Sunday 31 July 2022

रक्तदान शिबिरात जपली सामाजिक बांधिलकी ११६१ जणांचे विक्रमी रक्तदान ; संतोष अबगुल प्रतिष्ठानचा नालासोपारा येथे अभिनव उपक्रम !

रक्तदान शिबिरात जपली सामाजिक बांधिलकी
११६१ जणांचे विक्रमी रक्तदान ; संतोष अबगुल प्रतिष्ठानचा नालासोपारा येथे अभिनव उपक्रम !


मुंबई, बातमीदार : संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा पुर्व येथील डिवाईन लाईफ हायस्कुल येथेे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात सामाजिक बांधिलकी जपताना विक्रमी ११६१ नागरिकांनी आपले रक्तदान करून आदर्श घालून देत माणुसकीच्या रक्ताचे नाते आधोरेखित केले. 


यावेळी खेड, दापोली, मंडणगडचे सुपुत्र जे मुबंईमध्ये राहणारी स्वराज्य प्रतिष्ठान उमरोली, पाले ग्रामस्थ मंडळ, साकुर्डे ग्रामस्थ, वांझळोली ग्रामस्थ, पालवणी पंचक्रोशी, वांझळोली गावठान वाडी, चिखलवाडी ग्रामस्थ मंडळ, शिवराज्य प्रतिष्ठान (वसई,पालघर), तसेच देवेंद्र सावंत परीवारा तर्फे १५१ लोकांनी संतोष अबगुल प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीराला उपस्थित राहुन आपले रक्तदान केले. 


दिवसभरात नालासोपारा परीसरातील रक्तदाते यांनी आवर्जुन या रक्तदान शिबीरात जाऊन रक्तदान केले. तब्बल ११६१ जणांनी आपले रक्त या शिबिरात दान करुन एक वेगळा विक्रम नोंदवला. त्याबद्दल बोलताना उपस्थित डॉक्टरांनी, असे रक्तदान एवढ्या वर्षात कुठेही पहायला मिळालं नसल्याचे सांगितले. उपस्थितांनी अबगुल प्रतिष्ठानचे डॉक्टरांनी आभार मानले. रक्तदान शिबिरात महीलांचाही समावेश लाभला होता. संतोष अबगुल प्रतिष्ठांच्या वतीने प्रत्येक रक्त दात्यांना प्रमाणपत्र, दुध बिस्किट व जेवणाची व्यवस्था केलेली होती.
या शिबिराला अरूण जाधव नगरसेवक, निलेश देशमुख नगरसेवक, विश्वनाथ रक्ते, मनिष माईन, विनायक मांडवकर, गणेश बैकर, आशिष पाटील, दिलीप बडबे पालवणीचे अभिषेक कदम, गणेश नवगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

सौ. सुवर्णा ताई कानवडे याना महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पुरस्कार ! "युनिफाईड ह्यूमन राइट्स कोन्सिल वर सुवर्णा ताई कानवडे याची ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती"

सौ. सुवर्णा ताई कानवडे याना महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय पुरस्कार !

"युनिफाईड ह्यूमन राइट्स कोन्सिल वर 
सुवर्णा ताई कानवडे याची ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती" 


ठाणे, बातमीदार : श्रमिक पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा संघटिका ह्या पदावर संस्थापक प्रकाश गणपत संकपाळ यांनी नियुक्ती केली होती ताई सतत आपल्या पदाचा वापर करून राज्यात महिला अन्याय अत्याचार वर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. 


तसेच ताई महानगर सफाई कामगार संघ पदावर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तसेच मिशन महाराष्ट्र नारी शक्ती जिल्हा संघटिका आहेत. त्या मानवी अन्याय निर्मूलन संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. सतर्क पोलीस टाइम्स चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुद्धा आहेत.


आज पर्यत ताईने शेकडो महिलांना कोटूंबिक हिंसाचार, बलात्कार अपहरण. जेष्ठ नागरिकांनवर हिंसाचार बाबत अनेक समस्यांना सोडविण्यात ताई ना यश मिळाले आहे.


महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. महिला बचत गट, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आदी विविध योजना वेगवेगळ्या विभागामार्फत राबविल्या जातात.

निराधारांसाठी शासनाचा आधार...बालिका समृध्दी योजना.....
इंदिरा गांधी महिला संरक्षण योजना। देवदासी पुनर्वसन योजना....
महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची योजना.... 

सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना महिला बचत गट अश्या अनेक क्षेत्रात ताई कार्यरत आहेत. ताई ना अनेक जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नामदार ओमप्रकाश बच्चू कडू यांना महिला व बाळ कल्याण त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली असल्याने ताईने राज्यातील अनेक महिलांना महिला संरक्षण अधिकारी यांच्या मदतीने न्याय मिळवून देण्याची मोठी भूमिका पार पाडत आहेत, ताईने असा संकल्प केला आहे की आंध्र प्रदेश या राज्यात महिला अत्याचार बाबत आरोपीना २१ दिवसात शिक्षा होते हा कायदा ही महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे या साठी २५००० महिलांना घेऊन ताई विधान भवन गाठणार आहेत, असा ही संकल्प ताईने घेतला आहे. त्यामुळं त्यांचं सामाजिक वजन प्रचंड वाढलं आहे. आज पर्यत ताई ने शेकडो कोटुंबिक वादाच्या प्रकरणाला न्याय मिळवून दिला आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तााईंन स्वतः पुढाकार घेऊन महिलांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी 12 पेक्षा जास्त बलात्कार गुन्हे नोंदविले आहेत. असह्य अनेक सामजिक कार्यात ताई अग्रेसर असतात त्यामुळे ताई ला महाराष्ट्र शासन उपक्रम 'ग्लोबल महाराष्ट्र' ठाणे जिल्हा पर्यटन महोत्सव समिती व महाराष्ट्र राज्य कला व पर्यटन सांस्कृतिक समिती द्वारे महाराष्ट्र राज्य स्तरीय देऊन पर्यटन भूषण महाराष्ट्र मा. उमाजी भिषेन याच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. असून ताई ला युनिफाईड ह्युमन राइट्स कोन्सिल मध्ये राष्ट्रिय अध्यक्ष सय्येद ओवेसी व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ आदर्श भालेराव याच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली त्यामुले ताई ची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ही दिसून येत आहे.

*श्रावणाच्या मेघगर्जनेत निवोशीतील "शिसरोंडी" धबधबा पर्यटकांच्या गर्दीत ओसंडून वाहतोय !* ---------------------------------------------- *[ ✒️ संकलन / लेखक:- उदय गणपत दणदणे (ठाणे) निवोशी-गुहागर ]* *मोबाईल नंबर -८२७५६२७६३६*

*श्रावणाच्या मेघगर्जनेत निवोशीतील "शिसरोंडी" धबधबा पर्यटकांच्या गर्दीत  ओसंडून वाहतोय !*
----------------------------------------------
*[ ✒️ संकलन / लेखक:- उदय गणपत दणदणे (ठाणे) निवोशी-गुहागर ]*
*मोबाईल नंबर -८२७५६२७६३६* 


कोकणात गुहागर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत-निवोशी कार्यक्षेत्र निवोशी येथील "शिसरोंडी" वनराईतील धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षक ठरत असून पावसाळा आणि त्यात श्रावण महिना सुरू झाला की धबधब्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तरुणाईची या ठिकाणी विशेषतः गर्दी पाहायला मिळते ! श्रावण महिन्यात येथील डोंगर वनराई हिरवळ शालूने, सोनेरी किरणांनी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. कातळ परिसर, पाऊल वाटा, रानफुलांनी बहरलेलं निसर्ग सौंदर्य. वाऱ्याची हलकी झुळूक पर्यटकांना अगदी भुरळ घालत असते.


अनेकांच्या मोबाईल मध्ये या सौंदर्याचा अचूक नजराणा टिपला जातो तर अनेक युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या धबधब्याची विस्तृत माहिती व्हिडिओ स्वरूपात प्रसारित होत असते. धबधब्याला लागुनच अश्मयुगीन गुहा आहे, साधारण दहा-पंधरा वर्षापूर्वी याठिकाणी अश्मयुगीन काळातील अवजारे सापडली होती, ही गुहा पाहण्याचीही पर्यटकांची इच्छा पूर्ण होऊन जाते.


मात्र या धबधब्याचे आनंद लुटताना काही सूचनांचे पालन करणे विशेष काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. धबधब्याच्या ठिकाणी जाणारी पाऊल वाट ही संपूर्ण कातळस्थितीत असुन पावसाळ्यात संपूर्ण परिसरात शेवाळी तयार होत असते त्यामुळे चालताना पाय घसरून पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. कातळ परिसर असल्याने सरपटणारे प्राणी उदा. विंचू, सर्प, अन्य विषारी जीवाणूंकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. धबधब्याच्या    प्रमुख जल प्रवाहाच्या ठिकाणी जाणे टाळावे व सदर धोकादायक  ठिकाणी सेल्फी घेणे फोटो काढणे यांचा मोह टाळावा. आपण सुरक्षित आहोत अशा ठिकाणीच सेल्फी-फोटो टिपावेत.ज्यांना पोहता येत असेल त्यांनीच शक्यतो डोहात उतरण्याचे धाडस करावे.आपणास सदर परिसराची माहिती नसल्यास निवोशी गावातील जळपास राहणाऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी. आपल्या सोबत पाण्याची बाटली असावी.


ग्रामस्थांच्या निदर्शनास प्रामुख्याने समोर आलेल्या घटनांच्या अनुसरून  सदर आसपासच्या परिसरात प्रेमीयुगलांनी अशोभनीय असे कोणतेही वर्तन करू नये. मद्यप्राशन करून कोणत्याही प्रकारच्या काचेच्या बॉटल फोडू नयेत अथवा इतर प्लास्टिक कचरा करू नये कारण सदर रान माळावर जनावरे चरत असतात. शिवाय स्थनिक ग्रामस्थ शेती करत असल्यामुळे सदर काचेचे तुकडे शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पायाला दुखापत होत आहेत. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून निवोशी ग्रामस्थ जनतेला सहकार्य करावे एवढीच मापक अपेक्षा.

शिसरोंडी पर्यटनस्थळाच्या प्रसिद्धीमुळे भविष्यात शिसरोंडी धबधब्यामुळे निवोशी गावाला नवीन ओळख प्राप्त होतेय याचे ग्रामस्थांमध्ये अधिक समाधान आहेच ! श्रावणातील मेघ गर्जनेत आपण आणि आपलं अवघ कुटुंब या निवोशी गावातील नयन रम्य निसर्गाचा आणि शिसरोंडी धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटताना अवघ्या निवोशी गावची ख्याती सर्वदूर होत आपल्या हृदयी कप्यात आठवणी साठवल्या जातील हिच निवोशी गावची खरी ओळख होय !

शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे तर अनिता बिर्जे यांची उपनेतेपदी नियुक्ती !

शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे तर अनिता बिर्जे यांची उपनेतेपदी नियुक्ती !


भिवंडी, दिं ३१, अरुण पाटील (कोपर) :
           ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली आहे. तर, आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
           शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. केदार दिघे यांच्या नियुक्तीनंतर ठाण्यात पुन्हा शिवसेनेचे दिघे राज सुरू होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
           आज ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेने सोबत कायम असल्याची ग्वाही शिवसैनिकांनी दिली. या भेटी नंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. 
            शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे. 
            आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्यातील शिवसेनेचा चेहरा झाले होते. ठाणे, पालघर, कल्याण-अंबरनाथ या पट्ट्यात एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केले. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठाणे, पालघरमधून मोठी पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनी गृहीत धरली होती. बंड चिघळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी अनेक जु्ने शिवसैनिक सक्रिय झाले आहेत. 
            ठाण्यातही आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले खासदार राजन विचारे हे सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, शिंदे यांच्या सोबत न जाणाऱ्या एकमेव नगरसेविका या राजन विचारे यांच्या पत्नी आहेत. 
           एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटले होते. त्यामुळे केदार दिघे हे काही काळ पक्ष कार्या पासून दूर होते, अशी चर्चा सुरू होती. त्या शिवाय एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले देखील पु्न्हा शिवसेनेत सक्रिय होत आहेत. शिवसेना नेतृत्वाकडून या जुन्या शिवसैनिकांना संधी दिली जात असून शिवसेने पक्षाला उभारण्यासाठी आनंद दिघे यांच्या काळातील जुन्या शिवसैनिकांवर जबाबदारी सोपवन्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

कुणबी सेवा संघ संचालित नवभारत छात्रालय परिवार दापोली आणि अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस्, दापोली यांच्यातर्फे ग्रुप ग्रामपंचायत दमामे- तामोंड, ता. दापोली येथे मोफत रोपे/ कलमे वाटप !

कुणबी सेवा संघ संचालित नवभारत छात्रालय परिवार दापोली आणि अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस्, दापोली यांच्यातर्फे ग्रुप ग्रामपंचायत दमामे- तामोंड, ता. दापोली येथे मोफत रोपे/ कलमे वाटप !


मुंबई, (शांताराम गुडेकर ) :                              
             दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कुणबी सेवा संघ दापोलीच्या नवभारत छात्रालय परिवारा तर्फे ग्रुप ग्रामपंचायत दमामे - तामोंड ता. दापोली येथील शेतकऱ्यांना प्रत्येकी चार कोकम रोपे तर अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस् दापोली यांचे तर्फे प्रत्येक शेतकऱ्याला दोन काळीमिरी कलमे मोफत देण्यात आली. हा कार्यक्रम आयोजित करण्यात समन्वयकाची भूमिका डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ विस्तार विभाग, डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ वाहन चालक संघटना व कृषि विस्तार अधिकारी महाराष्ट्र शासन, सौ. गावंडे (सावके) मॅडम यानी पार पाडली.


           या कार्यक्रमात मु. दमामे - तामोंड गावामध्ये शेतकऱ्यांना १६०० कोकम रोपे आणि ८०० काळीमिरी कलमे मोफत देण्यात आली. या प्रसंगी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे सर, सरचिटणीस श्री. हरिश्चंद्र कोकमकर, तसेच दमामे - तांमोड गावचे सरपंच श्री. गंगाराम हरावडे, पोलिस पाटील श्री.संतोष बुरटे, डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ वाहन चालक संघटना उपाध्यक्ष श्री.बालगुडे तसेच कृषि मित्र श्री. कांदेकर, प्रगतीशील शेतकरी श्री. अनंत बंगाल व मोठ्या संस्थेने शेतकरी बंधू-भगिनी हजर होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. प्रविण झगडे यांनी केले. यावेळी प्रा. प्रभाकर शिंदे सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कोकम व काळीमिरी लागवडीचे महत्त्व आणि लागवडी संबंधिची सविस्तर माहिती या पिकांचे अर्थशास्त्र या विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे कुणबी सेवा संघाच्या विविध उपक्रमांची पुस्तिका सर्वांना देण्यात आली. 
कृषि विस्तार अधिकारी सौ. गावंडे (सावके) मॅडम, श्री.बालगुडे उपाध्यक्ष, वाहन चालक संघटना, सरपंच श्री.गंगाराम हरावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये डाॅ. प्रविण झगडे कृषि अधिकारी यानी उपस्थित सर्व मान्यवरांचे व शेतकरी बंधू-भगिनींचे आभार मानले.

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार; त्यानिमित्ताने कोकणातील श्री मार्लेश्वर या जागृत देवस्थानाविषयी थोडक्यात........

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार; त्यानिमित्ताने कोकणातील श्री मार्लेश्वर या जागृत देवस्थानाविषयी थोडक्यात........


                महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचं श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा अविष्कारच ! त्यातच मार्लेश्वर म्हणजे नागमोडी पर्वतरांगा जणू निसर्ग सागरावर उमटणा-या सोनेरी लाटाच ! या निर्जन, निरव शांतता असलेल्या अरण्यात अध्यात्मिक उपासकांसाठी अभंग शांतता भरून राहिली आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योग साधकास अध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे.


              सगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे १५ कि. मी.आणि आंगवली या गावापासून ११ कि. मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं हे पवित्रआणि जागृत  देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. नैसर्गिक दृष्ट्या अतिशय विलोभनिय असणा-या या ठिकाणी माणूस अक्षरश: हरवून जातो. भोवतालच्या रमणीय परिसराचा व हिरव्यागार वनश्रीचा आस्वाद घेण्यात दंग होतो. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे कुंजन प्रसन्नतेला वरदान आहे. पावसाळ्यात किंवा पावसाळा संपता संपता श्री क्षेत्र मार्लेश्वरला भेट देण्याची मजा आणखीनच वेगळी असते.


            श्री क्षेत्र मार्लेश्वर बसस्थानकापासून पुढे अरुंद नागमोडी सिमेंटच्या पाय-यांची पक्की पायवाट आहे. घनदाट जंगल, खाली खोल दरी, माथ्यावर सह्याद्रीची शिखरं पाहत असताना अनोख्या विश्वात कधी पोहचतो, याचे भानच राहत नाही. देवळाचा साडेतीन फुटी दरवाजा व गाभारा गुहास्वरूपाचा असून तो सुरक्षित आहे. एकावेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते. गाभा-यात मात्र २५ माणसं उभी राहू शकतात. ही गुहा पांडवकालीन असल्याचे जनमत आहे. गाभा-यात शंकराची स्वयंभू पिंड आहे. सोबत पाण्याचे कुंड असून खोळवर गेलेली विवरं आहेत. याठिकाणी विविध प्रकारचे साप व नाग मुक्तपणे संचार करताना दिसतात.मात्र ते कोणालाही इजा करत नाहीत. वाटेत वानरांची खोडकर वानरसेना हसत खिदळत मन रिझवतात. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक सांस्था, पत्रकार, स्वयंसेवक श्री क्षेत्र मार्लेश्वर ट्रस्ट, मारळ ग्रामपंचायत व अन्य समिती पदाधिकारी, सदस्य, पोलिस यंत्रणा प्रयत्न करत असतात. येणा-या-जाणा-या भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून दक्षता घेतली जाते. शिवाय स्वच्छता राखण्याचे कामही चोख बजावले जाते. अनेक सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे कार्यकर्ता झटत असतात.


          मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी याठिकाणी र्वषभर रिघ असते. शालेय सहली याचठिकाणी मोठय़ा प्रमाणात येत असतात. दर महिन्याच्या सोमवार व शनिवार तसंच सुट्टीच्या दिवशी व श्रावण महिन्यात, महाशिवरात्री, दत्तजयंती या दिवशी तर भाविकांचा महासागर लोटतो. जानेवारी महिन्यात तर येथे खूपच गर्दी असते. कोकणवासीय चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरचा जत्रौत्सव असतो. १३ व १८ जानेवारी दरम्यान होणा-या या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात. पूर्वी मारळ, आंगवली या गावांना फारसं कोणी ओळखत नव्हतं. परंतु आज मारळ-आंगवली म्हणजे मार्लेश्वर व मार्लेश्वर म्हणजे आंगवली-मारळ होय. या यात्रेसाठी भाविक पायी, सायकल व इतर खाजगी वाहने, एस.टी. बसेसने येत असतात. मुंबई येथून अनेक भाविक ग्रुपने बस करून यात्रेसाठी जातात. परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल, ठाणे, बोरिवली याठिकाणाहून तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, साखरपा, देवरूख, संगमेश्वर, सावंतवाडी याठिकाणाहून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे एस.टी.ची सोय केलेली असते.

          मारळ-आंगवली मध्ये या काळात दिवाळी साजरी होत असते. अंगणात रांगोळी, दरवाजावर तोरण, रंगरंगोटीही करून येणा-या-जाणा-या भाविकांचे, नातेवाईक यांचे स्वागतच केले जाते. हजारो गाडय़ा ये-जा करत असतात. सारा परिसर ‘हर हर महादेवऽऽऽ..’, ‘हर हर मार्लेश्वरऽऽऽ..’ या जयघोषाने दुमदुमत असतो. आंगवली गावांमध्ये असणारे माल्रेश्वर देवालय (मठ) व मारळचे श्री क्षेत्र माल्रेश्वर देवस्थानचे पावित्र्य जपणे प्रत्येकाच्या हाती असते. कारण ही दोन्ही मंदिरे वैशिष्टय़पूर्ण आहेत. याठिकाणी येणारे भाविक मद्यपान करून येऊ शकत नाहीत. शिवाय मांसाहार केलेलाही चालत नाही. महिलांनी आपल्या अडचणीत याठिकाणी येऊ नये असा संकेत आहे. ज्यांनी या बाबींचा विचार केला नाही, त्या-त्या वेळी नैसर्गिक आपत्ती वा अपघात झाले असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते. येथील धारेश्वर धबधब्याखाली प्रत्येक भाविक (पुरुष-महिला, युवकवर्ग) एकत्रितपणे स्नान करून शुचिर्भुत होऊनच माल्रेश्वरचे दर्शन घेतात. येथे स्नान करणे हा एक अनोखा आनंदच ! वर्षासहलीसाठीही येथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. आपणही एक वेळ येथील जत्रौत्सवाचा किंवा मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचा अनुभव घ्यावा. येथील निसर्ग सौंदर्य, धारेश्वर धबधबा आपणास येथे पुन्हा पुन्हा येण्यास उद्युक्त करते. कारण हे माल्रेश्वर देवालय (मठ) व श्री क्षेत्र माल्रेश्वर तीर्थस्थान ग्रामदैवत तितक्याच निसर्गरम्य गावात वासलेले असून मनाला ओढ लावणारे, स्मृतिचिरंतन करणारे, गतकाळाला उजाळा देणारे नव्हे तर पुन्हा-पुन्हा पाहातच राहावे असेच आहे. एकवेळ आपणही आमच्या या श्री क्षेत्र मार्लेश्वरला अवश्य भेट देऊन आनंद लुटावा.

‘हर हर महादेवऽऽऽ..!!’ ‘
हर हर मार्लेश्वरऽऽऽ..!!’
शांत्ताराम गुडेकर
विक्रोळी (प.) - +91 98207 93759

मुंबई गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात, राऊतांसह अधिकारी ईडी कार्यालयाकडे रवाना

मुंबई गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात, राऊतांसह अधिकारी ईडी कार्यालयाकडे रवाना

                  ईडी कार्यालयात जाताना राऊत
अरूण पाटील, भिवंडी (कोपर), दि. ३१ :
        तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना घेऊन ईडीचे अधिकारी फोर्ट येथील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. तेथेच त्यांची पुढील चौकशी होणार आहे.
        मुंबई -गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकसा प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक सकाळी ७.३० वाजता राऊत यांच्या घरी धडकले होते. पथकात १० ते १२ अधिकारी असून त्यापैकी सात अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतली.
           दरम्यान, संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. भाजप व ईडी विरोधात शिव सैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. पोलिसांचाही मोठा फौजफाटा राऊत यांच्या घरासमोर तैनात करण्यात आला होता .
              पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. पथकाने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट सील केला आहे. हा फ्लॅट राऊत यांनी ८३ लाख रुपयांना खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.
             संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांची देखील चौकशी सुरू आहे. दादरमध्ये जप्त केलेला फ्लॅट आणि अलिबागमधील जमीन या संदर्भात आता ईडी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. जमीन आणि फ्लॅट हे वर्षा राऊत यांच्यावर नावावर असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी सुरू आहे.
          राऊत यांना ईडीने २७ जुलै रोजी समन्स बजावले होते. ते अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाही. यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले होते . तेंव्हा संजय राऊत आणि त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत हे दोघेही सध्या त्यांच्या भांडुपयेथील मैत्री  बंगल्यावर होते.
             शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान ४ टविट केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
           या वेळी अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा ठेवला होता  कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला. ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते.
          राऊत यानी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र त्यानंतर आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या कुुटुंबीयांसमवेत संजय राऊत घरी असून अनेक प्रकरणात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असे ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी म्हटले होते.
                रोज सर्वांची सकाळ खराब करणार्यांची सकाळ आज खराब झाली यामुळे चांगले वाटतंय, पत्राचाळीत राहणाऱ्या गरीब मराठी लोकांना आज न्याय भेटेल. राऊत झुकेगा नही असे म्हणत होता, मात्र आता आत सुकेंगा नही असे विचारा त्यांना असा टोला आमदार नितेश राणेंनी लगावला आहे. भ्रष्टाचार केला म्हणून त्याची शिक्षा भोगावी लागेल, यांचे सहकारी म्हणतील की सत्तेचा गैर वापर सुरू आहे, मात्र लोकांना फसवल्यावर त्याची किंमत मोजीवी लागेलच असेही राणेंनी म्हटले आहे.
               या प्रकरणात संजय राऊत् यांचा काही संबंध नाही. असे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने ते चौकशीला गेले नाही, त्यांनी वेळ मागितला होता. मात्र हे सुडाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे, आणि सामनातील अग्रलेखांमधून होणाऱ्या टीकेचा सुड उगवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरेंना दाखवायचे आहे की बघा तुमच्या जवळच्या माणसांना देखील आम्ही अटक करू शकतो. शरण या नाही तर ईडीची कारवाई होईल असे म्हणताना अरविंद सावंत म्हणाले की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे असा आरोप केंद्र सरकारवर केला आहे.
          अखिर हिसाब देना होगा, असे म्हणतांना किरीट सोमय्यांनी १२०० कोटींचा पत्राचाळ घोटाळ्याचा असो की माफियागिरीसह लोकांना धमक्या देणे असो की मविआ सरकारने केलेल्या घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागेल असे म्हणत नवाब मलिकांच्या बाजुला संजय राऊत जातील असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

ईडीच्या  कारवाईतील मुख्य मुद्दे.
---------------------------------------------------------------
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू, फ्लॅट विकण्याचा नावाखाली १३४ कोटी जमा केले.
--------------------------------------------------------------
म्हाडाच्या इंजीनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी.
--------------------------------------------------------------
एकूण १०३९.७९ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय.
-----------------------------------------------------------
१०० कोटी रुपये प्रवीण राऊतांच्या अकाउंटवर ट्रान्सफर.
--------------------------------------------------------------
प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांना हस्तांतरित केली.
-----------------------------------------------------------------
५५ लाख रुपये वर्षा संजय राऊत यांना दिल्याचे समोर.
---------------------------------------------------------------
ईडीने याआधी कारवाई करत खासदार संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केले आहे. ही कारवाई काही दिवसांआधी करण्यात आली होती. एकूण ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांच्या स्थावर मालमत्ता आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे

शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेश शुल्कात सुट मिळावी - प्रदीप वाघ

शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेश शुल्कात सुट मिळावी - प्रदीप वाघ


जव्हार- जितेंद्र मोरघा :

प्राथमिक शिक्षण घेत असताना इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देऊन भविष्यात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती चा लाभ घेता येतो.

तसेच या परीक्षा म्हणजे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षण आहे किंबहुना विद्यार्थ्यांना सर्वांगीण अभ्यासाची तयारी करून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. ग्रामिण भागात यापूर्वी बहुसंख्य विद्यार्थी हि परीक्षा देत होते.

त्यावेळी परीक्षा शुल्क नाममात्र होते.

परंतु या वर्षी या शुल्कात मोठी वाढ झाली असून १००/- रुपये करण्यात आली आहे.

त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी याबाबत प्रदीप वाघ यांना संपर्क साधला व माहिती दिली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत आदिवासी भागातील विद्यार्थी सहभाग घेतील परंतु शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामधुन सुट मिळावी अशे पत्र प्रदीप वाघ यांनी. मा.मुख्यमंत्री महोदय, मा.आयुक्त शिष्यवृत्ती परीक्षा‌ शिक्षण विभाग पुणे व पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा यांना दिले आहे.

तरी या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी अशी अपेक्षा प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली आहे.

जव्हार तालुक्यात तूर पिकावर संकट, पावसाने पिक भुईसपाट !

जव्हार तालुक्यात तूर पिकावर संकट, पावसाने पिक भुईसपाट !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

       यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी जून उलटून जुलै महिन्यांच्या प्रारंभी पावसाने खरी सुरूवात केली. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. त्याने जमिनीची योग्य मशागत करुन पेरणी केली होती. जव्हार तालुक्यात शेतकऱ्यांनी वरई, नागली, भात, तूर हि पिके घेतली आहेत. परंतु जुलै महिन्याच्या मध्यंतरी पडलेल्या मुसळधार पावसाने तूर पिकाची पुरती वाट लावली आहे.
      शेतकऱ्यांनी नांगणी करुन तुरीची लागवड केली.परंतु तुरीचे पिक जोमात असताना झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची तूर शेतात सडून गेली. हातचे पिक वाया गेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. आधीच ग्रामीण भागात शेती करतांना खर्चासाठी रोजगाराचे साधन नाही. शेती हाच व्यवसाय समजून पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. मात्र झालेल्या अतिवृष्टीने तूर पिकाच्या नुकसानीमुळे बळीराजाचा तोंडचा घास हिरावला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.
      बाजारपेठेत गेल्या वर्षी हि तूरीचे उत्पादन घटल्यामुळे तुरडाळीने शंभरी ओलांडली होती. यावर्षी हि तूर पिक घटल्याने घाऊक बाजारपेठेत तूरडाळीचे दर वधारु शकतात. माञ पावसाने तूर पिकाच्या झालेल्या नुकसानीने जव्हार तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर पिकाच्या नुकसानीचे कृषि विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी बळीराजाने केली आहे.

     "आम्ही यंदाच्या वर्षी तुर पिकाची पेरणी वेळेवर केली होती.परंतु यंदा आठवडा भर खुप पाऊस पडल्यामुळे आमच्या राबात तुर पिकाची काडी सुध्दा वाचली नाही. तरी शासनाने तुर पिकाचे पंचनामे करुन आम्हांला नुकसान भरपाई मिळावी".

    --बाबन मोरघा, शेतकरी (विनवळ) जव्हार.

कांबा ग्रामपंचायत हद्दीत खळबळ ? तीनशे सत्तर एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश, पंधरा वर्षाच्या लढाईला यश !

कांबा ग्रामपंचायत हद्दीत खळबळ ? तीनशे सत्तर एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश, पंधरा वर्षाच्या लढाईला यश !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झालेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे, ३७० एकर जमीन ही सरकार जमा करण्याचे आदेश कल्याण चे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजीत भांडेपाटील यांनी नुकतेच दिले असून यामुळे गेली १५ वर्षे कायदेशीर लढा देणारे शेतकरी, गोरगरीब आदिवासी यांना अखेरीस यश मिळाले आहे. त्यामुळे या परिसरात आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कल्याण मुरबाड महामार्गाला लागुन कांबा ग्रामपंचायत हद्दीत शासनाची शेकडो एकर जागा आहे, येथेच शहा आणि कंपनीची देखील शेकडो एकर जमीन आहे, कांबा ग्रामपंचायत हा औद्योगिक पट्टा म्हणून विकसित झाल्याने येथे जागेला सोण्याचा भाव प्राप्त झाला आहे. येथील आदिवासी, शेतकरी, गोरगरीब हे वर्षानुवर्षे शेती करत आहेत, पर्यायाने यातील बहुतांश जमीनीवर यांची कब्जे वहिवाट आहे, त्यामुळे सर्व्हे नंबर, ५१, १, १५० एकर, ३५, १-१४ एकर, ७७-१७० एकर, ६४, ३५ एकर आणि सर्व्हे नंबर १२५-१ एकर अशा सुमारे ३७० एकर पेक्षा जास्त जागेचा कुळवहिवाटीचा वाद न्यायालयात सुरू आहे. संजय शहा, राजेश शहा, शांतीलाल शहा, मिलिंद शहा विरुद्ध देवराम सुरोशे, शाताराम बनकरी (मयत) भागीरथी शांताराम बनकरी, विठ्ठल बनकरी, भगवान बनकरी, बुधाची बनकरी, नारायण बनकरी, सोनूबाई भोईर, सुमन भोईर, कल्पना चौधरी, राजेंद्र कुंडले, सोमित्र गोसावी,(मयत) वांसती गोसावी, सचिन गोसावी, आदिती गोसावी, अनुराधा गोसावी, अंजली कळसकर असा हा वाद सुरू होता. गेली १५ वर्षे विविध प्रकारच्या न्यायालयात ही केस सुरू होती. अखेरीस शहा आणि कंपनी हे शेतकरी असल्याचे पुरावे सादर करु न शकल्याने कल्याण उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित भांडेपाटील यांनी वरील सर्व्हे नंबर मधील सुमारे ३७० एकर जमीन ही सरकार जमा अर्थात यावर महाराष्ट्र शासन अशी नोंद घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठी कांबा यांनी फेरफार नोंद करून सदर ७/१२ उता-यावर महाराष्ट्र शासन अशी नोंदी केली आहे. परंतु मंडल अधिकारी यांच्या कडून फेरफार नोंद मंजूर करण्यात आलेली नाही. ते लवकर करतील अशी अपेक्षा शेतकरी व आदिवासी यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात कल्याण प्रांताधिकारी डॉ. अभिजित भांडेपाटील यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, तर तलाठी कांबा, राजेश दळवी हे म्हणाले, आपण याबाबत फेरफार नोंदवले आहेत.

श्री समर्थ क्लिनिक च्या माध्यमातून स्थानिकांना विविध आजारांवर मोफत औषधोपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न...

श्री समर्थ क्लिनिक च्या माध्यमातून स्थानिकांना विविध आजारांवर मोफत औषधोपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न...


पालघर/ प्रतिनिधी :

श्री समर्थ क्लिनिक, कृष्णा आय व्हिजन, वाडा हॉस्पिटल आणि श्री पाटील मेडिकल यांनी वाडा तालुक्यातील खानीवली सारख्या मागास भागात आरोग्य सुविधांची असणारी गरज लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील श्री समर्थ क्लिनिक, खानिवली येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करून ग्रामीण रुग्णांना मोफत सेवा देण्याचा प्रयत्न केला. या आरोग्य शिबिरात वाडा हॉस्पिटलचे नामवंत डॉ. अमित शर्मा, श्री समर्थ क्लिनिक चे डॉ. भुषण पष्टे, डेंटिस्ट डॉ. श्रेयस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २०० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. 


         या आरोग्य शिबिरात ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर तपासणी, डोळ्यांचे आजार व तपासणी, दातांची तपासणी व इतर जनरल आजार अशा प्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान या शिबिराची सुरुवात करताना गावचे पोलीस पाटील नितीन पाटील व उपस्थित डॉक्टर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व श्री गणेश यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या शिबिरात गावातील लोकांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग घेऊन आपल्याला असलेल्या आजारावर अगदी डॉक्टरांसोबत मोकळेपणाने तपासणी करून घेतली.
             या शिबिराप्रसंगी आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉ. दिपेश पष्टे, कृष्णा आय व्हिजनचे कल्पेश पष्टे, दिपक पांचाळ, श्री पाटील मेडिकल चे देवेश पाटील, लॅब कर्मचारी राहुल पाटील तसेच संस्थांचे इतर पदाधिकारी व सदस्य, श्री समर्थ क्लिनिक व वाडा हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग स्थानिक आशा वर्कर, तालुक्यातील पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीने घेतले ताब्यात !

संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीने घेतले ताब्यात !


मुंबई, बातमीदार : आताची महत्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी माहिती समोर आली असता संजय राऊत यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांची तब्बल ९ तास राऊत यांची चौकशी सुरू होती, चौकशीत संजय राऊत हे सहकार्य करीत नसल्याचे सांगून ईडीने पूढील तपासाकरिता    ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे.

ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी असलेल्या छाप्यांवरून टीका करताना म्हटलं की, ही दमनशाही, दडपशाही सुरू आहे.
अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या केदुर्ली येथील कुटुंबाला कोणी 'घर देता का घर'...... .! **निराधार कुटुंबाला घरकुल तात्काळ मिळावे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांची आग्रही मागणी.**

अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या केदुर्ली येथील कुटुंबाला कोणी 'घर देता का घर'...... .!

**निराधार कुटुंबाला घरकुल तात्काळ मिळावे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांची आग्रही मागणी.**


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यात सुरुवातीच्या अतिवृष्टीमुळे केदुर्ली गावातील एका मोलमजुरी करणाऱ्या गरीब निराधार व्यक्तीचे घर पूर्णतः कोसळून जमीनदोस्त झाले आहे. सध्या या कुटुंबाचा संसार उघड्यावर आहे. शासकीय पंचनामाही झालाय मात्र त्या कुटुंबाला सरकारी हक्काचे घर केव्हा मिळणार या प्रतीक्षेत ते कुटुंब डोळे लावून बसले आहेत.


मुरबाड तालुक्यातील केदुर्ली गावातील सर्वसामान्य मोलमजुरी करणारे सुभाष रघुनाथ उघडे आपल्या वयस्क आई व पत्नी सह एका साध्या मोडकळीस आलेल्या घरात गेली अनेक वर्षे राहत होते. आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करून ते जीवन जगत आहेत.


मुरबाड तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या संततधार अतिवृष्टी मुळे त्यांचा निवाराच कोलमडून पडला आहे. थेट घराचे छप्परच जमीनदोस्त झाल्याने त्यांच्यावर उघड्यावर संसार मांडण्याची वेळ आली आहे. सध्या त्यांना शेजाऱ्यांनी तात्पुरता निवारा दिला असला, तरी आपल्या कोसळलेल्या घरा कडे बघून सुभाष उघडे हे फार चिंताक्रांत आहेत. शासकीय पंचनामा झाला आहे तात्पुरती कवडीमोल मदत मिळेलही कदाचित पण राहण्याची व्यवस्था कशी होणार ? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

मोडकळीस आलेले घर असतांना आज पर्यंत सरकारी अनास्थे मुळे गरीब निराधार सुभाष उघडे यांना साधे घरकुल ही मिळाले नाही. ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. पात्र लाभार्थ्यांना डावलून राजकीय लाभा साठी धनदांडग्या लोकांना सरकारी घरकुलांचा लाभ देणाऱ्या संबंधीत यंत्रणेने मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या सुभाष उघडेना कधी न्याय देणार हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होतोय.या प्रकरणी केदुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच काळूराम केशव म्हारसे व सदस्या कांता अनंत उघडे, सामाजिक युवा कार्यकर्ते गौतम उघडे यांनी शासन दरबारी उघडे यांना घरकुल तात्काळ मिळावे म्हणून आवाज उठवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रिपाइं आठवले पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे व तालुका उपाध्यक्ष सय्यदभाई शेख यांनी तात्काळ या उघडे कुटुंबाची भेट घेऊन शासकीय यंत्रणेशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांना निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून सुभाष उघडे यांना तात्पुरती आर्थिक मदत व अन्न धान्याची व्यवस्था केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश आणि विधानसभा अध्यक्ष पदी निवड होताच शैलेश वडनेरेंची दमदार आगेकूच !! **पक्षबांधणीसाठी जनसंपर्काला सुरुवात **

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश आणि विधानसभा अध्यक्ष पदी निवड होताच शैलेश वडनेरेंची दमदार आगेकूच !! **पक्षबांधणीसाठी जनसंपर्काला सुरुवात **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : शिवसेनेचे बदलापूर नगरपरिषदेतील झुंजार नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशा नंतर त्यांची मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी निवड होताच, वडनेरे यांनी जोरदारपणे कामाला सुरुवात केली असून, मतदारसंघात पक्ष बांधणी साठी जनसंपर्क सुरु केला आहे. काल ते मुरबाड येथे कार्यकर्ते व पत्रकारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते.


बदलापूर मध्ये शिवसेनेचे नगरसेवक असतांनाही मुरबाड तालुक्यात आपल्या विविध उपक्रमांनी मुरबाडकर जनतेवर वेगळाच ठसा उमटवणाऱ्या शैलेश वडनेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुरबाड विधानसभा क्षेत्र, अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारी आल्याने पुन्हा एकदा शैलेश वडनेरे ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. त्यांनी आज मुरबाड मधील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी वर्गाशी संवाद साधत पत्रकारांशी औपचारिक चर्चा केली.


कुळगाव बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत बदलापूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कँपटन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या मुरबाड तालुक्यातील लोकोपयोगी उपक्रमां मुळे त्यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने तात्काळ मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी सद्या दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना वडनेरे यांनी सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी साठी राष्ट्रवादी पक्ष सज्ज होतोय गट व गण निहाय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांना बळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढी साठी प्रयत्न करणार असून जनतेची सेवा करून त्यांचे प्रश्न सोडवणे व त्यांची कामे करणे हेच प्रमुख धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम सासे, महिला तालुका अध्यक्षा योगिता शिर्के, शहर अध्यक्ष दीपक वाघचौडे, सामाजिक न्यायचे संतोष बाईत, रविंद्र केंबारी, नरेश म्हाडसे, संजय हिंदुराव, बाळू भोईर, दिलीप शेळके, हर्षद शेळके, अभिजित शिंदे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Saturday 30 July 2022

राज्यात पिक स्पर्धेसाठी ११ पिकांचा समावेश *शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

राज्यात पिक स्पर्धेसाठी ११ पिकांचा समावेश
*शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन


बुलडाणा, बातमीदार : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्वायरी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग आणि उडीद या ११ पिकांचा समावेश समावेश करण्यात आला आहे. 
तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याकरिता भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहणार आहे.
एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते वगळून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षांत ज्या शेतकऱ्यांची तालुका पातळीवर प्रथम दोन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवर पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यामस पात्र असतील. तालुका आणि जिल्हा पातळीवरील पिकस्पर्धा स्वतंत्र होणार आहे. खरीप हंगामातील मुग आणि उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२२ आणि इतर पिकांमध्ये भात, ज्वांरी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकासाठी दि. ३१ ऑगस्ट २०२२ आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व जिल्हा कृषि संचालक यांनी केले आहे.

कट्टर शिवसैनिकांचे "निष्ठा" पत्र ! मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वासाचे हमी पत्र.. ..

कट्टर शिवसैनिकांचे "निष्ठा" पत्र !
मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वासाचे हमी पत्र.. ..


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यातील शिवसैनिक हे बाळासाहेबांचे निष्टावंत असून, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, आजही आहेत. आणि उद्याही सोबतच राहु, पक्षाच्या एकनिष्ठेसाठी येथील शेकडो शिवसैनिकांनी शंभर रुपयांच्या बाॅण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून सादर केल्यांची माहिती ठाणेजिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा उर्मिला लाटे यांनी दिली, तसेच तालुक्यातील निष्टावंत शिवसैनिक कायम भगव्या सोबत ठाम आहेत, ठाणे जिपचे उपाध्यक्षांसोबत ज्याना या फुटिर नेत्यांनी सामावून घेतले होते, त्यांची निष्ठानिष्ठी कायम राहून, आत्ता देखील दोन वर्षात दुस-यांदा तेच निसटले, जी राष्टवादीतील नविन भरती झाली होती, सध्याच्या राजकिय खांदेपालट परिस्थितीत स्वकियांनी दगाबाजी सुरू केल्याने शिवसेनेतील गटबाजीत कोणकोणासोबत हा पेचनिर्माण झाला असला, तरी मुरबाड तालुक्यातील एकही शिवसैनिक तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख ते पदाधिकारी व शिवसैनिक निसटला नसून, तालुक्यातील शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना साथ देत, आम्ही आपल्या सोबत आहोत असे बाॅण्ड पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून नव जिल्हाप्रमुख मा. आ. रुपेश म्हात्रेंकडे सुपुर्द केले आहे.
मुरबाड तालुक्यातील शिवसेना हि शिवभक्त साबिरशेख, धर्मविरांची निष्टावंत शिवसैनिक असल्याची ओळख जिल्हाभर असून पक्षप्रमुखांनाच काही सत्तापिपासुनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून भाजपाच्या तंबुत सामिल झाले आहेत, मात्र अशा ही परिस्थीतीत देखील तालुक्यातील निष्टावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून शिवसेना विधानसभा क्षेत्रसंघटक आप्पा घुडे, संतोष विशे, बाळा चौधरी, विश्वनाथ सुर्यराव, विलास देशमुख, सतिष घरत, जयवंत पडवळ, भरत गायकर, विनायक ढमणे, संजय भानुशाली, संतोष मोरे, रमेश कुर्ले, भाऊ यशवंतराव, साई गोपाळ, विष्णू पष्टे, सौ उर्मिला लाटे अशा शेकडो युवा शिवसैनिंकांनी व जेष्ठ शिवसैनिकांनी संयुक्तरित्या शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र बनवुन क्षेत्रसंघटक आप्पा घुडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा प्रमुख रूपेश म्हात्रे यांच्याकडे सुपुर्द करून ते स्टॅम्प पेपर उद्धव ठाकरे यांच्या कडे सुपुर्द केल्याची माहिती सौ उर्मिला लाटे यांनी दिली.  
तसेच कितीही स्थित्यांतरे झाली तरी आमची श्रद्धा व निष्ठा मातोश्री सोबतच असल्याचे मत उपतालुका प्रमु़ख संजय भानूशाली यानीं व्यक्त केले.

पलावा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ !

पलावा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ !


डोंबिवली, बातमीदार : एकता प्रतिष्ठान व आजित एकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पलावा कासारीवो मेनगेट क्लब येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी पलवा येथील परिसरातील दहावीत पास झालेल्या विद्यार्थांचा सन्मान व गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रमोद राजू रतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकता प्रतिष्ठान व अजित ॲकॅडमी पलावा शहर यांच्या विद्यमानाने शहरातील इयत्ता दहावी व गणित उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काटईचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, हेदुटने गाव- माजी सरपंच तथा मनसे शहर संघटक तकदीर काळण, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, गोपीचंद कदम, सोनाली रंभाड, दीप्ती नायर आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांचा सन्मान करीत हा समारंभ पार पडला.

अजित एकाडमीचे अजित सर व एकता प्रतिष्ठानचे समीर कोंडवाळकर यांच्या प्रयत्नाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अद्या गौड ही ९९ टक्के गुण घेवून महाराष्ट्रात दुसरी व भारतात पाचवी आलेल्या या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला. त्या वेळी जमलेल्या सर्व पालक विद्यार्थ्यांनी तिच्या सत्कारच्या वेळी उभे राहून तिचे कौतुक केले. आलेले मान्यवर म्हणाले असे सत्कार मुलांचे व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मुलांचे आत्मबल व विश्वास हा वाढतो.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

सकाळच्या प्रहरी महापालिका आयुक्तांनी केली महापालिका शाळेची पाहणी ! "शाळा परिसरात स्वच्छता राखण्याचे दिले निर्देश"

सकाळच्या प्रहरी महापालिका आयुक्तांनी केली महापालिका शाळेची पाहणी ! 
"शाळा परिसरात स्वच्छता राखण्याचे दिले निर्देश"


कल्याण, बातमीदार : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे हे दररोज महापालिका परिसराची पाहणी करत असून आज सकाळी आयुक्त दांगडे यांनी कल्याण पूर्वच्या जे प्रभागातील नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे विदयालयाला भेट देऊन तेथील विदयार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत शाळेतील विदयार्थ्यांना दिले जाणारे शैक्षणिक साहित्य, शाळेतील क्रिडा साहित्य, शाळेतील व शाळाबाहय‍ परिसरातील स्वच्छता/ स्वच्छताच्या सुविधा यांचा आढावा घेत उपस्थित शिक्षकांना योग्य त्या सुचना दिल्या. तसेच शाळेबाहेर विदयार्थ्यासाठी मोकळे मैदान तयार करणे बाबतही उपस्थित शिक्षकांना निर्देश दिले, यावेळी प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील सागर धामोडा, लोकमान तडवी, संदीप सावळे, संजय ओंकारेश्वर, कडू सर, महिला शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे जे प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता निरीक्षक पुरी उपस्थित होते.


आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.


विठ्ठल धों. चिविलकर यांची बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक सदस्य पदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड !

विठ्ठल धों. चिविलकर यांची बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक सदस्य पदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
            कुणबी सहकारी बँक ली. मुंबई अध्यक्ष सीए विठ्ठल धों. चिविलकर यांची बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक सदस्यपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. कुणबी बँक संचालक मंडळाच्यावतीने सी ए
चिविलकर यांचा उपाध्यक्ष श्री. ना. बा. गोरीवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक, कार्य. संचालक, सीईओ आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.

पालघर जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा भाट्टीपाडा येथे पाहणी दौरा ! --एकनाथ दरोडा यांच्या पाठपुराव्याला यश

पालघर जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचा भाट्टीपाडा येथे पाहणी दौरा ! --एकनाथ दरोडा यांच्या पाठपुराव्याला यश 


जव्हार- जितेंद्र मोरघा

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात रस्त्याच्या सुविधा अभावी दरवर्षी चर्चेत असलेला भाटीपाडा या दोनशे ते तिनशे वस्ती असलेल्या पाड्याची बातमी पुन्हा एकदा २३ जुलै रोजी वृत्तपत्र, वृत्तवाहीनी व समाज माध्यम (सोशियल मिडीया) यांत वाऱ्यासारखी पसरली आणि संपुर्ण महाराष्ट्रात भाट्टीपाड्यातील आदिवासींची दयनीय अवस्था उघड झाली व तेथील भयाण वास्तव महाराष्ट्रभर पसरलं. यास्तव पालघर जिल्ह्याचे नव-नियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी शनिवारी ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता भाट्टीपाड्याचा पाहणी दौरा केला. 


या वेळी बहुजन विकास आघाडी चे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ जी दरोडा देखील उपस्थीत होते. त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलतांना सांगितले की "आपण वनविभागाकडुन ३(२) चा प्रस्ताव जव्हार गटविकास अधिकारी वाठारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने मंजुर केला असुन त्याकरीता भाट्टीपाडा येथे त्वरीत रस्ता करावा या संबंधी वनविभाग कार्यालय जव्हार यांची परवानगी देखील घेतली आहे. तालुक्यात आपण एकमेव आहोत ज्यांना वनविभागाची परवानगी मिळालेली आहे. परंतु अपुऱ्या निधी अभावी सदर रस्ता करण्यास विलंब होत आहे. तरी सीबादेवी ते वडपाडा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भुस्कुटाचे वाकान ते दखनेपाडा हा जिल्हापरीषद कार्यकारी अभियंता या दोन्ही विभांगानी कुठलाही विलंब न करता त्वरीत पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. व भाट्टीपाड्याच्या ग्रामस्थांची हेळसांड थांबवावी. " अशी दरोडांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली तसेच दरोडा यांनी दोन वर्षापासुन केलेले पाठपुराव्याचे मागिल दैस्ताऐवज आणि वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या विवीध बातम्या सुद्धा जिल्हाधिकारी बोडके यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी एकनाथ दरोडा यांच्या सोबत जगन खानझोडे, उप सरपंच तुकाराम गरेल, झाप व भाट्टीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
दरोडा यांनी निवेदन दिल्या नंतर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तात्काळ रस्त्यासाठी प्रयत्न करावा अशा सुचना त्याच्या ताफ्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व जिल्हा परीषद बांधकाम विभाग यांना दिल्या. यास्तव या दोन्ही विभागांनी २०२२/२३ च्या विकास आराखड्या रस्ता तयार करणे करीता निधी मंजुरीस पाठवतो असे सांगितले. तसेच भाट्टीपाडा ग्रामस्थांसोबत बोलतांना बोडके यांनी ग्रामस्थांसी संवाद साधला की "तुम्हाला भाट्टीपाडा हे ठिकाण राहण्यास योग्य वाटत नसेल तर तुमच्या म्हणण्या नुसार आपण तुमचे पुनर्वसन देखील करू शकतो. ते लवकरात लवकर व कमी खर्चीक असेल" यावर भाट्टीपाड्याच्या ग्रामस्थांनी विरोध करत "आम्ही शेती सोडुन जाऊ शकत नाही म्हणुन पुनर्वसन ऐवजी आम्हाला त्वरीत रस्ता करून दिला तर योग्य राहील असे मत व्यक्त केले. जिल्हा अधिकारी गोविंद बोडके सोबत जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग, जव्हार तहसिलदार आशा तामखडे, नायब तहसिलदार भला साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी इंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम अभियंता शिंदे साहेब, तलाठी तायडे, बिराजदार, ग्रामसेवक वळवी व झाप पोलिस पाटील देवराम गवारी उपस्थित होते.

लोकांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठीच तर आपण इथे आहोत- आमदार सुनिल भुसारा

लोकांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठीच तर आपण इथे आहोत- आमदार सुनिल भुसारा 


जव्हार -जितेंद्र मोरघा :

                   राज्यात सध्या आझादी का अमृतमहोत्सव साजरा होत असून या निमित्ताने महावितरण मंडळाकडून उर्जा महोत्सवांचे आयोजन करून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत नुकताच जव्हार येथे हा कार्यक्रम साजरा झाला असून यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आमदार सुनिल भुसारा उपस्थित होते यावेळी आमदार भुसारा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महावितरणाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कामांची प्रशंसा करतानाच ग्राहकाशी सौहार्दपुर्ण वागण्याच्या सुचनाही दिल्या कारण आपण सगळे लोकांसाठी असून तुम्हाला लोकांचे ऐकावेच लागेल कारण तुमची नौकरी तुम्ही स्वच्छेने स्वीकारली आहे यामुळे सेवक म्हणून काम करताना ग्राहकाचे समाधान हेच तुमचे पहिले आणि अंतिम ध्येये असायला हवे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
    पुढे बोलताना भुसारा म्हणाले कि तुम्ही असो कि मी आज इथे असो हे लोकांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठीच आहोत कारण मला आमदार होण्यासाठी किंवा तुम्हाला अधिकारी होण्यासाठी कोणी सांगितलेले नव्हते, मी लोकांच्या दारात गेलो होतो मते मागायला त्याच प्रमाणे तुम्हीही हि नौकरी मिळावी म्हणून अनेक प्रयत्न केले, यामुळे आपण स्वेछेने या जागेवर आहोत यामुळे आपल्याला लोकांचे समाधान करावेच लागेल असे ते म्हणाले यावेळी भुसारा यांनी या भागात वीज गेल्यास पहिला फोन आमदाराला येतो आजच्या तरुण पिढीला जशी वीज हवीय तशीच मोबाईचे नेटवर्कही हवे यामुळे या भागात बऱ्यापैकी टॉवर उभारण्यास मला यश आले असून यापुढेही अनेक भागात नेटवर्क पोहचवायचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, याच बरोबर अनेक घरा घरांत वीज पोहचली असून वीजचोरीचे प्रमाणही कमी झाल्याबाबत समाधान व्यक्त करताना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांवर राग काढु नये तसेच आलेल्या ग्राहकांशी प्रेमाने बोलून त्यातून मार्ग काढावा असेही आवाहन केले.
     यावेळी वीज असताना आणि नसताना त्याच प्रमाणे वीजेचे महत्व या बाबत अनेक कलाकारांनी छोट्या नाटीका सादर करून जनजागृती केली त्याच प्रमाणे महावितरणाने आजवर केलेल्या आणि करणार असलेल्या अनेक कामांची उजळणी याठीकाणी केली त्याच बरोबर अनेक लाभार्थ्याचे सत्कार याठिकाणी करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, प्रांताधिकारी आयुषी सिंग याच बरोबरच महावितरणचे नगावकर मॅडम आणि अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आय टी आय जव्हार येथे महिंद्रा कंपनीने घेतला भरती मेळावा !

आय टी आय जव्हार येथे महिंद्रा कंपनीने घेतला भरती मेळावा !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार, जिल्हा पालघर येथे महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी यांच्याद्वारे शिकाऊ उमेदवारी करिता भरती मेळावा घेण्यात आला. महिंद्रा एम्प्लयी रिलेशन विभागाचे सुशील तिवारी यांनी भरती मेळावा विषयी आणि महिंद्रा कंपनीमधील कामाच्या पद्धती विषयी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटार गाडी, जोडारी, संधता या व्यवसायातील ८० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यात भाग घेतला. 
शिका उमेदवारांच्या ३५ जगांकरिता ही भरती असल्याचे महिंद्राचे अधिकारी श्री संदीप गिझरे यांनी सांगितले. तथापि प्रशिक्षणार्थी यांचा उत्साह बघून त्यापेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांना घेण्याचे आश्वासन त्यांनी दिली आहे. 
कॅम्पस मध्ये इंटरव्यू आयोजित केल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम उत्तम कंपन्यांमध्ये जाण्याची संधी मिळते. तसेच कंपन्यांनाही एकाच ठिकाणाहून अधिक कर्मचारी उपलब्ध झाल्याने फायदा होतो. एकाच संस्थेतील प्रशिक्षणार्थी कामाला एकत्र लागल्यामुळे त्यांची राहण्याची सोय करणे सोपे जाते, असे मत संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी व्यक्त केले.
या संस्थेमधील आयोजन गटनिदेशक कुसगावकर यांनी पाहिले असून बोडरे आणि गवळी यांनी प्रशिक्षणार्थी यांची तयारी करून घेतली.

हाँगकाँग च्या पाहुण्यांची वाकडपाड्याला भेट !

हाँगकाँग च्या पाहुण्यांची वाकडपाड्याला भेट !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा हायस्कूल व वाकडपाडा गावाला हाँगकाँग येथील रहिवासी व बँक अधिकारी पदावर कार्यरत असलेले अनिरुद्ध चांदवणकर यांनी भेट दिली, त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप वाघ यांनी यथोचित स्वागत केले.
स्पार्क फाउंडेशन चे सदस्य असलेल्या चांदवणकर यांनी भेट दिल्यानंतर शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांना योग्य ती मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याआधी शाळेसाठी शौचालय, इमारत बांधकाम, शैक्षणिक साहित्य इत्यादी मदत स्पार्क फाउंडेशन ने केली आहे.
मोठे सभागृह बांधकाम सुरू केले असून ते लवकरच पुर्ण होईल.
यावेळी प्रदीप वाघ यांनी स्पार्क फाउंडेशन च्या पदाधिकारी मंकरद दिक्षित व अनिरुद्ध चांदवणकर यांचे आभार मानले.
यावेळी ठवरे सर मुख्याध्यापक, संजय वाघ सरपंच, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, मंगेश दाते, पवार सर, नितीन पिठोले, धायगुडे सर नंदकुमार वाघ व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

सायले नळपाणी पुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईची ग्रामस्थांची केली मागणी !

सायले नळपाणी पुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईची ग्रामस्थांची  केली मागणी !


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यातील मौजे सायले येथील प्रचंड पाणी टंचाई असल्यामुळे शासनाने सन 2014 - 2015 साली पाणी टंचाई कायमस्वरूपी दुर करण्यासाठी सुमारे त्रेचाळीस लाख रुपये (43,00,000) इतका निधी मंजूर केला. व योजनेचे काम सुरु झाले. मात्र तेथील ठेकेदार, ग्रामसेवक व अधिकारी यांनी थातूरमातूर आणि अपुर्ण स्वरूपात काम करून, संपूर्ण निधी काढून घेतल्याचा आरोप करत सदर योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करून  ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांचेकडे तक्रार करून याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
                याबाबत मिळालेली माहिती अशी कि, ग्रामपंचायत सायले येथील नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून सुमारे त्रेचाळीस लाख रुपये (43,00,000) इतका निधी मंजूर झाला होता. व काम सुद्धा सुरु झाले. मात्र तेथील ठेकेदार तसेच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी संगनमताने थातुरमातुर काम करून या योजनेचा संपूर्ण निधी काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी प्रथमतः गटविकास अधिकारी मुरबाड यांचे कडे लेखी व तोंडी स्वरूपात अनेकदा तक्रारी केल्या. परंतु सदर तक्रारी बाबत त्यांच्या कडून कूठलीही कारवाई न झाल्याने सरते शेवटी मुख्यकार्यकारी अधिकारी ठाणे यांचेकडे तक्रार केली असून,सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Friday 29 July 2022

काष्ठ शिल्पकार संतोष घावट यांचा मुरबाड पोलिसां कडून सन्मान !! ** मुरबाड पोलिसांची कर्तव्या पलीकडे कौतुकास्पद कामगिरी **

काष्ठ शिल्पकार संतोष घावट यांचा मुरबाड पोलिसां कडून सन्मान !!
** मुरबाड पोलिसांची कर्तव्या पलीकडे कौतुकास्पद कामगिरी **


मुरबाड, (मंगल डोंगरे) : पोलीस खाते म्हटले कि,कायदा आणि सुव्यवस्था, असे नेहमीचे ठरलेले कर्तव,मात्र मुरबाड पोलिसांची कर्त्यव्या पलिकडे जावून कौतुकास्पद कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकताच मुरबाड पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष, व कलाप्रेमी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी तालुक्यातील मिल्हे गावचे नवतरुण काष्ठ शिल्पकार संतोष घावट यांच्या लाकडावरील कोरीव कामातून बनवलेल्या हूबेहुब मुर्ती आणि प्रतिमा पाहून, त्यांचा आपल्या पोलीस ठाण्यात यथोचित सन्मान केला आहे.


केवळ कायद्याचा बडगा घेऊन न फिरता, पांढरे साहेब यांनी अवघ्या वर्षभरातच तालुक्याचा अभ्यास करून, इथल्या गुन्ह्यांबरोबर, रुढी, परंपरा, सण उत्सव, तशीच इथली कलाकृती व गुणी कलावंत शोधण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा करण्याचे पवित्र काम त्यांच्या कडून सुरु आहे. 


नुकताच सन्मान झालेल्या संतोष घावट यांनी छत्रपती शिवरायांच्या सुबक प्रतिमांबरोबर, महानायक अमिताभ बच्चन यांचीही हुबेहूब मुर्ती बनवली असुन, बच्चन यांना" ती फांगणे येथील आजीबाईनी, त्यांच्या सुप्रसिद्ध कौन बनेगा करोड पती या कार्यक्रमात भेट म्हणून सुपुर्द केली आहे. या भेटीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून, लवकरच हा भाग दुरदर्शन वर दाखवला सुद्धा जाणार असून, मुरबाडच्या मातीतील कलाकृती सर्वदूर जगभर पसरली पाहिजे. असा आशावाद सत्कारकर्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी व्यक्त केला आहे. तर आपल्यातील कलाकृती दाबून न ठेवता ति जगासमोर आणण्याचे प्रयत्न करावेत. चांगल्या गोष्टीला आणि प्रामाणिक मेहनतीला यश नक्कीच मिळते. असे भावोद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांनी काढून घावट यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी व. पो.नि.प्रसाद पांढरे, स.पो.नि. अनिल सोनोने, पो. नाईक. विनायक खेडकर, पो.उप. नि. तडवी,सावंत, म.पो. शि. फाळे मँडम, जगप्रसिद्ध आजीबाई शाळेचे उद्गाते योगेंद्र बांगर सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

**मुरबाड मध्ये उज्वल भारत,,उज्वल भविष्य महोत्सव संपन्न ** ** *अम्रुत महोत्सवी वर्षात आदिवासी वाड्या-पाडे मात्र विजेपासुन दुरच ***

**मुरबाड मध्ये उज्वल भारत,,उज्वल  भविष्य महोत्सव संपन्न ** 

** *अम्रुत महोत्सवी वर्षात आदिवासी वाड्या-पाडे मात्र विजेपासुन दुरच ***   


मुरबाड, (मंगल डोंगरे) : येत्या १५ आँगस्ट रोजी देश स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे.  त्यानिमित्ताने आज मुरबाड मध्ये "उज्वल भारत, उज्वल भविष्य" या नावाने उर्जा मंत्रालय व उर्जा कंपण्यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील "ओजिवले येथील श्रीसिद्धीविनायक मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये उर्जा कंपण्यांच्या केंद्र शासनाची दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम, सौभाग्य योजना, कुसुम योजना, राज्य शासनाची क्रुषिपंप वीज जोडणी धोरण २०२०, बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजना, विलासराव देशमुख अभय योजना, मुख्यमंत्री सौर क्रुषिपंप योजना, क्रुषिपंपात उच्च दाब वितरण प्रणाली द्वारे जोडणी, इलेक्ट्रीक वाहनांना चार्जिंग सुविधा, या व अशा  विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावीपणे  अंमलबजावणी करुन, शासन व प्रत्यक्षात लाभ घेतलेले लाभार्थी यांच्या कडून माहिती जाणून घेणे, तसेच, आदिवासींच्या जिवनात प्रकाश टाकण्याचा हा खरा कार्यक्रम, पण एकीकडे आदिवासींच्या जिवनात प्रकाश टाकण्याचा सरकार व विजकंपन्या प्रयत्न करत असताना, दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवी वर्षापर्यंत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या पाडे विजेपासुन वंचित असुन, आदिवासी पाडे अंधारात असल्याची बाब समोर आली आहे. ज्यामध्ये "वाघदगड, धारखिंड, लोत्याची वाडी आणि भट्टीचीवाडी, हि गावे आजही विजेच्या प्रतिक्षेत आहेत.


तालुक्यात महावितरणने राबविलेल्या योजनांची यशस्वी पणे अंमलबजावणी झाली. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील ओजिवले येथिल सिध्दीविनायक मंगल कार्यालयात उर्जा महोत्सवाचे आयोजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुभहस्ते व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्याप्रसंगी माजी आमदार दिगंबर विशे सर म्हणाले की येत्या १५ ऑगस्ट रोजी भारत देश अमृत महोत्सवात पदार्पण करत असला तरी मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाड्या व पाड्यामध्ये अजुन विज पोहोचली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

             या उर्जा महोत्सवात असणाऱ्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी रंगमंच्यातील नृत्याचा आविष्कार सादर करण्यात आला. या प्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता, धनंजय आवडेंकर पोस्कोचे बलराम अधिक्षक अभियंता दिलीप ओढे. जि.प.सदस्य, उल्हास बांगर, सुभाष घरत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, यांचेसह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना सुरळीतपणे विज पुरवठा करण्यासाठी पारंपारिक उर्जा प्रकल्प राबविण्याची गरज असुन सौरऊर्जा प्रकल्प हा सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा नाही. महावितरण नागरिकांना विजपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असले तरी मुरबाड तालुक्यात दुर्गम भागात अजून विज पोहोचली नाही. यावेळी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात सुरळीतपणे विजपुरवठा करण्यासाठी केंद्राने सुमारे ३९ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले. तर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लवकरच महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबारचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...