Sunday, 28 June 2020

खंडणीसाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची विकासकाचा आरोप !

खंडणीसाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची विकासकाचा आरोप !

"विकासकाची मुख्यमंत्र्याकडे तक्रार"

कल्याण : टीटवाळा येथील विकासकाच्या ५ बिल्डींगचे काम सुरु असल्यामुळे त्याच्याकडे ५ लाखाची खंडणी मागत खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच पोलीस ठाण्यात बोलावून  बेदम मारहाण केल्याची घटना टीटवाळा पोलीस ठाण्यात घडल्याचा आरोप करत संबधित विकासक विमलेश तिवारी यांनी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

तिवारी यांचे टीटवाल्यानजीक अधिकृत ५ इमारतीचे काम सुरु असून या कामाची पाहणी करत काम पूर्ण व्हावे म्हणून  सहकार्य करण्यासाठी टीटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी आपल्या कर्मचारी  गाडे यांना ५ लाखाची खंडणी मागण्यासाठी साईटवर पाठवले. मात्र हि खंडणी देण्यास नकार दिल्यानेपोलीस नाईक गोल्हार यांनी खंडणी न दिल्यास कोणत्याही गुन्ह्यात त्यांना अडकविण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आपल्या नातेवाइकाबरोबर झालेलं बोलणे रेकॉर्ड करून घेत आपल्याला पोलीस ठाण्यात बोलवून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार तिवारी यांनी केली आहे याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले असून यात आपल्याला नाहक त्रास देत खोट्या गुन्ह्यात अडकविनार्या  वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांच्यासह गोल्हार आणि गाडे यांच्यावर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.  
दरम्यान याबाबत बालाजी पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या तक्रारीत तथ्य नसून पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्याची बदली थांबविण्यासाठी त्याने रचलेले हे नाटक असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...