Tuesday 30 June 2020

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक की बिनविरोध?

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक की बिनविरोध?


कल्याण (संजय कांबळे) ठाणे जिल्ह्यातील पाच पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची अडिज वर्षाची मुदत संपत आल्याने यांची निवडणूक नुकतीच जाहिर झाली असून मागील प्रमाणे याही वेळी सभापती बिनविरोध निवडणार की निवडणूक होणार हाच खरा प्रश्न आहे.
राज्यासह अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी युती केली. परंतु याला कल्याण तालुका अपवाद ठरला येथे कल्याण पंचायत समितीवर भाजपा ५,शिवसेना ४,आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे एकूण १२ सदस्याचे पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी अशी युती आहे. कल्याण ला देखील शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३असे पक्षीय बलाबल असताना या दोन पक्षाची सत्ता येत असताना वरिष्ठांच्या आशिर्वादाने तालुक्यात अशी काही चक्रे फिरली की सत्तेपासून आम्ही दूर राहणार असा म्हणणारा भाजपा सत्तेत सहभागी होऊन प्रथम उपसभापती पद व नंतर सभापती व उपसभापती अशी एक हाती सत्ता पंचायत समितीवर मिळवली
सध्या कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपा च्या श्रीमती रंजना केतन देशमुख आणि उपसभापती पदी याच पक्षाचे यंशवत दळवी विराजमान आहेत पक्षांतर्गत ठरलेल्या ठरावानुसार अडिच वर्षे मुदत पूर्ण झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी येत्या रविवारी म्हणजे ५जुलै २०२० रोजी पाच तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती /उपसभापती पदाच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
नुकतेच जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये कल्याण पंचायत समिती चे सभापती पद हे सर्वसाधारण महिला यासाठी राखीव असल्याने यावेळी सभापती कोण याबाबतीत चर्चेला उधाण आले असले तरी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे जे नाव निश्चित करतील ते कल्याण तालुक्याचे सभापती होतील हे जवळजवळ फिक्स आहे. त्यामुळे याहीवेळी भाजपा शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणार असेच वाटते आणि हो शिवसेना देखील काही चमत्कार करेल असे तर अजिबातच शक्य नाही कारण "बिगबाॅस" सबकी खबर रखता है! आता प्रश्न इतकाच आहे की निवडणूक की बिनविरोध?

कोरोनाचे संकट नष्ट होवो यासाठी मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडं.

कोरोनाचे संकट नष्ट होवो यासाठी मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडं.



लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. करोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते.


”आपण सगळे जणं माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही ना कोणी अधिकारी. माऊलीच्या समोर सगळे सारखेच आहेत. मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता.मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे. मला नक्की विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे”. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाच्या चरणी साकडं घातलं.

बुधवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यासोबत विठ्ठल मंदिरात सहा वर्षे सेवा करणाऱ्या बडे दाम्पत्याला यावर्षी महापूजेचा मान मिळाला

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी यात्रेवर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे मानाच्या ९ पालख्या या वारकऱ्यांशिवाय पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. तसेच आषाढी वारीसाठी पंढरीत गर्दी होऊ नये म्हणून दि २९ जुलै ते २ जुलै या चार दिवसा करीता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वर्क फ्रॉम होम मुळे लाईट बिलात वाढ ! "ऊर्जामंत्री नितीन राऊत"

वर्क फ्रॉम होम मुळे लाईट बिलात वाढ ! "ऊर्जामंत्री नितीन राऊत"


मुंबई : लॉकडाऊनदरम्यान वाढलेलं वीज बिल ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यासंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत लोकांच्या मनतील प्रश्नांची उत्तरं दिली. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज बिलात वाढ दिसून येत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा ग्राहकांना देण्यात येत आहे. तसेच संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार असल्याची माहितीही नितीन राऊत यांनी दिली.

विजेच्या बिलासंदर्भात लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. वीज नियामक आयोगाने सूचना दिल्या आहेत. MERC ने दारोदारी जाऊन रीडिंग घेतलेलं नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे सरासरीपेक्षा कमी रीडिंग घेऊन एप्रिल, मे महिन्यात बिल आकारण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल व मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज दरात वाढ दिसून येत आहे, असं नितीन राऊत यांनी म्हटलं. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता क्षेत्रीय कार्यालयात मदत केंद्रात नेमलेले आहेत. त्यानुसार ग्राहकांना समजवण्याचं काम सुरू आहे.

"ग्राहकांसाठी सवलती"

*थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात येत आहे.
*एक तृतीयांश बिल भरले तरी वीज कापण्यात येणार नाही.
*संपूर्ण वीज बिल एकत्र भरल्यास 2 टक्के सूट देण्यात येईल.
*जे लोकं घर सोडून बाहेर होते, त्यांची माहिती मिळाल्यास त्यांच्या मीटरमध्ये करेक्शन करून रिडींग घेतली जाईल.
*वीज मीटर बिघाड झाला असल्यास दुरुस्ती करून देण्यात येईल.
*महावितरण कार्यालयात जाण्याची कोणतीही गरज नाही.
*ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेच्या वीजबिल भरले असल्यास त्यांना देखील ती सूट देण्यात येईल.

"एनयुजे महाराष्ट्र ची वर्तमानपत्रांना आर्थिक सहायतेबाबत भूमिका"

"एनयुजे महाराष्ट्र ची वर्तमानपत्रांना आर्थिक सहायतेबाबत  भूमिका"


 मुंबई : "मा खासदार राहुल शेवाळेजी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री प्रकाश जावडेकरजी यांचे कडे नोंदणीकृत वर्तमानपत्रांसाठी १ते ५लाख रुपये  आर्थिक मदत देण्याची मागणी केली ,त्याबद्दल त्यांचे आभार मानतो!"
मात्र आपल्या  वर्तमानपत्रातील लोकशाहीचा सच्चा पाईक, चौथा स्तंभ असणार्‍या कर्मचाऱ्यांवर 
कोरोना संकटाच्या निमित्ताने  भयंकर अन्याय केला आहे, 
भांडवलदारी आणि प्रसार माध्यमांचे नाव वापरून आपले वैयक्तिक फायदे आजवर करून, इतर अनेक फायदे घेतले आहेत अशांची सर्वप्रथम चौकशी होणे अत्यावश्यक आहे! 
कोरोनाचे निमित्ताने आर्थिक  संकटातील प्रसार माध्यमांना बळकटी देण्यासाठी सर्व  प्रकारच्या सहायतेची तातडीने गरज असल्याचे निवेदन सर्वात आधी एनयुजे महाराष्ट्र ने मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि  महाराष्ट्र राज्य सरकारला दिले. 
एनयुजे इंडिया ने मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं,मा सोनिया गांधीजी तसेच सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठवले! 
आमची आग्रहाची भूमिका आहे की आर्थिक मदत न्याय्य असावी! 

१)पत्रकार व इतर कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकणे
२)राजीनामा देण्यास जबरदस्ती करणे
३)आपल्या वर्तमानपत्राच्या आवृत्या बंद करणे
४)हक्काचे पगार न देणे
५)पगारात कपात करणे

असे अनेक प्रचंड अन्याय कारक प्रकार करुन सरकारच्या आदेशाला हरताळ फासले आहेत. 
या सगळ्यांना काळ्या यादीत टाकावे. 
आर्थिक  सहायता ही छोट्या, मध्यम दैनिक,साप्ताहिकांना द्यावी, सरकारी यादीवर नसलेलेही यात असावेत. 
मा खा. राहूलजी शेवाळे आपले पुनश्च आभार! 

शीतल करदेकर 
*अध्यक्ष नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र*
*संलग्न :एनयुजे इंडिया, नवी दिल्ली*
*सदस्य :इंटरनँशनल फेडरेशन आँफ जर्नालिस्टस्, ब्रुसेल्स*

"आज जाहीर केलेली मदत तुटपुंजी, गरिबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. थेट जमा करा" महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.

"आज जाहीर केलेली मदत तुटपुंजी, गरिबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. थेट जमा करा" महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.


मुंबई, दि. ३० जून २०२०,ज्या पद्धतीने भाजप नेत्यांकडून पंतप्रधानांच्या राष्ट्र संबोधनाचा उदो उदो करण्यात आला होता. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग व लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्यांसाठी भरीव मदत, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची घोषणा करतील व सीमेवर आगळीक करणा-या चीनला लाल डोळे दाखवतील अशी अपेक्षा होती मात्र पंतप्रधानाच्या संबोधनातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी घाणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गरीब वर्गाकरिता प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्याची योजना लागू करण्यात आली होती. आपल्या देशातील शेतक-यांच्या मेहनतीने देशात प्रचंड मोठा अन्नधान्याचा साठा उपलब्ध असल्याने काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी सदर योजना सप्टेंबर पर्यंत वाढवावी अशी मागणी केली होती. अगोदरच्याच योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय हा प्रशासकीय असल्याने राष्ट्र संबोधनाची आवश्यकता नव्हती, पण कदाचित बिहारच्या निवडणुका पंतप्रधानांकरिता महत्वाच्या असाव्यात म्हणून त्यांनी स्वतः या योजनेला दिलेली मुदतवाढ जाहीर केली असावी. परंतु गोरगरिबांना अन्नाव्यतिरिक्त इतरही गरजा असतात, त्यांचे काय? याबद्दल पंतप्रधानांनी अवाक्षरही काढले नाही. पाच किलो गहू किंवा तांदूळ व एक किलो चना ही मदत अत्यंत तुटपुंजी असून रोजगार गेलेल्या गरिबांचे कुटुंब महिनाभर यावर चालणार नाही. गरिबाचे घर चालवायचे असेल तर त्यांना रोख मदत देण्याची आवश्यकता आहे. राहुलजी गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. एवढी मदत थेट द्यावी तरच त्यांचे घर सुरळित चालेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

नोव्हेंबर पर्यंत कोरोनाचे संकट राहणार आहे, अशी अप्रत्यक्षच कबुलीच पंतप्रधानांनी आज दिलेली आहे. त्यामुळे गरिबांसाहित मध्यमवर्ग, नोकरपेशा व बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. कोरोना संदर्भात देश समाधानकारक कामगिरी करत आहे. असे आश्चर्यकारक विधान पंतप्रधानांनी केले. कोरोनाच्या रूग्णसंख्येत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पंतप्रधानांकडे कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे. चीनच्या संदर्भात पंतप्रधान ठोस भूमिका घेतील ही देशवासियांची अपेक्षा देखील फोल ठरली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले

केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांसह ‘या’ कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मंजुरी !!

केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांसह ‘या’ कर्मचाऱ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मंजुरी !!


मुंबई : मुंबईत उपनगरीय लोकल ट्रेन्समधून केंद्रीय, राज्य सरकारचे कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसंच राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी, राज भवन कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश आहे. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनीही लोकलने प्रवास करता येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ही मुभा १ जुलै म्हणजेच बुधवारपासून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर बुधवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढही करण्यात आली आहे असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

कुणाला देण्यात आली लोकल प्रवासाची मुभा?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करु शकतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकू ण २०० लोकल फेऱ्या होतात. त्यात आणखी १५० फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे १ जुलैपासून मध्य रेल्वेवर ३५० लोकल फेऱ्या होतील.

पश्चिम रेल्वेवरही २०२ लोकल फेऱ्या होत असून यामध्ये बुधवारपासूून १४८ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही ३५० फेऱ्या होणार आहेत. राज्य सरकारने निश्चिात केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकलमधून प्रवास करु शकतील. त्याव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालय कर्मचारी यांनाच लोकल प्रवासाची मुभा होती. त्यात आणखी काही प्रवाशांची भर पडणार आहे.

मोटार अपघात प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय !"भविष्यातील संभाव्या मिळकतीचा विचार केला गेला नाही"

मोटार अपघात प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय !!
'हायकोर्टाने शेवटच्या रिटर्नवरील मिळकतीचा विचार न करण्याची केली चूक'

दिल्ली - मोटार अपघात प्रकरणी सुप्रीम कोर्टात अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विद्यमान कमाईत भविष्यातील संभाव्य संपूर्ण कमाई जोडूनच नुकसान भरपाई दिली जावी असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अपघातात मृत्यू पावलेल्या उत्तराखंडातील पीडित कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय देताना नुकसानभरपाईच्या रकमते सुप्रीम कोर्टाने वाढ केली आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्या वाहनाची विमा कंपनीनी ही वाढलेली १७ लाख ५० हजार रुपये इतक्या नुकसान भरपाईची रक्कम द्यावी. या बरोबर या रकमेवर साडे सात टक्के व्याजही दिले जावे, असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. विशेषाधिकाराचा प्रयोग करत नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्याशिवाय पीडितांना संपूर्ण न्याय मिळणार नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

'हायकोर्टाने शेवटच्या रिटर्नवरील मिळकतीचा विचार न करण्याची केली चूक'

उत्तराखंड हायकोर्टाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या शेवटी भरलेल्या आयकर परताव्याचा विचार न करून चूक केली आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीने हा परतावा मृत्युपूर्वी दाखल केला होता. यात त्याने आपली मिळकत वार्षिक १ लाख रूपये असल्याचे सांगितले आहे. हायकोर्टाने त्यापूर्वीच्या तीन मिळकत पराव्याचा सरासरी ५२६३५ रुपये इतकी वार्षिक मिळकत असल्याचे मानले. ही हायकोर्टाची चूक असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तर कनिष्ठ न्यायालयाने आयकर परतावा २००६-०७ ची मिळकत ९८५०० असल्याचे मान्य केले होते. मात्र त्यात भविष्यातील मिळकत जोडली नव्हती.

"भविष्यातील संभाव्या मिळकतीचा विचार केला गेला नाही"

सु्प्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने हा निर्णय दिला. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव हरीश असे असून त्याने सन २००६-०७ मध्ये दाखल केलेल्या आयकर परताव्यात आपली वार्षिक मिळकत १ लाख रुपये असल्याचे म्हटले होते. हा परतावा त्याने मृत्युपूर्वी दाखल केला होता. हा परतावा त्याने २० एप्रिल २००७ या दिवशी दाखल केला होता. तर हरीशचा मृत्यू १८ जून २००७ ला झाला होता. त्यावेळी त्याचे वय ३५ वर्षे इतके होते. हरीशवर त्यांची पत्नी, मुले आणि आई-वडील अवलंबून होते. खालच्या न्यायालयाने एक लाख रुपये वार्षिक मिळकतीच्या हिशेबाने एकूण नुकसान भरपाई १२ लाख ५५ हजार इतके ठरवले. मात्र यात हरीश यांच्या भविष्यकालीन मिळकतीचा उल्लेख केलेला नव्हता.

कोरोनाचा वाढता ‌प्रादुर्भाव पहाता ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर !!

कोरोनाचा वाढता ‌प्रादुर्भाव पहाता ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर !!


कल्याण - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहे असं सांगितलं. दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधला लॉकडाउन वाढतोय असंच चित्र आहे. कारण नाशिक, ठाणे या शहरांपाठोपाठ आता कल्याण डोंबिवलीतही १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लॉकडाउन होणं गरजेचं आहे असं महापालिकेने म्हटलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २ जुलै २०२० च्या सकाळी ७ पासून १२ जुलै २०२० च्या सकाळी ७ पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे महापालिकेने?

अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंची ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरता कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन.

सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही. टॅक्सी, रिक्षा यांनाही परवानागी नाही. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीची परवानगी असेल.

सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोर पालन करणं बंधनकारक

ज्या व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्या नियमाचे पालन बंधनकारक, त्या व्यक्तीने अगर तिच्या कुटुंबीयांनी पालन केले नाही तर कारवाई होणार

सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी ५ लोकांपेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी नको

व्यावसायिक आस्थापना, कार्यालये, कारखाने, गोदाम इ. सर्व दुकाने यांचे कामकाज बंद राहणार. मेडिकली संबंधित, सतत प्रक्रिया अशा आवश्यक असलेल्या उत्पादनं आणि उत्पादक युनिट्सना संमती

सरकारी कार्यालये कमीत कमी कर्मचाऱ्यांसह चालवण्याची परवानगी असणार आहे. चेक काऊंटर पासून आणि एकमेकांपासून ३ फूट अंतर ठेवणं बंधनकारक

अत्यावश्यक वस्तू, सेवा प्रदान करणाऱ्या दुकाने, आस्थापनांना वरील प्रतिबंधातून वगळण्यात आलं आहे..

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दूध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपा इत्यादी खाद्यपदार्थ दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरु राहतील.

मेडिकल स्टोर्स, रुग्णालयं, दवाखाने, गॅस सिलेंडर पुरवठा, उद्ववाहन दुरुस्ती यांच्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही

दूध विक्रीची दुकानं पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत सुरु ठेवून विक्री करता येईल

अशा सगळ्या सूचना देऊन २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत कल्याण डोंबिवलीतही लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

"राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार" सेवानिवृत्त सचिव अजोय मेहता यांच्याकडून स्विकारला पदभार !!

"राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार" सेवानिवृत्त सचिव अजोय मेहता यांच्याकडून स्विकारला पदभार !!


मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. करोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला आपले प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याप्रसंगी सहकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले. 

गेल्या चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन करोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपाययोजनांची यापुढेही प्रभावीपणे अमंलबजावणी केली जाईल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाच राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळा सुरू झाला आहे. याकाळात रोगराईचे प्रमाण वाढू शकते. ते रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील, असे पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी मेहता यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान, मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर उद्यापासून नवी जबाबदारी असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून ते उद्यापासून काम पाहणार आहेत.

"३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव"

संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या तुकडीचे असून आतापर्यंतच्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. १९८५ मध्ये अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांची त्यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९७ मध्ये उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेचे प्रकल्प समन्वयक, उर्जा नियामक आयोगाचे सचिव, पुणे महापालिका आयुक्त, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष, औरंगाबाद विभागीय आयुक्त, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले तर महिला व बालकल्याण, गृहनिर्माण या विभागांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता.

मुरबाड मध्ये कोरोनाचा दुसरा बळी ?कँन्सरग्रस्त रुग्णाचा कोरोनामुळे म्रुत्यु,तालुक्यात 43 कोरोनाग्रस्त,तर आज नव्याने एका रुग्णाची वाढ !!

मुरबाड मध्ये कोरोनाचा दुसरा बळी ?कँन्सरग्रस्त रुग्णाचा कोरोनामुळे म्रुत्यु,तालुक्यात 43 कोरोनाग्रस्त,तर आज नव्याने एका रुग्णाची वाढ !!


मुरबाड ( मंंगल डोंगरे )   एकीकडे मुरबाडमध्ये कोरोनाचा थैमान थांबत नाही, त्यात आज मृतांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.
  मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती कॅन्सरवर उपचार घेऊन घरी परतले होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दि. २१ जून रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बदलापूर येथील आशीर्वाद या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. व्हेंटिलेटरच्या सहाय्याने त्यांच्यावर  उपचार सुरू असतांना काल दुपार पासून त्यांची प्रकृती खालावली. मात्र रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांनी प्राण सोडला.
  
  त्यांचे शव स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेऊन दहन केले. मुरबाड शहरातील हा दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मृत झाल्याची घटना आहे.
   
  दि. २५ जून  रोजी त्यांच्या ५० वर्षीय पत्नीची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सद्या त्यांना ठाणे येथील सेंट मेरी या कोरोन्टाईन सेंटरमध्ये रवाना करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याच कुटुंबातील इतर ५ व्यक्तींचे रिपोर्ट काल निगेटिव्ह आले आहे. तर अद्याप ६ रिपोर्ट बाकी असल्याचे समजते.
[मुरबाड तालुक्यातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत तालुका आरोग्य अधिका-यांशी संपर्क साधला असता,या वाढत्या रुग्ण संख्येवर तालुक्यात अजूनही कुठलीही ठो, उपाय योजना उपलब्ध नसुन नगरपंचायत व ग्रामपंचायत ने याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लोकांना घरातच रहा, सुरक्षित अंतर ठेवा,स्वतःची काळजी घ्या. अशा सुचना वारंवार देणे गरजेचे असल्याचे सांगितले.]
         मुरबाडच्या बाहेर अद्याप ही उपचाराच्या योग्य सोयीसुविधा नाहीत. करोडपती व्यक्ती पैसे असून ही उपचारापासून वंचित असल्याच्या घटना समजत आहेत.  [ या आजारापेक्षा त्याचा उपचार जीवघेणा असे,  म्हणणे आता चुकीचे ठरणार नाही. कृपया घरातच राहा, सुरक्षित राहा! ]

मृत संख्या = २
 

Monday 29 June 2020

कल्याण-डोंबिवलीतील ३२ प्रभागांत निर्बंध!! "नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रहिवासी, व्यापारी, वाहनचालकांवर कारवाईचे आदेश"

कल्याण-डोंबिवलीतील ३२ प्रभागांत निर्बंध!!

"नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रहिवासी, व्यापारी, वाहनचालकांवर कारवाईचे आदेश"


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर करोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेले नियम धुडकावणाऱ्या रहिवासी, व्यापारी, वाहनचालकांवर कठोर कारवाईचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रुग्णसंख्या वाढत असलेल्या प्रभागांची सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी बेशिस्त वागणाऱ्यांची अजिबात गय करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत आहेत. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. यामुळे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून प्रशासनाने शहरातील करोना रुग्णसंख्या अधिक असलेले ३२ प्रभाग तीव्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या प्रभागाच्या चारही सीमा पालिका, पोलिसांनी बंद करू टाकल्या आहेत. या प्रभागातून अत्यावश्यक सेवा वगळता कोणाही रहिवाशाला बाहेर पडण्यास मुभा देण्यात आलेली नाही. या क्षेत्रात जाण्यास मज्जाव केला जात आहे.

पोलिसांची पथके चौकांमध्ये दुचाकी, चारचाकी, खासगी वाहनांची तपासणी करून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी मुभा देत आहेत. अनावश्यक वाहने रस्त्यावर आणणाऱ्यांवर दंड, वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे.

प्रतिबंधित क्षेत्र प्रभाग

मांडा, मोहने, गौरीपाडा, चिखलेबाग-मल्हारनगर, गोविंदवाडी, रोहिदासवाडा, जोशीबाग, विजयनगर, आमराई, तिसगाव, दुर्गानगर, कोळसेवाडी, चिकणीपाडा, गणेशपाडी, जरीमरीनगर, शिवाजीनगर, आनंदनगर, चोळेगाव, शिवमार्केट, सावरकर रस्ता, सारस्वत वसाहत, रामनगर, म्हात्रेनगर, तुकारामनगर, सुनीलनगर, गांधीनगर, पिसवली, ठाकूरवाडी, नवागाव, कोपर रस्ता, नांदिवलीतर्फ पंचानंद.

अत्यावश्यक दुकानेच सुरू

प्रतिबंधित क्षेत्रात औषध दुकाने, सिलेंडर पुरवठा, रुग्णालय सुरू राहणार आहेत, तर दूध, बेकरी, किराणा, भाजीपाला ही दुकाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्व प्रकारची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. दुकानदारांनी घरपोच सेवेला प्राधान्य द्यावे. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवरून विक्री व्यवहार करावा, असे आदेश आयुक्त सूर्यवंशी यांनी दिले आहेत

महात्मा ज्योतिबा फुले ‌जनआरोग्य योजनेतून दिड लाख कोरोनाबाधितांवर मोफत उपचार!

महात्मा ज्योतिबा फुले ‌जनआरोग्य योजनेतून दिड लाख कोरोनाबाधितांवर मोफत उपचार!

मुंबई : राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार करोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

या योजनेच्या माध्यमातून करोनाकाळात कर्करोग, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या तब्बल १ लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. तर सर्व रुग्णालयांमध्ये २५ जूनपर्यंत १ लाख ९८५ कोरोनाबाधिंतावर मोफत उपचार करण्यात आले. या काळात खासगी रुग्णालयात १८,२२८ तसेच केंद्र शासनाच्या, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या आरोग्य केंद्रात २,७७८ असे एकूण १ लाख २१ हजार ९९१ रुग्णांवर उपचार झाले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सामान्य रुग्णांना जीवनदायी ठरत असून मोठ्या खर्चाचे वैद्यकीय उपचार तेही मोफत घेणे या योजनेमुळे शक्य झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

करोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने २३ मे रोजी या योजनेची व्याप्ती नव्याने वाढवली. राज्यातील सर्वांचाच समावेश योजनेत करण्यात आला. पांढरी शिधापत्रिका असलेल्या लोकांनाही या योजनेंतर्गंत ३१ जुलैपर्यंत लाभ घेता येणार आहे. योजनेचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

जनआरोग्य योजनेचा विस्तार करताना त्यात सहभागी रुग्णालयांची संख्या ४५० वरून १,००० करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त उपचारांचा लाभ घेता येईल, यासाठी या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी नव्याने निविदा काढताना ज्या आजारांचा लाभ फारच कमी लोक घेतात असे आजार काढून या योजनेत नवीन आजारांचा समावेश केला. विशेष म्हणजे महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात गुडघे बदल शस्त्रक्रियेसह १२० प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची योजना यात सहभागी करून घेण्यात आली.

या योजनेसंदर्भात तसेच नजिकच्या सहभागी रुग्णालयांविषयी अधिक माहितीसाठी योजनेच्या सात दिवस २४ तास सुरू असणाऱ्या १५५३८८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी कले आहे.

अवाच्या सव्वा दराने आलेल्या विज देयकांमुळे नागरिक हैराण !!

अवाच्या सव्वा दराने आलेल्या विज देयकांमुळे नागरिक हैराण !!

मुंबई : करोनाकाळात सर्वसामान्यांची आर्थिक गणिते कोलमडली असतानाच, अवाच्या सवा दराने आलेल्या वीज देयकांमुळे महावितरणविरोधात सध्या राज्यभर तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र, टाळेबंदीच्या काळात वाढलेला वीजवापर आणि एप्रिलपासून वाढलेले वीजदर यामुळे वीज देयकांत लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे आधीच्या दोन महिन्यांतील सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापर यांच्यातील फरकाची रक्कमही देयकांत जोडण्यात आल्याने नागरिकांवर भार वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.

करोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने महावितरणने गेले दोन महिने ग्राहकांना सरासरी वीज देयके पाठवली. मार्चमध्ये वीजवापराची नोंदणी घेणे, मीटरवाचन बंद पडल्याने सरासरीसाठी जानेवारी, फे ब्रुवारी या महिन्यांतील वीजवापर गृहीत धरला गेला. त्या काळात थंडीमुळे वातानुकू लन यंत्रे, पंखे यांचा वीजवापर तुलनेत कमी असतो. मात्र एप्रिल, मे व जून महिन्यात वाढत्या उन्हामुळे वीजवापर वाढतो. एरवीसुद्धा उन्हाळ्यात घरगुती ग्राहकांचा वीजवापर किमान ३० ते ४० टक्के वाढतो. त्यातच टाळेबंदीमुळे यंदा या महिन्यांत नागरिक घरांतच असल्याने विजेचा वापर आणखी वाढला. त्याचेच प्रतिबिंब वीज देयकात पडत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता टाळेबंदी शिथिल झाल्याने सर्वच वीजवितरण कं पन्यांनी वीजग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीज देयक आकारणी सुरू के ली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील वाढीव वीजवापराचे फटके वीज देयकात दिसत आहेत. शिवाय एप्रिलपासून वीजदरात बदल झाले. त्याच्या जोडीला गेल्या दोन महिन्यांतील सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापरातील तफावतीची रक्कमही त्या वीज देयकात समाविष्ट आहे. वास्तव समजून घेऊन वीज ग्राहकांनी आपले वीज देयक तपासले पाहिजे. मीटरवाचनात चूक झाली असेल तर जरूर तक्रोर करावी, पण वीज कं पनी चुकीचेच वीज देयक देत आहे, असा गैरसमज करून घेऊ नये, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी स्पष्ट केले.

मुंबईत सर्वसामान्यांना दोन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासाला मज्जाव!

मुंबईत सर्वसामान्यांना दोन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासाला मज्जाव!

मुंबई : टाळेबंदी शिथिल झाल्यापासून मुंबईतील रस्त्यांवर होत असलेल्या वाहनांच्या, पादचाऱ्यांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवी ‘लक्ष्मणरेषा’ आखून दिली आहे. रहिवास क्षेत्राच्या दोन किलोमीटर परिघाबाहेर मुक्त संचार करण्यास नागरिकांना पोलिसांनी मज्जाव केला आहे. अत्यावश्यक सेवा किंवा नोकरीवर जाणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस कारवाई कुणावर व कशी करणार, याविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

या र्निबधांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तसेच निर्बंध झुगारणाऱ्यांविरोधात कारवाई होईल, असे पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी स्पष्ट केले. रविवारी हे निर्बंध लागू होताच पोलिसांनी उत्तर मुंबईसह शहरात जागोजागी नाकाबंदी करून विनाकारण फिरताना आढळलेल्या पाच हजार वाहनचालकांवर कारवाई केली.

सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनोय चौबे यांनी सांगितले की, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. घराजवळील बाजारात खरेदी करण्याऐवजी लांब अंतरावरील बाजारात जाणे, व्यायामाच्या निमित्ताने समुद्रकिनारी फिरायला जाणे या प्रकारांमुळे अशा ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. याखेरीज, बाजारांत सामाजिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे या र्निबधांचेही पालन होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता नागरिकांच्या मुक्त संचारावर निर्बंध आणण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे.

र्निबधांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांना आपापल्या हद्दीत नाकबंदीसह कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. नाकाबंदीत अडवून कुठून आले, कुठे जाणार, का प्रवास करत आहात, अशी चौकशी करण्यात येणार आहे.

नियम काय?

’घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मुखपट्टी अनिवार्य आहे.

’घरापासून फक्त दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या बाजारपेठा, दुकाने इत्यादी  ठिकाणी जाता येईल. व्यायामही याच मर्यादित परिसरात करावा.

’कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ही मर्यादा ओलांडता येईल. सामाजिक अंतराचा नियम न पाळणारी दुकाने बंद केली जातील.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.!

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.!


१ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाउन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे : १ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू होईल. १ जुलै ते ११ जुलैपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. भाजी तसंच मासळी बाजारदेखील या काळात बंद असतील. मुंबईला ये-जा देखील करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून यामुळे करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण ठाण्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु होती. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. पण अखेर आज पोलीस आणि महापालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर लॉकडाउनचा अधिकृत आदेश देण्यात आला आहे.

"राज्यातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला"!

"राज्यातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला"!


मुंबई :-प्रतिनिधी 
राज्यातील लॉकडाउन 30 जुनपर्यंत असून पुढे काय, असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला होता. राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत आहे, मात्र अद्यापही जिल्हाबंदी कायम आहे. त्यातच, एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे, जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनेतशी संवाद साधत कोरोनाविरुद्धची पुढील रणनिती सांगितली. 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
त्यानंतर, राज्यातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे.
राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाउन वाढवला आहे.
राज्यातील कंटोनमेंट झोन क्षेत्रात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, 31 जुलैपर्यंत हा लॉकडाउन वाढविण्यात आला असून मिशन बिगेन अगेननुसार हळू हळू सेवा सुरूळीत करण्यात येतील. मात्र, शासनाचा आदेश येईपर्यंत हा लॉकडाउन आणि केवळ अत्यावश्यक सुविधा व शिथिलता देण्यात आलेल्या आस्थपनाच सुरु राहणार आहेत.

माणगांव तालुका बाजारपेठ बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा मा.सागर भालेराव(रायगड जिल्हा महासचिव)!

माणगांव तालुका बाजारपेठ बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा मा.सागर भालेराव(रायगड जिल्हा महासचिव)!
   
   
         बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  रायगड जिल्ह्यातील माणगांव  तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता माणगांव तालुका नगरपंचायत मध्ये सर्वपक्षीय आणि सर्व संघटना आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत माणगांव बाजारपेठ स्वयंस्फुर्तीने २९ जून २०२० ते ०३जुलै २०२० पर्यंत बंद राहील असा निर्णय माणगांवच्या जनतेने आणि व्यापाऱ्याने घेतला आहे.      
       सदर निर्णय घेणे अत्यंत गरजेचे होते यातून माणगांव मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. तरी या निर्णयाचे स्वागत करत याला वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा जाहीर पाठीबा देत आहे.
     या निर्णया विरुद्ध जर कोणी वंचित बहुजन आघाडीचे नाव वापरून विरोध करत असेल तर ती त्यांची व्यक्तिगत भूमिका असेल,आणि पक्षाच्या नावाचा उपयोग करून जर कोणी पक्ष  भूमिके विरुद्ध भूमिका मांडत असेल तर अशा  व्यक्तिवर वंचित आघाडी रायगड जिल्हा अध्यक्षांच्या आदेशाने माननीय  सागर भालेराव (रायगड जिल्हा महासचिव)कारवाई करणार आहेत. असे पत्रकाना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जाहीर केले.

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी CSR अॅक्टिविटी मधून उपलब्ध झालेल्या दोन हजार सिमेंट पत्र्यांचे माणगांव आणि म्हसळा तालुक्यातील शाळांमध्ये वाटप!

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी CSR अॅक्टिविटी मधून उपलब्ध झालेल्या दोन हजार सिमेंट पत्र्यांचे माणगांव आणि म्हसळा तालुक्यातील शाळांमध्ये वाटप!



      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  सोमवार दिनांक २९ जून रोजी रायगड जिल्ह्यातील माणगांव आणि म्हसळा तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळग्रस्त शाळांना आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या बाबत सविस्तर वृत्त असे की, महाड MIDC मधील लक्ष्मी ऑर्गनिक कंपनीच्या माध्यमातून आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या मागणी नुसार सदरपत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे
      निसर्ग चक्रीवादळ मध्ये बहुतेक शाळांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे, सदर शाळा वेवस्थापनांच्या मागणीनुसार आमदार गोगावले साहेबांनी सदर कंपनीच्या मालकाकडे विनंती केली असता कंपनीच्या  वेवस्थापणाने याची दखल घेत ताबडतोब पत्र्यांची व्यवस्था करून दिली. 
या वेळी उपस्थित जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, लक्ष्मी कंपनीचे मॅनेजर प्रशांत पाटील,प्रकाश कर्णिक, खरवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधिज्ञ अॅड. माननीय महेंद्रजी मानकर साहेब, तसेच विक्रम शिंदे,योगेश पाटील  इत्यादी उपस्थित होते.
सिमेंट पत्रे दिलेल्या शाळांची यादी पुढील प्रमाणे आहे. 
१)सुशीला काशिनाथ भाटे विद्यालय बोरवाडी माणगाव,
२)सरस्वती विद्या मंदीर वढघर मुद्रे माणगाव,
३)खरवली शिक्षण प्रसारक मंडळ संचालिक विद्यालय खरवली माणगाव,
४)लोकमान्य ज्ञानदीप विद्या मंदिर साई माणगाव,
५)एस एस निकम इंग्लिश स्कुल लोणेरे,
६)हिरालाल महादेव मेथा माध्यमिक विद्यालय विळे माणगाव,
७)नू इंग्लिश स्कुल नेवरूळ म्हसळा,
८)जिजामाता हायस्कूल वरवठणे. आगरपाढा म्हसळा,
इत्यादी शाळांना गोगावले यांच्या उपस्थितीत पत्र्यांचे वाटप करण्यात आले.

ठाणे पोलिसांनी केली कडक कारवाईला सुरुवात!

ठाणे पोलिसांनी केली कडक कारवाईला सुरुवात!
"वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांचे नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन"

ठाणे - दरम्यान निर्बंध थिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून ठाणे पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
“ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी घऱात राहणं अपेक्षित आहे. गरजेच्या गोष्टी, कामांसाठी खासगी कार, टॅक्सी, रिक्षा ज्यामध्ये एक अधिक अशा दोघांना आणि दुचाकीवर एकालाच परवानगी आहे. असं असतानाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कंटेनमेंट झोन, रेड झोन वाढत आहेत,” असं अमित काळे यांनी सांगितलं आहे.
“या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी सर्व ठिकाणी कडक नाकाबंदी लावली आहे. विनाकारण फिरणारे, गरज नसताना बाहेर पडणारे यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. गाड्या जप्त देखील केल्या आहेत. कालच्या दिवसात दोन हजार वाहनांवर कारवाई केली. पहाटे पाच वाजेपर्यंत अडीचशे वाहनांवर कारवाई झाली आहे. सर्व नागरिकांनी घरातच थांबावं, अनावश्यक असताना बाहेर पडू नये अथवा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल,” असा इशारा अमित काळे यांनी यावेळी दिला आहे.

*कल्याण रुक्मिणी बाई रुग्णालयात गरोदर महिले च्या प्रसुती साठी सुविधा उपलब्ध न करणाऱ्या CMO ची बदली करा प्रहार जनशक्ती पक्ष- आदर्श भालेराव*

*कल्याण रुक्मिणी बाई रुग्णालयात गरोदर महिले च्या प्रसुती साठी सुविधा उपलब्ध न करणाऱ्या CMO ची बदली करा प्रहार जनशक्ती पक्ष- आदर्श भालेराव*


कल्याण: कल्याण महानगरपालिकेचे असलेले रुक्मिणी बाई रूग्णालयात गरोदर महिलेच्या प्रसुती वेळी पालिकेने कोणतेही सुविधा दिलेले नाही अशी अनेक वेळा अनेक संघटना, पक्ष संस्था जागरुक नागरिकांनी पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या  निदर्शनास आणून देखील रुक्मिणी बाई रुग्णालयात ICU NICU किंवा व्हेलटीलेटर सुविधा सुरू केली जात नाही.  ही शोकांतिका आहे.  त्यामुळे गरोद महिलेला सायन रुग्णालय , केईम रुग्णालयात कळवा कीव ठाणे सिव्हिल रुग्णालयात येते पाठवले जाते, किंवा नाईलाज पणे वेळ नसल्यामुळे  गरोदर महिलेची परिस्थिती लक्षात घेता नातेवाईकांना शेजारील खाजगी रुग्णालयात कर्ज घेऊन गरोदर महिलेला प्रसुती करावी लागते त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटूंबाला  बेजबाबदार CMO मूळे आर्थिक भुदंड बसतो ह्याच गामभीर्य अधिकारी यांना नसतो
नुकताच मा आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी रुक्मिणी रुग्णालयात गरोदर महिले साठी सुविधा नसल्या मुळे लॉक डोउन असताना एका गरीब महिलेची प्रसुती कल्याण येथील वैष्णवि हॉस्पिटलमध्ये केली होती.  त्यावेळी आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी यांना रुक्मिणी बाई रुग्णालयात तत्काळ ICU,NICU सुरू करा म्हणून  आदेश दिले होते.
एक महिना उलटून सुद्धा CMO यांनी दखल घेतली नाही किंवा आयुक्तांच्या आदेशाचे पालन ही केले नाही त्यामुळे आज ही अनेक गरजू महिलेला प्रसुती साठी रुक्मिणी बाई रुग्णालयातुन सुविधा उपलब्ध नाही असे कारण सांगून गरोदर महिलेला  स्थलांतरित केले जाते असे वारंवार घडत आहे.
 किंवा पालिकेचा निष्काळजी पणा मूळे अनेक महिला प्रसुती वेळी आपला व बाळाचा जीव ही गमवावा लागला आहे असे अनेक घटना रुक्मिणी बाई रुग्णालयात घडले असून देखील  रुक्मिणी बाई रुग्णालयातील CMO झोपेतून उठत नाही. त्यांच्या अधिकारा अंर्तगत रुक्मिणी रुग्णालयात अनेक सुविधा अपुरे असून देखील CMO रुख्मिनी रुक्मिणी बाई रुग्णालयातील पदभार सांभाळाण्यात अपयशी ठरत आहे.असे प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास आढळून आले आहे 
जर रुक्मिणी बाई रुग्णालयातिल CMO डॉ आश्विनी पाटील जाणून बुजून आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील  किंवा गरोदर महिलेला होत असलेल्या मानसिक शाररीक व आर्थिक त्रास लक्षात न घेता  दुर्लक्ष करत असतील किंवा रुक्मिणी बाई रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देत नसतील  तर अश्या CMO ची बदली करावी अशी प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील  व सुनील शिरिषकर ठाणे जिल्हा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली  कल्याण तालुका  संघटक आदर्श भालेराव  तर्फे मागणी करण्यात येत आहे  प्रहार जनशक्ती पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा नामदार राज्यमंत्री बचू भाऊ कडू असून त्यांच्या कडे महिला बाळ कल्याण मंत्रालयचा पदभार आहे  राज्यमंत्री बचू भाऊ कडू हे कधी नागरिकांना शासकिय अधिकारी यांच्या  पिळवणूक व मानसिक शाररीक व आर्थिक होणारा त्रास सहन करून घेत  नाही  हे अख्या राज्याला माहिती आहे  आणि पालिका अधिकारी जर कल्याण तालुक्यात गरोदर  महिला व बाळ यांना पालिकेच्या निष्काळजी पणा मूळे  अनेक समस्यांना तोड द्यावं लागतं असेल किंवा गरोदर महिला व बाळ यांना जीव गमवावा लागत असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष  सहन करून घेणार नाही अशी ही माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांनी माहिती दिली. जर तत्काळ बेजबाबदार CMO यांची बदली नाही केली तर प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यमंत्री नामदार मा  बचू भाऊ कडू याची भेट घेऊन  गरोदर महिलेच्या जीवाशी खेळणाऱ्या CMO यांना पाठशी घालणाऱ्या ही अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्या बाबत कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील  व सुनील शिरिषकर ठाणे जिल्हा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली  कल्याण तालुका कमिटी तर्फे कल्याण तालुका अध्यक्ष सूर्यकांत तांबोळी,कल्याण ग्रामीण अध्यक्ष सिद्धार्थ बोराडे, कल्याण पश्चिम सचिव प्रदीप सोनवणे प्रशांत मोरे कल्याण  34 प्रभाग अध्यक्ष  नदीम तांबोळी,45 प्रभाग अध्यक्ष  मुस्ताक अन्सारी , शिल्ड संस्थेचे संस्थापक  प्रशांत जाधव,  यांच्या कडून केली जाणार आहे अशी ही माहिती  कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांनी दिली आहे

Sunday 28 June 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औषध दुकानांची वेळ मर्यादित - डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औषध दुकानांची वेळ मर्यादित - डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

कल्याण   - डोंबिवली शहरात दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. औषधांच्या निमित्ताने नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहे. यावर नियंत्रण यावे तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे या करता औषध दुकानांची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत औषधी दुकान सुरु ठेवण्याचा निर्णय 
डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने घेतला आहे .तसेच
 अत्यावश्यक प्रसंगी रुग्णांनी दुकानाबाहेरील क्रमांकावर संपर्क केल्यास औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. एकही रुग्णांला औषधांची कमतरता भासणार नाही असे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे यांनी सांगितले आहे. इमर्जन्सी मध्ये 09702400111 , 09702665111 , 08691091055 या क्रमांक वर संपर्क करावा असे आवाहन डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधित क्षेञ कोरोना कमिटी ' गठित

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधित क्षेञ कोरोना कमिटी ' गठित!

कल्याण : पालिका क्षेत्रात फोफावलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जास्त रुग्ण असलेला भाग कंटेनमेंट झोन जाहीर करत या भागात लोकडाऊन घेण्यात आला आहे .या लोकडाऊन दरम्यान उपायोजनांची अमलबजावणी करण्यासाठी या भागात 
स्‍थानिक लोकप्रतिनिधी, राजकिय पदाधिका-यांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍था व नागरिकांचे सहकार्य मिळणेकामी ' प्रतिबंधित क्षेञ कोरोना कमिटी ' गठित करण्‍यात येणार आहे .
       महापालिका क्षेञातील कोरोना बाधित रूग्‍णांची वाढती रूग्‍ण संख्‍या पाहता, कोरोना विषाणूचा जास्‍त प्रार्दुभाव असलेला भाग हा प्रतिबंधित क्ष्‍ोञ म्‍हणून घोषित करण्‍यात आला असून, या भागामध्‍ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्‍हणून याकरीता अनेक उपाययोजना हाती घेवून त्‍याची अंमलबजावणी साठी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, राजकिय पदाधिका-यांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍था व नागरिकांचे सहकार्य मिळणेकामी ' प्रतिबंधित क्षेञ कोरोना कमिटी ' गठित करण्‍यात येणार आहे .यामध्‍ये महापालिका सदस्‍य/सदस्‍या (संबंधित प्रभागातील जेष्‍ठ सदस्‍य) हे अध्‍यक्ष राहणार असून, प्रतिबंधित क्षेञातील संबंधित महापालिका सदस्‍य/सदस्‍या, संबंधित पोलिस स्‍टेशनचे अधिकारी, संबंधित नागरी आरोग्‍य केंद्राचे वैदयकिय अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍थांचे पदाधिकारी, खाजगी वैदयकिय व्‍यावसायिक, किराणा दुकानदारांचे प्रतिनिधी, मेडिकल दुकानदारांचे प्रतिनिधी, भाजीपाला दुकानदारांचे प्रतिनिधी हे सदस्‍य व तसेच संबंधित प्रभागक्षेञ अधिकारी हे सदस्‍य सचिव असे समितीचे गठन असणार आहे या समितीने त्‍यांचे कार्यक्षेञातील कोरोना रोगाच्‍या नियंञणासाठी वैदयकिय व्‍यवसायिक यांची यादी तयार करणे, त्‍यांचे कडील ओपीडी मध्‍ये तापाचे रूग्‍णांची माहिती दररोज मिळेल यासाठी कार्यवाही करणे, तापाच्‍या रूग्‍णांबाबत पुढील उपचार व आवश्‍यकतेनुसार कोविड चाचणी करून त्‍यांचे विलगीकरण , पॉझिटिव रूग्‍णांचे हायरिस्‍क व लो रिस्‍क संपर्क शोधणे व विलगीकरण कक्षात पाठविणे व होम विलगीकरण केले असल्‍यास त्‍यांचेवर लक्ष ठेवणे,होम क्‍वारंटाईन करणे शक्‍य नसल्‍यास अशा व्‍यक्‍तींना कोणत्‍याही परिस्थितीत संस्‍थात्‍मक विलगीकरण कक्षात पाठविणे, सदर भागांमध्‍ये अत्‍यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्‍तु विक्रिंच्‍या दुकाने व्‍यतिरिक्‍त अन्‍य सर्व आस्‍थापने बंद असल्‍याची खाञी करून त्‍यासाठी उपाययोजना राबविणे, प्रतिबंध भागामध्‍ये नागरिकांचा अनावश्‍यक वावर थांबविणे व जीवनावश्‍यक वस्‍तू घरपोच पुरवठा करण्‍यासाठी स्‍वयंसेवक नेमणे,प्रतिबंधित क्षेञाच्‍या सीमा सील करून अनुज्ञेय वाहतूक वगळता अन्‍य वाहतूक 100 टक्‍कें बंद करून नागरिकांना देखील ये-जा करण्‍यास प्रतिबंध करणेकामी पोलिस यंञणेस व प्रशासनाचे मदतीसाठी स्‍वयंसेवक उपलबध करून देणे,प्रतिबंधित क्षेञामध्‍ये सील करण्‍यात आलेल्‍या इमारतीतील रहिवाश्‍यांचे विलगीकरण योग्‍य पध्‍दतीने असल्‍याबाबत देखरेख ठेवणे व आढावा घेणे,होम क्‍वारंटाईन केलेल्‍या पॉझिटिव्‍ह रूग्‍णांच्‍या विलगीकरणाबाबत नियंञण ठेवणे,प्रतिबंधित क्षेञातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्ष्‍ाण करून स्‍वयंसेवक उपलबध करून यंञणेस सहकार्य करणे,सदर समितीद्वारे होणा-या कार्यवाहीचा आढावा घेण्‍यासाठी तसेच नियंत्रण ठेवणेसाठी कार्यकारी अभियंता व उपअभियंता पदावरील अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून, या सनियंञण अधिका-यांनी कमिटी कडून सुचविण्‍यात आलेल्‍या उपायोजनांसाठी आवश्‍यक ते सहकार्य व समन्‍वय करन्याचे निर्देश आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट पीपीई किटचे तीन दिवसाचे 27 हजार! रुग्णांची लूट थांबवा अन्यथा परिणाम वाईट असतील - शिवसेना नगरसेवकाचा खाजगी रुग्णालयाला इशारा

खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट
पीपीई किटचे तीन दिवसाचे 27 हजार!
रुग्णांची लूट थांबवा अन्यथा परिणाम वाईट असतील - शिवसेना नगरसेवकाचा खाजगी रुग्णालयाला इशारा

कल्याण : कोरोना काळात काही खाजगी रुग्णालयांकडून कोव्हिडं रुग्णांसह अन्य आजाराच्या रुग्णांकडून भरमसाठ बिले आकारले जात असल्याचा आरोप होत आहे .असाच प्रकार कल्याणातील एका खाजगी रुग्णलयात उघडकीस आला .एका रुग्णाला तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारण्यात आले सदर बाब शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तत्काळ रुग्णलयात धाव घेत जाब विचारला तसेच रास्त बिल आकारण्याची मागणी केली यावेळी महेश गायकवाड यांनी कोरोना काळात माणुसकी दाखवा रुग्णांच्या असहाययतेचा फायदा घेऊ नका अन्यथा 
 परिणाम वाईट असतील असा सज्जड इशारा दिला .
     देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा कल्याण डोंबिवलीतही  झपाटयाने प्रादुर्भाव वाढल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दुसरीकडे अन्य आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसत आहे. काही ठिकाणी अन्य आजाराच्या रुग्णांना रुग्णालये उपचारासाठी दाखल करुन घेत नाहीत. दाखल करुन घेतलेच तर त्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल उकळले जात आहे. असाचे एक प्रकार कल्याण पूव्रेतील एका खाजगी रुग्णालयात समोर आला आहे. या रुग्णालयात राजेंद्र राजभर नावाची व्यक्ती तीन दिवस उपचार घेत होता. त्याला आज करण्यात उपचाराचे बिल त्याच्या हाती दिले तेव्हा त्यात तीन दिवसात पीपीई कीटचे 27 हजार रुपये आकारल्याची बाब त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली त्यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली मात्र त्यांनी बिल भरण्यास सांगितल्याने अखेर त्यांनी याबाबत शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे धाव घेत ही बाब निदर्शनास आणून दिली . नगरसेवक महेश गायकवाड यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले .शिवसेनेच्या दणक्या नंतर रुग्णालय प्रशासनाने बिल कमी केले .याबाबत नगरसेवक महेश गायकवाड यांनी 
कोरोना काळात माणुसकी दाखवा रुग्णांच्या असहाययतेचा फायदा घेऊ नका अन्यथा  परिणाम वाईट असतील असा सज्जड इशारा दिला .

खंडणीसाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची विकासकाचा आरोप !

खंडणीसाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची विकासकाचा आरोप !

"विकासकाची मुख्यमंत्र्याकडे तक्रार"

कल्याण : टीटवाळा येथील विकासकाच्या ५ बिल्डींगचे काम सुरु असल्यामुळे त्याच्याकडे ५ लाखाची खंडणी मागत खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच पोलीस ठाण्यात बोलावून  बेदम मारहाण केल्याची घटना टीटवाळा पोलीस ठाण्यात घडल्याचा आरोप करत संबधित विकासक विमलेश तिवारी यांनी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

तिवारी यांचे टीटवाल्यानजीक अधिकृत ५ इमारतीचे काम सुरु असून या कामाची पाहणी करत काम पूर्ण व्हावे म्हणून  सहकार्य करण्यासाठी टीटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी आपल्या कर्मचारी  गाडे यांना ५ लाखाची खंडणी मागण्यासाठी साईटवर पाठवले. मात्र हि खंडणी देण्यास नकार दिल्यानेपोलीस नाईक गोल्हार यांनी खंडणी न दिल्यास कोणत्याही गुन्ह्यात त्यांना अडकविण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आपल्या नातेवाइकाबरोबर झालेलं बोलणे रेकॉर्ड करून घेत आपल्याला पोलीस ठाण्यात बोलवून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार तिवारी यांनी केली आहे याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले असून यात आपल्याला नाहक त्रास देत खोट्या गुन्ह्यात अडकविनार्या  वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांच्यासह गोल्हार आणि गाडे यांच्यावर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.  
दरम्यान याबाबत बालाजी पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या तक्रारीत तथ्य नसून पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्याची बदली थांबविण्यासाठी त्याने रचलेले हे नाटक असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.

पावसाने दडी मारल्याने माणगांव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त !! 'शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट"

पावसाने दडी मारल्याने माणगांव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त !!
'शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट"
     
 
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ०३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळासह पावसाने हाहाकार केल्यानंतर गेली दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्व शेतकरी चिंताग्रस्त झालेले दिसून येत आहेत. 
  कारण माणगांव तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी रोहीणी नक्षत्राच्या प्ररंभापासून भात, नागली तथा नाचणी, वरी, झेंडू, उडीद, मिरची, कारली, भेंडी, गवार, चवळी, काकडी  आदि पिकांची धूळ वाफेची पेरणी केली. माणगांव तालुक्यात सुरवातीला पाऊस समाधानकारक पडल्याने शेतकर्यांनी पेरलेल्या भाताच्या प्रमुख बियाण्यासह सर्व प्रकारच्या बियाण्याचा चांगल्या प्रकारे रूज होवून रोपांची वाढ उत्तम झाली आहे. मात्र मागील दोन हप्त्यांपासून पावसाने दडी मारल्याने माणगांव तालुक्यातील शेतकर्यांची भात पिकाची लावणी खोळंबली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील शेतकरी हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला आहे.         
      कोरोना विषाणू आणि निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कंबरडे मोडलेल्या माणगांव तालुक्यातील शेतकरी मागील चार ते पाच वर्षापासून लहरी हवामान बेमोसमी पावसाच्या तर कधी दुष्काळाच्या मार्यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. 
        कोरोनाच्या महामारीमुळे सर्व शेतकऱ्यांचे गणित पुरते बिघडले आहे. शेतकरी शेतात अहोरात्र राबून, महागडे बियाणे विकत घेऊन त्याला महागडी खते वापरून अनेक मजूर घेऊन  मोठ्या कष्टाने तयार केलेल्या शेतीमालाला बाजारात कवडीमोल दराने विकावा लागतो. त्यामुळे शेतकर्यांना प्रचंड नुकसान पत्करावे लागते. 
       या सर्व बाबींवर मात करून माणगांव तालुक्यातील शेतकर्यांनी यंदा नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली आहे .परंतु पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त  झाला आहे. कारण शेतकर्यांनी पेरणी केलेले बियाणे सध्याच्या परिस्थितीत चांगले उगवून ही रोपे उगवून वर आली आहेत. कसदार जमिनीतील,पिके चांगली तरारली आहेत तर हलक्या क्षेत्रातील पिकांना पावसाची गरज आहे या आठवड्यात पाऊस न झाल्यास ही पिके माना टाकण्याची स्थितीत आहेत त्यामुळे पुन्हा पेरणी करणे शेतकऱ्यांना परवडनारे नाही. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
       माणगांव तालुक्यात सद्या  दिवसभर ढगाळ वातावरण तर कधी भर पावसाळ्यात रखरखीत उन पडते. तर कधी कधी  पावसाची शक्यता वाटते मात्र पाऊस येत नाही .पाऊस झालाच तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात पडतो  त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाची आशेने वाट पाहत आहेत. सध्या शेतकरी खुरपणी कोळपणी मशागतीचे काम करीत आहेत. भाताच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. परंतु पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीच्या संकटामुळे माणगांव तालुक्यातील शेतकरी हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला आहे.

मुरबाड तहसीलदार कार्यालयात कोरोनाचा शिरकाव !! "आज पुन्हा नव्याने 6 रुग्णांची वाढ "

मुरबाड तहसीलदार कार्यालयात कोरोनाचा शिरकाव !!
"आज पुन्हा नव्याने 6 रुग्णांची वाढ "


मुरबाड  (  मंगल डोंगरे  ) 
मुरबाड तहसीलदार कार्यालयात आता कोरोनाने शिरकाव केला असुन, या  कार्यालयांमधील सब जेल मध्ये असणाऱ्या 4  कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे  ऑफिस निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.अशी सूचना तहसीलदार अमोल कदम यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे.तर मुरबाड तालुक्यात रविवारी कोरोनाचे 6 नवीन रूग्ण आढळले त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 37 झाली आहे त्यापैकी  8 जण बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी  पुढील 2 दिवस तहसील कार्यालयात येऊ नये असे आवाहन तहसिलदार अमोल कदम यांनी केले आहे. मात्र मुरबाड मध्ये कोरोना वाढत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे .तर राजकिय नेते बाधित झाल्याने अनेक नागरिक भीतीच्या छायेत आहेत .

   मुरबाड तहसीलदार कार्यालयातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने या कोरोना काळात ही तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे  तरी या कार्यालयात दोन दिवस न येण्याचे आवाहन तहसीलदार कदम यांनी केले आहे .

पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी प्रदीप रोकडे आणि मंत्रालय संपर्क प्रमुख सचिन बुटाला यांची नियुक्ती !! "कोरोना महायोद्धा सन्मानपत्राचे वितरण"

पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी प्रदीप रोकडे आणि मंत्रालय संपर्क प्रमुख सचिन बुटाला यांची नियुक्ती !!
"कोरोना महायोद्धा सन्मानपत्राचे वितरण"


बदलापूर : पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अरूण ठोंबरे व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील निवडक पत्रकाराना कोरोना योद्धा पुरस्कारानी सन्मानित केले आहे. रामेश्वर गवई, अजय श्रीवासराव चिरेवील्ला, काशिनाथ भोसले (काका), सौ.भारती सचिन बुटाला, मंगल डोंगरे या   पत्रकाराना कोरोना महायोद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी प्रदीप रोकडे आणि मंत्रालय संपर्क प्रमुख सचिन बुटाला यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडक पत्रकाराची उपस्थिती मध्ये निलेश पवार, सचिन बुटाला, दिनानाथ कदम, अनिल मिश्रा, जाफर वणू, मनोज जैन, संजय साळवे, सिध्दांत गाडे,आणि  कैलास जाधव,  आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन उपाध्याक्ष मनोज जैन, आणि आभार सरचिटणीस प्रदीप रोकडे यांनी मानले.

Saturday 27 June 2020

उल्हासनगरात सापडले 60 कोरोना बाधित रुग्ण पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नगरसेवकांना कोरोनाची लागण!

उल्हासनगरात सापडले 60 कोरोना बाधित रुग्ण
पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नगरसेवकांना कोरोनाची लागण!

                 
उल्हासनगर, सिध्दांत गाडे  -  उल्हासनगरमध्ये 27 रोजी जून रोजी 60 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 44 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 874 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रात 27 जून रोजी उल्हासनगर शहरात कोरोनाचे 60 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी 610 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून आतापर्यंत 874 कोरोना मुक्त रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 610 संक्रमीत व्यक्ती कोरोना केअर सेंटर कक्षात उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर  874 रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

आश्चर्याची गोष्ट अशी की शहरात कोरोनाने आपला मोर्चा पालिका कार्यालयात वळवला असून आतापर्यंत पालिकेचे कित्येक अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नगरसेवकांना कोरोनची लागण झाली असून शहरातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
आश्चर्याची बाब अशी की जर एखाद्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास पालिका प्रशासनाकडून संपूर्ण परिसर सील करण्यात येतो. तर दुसरीकडे मात्र एखाद्या उच्च भ्रू वस्तीतील इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास सदर इमारत सील न करता केवळ त्या घरातील लोकांना मोकळे सोडून दिले जाते परिणामी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो याकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यासंदर्भात पालिकेत नव्याने रुजू झालेले पालिका आयुक्त डॉ. मतांडा राजा दयानिधी हे आता कोणती योजना बनवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीचे पालिका आयुक्त डॉ सुधाकर देशमुख आणि समीर उन्हाळे हे कोरोना संसर्ग नियंत्रण करू शकले नाहीत त्यामुळे राज्य प्रशासनाने त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आत्ताचे नवे आयुक्त डॉ मतांडा राजा दयानिधी यांच्या समोर कोरोना संसर्गाला शहरातून हद्दपार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात पालिकेत पालिका अधिकाऱ्यांनी बैठक घेतली असून आता त्यांनी आपले कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. 

उल्हासनगर शहरातील सरकारी कोरोना केअर सेंटर कक्षात 252 रुग्ण, खाजगी कोरोना केअर सेंटर कक्षात 70 रुग्ण, डी सी एच सी मध्ये 121 रुग्ण, डी सी एच मध्ये 70 रुग्ण, होम आय सोलेशन मध्ये 51 तर उल्हासनगर महानगर पालिकेच्या क्षेत्राबाहेरील 46 रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.

27 जून रोजी एकूण 60 कोरोना बाधित झालेले रुग्ण मिळून आले तर 44 व्यक्तींनी कोरोना मुक्त होऊन कोरोनावर मात करून घरी परतले आहेत त्यामुळे आतापर्यंत एकूण 874 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.



                     कॅम्प नंबर 1 मध्ये 09 रुग्ण

                     कॅम्प नंबर 2 मध्ये 13 रुग्ण

                     कॅम्प नंबर 3 मध्ये 07 रुग्ण

                     कॅम्प नंबर 4 मध्ये 21 रुग्ण

                     कॅम्प नंबर 5 मध्ये 10 रुग्ण

                                     एकूण 60 रुग्ण

उल्हासनगर शहरात आतापर्यंत एकूण 874 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत आणि सध्या एकूण 610 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले.

अंबरनाथ पुन्हा लॉकडाऊन असताना कडक नियमांचा अभाव !!

अंबरनाथ पुन्हा लॉकडाऊन असताना कडक नियमांचा अभाव !!


अंबरनाथ शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या झपाट्याने वाढतच आहे. यावर नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याने प्रशासनने पुन्हा लॉकडाऊन केले खरे पण ते करताना कोणतेही  नियम अटी व नियोजन दिसून आले नाही. पोलिस प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी वगळता अत्यावश्यक व जीवनाश्यक दुकाने सूरू असावीत असे होते. परंतु औद्योगिक क्षेत्रात सगळे काही सूरू होते. दारूचे दुकाने, कंपन्या आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस बिनधास्त चालत होते. याचाच अर्थ या सगळ्यांनी नियमाचे उल्लंघन केले आहे. यावर काय कार्यवाही करणार ? 
पण ही वेळच आशी आहे की प्रत्येकानं संयम आणि खबरदारी ने वागायला हवं, मीच एकटा बरोबर आणि बाकी सगळे चोर ही वृत्ती नको या भयंकर परिस्थितीत.  
प्रशासनात काम करणारी माणसं घरदार सोडून दिवस रात्र लढत आहेत, (तेही काही उपकार करत नाहीत, कामाचा भाग आहे. पण कोणत्या परिस्थितीत आणि किती वेळ काम करत आहेत याचं कुणाला सोयरसुतक नाही) आणि सर्वात जास्त रिस्क जे विभागात  काम करत आहेत, उद्या यांच्यापैकी कोणी पोसिटीव्ह आला तर आख्खी यंत्रणा बिनकामाची होऊन जाईल. 
अपुरी संसाधनं, अपुरं मनुष्यबळ, हातात शस्त्रचं नाही आणि शत्रू दिवसेंदिवस आपला आकार वाढवत आहे, अशी ही लढाई आहे. ही लढाईच वेगळी आहे, इथं शरीराने दूर राहून पण विचाराने आणि मनाने एकत्र येऊन लढलो तरच निभाव लागणार आहे आपला. एकमेकांवर विश्वास ठेवून, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरून, सामाजिक अंतर पाळून, स्वच्छतेच्या सवयी बाळगून, एकमेकांना सहकार्य करूनच ही लढाई लढावी लागेल. 
"वाढणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोखण्याची  वेळ आली  आहे.   कडक नियमाचे पालन करा. मास्क वापरा , सॅनिटाइजर नेहमी सोबत ठेवा. सामाजिक अंतर ठेवा.  गरज असेल तरच घरा बाहेर पडा"

"अरूण ठोंबरे'
'पत्रकार /संपादक'
*9322107521*

प्रतिबंधित क्षेत्रांत संबंधित लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना कमिटीची होणार स्थापना. !!

प्रतिबंधित क्षेत्रांत संबंधित लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना कमिटीची होणार स्थापना. !!


"महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांचा महत्वपूर्ण निर्णय"

कल्याण : महापालिका क्षेञातील कोरोना बाधित रूग्‍णांची वाढती रूग्‍ण संख्‍या पाहता, कोरोना विषाणूचा जास्‍त प्रार्दुभाव असलेला भाग हा प्रतिबंधित क्ष्‍ोञ म्‍हणून घोषित करण्‍यात आला असून, या भागामध्‍ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्‍हणून याकरीता अनेक उपाययोजना हाती घेवून त्‍याची अंमलबजावणी करणेकामी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, राजकिय पदाधिका-यांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍था व नागरिकांचे सहकार्य मिळणेकामी ' प्रतिबंधित क्षेञ कोरोना कमिटी ' गठित करण्‍यात येत आहे.
यामध्‍ये महापालिका सदस्‍य/सदस्‍या (संबंधित प्रभागातील जेष्‍ठ सदस्‍य) हे अध्‍यक्ष राहणार असून, प्रतिबंधित क्षेञातील संबंधित महापालिका सदस्‍य/सदस्‍या, संबंधित पोलिस स्‍टेशनचे अधिकारी, संबंधित नागरी आरोग्‍य केंद्राचे वैदयकिय अधिकारी, संबंधित क्षेञातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍थांचे पदाधिकारी, खाजगी वैदयकिय व्‍यावसायिक, किराणा दुकानदारांचे प्रतिनिधी, मेडिकल दुकानदारांचे प्रतिनिधी, भाजीपाला दुकानदारांचे प्रतिनिधी हे सदस्‍य व तसेच संबंधित प्रभागक्षेञ अधिकारी हे सदस्‍य सचिव असे समितीचे गठन असेल.
गठित समितीने त्‍यांचे कार्यक्षेञातील कोरोना रोगाच्‍या नियंञणासाठी खालील बाबींवर प्राधान्‍याने कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यामध्‍ये---
१. वैदयकिय व्‍यवसायिक यांची यादी तयार करणे, त्‍यांचेकडील ओपीडी मध्‍ये तापाचे रूग्‍णांची माहिती दररोज मिळेल यासाठी कार्यवाही करणे, तापाच्‍या रूग्‍णांबाबत पुढील उपचार व आवश्‍यकतेनुसार कोविड चाचणी करून त्‍यांचे विलगीकरण करणे बाबत कार्यवाही करणे.
२. पॉझिटिव रूग्‍णांचे हायरिस्‍क व लोरिस्‍क संपर्क शोधणे व विलगीकरण कक्षात पाठविणे व होम विलगीकरण केले असल्‍यास त्‍यांचेवर लक्ष ठेवणे.
३. होम क्‍वारंटाईन करणे शक्‍य नसल्‍यास अशा व्‍यक्‍तींना कोणत्‍याही परिस्थितीत संस्‍थात्‍मक विलगीकरण कक्षात पाठविणे.
४. सदर भागांमध्‍ये अत्‍यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्‍तु विक्रिंच्‍या दुकाने व्‍यतिरिक्‍त अन्‍य सर्व आस्‍थापने बंद असल्‍याची खाञी करून त्‍यासाठी उपाययोजना राबविणे.
५. प्रतिबंध भागामध्‍ये नागरिकांचा अनावश्‍यक वावर थांबविणे व जीवनावश्‍यक वस्‍तू घरपोच पुरवठा करण्‍यासाठी स्‍वयंसेवक नेमणे.
६. प्रतिबंधित क्षेञाच्‍या सीमा सील करून अनुज्ञेय वाहतूक वगळता अन्‍य वाहतूक 100 टक्‍कें बंद करून नागरिकांना देखील ये-जा करण्‍यास प्रतिबंध करणेकामी पोलिस यंञणेस व प्रशासनाचे मदतीसाठी स्‍वयंसेवक उपलबध करून देणे.
७. प्रतिबंधित क्षेञामध्‍ये सील करण्‍यात आलेल्‍या इमारतीतील रहिवाश्‍यांचे विलगीकरण योग्‍य पध्‍दतीने असल्‍याबाबत देखरेख ठेवणे व आढावा घेणे.
८. होम क्‍वारंटाईन केलेल्‍या पॉझिटिव्‍ह रूग्‍णांच्‍या विलगीकरणाबाबत नियंञण ठेवणे.
९. प्रतिबंधित क्षेञातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्ष्‍ाण करून स्‍वयंसेवक उपलबध करून यंञणेस सहकार्य करणे.
सदर समितीद्वारे होणा-या कार्यवाहीचा आढावा घेण्‍यासाठी तसेच नियंत्रण ठेवणेसाठी कार्यकारी अभियंता व उपअभियंता पदावरील अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून, या सनियंञण अधिका-यांनी कमिटी कडून सुचविण्‍यात आलेल्‍या उपायोजनांसाठी आवश्‍यक ते सहकार्य व समन्‍वय करावयाचे आहे. 

"कोरोना बाधितांसाठी पुरेशा रुग्णशय्या (बेड) उपलब्ध, ‘वॉर्ड वॉर रूम’ मुळे योग्यरित्या व्यवस्थापन होत असल्याचे निदर्शक"!

"कोरोना बाधितांसाठी पुरेशा रुग्णशय्या (बेड) उपलब्ध, ‘वॉर्ड वॉर रूम’ मुळे योग्यरित्या व्यवस्थापन होत असल्याचे निदर्शक"!


कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक ती व योग्य ठिकाणी रुग्ण शय्या उपलब्ध व्हावी, या मुख्य उद्देशाने आणि रुग्णवाहिका व इतर बाबींचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी महानगरपालिकेने सुरु केलेल्या विभागीय नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रुमची मात्रा हमखास लागू पडली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येने रुग्ण शय्या उपलब्ध आहेत. ऑक्सिजन पुरवठा, अतिदक्षता उपचार आणि जीवरक्षक प्रणाली असलेल्या रुग्ण शय्या देखील निरंतर उपलब्ध असून बेड मिळत नसल्याच्या तक्रारी निकालात निघाल्‍या आहेत.

कोविड १९ संसर्ग प्रारंभी वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होऊ लागला होता. सर्वव्यापी प्रयत्न करण्यात येत असताना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या आणि भविष्याच्या अंदाजानुसार गरजेच्या असलेल्या रुग्णशय्या तसेच उपचार केंद्रांची संख्याही महानगरपालिका प्रशासनाने वाढवली. असे असले तरी, रुग्णशय्या वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. महानगरपालिकेची नागरी मदतसेवा दूरध्वनी क्रमांक १९१६ वर मुंबईभरातून मोठ्या संख्येने येणाऱया दूरध्वनींमुळे सर्वांना समाधानकारक प्रतिसाद देताना, त्याची कार्यवाही विभाग स्तरावरुन करताना साहजिकच विलंब होत होता. यावर तोडगा म्हणून महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी या कामाचे विकेंद्रिकरण करण्याचा तातडीने निर्णय घेतला. त्यानुसार पद्धतीने विकेंद्रीत रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) अंमलात आली असून त्यासाठी सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

वॉर्ड वॉर रूम सुरु करतानाच, दुसऱया बाजूला सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना दररोजच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल विनाविलंब महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे सादर करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी दिले. दैनंदिन बाधितांचे अहवालांची माहिती मिळाल्यानंतर त्यातून विभागनिहाय २४ यादी बनवून त्या वॉर्ड वॉर रुमकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. वॉर्ड वॉर रुममध्ये नियुक्त डॉक्टर्स आपापल्या विभागातील बाधित रुग्णांशी तातडीने संपर्क व सुसंवाद साधून त्यांना गरजेनुसार व योग्य ठिकाणी रुग्णशय्या मिळवून देण्याची पूर्ण कार्यवाही करतात. ही संपूर्ण प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आल्याने व त्याप्रमाणचे कार्यवाही होऊ लागल्याने रुग्णांनी गोंधळून अथवा घाबरुन जाण्याचे प्रकार थांबले, वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून रुग्णशय्या नेमून देणे, व्याप्त व उपलब्ध रुग्णशय्यांची माहिती सातत्याने अद्ययावत करणे ही कामेदेखील होवू लागली. या सर्व सुसूत्रतेचा दृश्य परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे.

आज (दिनांक २७ जून २०२०) दुपारी २ वाजता अद्ययावत केलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध रुग्णालये व कोरोना काळजी केंद्र (२) मिळून १८ हजार ७४४ खाटांची क्षमता आहे. पैकी १२ हजार १२१ व्याप्त आहेत. तर तब्बल ६ हजार ६२३ उपलब्ध म्हणजे रिकाम्या आहेत. 

यामध्ये विविध समर्पित कोरोना रुग्णालये व समर्पित कोरोना उपचार केंद्र यांतील खाटांची एकूण क्षमता १२ हजार ४७८ इतकी आहे. पैकी ९ हजार २९९ व्याप्त असून ३ हजार १७९ उपलब्ध आहेत.

ठिकठिकाणचे कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) मिळून सध्या ६ हजार २६६ खाटा उपलब्ध आहेत. ताज्या आकडेवारीनुसार यातील २ हजार ८२२ व्याप्त असून त्यापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ४४४ उपलब्ध आहेत.

ऑक्सिजन पुरवठ्यासह उपचारांची सोय असलेल्या ७ हजार ७०५ रुग्णशय्यांपैकी ५ हजार ९८५ व्याप्त आहेत, तर १ हजार ७२० उपलब्ध आहेत. अतिदक्षता उपचारांचा विचार करता, १ हजार ३९४ पैकी १ हजार २९० रुग्णशय्यांवर उपचार सुरु असून १०४ बेड उपलब्ध आहेत. तर जीवरक्षक प्रणालीसह उपलब्ध असलेल्या ७७० खाटांपैकी ७४४ व्याप्त असून २६ उपलब्ध आहेत. 

याशिवाय, ठिकठिकाणी मिळून ३२४ कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १) तयार करण्यात आले आहेत, ज्यामध्ये बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्‍तिंना अलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात येते. या केंद्रांची मिळून एकूण क्षमता ४८ हजार ६४० आहे. मात्र सध्या १६ हजार ३५६ व्यक्ती या केंद्रांमध्ये असून ३२ हजार २८४ जणांना सामावून घेण्याची क्षमता उपलब्ध आहे.
या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर स्पष्ट होते की, सर्व रुग्णालये व केंद्रांमध्ये पुरेशा संख्येने बेड उपलब्ध असून रुग्णांनी व जनतेनेही अनावश्यक भीती बाळगून घाबरुन जाण्याचे कारण नाही. रुग्णशय्यांची क्षमता वाढवत असतानाच त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याची निकड वेळीच ओळखून महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आता संपुष्टात आल्या आहेत. फक्त रुग्णशय्याच नव्हे तर रुग्णवाहिकांचेही व्यवस्थापन होऊ लागल्याने त्याबाबतही तक्रारी नगण्य आहेत. रुग्णांशी थेट डॉक्टर्स सुसंवाद असल्याने अनावश्यक भीती कमी करण्यासह प्रत्यक्ष जनजागृती करण्यातही हे वॉर्ड वॉर रुम मोलाची भूमिका बजावत आहेत.
या विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

ए विभाग २२७० ०००७, बी विभाग २३७५ ९०२३, सी विभाग २२१९ ७३३१, डी विभाग २३८३५००४, ई विभाग २३०० ०१५०, एफ/दक्षिण विभाग २४१७ ७५०७, एफ/उत्तर विभाग २४०११३८०, जी/दक्षिण विभाग २४२१ ९५१५, जी/उत्तर विभाग २४२१ ०४४१.

एच/पूर्व विभाग २६६३ ५४००, एच/पश्चिम विभाग २६४४ ०१२१, के/पूर्व विभाग २६८४ ७०००, के/पश्चिम विभाग २६२० ८३८८, पी/दक्षिण विभाग २८७८ ०००८, पी/उत्तर विभाग २८४४ ०००१, आर/दक्षिण विभाग २८०५ ४७८८, आर/उत्तर विभाग २८९४ ७३५०, आर/मध्य विभाग २८९४ ७३६०.

एल विभाग २६५० ९९०१, एम/पूर्व विभाग २५५२ ६३०१, एम/पश्चिम विभाग २५२८ ४०००, एन विभाग २१०१ ०२०१, एस विभाग २५९५ ४०००, टी विभाग २५६९ ४०००.

प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये संलग्न या दूरध्वनी क्रमांकाच्या ३० वाहिन्या असल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत नाही. तसेच २४x७ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱया या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत असल्याने कोणत्याही क्षणी नागरिकांना मदत उपलब्ध होते. विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मुळे कोरोना बाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. 

शिवसेनेच्या वतीने आमदार भरतशेठ गोगावले यांनी निजामपूर विभागात केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !!

"शिवसेनेच्या वतीने आमदार भरतशेठ गोगावले यांनी निजामपूर विभागात केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप"


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शुक्रवार दिनांक २६ जून रोजी माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागात आठशे आठावन्न धान्य किट वाटप करण्यात आले. तसेच उर्वरीत नुकसान झालेल्या भागात देखील या नंतर शिवसेनेच्या माध्यमातून धान्याचे किट वाटप करण्यात येणार आहेत असे आमदार साहेबांनी सांगितले.
या वेळी माणगांव तालुक्याच्या निजामपूर विभागातील सणसवाडी,विळे वरचिवाडी, बेडगाब,विळे,वांगणेवाडी, साजे,लवेलवाडी,म्हसेवाडी, गोळेवाडी, पाटनुस,भैरिवाडी, भिरा गावठाण इत्यादी ठिकाणी स्वतः आमदार साहेबानी जाऊन धान्य वाटप केले, तसेच ग्रामस्थांच्या काही समस्या देखील जाणून घेतल्या.
      या प्रसंगी उपस्थित विभाग प्रमुख प्रसाद गुरव,गणेश समेळ, सुधीर पवार,अनिल मोरे,कोंडू फाळके,अप्पा म्हामुनकर, बापी म्हामुनकर,नाडकर पाटील,आणा कोदे, विष्णू भोसले,अविनाश नलावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

"खोपिवली येथील पुलाच्या अर्धवट कामामुळे व पर्यायी रस्ता पुरात वाहून गेल्या मुळे म्हसा-धसई संपर्क तुटला"!

"खोपिवली येथील पुलाच्या अर्धवट कामामुळे व पर्यायी रस्ता पुरात वाहून गेल्या मुळे म्हसा-धसई संपर्क तुटला"!,,


मुरबाड (मंगल डोंगरे ) - मुरबाड तालुक्यातील म्हसा- धसई - वैशाखरे अशा ,कल्याण -अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणा-या रस्त्याच्या नुतणीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपपासुन सुरु असुन ते काम आजमितीस अपुर्ण व अर्धवट स्थितीत असल्याचा फटका या रस्त्यालगत असणा-या गावांना बसत असल्याचे निदर्शनास येत असुन,आज अखेर खोपिवली नदीच्या पुराच्या पाण्यात पर्यायी रस्ता,आणि पुलाच्या दोन्ही बाजुचा भराव वाहून गेल्याने धसई कडून आपापल्या वाहनांनी  आलेले शंभर हुन अधिक प्रवासी आपल्या वाहनांसह  खोपिवली नदीच्या पलिकडे अडकून पडल्याची घटना घडली आहे.तर काही प्रवाशांना लाकडी सिडीचा आधार देवून पुलावरुन खोपिवली हद्दीत उतरण्यास नागरिकांनी मदत केल्याने त्यांची सुटका झाली आहे. 


            सदर प्रसंग बिकट बनला असुन ,संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना हि समस्या म्हणजे जिवघेणी बाब ठरू शकते. याबाबत संबधित ठेकेदारा कडून किंवा प्रशासकीय यंत्रणेकडुन  कुठलीच  उपाय योजना अमंलात आली नसुन ,नदीपलिकडे मिल्हे गाव हद्दीत,  धसई बाजारपेठे कडे जाणारे प्रवासी नागरिक, व खोपिवली गावातील  मिल्हे हद्दीतील  शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  याबाबत संबधित ठेकेदाराकडुन तात्काळ पर्यायी व्यवस्था न झाल्यास खोपिवली  परिसरातील नागरिक आंदोलन छेडणार असल्याचे नागरिकां कडून बोलले जात आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड तालुका सात दिवसांसाठी कडकडीत बंद !!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड तालुका सात दिवसांसाठी कडकडीत बंद !!


मुरबाड (मंगल डोंगरे )        
कोरोनामुक्त असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका कोरोनामय होत असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता तालुक्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठांसह मुरबाड शहर आता सात दिवसांसाठी कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश कल्याण उपविभागिय अधिका-यानी जारी केले आहेत.
                कोरोना संकटात गेल्या तिन महिन्यांपासुन कोरोना मुक्ती साठी सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा, आरोग्य खाते,यांसह अनेक सामाजिक, राजकीय, संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते, आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कोरोना संकटाचा सामना करत होते.आजुबाजुला असलेले कल्याण, डोंबिवली, ठाणे, शहापुर, कर्जत, बदलापुर, नेरळ,अशा ठिकाणी धुमाकुळ सुरु असताना आमचा गड अभेद्य राखला जात होता.मात्र हे चित्र फार काळ टिकु शकले नाही. आणी तितक्यातच कोरोनाची वक्रद्रुष्टी आमच्या तालुक्याला लागली. आणि कोरोना बाधितांची तालुक्यात ये-जा सुरु झाली. आम्ही मात्र आमच्या निधड्या छातीने कोरोनाशी दोन हात करत होतो.शासनाचे नियम,आमची सुरक्षा आम्ही पाळत होतो.पण आमची लढाई आता परकीय आक्रमनामुळे  अयशस्वी ठरु लागली आहे.कुठेतरी ,कोणीतरी आमचाच भुमिपुत्र, आमचा नातलगच,मात्र तो गेल्या  कित्येक वर्षांपासून गावकुसाबाहेर म्हणजेच पोटापाण्यासाठी बाहेर पडलेला, परंतु  या संपूर्ण महासंकटाच्या तावडीतुन,लाँकडावुन मधून स्वतःला सावरत गावाकडील आई,वडील,नातेवाईक यांच्या भेटीसाठी आसुसलेला,आणि गावाकडे काहीतरी निमित्ताने सर्वांना. भेटण्यासाठी आलेला.तो गावाकडे येतो काय,सर्वांना भेटुन पुन्हा आपल्या  चिल्यापिल्यांसाठी शहराकडे जातो काय .आणि कोरोनाच्या तावडीत सापडतो काय ,तोपर्यंत सर्वच निपचित होतात. त्याकारणाने गाव सिल केलं जाते काय ? तोपर्यंत कोरोना आणि आम्ही एकमेकां पासून कोसोमैल दुर होतो.मात्र हिच गोष्ट आता आमच्या काळजालाच येवून भिडली आणि गावा गावात खेडोपाडी कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. हां हां म्हणता कोरोनाचे रुग्ण गल्ली बोळात सापडु लागले.आणि मुरबाड तालुका बाधित होवू लागला.एक एक करता तालुक्यात तब्बल 32 पाँझीटिव्ह रुग्ण सापडले.पैकी 7 जण बरेही  झालेत.24 जण उपचार घेत आहेत.1 जण दगावला असुन काल परवाची आकडेवारी पाहिली तर एका  दिवसात 7 तर एका दिवसात 9 जण आढळून आले आहेत.ज्यामध्ये एक मुरबाड नगरपंचायत कर्मचारी, एक पोलीस अधिकारी, तर एक जण राजकिय नेता आहे.याशिवाय जवळपास 16 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असुन 120 जण क्वारंटाईन असल्याने  तालुक्यातील वातावरण भितीदायक झाले आहे.मात्र आज नव्याने सापडलेल्या तिन पाँझिटिव्ह रुग्णांमुळे तालुक्यातील आनखी तिन गावे सिल करण्यात आली असुन बाधितांना उपचारासाठी हलविण्यांत आले आहे.त्यामुळे दररोज वाढणा-या कोरोना रुग्णांमुळे
       वाढत्या रुग्ण संख्येचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात, देशात, सगळी कडे अनलाँक असताना सुद्धा प्रशासनाला मुरबाड शहरासहं, वैशाखरे, शिवळे,, सरळगाव, टोकावडे, धसई, म्हसा, अशा संपूर्ण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठा दिनांक 27 जुन पासून 3 जुलै पर्यंत,पुढील सात दिवसांसाठी लाँकडाऊन घोषित करावा लागला आहे.ज्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होवून निर्माण झालेली साखळी तुटून सर्वसामान्याना आपले जिवन जगता येईल.

"ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकांनी अधिक वेगाने रुग्ण आणि संपर्क शोधावेत – मुख्यमंत्री"

"ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकांनी अधिक वेगाने रुग्ण आणि संपर्क शोधावेत – मुख्यमंत्री"


मुंबई दि 26: ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे यासाठी सर्व पालिकांनी ट्रॅक एन्ड ट्रेस वर जास्तीत जास्त भर देऊन एकेका रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जिल्ह्यातील पालिका आयुक्तांची व इतर अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, उपयुक्त अश्विनी भिडे, उपस्थित होते

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावेळी  कोरोना साथीच्या बाबतीत करीत असलेल्या प्रयत्नांविषयी तसेच येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात अधिक गांभीर्याने रुग्णांचे संपर्क शोधणे तसेच तातडीने त्यांच्यावर निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पुढील उपचार करणे आवश्यक आहे. बेड्सची उपलब्धता होईल आणि त्याची माहिती गरजू रुग्णास तातडीने मिळेल हे पाहावे, कोविड केअर केंद्रांची तीन स्तरीय रचना खूप प्रभावी आहे. यामध्ये रुग्णांचे वर्गीकरण त्यांच्या तब्येतीनुसार करून उपचार देण्यात येतात. ही रचना ठाणे जिल्ह्यात व्यवस्थित काम करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय डॉक्टर्स व परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी हे मनुष्यबळ तिथल्या तिथे लगेच कसे उपलब्ध होईल हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

आमदारांचे पगाराला लागतात ५ अब्ज !! माजी आमदारांच्या पेन्शनवर कोटींची उलाढाल !!

आमदारांचे पगाराला लागतात ५ अब्ज !! माजी आमदारांच्या पेन्शनवर  कोटींची उलाढाल !!


शासनाच्या तिजोरीत असलेला खडखडाट, त्याचे विकासकामांवर होणारे परिणाम आणि राज्य कर्जाच्या खाईत लोटले गेले असताना ३६७ आमदारांच्या फक्त पगारावर पाच वर्षात ४ अब्ज ९५ लाख ७२ हजाराचा बोजा तिजोरीवर पडत असल्याची धक्कादायक माहिती आहे. "शरद काटकर सातारा" यांनी ही माहिती चव्हाट्यावर आणली आहे. 
सातारा जिल्ह्यातील 24 आमदारांच्या पेन्शनसाठी महिन्याला 1 कोटी 13 लाख 38 हजार तर वर्षाला सुमारे 13 कोटी 60 लाख 56 हजार रूपयाचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. या जिल्ह्याची आकडेवारी पाहता राज्यातील माजी आमदारांचा पेन्शनचे कोटीतले आकडे पाहून डोळे पांढरे  होण्याची वेळ आली आहे. दर पाच वर्षाने पराभुत आमदारांच्या पेन्शनच्या संख्येत वाढ होत असल्याने. हा बोजा वाढतच जात आहे. 
शासनाच्या तिजोरीला परवडत नाही म्हणून शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची पेन्शन योजनाच बासणात गुंडाळणार्‍या लोकसेवक राज्यकर्त्यांनी मात्र स्वत:चे ऊखळ पांढरे करण्यात धन्यता मानली आहे.आयुष्यातील 30 ते 32 वर्षे शासकिय नोकरी करणार्‍या कर्मचार्‍याला 22 ते 25 हजारांची पेन्शन तर पाच वर्षे आमदार म्हणून जनसेवा करणार्‍या, करोडपती होणारे कार्यसम्राटांना 50 हजार रूपये पेन्शन मिळत आहे. याव्यतिरिक्त आमदारांना, वैद्यकिय बिले, साडेतीन हजार कि.मी. मोफत रेल्वे प्रवास तर अमर्याद एसटीचा मोफत प्रवास अशा सुविधा दिल्या जात असल्याने  "तुम्ही जनसेवा म्हणा, आमदार खातोय का मेवा" अशी म्हणायची वेळ सर्वसामान्य जनतेला आली आहे.राज्यावरील कर्जाचा बोजा पाच लाख कोटीवर पोहचला असताना, दुसरीकडे राज्यातील आमदारांच्या पगारावर कोट्यांवधी रूपये खर्च होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. लोकसेवक, कार्यसम्राट या उपाधी लावून जनसेवेसाठी विधानसभा आणि विधान परिषदेवर निवडून येणार्‍या आमदारांच्या पगारावर पाच वर्षात सुमारे ४ अब्ज ९५ लाख ७२ हजाराचा तिजोरीवर बोजा पडत आहे. प्रत्येक आमदाराचा पगार सुमारे पावने दोन लाखांच्या घरात आहे. 
आजच्या डिजिटलच्या युगात विशेष म्हणजे टपाल सेवा आणि दुरध्वनीे सेवेसाठी त्यांना हजारो रूपयांची खिरापत वाटली जात आहे. राज्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदारांची संख्या 367 च्या घरात आहे. या आमदारांचा पगार महिन्याला पावनेदोन लाखाहुन अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधान मंडळाने जानेवारी 2018 या वर्षातील खर्चाची आकडेवारी मती गुंग करणारी आहे. सर्वसामान्य माणूस औद्योगिक वसाहतीत संसाराचा गाडा ओढण्यासाठी 6 ते 7 हजारावर राबतो मात्र आमदारांचे मुळ वेतन 67 हजार रूपये, महागाई भत्ता 91 हजार 120 रूपये संगणक चालकाची सेवा 10 हजार रूपये,दुरध्वनी सेवा 8 हजार रूपये,टपाल सुविधा 10 हजार रूपये, यांचा समावेश असून आमदारांना एकूण 1 लाख 86 हजार 120 रूपये प्रत्येक आमदारांवर दरमहा खर्च होत आहे. 367 आमदारांच्या वेतनापोटी दरमहा 68 कोटी 30 लाख 6 हजार रूपयांचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. 
एका बाजूला शासनाच्या तिजोरील खडखडाट असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. अशा परिस्थितीत स्वत:चे पगार  आणि पेन्शन या सुविधांसाठी सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्‍नावर गळ्यात गळे घालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 
विद्यमान आमदारांना ठराविक अंतर मोफत रेल्वे आणि विमान प्रवास, खासगी रूग्णालयातील वैद्यकीय खर्च ही सुविधा माजी आमदारांना देखील लागू करण्यात आली आहे. शासनाला परवडत नसल्याने शासकिय नोकरांची पेन्शन बंद झाली. मात्र एक टर्म आमदार राहिलेल्या माजी आमदारांना 50 हजार रूपये पेन्शन दिली जात आहे. आमदार जेवढ्या टर्म निवडून येतील त्या प्रत्येक टर्मसाठी पाच हजारांची वाढ पेन्शनमध्ये केली जात आहे. दर पाच वर्षाने काही नवीन आमदार निवडून येतात त्यांना पगार सुरू होतो. तर जे विद्यमान आमदार पराभूत होतात त्यांना पेन्शनच्या यादीत आपोआपच येतात. त्यामुळे दर पाच वर्षाने आमदारांची पेन्शनची यादी वाढत जात आहे सातारा जिल्ह्यात एकुण 24 माजी आमदार पेन्शनचा लाभ घेत आहेत.यामध्ये अनंतमाला विजयसिंह नाईक निंबाळकर, सोनुताई तात्याराव जाधव, कमल सदाशिव पोळ,जयश्री गुदगे, शारदादेवी कदम, आशालता कदम, शशिकला भोईटे, उषा देवी शिंदे, जयश्री अवघडे, शकुंतला तरडे, शशिकला पिसाळ शारदाबाई थोरात, रत्नमाला शिंदे, या माजी  आमदार आणि दिवंगत आमदारांच्या पत्नींना 40 हजार रूपये,  डॉ. दिलीप येळगावकर, तुकाराम तुपे, मदन भोसले, सदाशिव सपकाळ या माजी आमदारांना 50 हजार,प्रभाकर घार्गे 52 हजार रूपये, लक्ष्मण माने 52 हजार रूपये, प्रतापराव भोसले 74 हजार रूपये, विष्णू सोनावणे 70 हजार रूपये, जनार्धन अष्टेकर 60 हजार रूपये, कराड दक्षिणचे माजी आमदार विलास काका उंडाळकर यांना सर्वाधिक 1 लाख 10 हजार रूपये पेन्शनचे मानकरी ठरले आहे. जिल्ह्यात माजी आमदारांच्या पेन्शनवर दरमहा 1 कोटी 36 लाख 56 हजार तर वर्षाला जिल्ह्यातील 24 आमदारांच्या पेन्शन मध्ये डॉ. दिलीप येळगावकर 22 हजार 880, तुकाराम तुपे 22 हजार 890, विलासराव पाटील 1लाख 91 हजार 360, लक्ष्मण माने 27 हजार 880, आशा लता कदम 7 हजार 280, मदन भोसले 22 हजार 880, प्रभाकर घार्गे 30 हजार 480, प्रतापराव भोसले 72 हजार 385 रूपये, जयश्री अवघडे 9 हजार 880, सदाशिव सपकाळ 25 हजार 480, विष्णू सोनावणे 48 हजार , जनार्धन अष्टेकर 6 हजार 500 असा आयकर कपात पेन्शन मधून करण्यात आली आहे. उर्वरित 10 माजी आमदारांना आयकर लागू झालेला नाही. 
सातारा जिल्ह्याची गत आर्थीक वर्षातील आकडेवारी थक्क करणारी असून राज्यातील 36 जिल्ह्यातील आमदारांचे पगार व इतर खर्च तसेच माजी आमदारांच्या पेन्शन मुळे तिजोरीवर पडणारा बोजा कुठेतरी विचार करायला लावणारा आहे, यावर कुठे तरी आळा घातला जावा अशी जोरदार चर्चा सर्वसामान्य जनमाणसात जोर धरू लागली आहे.

"चिनी माल विक्री बंदी : दोंडाईचा न .प . चे अनुकरण करा !"

"चिनी माल विक्री बंदी : दोंडाईचा न .प . चे अनुकरण करा !"


धुळे - धुळे, जिल्ह्यातील दोंडाइचा नगरपालिका ही संपूर्ण देशात चीनी वस्तुंच्या विक्रीवर बंदी आणणारी पाहिली नगरपालिका ठरली आहे . दोंडाईचा नगरपालिका देशात एक उत्कृष्ट नगरपालिका म्हणून नावलौकिक मिळवित असताना , त्याच नगरपालिकेने याबाबतचा ठराव केला आहे . त्यामुळे या पुढे आता दोंडाइचा  शहरात व्यापाऱ्यांना चिनी माल विक्रीसाठी ठेवता येणार नाही . सीमेवर चिनने जी धोकेबाजी चालविली आहे व आपल्या देशाचे वीस सैनिक मारले त्यामुळे देशभरात असंतोष आहे. देशभरात चिनी मालावर बहिष्काराची मोहिम सुरू आहे . चिनी मालाची होळी देखील जागो जागी होत आहे . चिनी अॅप  डिलिट करा , म्हणून मोहिम देखील चालविली जात आहे . एकिकडे देशप्रेमाचे हे वातावरण असताना दुसरीकडे गेल्या आठवड्यात नवीन लॉन्च झालेला चायनाचा महागडा मोबाईल भारतात  काही तासातच संपला . डोकलामच्या वेळी देखील अशी चिनी मालावर बहिष्काराची मोहिम चालली होती , पण  ती मोहिम वाढू शकली नाही , निकर्षाप्रत जावू शकली नव्हती. दरम्यान सरकारनेच शेकडो , हजारो कोटींचे ठेके चिनी कंपन्यांना देणे सुरु ठेवले . या प्रकारच्या बातम्या पाहून चिनी वस्तुंवरील जनतेची बहिष्काराची भावना कमजोर पडते . यासाठी जनतेला दोष देणे सोपे आहे . परंतू सरकारची भुमिकाही ' लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ! ' अशी असता कामा नये . म्हणूनच आता राज्य सरकारने चिनी कंपन्यांचे पाच हजार कोटी रूपये गुंतवणूकीचे प्रस्ताव रोखून धरले , केंद्र सरकारने सीमेस लागून असलेल्या देशांची गुंतवणूक  सरकारच्या संमतीशिवाय होणार नाही , असेही जाहिर केले . सरकारांच्या या कृतीचे जनतेने स्वागतही केले  आहे , त्याच प्रकारे दोंडाइचा नगर पालिकेने  चिनी माल विक्री वर बंदीच्या केलेल्या ठरावाचे जनतेत स्वागत होणार आहे . बऱ्याच नागरिकांच्या मनात अशी शंका असते की , चिनी माल आयातीवर सरकारच बंदी कां घालत नाही ? प्रश्न सरळ आहे. पण आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गॅट करारावर सही केलेली आहे . त्यामुळे सरकार म्हणून अशी बंदी घालता येत नाही . शिवाय चिनने इतक्या वर्षात विविध वस्तूंचे उत्पादन केंद्र बनून संपूर्ण जगाचे चिनवर मोठे अवलंबित्व  निर्माण करून टाकले आहे . हा सुध्दा एक मुद्दा आहे . असे असले तरी जनतेनेच चिनी वस्तू विकायच्या नाहीत, विकत घ्यायच्या नाहित असे ठरविले , तर  त्यास गॅट किंवा अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रिय कराराची बाधा येत नाही . त्यामुळे देशभरात जर नागरिकांनी चिनी वस्तु घ्यायच्या नाहित ठरविले , चिनी वस्तु विकायच्याच नाहित , असे दुकानदारांनी ठरविले तर त्यास कुठलीच बाधा येवू शकत नाही . आता दोंडाइचा न प ने शहरात अशा चिनी वस्तू विक्रीवर बंदीचा ठराव केला आहे . त्यांनी सर्व बाबी तपासून घेवूनच हा ठराव केला असेल . या ठरावाचे परिणाम व महत्व मोठे आहे . याच प्रकारे विविध ग्रा. पं. , नगर पालिका , नगरपंचायत , नगर परिषद , महानगर पालिका यांनी गावोगावी ठराव करुन चिनीमाल विक्रीस बंदी घातली तर देशभरात खूप मोठा रिझल्ट मिळू शकतो. शासनाने देखील ऑनलाईन विक्री होणाऱ्या मालावर तो कोणत्या देशात उत्पादित झाला आहे . हे नमूद करणे बंधनकारक केले आहे . बऱ्याच ऑनलाईन  व्यापार कंपन्या परदेशी आहेत . त्धांनी स्वतः मेड इन चायना , मेड इन पी आर  सी असणारे प्रॉडक्ट विकणे बंद केले नाहि , तरी  संपूर्ण देशभरातील डिलिव्हरी बॉय  यांनी ठरविले, की  आम्ही चायना मेड मालाची डिलेव्हरी करणार नाही , तरी सुध्दा खूप फरक पडू शकतो . यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहिम चालली पाहिजे . त्या दृष्टीने दोंडाईचा नगरपालिकेच्या या ठरावाप्रमाणे संपूर्ण देशात न .प .मनपांनी ठराव केले, आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली तर खूप मोठे काम होणार आहे .

राष्ट्रीय कर्मचारी सेनेची महत्त्वाची बैठक राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयजी क्रिकेट क्लब बांद्रा येथे संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेची महत्त्वाची बैठक  राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयजी क्रिकेट क्लब बांद्रा...