Thursday, 8 October 2026

कल्याणमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीकडून उत्साहात स्वागत !!

कल्याणमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीकडून उत्साहात स्वागत !!

*कल्याण :* कांबा, कल्याण येथे नियोजित महिला मेळाव्यासाठी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे कल्याणमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले.

प्रवासादरम्यान ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, प्रदेश प्रवक्ते व कल्याण-भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख महेश तपासे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, कल्याण पश्चिम अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष रूपेश थळे, तुषार वैद्य, निखिल कदम, ओम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

याव्यतिरिक्त ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, बजरंग तांगडकर, शिल्पा तांगडकर, शांताराम झावरे, मल्लिकार्जुन बिराजदार, विरेंद्र जाधव, संकेत नरसाळे, सुनील दुबे, बजरंग ढोकरे, शशिकांत पात्रे, लक्ष्मण शिंपी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याणमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीकडून उत्साहात स्वागत !!

कल्याणमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीकडून उत्साहात स्वागत !! *कल्याण :* कांबा, कल्याण येथे नियोजित महिला...