नाशिक, गणेश ननगरे (प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अतिशय जोमाने संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे.
नाशिक शहरात देखील पक्ष प्रवेश जोमाने सुरू आहे त्याच अनुषंगाने तृतीयपंथी यांच्या न्याय हक्कासाठी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी विनोद आईसाहेब वाघचौरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष (तृतीयपंथी) आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केली.
विनोद आईसाहेब वाघचौरे यांचा जनसंपर्क समस्त युवा/युवतींमध्ये दांडगा असून संपूर्ण नाशिक शहरात/जिल्ह्यात पक्ष मजबूत करून शाखा उदघाटन कार्यक्रम पार पडणार आहे. विनोद (आईसाहेब) वाघचौरे यांच्या निवडीने समस्त नाशिक शहरातील/जिल्ह्यातील यांच्या संपर्कातील नागरिकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडी प्रसंगी युवा नेतृत्व बिपीन कटारे, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू बागुल, रिपब्लिकन नेते आदेश पगारे, माया कांबळे, दीपक वाघचौरे, स्वप्नील साळवे आदी उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment