Saturday, 30 July 2022

पलावा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ !

पलावा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ !


डोंबिवली, बातमीदार : एकता प्रतिष्ठान व आजित एकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पलावा कासारीवो मेनगेट क्लब येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी पलवा येथील परिसरातील दहावीत पास झालेल्या विद्यार्थांचा सन्मान व गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रमोद राजू रतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकता प्रतिष्ठान व अजित ॲकॅडमी पलावा शहर यांच्या विद्यमानाने शहरातील इयत्ता दहावी व गणित उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काटईचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, हेदुटने गाव- माजी सरपंच तथा मनसे शहर संघटक तकदीर काळण, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, गोपीचंद कदम, सोनाली रंभाड, दीप्ती नायर आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांचा सन्मान करीत हा समारंभ पार पडला.

अजित एकाडमीचे अजित सर व एकता प्रतिष्ठानचे समीर कोंडवाळकर यांच्या प्रयत्नाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अद्या गौड ही ९९ टक्के गुण घेवून महाराष्ट्रात दुसरी व भारतात पाचवी आलेल्या या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला. त्या वेळी जमलेल्या सर्व पालक विद्यार्थ्यांनी तिच्या सत्कारच्या वेळी उभे राहून तिचे कौतुक केले. आलेले मान्यवर म्हणाले असे सत्कार मुलांचे व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मुलांचे आत्मबल व विश्वास हा वाढतो.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...