खरांगण येथील शेतकऱ्यांच्या छाताडावर बांधलेल्या केटी बंधा-या मध्ये' शासकीय बाबूचा, भलताच इनस्ट्रेस? वन विभागाकडे तक्रार !!
कल्याण, (संजय कांबळे) : शहापूर तालुक्यातील सोगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खरांगण गावातील'हरड, कुटुंबातील शेतकऱ्यांची चुकीच्या ठिकाणी शाई नदीवर केटी बंधारा बांधल्यामुळे भातशेती वाहून गेली,या विरोधात राम हरड, गणपत हरड यांनी विविध शासकीय कार्यालयात तक्रारी दाखल केल्या यामध्ये संशयित म्हणून एका शासकीय वन कर्मचाऱ्यांने हा बंधारा बांधल्याचा आरोप करण्यात आला होता, तेंव्हा या कर्मचाऱ्यांने आपली बदनामी झाली, केली, अश्या वल्गना करून तक्रारदाराच्या विरुद्ध मानहानी चा दावा दाखल करण्याचा दम दिला होता, परंतु मिडिया मुळे हे प्रकरण तापल्यानंतर, ठेकेदारावर शासकीय दबाव वाढल्यामुळे हाच 'शासकीयबाबू, तक्रारदाच्या नातेवाईकांच्या 'किन्हवली, येथील घरी'वा-या,करीत आहेत, यावरून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या ९८ लाखांच्या केटी बंधा-यामध्ये या वन कर्मचाऱ्यांचा इनस्ट्रेस का वाढतोय? हे न समजण्या इतपत जनता दुधखुळी नक्कीच नाही.
खरांगण गावातील सोनूबाई हरड, राम हरड, गणपत हरड, आण्णा हरड, इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतीलगत मृद व जलसंधारण विभागाने जवळपास९८लक्ष रुपये खर्चाचा शाई नदीवर बंधारा बांधला, विशेष म्हणजे हा बंधारा कागदोपत्री सावरोली (खरपत) इथे दाखवला असला तरी तो प्रत्यक्षात खरांगण येथेच आहे, मग प्रश्न निर्माण होतो जलसंधारण अधिका-यांनी काय केले? बंधारा अंदाजपत्रकातील स्थळ एकच आहे का? स्थळाची जागा बदलली तर वरीष्ठांची परवानगी घेतली का? बंधारा मंजूर करण्यापूर्वी अधिका-यांनी स्थळ निश्चित केले होते का? आदी विविध बाबी समोर आल्या तर अधिकारी व ठेकेदार यांनी कसे संगणमत केले आहे हे समोर येते.यावरही कहर म्हणजे कागदोपत्री ठेकेदार हा शंशिकांत गायकवाड हा आहे, परंतु हे काम केले या वन कर्मचाऱ्यांच्या सुपूत्राने ! या विरोधात तक्रारी झाल्या व मिडियाने हे प्रकरण उचलले तेंव्हा हे वनपाल महाशय म्हणत होते, जा काय करायचे ते करा?माझे वर पर्यंत हात आहेत? मी सर्वांना 'मलिदा, पुरवतो अशी मगरुरीची भाषा वापरणारा हा शासकीय बाबू एका दिवसात जमिनीवर आला, तक्रारीची धार वाढली, पत्रकारांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरताच हा वनपाल हा तक्रादाराच्या किन्हवली येथील नातेवाईकांच्या घरी वा-या करु लागला.
त्यांना ५/१० हजार रुपयांचे आमिष दाखवून हे प्रकरण मिटवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला, परंतु ज्यांचे आयुष्य, जीवन असलेली शेतीच वाहून गेल्याने ते कसे तडजोड करतील, उलट या स्वाभिमानी शेतकऱ्यांने डोलखांब डिव्हिजन च्या या वनपाला विरोधात उपवनसंरक्षक (डिएफ ओ) शहापूर यांच्या कडे यांच्या निलंबनाची व केलेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करण्याची लेखी मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात या शासकीय बाबूवर काय कारवाई होते लवकर कळेल.
प्रतिक्रिया
*गणपत हरड (शेतकरी) खरांगण
आमच्या वर बदनामी चा दावा करणारा हा कर्मचारी आता आमच्या नातेवाईकांकडे तक्रार मागे घेण्यासाठी, आम्हांला आर्थिक आमिष दाखवून तडजोड करण्यासाठी का येतोय, यावरून हे सिध्द होते की हे काम यानेच केले आहे,