Wednesday 31 August 2022

ई-केवायसी करण्याच्या मुदतीत होणार वाढ ! "कृषी मंत्री सत्तार यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्याकडून परवानगी"

ई-केवायसी करण्याच्या मुदतीत होणार वाढ ! "कृषी मंत्री सत्तार यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्याकडून परवानगी"


पुणे, प्रतिनिधी :  देशातील 55 ते 60 टक्के लोकसंख्येसाठी शेती (PM Kisan) हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. येथील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. PM किसान योजना ही शेकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता ई -केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट होती मात्र आता ती आणखी वाढवण्यात येऊ शकते.

मराठवाडा विभागाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यानुसार एक ट्विट करण्यात आले आहे. त्यानुसार ई -केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवण्याच्या कृषी मंत्री सत्तार यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई -केवायसी
केले नाही त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र अद्याप पीएम किसान च्या वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

कसे कराल ई-केवायसी... 
-सर्वप्रथम पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
-येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
-आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
-आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
-सबमिट OTP वर क्लिक करा.
-आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.

व्याजाच्या नावाखाली पैशाची तिप्पट वसुली ! जातिवाचक उल्लेख करत वाद उकरून सावकाराची लोखंडी पाईपाने मारहाण !! "सावकार अटकेत"

व्याजाच्या नावाखाली पैशाची तिप्पट वसुली ! जातिवाचक उल्लेख करत वाद उकरून सावकाराची लोखंडी पाईपाने मारहाण !! "सावकार अटकेत"

पुणे, प्रतिनिधी : व्याजाच्या पैश्याच्या वसुलीसाठी जातिवाचक उल्लेख करत, पत्नीसंदर्भात अर्वाच्य उद्गार काढल्याने वादविवाद झाला. वादविवादात सावकाराने एकास लोखंडी पाईपाने मारहाण केल्याने एक जण जखमी झाला असून जातिवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्या सावकारास अटक करण्यात आली आहे.

तानाजी औदुंबर पाटील (रा. महतीनगर, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. प्रताप तानाजी पलंगे (वय ४४ वर्षे, रा. कांबळेगल्ली, इंदापूर) यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.२८) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खडकपूरा भागात आरोपीच्या दुकानासमोर हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हा हिंदू खाटीक समाजाचा आहे. त्याचा शेळ्या मेंढ्या विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, १३ जाने २०२२ रोजी पत्नीची तब्येत अचानक खराब झाल्याने तिला बारामती येथील खाजगी हॉस्पीटल येथे उपचाराकरीता दाखल केले होते.

उपचारकामी १ लाख रुपये लागतील असे सांगितल्याने पैशाची अडचण आल्याने पलंगे यांनी खाजगी सावकार तानाजी औदुंबर पाटील याच्याकडून पत्नीच्या उपचारकामी १ लाख रुपये ५ टक्के व्याज दराने घेतले. यावेळी पाटील यांनी पलंगे यांच्याकडून युनियन बँकेचे इंदापूर शाखेचे तीन कोरे चेक सही करून घेतले.

त्यानंतर ७ मार्च २०२२ रोजी पलंगे हे खडकपूरा येथे पाटील यांच्या दुकानासमोर गेले, तेव्हा पाटील यांनी ५ टक्के दराने पैसे परवडत नाहीत २० टक्के दराने मी व्याज देणार नसेल तर माझे पैसे परत दे अशी मागणी केली. त्यावर पलंगे यांच्या म्हणण्यानुसार माझ्याकडे पैसे नसल्याने मी तयार झालो. त्याच वेळी मी त्यांना २५ हजार ५०० रूपये मुद्दल म्हणून दिले. मात्र त्यांनी ते व्याजातून जमा केले. त्यानंतर मी पाटील यांना वेळोवेळी पैसे देत गेलो.

२८ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी सावकार तानाजी पाटील यांनी प्रताप पलंगे यांना बोलावून घेतले. माझ्या व्याजाच्या पैश्याचे काय झाले अशी विचारणा करत फिर्यादीच्या दुचाकीची चावी घेतली. फिर्यादीने एक दोन दिवसात पैसे देतो असे सांगितल्यानंतर जातिवाचक उल्लेख करत फिर्यादीच्या पत्नीबद्दल अर्वाच्य उद्गार काढून, आरोपीने आपल्या दुकानातील लोखंडी पाईप फिर्यादीच्या डोक्यात मारला अशा आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यात पाईप लागल्याने जखमी झालेले प्रताप पलंगे हे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. सावकार तानाजी पाटील या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना ! "राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन"

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना !

"राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन" 


नवी दिल्ली, ३१ : ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषाने आज कोपर्निकस मार्ग व येथील महाराष्ट्र सदन निनादले .लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी जमली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात दिसून आले. 


महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. 


महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 


दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३० मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला. 

गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळया लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, सांगितीक कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभागी होतात.

सरकारची दडपशाही, पहाटे तीन वाजता गणेशोत्सवाचा देखावा केला जप्त, पोलिसांची कारवाई, ऐकोणसाठ वर्षाचा गणेशोत्सव बंद, कल्याण मध्ये खळबळ ?

सरकारची दडपशाही, पहाटे तीन वाजता गणेशोत्सवाचा देखावा केला जप्त, पोलिसांची कारवाई, ऐकोणसाठ वर्षाचा गणेशोत्सव बंद, कल्याण मध्ये खळबळ ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण येथील प्रसिद्ध विजय तरुण मंडळाने सध्याच्या राजकीय परिस्थिती वर केलेल्या गणेशोत्सव सजावटीवर पोलिसांनी पहाटे ३ वाजता  कारवाई केली, त्यामुळे या हिटलर शाही व दडपशाही विरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगून गेल्या ५९ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव बंद करून या सरकारचा निषेध व्यक्त केला असल्याचे मंडळाचे पदाधिकारी विजय उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले.


कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. येथील मतदारांनी नेहमीच सेनेला भरभरून मतदान केले आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून उध्दव ठाकरे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या जे काही कुरघोडी चे राजकारण सुरू आहे, ते जनता पहात आहे. अशातच येथील उध्दव ठाकरे यांचे खंदे समर्थक निष्ठावंत शिवसैनिक तथा कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी, यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला. परंतु आपली निष्ठा ठाकरे अर्थात मातोश्री सोबत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.


त्यातच युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसंवाद यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून तूफान प्रतिसाद मिळत आहे. ते प्रत्येक सभेत फुटून गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना "गद्दार" बोलून राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाण्यचं आव्हान देत आहेत. एकूणच फुटीर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक तसेच जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे, त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटातील पदाधिका-यांना जाणूनबुजून त्रास देणे, दबाव आणणे, असे प्रकार सुरू आहेत असे आरोप अनेक सभामधून आदित्य ठाकरे व इतर सेना पदाधिकाऱ्यांनी केले आहेत.

असाच काहीसा प्रकार कल्याण मध्ये नुकताच घडला आहे. कल्याण मध्ये जी काही नामांकित गणेशोत्सव मंडळ आहेत त्यामध्ये रामबागेतील विजय तरुण मंडळाचा अग्रक्रम लागतो. ते प्रत्येक वर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडींवर देखावा तयार करतात, त्यामुळे यांच्या गणेशोत्सवाला भक्तांची तूफान गर्दी असते. याही वर्षी सध्याच्या राजकीय परिस्थिती वर यांनी देखावा तयार केला होता.

विजय तरुण मंडळ हे आगळा वेगळा देखावा सादर करण्यात कल्याण येथे प्रसिद्ध मंडळ आहे. तसेच शिवजयंती असो की गणेश उत्सव मंडळांनी सादर केलेले देखावे लक्ष वेधून घेणारे असतात आणि या देखाव्याला पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी सुद्धा करतात. अफजलखानाचा वध तसेच असे अनेक देखावे मंडळाने सादर केले आहेत.. मंडळाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खंदे समर्थक विजय तरुण मंडळाचे अध्यक्ष तसेच शिवसेना कल्याण महानगरप्रमुख विजय ऊर्फ बंड्या साळवी यांनी हा सत्य परिस्थितीवरील देखावा पोलिस उपायुक्तांना दाखवून संपुर्ण सजावट त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून करण्यात आली होती.

विजय तरूण मंडळाचा ५९ वा गणेशोत्सव आहे,असे असतानातीन पोलिस व्हॅन, लालदिव्यांच्या पोलिस बदोबस्त आधिकारी च्या दहा गाड्या, सीपी, डिसीपी, ऐसीपी, सिनियर पीआय व तीनशे पोलिस एवढे पोलिसबल आणुन रात्री तीन वाजता दडपशाही पद्धतीने कारवाई करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून गेल्या ५९ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव बंद करत असल्याचे मंडळाचे पदाधिकारी विजय साळवी यांनी जाहीर केले, शिवाय या सरकारच्या हिटलरशाही विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे ही सांगितले.त्यामुळे या प्रकारामुळे गणेश भक्तांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे तर विविध स्थरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

नालासोपारा समेळगाव एस टी बॉईज मित्र मंडळाला विजय पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या वतिने टी शर्ट वाटप...

नालासोपारा समेळगाव एस टी बॉईज मित्र मंडळाला विजय पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या वतिने टी शर्ट वाटप... 


वसई, प्रतिनीधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नालासोपारात गणेश मंडळांचा गणपतींचे आगमन उत्साहात पार पडत आहेत, कार्यकर्ते यासाठी जोरदार तयारी करत आहेत. गणेश मंडळांमध्ये टी-शर्टचा ट्रेंड तसा नवीन नाही.


सध्या नालासोपारातील गणेशोत्सव मंडळाचा हा टी-शर्ट चर्चेचा विषय बनला आहे. पूर्वी संस्कृती आणि परंपरेसोबत समाज प्रबोधनाचे कार्यक्रम देखील व्हायचे. मात्र आजच्या या बदलत्या काळात टी- शर्ट वर देखील सामाजिक संदेश देण्यात येत आहे.
यानिमित्त नालासोपारा समेळगावातील एस टी बॉईज ग्रुप मित्र मंडळाच्या मुलांना.....


*श्री. विजय पाटील साहेब, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस,* यांच्याकडून आज टी शर्ट वाटप करण्यात आले.


समेळगाव कॉंग्रेस अध्यक्षा *रूचिता अमित नाईक* यांच्या हस्ते वाटप करण्यात आले....

सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश अवचार यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात, चार ते पाच तालुक्यातून उपस्थिती !

सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश अवचार यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात, चार ते पाच तालुक्यातून उपस्थिती !


कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश अवचार यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तसेच पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.


बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेले रमेश अ. अवचार यांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत ग्रामसेवक म्हणून सुरुवात केली, यानंतर विस्तार अधिकारी, बालविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी अश्या विविध पदावर त्यांनी आतापर्यंत ३६ वर्षे ऐवढी प्रदिर्घ सेवा केल्यानंतर नुकतेच ते मुरबाड पंचायत समिती मध्ये  सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावरून सेवा निवृत्त होत आहेत. त्यांनी अंबरनाथ, डहाणू, पालघर, कल्याण, ठाणे, आणि मुरबाड आदी ठिकाणी सेवा दिली असून, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी इत्यादी हजारो लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.


त्यांच्या या सेवापूर्ती समारंभ सोहळ्यात मुरबाड चे तहसीलदार संदिप आवारी यांनी आपण आपल्या जीवनात श्री अवचार यांना आदर्श माणत असून मी सेवेत असेपर्यंत माझ्या तोंडातून केवळ अभिमानाने त्यांचे नाव निघेल असे सांगितले. तर मुरबाड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी ही त्यांच्या मितभाषी स्वभावाचे कौतुक केले. अश्या गुणी अधिका-याच्या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहणे हे माझे व तूमचं भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.


तर सत्कार सोहळ्याला उत्तर देताना रमेश अवचार हे लाभलेल्या प्रेमामुळे भारावून गेले होते, ते म्हणाले, मी माझ्या आयुष्यात कधी कोणाचे वाईट केले नाही, तशी वेळ आली नाही, ग्रामसेवक किंवा कर्मचाऱ्यांचे काही चुकले तर समजावून सांगितले, लोकांची कामे वेळत पुर्ण केली, दोन शब्द प्रेमाचे व आपुलिचे वापरले तक्रार अजिबात झाल्या नाही, पंचायत राज मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, डेप्युटी सीईओ, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, झेडपी सदस्य, आदी पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले असे बोलून त्यांनी सगळ्याचे त्रुण व्यक्त केले.

यावेळी झेडपी सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, सभापती स्वरा चौधरी, नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे,माझी सभापती श्रीकांत धुमाळ, दत्तू वाघ, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे,आदींची भाषणे झाली,

या सोहळ्याला रामभाऊ दळवी, स्नेहा घरत, अनिल घरत, रिपाइंचे दिनेश उघडे,सिमा घरत, कल्याण चे पत्रकार संजय कांबळे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव नितीन चव्हाण, ठाणे, पालघर, डहाणू, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड येथील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या अधिका-यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास इतकी प्रंचड उपस्थिती हे तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे अनेकांनी सांगितले.

Tuesday 30 August 2022

भिवंडी-कल्याण शिळफाटा सहा पदरी रस्त्याच्या वाढीव खर्चास राज्य शासनाची मान्यता, त्यामुळे होणार वाहतूक कोंडी कमी !

भिवंडी-कल्याण शिळफाटा सहा पदरी रस्त्याच्या वाढीव खर्चास राज्य शासनाची मान्यता, त्यामुळे होणार वाहतूक कोंडी कमी !


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
          भिवंडी ते कल्याण शिळफाटा या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्यासाठी ५६१ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ( एमएसआरडीसी) हा निधी देण्यात येणार आहे.
           भिवंडी ते कल्याण -- शिळफाटा या २१ कि.मि. लांबीच्या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्प अहवालानुसार उड्डाणपुल, रेल्वेवरील पुल, पुलाचे पोचमार्ग, जंक्शन सुधारणा, सूचना फलके व तत्सम अनुशंगिक कामासाठी ३८९ कोटी ६३ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु कल्याण शहरातील रेल्वे पत्री उड्डाण पुलाच्या कामात झालेली वाढ, तसेच रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी क्रांक्रीटीकरणाने सहापदरी रुंदीकरण करणे, इतर नवीन कामांची भर पडल्यामुळे तसेच बांधकाम खर्चात वाढ झाले आहे.
            प्रकल्पाचा एकूण खर्चही वाढला आहे. त्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव एमएसआरडीसीने राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने या आधी एमएसआरडीसीला १०५ कोटी रुपये दिले होते, ते वजा करून उर्वरित ४५६ कोटी ८५ लाख रुपये राज्य शासनाच्या निधीतून एमएसआरडीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई, ठाण्यासह राज्यात या भागात पावसाच्या पुनरागमनाची शक्यता !

मुंबई, ठाण्यासह राज्यात या भागात पावसाच्या पुनरागमनाची शक्यता !


पुणे, प्रतिनिधी :  राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र ३१ तारखे पासून मुंबई पुण्यासह पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात हलका ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला पावसाची हजेरी लागू शकते.

येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ०१ सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात ३१ तारखेपासून ते ५ सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच खानदेश मधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात अडीच लाखावर चाकरमानी..!

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात अडीच लाखावर चाकरमानी..!


सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे गणेशोत्सव अत्यंत मर्यादीत स्वरुपात साजरा करण्यात आला. मात्र, यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध हटवण्यात आल्याने गणेशभक्तांनी जल्लोष केला आहे.

कोकणात गणेशोत्सवाचा तुफान जल्लोष असतो. मुंबई-पुण्यातील अनेक कोकणी मंडळी गणेशोत्सवात आवर्जून गावी जातात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होणार असल्याने रेल्वे गाड्या तुडुंब भरल्या तर आहेतच, शिवाय रस्ते मार्गावरून धावणाऱ्या गाड्याही फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे अगदी उद्यावर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या तयारीसाठी कोकणात वेग आला आहे.

गणेशोत्सवासाठी २७२ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. तर, नियमित ३२ गाड्या आहेत. एसटीच्या ३ हजार ५०० बसेस सोडण्यात आल्या असून १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंग मिळाली असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

दरम्यान, सिंधुदुर्गात आतापर्यंत अडीच लाखावर चाकरमानी दाखल झाले आहेत. 

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तालुक्याध्यक्षपदी राहुल शिंदे !

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या तालुक्याध्यक्षपदी राहुल शिंदे !रत्नागिरी, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देवरूख तालुकाध्यक्षपदी राहूल शिंदे यांची निवड करण्यात आली. समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णात कोरे आणि जिल्हाध्यक्ष सचिन गोवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

याबाबतची सभा मातृमंदिर देवरूख येथे पार पडली. संघटना स्थापनेसाठी जिल्हा प्रधान सचिव सुहास शिगम, युयुत्सु आर्ते, विलास कोळपे यांचे विशेष योगदान लाभले. या शाखा स्थापनेमुळे देवरूख आणि संगमेश्वर येथील भोंदू बाबाकडून होणाऱ्या शोषणाला आळा बसणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

थकित पगार मिळू लागल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे ! कॉम्रेड अमृत महाजन

थकित पगार मिळू लागल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे ! कॉम्रेड अमृत महाजन 


जळगाव, प्रतिनिधी... आज खरया अर्थाने नवीन वाढीव पगार १ महिन्याचा का होईना पगार जमा झाले आहेत अजून थकीत पगार पडत आहेत. सरकारकडे निधीची मागणी केली परंतु तेव्हढा निधी सरकार देवू शकले नाही. पण नवीन वेतन श्रेणी नुसार हा पगार पडला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने १५ ऑगस्ट पासुन मंत्रीमंडळ तयार झाले त्या दिवसापासून आवाज उठवला शेवटी २७ ऑगस्ट अमळनेरचे श्रीपत पाटील व नऊ हुतात्मे यांचा शहीद दिवस पासून कामबंद सुरू केले आणि आता मागील काळाचा फरक ही भेटेल आणि नाही भेटला तर लढाई सुरूच राहील परंतु नवीन दराने पगार पडू लागल्याने कर्मचाऱ्यांचे खूप मोठं समाधान चळवळी मुळे झाले आहे म्हणून सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात येत आहे असे निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नेते काम्रेड अमृतराव महाजन यांनी काढले. आहे त्यात महाराष्ट्र राज्य 
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक चे राज्य अध्यक्ष प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, राज्य सेक्रेटरी कॉम्रेड नामदेवराव चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष मिलींद गणवीर, सखाराम दुर्गुडे, उज्ज्वल गांगुर्डे जिल्यातील तमाम हितचिंतक पत्रकार व संघटनेतील सहकारिंचे आभार मानले आहे.

गणेशघाटासह, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तलाव आणि विविध विकास कामांचे आ. कुमार आयलानी यांच्या हस्ते उद्घाटन !

गणेशघाटासह, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तलाव आणि विविध विकास कामांचे आ. कुमार आयलानी यांच्या हस्ते उद्घाटन !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील म्हारळ, कांबा येथील विविध विकास कांमाचे उद्घाटन आज आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले, यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ गावाकरिता गणेशोत्सव गणपती विसर्जनाकरिता मोठी अडचण येत होती. ही बाब गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख, प्रमोद देशमुख, समाजसेवक महेश देशमुख आदी सदस्यांनी आमदार कुमार आयलानी यांना सागितलं होते. याची दखल घेऊन आज रिजेन्सी अंन्टेलिया येथील स नं ५६ मध्ये गणेशघाटाचे उद्घाटन आज आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कांबा ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पावरहाऊस जवळ व वरप ग्रामपंचायतीला लागून असलेल्या तलावाच्या  सुशोभीकरणाचे उद्घाटन देखील आ कुमार आयलानी यांनी केले.


यावेळी कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसंरपच सदस्य, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता भोईर, वरप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. भगवान भोईर, म्हारळ ग्रामपंचायतीचे सदस्य, मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख, प्रमोद देशमुख, लक्ष्मण कोंगिरे, समाजसेवक महेश देशमुख, बाळा गायकर, वरपचे राजेश भोईर, उल्हासनगरच्या माझी महापौर मिना आयलानी, भाजपाचे महासचिव महेश सुखरामानी,  उल्हासनगर शहर भाजपा अध्यक्ष जमनू पुरुसवानी, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यानंतर उल्हास नदीच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर परिसरात देखील विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार कुमार आयलानी यांनी केले.यावेळी भविष्यात म्हारळ, वरप कांबा परिसरात विविध अडचणी, समस्या, सोडविण्याचे काम तसेच विकास कामांचे उद्घाटन लवकरच होतील असे या भागाचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी सांगितले. तर कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तलाव हा गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होता, याच्या भोवती बांधकाम, जँगीग ट्रँक, आदी सोईसुविधा निर्माण केल्या तर परिसरातील नागरिकांची सोय होईल, असे कांबा गावचे माजी पोलीस पाटील संजय भोईर यांनी सांगितले.

जव्हार बहुजन विकास आघाडी कडुन शाळेत वह्या वाटप !

जव्हार बहुजन विकास आघाडी कडुन शाळेत वह्या वाटप !


जव्हार- जितेंंद्र मोरघा :

माजी खासदार बळीराम जाधव, ज्येष्ठ नेते विल्सन फर्गोस व बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या उपस्थितीत जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद शाळा डोंगरपाडा, पाथर्डी, साकुर ग्रामपंचायत मधील साकुर, आळीव माळ जिल्हा परिषद शाळा येथे बहुजन विकास आघाडी व कै. सिसिलिया यांच्या स्मरणार्थ वह्या वाटप करण्यात आल्या, यावेळी जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी उप अध्यक्ष अनंता धनगरे, नितीन पाटील, सचिव रामचंद्र मौले, सल्लागार काशिनाथ दरोडा, माजी सरपंच सुमित्रा सोळे, माजी सरपंच संजय भला, माजी सरपंच राजेश वातास, ग्रामपंचायत सदस्य दिलीप वाघ,सुनील वळवी, महेश घुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लिना घूटे, सीता घूटे, रवींद्र सुतक, नरेश दोरे या वेळी उपस्थित होते.

Monday 29 August 2022

अवैध गुटखा विक्री प्रकरणी उरण येथे सहा जणांवर कारवाई !

अवैध गुटखा विक्री प्रकरणी उरण येथे सहा जणांवर कारवाई !


उरण, प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटच्या पथकाने प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या उरण भागातील ६ पान शॉपवर गुरुवारी छापा मारून कारवाई केली आहे.

यावेळी शॉपमधील हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करून उरण पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटने गुरुवारी उरणमधील ओएनजीसी रोडवर चारफाटा येथे असलेल्या सहा पान शॉपची तपासणी केली होती. यावेळी येथील पान शॉपमध्ये प्रतिंबधित असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी असा हजारो रुपये किमतीचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने नबाकांता अधेक (४२), पंकज गुप्ता (३८), अमित शर्मा (२९), राहुल गुप्ता (३६), बाबू तौडा (७५) आणि सदानंद नायर (६२) यांच्याविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गणपती उत्सवा दरम्यान वाहतूक विभागाची नियमावली जाहीर !

गणपती उत्सवा दरम्यान वाहतूक विभागाची नियमावली जाहीर !


कल्याण, प्रतिनिधी : गणपती विसर्जनाच्या दिवशी कल्याण शहरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील ३१ पोहच रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला आहे.

या भागात कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नयेत. याशिवाय दीड दिवस, पाच दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातून जड, अवजड वाहनांना सकाळी आठ वाजल्या पासून प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी अधिसूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी सोमवारी काढली आहे.

वाहने उभी करण्यास मनाई असलेले रस्ते......
--------------------------------------------------------------
मुरबाड रस्ता, पौर्णिमा सिनेमा, सिंदीगेट, संतोषी माता रस्ता, कर्णिक रस्ता, रामबाग गल्ली, परळीकर वखार, जुने पोस्ट ऑफीस, डॉ. म्हस्कर रुग्णालय, महमद अली चौक, अहिल्याबाई चौक, जोशी बाग, चंद्रविलास हाॅटेल, गांधी चौक, टिळक चौक, दीपक हॉटेल, गगनसेठ पेडी, बारदान गल्ली, मर्कन्टाईल बँक, दुधनाका, विजय लाॅन्ड्री, पारनाका, लक्ष्मी नारायण मंदिर ते दत्तात्रय मंदिर, भारताचार्य वैदय चौक ते टिळक चौक. अभिनव विद्या मंदिर, सहजानंद चौक, काळी मस्जिद, भाजप कार्यालय रस्ता.

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार !! "राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान"

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार !!

"राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान"
 

नवी दिल्ली, २९  : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी  राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामुनाईकतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत फाउंडेशनचे काम उल्लेखनीय !! *- कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन* *उपळी येथे आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरास मिळाला उदंड प्रतिसाद*

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत फाउंडेशनचे काम उल्लेखनीय !!

*- कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन*

*उपळी येथे आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरास मिळाला उदंड प्रतिसाद*


       सिल्लोड, ( प्रतिनिधी ) : दि.28, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेले आरोग्य सेवेचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी उपळी ( ता. सिल्लोड ) येथे आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले. 


    मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत फाउंडेशन आरोग्य सेवेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत असल्याची भावना मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.


         धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज ( दि.28 ) रोजी सिल्लोड तालुक्यातील उपळी येथे मोफत भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, समाजभान आणि लॉयन्स नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास 51 जणांनी रक्तदान केले तर शेकडो रुग्णाची या शिबिरात आरोग्य तपासणी करून त्यांना उपचार देण्यात आला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सिल्लोड तालुकाप्रमुख सुनील पांढरे तसेच  तालुका उपप्रमुख समाधान गायकवाड यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.


       या शिबिराचे उदघाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे  होते. कार्यक्रमास शिवसेना मदत कक्षाचे मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे, जिल्हा उपप्रमुख अमर लोखंडे, ज्ञानेश्वर गायके,चैतन्य देशमुख, ज्ञानेश्वर गायके, नितीन हिलाल , गोविंद कुमार, डॉ. मोहिज देशपांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, प.स. माजी उपसभापती अजीज बागवान, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतिष ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     कोरोना काळात मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सुविधांनी परिपूर्ण रुग्णवाहिका राज्यभर देण्यात आल्या.   अनेक रुग्णांवर मोफत उपाचार व शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे प्राण वाचले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्य  येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे असेल असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. रुग्णांना शासकीय योजनेसह सामाजिक क्षेत्रातून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना मदत कक्ष काम करीत आहे.  मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे तसेच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रुग्णसेवेचे काम करीत असल्याचे मंगेश चिवटे म्हणाले.

 कार्यक्रमास म्हसला गावचे सरपंच सुखदेव सपकाळ, केरहाळाचे सरपंच  दत्ता कुडके, रवी काळे, मुरलीधर शेजुळ, प्रदीप शेजुळ, राम कुटे, विठ्ठल गायकवाड, योगेश फोलाने, जनार्धन शेजुळ, राजेंद्र शेजुळ, राजीव सुरडकर, गणपत औटी, भगवान फोलाने, ऋषिकेश शेजुळ, बंडू काकरवाल, रामराव फोलाने, पप्पू शेजुळ, काशीनाथ सुरडकर, प्रदीप शेजुळ आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

एक निष्ठावंत कर्मयोगी माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत अनंतात विलीन !!

एक निष्ठावंत कर्मयोगी माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत अनंतात विलीन !!
 

👉कल्याण, ( मनिलाल शिंपी) : एका निष्ठावंत कर्मयोग्याचे निर्वाण माजी शिक्षक आमदार प्रभाकर अनंत संत हे नाव आठवले की आठवतो वयाच्या ९३ वर्षापर्यंत सतत कल्याण मुंबई असा विविध सामाजिक कामासाठी फिरणारा एक कर्मयोगी. लहानपणीच ते संघाचे स्वयंसेवक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असताना वनवासीक्षेत्रात आणि खेडोपाड्यात ग्रामीण विद्यार्थ्यांना हवी तशी शिक्षणाची सुविधा नाही हे पाहून एक स्वयंसेवक म्हणून आपल्याला काय करता येईल असा विचार ते करू लागले. त्यावेळचे विभाग प्रचारक कै. दामुआण्णा टोकेकर, कै. भाऊराव सबनीस, कै.माधवराव काणे, कै. भगवानराव जोशी त्यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करावी असे त्यांच्या मनाने घेतले. आदरणीय जिल्हा प्रचारक कै. दादा चोळकर व भगवानराव जोशी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी छत्रपती शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा व त्यायोगे ठाणे जिल्ह्यात खेडोपाडी शाळा सुरू कराव्यात असा संकल्प केला. सुरुवातीला विनायक प्रिंटिंग प्रेस च्या बाजूच्या जागेत या कामाला सुरुवात केली. नंतर जागा मिळाल्यावर टिळक चौकात अभिनव विद्या मंदिर हे उभे राहिले. त्यानंतर जेथे जेथे जागा मिळेल अशा गावी त्यांनी शाळा उघडण्याचा सपाटा लावला. अनेक संस्थांच्या बंद पडू पाहणाऱ्या शाळा दत्तक घेऊन त्यांनी त्या शाळा चालवल्या, त्यामुळे आज ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळा प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक, तसेच महाविद्याल अशा स्तरापर्यंत सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात शिक्षणाचा पाया भक्कम करणारे शिक्षण महर्षी म्हणून संत सरांचा उल्लेख करावा लागेल.

संतसर हे उत्तम वक्ते, संघटक, लेखक, व अभ्यासू विचारवंत होते. त्यामुळे अनेक संस्थांना संत सरांनी आपल्या संस्थेत काम करावे असे वाटे आणि संत सरांनीही कोणाला कधीही निराश केले नाही. त्यांच्या साहित्य विषयक कामामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या प्रांत कार्यकारणी मध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासद करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य व शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या ठाण्याच्या ब्राह्मण सहाय्यक संघासाठीही त्यांनी खूप मोठा निधी जमा करून दिला. संत सर दरवर्षी सावरकर साहित्य संमेलन हे घेत असत व सावरकर साहित्यावर एक अंकही काढत असत त्याची विक्रीही करत असत. अनेक सामाजिक संस्थांची त्यांनी स्थापना केली. कल्याणच्या काव्य किरण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. आज काव्य किरण मंडळ आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. 
 छत्रपती शिक्षण मंडळाचा कारभार काही वर्षे त्यांनी एका हाती चालवला मा. वसंतराव पुरोहित, मा. सदानंद फणसे, मा. शामराव जोशी व मा. भास्करराव मराठे यांनी छत्रपती शिक्षण मंडळाची धुरा सांभाळल्यावर त्यांनी छत्रपती शिक्षण मंडळाची सुत्रे त्यांच्या हाती देवून दुसरी सामाजिक कामे करण्यास मोकळे झाले.

त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम बघून शिक्षक परिषदेने त्यांना शिक्षक मतदार संघाचे तिकीट दिले. संत सरांचा सर्व महाराष्ट्रातील शाळांमध्ये व शिक्षकांमध्ये असलेला विस्तृत संपर्क यामुळे ते सहजपणे निवडून आले. विधान परिषदेत शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. शिक्षकांसाठी ते कायम उपलब्ध असत. अनेक संदर्भ, अनेक शासकीय निर्णय त्यांना तोंडपाठ असत. अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने त्यांनी विधान परिषदेत शिक्षकांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिला. कल्याणचे लुडस हायस्कूल, इंदिरानगर झोपडपट्टीतील शाळा, आंबेडकर रोडवरील शाळा यासाठीही त्यांनी खूप मेहनत केली. वाचन लेखन भाषण अशा सर्व स्तरांवर त्यांनी कायम लक्ष दिले अत्यंत लोकप्रिय व कार्यरत असणारे अनेक संस्थांना आर्थिक दृष्ट्या प्रबल करणारे कायम पायाला भिंगरी असणारे असे संत सर होते. गेल्या दोन-तीन वर्षात आजारपणामुळे ते कोठेही बाहेर जाऊ शकले नाहीत तरी त्यांचे जमेल तसे वाचन, साहित्य क्षेत्राची माहिती घेणे चालू असे. अत्यंत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या या कर्मयोगाचे वयाच्या ९५ व्या वर्षी सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी चार वाजता त्यांचे चिरंजीव सरस्वती ग्रंथभांडार चालविणारे मनोज संत यांचेकडे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे तिन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संत सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील योगदानाला कधीच विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा डोंबिवली येथे उत्साहात संपन्न !!

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा डोंबिवली येथे उत्साहात संपन्न !!


   👉 कल्याण, (मनिलाल शिंपी) : मुंबई विद्यापीठ ठाणे झोन क्रीडा समिती (Zone III) आणि प्रगती विद्यालय यांच्या डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतर महाविद्यालयीन टेबल- टेनिस स्पर्धा पुरुष व महिला दिनांक 22/8/2022 व 23/8/2022 रोजी प्रगती महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या.


  या स्पर्धे करता उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डोंबिवली विभागाचे "सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील कुराडे साहेब" यांच्या हस्ते पार पडले, खेळामुळे ताण तणाव कमी होतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाडूने कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे तरच भविष्यात आपल्या आरोग्य चांगले राहू शकते व आपण समाजासाठी चांगले खेळाडू घडवू शकतो असे मार्गदर्शन "सुनील कुराडे साहेबां"नी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ रोजी केले, तर 'संस्थेचे कार्यकारणी मंडळाचे सदस्य श्री. भगवान पाटील साहेब' यांनीही खेळाडूसाठी जमा होणारा निधी चांगल्या पद्धतीने खर्च व्हावा व खेळाडूंचा त्यामध्ये विकास व्हावा यासाठी प्रत्येक खेळाडूंनी, प्राचार्यांनी प्रयत्न करायला हवे असे मार्गदर्शन केले, तसेच या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी महाविद्यालयाच्या 'उपप्राचार्य डॉ. अनुजा बापट मॅडम' तसेच मुंबई लेखा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री केशव कुलकर्णी हे उपस्थित होते.


      तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक 23/ 8 /2022 रोजी मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाल्या, या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ "ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ जी पाटील साहेब" तसेच महाविद्यालयाच्या "प्राचार्या डॉ. ज्योती पाहुणे मॅडम" तसेच ठाणे झोन क्रीडा समिती सेक्रेटरी श्री. यज्ञेश्वर बागराव सर, निवड समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत म्हात्रे सर, क्रीडा समिती सदस्य देवयानी लढे मॅडम, गणेश मोरे सर, डॉ. देशमुख सर, आर एस पी कमांडर शिंपी सर तसेच जिमखाना चेअर पर्सन डॉ. धनंजय वानखडे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक श्री लक्ष्मण इंगळे सर यांनी केले.

इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात !

इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात !


प्रतिनिधी / चोपडा :
रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धन कामात सक्रिय असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत शहरातील विविध शाळांमधील ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अतिशय सुंदर मुर्ती त्यांनी बनविल्या.

या कार्यशाळेचे उद्घाटन पंकज माध्यमिक विद्यालय, चोपडाचे मुख्याध्यापक श्री. एम व्ही पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच सह प्रांतपाल नितीन अहिरराव अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख नयन महाजन, समन्वयक पंकज नागपुरे सर, राकेश विसपुते सर व रोटरी सदस्य उपस्थित होते. तसेच नम्रता सावकारे, केतन माळी, प्रमोद वरुडे, निखिल ठाकरे व सुरेश बारेला यांनी विद्यार्थींना शाळू मातीपासून गणेश मूर्ती तयार करायचे प्रशिक्षण दिले.
उत्कृष्ट मुर्ती घडवणार्‍या ५ विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 

गट १ (५ वी ते ७ वी) मधून प्रथम हंसिका पांडुरंग पाटील प्रताप विद्या मंदिर, द्वितीय देवांशी राकेश परदेशी, पंकज ग्लोबल स्कूल तृतीय समृद्धी, भाऊसाहेब चौव्हाण पंकज माध्यमिक विद्यालय, उत्तेजनार्थ रितीशा रणछोड पाटील तर उत्तेजनार्थ शेक रिजवान शेक कमाल या विध्यार्थी यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. तसेच गट २ (८ वी ते १० वी) मधून प्रथम रुद्र नितीन बडगुजर प्रताप विद्या मंदिर, द्वितीय मयुरी गोपाल भामरे प्रताप विद्या मंदिर व चैतन्य गजानन पाटील बालमोहन विद्यालय, तृतीय ओम उमेश चौधरी प्रताप विद्या मंदिर, उत्तेजनार्थ नेहा सतिष लोहार पंकज माध्यमिक विद्यालय तर उत्तेजनार्थ वैष्णवी विठ्ठल शिंदे पंकज माध्यमिक विद्यालय या विध्यार्थी यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.

परिवेक्षक म्हणून वसंत नागपुरे सर व सुनील बारी सर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र पवार सर यांनी केले.

ऐन गणेशोत्सवात कल्याण ग्रामीण भागात डेंग्यूचे 'विघ्न' प्रशासन सतर्क, नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज ?

ऐन गणेशोत्सवात कल्याण ग्रामीण भागात डेंग्यूचे 'विघ्न' प्रशासन सतर्क, नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ८ ते १० ग्रामपंचायत हद्दीत केवळ आँगस्ट महिना अखेर पर्यंत तब्बल १४ डेंग्यू व डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले असून यामुळे ऐन गणेशोत्सव काळात तालुक्यावर डेंग्यू चे विघ्न आले असून यामुळे उशिरा का होईना प्रशासन सतर्क झाले आहे. याशिवाय नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


पावसाने नुकतीच विश्रांती घेतली आहे, परंतु सांडपाणी, कचरा, गटारे, तसेच ज्या ज्या ठिकाणी डेंग्यू च्या डांसाची पैदास होते अशी ठिकाणी उदा पाण्याचे ड्रम, टाक्या, नारळांच्या करवट्ंया, टायर, झांडाच्या कुंड्या, इमारती बांधकाम ठिकाणी येथे विशेष काळजी घेतली जात नाही, शिवाय धुरफवारणी, स्वच्छता, दूषित पाणी आदी बाबतीत ग्रामपंचायती म्हणावे तसे लक्ष देत नाहीअसा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.. याचाच परिणाम तालुक्यातील तब्बल १४ रुग्ण हे डेंग्यू व डेंग्यू संशयित म्हणून गोवेली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यातील काही अजूनही रुग्णालयात आहेत.


तालुक्यातील दहिवली,अनखरपाडा, पोई, कोलम, म्हसरोंडी, पिंपळोली, घोटसई, टिटवाळा आदी भागातील पेंशटांची नोंद गोवेली ग्रामीण रुग्णालयात २९ आँगस्ट पर्यंत झाली असून यातील काही बरे होण्याच्या मार्गावर आहेत तर काहीचे रिपोर्ट हे अद्याप प्राप्त झाले नाहीत,म्हसरोंडी गावातील कु कल्याणी वसंत गुटे ही ११ वर्षाची मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.


*प्रशासन सतर्क-तालुक्यात मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू आदी आजाराचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रसाद भंडारी यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली, यावेळी स्वच्छता,रुग्णांची विचारफूस त्यांना औषध उपचार व्यवस्थित मिळतो का? जेवण, नाष्टा, येतो का? आदी बाबतीत प्रशासनातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या, तसेच काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील दुरावस्थेचे वृत्त पत्रकार संजय कांबळे यांनी दिले होते, ती दुरावस्था दूर केल्याचेही डॉ. भंडारी यांनी सांगितले. तसेच काही कामचुकार व नागरिकांच्या तक्रारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुरबाड येथे हलविण्यात आले असले तरी गोवेली ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ कमी होणार नाही याची ही काळजी घेण्यात येईल असी ही हमी त्यांनी दिली.


तर कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या म्हसरोंडी येथील कु कल्याणी वसंत गुटे पेशंट ची माहिती मिळताच त्यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शशिकांत जाधव, सरपंच, पोलीस पाटील आदीनी  रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, व गावात लवकर धुरफवारणी करण्यात येईल असे सांगितले. या शिवाय नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे अवाहन वैद्यकीय अधिका-यांनी केले.

Sunday 28 August 2022

कल्याण शहरात वाढले अवैध व्यवसाय, अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त ; पोलीस प्रशासनाने तातडीने घ्यावी दखल - महंत तपस्वी प प कर्मयोगी योगीदास पुरी महाराज_

कल्याण शहरात वाढले अवैध व्यवसाय, अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त ; पोलीस प्रशासनाने तातडीने घ्यावी दखल - महंत तपस्वी प प कर्मयोगी योगीदास पुरी महाराज_

"वैयक्तिक स्वार्थासाठी सरकारी यंत्रणेची डोळेझाक.... तरुण पिढी अडकत चालली अनैतिक धंद्याच्या जाळ्यात.... शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या भ्रष्टाचार मुळे देश पुन्हा जाईल गुलामगिरीत असेही म्हणाले मंहत"


कल्याण, प्रतिनिधी - गेल्या काही वर्षात कमी भांडवलात जास्त पैसा कमविणाच्या लालसेपोटी तरुणाई अवैध धंद्याकडे आकर्षित झाली आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे अनेक संसार, तरूण बरबाद होत आहेत. अशा अनैतिक व्यवसाय सर्व नियम धाब्यावर बसवून केले जातात ह्या कडे पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये केली जात आहे.

श्री धुनिवाले गजाजन महारास व्यसनमुक्ती बहुउद्देशी संस्थेचे संस्थापक महंत तपस्वी प. प. कर्मयोगी योगीदास पुरी महाराज यांनी कल्याण दौऱ्यावर असताना व्यक्त केले आहे.

मजूर, नोकरी, व्यवसाय करणारे तसेच लालसेपोटी उच्चशिक्षित तरूण, पुरूष, महिला बळी पडत आहेत. जास्त पैसे कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. छोट्या मोठ्या व्यवसायातून, नोकरीतून, जो पैसा कमविता येणार नाही तो पैसा अवैध धंद्यात सहज कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर गावठी दारूचा व्यवसाय तर सट्टा पट्टी, जुगार हे उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये संतुष्ट नसलेले तरुण, तर मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त अपेक्षा असलेला नोकरदार वर्ग याच्या आहारी गेला आहे. अत्यंत कमी पैशात जास्त पैसे मिळतात यामुळेच या सट्टा, मटका, जुगार, पत्त्यांचे क्लब यांच्या नादी लागून तरुण, संसारी व्यक्ती बरबाद होत आहेत. या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे तर काही आत्महत्या करत आहेत. जागोजागी तरुण पिढी नशेच्या आहारी जातानाही दिसत आहे गोवा गुटका, विमान, चरस, गांजा, गावठी दारू, देशी दारू, एमडी डक्स अशा अनेक नशाला बळी पडतानाही तरुण पिढी ,विवाहित तरुण सामोरे जाताना दिसत आहे, अनेक जागी मेडिकल, पान टपरी येथेही नशेचा कारोबार केला जात आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे सदर या सर्व लोकांचे हप्ते बांधलेले असल्यामुळे पोलीस प्रशासन व शासकीय विभाग यांच्यावर कारवाई करत नाही असेही सूत्रांचे आरोप आहेत. अवैध धंदेवाले फक्त काही महिन्याचा पॅकेज देतात म्हणून सरकारी यंत्रणा त्यावर दुर्लक्ष करणे हा मूर्खपणा ठरतो असेही महंत यांनी राग व्यक्त केला. स्वतःच्या स्वार्थापोटी शासकीय कर्मचारी, अधिकारी अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करून तरूण पिढीला बरबाद करत असेल तसेच लोकांचे संसार उद्ध्वस्त करेल तर या अधिकाऱ्यांमुळे देश गुलामगिरीत जाईल असेही महंत यांनी सांगितले.

या अवैध धंद्याच्या नादी लागुन कित्येक तरुण व नागरिक यांचे आपल्या कामधंद्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास थातूरमातूर कारवाई केली जाते व काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते. संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात हे अवैध धंदे सुरू असून त्यामुळे आता स्वतः माननीय पोलिस आयुक्त यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील अशा धंद्याच्या आहारी गेलेल्या नागरिक व तरुणांकरिता मानसोपचार केंद्र व नशा मुक्त केंद्र उभारण्याची घोषणा श्री धुनिवाले गजाजन महारास व्यसनमुक्ती बहुउद्देशी संस्थेचे संस्थापक महंत तपस्वी प. प. कर्मयोगी योगीदास पुरी महाराज यांनी केली.

संपर्क - डॉ. आदर्श भालेराव ; +91 80707 05552

कोकणाकडे एसटीने दीड लाख जण रवाना ; आज १२४१ गाड्या !!

कोकणाकडे एसटीने दीड लाख जण रवाना ; आज १२४१ गाड्या !!


मुबंई (प्रतिनीधी), गणेश नवगरे :
मुंबईहून गणेशोत्सवानिमित्त यंदा कोकणात जाणाऱ्यांची चाकरमान्याची, गणेशभक्तांची संख्या गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत अधिक असून सुमारे दीड लाखांहून अधिक जण कोकणात रवाना होणार असल्याची माहीती एसटी महामंडळाने दिली. एसटी गाड्यांची मागणी यावेळी वाढली आहे. रविवारी १२४१ हून अधिक गाड्या कोकणासाठी तसेच 
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती विशेष जादा गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ९५१ गाड्यांचे गट आरक्षण (ग्रुप बुकिंग) झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २,५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. 
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना २५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. २७ ऑगस्टला १७८ गाड्या रवाना झाल्या. तर २८ ऑगस्टला १ हजार २४१ आणि २९ ऑगस्टला १ हजार ४४५ एसटी कोकणसाठी रवाना होतील

नांदगाव येथे हिरवा देव आगमनाची जय्यत तयारी सुरू !

नांदगाव येथे हिरवा देव आगमनाची जय्यत तयारी सुरू !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

         नांदगाव पैकी राजेवाडी ठाकूर वाडी येथे हिरवा देव आगमनाची तयारी पूर्ण झाली असून या वर्षी ही हिरवा देवाचा उत्सव ७ दिवस चालणार आहे. हिरवा देव सेवाभावी संस्था नांदगाव (राजेवाडी) यांच्याकडून आदिवासी संस्कृती जतन व्हावी व पुढच्या पिढीला संस्कृती व आपल्या देवता माहिती व्हावी यासाठी गेल्या चार वर्षांपासून या उत्साहाची सुरुवात केली आहे. या वर्षी हिरवा देव उत्सव अध्यक्ष पदी शंकर झुगरे यांची निवड तर उप अध्यक्ष पदी धर्मा बरतड तर सल्लागार म्हणून संजय भला व एकनाथ दरोडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उस्तव पार पडणार आहे तरी या उत्सवाची रूपरेषा
३० तारखेला हिरवा देव व निसर्गाची पूजा करून स्थापना केली जाईल व २/०९/२०२२ तारखेला जागले गुरुजी यांचे समाज प्रबोधन होईल तर ०५/०९/२०२२ रोजी हिरवा देव उत्सवाची सांगता होईल. या उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तरी भाविकांनी या वर्षी ही आपल्या कुल दैवत हिरवा देवाच्या दर्शनासाठी नांदगाव पैकी राजेवाडी येथे अवश्य भेट द्या .

Saturday 27 August 2022

अमळनेरच्या नऊ हुतात्मा अभिवादन करून ; 'ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां'चे काम बंद आंदोलन जिल्ह्यात सुरू !! *नामदार गिरीश महाजन यांना दिले निवेदन*

अमळनेरच्या नऊ हुतात्मा अभिवादन करून ; 'ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां'चे काम बंद आंदोलन जिल्ह्यात सुरू !! 

*नामदार गिरीश महाजन यांना दिले निवेदन*  


जळगाव, बातमीदार : जळगाव जिल्ह्यातील हजार ग्रामपंचायतीत कार्यरत शिपाई, पाणीपुरवठा, क्लार्क, सफाई कर्मचारी, यांना गेल्या चार महिन्यापासून राज्य शासनाकडून पगार नाहीत, ग्रामपंचायत कडून पगाराचे हिस्सा मिळत नाही व ग्रामपंचायत उत्पन्नातून उपस्थित पस्तीस टक्के रक्कम खर्च केले जात नाही. आदि मूळ मागणी सह मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. परंतु कर्मचाऱ्यांकडे शासनाचे लक्षच नाही म्हणून शेवटी २७ ऑगस्ट २०२२ पासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. 


याबद्दल सविस्तर अशी की '२७ ऑगस्ट २०२२' हा अंमळनेरच्या ऐतिहासिक मिल कामगार यांच्या गौरवशाली लढ्याचा  स्मृती दिवस आहे. ७६ वर्षांपूर्वी शेखलाल नथू नावाच्या कामगाराला मिल व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकल्यामुळे त्याच्या नोकरीच्या शाश्वतीसाठी कामगारांनी पाठिंबा दिला व अमळनेर मध्ये चार हजार कामगारांनी मिरवणूक काढली त्यावर गोरा डीएसपी डेविड यांने बेछूट गोळीबार केला त्यात कॉम्रेड श्रीपत पाटील व नऊ सहकारी शहीद झाले त्या शहिदांना अभिवादन करण्यासाठी सकाळी अकरा वाजता लालबावटा ऑफिस बळीराम पेठ या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा वयोवृद्ध कामगार नेते काँ. काळू कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाला कामगार नेते महासंघाचे राज्य सचिव काँ. अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्व हुतात्मा जोरदार घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले.


नंतर उपस्थित कामगारांच्या शिष्टमंडळ जथा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात गेला. तेथे त्यांचे प्रतिनिधी पितांबर भावसार व होनाजी चव्हाण यांना नामदार महाजन यांच्याशी संपर्क केल्यानंतर निवेदन देण्यात आले. निवेदनाची एक प्रत मामा भोळे यांनाही दिली त्यावेळी श्री विनोद आढळते यांनी मदत केली.


नाथाभाऊ यांचे महासंघातर्फे आभार.....

ना. महाजन यांना निवेदन देण्याआधी कर्मचाऱ्यांची बैठक संपर्क कार्यालयात घेण्यात आली तेथे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आमदार नाथाभाऊ खडसे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्हा परिषदेत वर्ग, तीन वर्ग, चार पदी, दहा टक्के आरक्षणाच्या जागा गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत यासाठी जो आवाज उचलला उठवला याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले..


बैठकीत कॉम्रेड अमृत महाजन यांनी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी पुणे येथे जो पाठपुरावा केला.
त्याची माहिती देऊन जिल्हा परिषदेला आणि नामदार ग्रामीण विकास मंत्री यांना काम बंद आंदोलनाचे जे निवेदने दिले. त्याबद्दल माहिती दिली या बैठकीत ठरले असेही की, ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित राहणीमान भत्तासह पगार देतात त्या कर्मचाऱ्यांनी काल्या फिती लावून काम करावे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन नेटाने चालवावे असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले.


नामदार गिरीश महाजन यांना भेटायला गेलेल्या शिष्य मंडळात कॉ. अमृतराव महाजन यांचे नेतृत्वात शेख मोखत्यार, शेख रशीद, महेंद्र धनगर, रवींद्र पाटील, सुरेश पाटील, प्रदीप जोशी, विश्वास पाटील, रतिलाल पाटील, सुभाष सोनवणे, अनिल तडेले राहुल शिंदे, ईश्वर पाटील, नागो पाटील, किशोर इंगळे, जयेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सातपुते, जगदीश कन, देविदास सोनवणे, दिलीप पाटील, गोकुळ पाटील, आदी चोपडा धरणगाव, जळगाव, भुसावल, यावल, या तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...