. डी. आहेत व XXXIII भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहिमेचे ते सदस्य आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अंटार्क्टिकामधील भारतीय स्थानक प्रमुख डॉ वरूण यांच्याशी विद्यार्थी व प्राध्यापकांनी थेट व्हिडिओ संवाद साधत तेथील जीवन, वातावरण, परिसर आणि सुरू असलेल्या वैज्ञानिक कार्याची माहिती जाणून घेतली.
सेंट विल्फ्रेड्स स्टेट बोर्ड आणि CBSE शाळांच्या प्राचार्यांच्या प्रोत्साहनामुळे इयत्ता ११वी व १२वीतील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत प्रश्नोत्तर सत्रात देखील सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन संशोधन कक्ष, नैसर्गिक विज्ञान विभाग आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या (IQAC) संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन आणि नव्या वैज्ञानिक क्षितिजांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची प्रेरणा मिळाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.
*प्रा. पंकज सरवदे*
*(वाणिज्य विभाग प्रमुख)*
वृत्त - अश्विनी निवाते
No comments:
Post a Comment