Sunday, 19 January 2025

कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी.कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !!

कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी.
कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !!

** स्मृती फाउंडेशन, कल्याण तर्फे दखल

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीची अनेक स्वप्न दाखवत आहे परंतु अजूनही रस्ते, खड्डे आणि ट्रॅफिक अशा मुलभूत सुविधांसाठी नागरीक ओरड करत आहेत. नोकरदार सकाळी २ तास आणि संध्याकाळी २ तास रेल्वे प्रवास करून‌ आल्यानंतर घरी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनवरून रोज अर्धा तास ते कधी कधी एक तास लागत असेल तर नागरीकांची काय अवस्था असेल हे प्रशासनाला‌ कधी‌ समजणार कल्याण -मुरबाड रोड, कल्याण श्री हाॅस्पिटल -बैल बाजार रोड, कल्याण पुष्पराज हाॅटेल‌ रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दूर्गाडी किल्ला रोड नियमित ट्रॅफिक जाम असते.

अनेक नागरीकांनी कल्याण -बाईचा पुतळा -मुरबाड‌रोड ट्रॅफिक समस्या बाबत तक्रार केली होती त्या अनुषंगाने स्फूर्ती फाउंडेशन‌ अध्यक्ष बजरंग तांगडकर व‌‌ महिला प्रमुख शिल्पा तांगडकर व जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांच्या वतीने वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात त्यामध्ये सॅटिस प्रकल्प काम कधी‌ पूर्ण होणार हा नागरीकांचा प्रश्न आहे जेणेकरून ट्रॅफिक मुळे नागरीकांचा गुदमरलेला जिवास श्वास घ्यायला मिळेल, वाहतूक पोलीसांची संख्या वाढवावी, बेशिस्ती वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अवजड वाहने  सकाळी व‌ संध्याकाळी पूर्णतः बंद असावी, सिग्नल यंत्रणा नियमित चालू असावी अशी मागणी केली आहे.

2 comments:

  1. वाहतूक कोंडी थांबवून ज्या रिक्शा विनाकारण तेथे थांबतात ,कोणतेही भाडे घेत नाहीत,त्यांना बंदी करावी ,आणि प्रवाश्याना भाडे नाकारनाऱ्या वर कारवाई करावी

    ReplyDelete
  2. खरे आहे..one वे आणि पर्याय रस्ता असावा

    ReplyDelete

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !! **इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन  पुणे,...