Friday 29 October 2021

कल्याणात बाराशे सेहचाळीस रिक्षावर ओव्हसीट प्रकरणी कारवाई, अडीच लाख रुपयांची दंडवसुली, शहर शाखेची कारवाई !!

कल्याणात बाराशे सेहचाळीस रिक्षावर ओव्हसीट प्रकरणी कारवाई, अडीच लाख रुपयांची दंडवसुली, शहर शाखेची कारवाई !!


कल्याण, (संजय कांबळे) : ओव्हरसीट भरून स्वतः सह नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करणाऱ्या रिक्षा विरोधात कल्याण शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू केली असून १ आँक्टोबर ते २८ आँक्टोबर २०२१ पर्यंत एकूण १२४६ रिक्षावर कारवाई करून सुमारे २ लाख ४९ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.


कल्याण शहरात दररोज तूफान वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण एसटी स्टँड, परिसर, सागर भानू टाँकिज, छाया टाँकिज, शिवाजी चौक, सहजानंद चौक, बैलबाजार, कल्याण स्टेशन परिसर, तसेच कल्याण पुर्व परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याला सर्वस्वी रिक्षाच जबाबदार असतात, असे सर्वसामान्य नागरीकांचे मत बनलेले आहे. पण यासह रस्त्यावरील फेरिवाले, अनाधिकृत वाहन पार्किंग, हातगाड्या, भाजीपाला विक्रेते, दुकानदारांचे रस्त्यावर ठेवलेले साहित्य, या सगळ्यांचा परिणाम म्हणून, कल्याण बिर्लागेट, कल्याण दुर्गाडी, कल्याण शिळ, कल्याण नेवाळी या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी बघायला मिळते, याचा ताण शहर वाहतूक शाखेवर कायमच येत असतो.

कोरोनाच्या काळात अनेक वाहतूक व्यवस्था बंद होत्या, आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने, तसेच कोरोना नियमांमध्ये शिथीलता दिली गेल्याने आता सर्व जनता बाहेर पडू लागली आहे. रेल्वे, एसटी बस, आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुर्ण क्षमतेने सुरू झाल्याने आता प्रवाशांची संख्या वाढत आहे, असे असले तरीही कोरोनाचे संकट पुर्ण पणे नष्ट झाले नाही. म्हणून शासनाने रिक्षा मध्ये ३ प्रवाशांना प्रवास करणाची परवानगी दिली आहे.

कल्याण शहरात ५४ हजार रिक्षा आहेत, तरीही काही ठिकाणी ४,५ प्रवासी भरून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे नागरिक करत असल्याने, तसेच हे प्रवाशासह, नागरीकांच्या जिवीतास धोकादायक असल्याने कल्याण शहर वाहतूक शाखेने त्यांच्या हद्दीत ओव्हरसीट वाहतूक करणाऱ्या रिक्षा विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. 

त्यामुळे १ आँक्टोबर ते २८ आँक्टोबर २०२१ पर्यंत एकूण १२४६ रिक्षावर कारवाई करून सुमारे २ लाख ४९ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता कल्याण परिसरात रिक्षामध्ये ३ प्रवासी दिसून येत आहेत. 

यासंदर्भात कल्याण शहर वाहतूक शाखेचे "वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील" यांना विचारले असता ते म्हणाले, प्रवाशांनी पुढे बसू नये, तसेच रिक्षाचालकांने देखील ओव्हरसीट भरून स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे अवाहन करून ४/५ वेळा रिक्षावर कारवाई झाली तर त्यांचे लाईसन्स बाद करण्यासाठी आरटीओकडे शिफारस करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे ऐण दिवाळी सणासुदीच्या दिवसात कल्याणात रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचे काम शहर वाहतूक शाखा करते हे नक्कीच कौतुकास्पद आहे. हे कारवाईचे सातत्य कायम रहावे हीच नागरिकांची अपेक्षा आहे तर कल्याण आरटीओ ने देखील अशी धडक मोहीम उघडावी असे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष शेलार यांनी व्यक्त केले.

1 comment:

  1. Ani je MMRDA che kaam chalu aahe te tumhala dist nahi ka ya paise khaun news tayar karta
    #rikshachalmalak

    ReplyDelete

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !! भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत कॉंग्रेसचा म...