Sunday 31 October 2021

समीर वानखेडेंना मोठा दिलासा, धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग

समीर वानखेडेंना मोठा दिलासा, धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग


भिवंडी, दिं,1, अरुण पाटील (कोपर) :
        क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे  चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या धर्मांतराचे आरोप करण्यात आले. मात्र, समीर वानखेडे यांनी धर्मांतर  केले नसल्याचे मत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने  व्यक्त केले आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर ; यांनी सांगितले की, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची जातीसंबंधीची कागदपत्रे मी तपासली आहेत. त्यांनी धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नासल्याचे सांगितले.
         मुंबई दौऱ्यावर आले असताना वानखेडे यांनी अरुण हलदर यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत तक्रार दिली. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना ते म्हणाले की, काही लोक कुटुंबावर जातीवरुन आरोप करीत असल्याने वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही मागासवर्गीय आहात का? असे विचारले असताना त्यांनी हो म्हणून सांगितले, तसेच काही पुरावेही सादर केली आहेत. ड्रग्सच्या विरोधात काम करत आहे, त्याचमुळे काही लोक मला जातीच्या आधारावर माझ्यावर जाणूनबुजून आरोप करत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
            त्यांच्याशी बोलताना महार जातीचे असल्याचे मला जाणवले. त्यांचा पहिला विवाह स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार झाला होता.त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेले नाही. मात्र, आपण एकतर्फी निर्णय देणार नाही, असे सांगून ते म्हणाले, आमच्या कडे यांच्या जाती बाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करु. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करते ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोहने बाजारपेठेतील खाली करण्यात आलेल्या गाळे धारकांवर उपासमारीची वेळ !! "सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान"

मोहने बाजारपेठेतील खाली करण्यात आलेल्या गाळे धारकांवर उपासमारीची वेळ !!

"सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान"


मोहोने, बातमीदार : कल्याण सत्र न्यायालयाच्या आदेशाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोहने येथील सात दुकाने आणि बारा निवासी घरांवर खाली करण्याची कारवाई झाल्याने येथील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत.

ऐन सणासुदीच्या दिवसात गाळे व  घरे  खाली करण्यात आल्याने व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.


येथील एक गाळ्यात अपंग असलेले मरुधर स्टोअर्सचे मालक विजयराज चुन्नीलाल जैन हे कागदपत्रे झेरॉक्स करण्याचा व्यवसायिक करत होते या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. त्यांच्या दुकानावर कारवाई झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे हसन अली यांचे केशकर्तनालयाचे दुकान होते या दुकानावरही कारवाई झाल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नसल्याने ते पुरते हवालदिल झाले आहेत.

जागेचे मूळ मालक अंजना पटेल यांच्या जागेवर गेल्या ४० ते ४५ वर्षापासून पगडी भाडेपट्टी तत्त्वावर राहत असलेले चंपलाल मेहता, विजयराज जैन, हसन अली हे व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे भाडे पावती भरल्याच्या जुन्या पावत्या आहेत. 


जागा मालक अंजना पटेल यांनी दुकाने व घरे खाली करण्यासंदर्भात कल्याण कोर्टात दावा केला होता. कोर्टाने २००९ रोजी दुकाने खाली करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या या आदेशाविरोधात चंपालाल मेहता, विजयराज जैन, हसन अली, यांनी कल्याण न्यायालयात धाव घेऊन प्रतीदावा दाखल केला होता. हा दावा फेटाळण्यात आला असल्याचे सांगण्यात आले परंतु कोर्टाची कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक आमच्यावर जबरदस्तीने गाळे खाली करण्यात आले असल्याचा आरोप विजयराज जैन, हसनअली यांनी केला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात जबरदस्तीने आम्हाला दुकाने खाली करण्यास सांगितले आहे आम्ही बेघर झालो असून उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नसल्याने आमच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे आता आम्ही कोठे जावे काय करावे काही सुचत नाही असे ६५ वर्षीय अपंग असलेले विजयराज जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोर्टाला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने व्यापाऱ्यांना स्थगिती आदेश मिळवता आला नाही. दिवाळीच्या सुट्ट्या संपताच उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध स्थगिती आदेश देण्याची विनंती मा. कोर्टाकडे करणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

असे असले तरी ऐन दिवाळीच्या खरेदीचा दिवसात व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भिवंडीत दोन दुचाकी चालकांचा वाद, टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण.!!

भिवंडीत दोन दुचाकी चालकांचा वाद, टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण.!!


भिवंडी, दिं,31, अरुण पाटील (कोपर) :
          भिवंडी परिसरात विविध ठिकाणी  गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून एका क्षुल्लक कारणावरून दोन दुचाकीस्वारांमध्ये रस्त्यावर झालेल्या बाचाबाचीनंतर एका टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर  आली आहे . 
         मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील बागे फिरदोस रोडवरील पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. केतनकुमार पटेल असं मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पेट्रोल पंपावर एक दुचाकी विरुद्ध दिशेनं आल्याने केतन पटेल यांनी समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराने  हटकले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी  दुचाकीस्वाराने 'भिवंडी मेरे बाप की है' असे बोलून समोरील केतन पटेल यांना दमबाजी केली.
           त्यानंतर  या तरुणाने आपल्या मित्रांना पेट्रोल पंपावर बोलून घेतले. त्यानंतर या दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. या  दुचाकीस्वाराने स्वत: च्या बचावासाठी पेट्रोल पंपावर धाव घेतली. पण या टोळक्याने तिथेही घुसून या दुचाकीस्वाराला लाथाबुक्याने मारहाण केली.या संपूर्ण राड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आलेल्या केतनकुमार पटेल यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

शिवसेना युवासेना डोंबिवली मध्यवर्ती शहर शाखे कडून इंधन दरवाढ विरोधात आज आंदोलन करण्यात आले.!!

शिवसेना युवासेना डोंबिवली मध्यवर्ती शहर शाखे कडून इंधन दरवाढ विरोधात आज आंदोलन करण्यात आले.!!


कल्याण, बातमीदार :
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर आज युवा सेनेच्या माध्यमातून महागाईला विरोध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
 
केंद्र सरकरने पेट्रोल दरवाढ आणि महागाई केलेल्या विरोधात हेच का अच्छे दिन असा भाजप सरकारला टोला हाणत डोंबिवली युवा सेनेने सायकल रॅलीचे आयोजन केले होते.


भव्य सायकल रॅलीत शहरप्रमुख श्री.राजेश गोवर्धन मोरे आणि कल्याण जिल्हा युवा अधिकारी श्री.दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख श्री.राजेश कदम, उपजिल्हाअधिकारी आशू सिंह,, राहूल म्हात्रे, सागर दुबे, युवासेना शहर अधिकारी सागर जेधे, अभिजित थरवळ, यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि युवासेना यांनी सायकल रॅली काढण्यात आली. 


सर्व शिवसेना पदाधिकारी, युवा आणि युवती सेना, महिला आघाडी उपस्थित होते.


Saturday 30 October 2021

शिवसेना शाखा क्र. १७ शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन !!

शिवसेना शाखा क्र. १७ शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन !!


मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
          निवडणुकीच्या काळात सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक असतो तो म्हणजे मतदार. पण मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहाता येईल किंवा नसेल तर मतदार यादीत नाव नोंदणी कशी कराल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादीच्या नूतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिला आहे.सर्वसामान्य लोकांना याबाबतची योग्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बोरिवली  शिवसेना शाखा क्र. १७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यातर्फे नवीन  मतदार नोंदणी जनजागृती आणि शासकीय योजना विषयक मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जर तुमचं नाव यादीमध्ये आहे पण ते चुकले असेल तर फॉर्म -८ भरवा.जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलात आणि तुम्हाला तुमचे नाव तेथे नोंदवायचं असेल तर फॉर्म ६ भरावा लागणार आहे.जर कुणाच्या नावावर तुमची हरकत असेल तर फॉर्म- ७ भरावा लागतो.विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत पत्ता बदलण्यासाठी - नमुना ८ अ भरावा लागेल.यासाठी आवश्यक २ रंगीत फोटो, वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, तुमचा पत्ता असलेला पुरावा जशे  की रेशन कार्ड, टेलिफोन-इलेक्ट्रिसिटी बिल, पासपोर्ट, लायसन्स किंवा आधारकार्ड, घरातील एका सदस्यची मतदार कार्डची छायाप्रत आवश्यक आहे.याशिवाय विभागातील नागरिकांना "सुगंधी उटणं "चे वाटप होणार आहे. शिवाय सरकारी योजना विषयक मार्गदर्शन व  निशुल्क नोंदणी करण्यात येणार आहे. या योजना मध्ये इमारत आणि इतर बांधकाम कामगार ओळखपत्र,आयुष्मान भारत-आरोग्य योजना, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, अटल पेन्शन योजना, इ -श्रम कार्ड, घरघुती कामगार ओळखपत्र आदींचा समावेश आहे. तरी नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी शिवसेना शाखा क्र.१७ चे शाखाप्रमुख सुनील पाटील यांच्याशी शाखेत संपर्क करावा असे आवाहन शिवसेना शाखा १७ च्या पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

शिवसेना नगरसेविका ज्योती हारूण खान यांच्यातर्फे विक्रोळी पार्क साईट येथे हजारो कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप !!

शिवसेना नगरसेविका ज्योती हारूण खान यांच्यातर्फे विक्रोळी पार्क साईट येथे हजारो कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप !!


विक्रोळी, (शांताराम गुडेकर) :

       सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गेल्या पंधरा वर्षाची परंपरा जपत वार्ड न. १२४ शिवसेना नगरसेविका ज्योती हारुन खान आणि शिवसेना नेते हारुन खान यांच्या प्रयत्नाने सर्वसामान्यांची दिवाळी  आनंददायी होण्यासाठी यंदाही "आपुलकीची दिवाळी" हा उपक्रम विक्रोळी पार्क साईट येथे  राबवण्यात येत आहे .


         दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळी आनंदात साजरा करत असतात. पण आपल्या विभागातील सर्वसामान्य ची दिवाळी आनंदात साजरी झाली पाहिजे. म्हणून दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करून "आपुलकीची दिवाळी" हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचसोबत भाऊबीजेची भेट म्हणून आपल्या लाडक्या वहिनींना साड्यांचे ही वाटप करण्यात आले आहे.

ऐन दिवाळीत पाणी टंचाईचा, 'शिमगा'? विजबील थकबाकी, जिर्णजुनाट पाईपलाईन, भ्रष्टाचार कारणीभूत !!

ऐन दिवाळीत पाणी टंचाईचा, 'शिमगा'? विजबील थकबाकी, जिर्णजुनाट पाईपलाईन, भ्रष्टाचार कारणीभूत !!


कल्याण, (संजय कांबळे) : सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोकणात अर्थात ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत हद्दीतील गावात तसेच महानगरपालिका क्षेत्रात ऐन दिवाळीच्या सणात पाणी टंचाई विरोधात'शिमगा'सुरू असून अजून मार्च, एप्रिल मे लांबच आहेत, तोपर्यंत अशी अवस्था तर उन्हाळ्यात कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागे विजबील थकबाकी, जिर्णजुनाट पाईपलाईन आणि योजनेतील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.


ठाणे जिल्ह्यातील, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ आणि ठाणे तालुक्यात १२ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत, यामध्ये, कल्याणात,रायते प्रादेशिक नळ पाणी पुरवठा, मुरबाड मध्ये टोकावडे योजना, शहापूरात,अधई, बिरवाडी, कळंबे,आणि ठिले शेंंद्रूण तर भिवंडीत ३ योजना आहेत, बाकी इतर बहुतांश योजना या त्या त्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. यांच्या जोडीला बोअरवेल, विंधन विहीर, आहेच, असे असूनही पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडून देखील उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळत नाही ही शोकांतिका आहे. यामागील कारणे ही मानवनिर्मित आहेत, पाणी योजनांची वर्षानुवर्षेची विजबील थकबाकी लाखोंच्या घरात आहे, विद्यूत कंपनी थकीत बीलापोटी पाणी योजनाची लाईट कट करतात, मग गावाची पाणीटंचाई सुरू.


केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर विद्यूत मंडळाच्या गोवेली सेक्शन अतंर्गत तब्बल ५७ गावातील थकबाकी आहे, खडवली सेक्शन मध्ये १६ गावे, तसेच खडवली २ सेक्शन ७ गावे अशी थकबाकी हजारो, लाखोंच्या घरात आहे. हे झाले थकबाकीचे? आता पाणी योजनाचा विचार केला तर अनेक योजना १५/२० वर्षे पुर्वीच्या जिर्णजुनाट आहेत, काही योजना तर केवळ कागदावरच दिसतात, या योजनेचे पाईप हे अनेकांच्या घरासमोरील शेड, गोटे, येथे जाऊन लटकलेले दिसतात. काही पाईप हे भंगारवाल्याच्या गोडाऊन मध्ये दिमाखात उभे आहेत. कोण विच्चारतो, सगळेच एका माळेचे मणी?


भ्रष्टाचाराचा विचार केला तर, पैसा पाण्यात कसा मुरतो हे या पाणी योजनामधून दिसून येईल. प्रत्येक वर्षी  प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा बनवला जातो, यामध्ये विविध पाणी योजनावर लाखो, करोडो रुपये याची तरतूद केली जाते, प्रत्येक वर्षी नवनवीन योजना, दुरुस्ती, देखभाल केली जाते, ऐवढे करून ही प्रत्येक वर्षी पाणी टंचाई आहेच?एकट्या शहापूर तालुक्यात २५ टँकर ने पाणी पुरवठा करावा लागतो. सर्वाधिक निधी, तसेच पेसा अंतर्गत पैसा देखील याच तालुक्याला मिळतो. पण पाणी टंचाई काय केल्याने दूर होत नाही, ही खरी 'जादू' आहे. याचा अर्थ इतर तालुक्यात सर्व काही अलबेल आहे असे मुळीच नाही, फक्त त्याचे प्रमाण कमी अधिक आहे.

कल्याण तालुक्यातील वडवली शिरढोण गावात गेल्या २ वर्षापासून पाणी टंचाई सुरू होती, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी ने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. कांबा, गावातील महिलांनी पाणी प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले होते, रायते, गोवेली, घोटसई, निंबवली, सांगोडे, कोंढेरी, चौरे, रोहन, कोलम केळणी, आपटी मांजर्ली, गुरवली, उशीद, पळसोली, आदी गावात कमी अधिक प्रमाणात पाणी प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व परिस्थिती त बदल व्हायला हवा, यासाठी गावातील महिला बचतगट, तरुण मंडळी, सकारात्मकता असणारे लोक यांनी पाण्याच्या विषयी राजकारण करणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्याना तांदळातील खड्याप्रमाणे दूर करायला हवे,अन्यथा दिवाळीच काय? प्रत्येक सणाला पाण्यासाठी "शिमगा" करावा लागेल! 

पालिकेच्या विठ्ठलवाडी तलावाची झाली गटार गंगा .... "तलावाच्या प्रवेशद्वारालाआले कचराकुंडी स्वरूप तर लगतच्या रस्त्यावरील गटारांची उघडी झाकणे मृत्यूला देत आहेत आमंत्रण"...

पालिकेच्या विठ्ठलवाडी तलावाची झाली गटार गंगा ....
"तलावाच्या प्रवेशद्वारालाआले कचराकुंडी स्वरूप तर लगतच्या रस्त्यावरील गटारांची उघडी झाकणे मृत्यूला देत आहेत आमंत्रण"...


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी तलावाच्या सुशोभीकरणावर पालिका प्रशासनावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करून ही तलावात कचरा, गटाराचे पाणी शिरत असल्याने तलावाच्या पाण्यात जलपर्णीने विळखा घातल्याने तलावाला हिरवी झालर पसरली असल्याने तलावाला गटाराचे स्वरूप आले आहे तर दुसरी कडे दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या तलावाच्या प्रवेशद्वारावर कचरा कचराकुंडी निर्माण केली असून लगतच्या रस्त्या वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे  गटारांची झाकणे तुटल्याने उघड्या गटारांची झाकणे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना व लहान मुलांना मृत्यूचा साफळा बनली आहेत.


     कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने कल्याण पूर्वेतील काटेमानवली नजीक असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पुलाच्या पायथ्याशी असलेल्या विठ्ठलवाडी तलावाच्या सुशोभीकरणासाठी
प्रशासनाने लाखो रुपयाचा खर्च करत  तलावात रंगीत करंज्या सह विद्युत रोषणाई, संरक्षक कठडा आणि तलावाच्या काठावर बगीचा बनविण्यात आला होता. मात्र काही महिन्यातच या तलावाचा रंग उडाला असून कठडा तुटला आहे तर रंगीत कारंजे बंद पडले होते.


आजूबाजूच्या वस्ती मधील सांडपाणी या तलावात सोडले जात असल्याने तसेच साम्य तलावात कचरा टाकण्यात येत असल्याने या तलावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते .त्या नंतर स्थानिक नगर सेवक व विधान परिषदेच्या माजी आमदारांच्या विकास निधीतून पुन्हा तलावाची स्वच्छता, प्रवेशद्वार ,लाईटस, तलावाच्या संरक्षण भितींची दुरुस्ती व बाजूने जाळी लावणे ,रंग रंगोटी, आदी कामे करन्यात आली होती मात्र तलावाच्या आजू बाजूच्या चाळी व वसाहतीत घरांचे व गटाराचे सांडपाणी तलावात सोडले जात असल्याने साफ सफाई केलेल्या तलावाला अस्वच्छतेने व दुर्गंधीने ग्रासले व पुन्हा तलावातील अस्वच्छ पाण्यावर जलपर्णीने विळखा घातल्याने तलावावर हिरवी झालर पसरू लागल्याने सुशोभीकरणा वर केलेला कोट्यावधी रूपयाचा खर्च वाया गेला आहे. 


एका कोपर्यात दुर्गंधीच्या गर्तेत तलाव शेवटची घटका मोजत निपजित पडल्याचे दिसून आहे.दुरावस्थेत अडकलेल्या तलावाच्या प्रवेशद्वारा वर आजू बाजूच्या परिसरात राहणारे नागरिक कचरा आणून टाकीत असल्याने प्रवेश द्वारालाच कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे तर या तलावाच्या लगतच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून  बाजूच्या भागा जाणाऱ्या अवजड चारचाकी वाहना मुळे यारस्त्यावरील गटारांची झाकणे तुटली असल्याने या उघड्या गटारा पासून बचाव करत येजा करावी लागत आहे.
 

सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले या तलाव वारंवार साफ केला जातो तसेच आजू बाजूच्या परिसराची साफ सफाई केली जाते मात्र या तलावाच्या आजू बाजूच्या परिसरातील स्थानिक लोक व मच्छी विक्रेत्यांची चिकन मटण विक्रेत्यांची दुकानदार आपल्या दुकानातील घाण व कचरा तलावात टाकतात तसेच या दुकानदारा माल पुरविण्यासाठी येणाऱ्या गाड्यामुळे रस्त्यावरील गटारांची चेंबर तुटले जातात या बाबत अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले  पालिका प्रशासन कचरा टाकणाऱ्या या दुकांदारावर  कारवाई करावी तसेच उघड्या गटारांची चेंबरची झाकणे बसवावी या साठी नजीकच असलेल्या रिक्षा स्टॅन्ड मधील रिक्षा चालकांनी पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे मात्र पालिका प्रशासन दुलक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले तलावा शेजारी रस्त्यावरील उघड्या चेंबर मुळे आजू बाजूच्या परिसरात राहणारे वृद्ध नागरिक व लहान मुलांना आपला जीव वाचावीत रस्त्यावरून येजा करावी लागत असल्याने रस्त्यातील गटारांच्या चेंबरची तुटलेली झाकणे मृत्यूचा साफळा बनली आहेत.

Friday 29 October 2021

एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळीही अंधारात !! "आज पासून एसटी कर्मचाऱ्यांचे आगारात उपोषण सुरू"

एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळीही अंधारात !!

"आज पासून एसटी कर्मचाऱ्यांचे आगारात उपोषण सुरू"


संदीप शेंडगे/प्रतिनिधी दि. २८ 
कल्याण : एसटी कर्मचाऱ्यांची यावर्षाची दिवाळीही अंधारात जाणार असल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.


गेल्या वर्षी कोरोना काळात कामगारांना दिवाळी बोनस त्याचप्रमाणे महागाई भत्ता व पगारवाढ देण्यात आली नव्हती. तरीही कामगारांनी कोणतेही आंदोलन न करता कोरोना काळातही आपली नियमित सेवा पुरविली होती.
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळ सातत्याने दुर्लक्ष करीत असून त्यांना वेठबिगार कामगारांप्रमाणे काम करायला भाग पाडत आहेत.
दिवाळी सण दोन दिवसावर आली असून अद्याप कामगारांना दिवाळी भेट सानुग्रह अत्यंत तुटपुंजे २५००/-   देण्याची महामंडळ प्रशासनाने घोषणा केलेली आहे. तसेच दिवाळीपूर्वी वेतन मिळणार की नाही याची शाश्वती नाही याचाच निषेध म्हणून कामगारांनी कामगार आयुक्त कल्याण यांच्याकडे एक निवेदन देऊन दि.२८ ऑक्टोंबर गुरुवार पासून एस टी महामंडळाच्या कल्याण आगारात राज्यव्यापी उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे.


काय आहेत कामगारांच्या मागण्या ?

महागाई भत्ता १२ टक्क्याहून २८ टक्के वाढला असून अद्यापही कामगारांना वाढीव भत्ता दिलेला नाही तसेच महागाई भत्त्याची ३ टक्के थकबाकी देण्यात आलेली नाही.

१ ऑक्टोंबर २०२१ महागाई भत्त्यात २८ टक्के वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्येक पगारात महागाई भत्ता देण्यात यावा.

ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळी सण साजरा करण्याकरिता दिवाळीपूर्वी देण्यात यावे.

सण उत्सव साजरा करण्यासाठीची उचल रक्कम १२५०० दिवाळीपूर्वी देण्यात यावी.

दिवाळी भेट पंधरा हजार रुपये रोख देण्यात यावे.


यांसह कामगारांच्या विविध मागण्यांकरिता कामगार कल्याण आगारात उपोषणाला बसले असून या उपोषणास एसटी महामंडळाच्या सर्वच कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे


यामध्ये प्रामुख्याने : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना महाराष्ट्र एसटी कामगार सेना ; म मो का फेडरेशन ;
राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस इंटक ; महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना ; कास्ट्राईब राज्य परिवहन एसटी कर्मचारी संघटना सहभागी झाले आहेत तसेच अ मा सणभोर, धनंजय रायकर नितीन खंडागळे, दत्तात्रय अडांगळे, यांसह २८७ कामगारांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.


या सर्व संघटनांच्या वतीने कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल असे कामगारांनी सांगितले आहे.


या उपोषणाबाबत कल्याण आगार प्रमुख विजय गायकवाड यांना विचारले असता कामगारांचे उपोषण आंदोलन कायदेशीर नसून अत्यावश्यक सेवा कामगारांच्या मागण्या रास्त असून कामगारांनी एसटी महामंडळाच्या इतर कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास मज्जाव करू नये त्यांच्या मागण्यांचा महामंडळ योग्य तो विचार करीत असून लवकरच तोडगा काढण्यात येईल दिवाळी सण तोंडावर असताना कामगारांनी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन उपोषण करणे योग्य नाही असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

असे असले तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर सणासुदीच्या दिवसात एसटी कामगार संघटनांनी उपोषण पुकारल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने महामंडळाने कामगारांच्या मागण्यांचा विचार करून योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे.

कल्याणात बाराशे सेहचाळीस रिक्षावर ओव्हसीट प्रकरणी कारवाई, अडीच लाख रुपयांची दंडवसुली, शहर शाखेची कारवाई !!

कल्याणात बाराशे सेहचाळीस रिक्षावर ओव्हसीट प्रकरणी कारवाई, अडीच लाख रुपयांची दंडवसुली, शहर शाखेची कारवाई !!


कल्याण, (संजय कांबळे) : ओव्हरसीट भरून स्वतः सह नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करणाऱ्या रिक्षा विरोधात कल्याण शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू केली असून १ आँक्टोबर ते २८ आँक्टोबर २०२१ पर्यंत एकूण १२४६ रिक्षावर कारवाई करून सुमारे २ लाख ४९ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.


कल्याण शहरात दररोज तूफान वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण एसटी स्टँड, परिसर, सागर भानू टाँकिज, छाया टाँकिज, शिवाजी चौक, सहजानंद चौक, बैलबाजार, कल्याण स्टेशन परिसर, तसेच कल्याण पुर्व परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याला सर्वस्वी रिक्षाच जबाबदार असतात, असे सर्वसामान्य नागरीकांचे मत बनलेले आहे. पण यासह रस्त्यावरील फेरिवाले, अनाधिकृत वाहन पार्किंग, हातगाड्या, भाजीपाला विक्रेते, दुकानदारांचे रस्त्यावर ठेवलेले साहित्य, या सगळ्यांचा परिणाम म्हणून, कल्याण बिर्लागेट, कल्याण दुर्गाडी, कल्याण शिळ, कल्याण नेवाळी या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी बघायला मिळते, याचा ताण शहर वाहतूक शाखेवर कायमच येत असतो.

कोरोनाच्या काळात अनेक वाहतूक व्यवस्था बंद होत्या, आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने, तसेच कोरोना नियमांमध्ये शिथीलता दिली गेल्याने आता सर्व जनता बाहेर पडू लागली आहे. रेल्वे, एसटी बस, आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुर्ण क्षमतेने सुरू झाल्याने आता प्रवाशांची संख्या वाढत आहे, असे असले तरीही कोरोनाचे संकट पुर्ण पणे नष्ट झाले नाही. म्हणून शासनाने रिक्षा मध्ये ३ प्रवाशांना प्रवास करणाची परवानगी दिली आहे.

कल्याण शहरात ५४ हजार रिक्षा आहेत, तरीही काही ठिकाणी ४,५ प्रवासी भरून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे नागरिक करत असल्याने, तसेच हे प्रवाशासह, नागरीकांच्या जिवीतास धोकादायक असल्याने कल्याण शहर वाहतूक शाखेने त्यांच्या हद्दीत ओव्हरसीट वाहतूक करणाऱ्या रिक्षा विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. 

त्यामुळे १ आँक्टोबर ते २८ आँक्टोबर २०२१ पर्यंत एकूण १२४६ रिक्षावर कारवाई करून सुमारे २ लाख ४९ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता कल्याण परिसरात रिक्षामध्ये ३ प्रवासी दिसून येत आहेत. 

यासंदर्भात कल्याण शहर वाहतूक शाखेचे "वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील" यांना विचारले असता ते म्हणाले, प्रवाशांनी पुढे बसू नये, तसेच रिक्षाचालकांने देखील ओव्हरसीट भरून स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे अवाहन करून ४/५ वेळा रिक्षावर कारवाई झाली तर त्यांचे लाईसन्स बाद करण्यासाठी आरटीओकडे शिफारस करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे ऐण दिवाळी सणासुदीच्या दिवसात कल्याणात रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचे काम शहर वाहतूक शाखा करते हे नक्कीच कौतुकास्पद आहे. हे कारवाईचे सातत्य कायम रहावे हीच नागरिकांची अपेक्षा आहे तर कल्याण आरटीओ ने देखील अशी धडक मोहीम उघडावी असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष शेलार यांनी व्यक्त केले.

पथ नाट्यातून शून्य कचरा मोहिमेची जनजागृती ..... "कल्याणातील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सादर केले पथनाट्य".

पथ नाट्यातून शून्य कचरा मोहिमेची जनजागृती .....

"कल्याणातील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सादर केले पथनाट्य".


कल्याण :- देशात नव्हे तर संपूर्ण जगात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चलला असून कचरा हा आरोग्याला धोकादायक असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वच स्थरातून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनेही पालिका क्षेत्रातील जमणार्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी ढोस पावले उचलली असून शून्य कचरा मोहीम राबविली आहे ओला सुका कचरा वर्गीकरण करणे तसेच अपायकारक कचरा  या विषयी जनजागृती करण्यासाठी कल्याणातील महाविद्यालयाची मदत घेण्यात आली आहे. 


पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व कल्याणातील नूतन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शून्य कचरा मोहिमे अंतर्गत माझा कचरा माझी जबाबदारी  पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन कला शिक्षक श्रीहरी पवळे यांनी करीत विद्यार्थ्यानी या पथ नाट्यात सहभाग घेतला होता.


पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त 
रामदास कोकरे यांनी सकाळी दहा वाजता पार नाका येथे पथनाट्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले .नूतन विद्यालयांच्या विद्यार्थ्यानी साईचौक खडकपाडा, डी वॉर्ड चक्की नाका या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली या पथनाट्यासाठी साथ संगीत शाहीर स्वप्नील सिरसाठ यांनी केले कल्याण शहर आपके घरच आहे असे समजुन स्वच्छता राखा या अवाहना पथनाट्यातून संदेश देण्यात आला कल्याणकर नागरीकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले जनजागृतीच्या पथनाट्याला नूतन विद्याळ्याच्या मुख्याध्यापिका रेश्या सय्यद व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.तर विशेष सहकार्य सरस्वती विद्यालयाचे शिक्षक  अजयकुमार जोगी लाभले होते.


Thursday 28 October 2021

गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आर्यन खानला जामीन मंजूर.!!

गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आर्यन खानला जामीन
मंजूर.!!


भिवंडी, दिं 29, अरुण पाटील (कोपर) :
        २८ ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. आर्यन खानसह अरबाज आणि मुनमुन धमेचा यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संध्याकाळी 6 वाजता आर्यन खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यावर त्यावर आर्यन खान हसला आणि तुरुंग कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आर्यनला जामिनाची बातमी मिळाल्यावर तो खूप खूश  झाला.
           आर्यन खाननं रात्री उशीरापर्यंत जेवण केलं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खाननं त्याच्या बॅरेकमधील काही कैद्यांशी ओळख केली होती. आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी कळताच तो त्या कैद्यांकडे गेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आणि सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलं.
        सलग तीन दिवस आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच आर्यन, अरबाज, मुनमुन तुरुंगातून बाहेर पडू शकणार आहेत. तिघंही शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगातून सुटू शकतील. आर्यन खानच्या वकिलांना तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर स्टारकिडला जामीन मिळवून देण्यात यश आलं आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज दोनदा फेटाळला होता.
          गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आर्यनला जामीन मंजूर झाला. त्यानंतर नवाब मलिक यांनी 5 वाजून मिनिटांनी एक ट्विट केलं. त्यांनी प्रतिक्रियाही फिल्मी स्टाईलमध्ये आहे. 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' एवढंच ट्विट त्यांनी केलं.उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी कालची रात्र आर्यनला तुरुंगात राहावं लागलं. या तिघांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरच्या पहाटे एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. यांना अटकेत घेतल्यानंतर तिघांनाही 25 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांचा हुनर बिझनेस नेटवर्क यांच्या सहकार्याने फ्री मेडिकल कॅम्प !!

आरोग्यम्  धनसंपदा फाउंडेशन यांचा हुनर बिझनेस नेटवर्क यांच्या सहकार्याने फ्री मेडिकल कॅम्प !!


मुंबई, बातमीदार : 25/10/2021 रोजी हुनर बिझनेस नेटवर्क आणि आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांच्या माध्यमातून जेष्ठ महिला विधवा आश्रम. मुंबई (widows Home. Byculla). येथे फ्री मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला.


हुनर बिझनेस नेटवर्क चे फाउंडर शगुफ्ता मुमताज आणि ब्रँड ॲम्बेसेडर असिफ नूर हसन आणि आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील आणि डॉ. सुनील महाजन. यांच्या प्रयत्नाने 22 विधवा महिलांना मेडिकल चेकअप कॅम्प आणि औषधी मोफत देण्यात आले.


22 विधवा महिला साठी मनोरंजनासाठी. डान्स. सिंगिंग. गिफ्ट. आणि जेवण देऊन त्यांच्या चेहर्‍यावर हास्य निर्माण केले.


विशेष सहकार्य : शगुफ्ता मुमताज. मुमताज अहमद शेख. आसिफ नूर हसन.जितेंद्र पाटील. डॉ. सुनील महाजन. नूतन चोगुले.रवीका दुगल. रुखसाना शकील अन्सारी. अनुपमा पाधी. शहीना. रितू मनीक. फॉउंझीया घोजरिया. झोया ( कौसर परिहार ).. हुनर बिझनेस नेटवर्क टीम आणि आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन. कल्याण यांचे विशेष सहकार्य लाभले.

जितेंद्र पाटील : 9970219877 / 8169741997





अभिषेक मोरे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला होता आंदोलनाचा इशारा.!! ------------------- "युवासेनेच्या मागणीला यश"

अभिषेक मोरे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला होता आंदोलनाचा इशारा.!!
-------------------
"युवासेनेच्या मागणीला यश"


कल्याण, (अण्णा पंडित) : कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थी, पालक अथवा संबंधितांना कोरोना झाल्यास ते स्वतः जबाबदार राहणार असल्याबाबतचे हमीपत्र विद्यार्थ्यांकडुन लिहुन घेतले जात होते. बिर्ला महाविद्यालय प्रशासनाचे सदरचे कृत्य असंवैधानिक आणि गैर असुन शासनाने असे कुठलेच निर्देश महाविद्यालय आणि शाळा कॉलेजला दिले नसल्याचे युवासेनेच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्था चालकांच्या निदर्शनास आणून दिले. 


विद्यार्थी किंवा पालकांकडून 'कोरोनाची लागण झाल्यास महाविद्यालय जबाबदार असणार नाही किंवा संसर्ग झाल्यास तुम्ही स्वतः जबाबदार असाल'. अशा आशयाचे हमीपत्र लिहून देण्याची सक्ती बिर्ला महाविद्यालय प्रशासन व प्राचार्यांकडून करण्यात येवू नये यासाठी युवासेना कल्याण उपजिल्हा अधिकारी अभिषेक अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बिर्ला महाविद्यालयाचे संचालक नरेशचंद्र आणि महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. 


यांच्यासोबत हमीपत्रामध्ये बदल किंवा हमीपत्र रद्द करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असुन संचालक नरेशचंद्र यांनी युवासेनेची विनंती मान्य करून लगेचच संबंधित हमीपत्रामध्ये बदल करण्याचे निर्देश सबंधितांना दिले आहेत. 


अभिषेक मोरे यांच्या नेतृत्वाखाली भेट देण्यास गेलेल्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा चिटणीस सुचेत डामरे, शहर अधिकारी भुषण तायडे, विधानसभा अधिकारी अभिजित बोले, विधानसभा समन्वयक प्रतिक पेणकर, मोहोने-टिटवाळा शहर अधिकारी दिनेश निकम उपस्थित होते.


1 रुपयात 1 किलो रवा मैदा व साखर वाटप !! "12 हजार कुटुंबाची दिवाळी झाली गोड"

1 रुपयात 1 किलो रवा मैदा व साखर वाटप !!
"12 हजार कुटुंबाची दिवाळी झाली गोड"


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कोरोना महामारी मुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे नागरिकांना दिवाळी सण कसा साजरा करावा.


या विचारात असतांना डोंबिवलीतील नगरसेवक वामन म्हात्रे व गोरखनाथ बाळा म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिम विभागात 1 रुपयात 1 किलो साखर रवा व मैदा देऊन सुमारे 12 हजार नागरिकांची दिवाळी गोड केली, या कार्यक्रमाला वामन सखाराम म्हात्रे, गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे, अनमोल मात्रे, कविता म्हात्रे, अश्विनी मात्रे, मुकुंद मात्रे, संदीप सामंत, मनोज वैद्य, महेश तावडे, दिलीप धनावडे, लक्ष्मण म्हात्रे, राम मात्रे, राजू सावंत, राहुल जाधव, साक्षी मांडवकर, संजना डोरले कर, सोनल सुर्वे इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले,


Wednesday 27 October 2021

मंडणगड आगारातील बसेस आरटीओ पासींगसाठी रत्नागिरीत !! "ग्रामीण भागातील एसटी फेऱ्यांना होतोय विलंब विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक नागरिकांचे हाल".

मंडणगड आगारातील बसेस आरटीओ पासींगसाठी रत्नागिरीत !!

"ग्रामीण भागातील एसटी फेऱ्यांना होतोय विलंब विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक नागरिकांचे हाल".


मंडणगड, बातमीदार : मंडणगड आगारातील गाड्या आरटीओ पासींगसाठी रत्नागिरीत गेलेल्या असल्याने ग्रामीण भागातील प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. त्यामुळे आंबडवे विद्यानगरी येथे उच्च महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक व नागरिकांची गैरसोय झाली.

या संदर्भात आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता काही गाड्या आरटीओ पासींग रत्नागिरीत येथे गेलेल्या असल्याने तीन गावातील प्रवासी फेऱ्या विलंबाने सोडण्यात आल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यासंदर्भात प्रवासी व आगार व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीत तफावत असुन सुमारे नऊ गाड्या मंडणगड आगारातून विलंबाने सुटल्याची माहिती पुढे येत आहे मात्र आगार व्यवस्थापन केवळ दोन व तीन गाड्या गाड्यांनाच विलंब झालेला असल्याचे सांगत आहे.

आरटीओ पासींगसाठी आगारातील गाड्या वेळोवेळी रत्नागिरीत जात असतात त्याचे आगाऊ नियोजन होणे आवश्यक आहे एकाही गाडीला विलंब करणे हे समस्येचे घातक ठरणारे आहे कोरोना नियमांमध्ये शिथिलता असल्याने ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय नुकतीच सुरू झाली आहेत व शैक्षणिक कारणासाठीचा प्रवास हा एसटीवर अवलंबून असल्याने आगावू सुचना न देता गाडीच्या वेळापत्रकात झालेला बदल अडचणीचा ठरू शकतो गाड्यांना विलंब झाल्याने मंडणगड वरून आंबडवे येथे प्रवास करून जाणारे विद्यार्थी महाविद्यालयात पोहचु शकत नाहीत. 

याशिवाय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गाड्या वेळेवर न गेल्याने कामकाजाच्या वेळेत महाविद्यालयामध्ये आपली उपस्थिती नोंदवणे शक्य झाले नाही त्याच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

!! प्रभो शिवराया !! - प्रासंगिक कविता (संतोष गावडे / पत्रकार - वृत्तपत्र लेखक)

प्रासंगिक कविता --------------------- !! प्रभो शिवराया !! झुकेल मस्तक सदैव अमुचे महाराज तुमच्या चरणी ते सुर्य चंद्र अन् तारे जोव...