Monday 29 August 2022

इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात !

इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात !


प्रतिनिधी / चोपडा :
रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धन कामात सक्रिय असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत शहरातील विविध शाळांमधील ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अतिशय सुंदर मुर्ती त्यांनी बनविल्या.

या कार्यशाळेचे उद्घाटन पंकज माध्यमिक विद्यालय, चोपडाचे मुख्याध्यापक श्री. एम व्ही पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच सह प्रांतपाल नितीन अहिरराव अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख नयन महाजन, समन्वयक पंकज नागपुरे सर, राकेश विसपुते सर व रोटरी सदस्य उपस्थित होते. तसेच नम्रता सावकारे, केतन माळी, प्रमोद वरुडे, निखिल ठाकरे व सुरेश बारेला यांनी विद्यार्थींना शाळू मातीपासून गणेश मूर्ती तयार करायचे प्रशिक्षण दिले.
उत्कृष्ट मुर्ती घडवणार्‍या ५ विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 

गट १ (५ वी ते ७ वी) मधून प्रथम हंसिका पांडुरंग पाटील प्रताप विद्या मंदिर, द्वितीय देवांशी राकेश परदेशी, पंकज ग्लोबल स्कूल तृतीय समृद्धी, भाऊसाहेब चौव्हाण पंकज माध्यमिक विद्यालय, उत्तेजनार्थ रितीशा रणछोड पाटील तर उत्तेजनार्थ शेक रिजवान शेक कमाल या विध्यार्थी यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. तसेच गट २ (८ वी ते १० वी) मधून प्रथम रुद्र नितीन बडगुजर प्रताप विद्या मंदिर, द्वितीय मयुरी गोपाल भामरे प्रताप विद्या मंदिर व चैतन्य गजानन पाटील बालमोहन विद्यालय, तृतीय ओम उमेश चौधरी प्रताप विद्या मंदिर, उत्तेजनार्थ नेहा सतिष लोहार पंकज माध्यमिक विद्यालय तर उत्तेजनार्थ वैष्णवी विठ्ठल शिंदे पंकज माध्यमिक विद्यालय या विध्यार्थी यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले.

परिवेक्षक म्हणून वसंत नागपुरे सर व सुनील बारी सर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र पवार सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...